नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
F
04-08-2024
आमदार बंटी भांगडीया यांनी केली जखमीला औषध उपचारासाठी आर्थिक मदत
चिमूर -
शेतमजूर शेतातील काम आटोपून झुडूपात दबा धरून बसलेल्या वाघाला पाहण्यासाठी सायंकाळी घटना स्थळावर आला होता. दरम्यान वनाधिकारी यांनी वाघाला घटना स्थळावरून पिटाळून लावण्यासाठी सोबतीला शेतमजूराला घेतले होते. शेतकरी ओरडत झुडुपाच्या दिशेने जात असताना वाघाने डरकाळी फोडत शेतमजुराच्या मानेवर हल्ला चढवीला वाघाचा प्रतिकार करत शेतमजुराने उजवा हात आडवा केला असतानाच वाघाने हाताचा पंजा जबड्यात घेत सोलला असल्याची घटना रविवार ला सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान चिमूर प्रादेशिक वनविभागाच्या उरकुडपार शेत शिवारात घडली जखमी शेतमजूरांचे नाव दामोधर नन्नावरे वय ६३ वर्ष नवेगाव (पेठ) उरकुडपार येथील रहीवासी रहीवासी आहे.
गरडापार येथील शेतकरी कवडू सावसाकडे शेतात धानाचे रोवणी करत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला असता पाट, मनगट, पोट व भूजाला जबर मार आहे. कवडू ओरडल्याने तेथून तो वाघ दुसरीकडे जात असताना दुसरा शेतकरी शेतात काडया गाडत असताना त्याच्यावर हल्ला केला त्या शेतकऱ्यांचे नाव बालाजी नन्नावरे वय ५२ वर्ष रा गरडापार येथील रहीवासी असून याला वाघाने पंजा मारला असता हात कंबर पोटाला जबर मार आहे हि घटन पाऊन वाजता घडली. त्यानंतर वाघ उरकुडणार शेत शिवारात आला तिसरा व्यक्ती वनमजूर अडीज वाजता नर्सरीत काम करित असताना वाघाने त्याच्यावर हल्ला चढवीला त्या वन मजूराचे नाव बाबाराव दडमल असून त्याच्या पोट, मांडी, हात, डोक्याला व छातीला जबर मार व शरीराच्या काही भागाला वाघाने पंजाच्या सहायाने गंभीर जखमा केल्या आहेत.
गरडापार, उरकुडपार येथील गावकऱ्यांनी चिमूर प्रादेशिक वन विभागाला माहिती दिली असता वन विभागाचे अधिकारी कर्मचारी उशीराने घटना स्थळावर पोहचले. तो पर्यंत दोघांना वाघाने घायल केले होते. दरम्यान एका पाठोपाठ चार व्यक्तींना वाघाने घायल केले. यांना प्राथमिक उपचारासाठी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले.या चारही लोकांना जबर मार गंभीर जखमा असल्याने आमदार बंटी भांगडीया यांच्या सुचनेनुसार भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, युवा मोर्चा प्रदेश सचिव मनिष तुम्पल्लीवार, तालूका अध्यक्ष बाळू पिसे, तालूका महामंत्री प्रशांत चिडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक कैलास धनोरे, रमेश कंचर्लावार, सतिश जाधव, कुणाल कावरे आदी भाजप कार्यकर्त्यांनी जखमीची भेट घेत औषध उपचारासाठी आर्थिक मदत करत नागपूरला रेफर केले.
पाच वाजताच्या दरम्यान परिसरात पावसाला सुरुवात झाली. दुपार पर्यंत त्या वाघाला पिटाळून लावण्यासाठी वनविभागाने कोणतीही उपाय योजना केली नाही. त्यामुळे हा अनर्थ घडला. पुन्हा हा वाघ किती लोकांना घायल करणार ? असे शेतकरी बोलत असून वनाधिकाऱ्यांनी शेतमजूरी करणाऱ्या दामोधर नन्नावरे ला वाघाला पिटाळून लावण्यासाठी सोबतीला घेतले तो आरडा ओरड करितानांच वाघाने त्याच्यावर वाघाने हल्ला चढवून त्याचा हात आपल्या जबडयात घेऊन सोलला हा अनर्थ वनाधिकारीच्या निष्काळजीपनाने घडला त्यामुळे त्यांच्या हाताचा पंजा निकामी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे नागरीक बोलत आहे. मात्र एका पाठोपाठ एक प्रमाणे वाघाने जखमी करण्याचा सपाटा लावल्याने शेतकऱ्यांत दहशत निर्माण झाली असून वन विभागाने तात्काळ वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. वनाधिकारी यांच्यासी मोबाईलवरून संपर्क साधला असता टोलवा टोलवीची उत्तरे मिळत होती.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments