अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
F
27-10-2023
अनुसुचित जाती व जमातीच्या विवीध सघटनां झाल्या आक्रमक -
उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ आनंद किन्नाके कर्तव्यावर असताना शुक्रवार दिनांक २० ऑक्टोबर ४. १५ वाजता वहानगांव येथील प्रशांत कोल्हे हे प्रशासनाची कोनतीही परवानगी न घेता विनाकारण ओपीडी वेळेमध्ये रुग्णालयाच्या आतमध्ये डॉक्टर सेवा देत असलेल्या ठिकाणी येत असताना मोबाईल व्दारे विडीयो करत कर्तव्यावर हजर असलेल्या स्त्रि सुरक्षा रक्षक यांना धक्का बुक्की करत शिवीगाळ देत छेडछाड करण्याचा प्रयत्न करित होते. दरम्यान डॉक्टर सेवा देत असलेल्या रुग्ण खोली मध्ये जोर जबरदस्तीने प्रवेश करून अति महत्वाच्या रुग्ण सेवेत बाधा व डॉक्टर रुग्णावर हुज्जत घालून दहशत निर्माण केली. तु माजला का गोंडाळ्या अशा जातिवाचक बोलून अश्लिल शिव्या देत तु कशी नौकरी करते पाहून घेईल अशी धमकी दिली असल्याची माहिती गुरुवार ला अनुसुचित जाती, जमातीच्या विवीध संघटनाच्या पदाधीकाऱ्यांनी आयोजीत पत्रकार परिषदेत दिली.
डॉ आनंद किन्नाके यांनी चार महीन्यापूर्वी वैद्यकीय अधिक्षक पदाचा प्रभार घेतला तेव्हा पासुन उप जिल्हा रुग्णालयातील ओपीडीत रुग्णांची वाढ झाली आहे. याठीकाणी सर्व प्रकारच्या शस्त्रक्रीया होत असातत त्यामध्ये प्रामुख्याने प्रसुति सिजर हायड्रोशील हर्निया अपेन्डिक्स व हिस्टोकटॉमी व कुंटूब कल्याण शत्रक्रीया होतात. त्यामध्ये डॉ किन्हाके हे स्वतः कुंटूब कल्याण शत्रक्रीया हायड्रोशील हर्निया एमटीपी व इतर शत्रक्रिया करीत असतात. व इतर सोयी सुविधा पुरवितात गरजू रुग्णांना चौवीस तास सेवा देत असल्यामूळे रुग्णांना फायदा होत आहे. या रुग्णालयांत आदिवासी समाजाचा डॉक्टर असल्याने जातीवाचक समाज कंटकाला खटकत आहे. कोल्हे यांच्यावर चिमूर - शेगांव येथे विवीध प्रकारचे अनेक गुन्हे दाखल असून त्यांना काही दिवसासाठी जिल्हाबंदी केल्याची माहिती आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही पक्षांना समजावले मात्र प्रशांत कोल्हे समजण्याच्या मनस्तीतीत नव्हते. दरम्यान पुन्हा प्रशांत कोल्हे विनाकारण समाज माध्यमावर डॉ किन्नाके व आरोग्य सेवेची बदनामीकारक पोष्ट टाकत मानहानी करत आहे. या प्रकरणामूळे रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी यांच्यात भिती निर्माण झाली आहे. डॉ किन्नाके यांना जातीवाचक अश्लिल शिवीगाळ स्त्री सुरक्षा रक्षकाला धक्का बुक्की आरोग्य सेवेत बाधा आनने अशा प्रकारच्या असविधानीक वक्तव्य करनाऱ्या प्रशांत कोल्हे वर कायदेशीर कार्यवाही करून अटक करण्याची मागणी अनुसुचित जाती, जमातीच्या विवीध संघटनांच्या पदाधिकारी , नागरीकांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. दरम्यान गुरुवारला पोलीस निरिक्षक व उपविभागीय अधिकारी यांना संघटनेने निवेदण दिले.सात दिवसाच्या आत कार्यवाही न झाल्यास सर्व संघटना रस्त्यावर उतरेल असा इशाराही देन्यात आला.
पत्रकार परिषदेला ऑल इंडीया अदिवासी फेडरेशन चंद्रपूर कार्याध्यक्ष सुरेश तोरे, जागतिक गोंड सगा मांदि शाखा चिमूर अध्यक्ष मनोजसिंह गोंड मडावी, जनसेवा गोंडवाना पार्टी शाखा चंद्रपूर विधानसभा चिमूर ब्रम्हपुरी अध्यक्ष प्रल्हाद पत्रु उईके (नवतळा), भिम आर्मी संविधान रक्षक दल महाराष्ट्र अध्यक्ष जगदीश मेश्राम, गोंडवाना गणतंत्र पार्टी चंद्रपूर अध्यक्ष दिपक गोंड कुमरे, गोंडवाना युवा जंगोम दल- चिमूर चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख नंदू मडावी, भिम आर्मी संघटना सिंदेवाही अध्यक्ष- तेजस वानखेडे, जनसेवा गोंडवाना पार्टी शाखा जामनी अध्यक्ष- नानाजी उईके, आफ्रोट संघटना शाखा चिमूर अध्यक्ष प्रकाश कोडापे, ऑल इंडिया पॅन्थर सेना चिमूर ता. अध्यक्ष आशिष बोरकर, विकास मसराम, मंथन थुटे, सुरज रामटेके, विक्की वलके, नंदू मडावी, राधेश्याम मसराम, प्रियंका मले, बाळकृष्ण थुटे, वर्धन थुटे, गोंडवाना गणतंत्र पार्टी सिंदेवाही अध्यक्ष वाल्मिक जुमनाके, उपाध्यक्ष विनोद कोटनाके यांसह बरेच वाहानगाव वासीय नागरिक उपस्थित होते.
निवेदनाच्या प्रतिलिपी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म. रा. मुंबई, देवेन्द्र फडनविस उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री म.रा. मुंबई, डॉ.तानाजी सावंत सार्वजनिक आरोग्य मंत्री म. रा. मुंबई, सुधीर मुनगंटीवार पालक मंत्री चंद्रपूर, अशोक नेते खासदार चिमुर-गडचिरोली लोकसभा क्षेत्र, बंटी भांगडिया आमदार चिमुर-नागभीड विधानसभा क्षेत्र, जिल्हाधिकारी, चंद्रपूर, पोलीस अधिक्षक, चंद्रपूर, जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय, चंद्रपूर, राकेश जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी चिमुर, प्राजक्ता बुरांडे तहसिलदार चिमुर यांना पाठविल्या आहे.
.........................
विवीध संघटनाचे निवेदण मिळाले आहे. सदर प्रकरण चौकशीत आहे
मनोज गभणे
पोलीस निरिक्षक, पोलीस स्टेशन चिमूर
निर्मल जल शुद्धतात का वादा
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments