बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
24-12-2023
आरोपीला शोधन्यासाठी पोलीसांकडून धावाधाव सुरु
शहरातील साईनगर येथील नन्नावरे यांच्या घरासमोरील मारोती वॅन मध्ये सुगंधीत तंबाकू असल्याची माहीती नागपूर येथील अन्न सुरक्षा अधिकारी यांना मिळाली त्यानुसार चिमूर पोलीसांची मदत घेत छापा मार कारवाई करत मारोती वैन मधून ४९४ किलो पानमसाला व सुगंधीत तंबाकू शुक्रवार ला जप्त करन्यात आला. दरम्यान आरोपी विलास दौलतराव चंदनखेडे रा. प्रगती कॉलनी चिमूर यांना पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले मात्र त्याच दिवसी पोलीसांच्या देखत पोलीस ठाण्यात पोलीसांसोबत चालत बोलत असतांनाच रात्री आठ वाजता पळ काढला.
अन व औषध प्रशासन कार्यालय नागपूर येथील अन्न सुरक्षा अधिकारी गिरीश सातकर व आर. बी. यादव यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार आंबेडकर कॉलनीतील मॉ दुर्गा किराणा स्टोअर्स चे मालक विलास दौलतराव चंदनखेडे हे पान मसाला, सुगंधीत तंबाकू विक्री व साठवणूक शहरातील साई नगर येथे नन्नावरे यांच्या घराच्या बाजूला गोडावूनमधून करित आहेत. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी व चिमूर पोलीसांनी सापळा रचत शुक्रवार ला १२.३० वाजता छापामार कारवाईत मारोती वॅन क्रमांक एमएच बी एक्स ४६१० ची तपासनी केली असता वाहनात २९४ किलो पान मसाला व सुगंधीत तंबाकू एकून किमंत आठ लाख ७७ हजार २९० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान अन्न सुरक्षा अधिकारी यांनी आरोपी विलास चंदनखेडे ला चिमूर पोलीस ठाण्यात आनन्यात आले. शुक्रवार ला सायंकाळी ६ वाजता गुन्हा नोंद करन्यात आला. मात्र गुन्हा नोंद झाल्यानंतर दोन घंट्यानी रात्री आरोपीने पोलिसांसोबत बोलत चालत ठाण्यातुन पळ काढला एका अधिकाऱ्यांने आरोपीला इकडे बोलवा असे म्हटल्यानंतर पोलीस जेव्हा आरोपीला बोलवायला गेले तेव्हा आरोपी गायब दिसल्याने आरोपीला शोधण्यासाठी पोलीसांची धावाधाव सुरु झाली. पोलीसांनी शुक्रवार शनिवार दोन दिवस शोध मोहीम राबवीली मात्र सुगंधीत तंबाकूचा आरोपी अजून मिळाला नसल्याची माहिती आहे. या घटनेची सर्वत्र चर्चा शहरात सुरु आहे.
.........................................
या प्रकरणाचा तपास शनीवार ला दुपारी माझ्याकडे देन्यात आला. आरोपीचा शोध घेने सुरु आहे
विनोद जांभळे
सहाय्यक पोलीस निरिक्षक पोलीस स्टेशन चिमूर
Your car is our responsibility
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
No Comments