STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
F
15-08-2024
आमदार बंटी भांगडीया यांनी घेतली मृत समीरच्या कुंटूबाची सांत्वन पर भेट
चिमूर -
तालुक्यातील मजरा (बे.) येथील स्व. समीर वामन राणे १९ वर्ष या युवकाचा दि. ७ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीमुळे नाल्याला आलेल्या पुरात बैलजोडीसह वाहून गेल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता १५ ऑगस्ट स्वांतत्र दिनी गुरुवारला दुपारी आमदार बंटी भांगडीया यांनी मृतकांच्या निवासस्थानी कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन कुटुंबीयांना धीर देत शासनाच्या वतीने नैसर्गिक आपत्ती मधून मृत युवकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत ४ लक्ष रुपये व बैलजोडी नुकसान भरपाई ६४ हजार रुपयांचा धनादेश देन्यात आला.
यावेळी तहसीलदार चिमूर श्रीधर राजमाने,भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा तालूका महामंत्री हेमराज दांडेकर, सं.गां.नि.अ.यो. समिती अध्यक्ष संजय नवघडे, भाजपा ज्येष्ठ नेते मजहर शेख, भाजपा ज्येष्ठ नेते घनश्याम डुकरे, माजी पं. स. सदस्य अजहर शेख, भाजपा ज्येष्ठ नेते गिरीश भोपे, भाजपा ज्येष्ठ नेते विनोद रणदिवे, भाजयुमो चिमूर शहराध्यक्ष बंटी वनकर ,भाजपा नेते दशरथ नन्नावरे, भाजयुमो चिमूर शहर महामंत्री अमित जुमडे, सरपंच ग्रा. पं. रेंगाबोडी मारोती रहाटे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष वेणूदास बारेकर आदी भाजपा नेते पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments