समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
F
28-12-2023
खा. अशोक नेते यांनी श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाला सदिच्छा भेटीत केले आश्वस्त
श्री संत नगाजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सवात दोन दिवसीय कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवसी गोपाल काला निमित्त गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी सदिच्छा भेट दिली असता संत नगाजी महाराज यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला व समाजाच्या सामाजीक समस्या जाणून घेत खासदार निधीतून दहा लक्ष रुपयांचे संत नगाजी महाराज यांचे नावाने सामाजीक सभागृहाच्या मागणीला आश्वस्त केले. त्यामुळे येत्या काही दिवसात चिमूर मध्ये श्री संत नगाजी महाराज यांचे सामाजीक सभागृह होनार आहे.
श्री संत नगाजी महाराज सामाजीक सेवा समिती चिमूरच्या वतीने श्री क्षेत्र माणीक नगर येथे श्री संत नगाजी महाराज यांचा दोन दिवसीय पुण्यतिथी महोत्सव २७,२८ डिसेंबर ला आयोजीत करण्यात आला होता. याप्रसंगी श्री. संत नगाजी महाराज सामाजिक सेवा समिती व्दारे खासदार अशोक नेते यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजापा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष बालू पिसे, शहर अध्यक्ष बंटी वनकर, संत नगाजी महाराज सेवा समिती चे अध्यक्ष देवेंद्र कडवे, उपाध्यक्ष गजानन बनसोड, सचिव अरूण चिंचूलकर, सहसचिव दिवाकर पुंड, कोषाध्यक्ष रामभाऊ खडसिंगे, सदस्य रामदास मांडवकर, निलकंठ जमदाडे, रमेश मेंढूलकर, शेखर एकोनकर, अंकूश पुंड, महादेव सुर्यवंशी, अक्षय लांजेवार, भाजपा महामंत्री श्रेयस लाखे, अमित जुमडे, भाजपा शहर अध्यक्ष सचिन फरकाडे, प्रशांत नरुले, सूरज नरुले, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला परिसरातील बहुसंख्य महिला पुरुष उपस्थित होते.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments