CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
F
20-12-2023
हिरापूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे खंजरी भजन समाज प्रबोधनाचे माध्यम होते हे सर्वश्रृत असले तरी महाराजांनी भजनांच्या माध्यमातुन सामाजकार्य व देश विकासांचा विचार मांडला. अनिष्ठ रुढी परंपरा अंधश्रद्धा जाती धर्म पंत भेद आदीवर कठोर प्रहार करत देव, ईश्वरांचे विशुद्ध स्वरूप त्यांनी समाजापुढे मांडले. तुकडोजी महाराजांनी शेवटच्या क्षणापर्यत खंजरी भजन किर्तनच्या माध्यमातून समाजसेवा व राष्ट्र निर्माण करण्याच कार्य केले असल्याचे मार्गदर्शन डॉ सतिश वारजूकर यांनी केले.
श्री गुरुदेव सेवा मंडळ हिरापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पंचावन वी पुण्यतिथी बुधवार ला पार पडली दरम्यान तिन दिवसीय कार्यक्रम गोपाल काला निमित्त महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय ओबीसी महासंघ उपाध्यक्ष तथा चिमूर विधान सभा समन्वयक डॉ सतिश वारजूकर गुरुदेव भक्तांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
पूढे बोलताना वारजूकर म्हणाले की महारांजाच्या विचारातील राष्ट्र निर्माणाची भावना, विश्वधर्माच्या प्रसाराचे कार्य आणि मानवतावादी प्रेरणेचा विचारप्रवाह आधुनिक काळामध्ये पुढे नेण्याचे कार्य विदर्भाच्या मातीत जन्मलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म २९ एप्रिल १९०९ मध्ये विदर्भातील अमरावती जिल्ह्यात यावली येथे झाला. त्यांचे मूळ नाव माणिक बंडोजी इंगळे (ठाकूर) हे होते. यावेळी, चिमूर विधानसभा युवक कांग्रेस अध्यक्ष रोशन ढोक, माजी पंचायत समिती सदस्य भावना बावनकर, ग्रामपंचायत सरपंच मंगला मुंघांटे, पिताजी बावणकर, गुलाबजी ग्रामगिताचार्य हेमंत मेश्राम, ह.भ.प. लांजुळकर महाराज, रोशन बावनकर, एकनाथ आष्टणकर, दिपक बघिले,आदी उपस्थित होते. यावेळी महाराजांच्या पुण्यतिथीला परिसरातील बहुसंख्य गुरुदेव भक्त उपस्थित होते.
Redefine your style
book your appointment now
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments