संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
05-09-2024
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी उत्सव
चिमूर -
शिक्षणाच्या बाबतीत अती मागासलेला म्हणून चिमूर शहराची ओळख होती. या तालुक्यात शिक्षणाच्या पर्यायी सोयी उपलब्ध नसल्यामुळे येथील युवकांना उच्च शिक्षणासाठी बाहेर पडावे लागत असल्याचे वास्तव चिमूर विधान सभा क्षेत्राचे तत्कालीन आमदार विजय वडेट्टीवार यांच्या लक्षात आल तेव्हा त्यांनी कला, वाणिज्य , विज्ञान शाखांचे पदवी पदव्युत्तर कॉलेज शहरात स्थापन केले. आज घडीला अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असले विवीध शिक्षणाच्या माध्यमातून हल्ली दहा वर्ष चिमूर मागे पडले असून शहरात बेरोजगारी वाढली आहे. चिमूर विधान सभा क्षेत्रात विजय वडेट्टीवार यांनी ठेकेदार म्हणून नाही तर समाजाचे देन म्हणून काम केल यापुढेही या क्षेत्रात काम करत राहणार असल्याचे बुधवार ला सायंकाळी दहीहंडी उद्घाटन प्रसंगी मंचावरून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव शिवाणी वडेट्टीवार बोलत होत्या.
चिमूर क्रांती क्रीडा व सांस्कृतीक समितीचे आयोजक संदीप कावरे यांनी नेहरू विद्यालयाच्या प्रांगणात दहीहंडी उत्सव स्पर्धेचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष व उद्घाटक महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवाणी वडेट्टीवार, प्रदेश संघटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी धनराज मुंगल, चिमूर विधानसभा समन्वयक सतिश वारजूकर, सरचिटणीस जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी राजेंद्र लोणारे, अध्यक्ष ओबीसी काँग्रेस प्रदीप तळवेकर, सरपंच साईश वारजूकर, गौतम पाटील, नागेंद्र चट्टे, पलश वारजूकर, नितीन कटारे, अनिल डगवार , डॉ आनंद किन्हाके, रोहन नन्नावरे सारंग मामीडवार, सुभाष मोहीनकर ताहीर शेख, अक्षय नागरिक विलास मोहिनकर, इशांत मामीडवार, प्रविण वरगंटीवार आदी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
विशेष अतिथी धनराज मुंगले म्हणाले की, चिमूर विधानसभा क्षेत्रात विकासाचा कांगावा होत आहे मात्र चिमूर - वरोरा राष्ट्रीय महामार्ग सात वर्षापासून अर्पूणच आहे याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला.
दहीहंडी स्पर्धेत विदर्भातील तेरा संघानी सहभाग दर्शवीला होता. या स्पर्धेतील पुरुषापैकी प्रथम बक्षीस एक लाख एक रुपये कमलबाई नामदेव वडेट्टीवार यांचेकडून जय शितला माता मंदिर ग्रुप बाबुपेठ चंद्रपूर यांनी तर दुसरे बक्षीस महासचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस याचे कडून एक्कावन हजार एक रुपये आदिशक्ती ग्रुप भंडारा यांनी पटकावीले. महिलापैकी पहीले बक्षीस प्रदेश संघटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी ( ओबीसी ) धनराज मुंगले यांचे कडून एकेवीस हजार एक रुपये शिवशाही गर्ल्स ग्रुप राजुरा यांनी पटकावीले. दरम्यान संस्कृती राजू दांडेकर या मुलींने विजय वडेट्टीवार व शिवानी वडेट्टीवार यांचे स्केच फोटो काढून भेट दिले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक प्रा. राजू दांडेकर, आभार नागेंद्र चट्टे यांनी केले कार्यक्रमाला परिसरातीय बहुसंख्य नागरीफ उपस्थित होते.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments