अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
F
08-11-2023
वरोरा - भद्रावती मतदार संघातील शेतकऱ्यांत खूशीची लहर
जिल्हयातील कृषिपंपांना दिवसा थ्री फेस वीजपुरवठा होणार आहे. या मागणीसाठी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लावलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वात ३ - ११ - २०२३ रोजी सकाळी ११ वाजता उपविभाग वरोरा येथे कार्यालयाला कुलूप लावून आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतली असून हि मागणी पूर्ण केली आहे. सर्व शेतकरी बांधवांकडून आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे आभार मानले आहे.
चंद्रपूर जिल्हा हा एक ऊर्जानिर्मिती करणारा जिल्हा आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत. वरोरा - भद्रावती मतदार कृषी पंपांना अखंडित वीजपुरवठा होत नसल्याने शेतकरी बांधव हवालदिल होते. म. रा. वि. वि. कंपनीने थ्री फेस वीजपुरवठ्याचे जिल्ह्यात वेळापत्रक घोषित केले होते. आता रात्री ऐवजी सर्व कृषिपंपांना दररोज दिवसा वीजपुरवठा होणार आहे. त्यामुळे वरोरा - भद्रावती मतदार संघातील शेतकऱ्यांत खूशीची लहर आहे.
या निर्णयामुळे वरोरा - भद्रावती मतदार संघातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कृषी उत्पादन वाढण्यास मदत होईल. तसेच, हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यांपासून शेतकऱ्यांचे बचाव होईल.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments