निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
F
03-08-2024
आमदार बंटी भांगडीया यांनी घेतली जिल्हाधीकारी यांची भेट
दिले सकारत्मक कार्यवाही व अंमलबजावनीसाठी आदेश
चिमूर -
मागील वर्षी अति पाऊसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. दरम्यान पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली होती. मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याची रक्कम जमा झाली नाही. उर्वरीत शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात खात्यात रक्कम जमा होईल असे सांगीतले गेले मात्र रक्कम जमा झाली नाही. असे चिमूर विधानसभा क्षेत्रातील नऊ हजार शेतकरी पिक विम्यापासून वंचित आहे.
जिल्ह्यातील ओरिएंटल इंशुरन्स कंपनी व प्रशासन पिक विमा लाभार्थी शेतकऱ्यांना सहकार्य करित नसून पिक विमा संदर्भातील माहीती पुरविण्याची यंत्रणा ठप्प आहे. त्यामूळे चिमूर विधाक्षेत्रातील नऊ हजार शेतकरी पिक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांची व्यथा व आपबीती आमदार बंटी भांगडीया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारला जिल्हाधीकारी विनय गौडा यांची भेट घेत सांगीतली असता जिल्हाधीकारी गौडा यांनी संबंधीत प्रशासन व विमा कंपनीसी संपर्क साधून पिक विम्याची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात येणार असून यावर्षीच्या अतिवृष्टीमूळे धान सोयाबीन कापूस या पिकांना अन्य रोगांने कीड लागली शेतपिकांचे नुकसान झाले आहे. झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी व पंचनामे पूर्ण झालेले असून संपूर्ण अहवाल पुढील कार्यवाहीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे विवीध प्रश्न व त्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी पाच ऑगस्ट ला बैठक बोलावून संबंधीत सर्व प्रशासकीय अधिकारी व यंत्रणेला तातडीने सकारात्मक कार्यवाही तथा अंमलबजावणीसाठी आदेश देण्यात येईल अशी माहिती जिल्हाधीकारी यांनी दिली.
यावेळी भाजप नेते प्रकाश देवतळे, भाजपा तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा किसान मोर्चा चिमूर विधानसभा संयोजक एकनाथ थुटे आदी उपस्थित होते.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments