CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
F
29-08-2023
चिमूर येथील गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमुरचे माजी प्राचार्य डॉ. पी. व्ही. अंथोनी वय ६६ वर्ष यांचे मंगळवारला सकाळी दहा वाजता दरम्यान माणिक नगर येथील निवासस्थानी (व्हीला) येथे हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले.
डॉ. अंथोनी हे ख्रिश्चन धर्माचे असुन राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय, चिमूर येथे सन १९९१ ते २००३ या काळात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. नागपूर विद्यापीठाने त्यांना सन २००४ मध्ये पदोन्नती देत त्याच महाविद्यालयात प्राचार्य पदावर नियुक्त केले होते. त्या नंतर त्यांनी सन २०१९ पर्यंत सेवा देत सेवानिवृत्त झाले होते. ते मुळचे केरळ राज्यातील रहिवासी होते. मात्र, सेवा निवृत्ती झाल्यानंतर येथील ऋणानुबंधाने चिमूर येथेच कायमचे वास्तव्यास होते.
विध्यार्थी प्रिय अशी त्यांची ओळख होती. अनेक विद्यार्थ्यांना घडविण्यात त्यांचे मोलांचे सहकार्य होते. गांधीसेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. दिपक यावले, सचिव विनायक(कन्हैया) कापसे, सहसचिव नारायण डांगाले, सदस्य गोहणे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अश्विन चंदेल, सहकारी प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या. त्यांचेवर बुधवारला ब्रम्हपुरी येथे ख्रिश्चन मिशनरी तर्फे अंतिम संस्कार होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे.
Redefine your style
book your appointment now
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments