RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
F
03-09-2023
तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ता यांची उपस्थिती
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने संपूर्ण राज्यभरात काँग्रेस पक्षाच्या वतीने मोदी सरकारचे अपयश चव्हाट्यावर आणण्यासाठी जनसंवाद पदयात्रा काढण्यात आली आहे. त्याच अनुसंघाने चिमूर तालूका काँग्रेस कमेटीच्या वतीने या जनसंवाद पदयात्राची सुरुवात रविवार ला चिमूर क्रांतिभूमीतील प्रसिद्ध वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची तपोभूमी गोंदेडा येथे पार्थना करून करण्यात आली.
दरम्यान जनतेपर्यत जाऊन जनेतच्या अडचणी, समस्या जानून घेत राज्यातील महागाई, बेरोजगारी, ओबीसी जनगनना, ओबीसी आरक्षण आदी केंद्रातील भाजप आणि राज्यातील ED सरकाचे अपयश लोकांना सांगण्यात येणार आहे. ही जनसंवाद पदयात्रा पहिल्या दिवशी गोंदेडा येथून निघून पळसगांव - विहीरगाव मार्गे मासळ येथे येवून पदयात्रेचे सभेत रूपांतर होवून मासळ ला मुक्काम राहनार आहे. या जनसंवाद पदयात्रेत प्रदेश काँग्रेस कमेमिटीचे महासचिव अविनाश वारजूकर प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग प्रदेश संघटक धनराज मुंगले ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष डॉ सतिश वारजूकर जिल्हा काँग्रेस सरचिटनीस गजानन बुटके सेवादल काँग्रेसचे प्रा. राम राऊत काँग्रेस तालूका अध्यक्ष विजय गांवडे काँग्रेस पर्यावरण समितीचे अध्यक्ष प्रदिप तळवेकर किशोर शिंगरे विलास डांगे नागेंद्र चट्टे अक्षय लांजेवार पप्पू शेख वामन गेडाम प्रशांत डवले तालुक्यातील युवक, महिला, शेतकरी, काँग्रेस सर्व सेल अध्यक्ष काँग्रेस कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ही जनसंवाद यात्रा दहा दिवसात तालुक्यातील २१४ कि मी चा टप्पा पार करनार आहे. असे त्यामुळे या जनसंवाद पदयात्रेत परिसरातील नागरीकांनी सहभाग दर्शवावा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी महासचिव डॉ. अविनाश वारजूकर यांनी केले आहे.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments