आयुर्वेदिक पंचकर्म मल्टीस्पेशलिटी क्लिनिक
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
F
25-11-2023
भिसी पोलीस स्टेशन येथील दुर्देवी घटना.
- दोन चिमुकल्या आईविना झाल्या पोरक्या .
पती व पत्नीचे किरकोळ भांडणावरून पत्नी गाड झोपेत असताना डोक्यावर छातीवर दगडाने ठेचून झोपेतच निर्घुण हत्या केली व मृतदेह कपड्याने झाकून ठेवला असल्याची दुर्दैवी घटना भिसी येथे शुक्रवारच्या मध्यरात्रीनंतर घडली आहे. मृतक पत्नीचे नाव करुणा उर्फ शितल सोमेश्वर बाणकर वय २७ वर्ष असुन भिसी येथील रहीवासी आहे. आरोपी पती सोमेश्वर रामा बाणकर वय ४९ वर्ष नगरपंचायत भिसी प्रभाग क्रमांक १७ याला शनिवार ला पोलिसांना माहीती होताच अटक केली.
मृतक करूणा उर्फ शितल सोमेश्वर बाणकर हीचे सासर व माहेर भिसी येथील आहे. प्राप्त माहितीनुसार आरोपी सोमेश्वर बाणकर याची मृतक पत्नी करुणा उर्फ शितल ही चौथी पत्नी आहे. पहिल्या व तिसऱ्या पत्नीचा घटस्फोट झाल्याचे समजते यातील दुसरी पत्नी एकाएकी मरण पावली होती तर चौथी पत्नीची निर्घुण हत्या केली आहे. दरम्यान शनिवार ला सकाळी मृतक करुणाच्या वडीलाने पोलीस स्टेशन भिसी येथे दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करून घटनास्थळ पंचनामा केला व प्रेत उतरणीय तपासणी करिता उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले. नंतर मृतक करुणा चा अंत्यसंस्कार माहेरी भिसी येथे करण्यात आला. मृतक करुणा उर्फ शितलच्या पश्चात दोन व सात वर्षे वयाच्या दोन मुली आहेत. आरोपी वडील सोमेश्वर ने पत्नी करुणा ची हत्या केल्याने दोन्ही चिमुकल्या आई विना पोरक्या झालेल्या आहेत. पुढील तपास चिमूर उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांचे मार्गदर्शनात भिसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश राऊत यांचे नेतृत्वामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन जंगम करीत आहेत. सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments