संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
F
25-11-2023
गांवाची बदनामी करणाऱ्यांना बसनार चपराक
तालूक्यातील वहाणगांव हे दारूबंदीच्या कारकीर्दीपासून प्रसिद्ध आहे. या गावात शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा हल्ली गावचे सरपंच प्रशांत कोल्हे यांची एक हाती सत्ता तेरा वर्षा पासून आहे.अनेक विषयांमूळे हे गांव चर्चेचा विषय ठरले आहे त्यामुळे गावाची बदनामी करणार्यांना चपराक लावन्याच्या दृष्टिकोनातून व वहानगावची बदनामी थांबविण्यासाठी ग्रामपंचायतची ग्रामसभा शुक्रवार ला पार पडली
वहानगाव येथील अवैद्य व्यावसायीकाच्या काळे धंदेवाल्याना मोठ्या प्रमाणात तेथील सरपंच प्रशांत कोल्हे यांनी आळा घातल्याने त्यांचे विषयी सुडभावना निर्माण झाली. व त्यांच्या साथीला गावातील काही राजकीय विरोधक , वैयक्तीक विरोधक एकवटून सोशल मिडीयावर वहाणगांव व येथील सरपंच जातीयवादी आहे. अशा प्रकारचे अनेक आरोप करत आहे .त्यामूळे शुक्रवार ला आयोजीत ग्रामसभेत हा विषय चर्चेचा बनला व ग्रामस्थांनी या देशात राहून देश विरोधी कृत्य करणे म्हणजे देशद्रोह होतो मग गावात राहून गाव विरोधी कृत्य करणे गावद्रोह का नाही ? असा सवाल केला .
त्या विषयाला अनूसरुन सभेत उपस्थित लोकांनी यापुढे वाहानगावाची बदनामी करनारे गावातील किंवा बाहेरचे यांना आता नक्कीच धडा शिकवू . जो गावातील नागरीक आहे त्याचे काही प्रश्न समस्या असतील तर त्यांनी रीतसर मांडावे अशा सुचना ग्रामसभेत देन्यात आल्या गाव विरोधात आरोपकर्त्यांना सरपंच प्रशांत कोल्हे यांनी आव्हान करीत संधी दिली. मात्र सभेत गावाची बदनामी करणारा कोणताही विरोधक फिरकला नाही. विषेश ग्रामसभा ही सार्वभौम असून गावाच्या हितासाठी जो निर्णय घ्यावा लागेल तो घेवू असे एकमताने ग्राम सभेत ठरवीण्यात आले . सभेला गावातील शेकडो लोकांची वहाणगावांत पहील्यादांच ऐतिहासिक गर्दी बघायला मिळाली.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments