अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
F
24-08-2023
जेतवन बुद्ध विहार मालेवाडा यांचे आयोजन
.........................................
मानवी मूल्यांचा प्रचार-प्रसार व संस्कार करण्याच्या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंथन समिती, नागपूर द्वारा आयोजीत जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा यांचे सहकार्यातून अखिल भारतीय धम्म ज्ञान परीक्षा- 2023 चे आयोजन मालेवाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत करण्यात आले.
ही परिक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावर आधारीत वस्तुनिष्ठ स्वरुपाची परिक्षा होती गावातील एकूण 38 परीक्षार्थींनी यात सहभाग नोंदवीला. या परीक्षेकरिता बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंथन समिती, नागपूर द्वारा परीक्षार्थींना देण्यात आला होता परीक्षेचे आयोजनात बौध्द पंचकमेटी मालेवाडा, भीमज्योती महिला मंडळ मालेवाडा, प्रबुद्ध विचार मंच मालेवाडा यांचे विशेष सहकार्य लाभले. केंद्र प्रभारी म्हणून असित नीलकंठ बांबोडे यांनी तर केंद्र व्यवस्थापनात प्रदीप मेश्राम, सनय बांबोडे, दिक्षांत शेंडे, साहील शेंडे, प्रशिक बहादुरे, तेजस शेंडे आदींचे सहकार्य लाभले. परीक्षेच्या यशस्वीतेकरिता जगदीश रामटेके, आशिक रामटेके, प्रतिक शेंडे, योगेश मेश्राम यांनी प्रयत्न केले. मुख्याध्यापिका तुरारे ग्रामपंचायत सरपंच कालिदास भोयर यांचे सहकार्य तथा परीक्षार्थींनी यात दर्शविलेला सहभाग याशिवाय हा उपक्रम पूर्ण होऊ शकला नसता असे मत बौध्द पंच कमेटीचे सचिव आशिक रामटेके यांनी व्यक्त केले. सदर परीक्षेचा निकाल व पारितोषिक वितरण 14 ऑक्टो. चे कार्यक्रमात करण्यात येईल
निर्मल जल शुद्धतात का वादा
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments