ProfileImage
157

Post

3

Followers

0

Following

PostImage

Chunnilal kudwe

Oct. 15, 2024

PostImage

Annapurnabai Garden of Mahadawadi Village (Chimur) - चार महिन्याचा काळ उलटला मात्र 'महादवाडी' गावचे 'अन्नपूर्णाबाई गार्डन' आजही उपेक्षीत


सरपंचाने झिझविल्या प्रशासकीय विभागाच्या पायऱ्या

- पत्रकार परिषदेत सरपंच भोजराज कामडी यांची माहीती

चिमूर - 
        गावातील सिसी रोड व सभागृहाचे भूमिपूजन संदर्भाने आमदार बंटी भांगडीया १३ जून ला महादवाडी गावाला आले असता भूमिपूजन कार्यक्रमाच्या मंचावरून गावातील स्थानीक अन्नपूर्णाबाई गार्डनच्या सुशोभिकरणासाठी पन्नास लक्ष रुपयांचा निधी आठ दिवसात मंजूर करून गार्डनच्या कामाला सुरुवात करण्याची घोषणा केली. चार महिन्याचा काळ उलटला मात्र अन्नपूर्णाबाई गार्डन आजही उपेक्षीत असल्याचे सोमवारला महादवाडी ग्रामपंचायत येथे आयोजीत पत्रकार परिषदेत सरपंच भोजराज कामडी यांनी माहिती दिली.

          महादवाडी व हरणी गाव गट ग्रामपंचायतीची लोकसंख्या बाराशेच्या घरात आहे. महादवाडी येथील ग्रामपंचायत परिसरात गावातील अन्नपूर्णाबाईच्या वारसदारांनी चोवीस हजार स्केअर फुट जागा ग्रामपंचायतला दान केली होती. त्या जागेवर सरपंच भोजराज कामडी यांनी एक करोड रुपयाचे गार्डन तयार करण्याचा संकल्प केला. गार्डनची रूपरेषा तयार करण्यात आली व पंधरा वित्त, सामान्य फंडातून त्या पद्धतीने गार्डनच्या कामाला सुरुवात होवून जागेच्या सभोवताल प्राण्यांच्या प्रतिकृतीचे पुतळे उभारण्यात आले. गावात सिसी रोड व सभागृहाचे भूमिपुजनासाठी आमदार बंटी भांगडीया १३ जून ला महादवाडी येथे आले होते. त्या कार्यक्रमात सरपंच भोजराज कामडी उपस्थित होते तेव्हा त्यांनी भाषणातून अन्नपूर्णाबाई गार्डनच्या सुशोभीकरणासाठी निधीची मागणी केली असता आठ दिवसात निधी मंजूर होवून कामाला सुरुवात होणार असल्याची प्रचिती आमदार बंटी भांगडीया यांनी भूमिपूजन कार्यक्रमाच्या भाषनातून सांगीतले. त्यानुसार सरपंच यांनी दोन महीने जिल्हाधिकारी कार्यालय, बांधकाम विभाग व प्रशासकीय विभाग प्रशासनाच्या  पायऱ्या झिझविल्या पत्रव्यवहार केला मात्र अखेर निराशा आली.
          काही दिवसांवर विधानसभेच्या निवडणूका येवून ठेपल्या आहेत निवडणूकीची  आचार संहिता काही तासात लागनार आहे. चार महीने झाले महादवाडी गावची जनता विचारत आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांवर चालणारे आमदार भांगडीया साहेब स्थानिक अन्नपूर्णाबाई गार्डनचा निधी कुठे गेला? प्रशासकीय मान्यता मिळत नसेल तर दुसऱ्या कोणत्याही फंडातून गार्डन ला निधी उपलब्ध करून द्या अशी विनंती करत दोन दिवसात निधी उपलब्ध न झाल्यास महादवाडी गावात आमदार बंटी भांगडिया यांना व त्याच्या उमेदवारीच्या  प्रचाराची गाडी गावात फिरू देणार नसल्याचे आयोजीत पत्रकार परिषदेत सरपंच भोजराज कामडी यांनी सांगीतले.
.......................
     महादवाडी येथील अन्नपूर्णाबाई गार्डनच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव मंजूरीसाठी प्रशासनाला पाठविला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर लगेच गार्डनच्या कामाला सुरुवात होईल.

बंटी भांगडीया
आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र


PostImage

Chunnilal kudwe

Oct. 7, 2024

PostImage

Sugatkuti ( Malewada) chimur - सुगतकुटी आम्रवण सुगतकूटी दिक्षाभूमी ( मालेवाडा ) च्या सौंदर्यात पुन्हा विकासाची भर


चिमूर तालुक्यातील सुगतकुटी (मालेवाडा) व नागभिड तालुक्यातील बोकडडोह येथे पाच कोटी मंजूर
- आमदार भांगडीया यांच्या प्रयत्नाला यश

चिमूर -
         सुगतकुटी ( मालेवाडा ) येथे सामाजिक न्याय विभागाचे सामाजिक सभागृहाचे लोकापर्ण व बुद्धरूप मूर्तीची प्रतिष्ठाणा १ ऑक्टोबरला पार पडली. पुन्हा तिन दिवसानंतर ४ ऑक्टोबर ला सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागा अंतर्गत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत अडीच कोटी रुपये मंजूर झाल्याने आम्रवण दिक्षाभूमी सुगतकुटी (मालेवाडा ) येथील परिसराच्या सौंदर्यात पुन्हा विकासाची भर पडनार आहे.

         ग्रामीण क्षेत्रातील अनुसुचित जाती नवबौद्ध घटकांचा विकास व मुलभूत सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी सुचविलेल्या कामांना शासन स्तरावर मान्यता देण्यात आली. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत अनुसुचित जाती नव बौद्धाचा विकास सांस्कृतिक विकास घडवून आनन्याच्या दृष्टीकोनातून चिमूर तालुक्यातील सुगतकुटी (मालेवाडा ) परिसर येथे स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र, खुले डोम सभागृह बांधकाम, परिसर सौंदर्यीकरन व सोयी सुविधा निर्माण करन्यासाठी अडीज कोटी रुपये व नागभिड तालुक्यातील बोकडडोह परिसर येथे संरक्षण भिंत बांधकाम, स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र सभागृह बांधकाम, परिसर सौंदर्यीकरण व सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी अडीज कोटी रुपये एकुन दोन्ही स्थळांना पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
        आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या प्रयत्नाने चिमूर - नागभिड तालुक्यात पुन्हा विकासांची भर पडल्याने बौद्ध पंच कमेटी मालेवाडा येथील नागरीकांनी आमदार भांगडीया यांच्या निवासस्थानी पुष्प गुच्छ देवून त्यांचा सत्कार केला यावेळी बौद्ध पंच कमेटीचे अध्यक्ष जगदीश रामटेके, यशवंत सरदार, नरेश गजभिये, संघम भिमटे, काशिनाथ गजभिये, तुकाराम ठवरे, वामन गजभिये, विलास मेश्राम, गंगाधर गजभिये, पतिराम मेश्राम, कवडू मेश्राम, पंकज रामटेके आदी उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Oct. 4, 2024

PostImage

Chimur News, Dansar 'Gautami Patil' - महाराष्ट्राची प्रसिद्ध डॉन्सर गौतमी पाटील 9 ऑक्टोबर ला चिमुरात....


 चिमूर क्रांती बहुजन फाऊंडेशनचे गौतम पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती

चिमूर -
           चिमूर क्रांती बहुजन फाउंडेशनच्या वतीने नवरात्री, दुर्गोत्सव निमीत्य महाराष्ट्राची प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटील यांचा कार्यक्रम 9 ऑक्टोबर बुधवार ला चिमूर येथील ग्रामगिता महाविद्यालयाच्या पटांगणात सायंकाळी 6 वाजता आयोजीत करण्यात आल्याची चिमूर क्रांती बहुजन संघटनाचे संयोजक गौतम पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस संघटक ओबीसी धनराज मुंगले यांच्या चिमूर येथील कार्यालयात शुक्रवारला पत्रकार परिषदेत माहिती दिली.

       या कार्यक्रमाचे उदघाटन  महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचे हस्ते होणार असून या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी खासदार डॉ. नामदेवराव किरसान, आमदार अभिजित वंजारी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव शिवाणी वडेट्टीवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस संघटक ओबीसी धनराज मुंगले, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर,काँग्रेस सेवादलाचे प्रा.राम राऊत,पंजाबराव गावंडे,  संजय डोंगरे,संजय घुटके, ऍड. दिगंबर गुरुपूडे, गजानन बुटके, विनोद चौधरी, प्रफुल खापर्डे, नरेश हेमने, नेताजी मेश्राम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
       या कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती देताना मुख्य आयोजक गौतम पाटील म्हणाले की गौतमी पाटील हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. गौतमीच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची गर्दी नाही असं कधीच झालेलं नाही गौतमीची झलक बघण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. त्यामुळे शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याची काळजी घेण्यात येणार असल्याची माहिती आयोजीत पत्रकार  परिषदेत दिली.
        यावेळी पत्रकार परिषदेला धनराज मुंगले, गुणवंत कारेकर, गौतम पाटील राजेंद्र लोणारे, प्रदीप तळवेकर, लोकनाथ रामटेके, आदी उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Oct. 4, 2024

PostImage

Indrikar Maharaj Kirtan - Chimur - मी खर बोलतो हाच माझा गुन्हा - इंदूरीकर महाराज


 शाळा मंदीर झाली पाहिजेत याकडे लोकप्रतीनीधी, सरपंच यांनी लक्ष देण्याची गरज


चिमूर -
        सुक्षीशीत बुद्धीमान असतात अस नाही. संसार करणं पराक्रम नाही संसार परमारर्थ करण पराक्रम आहे. भौतीक श्रीमंती क्षणीक असते. वारकरी संप्रदायाचे एकच तत्व आहे. जगातली सर्वच माणसं ईश्वराची लेकरं आहेत. कर्मही देवाची पूजा आहे. चांगल बोला चांगल वागा अशा अनेक विषयांचे धडे उदाहरणार्थ किर्तनातून सांगत असताना माझ्या बोलण्याचे वाभाडे काढले जातात. माझ खर बोलणं लोकांना आवडत नाही. मी खर बोलतो हाच माझा गुन्हा असल्याचे हभप निवृत्ती महाराज (देशमुख ) इंदूरीकर महाराज किर्तनातून श्रोत्यांना सांगताना  बोलत होते.

          चिमूर तालुका भारतीय जनता पार्टी व आमदार बंटी भांगडीया यांच्या संकल्पनेतून  आदर्श विद्यालय वडाळा (पैकू) बिपीएड ग्राउंड चिमूर येथे आयोजीत किर्तन कार्यक्रमाचे उद्धघाटन भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते पार पडले.
         पुढे किर्तनातून इंदूरीकर महाराज बोलताना म्हणाले की, माणसं मोठी नाही माणसांच कर्तव्य मोठ आहे. ज्ञान देव, देवज्ञान, ज्ञानदेव यांचे महत्व पटवून देताना मिसाईल मॅन अब्दूल कलाम, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्तव्यांनी मोठी झालीत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आज सर्वाच दैवत ठरल आहे. आज देशातल्या अनेक जिल्हा परिषद शाळा ओस पावल्या आहेत शिक्षण बरोबर मिळत नाही शाळेच्या कवलांची गळती होत आहे. शिक्षक पगारापुरते काम करतात त्यामूळे विद्यार्थी घडत नाही. पुढची पीढी घडली पाहिजे शाळा ही मंदीर झाली पाहिजेत याकडे लोकप्रतिनीधी, गावातील सरपंच यांनी शाळेकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे किर्तनातून इंदुरिकर महारज सांगत होते.
        चिमूर तालुका भाजपाच्या वतीने हभप प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदूरीकर महाराज, भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार बंटी भांगडीया यांचा शाल श्रीफळ शिल्ड व ग्रामगिता देवून सत्कार करण्यात आला. यावेळी किर्तनाचे उद्धघाटक चंद्रशेखर बावणकुळे म्हणाले की, विकास कामाच्या बाबतीत राज्यातील पंधरा आमदारापैकी आमदार बंटी भांगडीया यांचा पहिला नंबर असल्याचे गौरवउदगार काढत समाज परिवर्तन व विकासाठी आमदार बंटी भांगडीया यांच्या सोबत राहण्याचे आवाहन केले. इंदूरीकर महाराजांच्या किर्तनात चिमूर विधानसभा क्षेत्रातील हजारो नागरीक श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.


PostImage

Chunnilal kudwe

Sept. 29, 2024

PostImage

भूमिपूजन लोकार्पण कार्यक्रमात बांधकाम विभागाला प्रोटोकालचा विसर...?


खासदार डॉ नामदेव किरसान आणणार हक्कभंग 
- संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी 

चिमूर - 
         चिमूर विधानसभा क्षेत्रातील नागभीड व चिमूर तालुक्यात होणाऱ्या विविध निधीतून तयार झालेल्या शासकीय इमारती व भूमिपूजन कार्यक्रमाचा सपाटा सुरु आहे मात्र या कार्यक्रमात स्थानिक बांधकाम विभाग  शासकीय प्रोटोकालला बगल देत कार्यक्रम घेत असल्याचा आरोप कांग्रेस पक्षाचे विधानसभा समनव्यक डॉ सतिष वारजूकर यांनी शनिवार ला पत्रकार परिषदेतून केला आहे.     

         विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन चिमूर विधानसभा क्षेत्रातील नागभीड व चिमूर तालुक्यात वेगवेगळ्या निधीतून मंजूर झालेल्या विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रम आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांच्या मार्फत सुरु आहेत या कार्यक्रमात प्रोटोकाल नुसार जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ नामदेव किरसान यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत असणे गरजेचे आहे मात्र संबंधित बांधकाम विभागाचे उपअभियंता उपगन्लावार व स्थानिक अधिकारी शासनाच्या प्रोटोकालला बगल देऊन राजशिस्टाचाराचा भंग करीत असल्याचा आरोप माजी जीप अध्यक्ष डॉ सतिष वारजूकर यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे 
    गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांना हेतुपुरस्कर या शासकीय निधीतून होणाऱ्या कार्यक्रमातून वगळण्यात येत आहे याविषयाची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे चिमूर तालुका कांग्रेस कमेटी तर्फे  करण्यात आली असून याबाबतचा हक्कभंग ठराव येत्या अधिवेशनात खासदार डॉ किरसान  आणणार असल्याचेही डॉ सतिष  वारजूकर यांनी पत्रकार परिषदेत  सांगितले. 
        पत्रकार परिषदेला चिमूर विधानसभा समन्वयक डॉ सतिश वारजूकर, राज्य काँग्रेस सेवादल सहसचिव प्रा. राम राऊत, काँग्रेस तालुका अध्यक्ष डॉ विजय गावंडे, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सरचिटनीस गजानन बुटके, शहर काँग्रेस अध्यक्ष अविनाश अगडे, काँग्रेस सेवादल तालूका सचिव घनश्याम चाफले, डॉ रहेमान, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष विवेक कापसे, काँग्रेस जेष्ठ नेते धनराज मालके, युवक काँग्रेस चिकर विधानसभा उपाध्यक्ष राकेश साठेणे, विपूल बुटके आदी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
..............................


चिमूर शहरात या कामांचे झाले भूमिपूजन - 

            अर्थसंकल्प योजना अंतर्गत चिमूर तहसील कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे बांधकाम करने कामांची किमंत ३५०.०० लक्ष रुपये, अर्थसंकल्प योजना अंतर्गत चिमूर येथील तलाठी कार्यालयाचे बांधकाम करने कामांची किमंत ४३५.०० लक्ष रुपये, अर्थसंकल्प योजना चिमूर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तासीलदार व महसुली कर्मचारी यांचे निवासस्थान बांधकाम करने कामांची किमंत १४३१.६३ लक्ष रुपये, ठेव बांधकाम योजना अंतर्गत दुय्यम निबंधक श्रेणी - १ या कार्यालयाच्या नविन इमारीतीचे बांधकाम करने कामांची किमंत २१४. २६ लक्ष रुपये, अर्थसंकल्प योजना अंतर्गत सार्वजनीक बांधकाम उपविभाग चिमूर या कार्यालयाच्या इमारत बांधकामा कामांची किमंत २२२. २८ लक्ष रुपये व वाल्मीक समाज सामाजिक सभागृह बांधकामाचा किंमत १००.०० रुपये आदी कामांचे भूमीपुजन गुरुवार ला पार पडले.


PostImage

Chunnilal kudwe

Sept. 29, 2024

PostImage

Buddha Murthy's dignity and public dedication of social hall 'Sugatakuti Malewada' (Chimur) - मंगळवारला सुगतकुटी मालेवाडा ( चिमूर ) येथे बुद्धरूप प्रतिष्ठापना व सामाजिक सभागृहाचे लोकार्पण


सोहळ्यात हजारो नागरिकांचा असणार सहभाग.. - सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र मोटघरे यांची पत्रकार परिषदेत माहिती

चिमूर -
         बौध्द पंचकमेटी, भिमज्योती महिला मंडळ मालेवाडा यांच्या माध्यमातुन गगन मलिक फाउन्डेशन व भांगडीया फाऊन्डेशन यांच्या वतीने 1 ऑक्टोंबर मंगळवारला सुगतकुटी मालेवाडा येथे बुध्दरूप प्रतिष्ठापना तथा सामाजिक सभागृहाचे लोकार्पण सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. या कार्यकामाची तयारी अंतिम टप्प्यात असून या कार्यक्रमात सुमारे दहा हजाराचे वर बौद्ध उपासकासह नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती शनिवार ला सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र मोटघरे यांनी सुगतकुटी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

       थायलंड देशातुन दान स्वरूपात प्राप्त 8 फुट व 5 फुट उंच असलेला बुध्दरुपाचे प्रतिष्ठापना व महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय विभागाचे निधीतुन बांधण्यात आलेले सामाजिक सभागृह लोकार्पण सोहळयाकरीता विशेष अतिथी म्हणुन थायलंडचे कॅप्टन नटूट्टाकिट चाईचेलर्ममॉन्गखील व गगन मलिक फाऊन्डेशनचे अध्यक्ष धम्मदुत डॉ. गगन मलिक, चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडीया उपस्थित राहणार असुन यावेळी थायलंडचे द मोस्ट व्हेन, फ्रा. देवपणा अभ्रोन, संघारामगिरीचे भिक्खु ज्ञानज्योती महास्थविर, सुगतकुटी मालेवाडाचे सचिव भिक्खु सुगतानंद महाथेरो , थायलंडचे फ्रामाहा बॅनजोंग आर्थिजवांग्या, डॉ. फ्रामाहा सुफारोक सुभट्टजरी, डॉ. भिक्खु धम्मचेती, मालेवाडाचे सरपंच कालीदास भोयर, जितेंद्र मोटघरे, पोलीस पाटील हेमंतकुमार गजभीये, बौध्द पंच कमेटी अध्यक्ष मालेवाडाचे जगदीश रामटेके, उपसरपंच शंकर दडमल, लोहाराच्या सरपंच दिक्षा पाटील, जि. प. माजी सदस्य मनोज मामीडवार, ईश्वर मेश्राम, ओम खैरे, काशिनाथ गजभीये, यशवंत सरदार, प्रविण जिवतोडे, गगन मलिक फाऊन्डेशनचे पी. एस. खोब्रागडे, डॉ. मोहन वाकडे, विकास तायडे, विनयबोधी डोंगरे, अनिरुध्द दुपारे, अमित वाघमारे, विशाल कांबळे, वर्षा मेश्राम, गुणवंत सोनटक्के आदी उपस्थित राहणार आहेत.
      1 ऑक्टोंबर  मंगळवार ला सकाळी साडे नऊ वाजता ध्वजा रोहन, दहा वाजता बुद्ध गयेतील मूळ बोधी वृक्ष वृक्षारोपण, साडे दहा वाजता भिक्षू संघाचे भोजनदान, साडे बारा वाजता सुगतकूटी दिक्षाभूमी लोकार्पण सोहळा, एक वाजता बुद्ध प्रतिबिंब प्रतिष्ठापणा, दिड वाजता शिलग्रहण, दोन वाजता पाहुण्यांचे स्वागत, अडीज वाजता भिख्खू संघ धम्मदेशना, सव्वातीन वाजता पाहुण्यांचे मार्गदर्शन, सव्वाचार वाजता संघदान, साडेचार वाजता मंगल मैत्री, पाच वाजता समारोप व आभार व विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असुन यात प्रसिध्द गायक अनिवृद्ध वनकर, कडुबाई खरात, व संच यांचा बुध्द-भिम गितांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
पत्रकार परिषदेला जितेंद्र मोटघरे यांचेसोबत जगदिश रामटेके, काशिनाथ गजभिये, यशवंत सरदार, लीलाधर बन्सोड, शैलेंद्र पाटील, सावन गाडगे, सागर भागवतकर, सतीश वानखेडे, पराग अंबादे, अमर गाडगे, शैलेश ठवरे, अशोक मेश्राम, ईश्वर ठवरे, वामन गजभिये, रोशन बोरकर, पत्रुजी गजभिये, राकेश मेश्राम, नरेश गजभिये आदी उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Sept. 29, 2024

PostImage

Bhumipujan - चिमूर शहरातील कोट्यावधी रुपयांच्या विवीध विकास कामांचे आमदार भांगडीया यांच्या हस्ते भूमिपूजन


 प्रशासकीय इमारत, पटवारी निवासगृह व सभागृह यांचे बांधकाम


चिमूर -
        तहसील परिसरातील दुय्यम निबंधक श्रेणी - १ प्रशासकीय कार्यालय इमारत, प्रशासकीय भवनाच्या वरच्या माळ्यावर उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे बांधकाम, सार्वजणीक बांधकाम विभागाच्या नविन इमारतीचे बांधकाम व वाल्मीकी समाज सामाजिक सभागृहाचे बांधकाम आदी भूमिपूजनांचा कार्यक्रम तहसिल कार्यालयातील राजीव गांधी सभागृह, पिडब्ल्युडी कार्यालय व शिवालय पार्क ओपन पेस, मासळ रोड, चिमूर शहरातील कोट्यावधी रुपयांच्या विवीध विकास कामांचे भूमिपूजनाचा कार्यक्रम आमदार बंटी भांगडीया यांच्या हस्ते प्रशासकीय अधिकारी व नागरीकांच्या उपस्थितीत गुरुवार ला पार पडला.

        तहसिल कार्यालयात झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमात मंचावर उपविभागीय अधिकारी तथा प्रभारि अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर घाडगे, सहाय्यक जिल्हा निबंधक अंकिता तांदळे, तहसिलदार श्रीधर राजमाने, भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, भाजपा तालूका अध्यक्ष राजू झाडे, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष संजय नवघडे आदी उपस्थित होते.
       दरम्यान प्रशासनाच्या वतीने आमदार भांगडीया यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार एकनाथ थुटे यांनी केले.

.........................................................

कोणत्या बांधकाम विकास कामाला किती निधी - 

         अर्थसंकल्प योजना अंतर्गत चिमूर तहसील कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे बांधकाम करने कामाची किमंत ३५०.०० लक्ष रुपये, अर्थसंकल्प योजना अंतर्गत चिमूर येथील तलाठी कार्यालयाचे बांधकाम करने कामाची किमंत ४३५.०० लक्ष रुपये, अर्थसंकल्प योजना चिमूर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तासीलदार व महसुली कर्मचारी यांचे निवासस्थान बांधकाम करने कामाची किमंत १४३१.६३ लक्ष रुपये, ठेव बांधकाम योजना अंतर्गत दुय्यम निबंधक श्रेणी - १ या कार्यालयाच्या नविन इमारीतीचे बांधकाम करने कामाची किमंत २१४. २६ लक्ष रुपये, अर्थसंकल्प योजना अंतर्गत सार्वजनीक बांधकाम उपविभाग चिमूर या कार्यालयाच्या इमारत बांधकामा कामाची किमंत २२२. २८ लक्ष रुपये व वाल्मीक समाज सामाजिक सभागृह बांधकामाचा किंमत १००.०० रुपये आदी कामाचा भूमीपुजन सोहळा संपन्न झाला.


PostImage

Chunnilal kudwe

Sept. 25, 2024

PostImage

Anganwadi morcha - अंगणवाडी सेविका, मदतनिस धडकल्या बाल विकास प्रकल्प कार्यालयावर


 सात तालुक्यातील अंगणवाडी सेविकां कर्मचारीचा समावेश


चिमूर -
       महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी सभा चे कार्याध्यक्ष इमरान कुरेशी यांच्या नेतृत्वात बुधवारला दुपारी एक वाजता राज्य सरकार च्या फसव्या आश्वासनाचा निषेध करण्यासाठी अंगणवाडी सेविकां मदतनिस यांनी विवीध मागण्यासाठी हुतात्मा स्मारक येथून मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी यांना निवेदण देत मुख्य मार्गाने मोर्चा सरळ पंचायत समिती परिसरातील एकात्मिक बालविकास प्रकल्प सेवा योजना कार्यालयावर धडकला.        

         मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. दरम्यान माधूरी विर, कमल बारसागडे, प्रभा चांबरकर, पोर्णीमा बोरकर, चिमूर विधानसभा समन्वयक डॉ सतिश वारजूकर, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सरचिटनीस गजानन बुटके इमरान कुरेशी यांनी सभेला मार्गदर्शन केले. अंगणवाडी कर्मचारी यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, म्हातारपणात उदरनिर्वाह करण्यासाठी मानधनाची अर्धी रक्कम पेन्शन म्हणून देण्यात यावी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करण्यात यावी, अहर्ताप्राप्त सेविकांमधून पर्यवेशिकांच्या जागा भरण्यात याव्या, सर्वोच्छ न्यायालयाने दिलेल्या ग्रॅज्युयीटीच्या निर्णयांची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, सेवानिवृत्त अंगणवादी कर्मचायांना एक रक्कमी लाभ देण्यात यावा आदी मागण्याचे निवेदन अंगणवादी सेविका मदतनिस यांनी प्रकल्प अधिकारी पूनम गेडाम यांना देण्यात आले. दरम्यान निवेदणाची प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांना पाठवित असल्याचे आश्वासन प्रकल्प अधिकारी यांनी दिले.
          गेली ४८ वर्षे कशाची ही तमा न बाळगता अविरत सेवा देनाऱ्या सरकारच्या प्रत्येक कार्यात सहभाग घेनाऱ्या अंगणवाडी ताई महागाईने भरडल्या आहेत त्यांच्या कडे कोनी लक्ष दयायला तयार नाहीत. निराश अंगणवाडी कर्मचारी यांनी केंद्र सरकार व राज्य सरकार विरोधात विवीध मोर्चाचे आयोजन केले. या मोर्चात तालुक्यातील बचत गट आहार पुरवठा संघटना व चिमूर नागभिड  भद्रावती मुल ब्रम्हपूरी सिंदेवाही वरोरा येथील सात तालुक्यातील हजारो अंगणवाडी सेविकांचा समावेश होता. निवेदण देताना माधुरी रमेश विर, इंदिरा आत्राम, प्रभा विश्वनाथ चामटकर, संयोगीता वसंता गेडाम, कमल सुखदेव बारसागडे, सविता सुखदेव चौधरी, ललीता अनिल सोनूले, विजया भास्कर बरडे, उषा रामहरी राऊत, अर्चना मुरलीधर भूरसे, लता राजू देवगडे, सुर्वणा डूकरे अन्नपूर्णा हिरादेवे, रोशनी चंदेल, आदी उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Sept. 21, 2024

PostImage

'Chimur Assembly' - चिमूर विधानसभेत काँग्रेसची उमेदवारी 'यांना कि त्यांना'.... संभ्रम?


उमेदवारीसाठी चार पुढऱ्यांनी अर्ज केल्याचे कळते

चिमूर -

  राज्यातील विधान सभेच्या निवडणूका काही दिवसावर येवून ठेपल्या आहेत. काही दिवसातच निवडणूकीची आचार संहिता लागण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेसचे काही पुढारी सहा महिन्यापासून तर काही पाच वर्षापूर्वीपासूनच पुढाऱ्यांनी चिमूर विधानसभा मतदार संघ पिंजून काढला आहे. दरम्यान पुढारी आर्थीक मदतीसह शैक्षणिक साहित्याचा वाटप करित आहे. तर काही पुढारी काही न करता चिमूर विधानसभेत काय चाललय हे पाहत आहे. त्यामुळे चिमूर विधानसभेत काँग्रेसची नेमकी उमेदवारी ' यांना कि त्यांना ' या संभ्रमात मतदार, नागरीक आहेत.

         लोकसभेच्या निवडणूका पार पडल्यानंतर आपल्यालाच चिमूर विधानसभेची उमेदवारी पक्की असल्याचे मतदारांना तालुक्यातील दोन पुढारी सांगत फिरत आहे. दरम्यान यातील एक पुढारी चिमूर विधानसभा क्षेत्राचे तिनशे पाच बुथ पिंजून काढत विशिष्ट समाजाच्या बैठका, सभा, उद्घाटन, विवीध समस्यावर आर्थीक मदत व गावातील समस्या या विषयावर पुढारी गाव खेडयात व शहरात जावून समस्या जानून घेत आंदोलने, मोर्चे काढत आहेत. या पुढाऱ्यांनी राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्याचे विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार व दिल्लीतील काँग्रेस वरिष्ठांच्या भेटी गाठी घेवून चिमूर विधानसभा मतदार संघातील समस्या जानून कामाला लागल्याचे चित्र समाज माध्यमातून दिसत आहे. मात्र अजून पर्यंत चिमूर विधानसभेची काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली नाही. ऐन वेळेवर पुढाऱ्याला उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदार संघात इतर पुढाऱ्यांनी केलेली आर्थीक, शैक्षणिक मदत व समाज सेवावर पाणी फेरल्या सारखे होईल. 
           प्राप्त माहिती नुसार लोकसभेच्या निवडणूका पार पडल्यानंतर आपल्याला चिमूर विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी चिमूर विधानसभा क्षेत्र समन्वयक तथा माजी जि प अध्यक्ष डॉ सतिश वारजूकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी संघटक धनराज मुंगले, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव शिवाणी वडेट्टीवार व सहकार नेते तथा मध्यवर्ती को ऑफ बँकेचे माजी अध्यक्ष आणि जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय डोंगरे यांनी राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अर्ज केला असल्याची माहिती कळते. यापैकी तिन पुढारी विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार यांच्या अगदी जवळचे असल्याचे बोलले जात आहे. मात्र यापूर्वी चिमूर विधान सभेच्या झालेल्या निवडणूकीत एका पुढाऱ्यांची " अर्ध्यावरती डाव मोडला , "अधूरी एक कहान " या गितीच्या ओळी प्रमाने स्थिती झाली होती. दरम्यान राज्याचे विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार यांचेशी जमत नसताना एका पुढाऱ्यांने चिमूर  विधानसभेची अखेरची संधी म्हणून यावर्षीच्या लोकसभा निवडणूकीच्या काही दिवसापूर्वीपासून जुळवून घेतल्याचे बोलले जात असून ते चिमूर विधानसभाचे संभाव्य उमेदवार म्हणून होवू घातलेल्या विधानसभेच्या निवडणूकातील 'भातकुलीच्या खेळात' राजा आणिक कितपत यशस्वी होते की त्या वरिल गिताच्या ओळीप्रमाने 'अधूरी एक कहानी' पूर्ण होते कि 'अधूरीच कहानी ' राहते याकडे चिमूर विधान सभेतील नागरीक व मतदार यांचे लक्ष लागले असून ऐन वेळेवर उमेदवारी यापैकी कोन्हाला मिळते.....? हे मात्र विशेष आहे.


PostImage

Chunnilal kudwe

Sept. 16, 2024

PostImage

Appointment of 'OBC Taluka President of Congress' - ईश्वर डुकरे की ओबीसी काँग्रेस के तालुका अध्यक्षपद पर नियुक्ती


औचित्य - चिमूर विधानसभा क्षेत्र के समन्वयक डॉ सतिश वारजूकर के जन्मदिनपर

 चिमुर:-

        राजनीतिक क्षेत्र में कई वर्षों से सक्रिय संगठनात्मक कौशल, भाषण, सरलता, समर्पण, सेवा और सामाजिक कार्य दृष्टिकोण को देखते हुए सोमवार को चिमूर विधानसभा क्षेत्र के समन्वयक डॉ सतिश वारजूकर के जन्मदिन मौकेपर चिमूर तालुका कांग्रेस कमेटी ने ईश्वर लक्ष्मण डूकरे को चिमूर तालुका कांग्रेस ओबीसी तालुका अध्यक्ष नियुक्त किया। 

        कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, नेता प्रतिपक्ष विजय वडेट्टीवार,  सांसद डॉ नामदेव किरसान, चंद्रपुर जिला कांग्रेस कमेटी ग्रामीण जिला अध्यक्ष. विधायक  सुभाष धोटे, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के महासचिव डॉ. अविनाश वारजुकर के मार्गदर्शन में चिमूर तालुका कांग्रेस कमेटी के तालुका अध्यक्ष डॉ. विजय गावंडे ने अधिक से अधिक कार्यकर्ताओं के शामिल होने का ध्यान रखते हुए ईश्वर डुकरे को नियुक्ति पत्र दिया। कांग्रेस पार्टी की छवि जनता के सामने लाकर पार्टी को कोई परेशानी नहीं होगी यह बात कहकर विधानसभा के नागरिकों को जोडने का काम करने की हिदायत पार्टी ने दि है।

         नियक्ती पत्र देते हुये चिमूर विधानसभा समन्वयक डॉ.सतीश वारजुकर प्रा. राम राऊत, किशोरबापू शिंगरे, गजानन बुटके, सचिन गाडीवार, अविनाश अगड़े समेत अन्य कांग्रेस पदाधिकारी मौजूद थे.


PostImage

Chunnilal kudwe

Sept. 10, 2024

PostImage

'Muslim community' on the streets to honor religious leader - धर्मगुरूओं के सन्मान के लिये सडकोपर उतरा मुस्लीम समुदाय


धर्मगुरू का अपमान करने वालों पर सख्त कार्रवाई करें

 चिमुर:-
       नासिक जिले के शाह पंचाले गांव में अखंड हरिनाम सप्ताह के दौरान महंत रामगिरि महाराज ने पैगंबर हजरत मोहम्मद का गलत शब्दों में वर्णन कर मुस्लिम समुदाय का अपमान किया था। भाजपा के विधायक नितेश राणे ने भी एक कार्यक्रम के दौरान मुस्लीम समाज के बारे में अभद्र टिप्पनी की जिसके बाद सोमवार को चिमूर में मुस्लिम समुदाय सड़कों पर उतर आया और मांग की भारतीय जनता पार्टी के विधायक नितेश नारायण राणे व महंत रामगिरी महाराज के खिलाफ कार्रवाई की मांग को लेकर उपविभागीय अधिकारी के माध्यम से मुख्यमंत्री को ज्ञापन सौपा।  इस दौरान मुस्लिम भाईचारे ने हात को काली पट्टी बांधकर इस घटना का विरोध किया

          महंत रामगिरि महाराज और भाजपा विधायक नितेश राणे ने मुस्लिम भाइयों के प्रति अशोभनीय शब्द बोलकर समाज में भय का माहौल पैदा किया है।  दोनों के खिलाफ कड़ी कार्रवाई की मांग को लेकर मुस्लिम एकता समाज संगठन ने सोमवार को नेहरू विद्यालय से लेकर मुख्य सड़क पर स्थित उपविभागीय अधिकारी कार्यालय से उपविभागीय पुलिस अधिकारी कार्यालय तक मोर्चा निकाला।  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेन्द्र फड़नवीस, को उपविभागीय पुलिस अधिकारि और उपविभागीय अधिकारियों के माध्यम से राज्य के विधानसभा के विपक्ष  नेता विजय वडेट्टीवार, गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्र के सांसद डॉ नामदेव किरसान ,चंद्रपुर के पुलिस अधीक्षक, जिल्हाधीकारी को ज्ञापन दिया गया। मोर्चा में सैकड़ों महिला - पुरुष मुस्लिम भाई मौजूद थे।

        ज्ञापन देते वक्त तंजील रज़ा, हाफ़िज़ अनीस, हाफ़िज़ अमजद, हाफ़िज़ अज़हर, जावा शेख, मौलाना अंसार, मोहम्मद सौदागर, मोहम्मद आरिफ़, अज़हर शेख, इकबाल सौदागर, कलीम पठान, पप्पू भाई, आरिफ़ बाबू, रिज़वान पठान, अम्मुभाई, अब्दुल राजिक, जमीर शेख आदि मौजूद थे।


PostImage

Chunnilal kudwe

Sept. 6, 2024

PostImage

'Shri Baba Ramdevji's' huge gathering Jagran and Bhajan evening in Chimur - 'छोटे मोठे सब बोलेंगे बाबा तेरी जय बोलेंगे' के लगे चिमूर में जयकारे


• रामदेवबाबा जन्मोत्सव पर जम्मा जागरण व कलश शोभायात्रा का हुआ आयोजन

चिमूर -
      श्री रामदेवबाबा भक्त मंडल व पूर्व विधायक मितेश भांगडीया की ओर से श्री बाबा रामदेव का 29 वां जम्मा जागरण, भजन संध्या एवं जन्मोत्सव बुधवार को मनाया गया। मार्केट लाइन के छत्रपती शिवाजी महाराज चौक स्थित श्री बाबा रामदेव मंदिर में भांगडीया परिवार के हाथों पूजा- अर्चना कर भव्य कलश शोभायात्रा शहर के मुख्य मार्ग शहीद बालाजी रायपूरकर चौक से संगीत की धुन, स्पर्श ढोल ताशा और वारकरी भजन के साथ बाबा तेरी जय बोलेंगे, छोटे-मोटे सब बोलेंगे के जयकारे से चिमूर शहर गुंजायमान हो गया। 

      बुधवार की रात सुशील गोपाल बजाज व सहयोगी केले माध्यम से जम्मा जागरण व भजन संध्या का आयोजन किया गया था। गुरुवार को भजन संध्या आरती व कलश शोभायात्रा श्री बाबा रामदेव मंदिर से छत्रपति शिवाजी महाराज चौक, शहीद बालाजी रायपुरकर चौक मुख्य मार्ग से नेहरू चौक, अहिंसा चौक, मार्कीट लाईन से मार्गक्रमण कर श्री बाबा रामदेव मंदिर में आरती के साथ कलश शोभायात्रा संपन्न हुई। इस दौरान कलशांवर शोभायात्रा में संत गाड़गेबाबा, तुकड़ोजी महाराज, गजानन महाराज, शंकरजी, गणेश, पार्वती आदि की झांकियां तैयार की गई थी। यह झांकियां चिमूरवासियों के लिए आकर्षण का केंद्र बनी थी। इस अवसर परी पूर्व विधायक मितेश भांगडीया, विधायक बंटी भांगडीया, श्रीकांत भांगडीया, मेघा भांगडीया, अपर्णा भांगडीया, आरती भांगडीया, डा. वैभव बियाणी, नेहा बियाणी, पार्थ भांगडीया, गौरव भांगडीया, अर्जुन भांगडीया, रुद्र भांगडीया, सुशील कोठारी, आनंद गट्ठाणी, संजय हेडा, कल्पना हेडा, संजय मालाणी, संगीता मालानी, योगेश साबु, द्वारकादास भुतडा, दीपक मोहता, नीलम राचलवार, राजू बलदवा, हरिष सारडा, अमित जाजू, हिरा बलदवा, गोपाल बलदवा, राजू देवतळे, घनश्याम डुकरे व श्री बाबा रामदेव भक्त मंडल व भक्त आदि उपस्थित थे।


PostImage

Chunnilal kudwe

Sept. 5, 2024

PostImage

Chimur Dahi Handi festival - ठेकेदार म्हणून नाही तर समाजाचे देणं म्हणून चिमूर विधान सभा क्षेत्रात काम केले - शिवाणी वडेट्टीवार


श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी उत्सव

  • चिमूर क्रांती क्रिडा व सांस्कृतीक समितीचे आयोजन


चिमूर -

           शिक्षणाच्या बाबतीत अती मागासलेला म्हणून चिमूर शहराची ओळख होती. या तालुक्यात शिक्षणाच्या पर्यायी सोयी उपलब्ध नसल्यामुळे येथील युवकांना उच्च शिक्षणासाठी बाहेर पडावे लागत असल्याचे वास्तव चिमूर विधान सभा क्षेत्राचे  तत्कालीन आमदार विजय वडेट्टीवार यांच्या लक्षात आल तेव्हा त्यांनी कला, वाणिज्य , विज्ञान शाखांचे पदवी पदव्युत्तर कॉलेज शहरात स्थापन केले. आज घडीला अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असले  विवीध शिक्षणाच्या माध्यमातून हल्ली दहा वर्ष चिमूर मागे पडले असून शहरात  बेरोजगारी वाढली आहे. चिमूर विधान सभा क्षेत्रात विजय वडेट्टीवार यांनी ठेकेदार म्हणून नाही तर समाजाचे देन म्हणून काम केल यापुढेही या क्षेत्रात काम करत राहणार असल्याचे बुधवार ला सायंकाळी दहीहंडी उद्घाटन प्रसंगी मंचावरून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव शिवाणी वडेट्टीवार बोलत होत्या.

       चिमूर क्रांती क्रीडा व सांस्कृतीक समितीचे आयोजक संदीप कावरे यांनी नेहरू विद्यालयाच्या प्रांगणात दहीहंडी उत्सव स्पर्धेचे आयोजन केले होते.

          या कार्यक्रमाच्या अध्यक्ष व उद्घाटक महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवाणी वडेट्टीवार, प्रदेश संघटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी धनराज मुंगल, चिमूर विधानसभा समन्वयक  सतिश वारजूकर,  सरचिटणीस जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी राजेंद्र लोणारे, अध्यक्ष ओबीसी काँग्रेस  प्रदीप तळवेकर, सरपंच साईश वारजूकर, गौतम पाटील, नागेंद्र चट्टे, पलश वारजूकर, नितीन कटारे, अनिल डगवार , डॉ आनंद किन्हाके, रोहन नन्नावरे सारंग मामीडवार, सुभाष मोहीनकर ताहीर शेख, अक्षय नागरिक विलास मोहिनकर, इशांत मामीडवार, प्रविण वरगंटीवार आदी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
      विशेष अतिथी धनराज मुंगले म्हणाले की, चिमूर विधानसभा क्षेत्रात विकासाचा कांगावा होत आहे मात्र  चिमूर - वरोरा राष्ट्रीय महामार्ग सात वर्षापासून अर्पूणच आहे याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला. 
        दहीहंडी स्पर्धेत विदर्भातील तेरा संघानी सहभाग दर्शवीला होता. या स्पर्धेतील पुरुषापैकी प्रथम बक्षीस एक लाख एक रुपये कमलबाई नामदेव वडेट्टीवार यांचेकडून जय शितला माता मंदिर ग्रुप बाबुपेठ चंद्रपूर यांनी तर दुसरे बक्षीस महासचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस याचे कडून एक्कावन हजार एक रुपये आदिशक्ती ग्रुप भंडारा यांनी पटकावीले. महिलापैकी पहीले बक्षीस  प्रदेश संघटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी ( ओबीसी ) धनराज मुंगले यांचे कडून एकेवीस हजार एक रुपये शिवशाही गर्ल्स ग्रुप राजुरा यांनी पटकावीले. दरम्यान संस्कृती राजू दांडेकर या मुलींने विजय वडेट्टीवार व शिवानी वडेट्टीवार यांचे स्केच फोटो काढून भेट दिले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक प्रा. राजू दांडेकर, आभार नागेंद्र चट्टे यांनी केले कार्यक्रमाला परिसरातीय बहुसंख्य नागरीफ उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Sept. 4, 2024

PostImage

तालुक्यातील शेतकरी करणार ५ सप्टेंबर उद्याला आमदार भांगडीया यांचा सत्कार


-  शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यात आमदार बंटी भांगडिया यांचा मोलाचा वाटा.

   चिमूर - 

       भाजप महायुती शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी, कल्याणासाठी ऐतिहासिक निर्णय घेतलेले असताना चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात लाभ मिळाला. त्यात आमदार बंटी भांगडिया यांचा मोलाचा वाटा असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आमदार बंटी भांगडिया यांचा सत्कार ५ सप्टेंबर गुरुवारला दु. २ वाजता भांगडीया नविन वाडा पिंपळनेरी रोड, चिमूर येथे करणार असल्याची माहिती संयोजक भाजप किसान आघाडी चिमूर विधानसभा एकनाथ थुटे यांनी दिली आहे.

  महायुती सरकारने दोन वर्षात शेतकऱ्यांना पीक विमा, कापूस, सोयाबीन अनुदान, धान बोनस रक्कम, वीज बिल माफ, दिवसा शेती साठी १२ तास वीज पुरवठा असे अनेक शेतकरी वर्गाला सुखी करणारे निर्णय घेतले आहे. आमदार बंटी भांगडिया यांनी सतत पाठपुरवठा करीत शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. शेतकऱ्यांत आमदार भांगडीया विषयी एक आनंदाची पर्वणी आहे. 


PostImage

Chunnilal kudwe

Sept. 4, 2024

PostImage

29th birth anniversary of Shri Ramdev Baba - चिमूर नगरित श्री रामदेवबाबा यांचा २९ वा विशाल जम्मा जागरण व भजन संध्या आजपासून


  • श्री रामदेवबाबा भक्त मंडळ  यांचे आयोजन

    चिमूर - 
          श्री  रामदेवबाबा यांचा  २९ वा विशाल जम्मा जागरण सह विविध कार्यक्रम ४ सप्टेंबर बुधवार पासुन सुरु झाला असून हा दोन दिवसीय कार्यक्रम गुरुवार पर्यंत चालणार आहे.


        ४ सप्टेंबर बुधवार ला रात्री १० वाजता  श्री रामदेवबाबा चे परम भक्त हैद्राबाद येथील  रहीवासी सुशील गोपाल बजाज आणि सहकारी यांच्या उपस्थितीत जम्मा जागरण  भजन संध्याला सुरवात होईल. ५ सप्टेंबर गुरुवारला सकाळी ५ वाजता भजन संध्या आरती, दुपारी ३ वाजता कलश शोभा यात्रा, सायंकाळी ६. ३० वाजता संध्या आरती नंतर लगेच ७.३० वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री रामदेव बाबा भक्त मंडळ चिमूर यांनी केले आहे.


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 30, 2024

PostImage

Dahi Handi Competition - उद्याला चिमुरात भव्य दहीहंडी स्पर्धाचा आगाज


स्व. गोटुलाल भांगडिया व स्व. धापूदेवी भांगडीया यांच्या स्मृती प्रित्यर्थ भांगडिया फाउंडेशनचे आयोजन 

चिमूर -

         स्व. गोटुलाल भांगडिया व स्व. धापुदेवी भांगडिया यांच्या स्मृती प्रित्यर्थ भांगडीया फाऊंडेशनच्या वतीने शहरातील नेहरू विद्यालयाच्या प्रांगणात ३१ ऑगस्ट शनिवारला दुपारी ४.३० वाजता भव्य दहीहंडी स्पर्धा आयोजीत केली आहे. या कार्यक्रमाचे विनीत चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया आहेत

        दरवर्षी प्रमाने याही वर्षी भांगडीया फांडडेशनच्या वतीने चिमूर शहरात भव्य दहीहंडी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमानिमीत्त भाजयूमो चिमूर शहर अध्यक्ष बंटी वनकर यांच्या हस्ते स्पर्धेच्या ग्राउंडचा पूजन कार्यक्रम २९ ऑगस्ट गुरुवारला पार पडला. या दहीहंडी स्पर्धेच्या प्रथम व व्दितीय विजेत्यांना रोख रक्कम देण्यात येणार आहे. दहीहंडी स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी सचिन डाहुले, गुणवंत चटपकार, गोलू मालोदे, शुभम सातपुते यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन भांगडीया फाउंडेशन, भारतीय जनता पार्टी चिमूर, भाजपा युवा मोर्चा चिमूर यांनी केले आहे.


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 29, 2024

PostImage

Shri Santaji Jaganade Maharaj Auditorium - चिमुरातील चावडी परिसरात होणार श्री संत संताजी जगनाडे महाराज सामाजिक सभागृह


 आमदार बंटी भांगडीया यांचे हस्ते होणार रविवारला सभागृह बांधकामांचे भूमीपूजन

चिमूर - 
         वैशिष्टपूर्ण  कामासाठी विशेष अनुदान निधी या योजने अंतर्गत चिमूर नगरपरिषद क्षेत्रातील चावडी परिसरात श्री संत संताजी जगनाडे महाराज सामाजिक सभागृह मंजूर झाले त्या सभागृहाच्या बांधकाम भूमिपूजनाचा सोहळा कार्यक्रम १ सप्टेंबर रविवारला सकाळी ११ वाजता श्री संत संताजी जगनाडे महाराज अधिष्ठान चावडी मोहला चिमूर येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमानिमीत्त सभागृह बांधकामाचे भूमिपूजन चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांचे हस्ते होणार आहे.


      या कार्यक्रमाला जेष्ठ समाजसेवक कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. महादेव पिसे, प्रमुख अतिथी न प मुख्याधीकारी डॉ. सुप्रिया राठोड, जेष्ठ वक्ते, तेली समाज गजानन उमाटे, केंद्रीय अध्यक्ष विदर्भ तेली समाज रघुनाथ शेंडे, सामाजीक कार्यकर्ता भाग्यवान खोब्रताडे, प्रकाश देवतळे, अध्यक्ष, श्री संत संताजी जगनाडे महाराज मंडळ राजू अगडे, प्रदीप बंडे, लता अगडे, सामाजीक कार्यकर्त्यां मनिषा कावरे, मिनाक्षी बंडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. परिसरात होनाऱ्या सभागृह बांधकाम भूमिपूजन कार्यक्रमाला तेली समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री संत संताजी जगनाडे महाराज कल्याणकारी मंडळ, चिमूर तथा सर्व तेली समाज बांधव चिमूर यांनी केले आहे


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 28, 2024

PostImage

Congress 'Nyaya Yatra' and 'Hatla Bol March' against the government - राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात काँग्रेसची शेतकरी न्याय यात्रा व हल्ला बोल मार्च



भिसी, जांबुळघाट आणि नेरी येथून पोहचला चिमूर शहरात शेतकऱ्यांचा बैलबंडी, ट्रॅक्टर व पायदळ मोर्चा


चिमूर - 
            चिमूर तालुक्यात अतिवृष्टी होवून शेत पीके नष्ट झाली. अनेक कुंटूब बेघर होवून उद्धवस्त झाली. परंतू राज्यात असलेल महायुतीच सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही. सरकारचे लक्ष वेदण्यासाठी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ नामदेव किरसान व चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक डॉ सतिश वारजूकर यांच्या नेतृत्वात शेतकरी शेतमजूर यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी विरोधी सरकारच्या विरोधात काँग्रेसने विवीध मागण्यासाठी बुधवार ला दहा वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आंबोली चौरस्ता येथून तुकडोजी महाराजाच्या पुतळ्याचे पूजन करून शेतकरी न्याय यात्रा व हल्ला बोल मोर्चाला सुरुवात करण्यात आली. ही न्याय यात्रा भिसी शहरातील महापुरुषाच्या पुतळ्यांना अभिवादन व करून जांबुळघाट, नेरी मार्गे चिमूर पंचायत समिती कार्यालय समोरून श्रीहरी बालाजी देवस्थान येथे दिड वाजता शेतकरी न्याय यात्रा पोहचली. दरम्यान श्रीहरी बालाजी महाराज देवस्थान ते चिमूर तहसिल कार्यालय पर्यंत शेतकऱ्यांचा बैलबंडी, ट्रॅक्टर व पायदळ मोर्चा मुख्य रस्त्याने काढण्यात आला.

        तहसिल कार्यालया समोरील मोर्चाचे रुपांतर सभेत झाले दरम्यान उपस्थित मान्यवरांनी शेतकरी मोर्चेकऱ्यांना संबोधीत केले. अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी रुपरे 50 हजार तात्काळ मदत करावी, शेतकऱ्यांना पीक विमा तात्काळ जाहीर करून संपूर्ण कर्जमाफी करावी. अतिवृष्टीमुळे घरे पडलेल्या कुटुंबांना तात्काळ घरकुल मंजूर करण्यात यावे, कृषी पंपांना रात्री मिळणारी वीज दिवस पाळी करून 24 तास पुरविण्यात यावी, शेतकऱ्यांचे प्रलंबित असलेली प्रोत्साहनपर राशीचे 50 हजार रुपये देऊन 2 लाखाचेवर जुने कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे, घरगुती वीज वापरासाठी लावण्यात येणारे स्मार्ट मीटर लावण्यात येऊ नये, मोखाबर्डी उपसासिंचन योजनेचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे, रोजगार हमीच्या कामावर असलेल्या मजुरांचे व कुशल कामांचे पैसे तात्काळ देण्यात यावे, वन जमिनींचे पट्टे लाभार्थ्यांना लवकरात-लवकर देण्यात यावे,घरकुल योजनांचे पैसे जराही विलंब न करता लाभार्थ्यांना लवकर देण्यात यावे, अतिवृष्टीमुळे पडलेले घर व गुरांचे गोठे पीडित कुटुंबांना तात्काळ मदत करण्यात यावी, वाढविण्यात आलेली वीज दरवाढ मागे घेण्यात यावी, ताडोबा अभयारण्याला लागून असलेल्या शेतकऱ्यांना शेतमालाचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्याकरिता मागेल त्या शेतकऱ्याला सरसकट जाळीचे कुंपण मोफत पुरविण्यात यावे, वन जमिनीवरील शेतकऱ्यांचे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही वन विभागाने त्वरित थांबवावी. आदी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार दिनेश पवार मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांना देण्यात आले.
         निवेदन देताना खासदार डॉ नामदेव किरसान, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तथा माजी. आमदार, अध्यक्ष खनिकर्म महामंडळ (राज्यमंत्री) दर्जा डॉ अविनाश वारजूकर, सेवादल सहसचिव प्रा राम राऊत, समन्वयक  चिमूर विधानसभा काँग्रेस तथा उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश ओबीसी महासंघ डॉ सतिश वारजूकर, महाराष्ट प्रदेश काँग्रेस ओबीसी संघटक धनराज मुंगले, माजी जि प सदस्य पंजाबराव गावडे, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी डॉ विजय गावडे, महासचिव जिल्हा काँग्रेस कमिटी गजानन बुटके, शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी अविनाश अगडे, उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी विवेक कापसे, महासचिव प्रदेश युवक काँग्रेस महाराष्ट्र साईश वारजूकर, काँग्रेस सेवादल किशोर शिंगरे, पप्पू शेख, आदी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते व मोर्चात हजारो शेतकरी शेतमजूर उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 27, 2024

PostImage

नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी जनसंवाद


  •  आगळा वेगळा कार्यक्रम - प्रश्न विद्यार्थ्यांचे उत्तरे आमदारांची
  • पासष्ठ विद्यार्थ्यांनी विचारले प्रश्न  

          चिमूर -   

            नेहरू विद्यालय व  कनीष्ठ महाविद्यालयाच्या वतीने  महाविद्यालयात २७ ऑगस्ट मंगळवार ला प्रश्न विद्यार्थ्यांची उत्तरे आमदारांची एक आगळा वेगळा कार्यक्रमा अंतर्गत  महाविद्यालयील विद्यार्थ्यांशी आमदारांचा जनसंवाद पार पडला. यात महाविद्यालयातील पासष्ठ विद्यार्थ्यांनी आमदार बंटी भांगडीया यांना प्रश्न विचारले.

    विद्यार्थ्यांनी चिमूर विधान सभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया यांना शिक्षण, आरोग्य, क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील जनतेशी निगडित न कंटाळता तब्बल चार तास विद्यार्थ्यांनी बसून प्रश्न विचारले असता हसत खेळत आमदारांनी विद्यार्थ्यांना प्रश्नाची उत्तरे दिली. एका विद्यार्थीनीने चिमूर क्रांती भुमी विषयी  आपले स्वप्न काय आहे असा प्रश्न विचारला असता आमदार बंटी भांगडिया यांनी उत्तर देत सांगितले की प्रथम चिमूर क्रांती जिल्हा निर्माण करणे, कांपा चिमूर वरोरा रेल्वे मार्ग,चिमूर ला जलमार्ग हब हेच स्वप्न असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष घालून मोठे व्हावे अश्या शुभेच्छा दिल्या.
       यावेळी मंचावर प्राचार्य निशिकांत मेहरकुरे उपस्थित होते. संचालन लोंढे तर आभार वाघधरे यांनी व्यक्त केले. दरम्यान भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे, भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे, भाजयुमो प्रदेश सचिव मनीष तुंम्पलीवार,जेष्ठ नेते घनश्याम डुकरे, संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष संजय नवघडे, किशोर मुंगले, जयंत गौरकर,श्रेयस लाखे, अमित जुमडे, गोलू मालोदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मेहनत घेतली होती.


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 24, 2024

PostImage

Assault on a mentally ill woman - अत्याचार करणाऱ्या त्या आरोपींना कठोर शिक्षा द्या - शिवाणी वडेट्टीवार


 नागभिड येथील मनोरुग्ण महिलेवरील लैंगीक अत्याचार प्रकरण

  • चिमूर, नागभिड, सिंदेवाही काँग्रेस शिष्टमंडळाची अतिरिक्त पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा  

 चिमूर - 
         जिल्ह्यातील नागभीड येथे १२ दिवसांपूर्वी एका मनोरुग्ण महिलेवर लैंगिक अत्याचार करून  व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल करण्यात आला. या प्रकरणातील एक  अल्पवयस्कसह सहा आरोपींना नागभिड पोलीसांनी दिनांक 22  ऑगस्ट शुक्रवार ला अटक केली. या घटनेची माहिती मिळताच प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार व चिमूर नागभिड सिंदेवाही काँग्रेस शिष्टमंडळाने नागभिड पोलीस स्टेशनला शनिवारला भेट देत उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना अत्याचार प्रकरणातील त्या आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली.

         १२ ऑगस्ट ला नागभीड शहरात एक मनोरुग्ण महिला एकटी फिरत असल्याचे पाहून काही इसमांनी त्या महिलेला सुनसान व अंधाराचा फायदा घेत नागभिड एसटी  बसस्थानक येथील प्रसाधनगृहातील निर्जन स्थळी अत्याचार केला. एवढेच नाही तर अत्याचार करतानाचा व्हिडिओ आरोपींपैकी एकाने मोबाईल द्वारे शूट करून जतन केला. काही दिवसानंतर हाच व्हिडिओ आपल्या मित्राला पाठविला असता संबंधित मित्राने सोशल मीडिया ग्रुप वर तो विडीओ वायरल केल्याने घटनेतील नराधमांचा हा अमाननीय प्रकार चव्हाट्यावर आला.
           सदर घटनेची माहिती मिळताच प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार आपला सिंदेवाही तालुका जनसंपर्क दौरा आटपून त्वरित आपल्या कार्यकर्त्यांसह नागभीड येथील पोलीस स्टेशन गाठले. पोलीस स्टेशनला उपस्थित अतिरिक्त पोलीस अधीक्षक रीना जनबंधू व इतर पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन राज्यात नुकत्याच घडलेल्या बदलापूर, अकोला जिल्ह्यातील घडलेल्या अमानुष घटनांच्या तसेच नागभीड येथे घडलेल्या अतिशय निंदनीय प्रकाराच्या पार्श्वभूमीवर विस्तृत चर्चा करून नागभीड येथील घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी याकरिता पोलीस विभागाने सहकार्य करत सदर प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात यावे अशी मागणी केली. 
        यावेळी काँग्रेसचे चिमूर विधानसभा समन्वयक डॉ. सतीश वारजुरकर, ओबीसी संघटक धनराज मुंगले, नागभीड तालुका अध्यक्ष प्रमोद चौधरी, महिला तालुका अध्यक्ष प्रणया गड्डमवार, सिंदेवाही तालुका अध्यक्ष सीमा सहारे, सिंदेवाही नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, उपनगराध्यक्ष मयूर सुचक, महिला शहराध्यक्ष प्रीती सागरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जयश्री कावळे, माजी नगरसेवक प्रतिक भसीन, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष महेश कुर्जेकर, युवक कांग्रेस महासचिव अमोल वानखेडे, युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ मुळे, सिंदेवाही अध्यक्ष अभिजीत मुपीडवार, गजानन उरकुडे, प्रशांत गेडाम, संकेत वारजुकर, संदीप सातव, भूपेश कोरे, पारस नांगरे,  रूपाली रत्नावार, निमंत्रिका कोकोडे, प्रीती गुरणुले, रजनी काऊलकर, महेश मंडलवार, निकु भैसारे, रोशन वारजूरकर, अंकुश सिडाम आदी काँग्रेसचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 22, 2024

PostImage

Dengue in Chimur taluka - चिमूरकरांनो सावधान - तालुक्यात डेंग्यू


चिमूर उपजिल्हा रुग्णालयात वीस दिवसात 29 रुग्ण 

 

चिमूर - 
         जुलै-ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसाने अनेक शहरातील खाली जागेतील प्लॉट वर तालुक्यातील अनेक ठिकाणी पाणी साचले आहे तर अनेक भागातील नाल्याची सफाई न झाल्याने अनेक भागात गटारगंगा वाहत आहेत त्यामुळे  शहरात व ग्रामीण भागात डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे गटारगंगा व अस्वच्छतेमुळे  नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

 
       चिमुरातील उपजिल्हा रुग्णालयात वीस दिवसात 29 डेंगू रुग्णाची नोंद झाली असून आज घडीला आठ ते दहा रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत तर काही रुग्ण उवचार घेऊन घरी गेले आहेत वीस दिवसात 29 रुग्णांची  नोंद झाल्याने चिमुरकरानो सावधान,शहरात डेंग्यूचा  धोखा वाढतोय......सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असून मागील चार पाच दिवसापासून पावसाने अनेक भागात उसंत दिली आहे त्यामुळे नागरीकांना चांगलाच उकाळा सहन करावा लागत आहे या गर्मीमुळे तालुक्यात सर्दी,खोकला ताप, मलेरिया,डेंगू सारख्या आजाराचा सामना करावा लागत आहे खाजगी दवाखान्यासह, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालयाच्या ओपीडी मध्ये  रुग्णसंख्या वाढली आहे 
      चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात ऑगस्ट महिन्यात वीस तारखेपर्यत 29 डेंगू रुग्णांची नोंद झाली असून त्यात 10 पुरुष,12 महिला  तर 7 मुलांची नोंद करण्यात आली आहे तर आजघडीला आठ ते दहा डेंग्यूचे रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत हा आकडा चिमूर उपजिल्हा रुग्णालयातील असून खाजगी दवाखान्यातील डेंगू रुग्ण वेगळेच आहेत याकडे  शहरातील नगर परिषद व तालुक्यातील ग्राम पंचायतचे दुर्लक्ष होत आहे. अनेक ठीकाणी फवारणी मशीनने धुव्वा सोडण्याच  शहरात दिसून येत नाही. मात्र डेंग्यूच्या या रुग्ण संख्येवरून चिमूर शहरासह तालुक्यात डेंग्यूचा धोखा वाढला असून हा डेंग्यूचा आकडा चिमुरकरांना सावधानतेचा इशारा  देत आहे. 
-----------------------------
बदलणाऱ्या लाइफस्टाइलने व परिसरातील अस्वच्छतेने घरातील एसी,कुलर मधील पाण्यात डेंग्यूच्या डासाची निर्मिती होते त्यामुळे नागरिकांनी हप्त्यातून एक दिवस ड्राय डे पाळणे गरजेचे आहे तर साधा ताप आल्यास वेळीच रक्ताची तपासणी करून जवळच्या रुग्णालयात उवचार करावे

डॉ.अश्विन अगडे
वैद्यकीय अधिकारी,
उपजिल्हा रुग्णालय चिमूर


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 22, 2024

PostImage

'Rakshabandhan' Hashy Jatra fem 'Prajakata Mali' - शनिवारला चिमूरातील रक्षाबंधन कार्यक्रमात महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्राजक्ता माळी येनार


कार्यक्रमात आमदार बंटी भांगडिया यांची प्रमुख उपस्थिती.

चिमूर - 

भारतीय जनता पार्टी महिला आघाडी तालुका चिमूर च्या वतीने भव्य रक्षाबंधन कार्यक्रम दिनांक २४ ऑगस्ट शनिवार ला आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाचे आकर्षण महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सह आमदार बंटी भांगडिया यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रक्षाबंधन कार्यक्रम शनिवारला दुपारी १२ वाजता अभ्यंकर मैदान येथील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

    चिमूर तालुक्यातील महिलांनी रक्षाबंधन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्ष माया नन्नावरे, प्रदेश चिटणीस ममता डुकरे, दुर्गा सातपुते आशा मेश्राम, गिता लिंगायत, वर्षा शेंडे, भारती गोडे, प्रतिभा गेजिक, वैशाली चन्ने, कल्याणी सातपुते, नसीमा शेख रत्नमाला मेश्राम, छाया कंचर्लावार अरुणा नन्नावरे समिना शेख इतर महिलांनी केली आहे.


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 21, 2024

PostImage

Rotary Family - रोटरी परिवारतील महिलांनी पोलीस बंधूना बांधली राखी


 चिमूर रोटरी क्लबचा उपक्रम


चिमूर - 
           रोटरी क्लब दरवर्षी शहरात नव नविन  सामाजिक उपक्रम राबवीत असते असाच उपक्रम रक्षाबंधनच्या दिवसी 20 ऑगस्ट मंगळवार ला चिमूर पोलिस स्टेशन येथील पोलिस बंधूंना रोटरी क्लब परिवारातील महिला सदस्यांनी  राखी बांधून रक्षाबंधन उत्सव व्दिगुनीत केला.


        बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन रक्षाबंधनाला बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देत असतो. "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" या ब्रीदवाक्यानुसार सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास पोलिस बांधव सदैव दक्ष आणि सज्ज असतात. आज संध्याकाळी 7 वाजता पोलिस स्टेशन चिमूर येथे आनंद उत्साहात पोलिस निरीक्षक संतोष बाकल व इतर पोलीस बंधूंना राखी बांधून त्यांच्यासोबत महिला भगिनींनी रक्षाबंधन साजरा केला. महिलांनी सर्वांना राखी बांधून आपले दायित्व रोटरी परिवारातील सपना गंपावार, राजश्री ताकसांडे, अर्चना भोयर, डॉ. आश्लेषा लांडगे, सपना बेत्तावार, डॉ.पौर्णिमा खानेकर यांनी पार पाडले.
        यावेळी या कार्यक्रमास चिमूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक संतोष बाकल सर ,रोटरी क्लब चिमूर चे अध्यक्ष रोटे. विशाल गंपावार, सचिव रोटे. कैलास धनोरे, कोषाध्यक्ष रोटे.पवन ताकसांडे, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त रोटे. भोयर सर, रोटे.रोकडे सर,  रोटे. प्रफुल बेत्तावार, रोटे.गुरुदास ठाकरे,  कृषीमित्र रोटे. अभिजीत बेहते , रोटे. डॉ.महेश खानेकर उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 19, 2024

PostImage

Bhartiya kisan Sanghatan - भारतीय किसान संघटनेची जिल्हा कार्यकारणी गठीत


 जिल्हाध्यक्षपदी जगदीश रामटेके


चिमूर - 
          भारतीय किसान संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र यादव यांनी भा कि संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी जगदीश रामटेके  यांची निवड केली असता जिल्हाध्यक्ष यांनी हुतात्मा स्मारक चिमूर येथे रविवारला सभा आयोजीत करून भारतीय किसान संघटनेची चंद्रपूर जिल्हा कार्यकारणी गठीत केली.


      उपाध्यक्ष वामन लहानू गेडाम, सचिव गुलाब कचरू गेडाम, सहसचिव संदेश शंकर रामटेके, कोषाध्यक्ष मंगेश परसराम थेरकर, सल्लागार ॲड विलास मोहुर्ले , कार्याध्यक्ष दिपक विलास वाघमारे, संघटक नरेश तानबा गजभीये, सदस्य अशोक किसन भिमटे, सदस्य बंडू परसराम तराळे, सदस्य लालाजी शिवराम शेंडे आदी पदाधिकारी, सदस्य यांची निवड करण्यात आली. दरम्यान हि संघटना  शेतकऱ्यासंदर्भात असल्याने जिल्हाध्यक्ष जगदीश रामटेके यांनी प्रत्येक पदाधिकारी, सदस्य यांना जबाबदारी वाटून दिली आहे.


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 15, 2024

PostImage

वडाळा स्मशान भूमीची स्वच्छता करून पन्नास झाडांचे वृक्षारोपन


स्वातंत्र्यदिनानिमीत्त रोटरी क्लब चिमूरचा उपक्रम


चिमूर - 
       वडाळा (पैकू) स्मशान भूमी परिसरात यावर्षीच्या सत्तरच्या पावसाने  लहान मोठी काटेरी झुडपे तयार होवून नागरीकांना अस्वच्छतेचा त्रास होत होता. हि बाब रोटरी क्लबच्या लक्षात आली. स्वातंत्र्य दिनानिमीत्य रोटरीने  बुधवारला श्रमदानातून स्मशान भूमी स्वच्छ करून पन्नास झाडांचे वृक्षारोपन करण्यात आले.


      स्मशानभूमी परिसरात  जांभूळ ,चाफा, पिंपळ, वड, उंबर  इत्यादी प्रजातीच्या पन्नास झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. ही मोहिम रोटरी क्लब चिमूर चे अध्यक्ष रोटे.विशाल गंपावार यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली. यावेळी सचिव रोटे कैलास धनोरे, कोषाध्यक्ष रोटे पवन ताकसांडे, , सार्जंट ऑफ आर्म रोटे मंगेश हिंगणकर, रोटे वैभव लांडगे, रोटे राकेश बघेल, रोटे आदित्य पिसे, रोटे गुरुदास ठाकरे, रोटे विलास अल्लडवार, रोटे डॉ. आदर्श पाल, रोटे राजेंद्र संगमवार,  रोटे यश गोहणे,  रोटे कृषिमित्र अभिजित बेहाते,  रोटे अक्षय अवधूत, रोटे रूपेश अगडे,  रोटे अमर चट्टे,  मनोज कठाणे,  रोटे जयवंत वरघने, रोटे प्रफुल्ल बेत्तावार,  रोटे डॉ. महेश खानेकर आदीची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता रोटरी क्लब चिमूर च्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 15, 2024

PostImage

Natural calamity check to the family of the deceased - पूरात वाहून गेलेल्या समीरच्या कुंटूबीयांना नैसर्गीक आपत्तीचा ४ लक्ष ६४ हजार रुपयाचा धनादेश


आमदार बंटी भांगडीया यांनी घेतली मृत समीरच्या कुंटूबाची सांत्वन पर भेट


चिमूर - 
        तालुक्यातील मजरा (बे.) येथील स्व. समीर वामन राणे १९ वर्ष या युवकाचा दि. ७ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीमुळे नाल्याला आलेल्या पुरात बैलजोडीसह वाहून गेल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता १५ ऑगस्ट स्वांतत्र दिनी गुरुवारला दुपारी आमदार बंटी भांगडीया यांनी मृतकांच्या निवासस्थानी कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन कुटुंबीयांना धीर देत शासनाच्या वतीने नैसर्गिक आपत्ती मधून मृत युवकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत ४ लक्ष रुपये व बैलजोडी नुकसान भरपाई ६४ हजार रुपयांचा धनादेश देन्यात आला. 


        यावेळी तहसीलदार चिमूर श्रीधर राजमाने,भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा तालूका महामंत्री हेमराज दांडेकर, सं.गां.नि.अ.यो. समिती अध्यक्ष संजय नवघडे, भाजपा ज्येष्ठ नेते मजहर शेख, भाजपा ज्येष्ठ नेते घनश्याम डुकरे, माजी पं. स. सदस्य अजहर शेख, भाजपा ज्येष्ठ नेते गिरीश भोपे, भाजपा ज्येष्ठ नेते विनोद रणदिवे, भाजयुमो चिमूर शहराध्यक्ष बंटी वनकर ,भाजपा नेते दशरथ नन्नावरे, भाजयुमो चिमूर शहर महामंत्री अमित जुमडे, सरपंच ग्रा. पं. रेंगाबोडी मारोती रहाटे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष वेणूदास बारेकर आदी भाजपा नेते पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 15, 2024

PostImage

The Chief Magistrate denied permission to MP Kirsan - मुख्याधिकारी यांनी चक्क खासदार यांना शहीद स्मृती दिनाच्या कार्यक्रमाची परवानगी नाकारली


शाहिद स्मृती दिनाच्या कार्यक्रमापासून कांग्रेस वंचित?
- पत्रकार परिषदेत काँग्रेसचा आरोप

चिमूर - 
          १६ ऑगस्ट १९४२ ला चिमूरात क्रांती झाली तेव्हा चिमूर तीन दिवस स्वतंत्र राहीले होते त्या दिनाचे अवचित्य साधून चिमुरात १६ ऑगस्ट ला शाहिद स्मृती दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याच अनुषंगाने कांग्रेसचे खासदार नामदेव किरसान यांनी १६ ऑगस्ट ला अभ्यंकर मैदान येथील सभागृहात शाहिद स्मृती दिन कार्यक्रमाच्या परवानगी साठी मुख्याधिकारी नगर परिषद चिमूर यांना पत्र दिले मात्र मुख्याधिकारी यांनी चक्क खासदार यांनाच परवानगी नाकारल्याने चिमूर तालुका कांग्रेस शाहिद स्मृती दिन कार्यक्रम घेण्यापासून वंचित राहीली असल्याचे बुधवार ला आयोजीत पत्रकार परिषदेत चिमूर तालूका काँग्रेसचे पदाधिकारी बोलत होते.

           तत्कालीन चिमूर ग्रामपंचायत कार्यकाळापासून शहरात शहीद स्मृती दिन कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक आमदार यांच्या मार्फत घेण्यात येते हीच परंपरा कायम ठेवत मागील दहा वर्षांपासून भजपचे आमदार किर्तीकुमार भांगडीया बीपीएड ग्राउंड तर कधी अभ्यंकर मैदान येथे कार्यक्रम आयोजित करतात यावर्षी सुद्धा आमदार बंटी भांगडीया यांच्या आयोजनात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सह अनेक भाजपचे नेते उपस्थित राहून शाहिदाना अभिवादन करणार आहेत तर दुसरीकडे कांग्रेसने शहीद स्मृती दिन कार्यक्रम घेण्यासाठी तालुका कांग्रेस अध्यक्ष विजय गावंडे यांनी १९ जुलैला मुख्याधिकारी यांना परवानगीसाठी अर्ज केला तर खासदार डॉ नामदेव किरसान यांनीही १९ जुलै ला कार्यक्रमाच्या परवानगीसाठी अर्ज केला मात्र मुख्याधिकारी सुप्रिया राठोड यांनी परवानगी देण्याचे तोंडी सांगितले मात्र आज घडी पर्यत अभ्यंकर मैदानावर तालुका कांग्रेस व  खासदार याना  परवानगी देण्यात आली नाही. हे सर्व लोकप्रतीनीधी यांच्या हुकूमशाहीमूळे घडले असल्याची माहिती काँग्रेसने पत्रकार परिषदेत देत शहीद स्मृती दिन कार्यक्रमासाठी भाजपला दोन ठिकाणी परवानगी दिली मात्र कांग्रेसचे खासदार डॉ नामदेव किरसान यांनी परवानगी परवानगी साठी नगर परिषदेत पत्र देऊनही परवानगी न देता पत्रावर कुठलीच कारवाई केली नाही त्यामुळे मुख्याधिकारी सुप्रिया राठोड यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्रकार परिषदेतून काँग्रेसने केली. पत्रकार परिषदेला काँग्रेस चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक डॉ सतिश वारजूकर, प्रा राम राऊत गजानन बुटके डॉ विजय गावंडे अविनाश अगडे विवेक कापसे ॲड धनराज वंजरी पप्पू शेख राकेश साठेने पलश वारजूकर श्रिकांत गेडाम अक्षय लांजेवार आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
..........................................
तत्कालीन मुख्याधीकारी यांनी अर्जावर रिमार्क केला होता. ज्यांचा प्रथम अर्ज नगर परिषदेला प्राप्त झाला त्यांनाच कायदा व सुव्यवस्थेचे भान ठेवून संबंधीत जागेची परमिशन देण्यात आली.

राहुल कंकाल
प्रभारी मुख्याधिकारी न प चिमूर
..........................
भाजपाने १२ जुलै ला दोन कार्यक्रमाच्या परमिशनचा अर्ज  नगरपरिषद ला केला होता. मात्र त्यांना सभेसाठी जागाच पाहिजे होती तर त्यांच्याकडे सभा घेण्यालायक शहरात अनेक जागा आहेत त्या जागांची परमिशन का बर घेतली नाही. 

आम. बंटी भांगडीया
चिमूर विधानसभा क्षेत्र


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 13, 2024

PostImage

शहीद स्मृती दिनानिमित्त नियोजन बैठक


16 ऑगस्ट शहीद स्मृती दिन सोहळा नियोजनासंदर्भात उपविभागीय कार्यालयात बैठक
- आमदार भांगडीया यांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सुचना

चिमूर -
       आमदार बंटी भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत  प्रशासकीय भवन, चिमूर येथे मंगळवारला उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात चिमूर क्रांती भूमीत १६ ऑगस्ट रोजी होणाऱ्या शहीद स्मृती दिन सोहळा व भारतरत्न, माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिदिन सोहळ्याच्या नियोजनासंदर्भात शासकीय बैठक पार पडली. 


         या बैठकीत आमदार बंटी भांगडीया यांच्या उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन, रूपरेषा व पूर्वतयारीसंदर्भात सविस्तर चर्चा करून आवश्यक सूचना दिल्या. या बैठकीला विविध प्रशासकीय अधिकारी/यंत्रणा व भाजपा नेते, पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 11, 2024

PostImage

Salute to the Martyrs of Chimur Kranti Bhoomi - चिमूर क्रांती भूमीतील ''शहीदांना'' अभिवादन करण्यासाठी येणार फडणविस, बावणकुळे, मुनगंटीवार, महाजन


16 ऑगस्ट शहीद स्म्रुती दिन सोहळा व माजी पंतप्रधान अटबिहारी वाजपेयी यांचा स्मृतीदीन

चिमूर - 

       चिमूर क्रांतीला यावर्षी 82 वर्षे पुर्ण होत आहेत. या क्रांती लढ्याचे भावी पिढीला स्मरण व्हावे या दृष्टीकोनातून दरवर्षी शहीद स्मृती दिन सोहळा व माजी पंतप्धान अटलबिहारी वाजपेयी यांचा स्मृती दिनाचे आयोजन शहरात करण्यात येते. या कार्यक्रमाला यावर्षी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास पंचायत राज व पर्यटन मंत्री ( म रा ) गिरीश महाजन, सांस्कृतीक कार्य वने मत्स्य व्यवसाय मंत्री ( म रा ) तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदी मान्यवर चिमूर क्रांतीभूमीतील वीर शहीदांना अभिवादन व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृति दिनानिमित्त शहरातील अभ्यंकर मैदान, हुतात्मा स्मारक येथे 16 ऑगस्ट शुक्रवार ला येनार असून पुढील नियोजीत कार्यक्रम बीपीएड ग्राऊंड, आदर्श विद्यालय वडाळा (पैकु) येथे होणार असल्याची माहिती विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांनी दिली. 

        दरम्यान देशभक्तीपर संगीताचा कार्यक्रम दुपारी 4  वाजता होणार असून सायंकाळी 5 वाजता  क्रांतीभूमातील विर शहीदांना अभिवादन ( हुतात्मा स्मारक, अभ्यंकर मैदान ) केले जाणार आहे. त्यानंतर  लगेच नियोजीत कार्यक्रम स्थळी स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या कुटूंबातील प्रमुखांचा सत्कार व पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृती दिन कार्यक्रम केला जाणार आहे.

         कार्यक्रमात विशेष अतिथी केंद्रीय मागासवर्गिय आयोग अध्यक्ष (केंद्रीय कॅबीनेट मंत्री दर्जा) पूर्व केंद्रीय गृहराज्य मंत्री, भारत सरकार हंसराज अहीर, माजी आमदार मितेश भांगडिया व  कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी खासदार अशोक नेते, आमदार कृष्णा गजभे, आमदार किशोर जोरगेवार माजी आमदार संजय छोटे, माजी आमदार अतूल देशकर, भाजपा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष हरिष शर्मा, सर्वाधिकारी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी लक्ष्मण गमे, माजी सर्वाधिकारी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी प्रकाश वाघ महाराज आदी मान्यवर मंचावर  उपस्थिती राहणार आहे. परिसरातील नागरीकांनी या शहीद स्मृती दिन सोहळा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया व चिमूर तालूका भाजपा पदाधिकारी कार्यकर्त यांनी केले आहे 


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 11, 2024

PostImage

MLA Bhangdia Lends a helping hand to fishermen - आमदार भांगडीया यांनी दिला चिमूर विधानसभा क्षेत्रातील मच्छीमार संस्थाना मदतीचा हात


 चिमूर विधानसभा क्षेत्रातील सदतीस मच्छीमार संस्थांना आर्थिक मदत देण्याची घोषणा

  • शहरातील वाल्मीकी मच्छीमार संस्थेस पन्नास हजार रुपयांचा धनादेश 

चिमूर -

       आमदार बंटी भांगडिया यांनी चिमुर विधानसभा क्षेत्रातील सततीस मच्छीमार सहकारी संस्थाना पन्नास हजार रुपयाची आर्थिक मदत देण्याची घोषणा करीत चिमूर तालुक्यातील चौदा संस्थापैकी दहा संस्थाना मदत सुपूर्द करण्यात आली. दरम्यान चिमूर येथील वाल्मिकी मच्छीमार सहकारी संस्थेला पन्नास हजार रूपयाचा धनादेश भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे यांनी संस्थेचे अध्यक्ष शंकर मोहीनकर व संचालक मंडळाकडे सुपूर्द केला. 

     ढिवर समाज व मच्छीमार संस्थाच्या विकासासाठी आमदार बंटी भांगडिया पाठीशी आहे. मासेमारी करणाऱ्यासाठी जॅकेट, जाळे खरेदी किंवा इतर कार्यासाठी ही मदत आहे. समाजानी येणाऱ्या काळात आमदार बंटी भांगडिया यांच्या सोबत राहण्याचे आवाहन भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे यांनी केले. मंचावर युवा मोर्चा शहर अध्यक्ष बंटी वनकर, भाजप मच्छीमार आघाडी तालुका अध्यक्ष दिवाकर डहारे शंकर मोहीनकर, भुपेश पचारे, रमेश कंचर्लावार, विलास कोराम, विकी कोरेकर, करण चावरे, गुणवंत चटपकर, नितीन बघेल, ईश्वर दिघोरे, संस्थेचे संचालक व समाज बांधव आदी उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 7, 2024

PostImage

'Manrega' - चिमूर विधानसभा क्षेत्रात ४ कोटी १० लक्ष रुपयांच्या विकास कामांना मंजूरी


आमदार बंटी भांगडिया यांच्या प्रयत्नाला आले मोठे यश.

    चिमूर..

     चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांना चिमूर विधानसभा क्षेत्रात मनरेगा अंतर्गत विविध गावातील सिमेंट रस्ता कामाच्या ४ कोटी १० लक्ष रू च्या निधी मंजूर करण्यात यश आले आहे. 

    चिमूर विधानसभा क्षेत्रातील आमडी मदन ते हनुमान मंदिर पर्यत सिमेंट रस्ता करणे १५ लक्ष,उसळमेंढा येथे सिमेंट रस्ता करणे १५ लक्ष रू,कन्हाळगाव येथे सिमेंट रस्ता करणे १५ लक्ष,कवडशी (देश )पुष्पकला बावणे ते वंजारी यांचे घरा पर्यत सिमेंट रस्ता करणे १५ लक्ष रू,कोसंबी गवळी येथे सिमेंट रस्ता करणे १५ लक्ष रू, कोर्धा येथे सिमेंट रस्ता करणे १५ लक्ष रू,खडसंगी येथील मेन रोड ते मधुकर बनसोड यांचे घरा पर्यत सिमेंट रस्ता करणे १५ लक्ष रू, खांबाडा येथील हेमंत गौरकर ते हनुमान मंदिर पर्यत रस्ता करणे १५ लक्ष रू,गिरगांव येथे सिमेंट रस्ता करणे १५ लक्ष रू, तळोधी येथील रमेश जाभूळे ते मधु गिरी घरा पर्यत रस्ता करणे १५ लक्ष रू,देवपायली येथे सिमेंट रस्ता करणे १५ लक्ष रू,नवतळा येथे घेरोबा मुंगणे ते ज्ञानेश्वर हजारे घरा पर्यत रस्ता करणे १५लक्ष रू,नवेगाव पांडव येथे सिमेंट रस्ता करणे १५ लक्ष रू,पार्डी येथे सिमेंट रस्ता  करणे १५ लक्ष रू, पिंपळगाव येथील हनुमान मंदिर ते गुरुदेव सेवा मंडळ पर्यत रस्ता करणे १५ लक्ष रू,बाळापूर (बु ) येथे रस्ता करणे १५लक्ष रू, बोडधा येथील हनुमान मंदिर ते प्रमोद नाकाडे घरा पर्यत रस्ता करणे १५ लक्ष रू,बोथली मधु कोसरे ते सूर्यभान नागपुरे घरा पर्यत रस्ता करणे १५ लक्ष रू,मिनथुर येथे सिमेंट रस्ता करणे २०लक्ष रू, लोहारा येथील मधुकर मेश्राम ते सरकारी दवाखाना पर्यत रस्ता करणे १५ लक्ष रू,वलनी मेंढा येथील सिमेंट रस्ता करणे १५ लक्ष रू,सिरपूर येथील शालिक डहारे ते रामभाऊ मोहिनकर यांच्या घरा पर्यत रस्ता करणे १५ लक्ष रू,शिवरा येथील मधु सावसाकडे ते सुरेश नन्नावरे यांच्या घरा पर्यत रस्ता करणे १५ लक्ष रू,सावरगाव येथील सिमेंट रस्ता करणे, योगेश नाकाडे ते विलास नाकाडे यांच्या घरा पर्यत रस्ता करणे १५ लक्ष रू,सावरी येथील विलास वाकडे ते रतीराम ठवरे घरा पर्यत रस्ता करणे १५ लक्ष रू,हेटी (गंगासागर ) येथे सिमेंट रस्ता करणे १५ लक्ष रू. अश्या प्रकारे निधी मंजूर करण्यात आली आहे.

  आमदार बंटी भांगडिया यांनी मनरेगा अंतर्गत रस्ता कामे मंजूर केले असल्याने नागरिकांनी आभार व्यक्त करीत आमदार बंटी भांगडिया यांच्या विकास कार्यावर समाधान व्यक्त केले.


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 4, 2024

PostImage

Tiger attack - वाघाने शेतमजूरांच्या ' हाताचा पंजा'  जबडयात घेवून सोलला


आमदार बंटी भांगडीया यांनी केली जखमीला औषध उपचारासाठी आर्थिक मदत

  • चार घायल नागपूर ला रेफर 
  • - वनाधीकारी यांच्या निष्काळजीपनामुळे शेतमजूरांचा हाताचा पंजा निकामी होण्याची शक्यता 

चिमूर -
         शेतमजूर शेतातील काम आटोपून झुडूपात दबा धरून बसलेल्या वाघाला पाहण्यासाठी सायंकाळी घटना स्थळावर आला होता. दरम्यान वनाधिकारी यांनी वाघाला घटना स्थळावरून पिटाळून लावण्यासाठी सोबतीला शेतमजूराला घेतले होते. शेतकरी ओरडत झुडुपाच्या दिशेने जात असताना वाघाने डरकाळी फोडत शेतमजुराच्या मानेवर हल्ला चढवीला वाघाचा प्रतिकार करत शेतमजुराने उजवा हात आडवा केला असतानाच वाघाने हाताचा पंजा जबड्यात घेत सोलला असल्याची घटना  रविवार ला सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान चिमूर प्रादेशिक वनविभागाच्या उरकुडपार शेत शिवारात घडली जखमी शेतमजूरांचे नाव दामोधर नन्नावरे वय ६३ वर्ष नवेगाव (पेठ) उरकुडपार येथील रहीवासी रहीवासी आहे. 


      गरडापार येथील शेतकरी कवडू सावसाकडे शेतात धानाचे रोवणी करत असताना  झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला असता पाट, मनगट, पोट व भूजाला जबर मार आहे. कवडू ओरडल्याने तेथून तो वाघ दुसरीकडे जात असताना दुसरा शेतकरी शेतात काडया गाडत असताना त्याच्यावर हल्ला केला त्या शेतकऱ्यांचे नाव बालाजी नन्नावरे वय ५२ वर्ष रा गरडापार येथील रहीवासी असून याला वाघाने पंजा मारला असता हात कंबर पोटाला जबर मार आहे हि घटन पाऊन वाजता घडली. त्यानंतर वाघ उरकुडणार शेत शिवारात आला तिसरा व्यक्ती  वनमजूर अडीज वाजता नर्सरीत काम करित असताना वाघाने  त्याच्यावर हल्ला चढवीला त्या वन मजूराचे नाव बाबाराव दडमल असून त्याच्या पोट, मांडी, हात, डोक्याला व छातीला जबर मार व शरीराच्या काही भागाला वाघाने पंजाच्या सहायाने गंभीर जखमा केल्या आहेत. 
      गरडापार, उरकुडपार येथील गावकऱ्यांनी चिमूर प्रादेशिक वन विभागाला माहिती दिली असता वन विभागाचे अधिकारी कर्मचारी उशीराने घटना स्थळावर पोहचले. तो पर्यंत दोघांना वाघाने घायल केले होते. दरम्यान एका पाठोपाठ चार व्यक्तींना वाघाने घायल केले. यांना प्राथमिक उपचारासाठी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले.या चारही लोकांना जबर मार गंभीर जखमा असल्याने आमदार बंटी भांगडीया यांच्या सुचनेनुसार भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, युवा मोर्चा प्रदेश सचिव मनिष तुम्पल्लीवार, तालूका अध्यक्ष बाळू पिसे, तालूका महामंत्री प्रशांत चिडे,  कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक कैलास धनोरे, रमेश कंचर्लावार, सतिश जाधव, कुणाल कावरे आदी भाजप कार्यकर्त्यांनी जखमीची भेट घेत औषध उपचारासाठी आर्थिक मदत करत नागपूरला रेफर केले.
        पाच वाजताच्या दरम्यान परिसरात पावसाला सुरुवात झाली. दुपार पर्यंत त्या वाघाला पिटाळून लावण्यासाठी वनविभागाने कोणतीही उपाय योजना केली नाही. त्यामुळे हा अनर्थ घडला. पुन्हा हा वाघ किती लोकांना घायल करणार ? असे शेतकरी बोलत असून वनाधिकाऱ्यांनी शेतमजूरी करणाऱ्या दामोधर नन्नावरे ला वाघाला पिटाळून लावण्यासाठी सोबतीला घेतले  तो आरडा ओरड करितानांच वाघाने त्याच्यावर वाघाने हल्ला चढवून त्याचा हात आपल्या जबडयात घेऊन सोलला हा अनर्थ वनाधिकारीच्या निष्काळजीपनाने घडला त्यामुळे त्यांच्या हाताचा पंजा निकामी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे नागरीक बोलत आहे. मात्र  एका पाठोपाठ एक प्रमाणे वाघाने जखमी करण्याचा सपाटा लावल्याने शेतकऱ्यांत दहशत निर्माण झाली असून वन विभागाने तात्काळ वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. वनाधिकारी यांच्यासी मोबाईलवरून संपर्क साधला असता टोलवा टोलवीची उत्तरे मिळत होती.


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 3, 2024

PostImage

Farmers Crop Insurance - चिमूर विधान सभा क्षेत्रातील नऊ हजार शेतकरी पिक विम्यापासून वंचित


 आमदार बंटी भांगडीया यांनी घेतली जिल्हाधीकारी यांची भेट

 दिले सकारत्मक कार्यवाही व अंमलबजावनीसाठी आदेश


चिमूर -
          मागील वर्षी अति पाऊसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. दरम्यान पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली होती. मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याची रक्कम जमा झाली नाही. उर्वरीत शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात खात्यात रक्कम जमा होईल असे सांगीतले गेले मात्र रक्कम जमा झाली नाही. असे चिमूर विधानसभा क्षेत्रातील नऊ हजार शेतकरी पिक विम्यापासून वंचित आहे.
          जिल्ह्यातील ओरिएंटल इंशुरन्स कंपनी व प्रशासन पिक विमा लाभार्थी शेतकऱ्यांना सहकार्य करित नसून पिक विमा संदर्भातील माहीती पुरविण्याची यंत्रणा ठप्प आहे. त्यामूळे चिमूर विधाक्षेत्रातील नऊ हजार शेतकरी पिक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांची व्यथा व आपबीती आमदार बंटी भांगडीया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारला जिल्हाधीकारी विनय  गौडा यांची भेट घेत सांगीतली असता  जिल्हाधीकारी गौडा यांनी संबंधीत प्रशासन व विमा कंपनीसी संपर्क साधून पिक विम्याची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात येणार असून यावर्षीच्या अतिवृष्टीमूळे धान सोयाबीन कापूस या पिकांना अन्य रोगांने कीड लागली शेतपिकांचे नुकसान झाले आहे. झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी व पंचनामे पूर्ण झालेले असून संपूर्ण अहवाल पुढील कार्यवाहीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे विवीध प्रश्न व त्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी पाच ऑगस्ट ला बैठक बोलावून संबंधीत सर्व प्रशासकीय अधिकारी व यंत्रणेला तातडीने सकारात्मक कार्यवाही तथा अंमलबजावणीसाठी आदेश देण्यात येईल अशी माहिती जिल्हाधीकारी यांनी दिली.
        यावेळी भाजप नेते प्रकाश देवतळे, भाजपा तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा किसान मोर्चा चिमूर विधानसभा संयोजक एकनाथ थुटे आदी उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 3, 2024

PostImage

' मुख्यमंत्री माझी लाडकी बहीन 'योजनेत तिन अशासकीय सदस्याची निवड


 चिमूर विधान सभा क्षेत्र निहाय समितीची स्थापना

आमदार बंटी भांगडीया यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड

चिमूर -

          महिलांच्या आर्थिक उन्नती, स्वातंत्र्य, आरोग्य आणि पोषणात सुधारणा करने व कुंटूबातील त्यांची निर्णयाक भूमीका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीन ही योजना सुरू करण्यात आली. सदर योजनेची विधानसभा निहाय अंमलबजावणी करण्यासाठी विधान सभा क्षेत्र निहाय चिमूर विधानसभा क्षेत्रात विधान सभा क्षेत्र समिती स्थापन करण्यात आली यात तिन अशासकीय सदस्याची निवड जिल्हयाचे पालकमंत्री मार्फत जिल्हाधिकारी यांनी केली आहे.

       मुख्यमंत्री माझी लाडकी बहीन योजनेत चिमूर विधानसभा क्षेत्र निहाय समितीत सहा सदस्यांची निवड करण्यात आली या समितीचे अध्यक्ष आमदार बंटी भांगडीया असून चिमूर विधानसभा क्षेत्रातील नागभिड येथील सचिन आकुलवार व चिमूर ( भिसी ) येथील किशोर मुंगले यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड झाली आहे. तर संबधीत विधान सभा क्षेत्रातील तहसिलदार, गट विकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची सदस्य व बाल विकास प्रकल्प अधिकारी ( ग्रा. ) चिमूर पुनम गेडाम यांची सदस्य सचिव म्हणून निवड करण्यात आली. या समितीतील अध्यक्ष सचिव सदस्य यांना विधानसभा क्षेत्रनिहाय त्यांच्या क्षेत्रातील लाभार्थ्याची यादी अंतीम करण्याचे अधिकार देण्यात आले आहे.


PostImage

Chunnilal kudwe

July 30, 2024

PostImage

जि. प. प्राथ.शाळा कवडसी ( डाक ) येथे वृक्षारोपण


शिक्षन विभागामार्फत शिक्षण सप्ताह

चिमूर - 
        महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागामार्फत शिक्षण सप्ताह साजरा केला जात आहे.या सप्ताहाचे औचित्य साधून जि.प.प्राथ.शाळा कवडशी (डाक) येथे वृक्षारोपण करण्यात आले. एक मुल एक झाड याप्रमाणे शाळेच्या प्रांगणात, परिसरात,शेताच्या बांधावर आंबा,  फणस, चिकू, चिंच, वड, पिंपळवृक्ष, इत्यादी फळझाडे, गुलाब,कृष्णकमळ, शेंवती, मोगरा, सदाफुली आदी फुलझाडे, तुळस,अडूळसा, पानफुटी, कोरफड आदी औषधी वनस्पती, वांगी,टमाटर,दोडका,चवळी शेंगा, लौकी आदी भाजीपाला, सांबार, पालक ईत्यादी पालेभाज्याचे रोपण करण्यात आले. वृक्षलागवड करून संवर्धन करण्याची शपथ घेण्यात आली.प्रधानमंत्री पोषण आहार योजना यामूळे प्रभावी होईल असे प्रतिपादन सहाय्यक शिक्षिका कविता लोथे यांनी केले. तर वृक्षांवर माया कराल तर ते आपल्याला भरभरून देतात असे मुख्याध्यापक धनराज गेडाम यांनी सांगितले. 
      हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळाव्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, ग्रामस्थ, पालक यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स.शि. कविता लोथे, मुख्याध्यापक धनराज गेडाम व आजी-माजी विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.


PostImage

Chunnilal kudwe

Feb. 25, 2024

PostImage

'Ghoda Yatra' Navratri ends with Gopala - Gopala - गोपाला - गोपाला ने श्रीहरी बालाजी महाराज घोडायात्रा नवरात्रीची समाप्ती


हजारो श्रीहरी बालाजी भक्तांनी घेतला श्रीहरी चा काला

चिमूर घोडा यात्रा उत्सव

        ३९७ व्या घोडायात्रा उत्सवा निमित्त १४ फेब्रुवारी मिती माघ शुद्ध वसंत पंचली ला श्रीहरी बालाजी महाराज घोडा रथ यात्रा नवरात्र प्रारंभ झाली होती. मिती माघ शुद्ध गुरु प्रतिपदा रविवार ला अडीज वाजता हभप विनोद बुवा खोंड महाराज यांच्या नारदीय काल्याच्या किर्तनाने महाआरती करून गोपाला गोपाला म्हणत दही हंडी फोडून काला वितरीत करत श्रीहरी बालाजी महारज यांची घोडा यात्रा नवरात्रीची समाप्ती करण्यात आली.                                                   

        श्रीहरी बालाजी महाराज यांच्या घोडारथ यात्रेला २५१ वर्ष झाले. मिती माघ शुद्ध पंचमी गुरुवार ला मध्यरात्री अश्वारूढ लाकडी घोड्यावर श्रीहरी बालाजी महाराज यांची विष्णूची मूर्ती बसवून घोडा रथ यात्रा शहरातून मार्गक्रमण करण्यात आली होती. मिती माघ शुद्ध गुरु प्रतिपदा रविवार ला दुपारी श्रीहरी बालाजी मंदीर परिसरात हभप विनोद बुवा खोंड महाराज यांनी घोडायात्रा निमित्त गोपाल काल्याचे किर्तन केले मंदिरातील पुजारी यांनी महाआरती केली नारदीय किर्तनाने गोपाला गोपाला म्हणत दही हंडी फोडून गोपाल काला वितरण करण्यात आले यावेळी श्रीहरी बालाजी महाराज देवस्थान कमेटीचे अध्यक्ष निलम राचलवार, डॉ मंगेश भलमे, ॲड चंद्रकांत भोपे डॉ दिपक यावले, नैनेश पटेल, धमरमसिंग वर्मा आदी उपस्थित होते. दरम्यान आमदार बंटी भांगडीया व काँग्रेस चिमूर विधान क्षेत्राचे समन्वयक डॉ सतिश वारजूकर यांनी श्रीहरीचे दर्शन घेत गोपाल काला व मसाला भात वितरण केले.


  •       गोपल काल्याला छतीसगड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश व राज्यातील हजारो श्रीहरी बालाजी भक्त आले होते. हि यात्रा महाशिवरात्री पर्यंत राहते. यात्रेत विवीध संघटनांनी शहरातील मुख्य मार्गावर मासला भाताचे स्टॉल लावून श्रीहरी बालाजी भक्तांना वाटप करण्यात आले. गोपाल काल्या दरम्यान पोलीसांचा चोख बंदोबस्त होता. यात्रेत आकाश पाळणे, ड्रगन, बोट, भूत बंगला मौत चा कुआँ, मिना बाजार, खेळण्यांची दुकाने, मनोरंजनात्मक कार्यक्रम व विवीध साहित्याची दुकाने सजली आहेत.


PostImage

Chunnilal kudwe

Feb. 23, 2024

PostImage

Horse Chariot Yatra Chimur - जयश्री बालाजी, गोविंदा - गोविंदाच्या गजराने चिमूर नगरी निनादली


घोडा रथ यात्रा दरम्यान अश्वारूढ श्रीहरी बालाजी महाराजांच्या प्रतिकृतीचे लाखो बालाजी भक्तांनी घेतले दर्शन
- शहरातील मुख्य मार्गाने निघाली घोडा रथ यात्रा


           चिमूर येथील श्रीहरी बालाजी महाराज यांच्या घोडारथ यात्रेला ३९७ वर्षाची परंपरा आहे. यावर्षी घोडा रथ यात्रा उत्सवाला २५१ वर्ष झाले आहे. मिती माघ शुद्ध पंचमी गुरुवार ला मध्यरात्रीच्या दरम्यान पुजा अर्चना करून लाकडी रथावरील लाकडी अश्वारूढ घोड्यावर लाकडी श्रीहरी बालाजी महाराज यांच्या प्रतिकृतीत विष्णूची मूर्ती बसवून परंपरेनुसार शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत असताना याच अश्वारूढ श्रीहरी बालाजी महाराजांच्या प्रतिकृतीचे लोखो बालाजी भक्तांनी दर्शन घेतले. दरम्यान जय श्रीहरी बालाजी महाराज गोविंदा गोविंदाच्या गजराने चिमूर नगरी निनादली. यालाच रात घोडा असे म्हणतात.


        श्रीहरी बालाजी देवस्थान कमिटीच्या वतीने दरवर्षीप्रमाने याहीवर्षी घोडा रथ यात्रा उत्सवाचे आयोजन केले या उत्सवात गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, आमदार बंटी भांगडीया व परिवारांनी घोडा रथ यात्रा उत्सवादरम्यान श्रीहरी बालाजी महाराजांचे दर्शन घेत  गोविंदा गोविंदा सह जय श्रीरामाचे जयकारे लावले. दरम्यान श्रीहरी बालाजी महाराज कमिटीचे सर्व विश्वस्त, डाहुले पाटील यांचे वंशज व पुजारी भोपे यांच्या व्दारे विधीवत पूजा करून श्रीहरी बालाजी महाराजांचा घोडारथ गुरुवारी मध्यरात्री साढे बारा वाजताच्या दरम्यान शहरातील मुख्यमार्गानी फटाक्याची आतीशबाजी करत मार्गक्रमनासाठी निघाली असता वारकरी भजन मंडळ टाळ मृदुंगा व डिजेच्या ताल सुरात शहीद बालाजी रायपूर चौक, नेहरू चौक, अहिंसा चौक, मार्केट लाईन, छत्रपती शिवाजी चौकातून मुख्य मार्गाने श्रीहरी बालाजी मंदीरासमोर शुक्रवारी पहाटे साडे पाच वाजता पोहचला असता परिसर संपूर्ण भक्तीय झाला होता दरम्यान घोडा रथ यात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी लाखो भक्तांनी श्रहिरी बालाजी महाराजांचे दर्शन घेतले.
         २५ फेब्रुवारी रविवार ला दुपारी ३ वाजता हभप विनोद बुवा खोंड महाराज यांच्या नारदीय किर्तनाने गोपाल काला होणार आहे. श्रीहरी बालाजी भक्तांनी या गोपाल काल्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीहरी बालाजी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष निलम राचलवार यांनी केले आहे.हि यात्रा महाशिवरात्री पर्यंत असते. या यात्रेत मनोरंजनात्मक आकाश पाळना, ड्रँगन, कोलंबस, मौत काँ कुआँ, भूत बंगला, बैठकी ब्रेक डान्स पाळना व मिना बाजारात म विवीध साहित्यांच्या खरेदी दुकाने सजली आहेत.
..................................
संपूर्ण परिसर जय श्रीराममय झाला  - 
     इशरथ जहान यांचा घोडायात्रा महोत्सवानिमित्त गुरुवार ला रोड शो ठेवण्यात आला दरम्यान श्रीहरी बालाजी मंदीर परिसारत स्थानिक स्टेजवर भगवा रंग चढणे लगा है हे गाणे म्हणत असताना अनेक भक्तांनी ठेका घेतला. श्रीहरी बालाजी महाराज घोडा रथ यात्रा दरम्यान शहरातीत मुख्य रस्त्यानी रोड करण्यात आला. यावेळी संपूर्ण परिसर जय श्रीराममय झाला. 
         चिमूर घोडा यात्रा महोत्सव समिती यांच्या वतीने २६ फेब्रुवारी ला चला हवा येऊ द्या भाऊ कदम भरत गणेशपुरे व संच यांचा लाईव्ह कामेडी शो, २७ फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय गरबा गायीका गिताबेन रब्बारि यांचा लाईव्ह कॉन्सर्ट कार्यक्रम, २८ फेब्रुवारी ला जयजय महाराष्ट्र माझा गीत फेम अवधूत गुप्ते यांचा लाईव्ह कॉन्सर्ट कार्यक्रम चिमूर बाजार मैदान लोणकर पेट्रोल पंपच्या जवळ रात्रो ८.३० वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला परिसरातील नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष बंटी वनकर व सहकारी यांनी केले आहे.


PostImage

Chunnilal kudwe

Feb. 22, 2024

PostImage

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti - छत्रपती शिवाजी महाराजाचा लावलेला बॅनर काढून अपमान करणाऱ्यावर कारवाई करा - डॉ सतिश वारजूकर



 चिमूर पोलीसात तक्रार ठाणेदाराला निवेदन

       बहुजन प्रती पालक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोमवारला होती त्या दरम्यान चिमूर येथील तलावाच्या पाळीवरील श्याम बंग यांच्या दुकानावरील बॅनर स्टॅन्डवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेला मानाचा मुजरा असा बॅनर जयंती दिनी एक दिवसासाठी किरायाने घेण्यात आला रक्कमही दिली होती. मात्र भाजपा नेत्यांच्या दबावात येवून बॅनर स्टॅण्ड मॅनेजर यांनी तो लावलेला बॅनर काही क्षणातच आदळ आपट करत खाली फेकला बॅनरवर असलेला बहुजन प्रती पालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोचा अपमान करणाऱ्यावर कारवाई करा अशी मागणी चिमूर विधानसभा समन्वयक सतिश वारजूकर यांनी बुधवारला ठाणेदार योगेश घारे यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे. 


      शिव जयंतीच्या दिवसी एक दिवसा करीता बॅनर स्टॅण्ड किरायाने घेतले होते. याची ॲडव्हास बुकिंग रक्कम २ फरवरीला बॅनर स्टॅण्ड मॅनेजर प्रित सुभाष घोरपडे यांच्या खात्यात ऑनलाईन पाच हजार रुपये जमा केली होते. त्यानंतर महाराजांच्या जयंती दिवसी बॅनर लावल्याचा फोटो मित्र अफरोज पठाण यांनी पाठवीला दुपार नंतर बॅनर स्टॅण्ड मॅनेजर घोरपडे यांनी तुमची रक्कम वापस करीत आहो असे सांगत कारण विचारले असता त्यांच्यावर दबाव आणत तुम्ही वारजूकर यांचा लावलेला बॅनर काढा नाही तर आम्ही तुम्हाला मारू, बॅनर काढून फेकु अशी धमकी भाजपाच्या नेत्यांनी दिली व दुपारी सव्वा दोन वाजता बॅनर काढून फेकल्याचा व्हिडीओ पाठवीला. बहुजनांचे आराध्य दैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा बॅनर आदळ आपट करत खाली फेकला. त्यामुळे बहुजनांच्या भावणा दुखावल्या आहेत. चिमूर येथे राष्ट्रसंत थोर महापुरुषाचे बॅनर फाडून फेकल्याच्या घटना घडत आहेत अशा घटना भविष्यात घडू नये व राष्ट्रसंत, थोर महापुरुषांच्या अपमान होवू नये यासाठी पोलीसांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करनाऱ्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करावे या मागणीसह आंदोलनाचा इशारा डॉ सतिश वाजूकर गजानन बुटके रोशन ढोक जावा भाई प्रदीप तळवेकर आदी काँग्रेस पदाधीकारी यांनी निवेदनातून केला आहे. दरम्यान निवेदण सहायक पोलीस निरीक्षक निलेश चवरे यांनी स्वीकारले असता चौकशी करून कारवाई करतो असे बोलले

.....................................
श्रीहरी बालाजी महाराज घोडा यात्रा महोत्सव निमित्त चिमूर नगर परिषदच्या परवानगीने शहरात ४x४ चे १५० बॅनर लावण्यात आले त्यापैकी ६५ बॅनर चोरी गेले व ८५ बॅनर शिल्लक आहे. यांची तक्रार मुख्याधीकारी नगर परिषद व ठाणेदार पोलीस स्टेशन चिमूर ला देण्यात आली. बॅनर चोरी करणाऱ्यांची चौकशी करून तात्काळ योग्य कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.
..............................
विना पारवानगीने कायम स्वरूपी बॅनर लावणाऱ्यावर कारवाई करा-
चिमूर नगर परिषद हद्दीत अनेक दिवसापासून कायम स्वरूपी लोखंडी बॅनर स्टॅण्डवर बॅनर लावले जात आहे. याकडे नगर परिषदचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नगरपरिषदचा कर बुडत आहे. त्यांच्यावर नगरपरिषदने कोणतीही कारवाई केली नाही. विना परवानगी अवैध बॅनर लावणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून दंड वसूल करण्यात यावा व कायम स्वरूपी किरायाने देत असलेले शहरातील लोखंडी बॅनर स्टॅण्ड तिन दिवसात न हटविल्यास २९ फरवरी पासून धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शंकरपूर ग्रामपंचायतचे सरपंच साईश वारजूकर यांनी मुख्याधीकारी यांना बुधवार ला दिलेल्या निवेदनातुन दिला आहे.
............................
श्रीहरी बालाजी देवस्थान यांच्या तलावाच्या पाळीवरील श्याम बंग यांच्या दुकानांच्यावरती लोखंडी बॅनर स्टॅण्ड लागलेला आहे तो लोखंडी बॅनर स्टॅण्ड अनाधिकृत आहे. त्यावर नियमानुसार कारवाई करणार.

डॉ सुप्रिया राठोड
मुख्याधीकारी नगर परिषद चिमूर


PostImage

Chunnilal kudwe

Jan. 29, 2024

PostImage

'Parjanya' became a scientist - कठिण परिश्रमाच्या संघर्षातुन 'पर्जन्य' झाला वैज्ञानिक


चिमूर क्रांतीभूमीचे नाव केले लौकीक


            शिक्षणाची ओढ असली तरी आर्थिक परिस्थिती समोर जावू देत नाही असा समज असल्यामूळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी मागे पडताना दिसतात अशीच परिस्थिती शहरातील एका विद्यार्थावर आली. कुंटूब सुशिक्षीत मात्र आर्थिक विवंचनेत असताना मनाची तयारी केली अन यशालाही गवसनी घालता येते अशीच संकल्पना मनात ठेवून आर्थिक परिस्थितीला न घाबरता कठीण परिश्रमाच्या संघर्षातून मार्ग काढत पर्जन्य वैज्ञानिक झाला. तो दिल्ली येथील केंद्र सरकारच्या इलेट्रानिकी एव सुचना प्रौधोगिकी मंत्रालयात वैज्ञानीक बी सहायक निदेशक ( आई टी ) या पदावर कार्यरत आहे.
        पर्जन्य चे वडिल शिवशंकर चोपकर सिव्हील इंजिनीअर आई उषा चोपकर गृहिनी होत्या ते चिमूर येथील गांधी वार्ड येथील रहिवासी आहेत. पर्जन्य ने प्राथमिक शिक्षक संस्कार विद्या निकेतन व बारावी पर्यंतचे शिक्षण नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिमूर येथुन केले . इथे झाले. खरतर पर्जन्यचे अख्खे  बालपन आर्थिक व मानसीक समस्येत गेले. मात्र जिवणात काही मोठं व्हायच हे आधीपासुनच ठरवल होत यासाठी खुप स्ट्रगल करत रात्रनं दिवस अभ्यास केला. यासाठी शैक्षणिक कर्ज घेतल खुप संघर्ष करत असतानाच स्पर्धा परिक्षेचा पहिला अटेम्प दिला मात्र यात अपयश हाती आले. दरम्यान कॉलेजमधून प्लेसमेंट झाल व कंपनी जॉईन केली. या कंपनीतील नौकरीमुळे थोडी आर्थिक समस्या कमी झाली मात्र शैक्षणिक कर्ज असल्यामुळे एक नौकरी सोडून दुसरी नौकरी करायला जमत नव्हते त्यामूळे पूर्ण वेळ स्पर्धा परिक्षेचा दुसरा अटेम्पट देवू शकत नव्हता तेव्हा नौकरी सोबतच अभ्यास करायच ठरविले. यात थोडफार यश आल.

       पर्जन्य ला पहिली नौकरी चेन्नई येथे सॉफ्टवेअर इंजिनीयर ची मिळाली त्यानंतर पुन्हा  परिक्षेचा दुसरा अटेम्पट दिला यातही अपयश आल. तेव्हा आपल्याला मोठं व्हायच आहे हे लक्षात ठेवून परिक्षेला तिन महीने असताना नौकरी सोडली व जिद्द चिकाटी व मेहनतीने करो या मरो या स्थितीत अभ्यास केला अखेरिस मेहनितीचे फळ मिळायला सुरुवात झाली लागोपाठ GATE, BARC, JNUEE, NET, JRF, NIC परिक्षा झाली. पर्जन्य ने NIC मध्ये वैज्ञानिक सहायक निदेशक या पदावर आपले नाव कोरून क्लास 1 गॅझेटेड अधिकारी झाला असून पर्जन्य ने चिमूर क्रांतीभूमी चे नाव लौकीक केले आहे.
..............................
कुठल्याही परिस्थितीला न खचता  मेहनतीने व जिद्दीने अभ्यास केला पाहिजे. आयुष्यात काही करायचे असेल तर सुर्या सारखे तपायला शिकलं पाहिजे. हेच मोटिवेशन ठेवून अभ्यास केला तर यश नक्की मिळते.

पर्जन्य चोपकर
वैज्ञानिक सहायक निदेशक ( आइ टी ) दिल्ली.


PostImage

Chunnilal kudwe

Jan. 12, 2024

PostImage

Farmers of '"Sardpar"' are deprived of 'paddy crops' due to lack of 'Prashant' road - 'सरडपार' येथील शेतकरी "प्रशांत" हातात आलेल्या धान पिकांपासुन वंचित


 रस्त्या अभावी ४० पोते धान शेतातच रस्त्यासाठी शेतकऱ्याचा तहसील कार्यालयात चकरा

       चिमूर तहसील कार्यालया अंतर्गत येणाऱ्या सरडपार येथील शेतकरी प्रशांत पाटील  यांची वडिलोपार्जित दीड एकर धनाची शेती आहे या शेतीत धानाची फसल घेतली त्यात ४०पोते धान झाले मात्र बाजूचे शेतकरी  रस्ता  देत नसल्याने ४० पोते धान एक महिन्यापासून शेतातच पडले आहेत त्यामुळे हातात आलेल्या पिकापासून प्रशांत पाटील शेतकरी पिकापासून वंचित झाले असून त्यांच्या परिवाराचे अर्थचक्र थांबले असल्याने परिवाराचे पालन कसे करावे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.


    महसूल विभाग चिमूर अंतर्गत येणाऱ्या मासळ (बु) मंडळ मध्ये समाविष्ट असणाऱ्या सरडपार येथील शेतकरी प्रशांत अर्जुन पाटील यांची भूमापन क्रमांक १०३,१०१,१००, व ९९ मध्ये वडिलोपार्जित शेती आहे वाडीलपासून शेती करीत असताना बाजूच्या शेतकरी यांच्या सहकार्याने शेतात जाण्यायेण्यासाठी रस्ता होता मात्र बाजूचे शेत नव्याने मूळ मालकाकडून घेतलेले उमरेड येथील शेतकरी वंदना प्रकाश पिसे, प्रणव प्रभाकर वरघणे, वैभव प्रभाकर वरघणे यांनी शेताला जाळीचे कुंपण करून रस्ता बंद केला त्यामुळे रघुनाथ लक्ष्मण पाटील, प्रशांत अर्जुन पाटील व केवळराम पाटील यांना शेतात साहित्य बंडी, ट्रेकटर नेण्यासाठी रास्ता नसल्याने हे तिन्ही शेतकरी शेती करण्यापासून वंचित राहूण्याची वेळ आली आहे. 
तर प्रशांत पाटील यांनी कशीबशी धनाची फसल घेतली व धानाचे चुरणे केले मात्र रस्त्या अभावी चाळीस पोते धान मागील एक महिन्यापासून शेतातच पडले आहेत यामुळे प्रशांत पाटील याच्यावर मोठे संकट ठाकले आहे 
 शेती करण्यासाठी मला स्थायी रस्ता द्यावा या मागणीसाठी मागील पाच वर्षांपासून तहसीलदार यांचे उंभरठे झिजवत आहेत मात्र न्याय मिळाला नाही नैराश्याने माझे कडून काही विपरीत घडले तर याची सर्व जवाबदारी प्रशासनाची राहील असा निर्वाणीचा इशाराही शेतकरी प्रशांत पाटील यांनी निवेदनातून दिला आहे
-------------------------------
उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशालाही बगल -

२३ ऑगस्ट २०१९ पासून रस्त्यासाठी प्रलंबित असलेल्या सरडपार येथिल भूमापन क्रमांक १०३,१०१,१००,९९ रस्त्यासाठी चौकशी करून महसूल अधिनियम १९६६ तसेच मामलेदार ऍक्ट १९०५ नुसार कारवाई करण्याचा आदेश ८ डिसेंबर २०२३ला उपविभागीय अधिकारी यांनी  दिला मात्र अजूनही कारवाई केली नाही
---------------------------
रस्त्या अभावी शेती पडीक -

पारडपर येथील भूमापन क्रमांक १०३,१०१,१००,व ९९ पैकी तीन शेतकऱ्यांना बाजूचे शेतकरी बैलबंडी, ट्रेकटर नेऊ देत नसल्याने व स्थायी रस्ता नसल्याने गुलाब पाटील,केवळ पाटील यांना शेती पडित ठेवावी लागली आहे.
..............................
शेतातील धनाला लागली घुस -

 धानाचे चुरणे करून धान नेण्यासाठी बाजुच्या शेतकऱ्याने रस्ता अडवल्याने मागील एक महिन्यापासून ४० पोते धान शेतातच आहेत या धानाला घुस लागल्याने धनाची नासाडी सुरू झाली आहे यामुळे हातात आलेल्या हजारो रुपये किमतीच्या धानाचे नुकसान होत आहे 
------------------------
धानाच्या राखवलीसाठी करावी लागते जागल -

शेतात रस्त्या अभावी धानाचे चाळीस पोते ठेऊन असून जंगली डुक्करा पासून धान पोत्याचे रक्षण करन्यासाठी प्रशांत पाटील जीवावर उद्धार होऊन आजही एकटाच जागल करीत आहे दरम्यान कमीजास्त झाल्यास याची जवाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.


PostImage

Chunnilal kudwe

Jan. 9, 2024

PostImage

We still don't know Savitri - Samata Dut Rajurwade - अजूनही सावित्री आम्हाला कळली नाही. - प्रज्ञा राजुरवाडे


 सवित्रीबाई फुले जयंती

          ज्या काळात स्त्रीला स्वताच्या  अस्तित्वाची जानीव नव्हती त्याकाळात स्त्रीयांना हक्क व अधीकाराची जानीव करुण देत अंगावर फेकलेल्या शेनाची दगड धोंडाची पर्वा न करता शिक्षणाची गंगा पुढे नेण्याच काम सवित्रीबाई फुले यांनी केल. हा अपमान कोनासाठी सहन केला व का  केला असेल? हा क्षन स्त्रीयांना विचार व आत्मचितंन करनारा आहे. सवित्रीचे कार्य पुढे नेण्याची जबाबदारी आम्हा सर्वांवर असली तरी अजुनही सवित्री आम्हाला कळली नाही असल्याचे मार्गदर्शन उपस्थितांना समता दुत प्रज्ञा राजुरवाडे यांनी केले.


         माळी समाज नवतळा येथे सावित्रीबाई फुले जयंतीचे आयोजन करन्यात आले होते त्या प्रसंगी स्त्रीयांना मार्गदर्शन करताना डॉ बाबासाहेब आंबेडकर  संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पूणे च्या समता दुत प्रज्ञा राजूरवाडे स्त्रीयाना प्रमुख मार्गदर्शनात केला.


         यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदिवासी आश्रमशाळेचे मुख्य्ध्यापक सुकारे, प्रमुख अतिथी भाजपा ओबीशी प्रदेशाध्य्क्ष तथा गुरुदेव प्रचारक राजू देवतळे भाजप युवा तालुका अध्यक्ष बालू पिसे, रमेश कंचर्लावार  उपसरपंच तूळशीराम शिवरकर,ग्रा सदस्य संगीता टेम्भुर्ने,कविता वसाके,गिताबाई कैकाडे, सुनदा शेंडे, मुकनायक फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश मेश्राम, प्रा.ठवरे, प्रा. चटपकार, केल्झरकर, गुलाब श्रीरामे, गोपाळ गुरनुले अण्णा वसाके आदी मान्यवर उपस्थित होते.


         पूढे बोलताना राजुरवाडे म्हणाल्या की जुन्या परंपराना छेद देवून नवविचारांची कास धरत दुरदृष्टी ठेवली पाहीजे. समाजात आजही काहि चुकिच्या प्रथा आहेत त्यांना कायमचे नष्ट करण्यासाठी आपन काहि भूमिका  स्वीकारल्या आहेत का ? कर्मठ व रुढीवादी समाजात प्रवाहाच्या विरोधात वाहने हे सोपे नसते ते धाडस व हिम्मत सवित्रीच्या लेकीत असताना पन प्रवाहाच्या विरोधात लीहणे बोलने ही हिम्मत स्त्रियामध्ये आली नाही. शिक्षन हे परिवर्तनवादी आहे. स्त्री शिकली म्हणजे समाजात बदल घडवुन आणू शकते. सवित्रीच्या विचारातुन सक्षम होने गरजेचे आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माळी समाज अद्यक्ष महादेव कोकोडे तर संचालन व आभार  योगेश कोटरंगे यांनी केले यावेळी समस्त माळी समाज उपस्थित होता


PostImage

Chunnilal kudwe

Jan. 8, 2024

PostImage

'Chimur Taluka Press' made Darpankar himself. Greetings to 'Balshastri Jambhekar' - चिमूर प्रेस असोशिएशनच्या सदस्यांनी केले दर्पनकार स्व. बाळशात्री जांभेकर यांना अभिवादन


6 जानेवारी पत्रकार दिवस

          6 जानेवारी पत्रकार दिन मराठी पत्रकारीतेचे जनक दर्पनकार स्व. बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमीत्त शनिवार ला शहरातील पत्रकार भवनाचे नियोजीत जागेवर चिमूर तालुका प्रेस असोशिएशनचे जेष्ठ सदस्य रविंद्र गोंगले व भरत बंडे, यांनी दर्पनकार यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. 


        यावेळी प्रेस असोशिएशनचे अध्यक्ष चुन्नीलाल कुडवे, सचिव कलीम शेख, उपाध्यक्ष मनोज डोंगरे, सहसचिव जितेंद्र गाडगे, राजकुमार चुनारकर, सदस्य जितेंद्र सहारे, फिरोज पठाण, इमरान कुरेशी, डॉ ज्ञानेश्वर जुमनाके, झामदेव आत्राम, उमेश शंभरकर आदी उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Jan. 5, 2024

PostImage

'Atish Bhaisare' appointed as ' City President ' of Chimur Youth Congress - चिमूर युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष पदावर आतिश भैसारे यांची नियुक्ती


चिमूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष रोशन ढोक यांनी दिले नियुक्ती पत्र


       अनेक वर्षापासून राजकीय क्षेत्रात सक्रीय असलेले व संघटन, कौशल्य वाकचातुर्य, सेवाभाव व सर्वाना सोबत घेवून समाजकार्य करन्याची वृत्ती लक्षात घेता आतिश भैसारे यांची चिमूर विधानसभा युवक काँग्रेसचे चिमूर शहर अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली.

हि नियुक्ती चिमूर विधानसभा युवक काँग्रेस कमिटी अध्यक्ष रोशन रवि ढोक यांनी १ जानेवारी ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चिमूर तालूका कार्यालय येथे नियुक्ती पत्र देवून केली आहे. काँग्रेस पक्षाची प्रतिमा जनमानसात उज्वल करावी व काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे समाजातील सर्व जनसामान्यांपर्यत पोहचवून अधिकाधिक कार्यकर्ते आपण जोडन्यासाठी परिश्रम घ्याल. भविष्यातील यशस्वी, राजकीय व सामाजिक वाटचाली करीता चिमूर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष नागेश चट्टे, उपाध्यक्ष मंगेश घ्यार, माजी तालूका अध्यक्ष काँग्रेस अल्पसंख्याक जावाभाई श्रीकांत गेडाम , प्रज्वल बोबडे, शेखर राऊत, मुकेश शिवरकर, आशिष राऊत, ईश्वर वाघ आदी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ता यांनी शुभेच्छा दिल्या.


PostImage

Chunnilal kudwe

Jan. 4, 2024

PostImage

You should become MLAs and MPs to "spread the thoughts of great saints" to villages - Ghanshyam Dhongde - संत महापुरुषांचे विचार गावागावात पोहचविण्यासाठी तुम्ही आमदार, खासदार झाले पाहीजे - धोंगडे


संत महापुरुषांचे विचार गावागावात पोहचवण्यासाठी तुम्ही आमदार, खासदार झाले पाहीजे - धोंगडे
- भिमा कोरेगाव शोर्य दिन व सावित्री फुले जयंती

गौतम बुद्धाला विज्ञानवादी का म्हणतात कारण गौतम बुद्धांनी इ. स. पूर्व काळात शैक्षणीक क्रांतीची चळवळ सुरू केली होती नंतर त्यांचा वारसा महात्मा फुले दाम्पत्त्यांनी चालवीला. त्यांचेच विचार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात मांडले. मात्र आमच्या संत व महापुरुषांचा खरा इतिहास आम्हाला शिकवीला जात नाही. फक्त काल्पनीक कथा व विकृत संस्कृती शिकविली जाते. बालवाडी पासून मानवतावादी शिक्षण दिल पाहीजे. महापुरुषांच्या विचारावर चालनार सरकार पाहीजे जे संत महापूरुषांचे विचार गावागावात पोहचवीले पाहीजे यासाठी तुम्ही आमदार खासदार झाले पाहीजे असल्याचे मार्गदर्शन अध्यक्ष भाषनातुन धनश्याम धोंडगे यांनी केले.

अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखा चिमूर, तक्षशिला बुद्ध विहार, समता सैनिक दल, त्रिशरण महीला मंडळ चिमूर यांच्या संयुक्त विद्यमाने भिमा कोरेगाव शौर्य दिन व सावित्री फुले यांचा १ ते ४ जानेवारी पर्यंत चार दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान बुधवार ला सावित्री जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना सेवा निवृत्त शिक्षक घनश्याम धोंगडे बोलत होते.यावेळी कार्यक्रमाचे मार्गदर्शक विषय तज्ञ प. स. चिमूर चे संजय पंधरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रभाकर पिसे, कॉस्ट्राईब कर्मचारी संघाचे किशोर नागदेवते, ओबीसीचे सल्लागार प्रभाकर पिसे, शिक्षीका कल्पना महाकारकर, बोद्ध महासभेचे अध्यक्ष रोशन सहारे, चिमूर प्रेस चे अध्यक्ष चुन्नीलाल कुडवे आदी उपस्थित होते.

      पूढे बोलताना धोंगडे म्हणाले की, भिमा कोरेगावात अडीज हजार पेशव्या विरुद्ध इंग्रजांची जिकराची लढाई झाली होती त्यात पाचशे महार बटालीयनचे शुरविर होते त्यांनी अडीज हजार पेशव्यांना परास्त केले होते एका शूरविरांच्या वाट्याला ५६ पेशवे आले होते याचा अर्थ त्या प्रत्येक महार बटालियन शुरविरांची छाती ५६ इंचची होती म्हणून या देशात ५६ इंचची छाती कोनाचीही नाही ती फक्त महार बटालीयन शुरविरांची आहे. या देशात ७५ वर्षा पासुन समस्या जशीच्या तशी आहे. उलट शोषण सुरु आहे. या निमीत्ताने जाती जोडल्या पाहीजे. संविधानाला व देशाला वाचवायचे असेल तर सर्व मिळून समस्याची  जनजागृती समाजात केली पाहीजे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी एक मताचा अधिकार दिला तो विकू नका. मानूस मरतो पण महामानवांचे विचार मरत नाही. पूढील काळ सांगता येत नाही. आपल्या हक्क अधिकाराच्या सरकारला निवडून द्या.

    कार्यक्रमाचे वक्ते संजय पंधरे म्हणाले की, जो पर्यत ज्योतीबा रुमजनार नाही तो पर्यत सावित्री कळनार नाही, कत्पना महाकारकर म्हणाल्या की, महीला शिकली म्हणजे धर्म बुडाला आजही स्त्रीयाच्या समस्या संपल्या नाहीत. किशोर नागदेवते म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकरामूळेच भिमा कोरेगाव विजय स्तंभाची माहिती मिळाली, प्रभाकर लोथे म्हणाले की, महापुरुषांनी शाळा काढल्या आपन देवळे मंदीरे काढत आहो असल्याचे बोलत होते.

  १ जानेवारी भिमा कोरेगाव शौर्य दिनानिमीत्त शुरविरांच्या सन्मानार्थ बाईक रॅली व विजयस्तंभाला मानवंदनाचे आयोजन डॉ. आंबेडकर स्मारक इंदिरा नगर येथून करण्यात आले. हि रॅली वडाळा (पैकू) संविधान चौक, शहरातील मार्केट लाईन मार्गे तक्षशीला बौद्ध विहारात पोहचली तिथेच रॅलीचा समारोप करन्यात आला २ जानेवारी ला भिमा कोरेगाव शुरविरांच्या सन्मानार्थ रक्तदान शिबीराचे आयोजन डॉ आंबेडकर स्मारक येथे करण्यात आले या शिबीरात विस रक्तदात्यानी रक्तदान केले. ४ जानेवारी ला विकास राजा यांचा समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम घेन्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्तावीक महेंद्र लोखंडे आभार आकाश भगत यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Jan. 3, 2024

PostImage

New Year Essay Competition at Government Residential School for Scheduled Caste, Neo-Buddhist Girls, Chimur - निवासी शाळेत नूतन वर्षानिमीत्त प्रतिकृती स्पर्धा


डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान


  •    प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये शाळेप्रती
    उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी तसेच आनंददायी, प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत " मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" हे अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा चिमूर येथे नूतन वर्षाचे औचित्य साधून 'प्रतिकृती स्पर्धा' मंगळवार ला पार पडली.

  सदर स्पर्धा ही शालेय गटांत घेण्यात आली. विद्यार्थीनींनी टाकाऊ वस्तूंपासून अप्रतिम सौंदर्य निर्माण करून शालेय परिसर सुशोभित केला. अवघ्या दोन दिवसांत त्यांनी ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडली. परीक्षण प्रक्रिया पार पाडल्यानंतर विद्यार्थिनींचे खूप कौतुक करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थिनींसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 

 कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता खोब्रागडे, प्रमुख अतिथी मनोहर गभणे, मीरा काळे, जया कुकडे, सतीश कुकडे, विनय खापर्डे, अनुराधा महाजन, राज गजभिये, सुकदेव बोरकर, हेमूताई मगरे, बॉबी धात्रक आदी सर्व बाह्यस्त्रोत कर्मचारी उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Jan. 1, 2024

PostImage

'Rotary's initiative' to distribute bicycles to needy school students - त्रेपन्न गरजू शालेय विद्यार्थ्यांना सायकल वितरण


चिमूर रोटरी क्लबचा उपक्रम

       चिमूर रोटरी क्लब च्या वतीने गरजू होतकरू शालेय विद्यार्थ्यांना  रविवार ला वडाळा (पैकू) चिमूर येथील आदर्श विद्यालयाच्या पटांगनात गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना त्रेपन्न सायकलचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

नेहमी समाजकार्यात अग्रेसर असनाऱ्या रोटरीने समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यासाठी उपक्रम राबवत समाज घटकातील विद्यार्थ्यांची शाळेत जान्याची समस्या लक्षात घेत सायकलचे वितरण केले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे. वैभव लांडगे, सचिव विनोद भोयर, कोषाध्यक्ष राकेश बघेल, विशेष अतिथी आदर्श विद्यालयचे मुख्याध्यापक नैताम, मार्गदर्शक विषय तज्ञ प. स. चिमूरचे संजय पंधरे, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष प्रवीण सातपुते, सचिव बबन बन्सोड व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटे. मंगेश हिंगणकर, रोटे. पवन ताकसांडे, रोटे. हरीश सारडा, रोटे. कैलास धनोरे, रोटे. पवन बंडे, रोटे. अभिजीत बेहते, रोटे. आदित्य पिसे, रोटे. अक्षय अवधूत, रोटे. यश गोहने, रोटे. विलास अल्लडवार, रोटे. डॉ. महेश खानेकर, रोटे. सुभाष केमये, रोटे. श्याम बंग, रोटे. गुरु ठाकरे, रोटे. जयवंत वरघने, रोटे. यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे संचालन रोटे. कुशाब रोकडे व आभार रोटे. विशाल गंपावार यांनी मानले.


PostImage

Chunnilal kudwe

Jan. 1, 2024

PostImage

'Astha' Vaditia in State Level Crooking Competition - राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत डॉ. खत्री कॉलेज च्या 'आस्था' व्दितीय


जल जीवन मिशन विषया अंतर्गत योजनांची प्रभावी प्रचार प्रसिद्धी

 

चंद्रपूर (का.प्र.)
       राज्यस्तरावर घेण्यात आलेल्या " जल जीवन मिशन " विषयाअंतर्गत योजनांची प्रभावी प्रचार प्रसिद्धी व्हावी या उद्देशाने पार पडलेल्या व वक्तृत्व स्पर्धेत 
चंद्रपूर तुकूम येथील डॉ. खत्री कॉलेजची ११ विज्ञान शाखेची विद्यार्थीनी आस्था उदेभान गणवीर हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. 

चंद्रपूर येथील रफी अहमद किदवाई हायस्कूल मध्ये १९ डिसेंबर २०२३ ला आयोजित करण्यात आलेल्या या वकृत्व स्पर्धेत राज्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थांनी सहभाग घेतला होता. या वकृत्व स्पर्धेत आस्था उदेभान गणवीर या विद्यार्थीनीने आपल्या प्रभावी वक्तृत्व शैलीचे उदाहरण देत या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तिच्या यशाने डॉ खत्री कॉलेजचे नावलौकीक झाले आहे. 

आस्थाच्या वक्तत्व स्पर्धेतील यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. एम. काकडे, संस्थेच्या कोषाध्यक्ष प्रा. अनुश्री पाराशर, सांस्कृतिक विभागाच्या प्रा. सुप्रिया सदलवार तसेच प्रा. डॉ. टी.एम. शेख यांनी तिचे कौतुक करत पुष्पगुच्छ देत भविष्यातील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या आहे.


PostImage

Chunnilal kudwe

Dec. 31, 2023

PostImage

Selection of 'Gramgita Farmers Producers Company' from 'Chimur' for Business Concave Exhibition - पुणे इथे होणाऱ्या बिसनेस कॉनकेव्ह करिता ग्रामगीता शेतकरी उत्पादक कंपनीची निवड


 भव्य कृषी व्यवसाय सोहळा

 

        ग्रामीण भागातील शिक्षित तरुणांत कृषी विषयी माहिती व नवीन उद्द्योजकता निर्माण करणाऱ्या क्षेत्रात कार्यरत असणारी पुणे येथील सामाजिक संस्था ' सेंटर फॉर अँग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलोपमेंट ' यांच्या वतीने १६ जानेवारी २०२४ ला पुणे इथे आयोजित ' अँग्री - स्टार्टअप अँड बिझनेस कॉनकेव्ह ' कृषी व्यवसायावर आधारित प्रदर्शनीकरीता चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागात विशेषतः 'कृषी,पर्यावरण व जैव इंधन ' क्षेत्रात कार्यरत ' ग्रामगीता शेतकरी उत्पादक कंपनीची ' निवड करण्यात आली आहे.

        या भव्य कृषी व्यवसाय सोहळ्याचा मुख्य उद्देश ग्रामीण भागात तरुण युवकांमध्ये कृषी आधारित व्यवसायाची निर्मिती करणे, प्रत्येक गावात तरुणाचे कौशल्य विकसित करण्यावर भर देणे, नव - नवीन उद्योजक होण्याच्या संधी उपलब्ध करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे, विविध व्यवसायांचे प्रदर्शन करण्यास ' आवश्यक तो मंच ' त्यांना उपलब्ध करून देणे व पर्यावरणाचे हित जपणाऱ्या संस्था तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन देणे हा आहे. त्यामुळे तालुक्यातील तरुणांसाठी व्यवसायिक संधी उपलब्ध होणार आहे. 

       तरुण युवकांनी व्यवसायिक होण्यास प्रयत्नशील राहावे हाच उद्देश या सोहळ्याचा आहे. ही चिमूर तालुक्यासाठी शेतकरी यांच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. हे धरती माय ग्रामगीता यांचा लाभलेला आशीर्वाद आहे. तालुक्यात खऱ्या अर्थानं कृषी क्रांती कशी घडून येईल हाच उद्देश आहे. जैविक शेती,ग्रामीण महिला वर्ग यांना विविध उपक्रम माध्यमातून सक्षम करणे ग्रामीण रोजगानिर्मिती असे अनेक बाबी आहेत. अशी माहीती संस्थापक कृषी पदवीधर असलेले अभिजीत धनराज बेहते यांनी केले. दरम्यान कार्यक्रमाला सहकारी अक्षय अवधूत, कार्तिक मगरे, शुभम निवल, प्रफुल मदनकर पुणे इथे उपस्थितीत राहणार आहे.


PostImage

Chunnilal kudwe

Dec. 29, 2023

PostImage

Bhagwat week is a celebration of enlightenment - Dr Satish Warjukar - भागवत सप्ताह म्हणजे ज्ञानयज्ञ सोहळा - डॉ वारजूकर


 पळसगांव येथे भागवत सप्ताह  समाप्ती

    भगवंताने कथांमधून जीवनाचा उद्धार कसा करावा, हेच सांगितले आहे. भागवतानी अत्यंत सरळ आणि सोप्या भाषेत मानवजातीला अचूक मार्ग दाखविला आहे. भागवताकडे केवळ कथा म्हणून न पाहता या कथांचे आपल्या जीवनात काय महत्त्व आहे त्यातील काय आत्मसात करायचे हे  समजून घ्यायला पाहीजे. भागवत सप्ताह म्हणजे ज्ञानयज्ञ सोहळा त्यामुळे त्यातील तत्त्वज्ञान समजून घ्यायला हवे असे प्रतिपादन चिमूर विधान सभा क्षेत्राचे समन्वयक तथा महाराष्ट्र प्रदेश ओबीसी महासंघ चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. सतिश वारजुकर यांनी केले.


     भागवत सप्ताह समितीच्या वतीने श्रीमद् भागवत सप्ताह, गोपाल काला निमित्त भागवत सप्ताह समाप्ती कार्यक्रमाचे आयोजन पळसगांव ( पिपर्डा ) येथे करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ सतिश वारजूकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चिमूर तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. विजय गावंडे पाटील,पळसगांव सर्कल प्रमुख सुभाष बन्सोड, दुमदेव पाटील बोरकर, राजू आत्राम, निकेश सोनबनवार, प्रकाश रामटेके, संजय सोणेकर, नूतन सहारे, महादेव सहारे व समस्त गावकरी उपस्थित होते


PostImage

Chunnilal kudwe

Dec. 28, 2023

PostImage

Shri Sant Nagaji Maharaj Social Hall Chimur - MP Ashok Nete - चिमूर मध्ये होनार श्री संत नगाजी महाराज यांचे सामाजिक सभागृह


 खा. अशोक नेते यांनी श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाला सदिच्छा भेटीत केले आश्वस्त  

         श्री संत नगाजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सवात दोन दिवसीय कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवसी गोपाल काला निमित्त गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी सदिच्छा भेट दिली असता संत नगाजी महाराज यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला व समाजाच्या सामाजीक समस्या जाणून घेत खासदार निधीतून दहा लक्ष रुपयांचे संत नगाजी महाराज यांचे नावाने सामाजीक सभागृहाच्या मागणीला आश्वस्त केले. त्यामुळे येत्या काही दिवसात चिमूर मध्ये श्री संत नगाजी महाराज यांचे सामाजीक सभागृह होनार आहे.


      श्री संत नगाजी महाराज सामाजीक सेवा समिती चिमूरच्या वतीने श्री क्षेत्र माणीक नगर येथे श्री संत नगाजी महाराज यांचा दोन दिवसीय पुण्यतिथी महोत्सव २७,२८ डिसेंबर ला आयोजीत करण्यात आला होता. याप्रसंगी श्री. संत नगाजी महाराज  सामाजिक सेवा समिती व्दारे खासदार अशोक नेते यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.


       यावेळी भाजापा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष बालू पिसे, शहर अध्यक्ष बंटी वनकर, संत नगाजी महाराज सेवा समिती चे अध्यक्ष देवेंद्र कडवे, उपाध्यक्ष गजानन बनसोड, सचिव अरूण चिंचूलकर, सहसचिव दिवाकर पुंड, कोषाध्यक्ष रामभाऊ खडसिंगे, सदस्य रामदास मांडवकर, निलकंठ जमदाडे, रमेश मेंढूलकर, शेखर एकोनकर, अंकूश पुंड, महादेव सुर्यवंशी, अक्षय लांजेवार, भाजपा महामंत्री श्रेयस लाखे, अमित जुमडे, भाजपा शहर अध्यक्ष सचिन फरकाडे, प्रशांत नरुले, सूरज नरुले, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला परिसरातील बहुसंख्य महिला पुरुष उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Dec. 27, 2023

PostImage

Village there branch NCP (Ajit Pawar group) - गाव तेथे शाखा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत शिक्कामोर्तब


चिमूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस ( अ. प. ) पदाधिकाऱ्यांची  बैठक


       राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवार ला शहरातील जिल्हा परिषद  विश्रमगृहात पार पडली या बैठकीत चिमूर विधान क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसची गाव तेथे शाखा विषयी शिक्कामोर्तब करण्यात आले.


      ही बैठक चंद्रपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष नितीन भटारकर, चिमूर राष्ट्रवादी काँग्रेस विधान सभा अध्यक्ष अरविंद रेवतकर, चिमूर तालूका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष योगेश ठूणे यांच्या मार्गदर्शनात बैठक पार पडली. दरम्यान चिमुर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निहाय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करुन गाव तेथे शाखा स्थापन करने व पक्ष वाढविणे संदर्भात पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्यात आली व उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस ( अ. प. ) पदाधिकाऱ्यांच्या हस्ते राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे चिमुर तालुकाध्यक्ष मनीष वजरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या भूमिकेचे समर्थन करीत प्रमुख पदाधिकाऱ्यांसह प्रवेश केला.


      यावेळी बैठकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मनीष वजरे, स्वरूप तळवेकर, परमेश्वर ढोणे , मेहबूब भाई शेख, दिपक दुधे , राष्ट्रपाल गेडाम , बाबाकर खोब्रागडे, राजेंद्र मसराम ,संजय घरत , राहुल ढोणे, सुखदेव गराटे उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Dec. 26, 2023

PostImage

Rangnar National Sports Tournament with cultural feast in Ballarpur - बल्लापूर मध्ये रंगणार सांस्कृतीक राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा


  • फायर शो, लेझर शो, ॲक्रोबॅटिक डान्सचाही समावेश
  • मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या उपस्थितीत होणार उद्धघाटन

चंद्रपूर, दि. 26 : ‘मिशन ऑलिम्पिक 2036’ हे एकच ध्येय डोळ्यांपुढे ठेवून राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून बल्लारपूर तालुका क्रीडा संकुलात 67व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा होत आहेत. यासाठी मा. ना. मुनगंटीवार यांनी प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजन करून घेतले आहे. उद्घाटन सोहळा सांस्कृतिक मेजवानीचे रंगणार असून स्पर्धेदरम्यान  विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे दर्शन खेळाडूंना घडणार आहे.

27 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 5.30 वाजता राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
शुभारंभ समारंभात फायर शो, लेझर शो, ॲक्रोबॅटिक डान्ससह विविध सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य आकर्षण राहणार आहे. 27 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत बल्लारपूर येथे होणाऱ्या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताचे चंद्रपूर व बल्लारपूर नगरीचा चेहरामोहरा बदलला आहे. विविध चौकांचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. विविध संकल्पनावर आधारित रंगबेरंगी चित्रांनी भिंती फुलल्या आहेत. अखिल भारतीयस्तरावरील या स्पर्धेसाठी चंद्रपूरनगरी सज्ज झाली आहे.

शाल्मली खोलगडे गाणार ‘लाइव्ह’

मुख्य उद्घाटन सोहळ्यात 27 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 6.30 वाजता प्रसिद्ध सिनेगायिका शाल्मली खेालगडे यांचा लाइव्ह संगीत परफॉर्मन्स आयोजित करण्यात आला आहे. यासोबतच फायर शो, लेझर शो, अक्रोबाईट डान्स आणि ढोल ताशांचा गजर करण्यात येणार आहे.  

‘एक शाम खिलाडीयों के नाम’

28 डिसेंबरला सायंकाळी 6.30 वाजता गीत आणि नृत्याचा समावेश असलेल्या ‘एक शाम खिलाडीयों के नाम’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात पार्श्वगायक मोरेश्वर निस्ताने, श्रुती जैन (सूर नवा ध्यास नवा फेम), स्वस्तिका ठाकूर (कलर्स रायजिंग फेम) व सागर मधुमटके, संगीत संयोजन पंकज सिंग व नृत्य दिग्दर्शन सचिन डोंगरे हे कलाकार सहभागी होतील.

शिववंदना, महाराष्ट्राची लोकधाराही वेधणार लक्ष

महाराष्ट्राच्या लोक संस्कृतीचे दर्शन घडविणारा, शिववंदना व महाराष्ट्राची लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रम 29 डिसेंबरला सायंकाळी 6.30 वाजता होणार आहे. यात सुमारे 300 लोककलावंत सहभागी होणार आहेत. महाराष्ट्राची विविध संस्कृतीचे दर्शन या कार्यक्रमातून घडेल. गणेशवंदना, जागर गोंधळ, शाहिरी, भक्ती-शक्ती संगम, कोळी नृत्य व  शिवराज्यभिषेक सोहळ्याचे सादरीकरण यावेळी उपस्थिताना पाहता येईल.

‘कलर्स ऑफ इंडिया’चीही क्रेझ

30 डिसेंबरला 350 कलाकार देशातील विविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. भव्यदिव्य स्वरूपात होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी ‘थीम साँग’ तयार करण्यात आले आहे. या गाण्याला प्रसिद्ध पार्श्वगायक कैलाश खेर यांनी स्वर दिला आहे. ‘आओ चंद्रपूर, खेलो चंद्रपूर... खेलो ऐसा दिल लेलो चंद्रपूर...’ असे शब्द असलेले हे गीत विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाची पेरणी करणारे ठरत आहे. लक्षवेधक शब्द, जोशपूर्ण संगीत आणि कैलाश खेर यांचा भावगर्भित आवाज हे या ‘थीम साँग’ची वैशिष्ट्य ठरत आहे. प्रसिद्ध अभिनेते सलमान खान आणि आमिर खान यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा संदेश प्रसारीत केले आहेत.


PostImage

Chunnilal kudwe

Dec. 26, 2023

PostImage

159 year tradition of Shri 'Dutt Prabhu' Jayanti Mahotsava at Sathgaon - साठगाव येथील श्री दत्त जयंतीला १५९ वर्षाची परंपरा


बुधवार पासून श्री दत्त जयंती महोत्सव

 

- साठगाव येथील गावंडे कुटुंबांला २४८ वर्षापुर्वी मिळाली मालगुजारी

   

Caption

 

         चंद्रपूर, नागपूर व भंडारा या तिन्ही जिल्ह्याच्या सीमा हद्दीवर वसलेल्या चिमूर तालुक्यातील साठगाव येथील टेकडीवर गावंडे कुटुंबातील राधाबाई धर्माजी पाटील गांवडे यांनी इसवी सन १८६४ मध्ये श्री दत्तात्रय प्रभुचे मंदिर बांधकामास सुरवात केली. तेव्हापासून श्री दत्त जंयती महोत्सवाच्या तीनदिवसीय कार्यक्रमाला सुरवात झाली. यावर्षीही १५९ वर्षांनी २७ डिसेंबरपासून श्री दत्त प्रभू जयंती महोत्सवास सुरवात होणार आहे. हि यात्रा तिन दिवस चालनार आहे


      महानुभाव ग्रंथामध्ये चांदापूर येथे राजे भोसले यांचे इ.स. १७८५ मध्ये इंग्रजाशी झालेल्या युद्धाचा उल्लेख आहे. त्यावेळी माहूर संस्थान मधून भोसल्यांच्या राज्याचा कारभार चालविला जात होता. या काळात युद्धात विजय मिळविलेल्या राजे भोसले यांचेकडून विजयी सेनाप्रमुख गावंडे कुटुंबातील पराक्रमी वीराला पूर्वीचे परागणे हल्लीचे अठराशे ते दोन हजार लोकवस्तीचे साठगाव मालगुजारीत मिळाले होते. मात्र भोसलेकालीन काळात काही नैसर्गीक आपत्ती व पेंढारी ( लुटारू ) यांच्या लुटीत पूर्णपणे उद्धवस्त झाले होते. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील गावंडे कुटुंब साठगावला मालगुजार म्हणून स्थायिक झाले. त्यानंतर त्यांनी श्रीदत्तात्रेय प्रभू यांचे निद्रास्थान देवदेवेश्वरी संस्थान, माहूर येथे खाचर बैलाने देवदर्शानाकरिता माहुरवारी सुरू केली. पूर्वी तीर्थयात्रेवरून परत आल्यानंतर गावाचे शिवेवर किंवा मंदिरात एक रात्र मुक्काम केल्या जात होता.


        अशाच एका वारीमध्ये मालगुजार गावंडे पाटील यांनीसुद्धा त्याकाळी गावापासून दूर असलेल्या टेकडीवर मुक्काम केला. तेव्हा गावंडे पाटील यांच्या स्वप्नात पूजा केल्यास गावाचे भाग्य उदयास येईल, असे सांगण्यात आले. तेव्हापासून झोपडीवजा मंदिरात माहूर येथील विशेषाची स्थापना त्रिकाळ पूजाअर्चा सुरू केली. ही आजही नित्यक्रमाने सुरू आहे. राधाबाई धर्माजीराव पाटील गांवडे १५९ वर्षांपूर्वी याच टेकळीवर श्री दत्तात्रय प्रभु मंदिर बांधले. तेव्हापासून श्री दत्त जंयती महोत्सवास सुरवात झाली. यानंतर राधाबाईने माहूरवारी बंद करून गोंदिया जिल्ह्यातील डाकराम-सुकळी (चक्रधर स्वामीचे चरणाकिंत स्थान) येथील वारी सुरू केली. ती वारी आजही सुरू आहे.


        राधाबाई नंतर त्यांचा मुलगा कवडूजी पाटील यांनी तर त्यानंतर रामचंद्रजी, हरिचंद्रजी, देविदासजी व उमेशजी पाटील यांनीही श्री दत्तजयंती यात्रेचा वारसा जोपासला आहे. आजही पुढील पिढीकडून हे कार्य सुरू आहे. न्यास नोंदणी नंतर अध्यक्ष म्हणून कै. कवडूजी धर्माजी पाटील गावंडे, कै. रामचंद्र कवडूजी पाटील गावंडे व श्रीमती लीलाबाई रामचंद्र पाटील गावंडे यांनी कार्यभार सांभाळलेला आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेपासून येथे श्री दत्त जयंती यात्रा महोत्सवाला सुरुवात होते प्रथम दिवसी सकाळी श्री दत्त प्रभुचा जन्मोत्सव ध्वजारोहण सायंकाळी वाद्य भजनाच्या गजरात दत्त प्रभूचे नामघोषात गावातून रथ यात्रा काढली जाते दुसऱ्या दिवसी भजन प्रवचन कीर्तन दहीहांडी गोपाल काला व महाप्रसादाचे आयोजन केले जाते यात्रेनिमीत्त गावातील नागरीक आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर मैदानी खेळ व नाटकाचे आयोजन करीत असतात. १५९ वर्षांनंतरही सुरेश रामचंद्र पाटील गावंडे कुटुंबाकडून गावालगतच्या टेकडीवर उभे असलेले श्री दत्त प्रभू चे मंदीरात जयंती महोत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात येत आहे.


PostImage

Chunnilal kudwe

Dec. 24, 2023

PostImage

The accused of 'scented tobacco' escaped walking and talking with the police - पोलीसांच्या देखत सुगंधीत तंबाकुच्या आरोपीने चालत बोलत पोलीस ठाण्यातुन पळ काढला


 आरोपीला शोधन्यासाठी पोलीसांकडून धावाधाव सुरु

      शहरातील साईनगर येथील नन्नावरे यांच्या घरासमोरील मारोती वॅन मध्ये सुगंधीत तंबाकू असल्याची माहीती नागपूर येथील अन्न सुरक्षा अधिकारी यांना मिळाली त्यानुसार चिमूर पोलीसांची मदत घेत छापा मार कारवाई करत मारोती वैन मधून ४९४ किलो पानमसाला व सुगंधीत तंबाकू शुक्रवार ला जप्त करन्यात आला. दरम्यान आरोपी विलास दौलतराव चंदनखेडे रा. प्रगती कॉलनी चिमूर यांना पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले मात्र त्याच दिवसी  पोलीसांच्या देखत पोलीस ठाण्यात पोलीसांसोबत चालत बोलत असतांनाच रात्री आठ वाजता पळ काढला.


       अन व औषध प्रशासन कार्यालय नागपूर येथील अन्न सुरक्षा अधिकारी गिरीश सातकर व आर. बी. यादव यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार आंबेडकर कॉलनीतील मॉ दुर्गा किराणा स्टोअर्स चे मालक विलास दौलतराव चंदनखेडे हे पान मसाला, सुगंधीत तंबाकू विक्री व साठवणूक शहरातील साई नगर येथे नन्नावरे यांच्या घराच्या बाजूला गोडावूनमधून करित आहेत. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी व चिमूर पोलीसांनी सापळा रचत शुक्रवार ला १२.३० वाजता छापामार कारवाईत मारोती वॅन क्रमांक एमएच बी एक्स ४६१० ची तपासनी केली असता वाहनात २९४ किलो पान मसाला व सुगंधीत तंबाकू एकून किमंत आठ लाख ७७ हजार २९० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


        दरम्यान अन्न सुरक्षा अधिकारी यांनी आरोपी विलास चंदनखेडे ला चिमूर पोलीस ठाण्यात आनन्यात आले. शुक्रवार ला सायंकाळी ६ वाजता गुन्हा नोंद करन्यात आला. मात्र गुन्हा नोंद झाल्यानंतर दोन घंट्यानी रात्री आरोपीने पोलिसांसोबत बोलत चालत ठाण्यातुन पळ काढला एका अधिकाऱ्यांने आरोपीला इकडे बोलवा असे म्हटल्यानंतर पोलीस जेव्हा आरोपीला बोलवायला गेले तेव्हा आरोपी गायब दिसल्याने आरोपीला शोधण्यासाठी पोलीसांची धावाधाव सुरु झाली. पोलीसांनी शुक्रवार शनिवार दोन दिवस शोध मोहीम राबवीली मात्र सुगंधीत तंबाकूचा आरोपी अजून मिळाला नसल्याची माहिती आहे. या घटनेची सर्वत्र चर्चा शहरात सुरु आहे.

.........................................

या प्रकरणाचा तपास शनीवार ला दुपारी माझ्याकडे देन्यात आला. आरोपीचा शोध घेने सुरु आहे

विनोद जांभळे
सहाय्यक पोलीस निरिक्षक पोलीस स्टेशन चिमूर


PostImage

Chunnilal kudwe

Dec. 21, 2023

PostImage

File a case of murder against 'FDCM' officers, beat guards - खडसंगी एफडीसिएम चे अधिकारी , बिट गारड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून निलंबीत करा


  • .  अवैध रेतीचे ट्रॅक्टर खाली युवक आल्याने मृत्यु
  • - मृतकाच्या वारसानांना पंचेवीस लाख रुपयाची मदत द्या
  • - पत्रकार परिषदेत चिमूर तालूका रा. कॉं. पार्टीचे तालुका अध्यक्ष राजू मुरकुटे यांची मागणी
    ................................................         एफडीसीएम खडसंगीच्या जंगलात अनेक वर्षापासुन अवैध रेती चोरी होत आहे. या विषयी वनमंत्री व एफडीसीएमचे विभागीय व्यवस्थापक यांना सहा महीन्यापूर्वी तक्रारी केल्या मात्र त्यांनी दखल घेतली नाही त्यामुळे बुधवार ला रात्री अवैध रेती भरून ट्रॅक्टरने जात असताना ट्रॅक्टरवर बसुन असलेला  आकाश धनराज सोनटक्के रा नवेगाव (पू) हा ट्रॅक्टर खाली आल्याने या युवकाचा जागीच मृत्यु झाला. याला जबाबदार एफडीसीएम चे अधिकारी, बिट गार्ड असल्याने यांचेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून निलंबीत करन्यात यावे अशी मागनी गुरुवारला आयोजीत पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालूका अध्यक्ष राजू मुरकुटे यांनी केली आहे.


        खडसंगी एफडीसीएम कक्ष क्रमांक २५ / २६ मध्ये अवैध रेती चोरी होत असल्याचे पत्र राजू मुरकुटे यांनी जुन २०२३ ला वनमंत्री, जुलै २०२३ ला विभागीय व्यवस्थापक एफडीसीएम चंद्रपूर व डिसेंबर २०२३ ला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पाठवीले होते मात्र कुठलीही कारवाई झाली नाही उलट अधिकारी कर्मचारी यांच्या डोळ्या देखत करोडो रुपयाची अवैध रेतीची चोरी एफडीसीएमच्या जंगलातून होत आहे. ट्रॅक्टर मध्ये अवैध रेती भरून जंगलातुन रस्त्यावर येत असताना  ट्रॅक्टर मुंडीवर बसलेला आकाश अचानक ट्रॅक्टर खाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असे किती मृत्यु एफडीसीएम घेनार ? एफडीसीएमच्या अधिकाऱ्यांनी अवैध रेतीला वेळीच आळा घातला असता तर आकाश चा मृत्यु झाला नसता. मृतकांच्या वारसांना शासनाने पंचेवीस लाख रुपयांची मदत द्यावी व एफडीसीएम अधिकारी बिट गार्ड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून निलंबीत करन्यात यावे. सात दिवसात कारवाई न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करन्यात येईल असा इशारा पत्रकार परिषदेत चिमूर रा.कॉ. चे तालूका अध्यक्ष राजू मुरकुटे यांनी दिला आहे.


        पत्रकार परिषदेला राष्टवादी काँग्रेसचे जिल्हा सचिव रमेश खेरे, तालूका युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष मनिष वजरे, तालूका उपाध्यक्ष रा.काँ. रामू चौधरी आदी उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Dec. 20, 2023

PostImage

'Tukdoji Mahara'j worked for social service and nation building till the last moment - तुकडोजी महाराजांनी खंजरी भजन, किर्तनाच्या माध्यमातुन समाजसेवा व राष्ट्र निर्माण - डॉ सतिश वारजूकर


 हिरापूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी

       
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे खंजरी भजन समाज प्रबोधनाचे माध्यम होते हे सर्वश्रृत असले तरी महाराजांनी भजनांच्या माध्यमातुन सामाजकार्य व देश विकासांचा विचार मांडला. अनिष्ठ रुढी परंपरा अंधश्रद्धा जाती धर्म पंत भेद आदीवर कठोर प्रहार करत देव, ईश्वरांचे विशुद्ध स्वरूप त्यांनी समाजापुढे मांडले. तुकडोजी महाराजांनी शेवटच्या क्षणापर्यत  खंजरी भजन किर्तनच्या माध्यमातून समाजसेवा व राष्ट्र निर्माण करण्याच कार्य केले असल्याचे मार्गदर्शन डॉ सतिश वारजूकर यांनी केले.


      श्री गुरुदेव सेवा मंडळ हिरापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पंचावन वी पुण्यतिथी बुधवार ला पार पडली दरम्यान तिन दिवसीय कार्यक्रम गोपाल काला निमित्त महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय ओबीसी महासंघ उपाध्यक्ष तथा चिमूर विधान सभा समन्वयक डॉ सतिश वारजूकर गुरुदेव भक्तांना मार्गदर्शन करताना बोलत होते.


      पूढे बोलताना वारजूकर म्हणाले की महारांजाच्या विचारातील राष्ट्र निर्माणाची भावना, विश्वधर्माच्या प्रसाराचे कार्य आणि मानवतावादी प्रेरणेचा विचारप्रवाह आधुनिक काळामध्ये पुढे नेण्याचे कार्य विदर्भाच्या मातीत जन्मलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केले.  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म २९ एप्रिल १९०९ मध्ये विदर्भातील अमरावती जिल्ह्यात यावली येथे झाला. त्यांचे मूळ नाव माणिक बंडोजी इंगळे (ठाकूर) हे होते. यावेळी, चिमूर विधानसभा युवक कांग्रेस अध्यक्ष रोशन ढोक, माजी पंचायत समिती सदस्य भावना बावनकर, ग्रामपंचायत सरपंच मंगला मुंघांटे, पिताजी बावणकर, गुलाबजी ग्रामगिताचार्य हेमंत मेश्राम, ह.भ.प. लांजुळकर महाराज, रोशन बावनकर, एकनाथ आष्टणकर, दिपक बघिले,आदी उपस्थित होते. यावेळी महाराजांच्या पुण्यतिथीला परिसरातील बहुसंख्य गुरुदेव भक्त उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Dec. 19, 2023

PostImage

Corporation's ST bus went into the field while dodging potholes - खड्डे चुकविताना एसटी बस गेली शेतात


सतिश वारजुकर यांनी केले रस्तारोको आंदोलन -

      कांपा - चिमूर या रस्त्यांवरील कवडशी देश फाट्यावर रस्त्यातील खड्डे चुकविताना बस शेतात गेल्याने 16 प्रवासी किरकोळ  जखमी झाले आहे हि घटना मंगळवार ला सकाळी दहा वाजता दरम्यान घडली त्यामुळे संतप्त प्रवासी, गावकरी व डॉ सतीश वारजुकर यांनी रस्तोरोको आंदोलन केले आहे.


       मागील एक वर्षापासून चिमूर शंकरपूर कांपा हा रस्ता खराब झालेला आहे जागोजागी खड्डे पडलेले आहे  या रस्त्याचे खड्डे बुजवण्यासाठी राजकीय पक्ष व सामाजीक संघटनेने सुद्धा निवेदन दिलेले आहे परंतु त्या निवेदनाची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतलेली नाही या खड्ड्यामुळे कितीतरी अपघात झालेले आहे  मंगळवार ला सकाळी चिमूर वरून भंडारा ला जाणारी बसक्रमांक mh 40 BL 39880 खड्डा चुकवत असताना कवडशी देश फाट्यावर  शेतात घुसलेली आहे या बस मध्ये  जवळपास 70 प्रवासी होते त्यात 16 प्रवासी व शालेय विद्यार्थी  जखमी झाले आहे सदर जखमी प्रवाशांना प्राथमिक आरोग्य केंद्र शंकरपूर येथे उपचार सुरू आहेत तर काही प्रवाषानी खाजगी दवाखान्यात उपचार घेतले आहे.  


        ही बाब जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ सतीश वारजुकर यांना माहीत होताच रुग्णवाहिका बोलाऊन दवाखान्यात पाठविले तसेच आज पर्यंत दिलेल्या निवेदनाची  दखल न घेतल्यामुळे रस्ता रोको आंदोलन सुरू केले दरम्यान भिसि पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश राऊत व चिमूर चे ठाणेदार मनोज गभने हे ताफ्यासह हजर झाले पोलीस संरक्षणात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता उपगंल्लावार यांनी खड्डे बुजविण्याचे काम बुधवार पासून तर नवीन रस्त्याचे काम पंधरा दिवसात सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने रस्ता रोको आदोलन मागे घेण्यात आले. यावेळी माजी उपसभापती रोशन ढोक कवडशी चे उपसरपंच बाबा देशमाने खैरी चे माजी उपसरपंच लक्षमन खेडेकर दामोधर ननावरे अशोक चौधरि आदी उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Dec. 18, 2023

PostImage

Prakash Nanhe's entry into Shiv Sena - एकलव्य सेना र्व विदर्भ संघटक प्रकाश नान्हे यांचा शिवसेना ( उबाठा ) मध्ये प्रवेश )



  • - शिवसेना रुग्णवाहिकेचे लोकार्पण

             शिवसेना ( उबाठा ) ची आढावा बैठक चंद्रपूर ला रविवारी पार पडली दरम्यान शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रशांत कोल्हे यांच्या नेतृत्वात व जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या मार्गदर्शनात एकलव्य सेना पूर्व विदर्भ संघटक व शेकाप जिल्हाध्यक्ष प्रकाश नान्हे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यावर विश्वास ठेवत शिवसेना ( उबाठा ) पूर्व विदर्भ संघटक प्रकाश जाधव यांच्या हस्ते शिवसेना ( उबाठा ) मध्ये प्रवेश घेतला.


  •          चिमूर तालुक्यात सध्या शासकीय रुग्णवाहीकेचे तिन तेरा वाजले आहेत. रुग्णांना रुग्णवाहीका वेळेवर उपलब्ध होत नाही. अनेक रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने उपचारही न होता दगावले असल्याचे शिवसेना ( उबाठा ) चे उप जिल्हाप्रमुख प्रशांत कोल्हे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तालुक्यातील नागरीकांची गैरसोय होवू नये सर्वांना रुग्ण वाहीकेचा  लाभ मिळाला पाहीजे. या दृष्टीकोनातुन रुग्ण वाहीका सुसज्ज केली. त्या रुग्णवाहिकेचे लोकार्पन शिवसेना ( उबाठा ) पूर्व विदर्भ संघटक भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रकाश नान्हे चिमूर शिवसेना ( उबाठा ) शहर प्रमुख नितीन लोनारे, सभापती पुंडलीक चोखे, भैयाजी कारेकार, राजेंद्र जाधव, भाऊराव ठोंबरे, संजय वाकडे आदी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Dec. 15, 2023

PostImage

'Prashant Kolhe' appointed as Sarpanch Seva Chandrapur District President - सरपंच सेवा जिल्हाध्यपदी प्रशांत कोल्हे यांची नियुक्ती



        ग्रामपंचायत स्तरावरील कार्य व जिल्हयातील खेड्यांचा विकास होन्याच्या दृष्टीकोनातून अहमदनगर येथे पार पडलेल्या स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या कार्यकारणीच्या बैठकीत वहानगाव येथील सरपंच प्रशांत कोल्हे यांची चंद्रपूर सरपंच सेवा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती सरपंच संघटीत चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे यांनी केली आहे.


        वहानगाव येथील विकासाची तळमळ बघून नोंदणीकृत झालेल्या सरपंच सेवा संघाच्या चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी सरपंच प्रशांत कोल्हे यांची अधिकृत नियुक्त्ती दोन वर्षासाठी करण्यात आली आहे. तालुक्यातील सरपंच यांना संघटीत करून चिमूर तालुक्यात आदर्श निर्माण करण्यासाठी आपण सरपंचांना मार्गदर्शन करावे अशी सुचना पत्रात नमूद आहे.


PostImage

Chunnilal kudwe

Dec. 11, 2023

PostImage

The voice of Shahu, Phule, Dr. Ambedkar should reach the Parliament - प्रत्येक गावांतून शाहू, फुले व डॉ. आंबेडकरांच्या समतेचा आवाज संसदेत पोहचला पाहिजे - राजूरवाडे


महापरिनिर्वाण दिना निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन…

 

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा जिवनसंघर्ष व सामाजीक समता सर्व समाजाच्या  आत्मसन्मासाठी आणि लोकशाहि बळकट  होन्यासाठी होता. लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी विरोधी पक्षाचे अस्तितव शक्तीशाली असावे असे संविधान सभेतिल शेवटच्या भाषनात डॉ बाबासाहेब आंबेडकर सांगतात. नितीमान समाज व्यव्यस्थेची अत्यावश्यकता डॉ बाबासाहेबांना अपेक्षित होती जातीवीहिन, वर्णविहिन बुद्धिवादी व समतावादी समाजाचे स्व्प्न पाहनार्याना डॉ बाबासाहेबांचे विचार कृतित उतरवीन्याची  गरज असून बाबासाहेबांनी एक मताचा अधिकार दिला या मताचा लोकशाही बळकट करण्यासाठी उपयोग झाला पाहीजे. हल्ली आपला पुढारी कोन हे ओळखन्याची आज  गरज आहे  म्हनुन प्रत्येक गावातुन शाहू, फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेचा  आवाज  ससंदेत पोहचला पाहिजे  असे प्रतीपादन समतादूत प्रज्ञा राजुरवाडे यांनी उपस्थितांना केले.    


       जांबुळघाट येथील सम्राट अशोक विश्वशांती बौद्ध विहार येथे महापरिनिर्वाण दिना निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन कार्यक्रमात डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पूणेच्या समतादुत प्रज्ञा राजुरवाडे प्रमुख मार्गदर्शनात बोलत होत्या.


       यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा माजी सैनिक  हरीचंद्र पाटील, प्रमुख अतिथी एकनाथ गोंगले, किरण गोंगले  प्रा.दीक्षान्त रामटेके, ग्रा. प. सदस्य निता रामटेके संजना खोब्ररागडे आदी उपस्थीत होते 


          पूढे बोलताना राजूरवाडे म्हणाल्या की बाबासाहेबांमुळेच समाजातील नागरिकांनी खुप प्रगती केली. समाजाचा अनमोल  दागीना बौद्ध विहारे आहेत.  समाजाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकिय प्रगती कशी राहील ? समाजाच्या विनयशीलतेचि प्रतिमा कशी उंचावेल यावर प्रतेक बौद्ध विहारात चर्चा व्हायला पाहीजे. समाजात मान, सन्मान, संघटनात्मक पदे यांची अपेक्षा न करता बाबासाहेबांनी आपल्याला बाविस प्रतिज्ञा दिल्या आहेत त्या प्रतिज्ञाचे पालन करा. मुलांना उच्च शिक्षण द्या प्रत्येक बौद्ध विहारात भारतिय संविधान वाचनाचा कृती कार्यक्रम राबवा. कार्यक्रमाचे संचालन व आभार धनराज खोब्ररागडे यांनी केले. कार्यक्रमाला परिसरातील बहूसंख्य बौद्ध उपासक व उपाशीका हजर होते.


PostImage

Chunnilal kudwe

Dec. 9, 2023

PostImage

Disappointment among Kolara residents - दोन महिन्या नंतरही कोलारा वासियांच्या पदरी निराशाच...l


ग्रामपंचायत कमिटीच्या बरखास्तीसाठी केले होते आंदोलन


  गावकऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायत कमिटी टोलवाटोलवी करीत विविध विकास कामात गैरप्रकार करून, स्वतःच्या हितासाठी जिप्सी वनविभागात लावण्याचा  ठराव गावकऱ्यांना अंधारात ठेऊन घेतल्याची बाब गावकऱ्यांच्या   निदर्शनास आल्याने गावकऱ्यांनी १५ऑक्टोबर ला संतप्त गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयास ताला ठोकला व आंदोलन केले होते आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाणे गावकऱ्यांच्या मागण्या सोडवण्याचे आश्वासन दिले मात्र दोन महिन्याचा कालावधी लोटूनही कोलारा वासीयांच्या पदरी निराशाच आली आहे या समस्या लवकरात लवकर मार्गी न लागल्यास कोलारा गावकऱ्या तर्फे मोठे आंदोलन करण्याचा इशारा शुक्रवार ला जिल्हाधिकारी व जि प मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून प्रशासनास दिला आहे.


      २८ ऑगस्ट ला झालेल्या ग्रामसभेत विषय बाजूला ठेवून वनविभागाच्या पत्राचे वाचन न करता गाव मर्जीतील चार जिप्सी वाहने सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांनी मनमानी करत ग्रामपंचायती मधील मूळ दस्ता मध्ये खोट्या बनावट कागद पत्राचा समावेश करून फेरफार केला. ग्रामपंचायत हद्दीतील बाभळीच्या झाडाचे लिलाव करण्यात आला मात्र या विषयी ग्रामसभेत वाचन न करता शासकीय मालमतेची अफरातफर केली आहे. मनरेगा अंतर्गत ग्रामपंचायत यंत्रणेकडून केलेली रोडची कामे शंकर सिडाम ते रतिराम डेकाटे, मारोती येरमे ते पंचफुला कोडापे, मधूकर मेश्राम ते बुधाराम शेंडे, शांताबाई शेंडे ते दयाराम गणवीर योचे घरापर्यत या रोडचे सर्व बांधकाम निकृष्ठ दर्जाचे आहेत. रतिराम डेकाटे यांच्या खाजगी बोअरवेलचे पाणी रस्ता बांधकामासाठी वापरले मात्र पाणी बिलाची रक्कम अफरातफर करून सरपंच ग्रामसेवक व दोन सदस्यांनी फसवणूक केली. सरपंच व ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराला त्रासुन १५ ऑक्टोबर ला नागरीकांनी रात्री ग्रामपंचायत कुलूप ठोकले. याची तक्रार पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना दिली दोन महीन्याचा कालावधी होवून कुठलीही दखल घेतली नसल्याचे निवेदनात नमूद आहे.


    सरपंच शोभा कोयचाडे उपसरपंच सचिन डाहुले ग्रामसेवक संजय ठाकरे व ग्राम पंचायत सदस्य यांनी कर्तव्यात न राहता कसूर केलेला आहे अशा बेजबाबदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करून शासकीय मालमत्तेची अफरातफर करनार्या दोषीवर कार्यवाही करून नुकसान भरपाई वसुल करन्यात यावी अशी मागणी कोलारा ग्रामस्तानी केलेल्या साडेतिनशे सह्याचे जिल्हाधीकारी व जि प मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देताना प्रहार जनशक्ती पक्षाचे शेरखान पठाण, खेमाबाई दसरथ खाटे, मंगला बळीराम धारणे, रतिराम डेकाटे, रतिराम वांढरे, प्रभाकर नैताम, विकास मडावी, रविंद्र जिवतोडे, सज्जन गेडाम, तुलसी रामटेके, रवि बावणे आदी उपस्थित होते यांच्या प्रतिलिपी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधीकारी चंद्रपूर, पंचायत समिती गटविकास अधिकारी चिमूर यांना पाठविन्यात आल्या आहेत.


PostImage

Chunnilal kudwe

Nov. 28, 2023

PostImage

A non-alcoholic 'energy drink' from 'Mohufful' - मोहफुलापासून अल्कोहोल विरहीत म्याजीक 'महुआ ड्रिक'


 दादासाहेब बालपांडे औषधनिर्माण महविद्यालयातील प्रध्यापक डॉ अजय पिसे व सहकारी यांचे संशोधन


       नागपूर येथील दादासाहेब बालपांडे औषधनिर्माण महाविद्यालयातील प्राध्यापक व संशोधक डॉ. अजय घनश्यामजी पिसे व सहकार्यांनी संशोधित  केलेल्या मोहफुलांपासून अल्कोहोल विरहीत ‘म्याजीक महुआ’ नावाचे ‘एनर्जी ड्रिंक’ नागपूर येथील एग्रो-विजन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अनावरण मंगळवारला करण्यात आले. 


         याप्रसंगी उत्तर प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश चे कृषीमंत्री व अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान मोहापासून तयार केलेल्या या संशोधनाची प्रशंसा नितीन गडकरी यांनी केली. व बाजारात उपलब्ध असलेल्या केमीकलयुक्त कोल्ड्रिंक पेक्षा मोहाचे ‘म्याजीक महुआ’ ‘एनर्जी ड्रिंक’ जास्त उपयुक्त होऊ शकते यामुळे याचा जास्त प्रसार झाला पाहिजे असे मत नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. या प्रकल्पामुळे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यातील आदिवासी व बेरोजगार युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. 


      मोहाच्या समाजोपयोगी संशोधनाचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. या प्रकल्पाला संस्थेचे अध्यक्ष  मनोज बालपांडे, प्राचार्य डॉ. उज्वला महाजन यांचे विशेष सहकार्य लाभले.


PostImage

Chunnilal kudwe

Nov. 28, 2023

PostImage

The future of the previous generation only if the 'Indian Constitution' survives - 'भारतीय संविधान' जिवंत राहिले तरच पूढच्या पिढीचे भविष्य - डॉ वारजूकर


 वक्त्याचे मार्गदर्शन व प्रबोधनात्मक संगीतमय कार्यक्रम


       या देशाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीचे राज्य दिले मात्र या देशात दहा वर्षापासुन हुकूमशाही सुरु आहे. तुमचे आमचे आरक्षण संपवून खाजगीकरण सुरू आहे. या देशातील नागरीकांना अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण सोयी सुविधा गरीबा पर्यत पोहचाव्यात म्हणून डॉ बाबासाहेबांनी संविधानात तरतूद केली मात्र इथे उलट सुरु आहे. अशी अर्थव्यवस्था निर्माण होत असेल तर गरीब जिवण जगेल काय ? संविधान सुरक्षीत राहील काय असा प्रश्न निर्माण होत आहे. बहुजनांची मुलं विद्याविभूषीत होवून बेरोजगार आहेत परंतु मागच्या दरवाज्यातुन मनुवाद्याची मुलं सचिव होत आहे. या देशाचे पंतप्रधान इंडिया एवजी भारत करण्याच्या तयारीत आहे हा भारतीयांसाठी धोका आहे त्यामुळे हल्ली बहुजनांना विचार करन्याची गरज आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी एक मताचा अधिकार दिला मताचे विभाजन न करता एक संघ राहून डॉ बाबासाहेबांच्या राज्यघटनेवर चालनार सरकार स्थापीत करून भारतिय संविधान जिवंत ठेवले तरच पूढच्या पिढीचे भविष्य घडेल अन्यथा पिढी बरबात होनार असल्याचे संविधान सन्मान दिनी उद्धघाटन भाषणात उपस्थितांना प्रतिपादन करताना डॉ सतिश वारजूकर बोलत होते.


         संविधान सन्मान दिन समारोह वडाळा (पैकु) चिमूर च्या वतीने २६ नोव्हेंबर रविवार ला संविधान सन्मानदिन समारोह कार्यक्रमाचे आयोजन संविधान चौक वडाळा (पैकु) चिमूर येथे करण्यात आले. संविधान सन्मान दिवस या कार्यक्रमांचे उद्धघाटन महाराष्ट्र प्रदेश महासंघ ओबीसी उपाध्यक्ष डॉ सतिश वारजूकर यांनी केले. दरम्यान उपस्थित  मान्यवरांनी संविधान चौकातील नामफलक व संविधान प्रतीकृतीला पुष्पमाला अर्पण केली. कार्यक्रमादरम्यान पाकी पवण ताकसांडे या मुलींची निवड नवोदय विद्यालयात झाली त्यामूळे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पाकी व तिचे आई वडील यांचा सत्कार करन्यात आला.

         यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चिमूर चे सल्लागार प्रभाकर पिसे मार्गदर्शन करताना देशाचे संविधान सर्वोच्छ असल्याचे बोलत होते. प्रमुख मार्गदर्शक नालंदा अकाडमी वर्धा चे अनुपकुमार यांनी भारताचे संविधान व त्यापूढील आव्हाने या विषयावर बोलताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रबुद्ध भारत बनविन्याचे अधूरे राहीलेले स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्याचे प्रयत्न यावर मार्गदर्शन केले. मुख्य मार्गदर्शक भूमीपूत्र ब्रिगेड महाराष्ट्र चे डॉ. समिर कदम यांनी भारताचे संविधान आणि भारतीय नागरिकांचे हित यांचा सहसंबध याविषयी पटवून देताना अनेक उदाहरणे देत अजूनही ओबीसी जागृत झाला नाही असे बोलत होते.भारतीय संविधान सन्मान सुरक्षा संवर्धन अभियान चे मुख्य प्रबोधक कार्यक्रमाच्या मुख्य मार्गदर्शक कविता मडावी यांनी भारताचे संविधान राष्ट्रव्यापी जनजागृतीची आवश्यकता व नागरिकांची भूमिका या विषयावर बोलताना भारतीय संविधान घरा घरापर्यत पोहचविन्याची जिम्मेदारी घेत जन जागृती करत संविधानानुसार नागरिकांना अजुनही त्यांच्या हक्काची जानीव माहिती नसल्याचे बोलत होत्या. प्रमुख अतिथी रोशन ढोक, संविधान सन्मान दिन समारोह समिती चे अध्यक्ष सुधाकर पाटील आदी उपस्थित होते.

        दरम्यान सकाळी शहरातील थोर महापुरुषांच्या स्मृती स्थळांना अभिवादन व संविधान बाईक रॅली काढन्यात आली सायंकाळी कमलेश भोयर यांचा भिमराव एकच राजा संगितमय प्रबोधनात्मक कार्यक्रम घेन्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सुरेश राऊत, ताई मेश्राम, प्रास्तावीक  महेंद्र लोखंडे, आभार आनंद गजभिये यांनी केले. कार्यक्रमाला परिसरातील बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Nov. 25, 2023

PostImage

Gram sabha about defamation of village - वहाणगावची बदनामी थांबवीण्यासाठी ग्रामपंचायतने घेतली गावात ग्रामसभा


गांवाची बदनामी करणाऱ्यांना बसनार चपराक

तालूक्यातील वहाणगांव हे दारूबंदीच्या कारकीर्दीपासून प्रसिद्ध आहे. या गावात शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा हल्ली गावचे सरपंच प्रशांत कोल्हे यांची एक हाती सत्ता तेरा वर्षा पासून आहे.अनेक विषयांमूळे हे गांव चर्चेचा विषय ठरले आहे त्यामुळे गावाची बदनामी करणार्यांना चपराक लावन्याच्या दृष्टिकोनातून व वहानगावची बदनामी थांबविण्यासाठी ग्रामपंचायतची  ग्रामसभा शुक्रवार ला पार पडली


        वहानगाव येथील अवैद्य व्यावसायीकाच्या काळे धंदेवाल्याना मोठ्या प्रमाणात तेथील सरपंच प्रशांत कोल्हे यांनी आळा घातल्याने त्यांचे विषयी सुडभावना निर्माण झाली. व त्यांच्या साथीला गावातील काही राजकीय विरोधक , वैयक्तीक विरोधक एकवटून सोशल मिडीयावर वहाणगांव व येथील सरपंच जातीयवादी आहे. अशा प्रकारचे अनेक आरोप करत आहे .त्यामूळे शुक्रवार ला आयोजीत ग्रामसभेत हा विषय चर्चेचा बनला व ग्रामस्थांनी या देशात राहून देश विरोधी कृत्य करणे म्हणजे देशद्रोह होतो मग गावात राहून गाव विरोधी कृत्य करणे गावद्रोह का नाही ? असा सवाल केला .

        त्या विषयाला अनूसरुन सभेत उपस्थित लोकांनी यापुढे वाहानगावाची बदनामी करनारे गावातील किंवा बाहेरचे यांना आता नक्कीच धडा शिकवू . जो गावातील नागरीक आहे त्याचे काही प्रश्न समस्या असतील तर त्यांनी रीतसर मांडावे अशा सुचना ग्रामसभेत देन्यात आल्या गाव विरोधात आरोपकर्त्यांना सरपंच प्रशांत कोल्हे यांनी आव्हान करीत संधी दिली. मात्र सभेत गावाची बदनामी करणारा कोणताही विरोधक फिरकला नाही. विषेश ग्रामसभा ही सार्वभौम असून गावाच्या हितासाठी जो निर्णय घ्यावा लागेल तो घेवू असे एकमताने ग्राम सभेत ठरवीण्यात आले . सभेला गावातील शेकडो लोकांची वहाणगावांत पहील्यादांच ऐतिहासिक गर्दी बघायला मिळाली.


PostImage

Chunnilal kudwe

Nov. 25, 2023

PostImage

Murder - Killing wife by crushing her with a stone - झोपेत दगडाने ठेचून पतीने केली पत्नीची निर्घुण हत्या



 भिसी पोलीस स्टेशन येथील दुर्देवी घटना.

 -  दोन चिमुकल्या आईविना झाल्या पोरक्या . 

   
           पती व पत्नीचे किरकोळ भांडणावरून पत्नी गाड झोपेत असताना डोक्यावर छातीवर दगडाने ठेचून झोपेतच निर्घुण हत्या केली व मृतदेह कपड्याने झाकून ठेवला असल्याची दुर्दैवी घटना भिसी येथे शुक्रवारच्या मध्यरात्रीनंतर घडली आहे. मृतक पत्नीचे नाव करुणा उर्फ शितल सोमेश्वर बाणकर वय २७ वर्ष असुन भिसी येथील रहीवासी आहे. आरोपी पती सोमेश्वर रामा बाणकर वय ४९ वर्ष नगरपंचायत भिसी प्रभाग क्रमांक १७ याला शनिवार ला पोलिसांना माहीती होताच अटक केली.


      मृतक करूणा उर्फ शितल सोमेश्वर बाणकर हीचे सासर व माहेर भिसी येथील आहे. प्राप्त माहितीनुसार आरोपी सोमेश्वर बाणकर याची मृतक पत्नी करुणा उर्फ शितल ही चौथी पत्नी आहे. पहिल्या व तिसऱ्या पत्नीचा घटस्फोट झाल्याचे समजते यातील दुसरी पत्नी एकाएकी मरण पावली होती तर चौथी पत्नीची निर्घुण हत्या केली आहे. दरम्यान शनिवार ला सकाळी मृतक करुणाच्या वडीलाने पोलीस स्टेशन भिसी येथे दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करून घटनास्थळ पंचनामा केला व प्रेत उतरणीय तपासणी करिता उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले. नंतर मृतक करुणा चा अंत्यसंस्कार माहेरी भिसी येथे करण्यात आला. मृतक करुणा उर्फ शितलच्या पश्चात दोन व सात वर्षे वयाच्या दोन मुली आहेत. आरोपी वडील सोमेश्वर ने पत्नी करुणा ची हत्या केल्याने दोन्ही चिमुकल्या आई विना पोरक्या झालेल्या आहेत. पुढील तपास चिमूर उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांचे मार्गदर्शनात भिसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश राऊत यांचे नेतृत्वामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन जंगम करीत आहेत. सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


PostImage

Chunnilal kudwe

Nov. 25, 2023

PostImage

PM Sunidhi Yojana - Loans to Ferries - पिएम स्वनिधी योजने अंतर्गत फेरीवाल्यांना मिळणार कर्ज


१० ते ५० हजारापर्यंत ७ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध



 प्रधानमंत्री पथविकेता आत्मनिर्भर निधी योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यात सुरू असुन यामध्ये फेरीवाल्यांसाठी १० ते ५० हजार रूपयापर्यंत कर्ज उलपब्ध करून देण्यात येत आहे.


यामध्ये पथविक्रेत्यांना प्रथम टप्प्यात १० हजार रूपये कर्ज उलपब्ध करून देण्यात येते  सदर कर्ज परतफेडीनंतर दिड वर्ष कालावधीसाठी वीस हजार आणि त्यांनतर तीन वर्ष कालावधीसाठी ५० हजार रू विणातारण कर्ज देण्यात येत आहे. यासाठी फक्त ७ टक्के व्याजदर आकारला जात आहे.
यासाठी www.pmsvanidhi.mohua.gov.in या संकेतस्थावरून किंवा ऑनलाईन सेंटरवरून अर्ज करता येईल. सदर कर्ज प्रकरण भरण्याकरिता आधारकार्ड, बँक पासबुक व आधारलिंक मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ चिमुर शहरातील रस्त्यावरील फेरीवाले तसेच आजुबाजुच्या गावातील परंतु चिमुर शहरात व्यवसाय करणारे नागरीक घेऊ शकतात.


सदर प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी योजनेचा चिमुर शहरातील जास्तीत जास्त पथ वीक्रेत्यांनी लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी चिमुर नगर परिषदेसोबत संपर्क साधावा असे आवाहन  नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. सुप्रीया राठोड यांनी केले आहे.


PostImage

Chunnilal kudwe

Nov. 25, 2023

PostImage

Rashtrasant Tukdoji College got B Plus - राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयाला बि प्लस


मदाविद्यालयातील सर्वाच्या सहकार्याने शक्य 


         चिमूर क्रांती भूमीतील  राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या . नावाने असलेल्या महाविद्यालयात नॅक कमिटी तपासणीसाठी आली होती. दरम्यान तपासणी अंती नॅक कमिटीने बि प्लस चा दर्जा दिला. महाविद्यालयातील टिम वर्क प्राचार्य, प्राध्यापक तथा कर्मचारी या सर्वांच्या प्रयत्नाने शक्य झाले असल्याचे महाविद्यालयातील सभागृह येथे मंगळवार ला आयोजीत पत्रकार परिषदेत संस्थेचे अध्यक्ष डॉ दिपक यावले यांनी सांगीतले.


       चिमूर येथील राष्ट्रसंताच्या कर्मभूमीतील राष्ट्रसंत महाविद्यालयाची स्थापना होवून एक्कावन्न वर्ष झालीत महाविद्यालयातील विद्यार्थ्यासाठी सोयी सुविधा, लायब्ररी , कंम्पुटर लॅब, तपासणी करिता तीन सदस्य टिम ऑक्टोबर महिन्यात  आली होती. नॅक च्या नविन निकषानुसार महाविद्यालयाने सादर केलेचा स्वमुल्य निर्धार अहवालाचे सात निकषावर सुमारे सातशे गुणांचे मुल्यांकन केले. उर्वरित तिनशे गुणांचे मुल्यांकन पिअर टिममार्फत करण्यात आले या सात निकषांमध्ये अभ्यासक्रम अध्ययन - अध्यापन प्रणाली संशोधन व नव निर्मिती विस्तार पायाभूत सुविधा व अध्ययन स्त्रोत विद्यार्थी सहायता प्रगती प्रशासन नेतृत्व व प्रशासन संस्थालक मुल्ये व उत्तम उपक्रम याचा समावेश असतो या सातही निकषांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयाने दमदार कामगीरी केली आहे. हे सर्व महाविद्यालयातील टिक वर्कमुळे घडून आले असून पूढील दोन वर्षात महाविद्यालयाची नविन वास्तू विद्यार्थ्यांच्या अध्यार्जनासाठी तयार होत असल्याचे आयोजीत पत्रकार परिषदेत संस्थेचे अध्यक्ष डॉ दिपक यावले यांनी सांगीतले.


        यावेळी पत्रकार परिषदेला संस्थेचे सचिव विनायक कापसे, नारायण डांगाले, प्रा मारोतराव भोयर, श्रीहरी गोहणे, कालू निसार सय्यद, रघुनाथ कडवे, प्राचार्य डॉ अश्विन चंदेल, गुणवत्ता सेलचे समन्वयक तथा लेप्टनंट उपप्राचार्य डॉ प्रफुल बनसोड, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा आशुतोष पोपटे, प्रा कार्तिक पाटील, प्रा हर्षवर्धन गजभिये , प्रा कुमरे सह प्राध्यापक कर्मचारी आदी उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Nov. 21, 2023

PostImage

Cotton purchase and 'thorn worship in Jinning' - चिमूर कॉटन इंडस्ट्री कापूस खरेदी व काटा पूजन


 सहा शेतकऱ्यांचा सत्कार

       चिमूर कॉटन इंडस्ट्री येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंगेश धाडसे व उप सभापती पिसे तालूका कृषी अधिकारी ज्ञानदेव तिखे यांचे हस्ते सोमवार ला काटा पूजन करून कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आले.


      यावेळी व्यापारी मंगळाचे अध्यक्ष प्रविण सातपुते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कैलास धनोरे, राजू बानकर, बाजार समितीचे सचिव दिनेश काशीकर, लेखापाल अरविंद देठे, निरिक्षण निशांत बिरजे चिमूर कॉटन इंडस्ट्री संचालक अनिल मेहेर, प्रमोद भलमे, सचिन अंबागडे आदी उपस्थित होते. दरम्यान प्रथम कापूस विक्रीसाठी आननारे शेतकरी नामदेव फलके बामणी, बाबाराव बावणकर चिमूर, प्रविण पिजदुरकर शेंगाव, प्रभाकर उताने चिमूर, शुभम गोरले बामणी, राकेश दुर्गे बामणी, देविदास जुमडे सोनेगाव, राहुल नेरलकर मारोडा मुल, हरिहर आष्टणकर या शेतकऱ्यांचा  उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. कापूस खरेदी दरम्यान प्रति क्विंटल सात हजार भाव पडला.
....................,.......
शेतकरी हिताच्या दृष्टिकोनातून कृषी उत्पन्न बाजार समिती, तालुका कृषी विभाग, तालुक्यातील सर्व कृषी केंद्र, शेती अवजार विक्रेते, शेती बियाणे विक्रेते, कृषी शास्त्रज्ञ, लोकप्रतीनीधी, जिनिंग  चालक मालक यांच्या वतीने जैविक बुरशी नियंत्रण, किड नियंत्रण, माती सुधार, जैवीक शेतीचे महत्व, ट्रक्टर शेती, माती परिक्षण, कापूस, धान, सोयाबीन, तुर, हळद आदी यावर कार्यशाळा व मार्गदर्शन कार्यक्रम घेन्याचे आयोजन डिसेंबर महिन्यात चिमूर कॉटन इंडस्ट्री येथे कापूस खरेदी  चर्चे दरम्यान करण्यात आले.


PostImage

Chunnilal kudwe

Nov. 21, 2023

PostImage

Infantry March - वहानगावच्या सरपंचाला अटक करण्यासाठी चिमूर ते चंद्रपूर पायदळ मार्च


भिम आर्मी संविधान रक्षक दल व ऑल इंडिया पँथर सेनाचे आयोजन

        सोशल मिडीयावर संविधान विषयी अश्लिल भाषा वापरनाऱ्या विषयी पोलीस अधिक्षक यांना निवेदण दिले मात्र त्यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही. संविधान व कायदा विषयी अश्लिल भाषा करनाऱ्या सरपंच प्रशांत कोल्हे ला अटक व्हावी यासाठी दिनांक २२ /११ / २०२३ बुधवार ला चिमूर ते चंद्रपूर जिल्हाधीकारी कार्यालय पर्यत पायदळ मार्च चिमूर तहसिल कार्यालयापासुन काढनार असल्याची माहिती भिम आर्मी संविधान रक्षक दल चे जगदीश मेश्राम व ऑल इंडिया पॅथर सेना संघटनेचे आशीष बोरकर यानी मंगळवार ला आयोजीत पत्रकार परिषदेत माहीती दिली.


     कोल्हे यांचेवर अनेक गुन्हे शेंगाव चिमूर पोलीस स्टेशन मध्ये दाखल आहेत पोलीस लक्ष देत नाही. या विषयाला एक वर्ष होत आहे. त्यामुळे चिमूर तहसील कार्यालय ते चंद्रपूर जिल्हाधीकारी कार्यालय पर्यत पायदळ मार्च काढन्याचे नियोजन बुधवार ला सकाळी दहा वाजता करण्यात आले आहे. या पायदळ मार्च मध्ये दोन ते तिन हजार विवीध संघटनाचे नागरीक सहभागी होनार असल्याची माहिती आयोजीत पत्रकार परिषदेत संघटनेच्या पदाधीकाऱ्यांनी दिली. पत्रकार परिषदेला ऑल इंडिया पॅथर सेना चिमूर चे तालूका अध्यक्ष आशीष बोरकर, भिम आर्मी संविधान रक्षक दल चे तालूका अध्यक्ष जगदीश मेश्राम, शहर अध्यक्ष प्रितम भैसारे आदी उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Nov. 19, 2023

PostImage

Give life to the 'yellow cat' - खवल्या मांजराला दिले जिवनदान


तरुण पर्यावरणवादी मंडळ शंकरपूर

 

     शंकरपूर येथील एका महिलेच्या घरी रात्री खवल्या मांजर दिसून आले त्यांनी तरुण पर्यावरणवादी मंडळाच्या सदस्यांना बोलावले त्या मंडळाच्या सदस्यांनी खवल्या मांजर ला पकडून जीवनदन दिले.

येथील सुमन व्यवहारे यांच्या घरी शुक्रवारच्या मध्यरात्री खवल्या मांजर शिरले होते स्वयंपाक रूम मधून भांडे पडत असल्याने या महिलेने उठून पाहिले असता त्या महिलेला हा प्राणी दिसून आला त्यांनी लगेचच तरुण पर्यावरणामध्ये मंडळाचे सदस्य विजय गजबे यांना फोन करून बोलावून घेतले त्यांनी या खवल्या मांजरला शिताफीने पकडून वनविभागाच्या स्वाधीन केले.

येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांनी त्याची तपासणी करून ठणठणीत असल्याचे प्रमाणपत्र दिल्याने त्याला शंकरपूर येथील वाघाई जंगल परिसरात सोडण्यात आले हा सस्तन प्राणी असून निशाचर आहे बिळात राहत असून मुंग्या त्याचे खाद्य आहे असुरक्षित वाटल्यास शरीराचे वाटोळे करतो अशी माहिती आमोद गौरकर यांनी दिली यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊरकर, वनरक्षक, आर एस भुरले, व्ही डी सोनूने, प्रदीप ढोणे, जग्गू लांजेवार तरुण पर्यावादी मंडळाचे सदस्य विजय गजभे, साईश वारजूकर,  योगेश बारेकर, राजू वाढई, अनमोल चुनचूनवार, रितेश गजबे उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Nov. 19, 2023

PostImage

'Gram Gaurav' Award - अभिजीत बेहाते 'ग्रामगौरव' पुरस्काराने सन्मानीत


विवीध कृषी क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल


           विदर्भ कुर्मी समाजाच्या वतीने श्री गुरुदेव सेवा मंडळ सभागृह पिपंळनेरी येथे ग्रामगीता शेतकरी उत्पादक कंपनीचे सहसंचालक अभिजीत शारदा धनराज बेहते यांना शनिवार ला उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते ग्रामगौरव पुरस्काराने सन्मानीत करन्यात आले.  


       अभिजीत हे तालुक्यामध्ये जैव इंधन क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत आहे. त्यांनी शेतकऱ्यांचे संघटन उभे करून जैविक इंधन क्षेत्रात क्रांती करत तालुक्यातील तरुणांसाठी उद्योग निर्माण करणे, रोजगार उपलब्ध करून देणे, महिला सक्षमीकरण यास प्रोत्साहन देणे व शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविणे, शेतातील टाकाऊ कचऱ्यापासून जैविक कोळसा तयार करण्याचा प्रकल्प, आदी विवीध कृषी क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेता कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी त्यांना ग्रामगौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. 


      यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकर शिरभैय्ये, किशोर शिंगरे, दिगांबर खलोरे, अरुणा शिरभैय्ये, मुरलीधर शिरभैय्ये, जानेश्वर शिरभैय्ये, साहेबराव नलोडे, शरद बरगये, मोहन धनोरे, गुरुदास धनोरे, सुनिल केमये विवेक शिरभैय्ये, किर्ती शिंगरे, आदी उपस्थित होते. दरम्यान तालुक्यातील शेतकऱ्यांनी अभिजीत बेहाते याना ग्राम गौर पुरस्कार मिळाल्याबदल कौतुक केले.


PostImage

Chunnilal kudwe

Nov. 18, 2023

PostImage

A selection of pettings of 'Liladhar' from 'Palasgaon' forest area are exhibited - राष्ट्रीय व मानांकित पेंटींग प्रदर्शनीत 'लीलाधर आत्राम' यांच्या पेंटींगची निवड


- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या पळसगाव वनपरिक्षेत्राचे नाव लौकीक -

न्यू दिल्ली येथील इंडियन हैबिटेट केंद्रामध्ये स्थानिक चित्रकार यांनी रेखाटलेल्या पेटिंगची प्रदर्शनी लावण्यात आलेली होती. भारतातील सर्व व्याघ्र प्रकल्पातील ज्यांनी या प्रदर्शनीकरिता आपली पेटिंग पाठवली अशा प्रत्येक व्याघ्र प्रकल्पातील २ कलावंताचा यामध्ये सहभाग होता. दरम्यान या प्रदर्शनीत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पळसगाव वनपरिक्षेत्रातील व पळसगाव येथील स्थानिक चित्रकार लीलाधर अत्राम यांच्या पेटिंगची निवड करण्यात आली असून राष्ट्रीय व मानांकित प्रदर्शनीमध्ये पेटींग प्रदर्शित करण्यात आली.


            राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) न्यू दिल्ली व शंकला फौंडेशन आयोजित राष्ट्रीय पेटिंग प्रदर्शनी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली होती. या प्रदर्शनीचा उद्देश कि, व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील पारंपारिक चित्र रेखाटन करणाऱ्या चित्रकाराचे पेटिंगचे प्रदर्शन भरवून या प्रदर्शनीच्या माध्यमातून त्यांना रोजगार मिळावा व स्थानिक कला व कलाकारांची यांची ओळख जगाला व्हावी यासाठी त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देन्यात आले होते. 

या राष्ट्रीय प्रदर्शनीमध्ये ८० ते १०० निवडक अशा पेंटिंग प्रदर्शित करण्यात आल्या होत्या या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंदर यादव, वन आणि जलवायू परिवर्तन अश्विनी चौबे, राज्यमंत्री केंद्रीय पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन सचिव यांच्या उपस्थितीत व केंद्रीय सचिव केंद्रीय पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन लीना नंदन वरिष्ठ वनाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरूवात करन्यात आली. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील दुर्गम भागातील लीलाधर अत्राम यांची पेटिंगचे कौतुक सर्व अधिकारी व प्रदर्शकांनी केले. बघण्यासाठी आलेल्या लोकांनी केले 'वाघाचे व स्थानिक समुदयाचे सहजीवन अशा खोलवर आशय असलेल्या विषयावर ताडोबा क्षेत्रातील जिवंत चित्र रेखाटन मांडले होते. या चित्रातील गाभा अतिशय प्रेरक असून वाघ व मानवाचे नाते याविषयी सुंदर पद्धतीने रेखाटन प्रदर्शनीत केले आहे. दरम्यान लीलाधर आत्राम बोलताना म्हणाले कि, ही पेटिंग ही आमची म्हणजे स्थानिक लोक व वन्यप्राणी आणि वन यांच्या नात्यातील गुंफण आहे आणि ते माडण्यांचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे असल्याचे मत व्यक्त केले.

 या अभिनव कार्यक्रमासाठी सहभागी झालेल्या सर्व कलावंताशी  राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी संवाद साधत लिलाधर आत्राम यांचे कौतुक केले. दरम्यान लिलाधर आत्राम यांच्या पेंटिंग ची निवड झाल्याने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पळसगाव वनपरिक्षेत्राचे नाव लौकीक झाले आहे. त्यामुळे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी विशेष अभिनंदन करत उपसंचालक ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प बफर क्षेत्र कुशाग्र पाठक व उपसंचालक (कोर) नंदकिशोर काळे व पळसगाव वनपरिक्षेत्राच्या वनपरिक्षेत्र अधिकारी योगीता मडावी यांनी लिलाधर आत्राम यांचे कौतुक करत अभिनंदन केले व आवश्यक ते सहकार्य करन्याचे बोलले.या कार्यक्रमामध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे प्रतिनिधित्व म्हणून प्रफुल्ल सावरकर (पर्यावरण शिक्षण अधिकारी) यांनी केले.


PostImage

Chunnilal kudwe

Nov. 18, 2023

PostImage

Wounded Tiger 'Chota Matka' - चार दिन बाद दिखा ' मटका'


• वाहानगांव खेत परिसर में 'बजरंग' की ली थी जान


ताड़ोबा के खडसंगी बफर वन क्षेत्र अंतर्गत वाहानगांव खेत परिसर में मंगलवार को छोटा मटका और बजरंग नामक दो बाघों के बीच हुए संघर्ष में बजरंग की मौके पर ही मौत हो गई। जबकि छोटा मटका गंभीर रूप से घायल होकर जंगल की ओर भाग गया था। जिसके चलते खडसंगी प्रादेशिक वन और बफर वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारियों द्वारा चलाए गए सर्च आपरेशन के दौरान चार दिन बाद शुक्रवार को छोटा मटका बाघ कोलारा वन परिक्षेत्र के नवेगांव माडो परिसर के कक्ष क्रमांक 57 के ट्रैप कैमरे में कैद हुआ।

जिसमें वह बेहतर दिखाई दे रहा है। लेकिन फिर भी छोटा मटका को उपचार की आवश्यकता तो नहीं है, इस दृष्टि से चिमूर वन परिक्षेत्र प्रादेशिक वन विभाग के वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊरकर व खडसंगी (बफर) वन परिक्षेत्र के वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे के साथ निमढेला क्षेत्र सहायक बी. आर. रंगारी, क्षेत्र सहायक आर. जे. गेडाम, वनरक्षक जी.एम. हिंगणकर, निखिल बोडे, संतोष लोखंडे,
चेतन कोटेवार, एसटीपीएफ, पीआरटी कर्मचारी उस पर नजर बनाये हुए हैं।

गौरतलब है कि चिमूर प्रादेशिक वन परिक्षेत्र अंतर्गत आनेवाले वाहानगांव में किसान सुभाष दोडके के खेत में छोटा मटका और बजरंग नामक बाघों के बीच लड़ाई हुई थी। लड़ाई इतनी भयानक थी कि बजरंग के गर्दन, सिर, पैर पर गंभीर चोटें लगने से उसकी मौके पर ही मौत हो गई और छोटा मटका भी गंभीर रूप से घायल हो गया था घटना के बाद सर्च ऑपरेशन के दौरान टैप कैमरे में कैद छोटा मटका के सामने के दाहिने पैर और शरीर पर मामूली चोटें देखी गई थी। ऐसे में उसे उपचार की आवश्यकता तो नहीं है, इस दृष्टि से वनविभाग की ओर से छोटा मटका का सर्च आपरेशन जारी है। यहां परिसर के 15 ट्रैप कैमरे के साथ खडसंगी बफर और प्रादेशिक वनपरिक्षेत्र अंतर्गत अधिकारी, कर्मचारी, कुटी मजदूर, वन मजदूर, गाइड, अलीझंझा, निमढेला पर्यटन गेट के गाइड, जिप्सी ड्राइवर मालिक ऐसे कुल 65 वन कर्मचारी मंगलवार की रात से घटनास्थल और अन्य परिसर में पैदल गश्त कर रहे हैं। दो दिनों तक छोटा मटका के दिखाई न देने से चिंता बढ़ गई थी, किंतु आज शुक्रवार को कक्ष क्र. 57 के ट्रैप कैमरे में घायल छोटा मटका कैद होने पर थोड़ी राहत महसूस की है।
....................................

दाहिने पैर में लगी है हल्की चोट -  

घायल छोटा मटका कक्ष क्र. 57 के ट्रैप कैमरे में दिखाई दिया है। शुक्रवार की सुबह कोलारा वनपरिक्षेत्र के नवेगांव माडो वनपरिक्षेत्र के सर्च आपरेशन के दौरान दिखाई दिया। उसके दाहिने पैर में हल्की चोट है. फिलहाल छोटा मटका बाघ की हालत में सुधार दिख रहा है। कुल 65 वन अधिकारी इसकी निगरानी कर रहे हैं। 

किरण धानकुटे, वनपरिक्षेत्र अधिकारी, (बफर) खडसंगी


PostImage

Chunnilal kudwe

Nov. 17, 2023

PostImage

OBC Reservation Opposition Leader 'Vijay Vadetiwar' - जीवात जीव असे पर्यत ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी लढणार 'विजय वडेट्टीवार'


जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे

मुंबई, दि. 17: ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. ओबीसी समाजाचे आरक्षण टिकवणे सरकार आणि विरोधी पक्ष यांची सामूहिक जबाबदारी आहे. ओबीसींच्या हक्काचे रक्षण करण्याबरोबरच सर्व समाजाला न्याय देण्याचे काम आम्ही मिळून करू, जीवात जीव असेपर्यंत ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी लढणार,असा विश्वास देत जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

जालना जिल्ह्यातील अंबड येथे झालेल्या एल्गार सभेला संबोधित करताना विजय वडेट्टीवार बोलत होते. यावेळी  वडेट्टीवार भावूक झाले होते.

वडेट्टीवार म्हणाले की, आजची ही सभा पाहिल्यावर ओबीसींच्या हक्काला धक्का लावण्याची कोणाची हिंमत होणार नाही. ही ऐतिहासिक सभा आहे. ओबीसींच्या हक्कासाठी आम्ही लढत असताना कोणी धमक्या दिल्या तरी आम्ही लढत राहणार. पद येतील जातील. पदापेक्षा समाजातील उपेक्षित वर्गाला न्याय देणे महत्वाचे आहे.

३५० जातीचा समाज कसा जगतो, कोणत्या अवस्थेत जगतो. हे पाहिल्यावर समाजाचे दुःख कळेल. जमिनी कमी झाल्या म्हणणाऱ्यांनी जमिनी नसलेल्या समाजाचा विचार केला पाहिजे.20 एकर,50 एकर जमीन असलेला शेतकरी 5 एकरावर आला असेल, मात्र ज्याला 2 एकर सुद्धा जमीन नाही. तो शेतकरी 20 पिढ्यात कुठे असेल याचा विचार केला पाहिजे. मोठ्या भावाने मोठ्या भावासारखे वागले पाहिजे. दहशत, भीती दाखवून घाबरून सोडणे योग्य नाही. घर जाळण्यापर्यंत टोकाचा द्वेष पसरवला जात आहे. द्वेष आणि विष पेरण्याचे काम कोणी करू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

वडेट्टीवार म्हणाले, एका छोट्या जातीचा ओबीसी कार्यकर्ता आज समोर आला आहे. मंत्री होतो तरी कधी चिंता केली नाही. आजही चिंता करत नाही. अंबडची ही सभा तुंबड झाली आहे. आता प्रत्येक जिल्ह्यात सभा घ्यावी लागेल. अनेक वर्ष काम केले. कधी घाबरलो नाही. वेदना, दुःख झाल्याने ते मांडण्यासाठी सर्वपक्षीय नेते जमले आहेत. सर्वांनी मिळून केंद्राकडे जातीनिहाय जनगणनेची मागणी केली पाहिजे. 'जिस की जितनी संख्या भारी, उसकी उतनी हिस्सेदारी! असेही श्री. वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.


PostImage

Chunnilal kudwe

Nov. 17, 2023

PostImage

Distribution of honorarium on 'Bhai Dooj' - शंकरपूर ग्रा. प. ने दिव्यांगों को बांटी साइकिले और मानधन राशी


दिपावली - भाईदुजपर विशेष उपहार 

          शंकरपुर ग्राम पंचायत पिछले तीन वर्षो से महिला और दिव्यांगों के लिए सरपंच भाईदूज मानधन योजना शुरू की है इस योजना की शुरुआत भाईदूज पर की गई थी। इस वर्ष विधवा, 65 वर्ष से अधिक आयु की महिला और दिव्यांगों को मानधन और तिपहिया साइकिल का वितरण  किया गया।

            कार्यक्रम का उद्घाटन प्रदेश कांग्रेस कमेटी के संगठक धनराज मुंगले के हाथों पूर्व विधायक डा. अविनाश वारजूकर की उपस्थिति में किया गया। प्रमुख अतिथि के रूप में चिमूर विस समन्वयक डा. सतीश वारजूकर, जिला कांग्रेस कमेटी महासचिव गजानन बुटके, सरपंच साईश वारजूकर चिमूर विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष व पूर्व सभापति रोशन ढोक, पूर्व पंचायत समिति सदस्य भावना बावनकर सविता चौधरी, भाऊ बावनकर, गोकुल सावरकर, उपसरपंच अशोक चौधरी आदि उपस्थित थे।

             दिपावली -  भाईदुजपर इस अवसर पर दिव्यांग विनोद कोडापे और देवराव गायकवाड को तिपहिया साइकिल अतिथियों के हाथों विशेष उपहार के तौरपर वितरित की गई। योजना अंतर्गत 65 वर्ष से अधिक आयु की 143 महिला लाभार्थी, 351 विधवा महिला लाभार्थी और 43 दिव्यांग लाभार्थियों को मानधन दिया गया। इसके पश्चात नागपुर के नटरंग डांस ग्रुप का कार्यक्रम आयोजित किया गया। अमोद गौरकर ने प्रस्ताविक किया और आभार माना। संचालन विजय गजभे ने किया। सफलतार्थ ग्रापं सदस्य और कर्मचारी सादिक शेख, बाला ढोक, रवींद्र राखडे, राम शेरकी, सचिन निकुरे, राजू बघेल आदि ने प्रयास किए।


PostImage

Chunnilal kudwe

Nov. 16, 2023

PostImage

Rotary festival - सोमवार पासून चिमूर क्रांती भूमीत रोटरी उत्सव


समाज प्रबोधन, विवीध कार्यक्रम स्पर्धा, नृत्य, खेळ कार्यक्रमाचे आयोजन


       दिवाळी उत्सवाच्या निमीत्ताने सामजीक बांधीलकी जपत रोटरी क्लब चिमूरच्या वतीने पहिल्यांदाच चिमूर क्रांतीभूमीत दिनांक २० नोव्हेंबर सोमवार ते २५ नोव्हेंबर शनीवार पर्यत सहा दिवसीय रोटरी उत्सव कार्यक्रमाचे आयोजन बिपीएड ग्राऊंड, आदर्श विद्यालय, संविधान चौक वडाळा ( पैकु ) चिमूर येथे करण्यात आले आहे.


        मागील अनेक वर्षापासुन चिमूर येथील रोटरी क्लब सामाजीक बांधीलकी जपत पर्यावरण, आरोग्य, शिक्षण या विषयी जनजागृती करून शिबीर राबवीले आहे. रोटरीने असहाय्य अशा व्यक्तीना मदतही केली आहे. रोटरी काय आहे ? रोटरी नेमकं समाजासाठी काय करते हे पटवून देन्याच्या उद्देशाने चिमूर क्रांतीभूमीत रोटरी उत्सवा निमीत्त विवीध कार्यक्रमाचे आयोजन करन्यात आले आहे. सोमवार पासून उत्सवाला सुरुवात होनार आहे. या पाच दिवसीय रोटरी उत्सव कार्यक्रमात नृत्य व विवीध स्पर्धा, रॉक बँड, फॅशन शो व विवीध खेळ, समूह नृत्य स्पर्धा व एड्स जागृतीवर पथनाटय, उत्पादनाची विशाल प्रदर्शनी, सर्व वयोगटातील नागरिकांसाठी आकाश पाळना, झुले, ड्रगन, मौत का कुआ, रेलगाडी व विवीध प्रकारचे मनोरंजन, स्वादिष्ट पदार्थांचा दिलखुलास स्वाद, शाळेतील विद्यार्थ्यासाठी चित्रकला स्पर्धा, नृत्य, गायन, व्यक्ती महत्व विकास, महिला व युवतींसाठी विवीध स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 


      रोटरी उत्सव कार्यक्रम सहा दिवस राहनार आहे. तरी परिसरातील नागरीकांनी या रोटरी उत्सवात सहभाग दर्शवून लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब चे अध्यक्ष रोटे वैभव लांडगे तथा रोटरी क्लब चे रोटे पदाधिकारी यांनी केले आहे.


PostImage

Chunnilal kudwe

Nov. 16, 2023

PostImage

"Bajrang" (Tiger) lost the battle of life - छोटा मटका ( बाघ ) से दांव - पेंच में जिंदगी की जंग हार गया "बजरंग" ( बाघ )


 पर्यटकों के पसंदीदा बाघ की साबित हुई अंतिम लड़ाई 

बाघों के लिए विश्व प्रसिद्ध ताड़ोबा में अनेक बाघ, बाघिनों ने अपनी अठखेलियों के साथ पर्यटकों का मन मोहा है। ऐसा ही एक बजरंग बाघ था जो अनेक पर्यटकों का पसंदीदा बना था किंतु बढ़ती उम्र और लड़ाई के दांव पेंच कम पड़ने से छोटा मटका के साथ उसकी अंतिम लड़ाई हुई और बजरंग की मौत हो गई। इसलिए, खड़संगी बफर जोन वन क्षेत्र के बाहानगांव खेत परिसर में मंगलवार की दोपहर को बजरंग का संघर्ष समाप्त हो गया।


        चार से पांच वर्ष पूर्व ताड़ोबा और बाद में करांडला अभयारण्य में अपना कब्जा बनाने वाले जय बाघ के अचानक गायब हो जाने की घटना बाघ प्रेमियों के लिए एक सदमा साबित हुआँ है। जय बाघ के साथ अनेक बाघों का संघर्ष हुआँ है। वनविभाग बाघों को टी फोर, फाइव इस प्रकार से पहचान देती हैं । वही वन्यजीव प्रेमी, गाइड बाघों का नामकरन करते है । और उस नाम से पहचानते हैं। ताड़ोबा अंधेरी बाघ प्रकल्प के कारवा वनपरिक्षेत्र के कोलसा क्षेत्र में कुवानी बाघिन
के शावक बजरंग ने अपनी मां कुवानी से कोलसा, कारवा जंगल में शिकार करना सीखा, फिर सन 2011 में उसने ताड़ोबा कोर में रुद्रा नामक बाघ से लड़ाई की। कुछ समय के लिए ताड़ोबा कोर में अपना क्षेत्र स्थापित किया, फिर मदनापुर बफर जंगल में कंकाझरी नर के साथ अस्तित्व के लिए लड़ना पड़ा और मदनापुर बफर में रहना पड़ा। बजरंग को पंढरपौनी क्षेत्र में दो बाघों छोटा मटका और मोगली के साथ अस्तित्व के लिए लड़ना पड़ा और बजरंग ने अपना क्षेत्र बदलकर खड़संगी बफर क्षेत्र के अलीझंजा, रामदेगी जंगल में रहना शुरू कर दिया था। इस क्षेत्र में बबली और भानुसखिंडी बाघिन रहती है, जबकि छोटा मटका बाघ भी इसी क्षेत्र में रहता है।
.............................

कोलसा जंगल से शुरू हुआँ था बजरंग का संघर्ष 

कोलसा के जंगल से शुरुआत करके, बजरंग कई पर्यटकों का पसंदीदा बन गया क्योंकि उसने अपने समय पर रुद्रा, कंकाझरी नर, छोटा मटका और मोगली के साथ तगड़ा संघर्ष किया। एक समय पर छोटा मटका के साथ संघर्ष कर अपना राज्य स्थापित करने वाले बजरंग की बढ़ती आयु और दांवपेंच कम पडने से मंगलवार को खडसंगी बफर क्षेत्र के वहानगांव में छोटा मटका के साथ हुआ संघर्ष अंतिम साबित हुआ और बजरंग को अपनी जान गंवानी पड़ी और छोटा मटका भी घायल हुआ है। उसकी मौत के साथ बजरंग का संघर्ष समाप्त हो गया। दुबले-पतले शरीर वाला बजरंग बाघ ताडोबा का गौरव था. और उसने इस बाघ अभ्यारण्य के एक बड़े क्षेत्र पर अपना साम्राज्य स्थापित किया है। संभवतः बिग डैडी बाघ के बाद सबसे अधिक संख्या में बाघिनों को अपने नियंत्रण में लाने का रिकॉर्ड उसके नाम है। छोटा मटका से लड़ाई के समय बजरंग की उम्र करीब 14 साल रही होगी।

मनिष नाईक
वन्यजीवप्रेमी तथा अध्यक्ष ट्री फाउंडेशन चिमूर.


PostImage

Chunnilal kudwe

Nov. 15, 2023

PostImage

Inauguration of Vikasit Bharat Sankalp Yatra by Prime Minister - गडचिरोली जिल्ह्यात विकसीत भारत संकल्प यात्रेचा पंतप्रधानाच्या हस्ते आभासी शुभारंभ


वैरागडच्या कार्यक्रमात खा.अशोक नेते यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ संपन्न
 
दिं १५ नोव्हेंबर २०२३

गडचिरोली : जिल्ह्यातील ४२२ ग्रामपंचायतींमध्ये फिरणार असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ आज बुधवार ला (दि.१५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी  पद्धतीने करण्यात आला. आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जिल्ह्यातील वैरागड  येथे पंतप्रधानांच्या भाषणाच्या थेट प्रक्षेपणासोबत प्रत्यक्ष शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वैरागड येथे खासदार अशोक नेते यांच्या हस्ते या संकल्प यात्रेचा प्रत्यक्ष शुभारंभ करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 वर्षाच्या कार्यकाळात समाजातील प्रत्येक घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचाच एक भाग  म्हणून भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ असल्याचे सांगून, या विकसित भारत यात्रेच्या निमित्ताने कल्याणकारी योजनांचा प्रचार व  प्रसार शासकीय कर्मचाऱ्यांनी करून नागरिकांना त्याचा लाभ द्यावा, तसेच नागरिकांनी यात जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी खा.अशोक नेते यांनी केले.

या कार्यक्रमाच्या ठिकाणी एलपीजी गॅस सिलिंडर, आयुष्मान भारत योजना, आभा कार्ड अशा पद्धतीने विविध स्टॅाल लावून नागरिकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.आदिवासी समाजाच्या संस्कृतीचा वारसा जतन करत आदिवासी नृत्य हे विशेष या कार्यक्रमात ठरले.यावेळी प्रमाणपत्रांसह कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्वांना पंचप्राण शपथ देण्यात आली.

यावेळी आ.कृष्णा गजबे, सीईओ आयुषी सिंह, अतिरिक्त सीईओ राजेंद्र भुयार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी फनिंद्र कुतीरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चेतन हिवंज, आरमोरीचे तहसिलदार श्रीहरी माने, बीडीओ मंगेश आरेवार, वैरागडच्या सरपंच संगिता पेंदाम, उपसरपंच भास्कर बोडणे, सदानंद कुथे, माजी जि.प.सदस्य संपत आळे, पुनम गुरनुले आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन केंद्रप्रमुख तथा शिक्षण विस्तार अधिकारी राजेश वडपल्लीवार यांनी केले.


PostImage

Chunnilal kudwe

Nov. 15, 2023

PostImage

Firecrackers given during Diwali festival" - अरविंद रेवतकर यांनी केला मुलांचा आनंद व्दिगुणीत


 दिवाळी उत्सवात दिली फटाक्यांची भेट

         मुले देवा घरची फुले असतात मात्र त्यांना ओळखता आले पाहीजे हीच जान ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपूर जिल्हा सरचिटनीस तथा चिमूर विधान सभा अध्यक्ष ( अजित पवार गट ) अरविंद रेवतकर यांनी दिवाळी उत्सवादरम्यान फटाक्यांची भेट देत मुलांचा आनंद व्दिगुणीत केला.


        प्रत्येक मुलांची परिस्थिती सारखी असते असे नाही. तर काही मुले परिस्थितीमूळे दिवाळीत फटाके घेवून उत्सव साजरे करू शकत नाही मात्र काही मुले फक्त दुकानाकडे पाहुन आनंद घेत असतात. असेच वास्तव राष्ट्रवादी काँग्रेस चिमूर विधानसभा अध्यक्ष अरविंद रेवतकर यांना दिसले त्यांनी कशाचीही पर्वा न करता अशा साठ मुलांना एकत्र करून फटाके घेवून देत मुलांचा आनंद व्दिगूनीत केला यावेळी मुले चांगलीच प्रफुलीत झाल्याचे दिसले.


PostImage

Chunnilal kudwe

Nov. 15, 2023

PostImage

Chimur Municipal Council - प्रभागातील मुलभूत प्रश्नाकडे नगरपरिषदचे दुर्लक्ष - अविनाश अगडे


 मूलभूत प्रश्न त्वरीत निकाली न काढल्यास आंदोलन


        सिमेंट रोड, सभागृह ,या व्यतिरिक्त समाज हिताचे व गरजेचे एकही काम नगर परिषद करू शकली नाही. कोनतेही काम कितीदा करायचे याचे सुद्धा नियोजन नाही. विवीध समस्याने नगरपरिषद बरबटली असून प्रभागातील मुलभूत प्रश्नाकडे नगर परिषदचे दुर्लक्ष होत आहे. प्रभागातील मुलभूत प्रश्न त्वरीत निकाली काढावे अन्यथा आंदोलन करू असा ईशारा चिमूर तालुका काँग्रेसचे शहर अध्यक्ष अविनाश अगडे यांनी दिला आहे.


        चिमूर नगरपरिषदेला आठ वर्ष झाली नळाची पाणी समस्या जशीच्या  तशीच आहे. या संदर्भात अनेकदा नगर परिषद ला पत्र व्यवहार केला मात्र नगरपरिषद याकडे लक्ष देत नाही.  पूर्ण पावसाळा गेला तरी या वर्षी नाली व नाले साफ करण्यात आले नाही. कोणत्याही कामात नियोजित काम नाही निव्वळ निधीची उधळण सुरू आहे.  लोकप्रतिनिधीचे याकडे दुर्लक्ष होत आहे. टॅक्स वसुलीच्या माध्यमातुन जनतेची पिळवणूक सुरू आहे. अन्न, पाणी , निवारा या तिन्ही बाबीकडे नगर परिषद फोल ठरत आहे. 


      येत्या काही दिवसात समस्या निकाली न लागल्यास विधानसभा 74 समन्वयक डॉ. सतिश वरजूकर, ओबीसी संघटक धनराज मुंगले, जिल्हा सरचिटणीस गाजनन बुटके, तालुका अध्यक्ष विजय गावंडे पाटील यांच्या नेतृत्वात नगर परिषदला धडक देत आंदोलन करू असा ईशारा प्रेसनोट च्या माध्यमातून चिमूर तालुका काँग्रेसचे शहर अध्यक्ष अविनाश अगडे यांनी दिला आहे.


PostImage

Chunnilal kudwe

Nov. 15, 2023

PostImage

"Tiger fight" one dead the other serious - शिकार खान्यासाठी आलेल्या वाघांची एकमेकाशी झुंज


झुंझीत एका वाघाचा मृत्यु तर एक गंभीर , वहानगाव येथील जंगलालगत शेतातील घटना


      चार दिवसा अगोदर  शनीवारला हातात बैलाचे कासरे घेवून बैलाना चारा चराईसाठी शेतातील आवारात शेतकरी  नेत असताना मागेकडून आलेल्या वाघाने बैलावर हल्ला चढवत बैलाला ठार केले तिच शिकार मंगळवारला खान्यासाठी तो वाघ आला होता शिकार खात असताना दुसरा वाघ आला माझी शिकार खाते म्हणून त्या वाघाने शिकारखान्यासाठी आलेल्या वाघावर हल्ला चढवीला यात दोन तास दोन वाघात झुंज झाली त्यात एका वाघाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला तो वाघ शेतात नागरीक येताच जंगलात पळून गेला हि घटना वहानाव जंगलालगत शेत सर्व्हे क्रमांक 290 (खाजगी शेतजमीन ) सुभाष दोडके यांच्या शेतात घडली.


      चिमूर वन परिक्षेत्राअंतर्गत खडसंगी बिटातील बफर झोन जंगलालगत शेतशिवारात शनिवार दिनांक १० नोव्हेंबर ला दुपारी दोन वाजता शेतकरी मुरलीधर दोडके शेतात बैल चराईला नेत असताना मागेकडून येनाऱ्या वाघाने बैलाला ओढत शिकार केली असता त्याने मागे वळून पाहीले असता वाघ दिसल्याने शेतक्यांने शेतातुन पळ काढला दरम्यान वनविभागाने या घटनेचा पंचनामा केला होता. मात्र ति शिकार शेताच्या जंगलालगत असल्याने तो वाघ पुन्हा मंगळवार ला शिकार खान्यासाठी आला असता दरम्यान दुसरा वाघ शिकार पाहून तिच शिकार खान्यासाठी शिकारी जवळ आला माझी शिकार कसा खाते म्हणून दोन वाघाची झुंज मृत  बैला जवळील लगतच्या सुभाष दोडके याच्या शेतात झाली. वाघाची झुंज दोन तास चालली हि माहीती शेतकर्यांने गावकर्यांना दिली गावकर्यांना माहिती होताच शेतात गर्दी केली असता एक वाघ नागरिकांना शेताकडे येताना पाहून जंगलात पळून गेला. मृत वाघ हा नर असुन तो अंदाजे सहा ते सात वर्षाचा आहे.


      वनविभागाची टिम घटना स्थळावर दाखल झाली मात्र सायंकाळपर्यत मृत वाघ शेताततील घटना स्थळावरच होता. सुभाष दोडके यांच्या शेतात चना पेरला आहे. मृत वाघाला पाहन्यासठी नागरीक आले असता शेतात पेरलेला चना तुडवल्याने  शेतकर्यांचे नुकसान झाले. जो पर्यत वनविभाग नुकसान भरपाई देनार नाही तो पर्यत मृत वाघाला उचलू देनार नाही अशी भूमिका शेतकर्यांनी  घेतल्याचे आढळले. घटनेचे वृत्त कळताच उपवनसंरक्षक ब्रम्हपूरी वन विभाग दिपेश मलहोत्रा, सहाय्यक वनसंरक ( तेंदू )  स्थळावर चिमूर वनपरिक्षेत्र ब्रम्हपूरी वनविभाग सुनिल हजारे, राजू मेश्राम, उत्तम घुगरे, रूपेश चौधरी, संजय पाटील, तसेच खडसंगी बफ्फर वनपरिक्षेत्र वनाधिकारी किरण धानकुटे, जी एम. हिंगणकर, राजेन्द्र मेश्राम, अजय ढवळे, पीआरटी टीम, एनटीसिए प्रतिनिधी बंडू धोतरे, अमोद गौरकर तसेच शेगांव पोलीसांच्या उपस्थितीत घटना स्थळावर मंगळवार ला रात्री उशीरा पर्यत मौका पंचनामा नोंदविण्यात आल्याचे माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी ( प्रादेशीक ) परिक्षेत्र चिमूर चे किशोर देऊरकर यांनी प्रेसनोटच्या माध्यमातून दिली.
,........................................


       दोन वाघाच्या झुंजीत जखमी झालेल्या वाघाच्या शोधकरिता खडसंगी बफ्फर वनपरिक्षेत्रातील अधिकारी,एसटीपिएफ,पीआरटी,टीम,व वन मजूर यांच्या सह पायदळ गस्त करून शोध घेनार असून घटना स्थळ परिसरात दहा ट्रॅप कॅमेरे लावून जखमी वाघाचा शोध घेण्यात येणार आहे.

किरण धानकुटे
वनपरिक्षेत्र अधिकारी, बफ्फर, खडसंगी
...........................................
छोटा मटका ठरला बजरंग वर भारी -
         खडसंगी ब्फ्फर क्षेत्रात अस्तित्व असणारे छोटा मटका व बजरंग या दोन ढाण्या वाघात शिकारी वरून वाहांनगाव शेतशिवारात मंगळवारी दुपारी  झालेल्या झुंजीत छोटा मटका वाघाने बजरंग वाघाला ठार करीत आपले वर्चस्व गाजविले असल्याच्या चर्चा वन्यजीवप्रेमी, गाईड मध्ये होत आहेत.
...........................................

       वनविभागाने मृत वाघाची पाहणी केली असता त्याच्या गळ्यावर गंभीर स्वरुपाच्या जखमा आहे. उजवा व डाव्या पायावर जखमांचे मोठे-मोठे पाव आहे. चेहन्यावर सुध्दा पाव दिसून येत आहे. पाठीवर घाव असून त्याचे मास निघालेले आहे. वाघाच्या मिशा, दात, सर्व नखे तसेच सर्व अवयक शाबुत आहेत. प्रथम दर्शनी सदर वाघ दोन वाघाच्या झुंजीमध्ये मरण पावला असावा. वाघाचे मोजमाप केले असता, नाकापासून ते धडापर्यंत - 213 से.मी. शेपटीची लांबी 90 से. मी. समोरच्या पायाची उंची खांद्यापासून - 113 से. मी. मागील पायाची उंची कमरेपासून 118 से. मी. आहे.


PostImage

Chunnilal kudwe

Nov. 8, 2023

PostImage

Success to MLA Pratibha Dhanorkar's movement, three phase electricity during the day instead of night - जिल्ह्यातील कृषि पंपाना दिवसा थ्री फेज पुरवठा


आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या मागणीला यश 

वरोरा - भद्रावती मतदार संघातील शेतकऱ्यांत खूशीची लहर   

          जिल्हयातील कृषिपंपांना दिवसा थ्री फेस वीजपुरवठा होणार आहे. या मागणीसाठी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लावलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वात ३ - ११ - २०२३ रोजी सकाळी ११ वाजता उपविभाग वरोरा येथे कार्यालयाला कुलूप लावून आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतली असून हि मागणी पूर्ण केली आहे. सर्व शेतकरी बांधवांकडून आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे आभार मानले आहे. 

चंद्रपूर जिल्हा हा एक ऊर्जानिर्मिती करणारा जिल्हा आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत. वरोरा - भद्रावती मतदार कृषी पंपांना अखंडित वीजपुरवठा होत नसल्याने शेतकरी बांधव हवालदिल होते. म. रा. वि. वि. कंपनीने थ्री फेस वीजपुरवठ्याचे जिल्ह्यात वेळापत्रक घोषित केले होते. आता रात्री ऐवजी सर्व  कृषिपंपांना दररोज दिवसा वीजपुरवठा होणार आहे. त्यामुळे वरोरा - भद्रावती मतदार संघातील शेतकऱ्यांत खूशीची लहर आहे.

या निर्णयामुळे वरोरा - भद्रावती मतदार संघातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कृषी उत्पादन वाढण्यास मदत होईल. तसेच, हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यांपासून शेतकऱ्यांचे बचाव होईल.


PostImage

Chunnilal kudwe

Nov. 7, 2023

PostImage

' Nana Patole ' held a press conference - सरकार मध्ये आरक्षणाविषयी एकवाक्यता नाही - ' नाना पटोले '


भारतीय जनता पक्ष आरक्षण विरोधी आहे.

     मराठा व ओबीसी समाजात तेढ निर्माण करुन राज्यात सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सरकारमधील दोन मंत्रीच आरक्षणावर वेगवेगळी विधाने जाहीरपणे करत आहेत. सरकारमध्ये आरक्षणाविषयी एकवाक्यता दिसत नाही त्यामुळे आरक्षणाप्रश्नावर भाजपा व शिंदे सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी मंगळवार ला आयोजीत पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

मुंबई येथील टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी भूमिका सर्व पक्षिय बैठकीत मांडण्यात आली होती पण तसे होताना दिसत नाही. दोन जातींमध्ये तणाव निर्माण करून राज्याला भेडसावत असलेले महागाई, बेरोजगारी, दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, ड्रग्जची तस्करी या मुळ मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी वातावरण बिघडवले जात आहे. मराठा, धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन त्यांच्या मतांवर भाजपा सत्तेत आला पण त्यांना आरक्षण दिलेच नाही. मराठा आरक्षणाविरोधात बाजू मांडू नका असे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितले होते असे त्यावेळी सरकारची बाजू न्यायालयात मांडणारे महाधिवक्ता आशितोष कुंभकोणी यांनीच सांगितले आहे. आरक्षणाविरोधात ज्या लोकांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या, त्यांच्यामागे कोण आहेत हे राज्यातील जनतेला माहित आहे. भारतीय जनता पक्ष हा आरक्षणविरोधी आहे, त्यांना आरक्षण संपवायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःच गरिब ही जात आहे असे सांगत आहेत, गरिब व श्रीमंत या दोन जाती ठरवून गरिब जनतेला शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या कमजोर करुन गुलाम बनवण्याचा मनुसुबा आहे. भाजपाचा हा मनसुबा मात्र कधीच यशस्वी होणार नाही. मागास जातींना आरक्षण दिले पाहिजे ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. आरक्षण प्रश्नी आज तो वाद सुरु आहे त्यातून मार्ग काढायचा असेल तर, जातनिहाय जनगणना करणे व आरक्षणाची ५० टक्के मर्यादा हटवणे गरजेचे आहे. राहुल गांधी यांनी ही भूमिका देशभर मांडली आहे पण केंद्रातील भाजपा सरकार मत्र यावर निर्णय घेत नाही कारण भाजपा हा आरक्षण विरोधी पक्ष आहे. 

,,...................,...............,...........

बीडमधील जाळपोळीवर बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे. गृहखाते कमी पडत आहे हे स्पष्ट दिसत आहे. बीडमध्ये जी जाळपोळ करण्यात आली त्यामागे कोणतीतरी शक्ती असल्याशिवाय शक्य नाही. कोणतरी राजकीय फूस लावल्याशिवाय अशी जाळपोळ होत नाही. या सर्व प्रकारामागे सरकारचा हात असू शकतो असे पटोले म्हणाले.

.,.,,...........,....................................,....

 कुणबी प्रमाणपत्राबद्दल बोलताना पटोले म्हणाले की, सरकार मराठा समाजाची फसवणूक करत आहे. जात प्रमाणपत्र देताना फॅमिली ट्री लागतो तरच असे प्रमाणपत्र देता येते, सरकार आज जे करत आहे ती तात्पुरता व्यवस्था आहे कायमस्वरूपी नाही.

या पत्रकार परिषदेला माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Nov. 7, 2023

PostImage

Victory in the by-election - दोनदा निवडणूकीच्या पराभवानंतर अखेर पोटनिवडणूकीत विवेक रामटेके विजय


माजी जि प सदस्य गजानन बुटके यांनी दिल्या शुभेच्छा

      मागील दोनदा पंचवार्षिक निवडणूकीत फक्त एका मतांनी पराभव पत्कारलेल्या एका उमेदवाराने यावेळी पोटनिवडणुकीत नऊ मतांनी विजय मिळविला ही घटना चिमूर तालुक्यातील वडसी येथील आहे. दरम्यान ग्राम पंचायत सदस्यांच्या निधनानंतर सहा महिन्याने झालेल्या पोटनिवडणूक विवेक रामटेके विजयी झाले आहेत.

चिमूर तालुक्यातील वडसी येथील एका सदस्याचे निधन झाल्याने ती जागा रिक्त् झाली होती. त्यामुळे दोनदा पंचवार्षिक निवडणुकीत फक्त एका - एका मताने पराभव झालेले विवेक रामटेक हे ह्या जागेवर तिसऱ्यांदा उभे झाले होते.  त्यामुळे ह्या पोटनिवडणूकीकडे अख्या तालुक्याचे लक्ष लागले होते. दोन्ही उमेदवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. दोन्ही उमेदवारांचा घटनाक्रम मजेदार आहे. वडसी येथील रहिवासी असलेले विवेक रामटेके हे मागील दोन ग्राम पंचायत पंचवार्षिक निवडणुकीत उभे राहिले परंतु त्याचे प्रतिस्पर्धी भास्कर मेश्राम यांनी त्यांचा दोन्ही निवडणुकीत फक्त एक मतांनी पराभव केला होता.


         त्यानंतर भास्कर मेश्राम यांच्या निधनाने वार्ड नंबर 3 मधील सदस्य जागा रिक्त झाली. त्यानंतर सहा महिन्यानंतर पोटनिवडणुक  रविवार ला पार पडली. विवेक रामटेके यांच्या तिसऱ्यांदा निवडणूकीत उभे राहिल्यानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी भास्कर मेश्राम यांचे मोठे बंधू भक्तदास मेश्राम यांनी उमेदवारी अर्ज भरला. दोन्ही उमेदवारांसाठी ही निवडणूक ही प्रतिष्ठेची ठरली होती. सोमवार ला मतमोजणीत विवेक रामटेके यांनी घवघवीत तिसऱ्यांदा विजय मिळविला. दरम्यान मतमोजनी केंद्रावर माजी जि प सदस्य गजानन बुटके यांनी विवेक रामटेके यांचे अभिनंदन करत पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
     वडसी गावातील वार्डात 195 मतदान होते . विवेक रामटेके यांना 86 तर भक्तदास मेश्राम यांना 77 मतें मिळाली. 3 मते नोटाला मिळाली. विवेक रामटेके यांचा तिसऱ्यावेळी पराभवाचा वनवास संपल्याने बॅंडच्या तालावर वडसी गावात विजयी मिरवणूक काढण्यात आली.


PostImage

Chunnilal kudwe

Nov. 7, 2023

PostImage

Diwali festival - चिमूर पंचायत समितीत दिवाळी फराळ महोत्सव


उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष चा उपक्रम 


   उमेद तालूका अभियान व्यवस्थापन कक्ष च्या वतीने सोमवार ला पंचायत समिती चिमूर आवारात दिवाळी फराळ पाच दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या दिवाळी फराळ प्रदर्षानीचे उद्घाटन प स संवर्ग विकास अधिकारी राजेशकुमार राठोड व विस्तार अधिकारी(कृषी) पंचायत समिती यांचे हस्ते फीत कापून करण्यात आले.


        दिवाळीनिमित्त विविध वस्तूची खरेदी करताना ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील महिलांनी उत्पादित केलेले खाद्यपदार्थ, आकाश दिवे, उटणे यांची खरेदी करून ग्रामीण भागातील महिलांच्या उत्साह वाढवावा व त्यांच्या उत्पन्नात वाढ करावी असे आवाहन संवर्ग विकास अधिकारी राजेशकुमार राठोड यांनी केले. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्वयंसहायता समूह कार्यरत असून यातील अनेक महिला नाविन्यपूर्ण वस्तूची निर्मिती करतात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिलांकडून विविध खाद्यपदार्थ व सजावटीच्या वस्तू विक्रीस ठेवल्या आहेत. पंचायत समिती चिमूर परिसरात दिनांक 6 नोव्हेबर ते 10 नोव्हेबर या पाच दिवसीय कालावधीमध्ये दिवाळी फराळ महोत्सव राहनार करण्यात आहे या  पाच दिवसांमध्ये विविध वस्तू विक्रीस असणार आहेत भेट देणाऱ्या ग्राहकांनी ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तू खरेदी कराव्यात जेणेकरून ग्रामीण भागातील महिलांच्या घरातही आनंद पोहोचेल असे आवाहन  तालुका अभियान व्यवस्थापक राजेश बारसागडे यांनी केले.


       दरम्यान कार्यक्रमाला  मेघदीप ब्राम्हणे, रजनी खोब्रागडे, हेमचंद बोरकर, ईश्वर मेश्राम, सुधीर ठेंगरी, दिपाली दोडके, स्वप्ना उराडे, पुंडलीक गेडाम, श्री. नितेश मेश्राम, किरणकुमार मेश्राम, नितेश संगेल प्रीती डोंगरे आदी उमेदच्या टीमने परिश्रम घेतले


PostImage

Chunnilal kudwe

Nov. 7, 2023

PostImage

FDCM employees are working with black belt - काले फिते लगाकर काम कर रहे एफडीसीएम कर्मी


सातवें वेतन आयोग की बकाया राशि की मांग 

 

एफडीसीएम के अधिकारी कर्मचारियों को 16 सितंबर 2021 से 7वां वेतन आयोग लागू हुआ है। वहीं राज्य कर्मचारियों को 2016 से इसलिए इस बीच की बकाया राशि दिवाली पूर्व देने की मांग के लिए सोमवार से अधिकारी कर्मचारियों ने काले फीते लगाकर काम करना शुरू किया है। इसके बावजूद मांग न पूरी किए जाने पर 1 दिसंबर से राज्य भर में हड़ताल कर तीव्र आंदोलन की चेतावनी दी है।  


        आंदोलनकारियों का आरोप है कि राज्य सरकार ने अधिकारी कर्मचारियों को 2016 से सातवां वेतन आयोग लागू किया है। इसी तर्ज वन विकास महामंडल (एफडीसीएम) के कर्मचारियों को सातवां वेतन अयोग लागू करने की सिफारिश एफडीसीएम संचालक मंडल ने प्रशासन को प्रस्ताव प्रस्तुत कर की थी। सरकार ने एफडीसीएम कर्मचारियों के को जुलाई 2021 से सातवां वेतन आयोग मंजूर कर एफडीसीएम कर्मचारियों पर अन्याय किया है। इस मांग पर निर्णय लेने 29 नवंबर 2022 को मंत्रिमंडल की बैठक में एक उपसमिति का गठन किया गया। जिसमें अध्यक्ष देवेंद्र फडणवीस और सदस्यों में सुधीर मुनगंटीवार, संजय राठोड का समावेश है किंतु समिति ने इस विषय को लेकर एक भी बैठक नहीं ली है। 


         इसलिए दिवाली के पूर्व तक राशि देने की मांग के लिए सोमवार से आंदोलन शुरू किया है। 30 नवंबर तक मांग पूरी न होने पर 1 दिसंबर से राज्य भर में महामंडल 2000 अधिकारी कर्मचारी हड़ताल करने की चेतावनी संगठन के केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील ने दी है।


PostImage

Chunnilal kudwe

Nov. 3, 2023

PostImage

MLA Pratibha Dhanorkar slammed MSEB - आमदार प्रतिभा धानोरकर यांनी विज वितरण कार्यालयाला ठोकले कुलूप


आश्वासन पूर्ण न केल्यास मुख्यअभियंता वीजवितरण कंपनी चंद्रपूर कार्यालयाला कुलूप बंद आंदोलन करनार

 

      शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा थ्री फेज वीजपुरवठा देण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली होती. या मागणीला सरकार कडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नसल्याने शुक्रवार दिनांक 3.11.2023 रोजी सकाळी 11 वाजता कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्या वरोरा, कार्यालयावर शेतकरी व पदाधिकारी तसेच कार्यकत्यांनी मोर्चा काढत कार्यालयावर जाऊन अधिकाऱ्यांना खोलीत बंद करून कुलूप ठोकले. त्यानंतर ठिय्या आंदोलन करून आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वात हुकूमशाही सरकारच्या निषेध केला. यावर वीज वितरण कंपनीचे अधिकारी नरमले असून हि मागणी दोन दिवसात पूर्ण करणार असे आश्वासन दिले. परंतु हे आश्वासन पूर्ण न केल्यास मुख्य अभियंता वीजवितरण कंपनी मर्या चंद्रपूर कार्यालयाला कुलूप बंद आंदोलन करू असा अल्टिमेटम आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिला आहे.  

याप्रसंगी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, वरोरा तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद भोयर, शहर काँग्रेस अध्यक्ष विलास टिपले, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती विशाल बदखल, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती राजेंद्र चिकटे, भद्रावती काँग्रेस शहर अध्यक्ष सुरज गावंडे, माजी नगरसेवक राजू महाजन, वरोरा तालुका महिला अध्यक्ष ऐश्वर्या खामनकर, मोनू चिमुरकर, प्रमोद मगरे, बसंत सिंग, निलेश भालेराव, मनोहर स्वामी, फिरोज पठाण, प्रमोद काळे, पुरुषोत्तम पावडे, रवींद्र धोपटे, संजय घागी, गणेश घागी, रत्नमाला अहिरकर, माधुरी चिकटे, सविता सुपी, योगेश खामणकर, अनिल झोटिंग, किशोर डुकरे, मयूर विरुटकर, अनिरुद्ध देठे, विलास गावंडे, सुधाकर कडुकर, किशोर डुकरे, प्रशांत झाडे,  प्रमोद नागोसे, संदीप कुमरे, रितेश वाढई, तन्वीर शेख, महेश कोथडे, निखिल राऊत, गुरु थई, सचिन पचारे यांची उपस्थिती होती.  

चंद्रपूर जिल्हा हा  ऊर्जानिमिर्ती करणारा जिल्हा आहे. खासगी व शासकीय वीजनिर्मिती केंद्राच्या माध्यमातून ४४२० मे. वॅ.  वीजनिर्मिती होते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झुडपी व मोठे जंगल आहे. रात्रीपाळीत शेतकरी कृषिपंपातून शेतीला पाणीपुरवठा करीत असतात. यावेळी हिंस्त्र प्राणी शेतकऱ्यावर हल्ला करीत असतात. यात शेकडो शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. २ दिवसात चंद्रपूर जिल्ह्यात  २४ तास थ्री फेस वीजपुरवठा न केल्यास जिल्ह्यातील वीज वितरण कार्यालयाला टाळे बंद आंदोलन करण्याच्या इशारा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला होता. परंतु सरकारकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नसल्याने आज हे आंदोलन करण्यात आले. 

                जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आहे. जिल्ह्यांत कृषी पंपांना अखंडित वीजपुरवठा होत नसल्याने शेतकरी बांधव हवालदिल आहेत. १ एप्रिल २०२० पासून जिल्ह्यात कृषिपंप जोडणी च्या मागण्या प्रलंबित आहेत. ज्यांना कनेक्शन दिलेत त्यांना अखंडित वीजपुरवठा होत नाही. म. रा. वि. वि. कंपनीने  थ्री फेस वीजपुरवठ्याचे जिल्ह्यात वेळापत्रक घोषित केले आहे.  आठवड्यातून ४ दिवस आणि ३ दिवस रात्री ८ तास कृषिपंपाना वीजपुरवठा करण्यात येत आहे. परंतु २४ तास  थ्री फेस पुरवठा दिल्यास शेतकऱ्यांना सोयीचे होईल.

             महाजनको कडून ग्रीड मार्फत संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गरजेनुसार थ्री फेस वीजपुरवठा मिळालाच पाहिजे हि आपली आग्रही भूमिका असून पुढे देखील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपण रस्त्यावर उतरू असा इशारा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिला आहे.


PostImage

Chunnilal kudwe

Nov. 3, 2023

PostImage

'Thiya' agitation for power supply - चोवीस तास विद्युत पुरवठयासाठी काँग्रेसचा ठिय्या


२४ तासाच्या आत शेतकऱ्यांना विज पुरवठा न मिळाल्यास तीव्र  आंदोलन करणार - डॉ सतिश वारजूकर


  हल्ली रब्बी पिकांचा हंगाम सुरु असुन थंडीचे दिवस आहेत. शेती ओलित करण्यासाठी शेतकऱ्यांना विजेअभावी मोठी कसरत करावी लागत आहे. परिसरातील शेतकऱ्यांची अवस्था लक्षात घेता चिमूर विधान सभा क्षेत्राचे समन्वयक तथा महाराष्ट्र प्रदेश  ओबीसी महासंघ उपाध्यक्ष डॉ सतिश वारजूकर व परिसरातील शेतकर्यानी २४ तास वीज पुरवठा करण्यात यावा या मागणी करीता शुक्रवार ला चिमूर - वरोरा महामार्गावरील  रामदेगी फाट्याजवळ ठिय्या आंदोलन केले. 


        एकीकडे मोझाक या व्हायरसमुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक पूर्णपणे नष्ट झाले तर दुसरीकडे शेतकऱ्याला थ्री फेज वीजपुरवठा दिवसा नसल्याने शेतकरी पूर्ण पणे हवालदिल झाला आहे कपाशीचे पीक देखील उन्हामुळे मरणागती जात असल्याचे दिसत आहे याच सोबत धान पीक देखील पाण्या अभावी नष्ट होण्याची दाट शक्यता आहे. रब्बी हंगामातील चना गहू या पिकांना पाणी सुधा गरजेचे असल्याने शेतकऱ्यांना रात्रीला गस्त करत रात्रीला रानटी जनावरे, विषारी साप विंचू अशा प्राण्यांना तोंड देत जीव मुठीत धरून शेतीला पानी करावे लागत आहे. शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता २४ तास विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा या मागणीसाठी वरोरा तालुक्यातील येरखेडा, गिरोला, चिमूर तालुक्यातील सावरी, माकोना खानगांव, गुजगव्हान येथील शेतक्यांसह डॉ सतिश वारजूकर  यांनी रास्तारोको ठीय्या आंदोलन केले. 


        जर २४ तासाच्या आत शेतकऱ्याना २४ तास विज पुरवठा सुरळीत झाला नाहीतर संपूर्ण शेतकरी व काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करनार असल्याचा इशारा चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्व्यक डॉ. सातिश वारजूकर व परिसरातील सर्व शेतकरी यांनी उपस्थित अभियंता सिंग यांना देण्यात आला. दरम्यान रास्तारोको आंदोलनामुळे अर्धा तास वाहतूक विस्कळीत झाली होती. शेगांव ठाणेदार अविनाश मेश्राम यांनी आंदोलनात मध्यस्ती करत शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवली. यावेळी चंद्रपूर जिल्हा कांग्रेस कमिटी सरचिटणीस गजाजन बुटके, तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. विजय गावंडे, जिल्हा परिषद माजी सभापती गुणवंत कारेकर, ग्रामपंचायत सरपंच सावरी लोकेश रामटेके, माजी सरपंच ठेपाले, मंगेश मेश्राम,गोलू रामटेके, आशिष खोब्रागडे, सौरभ बुटके,पंचम रामटेके, बंडू गायकवाड, संदीप माथनकर, पकढारी माथनकर,पंढरी माथनकर, नंदलाल शेंडे, ताराचंद पाटील, थकसेन पाटिल, रोशन खोब्रागडे, सुरेश निखाडे, व शेतकरी उपस्थित होते


PostImage

Chunnilal kudwe

Nov. 3, 2023

PostImage

Students died due to BJP booth chief's negligence - शेतातील कंपाउंड ला विद्यार्थ्याचा हात लागल्याने मृत्यु


 सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची पत्रकार परिषदेत काँग्रेसची मागणी
 

         नेहमी प्रमाणे सकाळी उठून काही विद्यार्थी गावाशेजारील शाळेजवळच्या परिसरात धावण्यासाठी गेले होते. यापैकी एका विध्यार्थीला शौच्छास लागली तो शेतात शौच्छास आटोपून आपल्या विद्यार्थी मित्राकडे येत असताना  शाळेजवळील शेतकऱ्याने आपल्या शेतात घरगुती मिटर वरून अवैध रित्या शेतातील कुंपनाला लावलेल्या जिवंत विद्यूत प्रवाहाला  मदनापूर येथील विद्यार्थी विष्णू विनोद कामडी वय ११ वर्ष यांचा अचानक हात लागल्याने विध्यार्थ्यांचा जाग्यावरच मृत्यु झाला. ते शेत भाजपा बुथ प्रमुख गोवर्धन रंदये यांचे असून हे प्रकरण आपल्यावर उलटल  म्हणून विद्यार्थ्यांचे प्रेत शाळे जवळील आवारात आनून ठेवल्याची माहीती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कार्यालयात गुरुवार ला पत्रकार परिषदेत दिली असून भाजपा बुथ प्रमुख गोवर्धन रंदये यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस पदाधिकार्यांनी पत्रकार परिषदेतुन केली आहे.


           मदनापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पाचवी मध्ये शिकत असलेला विध्यार्थी विष्णू विनोद कामडी आपल्या काही मित्रा सोबत नेहमी प्रमाणे गावाच्या बाहेर सकाळी फिरण्यासाठीसाठी गेला होता गोवर्धन रंदये यांनी शेतात घरच्या वीज मीटर वरून अवैधरित्या लावलेल्या ताराच्या कंपाऊंडला वीज प्रवाहाचा जबरदस्त झटका विद्यार्थी विष्णू ला लागला या प्रवाहाने विद्यार्थ्यांचा जागेवरच मृत्यू झाला. आपल्यावर हे प्रकरण अलगट येईल म्हणून भाजपा बुध प्रमुखाने विद्यार्थ्यांचे प्रेत शेताला लागुन असलेला जय लहरी जय मानव या शाळेच्या आवारात आनून ठेवले. बाकी विद्यार्थ्यांनी विष्णू कंपाऊंड ला चिपकल्याची माहिती विष्णूच्या घरच्या मंडळीना दिली .


          गावकर्‍यांनी घटनेची माहिती चिमूर पोलिस व चिमूर विज वितरण कंपनी यांना देण्यात आली. रंदये यांनी विज वितरण कंपनीला करंट कसा लावला याची माहिती काँग्रेस पदाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान चिमूर पोलिस व विज वितरण कंपनीने घटना स्थळाचा  पंचनामा केला. विज वितरण ने अवैद्य विज कनेक्शन विषयी कुठलीही कार्यवाही केली नसुन पोलीसांनी भाजपा बुथ प्रमुख गोवर्धन रंदये यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करन्यात यावा त्यांना आर्थिक मदत देन्यात यावी अशी मागणी पत्रकार परिषदेतुन केली आहे. पोलीसांनी व विज वितरण कपनी ने कार्यवाही न केल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा काँग्रेस पदाधीकारी यांनी दिला आहे. यावेळी पत्रकार परिषदेला कांग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गजानन बुटके, तालुका अध्यक्ष डॉ विजय गावंडे पाटील, शहर अध्यक्ष अविनाश अगडे, विनोद ढाकुंनकर, पप्पू शेख, सुभाष बन्सोड, रहेमान पठाण आदी उपस्थित होते


PostImage

Chunnilal kudwe

Nov. 2, 2023

PostImage

Vaireen became the mother of a newborn baby - नवजात अर्भक फेकले नालीत


बोडधा ( हेटी ) येथील घटना, अज्ञात माते विरुद्ध गुन्हा दाखल.


          मातृ देवो भव, आईसारखं दैवत साऱ्या जगतात नाही यासारख्या उक्तींनी आईची महानता ज्या भारतीय संस्कृतीमध्ये अनादी काळापासून वर्णन केली गेली आहे. त्याच भारतात मातृत्वाला कलंक लावणारी घटना चिमूर तालुक्यातील बोडधा ( हेटी ) गावात घडली या घटनेने गावात खळबळ उडाली असून त्या निर्दयी मातेविरुद्ध संताप व्यक्त करण्यात येत आहे. चिमूर शहरापासून सोळा किलोमीटर अंतरावर असलेल्या व भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोडधा ( हेटी ) हनुमान मंदीर येथील चौकातील नालीत एक नवजात अर्भक अज्ञात व्यक्तीने आणून  फेकल्याची घटना सायंकाळी पाच वाजता दरम्यान बुधवारला उघडकीस आली.
           
           

बोडधा ( हेटी )  येथील मंदिरा जवळील नालीत बुधवारला सकाळी काही नागरिकांना नऊ वाजता दरम्यान कुई, कुई,,, असा रडन्याचा आवज येत होता. मात्र हा आवज कुत्र्याच्या पिल्लाचा असेल म्हणून कुणी लक्ष दिले नाही. सायंकाळी एक महिला झाडझुड करुन  कचरा टाकण्यासाठी नालीकडे गेली असता तिला ते नवजात बाळ नालीत असल्याचे दिसले ही माहिती गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती दरम्यान पोलीस पाटील गडदे यांनी घटनेची माहिती भिसी पोलिसांना दिली. भिसी पोलीस घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून अर्भकाला चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केले. 

 दिवसभर नवजात अर्भक नालीत असल्याने मृत झाले असल्याचे डॉक्टरानी सांगितले, एक दिवसाचे फिमेल अर्भक असल्याने त्याचे पोस्टमार्टेम व्हिडीओ कमेऱ्यामध्ये फोरेन्सिक लॅब मध्ये करावे लागत असल्याने व ही व्यवस्था चिमूर येथे नसल्याने त्या अर्भकाला चंद्रपूर येथे पाठविण्यात आले.
भिसी पोलिसांनी भादवी ३१७ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार प्रकाश राऊत यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक सचिन जंगम करीत आहेत
--------------------------------
नवजात अर्भक हे साधारणता आठ ते नऊ महिन्याचे असून या अर्भकाचे वजन २ किलो १०० ग्राम आहे अर्भकाची उत्तरीय तपासणी करण्यासाठी वेगळी कमिटी आहे त्यामुळे हे अभ्रक चंद्रपूर येथे फोरेन्सिक लॅब मध्ये पाठविण्यात आले आहे.


  डॉ. आनंद किन्नाके
वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, चिमूर


PostImage

Chunnilal kudwe

Oct. 31, 2023

PostImage

Tathagata's Dhamma for a successful life - यशस्वी मार्ग शोधन्याकरिता तथागताचा धम्म - आशिक रामटेके


मालेवाडा जेतवन बुद्ध विहारात अशोका विजयादशमी


             जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे "अशोका विजयादशमी दिनाच्या" कार्यक्रम प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना बौद्ध पंच कमेटी, मालेवाडा चे सचिव आशिक रामटेके म्हणाले की, सद्याची जागतिक युद्धजन्य परिस्थिती, धर्मांधतेला आलेला उत, तरुणाईची व्यसनाधीनता व नैराश्याकडे होत असलेली वाटचाल अशी एकंदरीत परिस्थिती बघता यातून जीवनाचा यशस्वी मार्ग शोधण्याकरिता तथागताच्या धम्म शिकवणीशिवाय पर्याय नाही.


          बौद्ध धम्मातील महत्वपूर्ण प्रसंग व उत्सव हा धम्माचा सांस्कृतिक वारसा असून तो जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य व काळाची गरज आहे. याप्रसंगी तथागत बुद्ध, प्रियदर्शी सम्राट अशोक, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांचे हस्ते अभिवादन करुन सामूहिक त्रिशरण- पंचशील घेण्यात आले. अशोक विजया दशमी बौद्ध धम्मीयांचा पुजनीय व पवित्र सण शुभ व मंगल दिन, मानवांच्या दुःखमुक्तीचा दिवस, धम्मविजयाचा आदर्श दिवस, बौद्ध साहित्यामध्ये सर्वात मोठे महत्त्व असलेला दिवस, एक आदरणीय व अनुकरणीय दिवस, समता, स्वातंत्र्यता, बंधुता व मैत्रीच्या संगमाचा दिवस, असत्यावर सत्याचा विजय दिवस, क्रूरतेवर व पशुतेवर सत्धम्माचा विजय दिवशी यावेळी गंगाधर गजभिये, ईश्वर ठवरे, मारोती बहादुरे, भाऊराव गजभिये, दादाजी रामटेके, प्रदीप मेश्राम, विलास मेश्राम, राजेंद्र गजभिये, योगेश मेश्राम,निलेश मेश्राम,प्रशिक बहादुरे ,आयु. भिमाबाई गजभिये, काजल ठवरे, वंदना मेश्राम, रत्नमाला भिमटे, संघमित्रा मेश्राम, सुनंदा रामटेके, विद्या रामटेके, शोभा चव्हाण, शोभा गजभिये, सत्यफुला चव्हाण, शांताबाई रामटेके, भावना शेंडे, आदी मान्यवर व समाज बांधव उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Oct. 30, 2023

PostImage

Other dances including garba dance - उद्याला शहरातील युवक - युवती थिरकणार गरबा नृत्यासह इतर नृत्यात


चिमूर नगर परिषद चे आयोजन शक्ती महोत्सव निमीत्य सांस्कृतीक कार्यक्रम

.....................



स्थानिक आमदार विकास निधी कार्यक्रम अंतर्गत चिमूर नगर परिषदेच्या वतीने दोन दिवसीय विविध सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन नेहरु विद्यालयाच्या प्रांगणात दिनांक 31 ऑक्टोंबर ते 1 नोव्हेंबर पर्यत सायंकाळी 7 वाजता आयोजीत केला आहे. त्यामुळे शहरातील युवक - युवती गरबा नृत्यासह इतर नृत्यात थिरकणार आहे .


       युवक युवतीच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या करीता प्रथमतःच सांस्कृतीक कार्यक्रमाकरीता निधी मंजुर करण्यात आला आहे. यादोन दिवसीय सांस्कृतीक कार्यक्रमात गरबा नृत्य व इतर नृत्य प्रकारच्या खुला स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष व उदघाटक आमदार किर्तीकुमार भांगडिया राहनार असुन त्यांच्याच हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषीक देन्यात येनार आहे. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभाग दर्शवावा असे आवाहन चिमूर नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी यांनी केले आहे.


PostImage

Chunnilal kudwe

Oct. 29, 2023

PostImage

Protection of the Constitution - संविधानाचे संरक्षण झाले तर डॉ. बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत निर्माण होईल


वडाळा पैकू येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

        भारतीय बौद्ध महासभा वडाळा पैकू शाखेच्या वतीने ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन लूंबिनी बुद्धविहार, वडाळा पैकू येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा वडाळा पैकू शाखेचे अध्यक्ष गुलाबराव गणवीर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ओबीसी विचारवंत प्रभाकर पिसे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश डांगे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संघटक नारायण कांबळे,दयाराम रामटेके उपस्थित होते.दयाराम रामटेके यांचे हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. तथागत गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना माल्यार्पण करण्यात आले.

        प्रमुख मार्गदर्शक सुरेश डांगे म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साऱ्या जगाला हेवा वाटेल असे संविधान भारताला दिले आहे. हे संविधान आता धोक्यात आले आहे. सर्वांगसुंदर असे हे संविधान वाचवायची आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्याचे संरक्षण करणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. ते आपण पार पाळले पाहिजे. संविधानाच्या संरक्षणासोबतच संविधान घराघरात जाणे आवश्यक आहे. त्यासाठी संविधानाचा प्रचार आणि प्रसार आपण सर्वांनी केला पाहिजे. संविधानाचे संरक्षण झाले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेले धम्मचक्र गतिमान होत राहील आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत निर्माण होईल. सध्या शिक्षणापासून बहुजन समाजाला वंचित ठेवण्याचा डाव शासनाचा आहे. तो डाव सर्वांनी एकत्र येऊन हाणून पाडायला हवा. ज्या शिक्षणासाठी महात्मा फुले, सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या रक्ताचे पाणी केले आणि शिक्षणाने पुरोगामी महाराष्ट्र घडवला. त्याच पुरोगामी महाराष्ट्रात शिक्षण संपवून बहुजन समाजाला गुलामगिरीच्या खाईत लोटण्याचे कुटील कारस्थान उलथवून टाकण्याचे आवाहनही यावेळी केले.


     प्रमुख मार्गदर्शक प्रभाकर पिसे यांनी वाईट रुठी,परंपरा फेकल्याशिवाय कोणत्याही समाजाची प्रगती होत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले धर्मांतर ऐतिहासिक आहे. त्यांनी केलेली ही मोठी क्रांती आहे. याच क्रांतीच्या माध्यमातून बौद्ध समाज आज प्रगतीच्या वाटा चालत आहे. या समाजापासून ओबीसी बांधवांनी खूप शिकण्यासारखे आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच आपण ताठ मानेने जगत असल्याचे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषण गुलाबराव गणवीर यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन शिवराम मेश्राम यांनी केले. प्रास्ताविक गिरीधर घोनमोडे यांनी केले. आभार भाऊराव साळवे यांनी मानले. कार्यक्रमाला बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


PostImage

Chunnilal kudwe

Oct. 29, 2023

PostImage

Mungantiwar's initiative - जिल्ह्यात होनार नविन बावन्न तलाठी कार्यालय


पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे 18 कोटी 19 लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता

 ग्रामीण भागात नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच गावपातळीवरील प्रशासकीय कारभार उत्तम रितीने चालावा, यासाठी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष पुढाकारामुळे जिल्ह्यात बावन्न नवीन तलाठी कार्यालयाची निर्मिती होणार आहे. त्यासाठी विशेष बाब म्हणून 18 कोटी 19 लक्ष 24 हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. याबाबत महसूल व वनविभागाने 17 ऑक्टोबर 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.

चंद्रपूर हा नक्षलग्रस्त आणि दुर्गम भाग असल्याने तेथील गावांमध्ये प्रशासकीय कामकाम उत्तमरित्या चालावे, गावातील नागरिकांना आवश्यक असलेले महत्वाचे दाखले, कृषीविषयक नोंदी / कागदपत्रे वेळेत मिळावेत, यासाठी नवीन तलाठी कार्यालयांची आवश्यकता होती. याबाबत प्रशासनाकडून सुरवातीला 7 कोटी 80 लक्ष रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र कर्मचा-यांच्या निवासस्थानासह तलाठी कार्यालयाची निर्मिती करण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला सुचना केल्या. त्यानुसार विशेष बाब म्हणून 18 कोटी 19 लक्ष 24 हजार रुपयांचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात आला. राज्य शासनाने या प्रस्तावाला नुकतीच मंजूरी दिली असून नवीन तलाठी कार्यालय व कर्मचा-यांच्या निवासस्थानाचा मार्ग मोकळा झाला आहे. यात पोंभुर्णा तालुक्यात 11, चंद्रपूर तालुक्यात 6, बल्लारपूर तालुक्यात 7 आणि मुल तालुक्यात 28 असे एकूण 52 नवीन तलाठी कार्यालये उभारण्यात येणार आहे.

गावपातळीवरील राज्य शासनाचा महत्वाचा घटक म्हणून तलाठ्यांकडे अनेक प्रशासकीय कामे सोपविण्यात आली आहेत. यात गावपातळीवरील 21 गाव नमुने तयार करणे, ते अद्ययावत करणे, वारसान नोंदी घेणे, खरेदी-विक्री व्यवहारानुसार सातबारावर फेरफार नोंदी घेणे, नैसर्गिक आपत्तीच्या काळात नुकसानीचे पंचनामे करणे, नागरिकांना नुकसान भरपाईबाबत प्रक्रिया राबविणे, त्याचा अहवाल शासनाकडे सादर करणे, रहिवासी व उत्पनाचा दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्र नागरिकांना उपलब्ध करून देणे, गावाची पैसेवारी निश्चित करणे, पीक कापणी प्रयोग, ई-पीक पाहणी आदी महत्वाच्या उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, कृषी गणना करणे, सातबारा वाटप करणे, ऑनलाईन सातबारा नागरिकांना उपलब्ध करून देणे आदी महत्वाच्या कामामुळेच तलाठी हा गावपातळीवरील प्रशासनाचा मुख्य कणा मानला जातो.

....................................................

या ठिकाणी होणार नवीन तलाठी कार्यालये -

पोंभुर्णा तालुक्यातील वेळवामाल, चेकबल्लारपूर, डोंगरहळदी, उमरी पोतदार, घोसरी, देवाडा (बुर्ज), देवाडा (खुर्द), नवेगाव मोरे, जाम तुकुम, फुटाना मोकासा आणि चेक ठाणेवासना. चंद्रपूर तालुक्यातील अजयपूर, पिंपळखुट, जुनोना, पद्मापूर, बोर्डा, दुर्गापूर चांदा रयतवारी. बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव, मानोरा, कवडजाई, कळमना, विसापूर, कोठारी, बामणी, मूल तालुक्यातील मरेगाव, भादुर्णी, उश्राळाचक, केळझर, राजगड, पिपिरी दीक्षित, भेजगाव, चिंचाळा, सुशी दाबगाव, ताडाळा, नांदगाव, मूल, राजोली, नवेगाव, कोसंबी, कांतापेठ (रै), चिरोली, गडीसुर्ला, बोंडाळा (भुज), मारोडा, चिखली माल, चिमढा, हळदी गावगन्ना, बोरचांदली, सिंताळा, जुनासुर्ला, बेलघाटा माल आणि डोंगरगाव येथे नवीन तलाठी कार्यालय निर्माण होणार आहे.


PostImage

Chunnilal kudwe

Oct. 28, 2023

PostImage

The controversy of the tourist gypsy - वादग्रस्त जिप्सीचा ठराव नामंजूर करण्यात आला


पोलीस संरक्षणात पार पडली ग्रामसभा

कोलारा ग्रामपंचायत येथील प्रकार -

       अवैध जिप्सी ठराव तो वादग्रस्त ठराव नाममंजुर करण्यासाठी ग्रामस्तनांनी ग्रामपंचायतीला कुलुप लावले. व तीसऱ्या दिवसी तोडगा न निघल्यांने पोलीस संरक्षणात कुलुप तोडले व ग्रामसेवकांनी २७ ऑक्टोबर शुक्रवारला विशेष ग्रामसभा ग्राम पंचायत आवारात पार पडली. त्या ग्रामसभेत अखेर तो वादग्रस्त ठराव नाममंजुर करन्यात आला.


            कोलारा ग्रामपंचायतीत गावकर्यांनी ग्राम सभेचे आयोजन १४ ऑक्टोबरला केले होते या ग्रामसभेत सरपंच सदस्य आले नव्हते त्यामुळे गावकर्यांनी रात्रो १० वाजता ग्रामपंचायत ला  कुलुप लावले. दरम्यान ग्रामसेवकांनी तीन दिवसांनी पोलीस संरक्षणात कुलुप तोडले. व ग्रामसेवकाने ग्रामसभेची नोटीस काढून शुक्रवार ला त्या जिप्सीच्या वादग्रस्त ठरावाविषयी ग्रामसभेचे आयोजन केले. ग्रामसभेला गावातील महिला, पुरुष उपस्थित होते. ग्रामभेला दोन विषय ठेवण्यात आले होते. कोलारा येथील डिजीटल गेट बाजुला नेण्यात यावा. परंतु वन विभागाने त्यावर तोडगा काढून शेतकऱ्यांना गेटच्या बाजुला रस्ता काढून देण्याचे आवश्वान दिले. त्यामुळे तो विषय एकमतांनी मंजुर करण्यात आला. परंतु चार जिप्सी गेटवर लावण्याचा  वादग्रस्त विषय घेताच गावकऱ्यांत संतापून ग्रामस्तांच्या एकमतांनी तो वादग्रस्त ठराव नामंजूर करण्यात आला. या गेट वर जिप्सी घेतांना विशेष ग्रामसभेचे आयोजन करूनच व ईश्वरचिठ्ठीनेच पुर्वीच्या पद्धतीनेच निवड करण्यात यावा. असाही ठराव मंजुर करण्यात आला. ग्रामसभेला ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य ,वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.


          ग्रामसभेच्या दिवशी गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. व गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठाणेदार मनोज गभने यांच्या मार्गदर्शनात पोलीसांचे दंगा पथक, पोलीसांची कुमक गावात तैनात करण्यात आली होती.


PostImage

Chunnilal kudwe

Oct. 28, 2023

PostImage

Various problems in Nagar Panchayat ward - भिसी येथील विवीध समस्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सरसावली


विवीध समस्याचे नगर पंचायत मुख्याधीकारी यांना निवेदन

             भिसी नगर पंचायत होवून अनेक वर्ष झालीत अजूनही भिसी वासीयांच्या समस्या जैसे थे आहे. येथील नागरिक अनेक समस्यांनी ग्रस्त आहेत अनेकदा पाठपुरावा करूनही नगर पंचायतचे दुर्लक्ष होत आहे. त्यामूळे शुक्रवार ला राष्ट्रवादी काँग्रेस चिमूर विधानसभा अध्यक्ष अरविंद रेवतकर, विधान सभेच्या महिला आघाडी अध्यक्ष अविशा रोकडे व अरविंद रेवतकर मित्र परिवारांने  नगरपंचायत मुख्याधीकारी यांना विवीध समस्याचे निवेदन देन्यात आले.

       प्रभाग क्रमांक ३ मध्ये व इतर प्रभागामध्ये नागरीक मागील ६० ते ७० वर्षापासून आबादी जागेंवर कच्चे व पक्के मकान बांधून राहात आहे. त्यांना रहिवासी वहिवाट घरगुती जागा नियमानुकूल करून  कायम स्वरूपी मालकी हक्क पट्टे देण्यात यावे, नवीन नळ कनेक्शन जोडणी व गरजू नागरिकांना नळ कनेक्शन देणे, प्रभागातील ज्या इलेक्ट्रीक पोलवर लाईट नाही. त्या ठिकाणी लाईट लावने, तुटलेल्यानाल्यावरील छोट्या पुलांचे व इतर पुनर्रबांधकाम करणे, नाली बांधकाम व रस्ता बांधकाम करणे आदी मागण्यांचा  निवेदनात समावेश आहे.

        निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पेंटर जगत, विजय नवले, अक्षय नागपूरे, अक्षय खवसे, देवीदास घुटके, सुनील तांबे, चेतन पडोळे, पंकज रेवतकर, शैलेश आजवनकर, शैलेश बावणे व इतर समस्या ग्रस्त महिला , पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Oct. 28, 2023

PostImage

Snake bite - मृतक शेतकऱ्यांच्या परिवारासोबत डॉ सतिश वारजूकर


वहानगांव येथील मृतक परिवारांची सांत्वन भेट

 
शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे   शेतकऱ्यांचे मृत्युचे प्रमाण वाढत आहे. एकीकडे शासन शेतकऱ्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी योजना देत आहे तर दुसरीकडे पाणी पुरवठा करण्यासाठी दिवसभरात विज पुरवठा न करता शेतकऱ्याला रात्री विज पुरवठा करत आहे.  रात्रीच्या वेळेला शेतात पाणी करणे म्हणजे जीव धोक्यात घालन्याचा प्रकार आहे. असाच प्रकार तालुक्यातील वाहनगांव येथील शेतकरी नितीन रामचंद्र जुगनाके वय ३१ वर्ष हे दिनांक २३ ऑक्टोबर सोमवार ला रात्री  ११ वाजताच्या दरम्यान शेतात पिकाला पाणी करण्यासाठी गेले होते त्यांच्या पायाला सर्पाने दंश केला असता त्याचा मृत्यु झाला. या घटनेची माहिती होताच वहानगांवातील शेतकऱ्यांच्या घरी भेट देत परिवाराचे सांत्वन करत मृतक शेतकऱ्यांच्या परिवारासोबत असल्याचे चिमूर विधान सभा क्षेत्राचे समन्वयक तथा महाराष्ट्र प्रदेश ओबीसी महासंघचे उपाध्यक्ष डॉ सतिश वारजूकर यांनी सांगीतले.

मृतक नितीन आणि मंगेश दोन्ही भाऊ शेतात पाणि करत होते. मृतकाला सर्प दंश झाल्याचे लक्षात येताच नितीन ने सोबत असलेले मोठे बंधू मंगेश जुमनाके याना सांगितले कसेबसे ते घरी परत आले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना लगेच उपचारासाठी चिमूर येथील उपजिल्हाला रुग्णालयात दाखल केले. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. यावेळी मृतकांच्या घरी भेट देतांना कांग्रेस नेते कमलसिंग अंधरीले, युवक कांग्रेस अध्यक्ष नागेद्र चट्टे, कांग्रेस कार्यकर्ते रुपचंद शाश्त्रकार, सरपंच प्रशांत कोल्हे, स्वप्नील मुंगले, इरफान पठाण,ग्यानसिंग अंधरीले, डोमाजी थुटे, प्रमोद दोडके,  ज्ञानकसिंग अंधरीले, सजीत सब्जीत सिंग अंधरिले, अरुण मसराम आदी उपस्थित होते,


PostImage

Chunnilal kudwe

Oct. 27, 2023

PostImage

Caste abuse to Medical Superintendent - वैद्यकीय अधिक्षकाला अश्लिल जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या प्रशांत कोल्हे वर कार्यवाही करा


 अनुसुचित जाती व जमातीच्या विवीध सघटनां झाल्या आक्रमक - 

उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ आनंद किन्नाके कर्तव्यावर असताना शुक्रवार दिनांक २० ऑक्टोबर ४. १५ वाजता  वहानगांव येथील प्रशांत कोल्हे हे प्रशासनाची कोनतीही परवानगी न घेता विनाकारण ओपीडी वेळेमध्ये रुग्णालयाच्या आतमध्ये डॉक्टर सेवा देत असलेल्या ठिकाणी येत असताना मोबाईल व्दारे विडीयो करत कर्तव्यावर हजर असलेल्या स्त्रि सुरक्षा रक्षक यांना धक्का बुक्की करत शिवीगाळ देत छेडछाड करण्याचा प्रयत्न करित होते. दरम्यान डॉक्टर सेवा देत असलेल्या रुग्ण खोली मध्ये जोर जबरदस्तीने प्रवेश करून अति महत्वाच्या रुग्ण सेवेत बाधा व डॉक्टर रुग्णावर हुज्जत घालून दहशत निर्माण केली. तु माजला का गोंडाळ्या अशा जातिवाचक बोलून अश्लिल शिव्या देत तु कशी नौकरी करते पाहून घेईल अशी धमकी दिली असल्याची माहिती गुरुवार ला अनुसुचित जाती, जमातीच्या विवीध संघटनाच्या पदाधीकाऱ्यांनी आयोजीत पत्रकार परिषदेत दिली.

डॉ आनंद किन्नाके यांनी चार महीन्यापूर्वी वैद्यकीय अधिक्षक पदाचा प्रभार घेतला तेव्हा पासुन उप जिल्हा रुग्णालयातील ओपीडीत रुग्णांची वाढ झाली आहे. याठीकाणी सर्व प्रकारच्या शस्त्रक्रीया होत असातत त्यामध्ये प्रामुख्याने प्रसुति सिजर हायड्रोशील हर्निया अपेन्डिक्स व हिस्टोकटॉमी व कुंटूब कल्याण शत्रक्रीया होतात. त्यामध्ये डॉ किन्हाके हे स्वतः कुंटूब कल्याण शत्रक्रीया हायड्रोशील हर्निया एमटीपी व इतर शत्रक्रिया करीत असतात. व इतर सोयी सुविधा पुरवितात गरजू रुग्णांना चौवीस तास सेवा देत असल्यामूळे रुग्णांना फायदा होत आहे. या रुग्णालयांत आदिवासी समाजाचा डॉक्टर असल्याने जातीवाचक समाज कंटकाला खटकत आहे. कोल्हे यांच्यावर चिमूर - शेगांव येथे विवीध प्रकारचे अनेक गुन्हे दाखल असून त्यांना काही दिवसासाठी जिल्हाबंदी केल्याची माहिती आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही पक्षांना समजावले मात्र प्रशांत कोल्हे समजण्याच्या मनस्तीतीत नव्हते. दरम्यान पुन्हा प्रशांत कोल्हे विनाकारण समाज माध्यमावर डॉ किन्नाके व आरोग्य सेवेची बदनामीकारक पोष्ट टाकत मानहानी करत आहे. या प्रकरणामूळे रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी यांच्यात भिती निर्माण झाली आहे. डॉ किन्नाके यांना जातीवाचक अश्लिल शिवीगाळ स्त्री सुरक्षा रक्षकाला धक्का बुक्की आरोग्य सेवेत बाधा आनने अशा प्रकारच्या असविधानीक वक्तव्य करनाऱ्या प्रशांत कोल्हे वर कायदेशीर कार्यवाही करून अटक करण्याची मागणी अनुसुचित जाती, जमातीच्या विवीध संघटनांच्या पदाधिकारी , नागरीकांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. दरम्यान गुरुवारला पोलीस निरिक्षक व उपविभागीय अधिकारी यांना संघटनेने निवेदण दिले.सात दिवसाच्या आत  कार्यवाही न झाल्यास सर्व संघटना रस्त्यावर उतरेल असा इशाराही देन्यात आला.

 पत्रकार परिषदेला ऑल इंडीया अदिवासी फेडरेशन चंद्रपूर कार्याध्यक्ष सुरेश तोरे, जागतिक गोंड सगा मांदि शाखा चिमूर अध्यक्ष मनोजसिंह गोंड मडावी, जनसेवा गोंडवाना पार्टी शाखा चंद्रपूर विधानसभा चिमूर ब्रम्हपुरी अध्यक्ष प्रल्हाद पत्रु उईके (नवतळा), भिम आर्मी संविधान रक्षक दल महाराष्ट्र अध्यक्ष जगदीश मेश्राम, गोंडवाना गणतंत्र पार्टी चंद्रपूर अध्यक्ष दिपक गोंड कुमरे, गोंडवाना युवा जंगोम दल- चिमूर चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख नंदू मडावी, भिम आर्मी संघटना सिंदेवाही अध्यक्ष- तेजस वानखेडे, जनसेवा गोंडवाना पार्टी शाखा जामनी अध्यक्ष- नानाजी उईके, आफ्रोट संघटना शाखा चिमूर अध्यक्ष प्रकाश कोडापे, ऑल इंडिया पॅन्थर सेना चिमूर ता. अध्यक्ष आशिष बोरकर, विकास मसराम, मंथन थुटे, सुरज रामटेके, विक्की वलके, नंदू मडावी, राधेश्याम मसराम, प्रियंका मले, बाळकृष्ण थुटे, वर्धन थुटे, गोंडवाना गणतंत्र पार्टी सिंदेवाही अध्यक्ष वाल्मिक जुमनाके, उपाध्यक्ष विनोद कोटनाके यांसह बरेच वाहानगाव वासीय नागरिक उपस्थित होते.

निवेदनाच्या प्रतिलिपी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म. रा. मुंबई, देवेन्द्र फडनविस उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री म.रा. मुंबई, डॉ.तानाजी सावंत सार्वजनिक आरोग्य मंत्री म. रा. मुंबई, सुधीर मुनगंटीवार पालक मंत्री चंद्रपूर, अशोक नेते खासदार चिमुर-गडचिरोली लोकसभा क्षेत्र, बंटी भांगडिया आमदार  चिमुर-नागभीड विधानसभा क्षेत्र, जिल्हाधिकारी, चंद्रपूर, पोलीस अधिक्षक, चंद्रपूर, जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय, चंद्रपूर, राकेश जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी चिमुर, प्राजक्ता बुरांडे तहसिलदार चिमुर यांना पाठविल्या आहे.
.........................
विवीध संघटनाचे निवेदण मिळाले आहे. सदर प्रकरण चौकशीत आहे

मनोज गभणे
पोलीस निरिक्षक, पोलीस स्टेशन चिमूर


PostImage

Chunnilal kudwe

Oct. 25, 2023

PostImage

Thiya agitation against MSEB - बारा तास विजेच्या मागणीसाठी उप जिल्हा रुग्णालयात ठिय्या


शेतात पाणी करण्यासाठी गेलेल्या युवकाचा सर्प दंशाने मृत्यु


- अखेर वहाणगांव वासीयांच्या आंदोलणाला यश

          शेतीत पाणि करण्यासाठी गेलेल्या शेतकरी युवकांचा सोमवारच्या रात्री सर्प दंशाने मृत्यु झाला. मृतक शेतकर्यांचे नाव नितीन रामचंद्र जुमनाके असुन वहानगांव येथील रहिवासी आहे. दरम्यान मृतकाचा परिवार व गावकऱ्यांनी शेतात बारा तास विज पुरवठा करण्याच्या मागणीसाठी शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रशांत कोल्हे यांच्या नेतृत्वात शेतकर्यांनी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे मंगळवार ला ठिय्या आंदोलन केले होते.


       दिवसा सिंगल फेज रात्री नाहीच्या बरोबर लाईट कधी लाईट आली तर येते नाही तर  रात्रभर लाईट बंद असते. शेताला पाणि करण्याच्या दृष्टीकोनातून सोमवार ला आपल्या गावा सेजारील शेतात नितीन पाणि करायला गेला होता. त्यातच शेतात सर्प दंशाने त्याचा मृत्यु झाला मृतक माझी सरपंच कलाबाई जुमनाके यांचा मुलगा आहे. हल्ली या विज वितरण कंपणीच्या जाचाला शेतकरी कंटाळले असुन शेतकऱ्यांत विज वितरण कंपनी विषयी रोष निर्माण झाला आहे. गावात दसरा, दुर्गा उत्सव असताना नितीनच्या मृत्युने गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. दरम्यान गावकरी व मृतकाच्या परिवाराने शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रशांत कोल्हे याच्या नेतृत्वात चिमूर येथील एमएसईबी कार्यालयातील अधिकार्याला जाब विचारन्याच्या दृष्टीकोनातुन मृतकाचे प्रेत एमएसईबी कार्यालयात नेवून ठिय्या देण्याचे ठरवीले होते मात्र पोलीसानी या आंदोलनाला नकार दिला होता त्यामुळे उप जिल्हा रुग्णालय येथेच ठिय्या आंदोलन सुरु केले होते. नंतर चिमूरचे पोलीस निरीक्षक मनोज गभने यांनी मध्यस्ती करत एमएसईबी अधिकार्‍यांना उपजिल्हा रुग्णालय येथे बोलवून बारा तास शेतात विज विषयी शेतकर्यांच्या मागणीचा तोडगा काढला. 

          अखेर आंदोलनाला यश आले. दिवसाला बारा तास विज पुरवठा करन्याची मागणी मंजूर झाल्यामुळे ठिय्या आंदोलन मागे घेन्यात आले. आंदोलणात अमर रहे , अमर रहे नितीन जूमनाके अमर रहे. जय जवान जय किसान अशा घोषणा शेतकरी बांधवानी दिल्या होत्या .


PostImage

Chunnilal kudwe

Oct. 25, 2023

PostImage

"Kirtan" is an effective medium of entertainment - समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम " किर्तन " - डॉ सतिश वारजूकर



- नेरी येथील शिवशक्ती दुर्गा उत्सवाच्या सप्तखंजरी वादक कार्यक्रमात किर्तन


         किर्तन हि कला मराठी साहित्यातील संत, पंत, व तंत या तिन्ही प्रवाहामध्ये महत्वाची मानली जाते. अलीकडच्या काळात पंडित, शाहीर, कवी हे एक प्रकारे किर्तनकारच होते. याच किर्तनाच्या माध्यमातुन अनेक काव्याची निर्मीती व साहित्याचा प्रसार आणि प्रचार झाला. कलात्मक किर्तनाच्या माध्यमातुन समाजाभिमुख सुधारक संतानी जन जागृती व आत्म जागृतीचे कार्य केले. किर्तनासारखे लोक जागृतीचे दुसरे कोणतेही प्रभावी माध्यम नाही. त्यामुळे मनोरंजनासह जिवणमुल्य व समाज प्रबोधनाचा प्रसार करणारे प्रभावी माध्यम " किर्तन" असल्याचे डॉ सतिश वारजूकर यांनी सांगीतले.


      ते नेरी येथिल शिवशक्ती दुर्गोत्सव कमिटी व्दारा नवरात्र दुर्गोत्सव निमित्त श्री शंकर देवस्थान येथे सप्तखंजरी वादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य इंजिनीयर पवण दवंडे महाराज यांचा सोमवार ला जाहीर किर्तनाचा कार्यक्रम आयोजीत करन्यात आला होता किर्तन कार्यक्रमाच्या उद्दघाटनाप्रसंगी भाविकांना प्रतिपादन करताना चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक तथा महाराष्ट्र प्रदेश ओबीसी महासंघ उपाध्यक्ष डॉ सतिश वारजूकर बोलत होते.

 यावेळी ग्राम पंचायत सरपंच रेखा पिसे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सेवादल महासचिव प्रा. राम राऊत, तालूका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ विजय गावंडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष संजय डोंगरे, सामाजिक कार्यकर्ते कमलाकर लोणकर, अशासकीय सदस्य नवोदय विद्यालय डॉ श्याम हटवादे, गुरुदेव सेवा मंडळ तालूका प्रचारक घनश्याम चाफले, माजी सभापती लता पिसे, नेरी शिरपूर जिल्हा परिषद सर्कल प्रमुख विलास पिसे, गुरुदेव नागरी सहकारी पत संस्थाचे अध्यक्ष प्रशांत पिसे, शहर महिला अध्यक्ष भावणा पिसे, सामाजीक कार्यकर्त्या दुर्गा वैरागडे, इंदिरा वैरागडे, रुपचंद चौधरी, राजू पिसे, सिताराम जिवतोडे, गिरीधर वांढरे, घनश्याम मोहितकर, अक्रम शेख, अनिकेत जिवतोडे, वैभव चौधरी, आशिष दडमल, कनय्यासिंग भोंड आदी मान्यवर उपस्थित होते.

          पूढे बोलताना वारजूकर म्हणाले की,मौखिक परंपरेने चालत आलेली शब्दरूपी कला म्हणून कीर्तन या प्रकाराकडे पाहिले जात असले तरी भक्ती, भावनां व प्रबोधनाचा  दुसरा प्रकार म्हणूनही कीर्तनाची ओळख आहे. केवळ परमार्थिक अधिष्ठान या किर्तन कला या प्रकाराला लाभले असले तरी या कलेच्या प्रायोगिक व कलात्मक किर्तनाकडे दुर्लक्ष झालेले दिसते. कीर्तन हा सामूहिक भक्तीचा जागर आहे त्याची नाळ संगीत, नाट्य नृत्य, साहित्य, वक्तृत्व या कलेत जुळलेली आहे. पूर्वीच्या काळात लोकशिक्षण साहित्य व समाजप्रबोधनाचे प्रभावी कार्य  कीर्तन या कलेनींच केले असल्याचे बोलत होते. दरम्यान कार्यक्रमाला बहुसंख्य भावीक भक्तांची उपस्थिती होती.


PostImage

Chunnilal kudwe

Oct. 23, 2023

PostImage

Victory for Congress - आगामी निवडणूकीत विजय काँग्रेसचाच - विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार


  •  ब्रम्हपूरी येथे जुनी पेन्शन योजना कर्मचारी संघटनेचा मेळावा 

- कार्यक्रमात वडेट्टीवारांना राखी बांधून ओवाळनीत जुनी पेन्शन योजना लागू करण्याची विनंती 

विद्यमान शिंदे-भाजप सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. या सरकारने घेतलेले अनेक निर्णय हे चुकीचे होते. कंत्राटी नोकरभरतीचा शासन निर्णय काढून त्याचे कंत्राट ज्या नऊ कंपन्यांना देण्यात आले होते. त्या कंपन्या सत्तेतील लोकांच्या होत्या. ह्या कंत्राटी नोकरभरतीला मी तीव्र विरोध केला आणि मुद्दा शेवटपर्यंत लावून धरला आणि तो निर्णय मागे घ्यायला सरकारला भाग पाडला. मात्र आगामी निवडणुकांमध्ये विजय हा काँग्रेसचाच होनार असल्याचे सुतोवात राज्याचे विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार जुनी पेन्शन योजना मेळाव्याला संबोधीत करताना बोलत होते. 


        जुनी पेन्शन योजना कर्मचारी संघटनेच्या वतीने ब्रम्हपूरी येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात उपस्थीत जुनी पेन्शन योजना महिला कर्मचारी पदाधीकारी यांनी राज्याचे विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार यांना कार्यक्रमात राखी बांधून ओवाळणीत जुनी पेन्शन योजना लागु करन्याची विनंती केली आहे

     यावेळी मंचावर शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबाले, जुनी पेंशन  संघटना राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, राज्य कार्याध्यक्ष आशुतोष चौधरी, राज्य सल्लागार सुनिल दूधे, राज्य महीला उपाध्यक्ष मनिषा मडावी, विभागीय अध्यक्ष अनिल वाकडे, विभागीय उपाध्यक्ष दुशांत निमकर, विपीन धाबेकर, गुरुदेव नवघडे, मनिष वैरागडे, राकेश शेंडे, गुलाब लाडे यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

     पूढे बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, पेन्शन योजना लागू करावी ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. ह्या मागणीच्या संदर्भाने आम्ही पुर्णतः सकारात्मक असुन यासाठी माझा पाठींबा आहे. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी म्हणून स्पष्ट भुमिका जाहीर केली आहे. आगामी काळात राज्यात काँग्रेसची सत्ता येताच प्राधान्याने जुनी पेन्शन योजना लागू करणार.


PostImage

Chunnilal kudwe

Oct. 21, 2023

PostImage

Selection at State level - निवासी शाळेच्या विद्यार्थीनी पोहचल्या राज्यस्तरावर


चिमूर येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळेच्या विद्यार्थिनी भूमिका अभिनयात नागपूर विभागात प्रथम 


       नागपूर विभागात  सर्वोत्कृष्ट सादरीकरण करून चिमूर तालुक्यातील  अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा येथील विद्यार्थीनींनी राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प 2023-24 या कार्यक्रमांतर्गत नागपूर विभागीय स्तरावर इंटरनेटचा सुरक्षित वापर व साक्षरता मीडिया या विषयावर उत्कृष्ट भूमिका अभिनय सादर करुन नागपूर विभागात प्रथम क्रमांक पटकावला असल्यामूळे त्यांची राज्यस्तरावर निवड करण्यात आली.


      सदर विभागीय स्पर्धा हि गुरुवारला राज्य विज्ञान शिक्षण संस्था, (प्रादेशिक विद्या प्राधिकरण) रवीनगर, नागपूर येथे  पार पडली. यावेळी कार्यक्रमाचे  उद्घाटक  प्राचार्य डॉ. हर्षलता बुराडे, जेष्ठ अधिव्याख्याता डॉ. राजकुमार अवसरे, डॉ. गंगाधर वाळले, बुरघाटे, अधिव्याख्याता विभागप्रमुख डॉ. अपर्णा शंखदरबार, परीक्षक सीमा गोडबोले व सूचना भावसार आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान शमिका अभिनय सादरीकरणात प्रथम क्रमांक पटकविनाऱ्या चिमूर येथील अनुसुचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळेच्या विद्यार्थिनींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिल्ड व प्रमाणपत्र  देन्यात आले.
         तालुक्यात ही शाळा विविध उपक्रम राबवित असुन नानाविध  स्पर्धामध्ये सहभागी होत असते. नागपूर विभागातील एकुण सहा जिल्ह्यातील विद्यार्थी भूमिका अभिनय सादरीकरनासाठी सहभागी झाले होते. त्यापैकी  चिमूर येथील निवासी शाळेने नागपूर विभागात प्रथम क्रमांक मिळविला. या भूमिका अभिनय स्पर्धेत सहभागी विद्यार्थीनी  विभा गव्हारे. क्षिप्रा खोब्रागडे, आकांक्षा रामटेके,समृद्धी नागदेवते, खुशबू रामटेके यांनी  शाळेच्या मुख्याध्यापिका आणि मार्गदर्शिका सुनिता खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात व सहायक शिक्षक विनय खापर्डे यांच्या उपस्थित सादरीकरण करण्यात आले होते. नागपूर विभागात मोठी भरारी मारुन राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाल्यामुळे सहायक आयुक्त समाज कल्यान चंद्रपूर बाबासाहेब देशमुख, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूरचे प्राचार्य हिवारे , जि प माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, गटशिक्षणाधिकारी कांबळे, पंचायत समितीचे केंद्रप्रमुख महल्ले, सर्व पदाधिकारी आणि साधन व्यक्ती यांनी यांनी शाळेच्या  मुख्याध्यापक, शिक्षक व सहभागी विदयार्थीनींचे अभिनंदन केले.सदर स्पर्धेसाठी शाळेतील सर्व सहकारी वृंद सतीश कुकडे मनोहर गभने, अनुराधा महाजन , हेमुताई मगरे, धात्रक, आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली होती.


PostImage

Chunnilal kudwe

Oct. 20, 2023

PostImage

Shubham admitted Raju to the rehabilitation center - पंचेविस वर्षानंतर दखल


पूर्ण उपचारानंतर दिव्यवंदना फाऊंडेशन देनार आधार

 

       कोन कुठला काही पत्ता नाही कोनाला कवडीचा त्रास नसलेला बेवारस राजू चिमूरात कसा आला कळलेच नाही. पाहता पाहता पंचेविस वर्ष झाली कोनीच त्यांच्या आरोग्याची व पुर्नवसनाची दखल घेतली नाही. मिळेल ते खाने आणि आपल्या रोजच्या ठिकाणी राहने एवढेच होते. अशातच चिमूर क्रांतीभूमीचे सुपूत्र शुभम पसारकर यांच्या नजरेस राजू दिसला. त्यांच्यासोबत मैत्री करत वार्तालाप केला. तो हिंदी व्यतीरिक्त इतर भाषा बोलत असताना आढळला क्षणातच चांगला तर क्षणातच वाईट बोलत होता. बोलन्यावरून राजू मनोरुग्ण असल्याचा भास होत असताना त्याला सक्त उपचाराची गरज असल्याचे लक्षात येताच दिव्यवंदना आधार फाऊंडेशन चे अध्यक्ष शुभम ने बेवारस राजू ला नागपूर येथील  पूर्नवसन केंद्रात दाखल केले.

             राजू जेव्हा चिमूर शहरात आला तेव्हापासून इंदिरा नगर वस्तीला लागुन असलेल्या बालाजी मंदीर देवस्थानच्या मालकीच्या तलावात सकाळीच आंघोळ करून नेहमीच्या ठिकाणी राहत होता. कोनी ही सांगीतले ते काम करित असताना मात्र राजू चा कोनाला काही त्रास झाला नाही. राजू चे ज्या व्यक्ती सोबत जमले त्या व्यक्ती ला भैया किंवा भाभी म्हणत होता. दोन वर्षपूर्वी कोरोणाचा काळ भयावह असताना  त्या काळात घरातील अनेक मानसं मृत्युमुखी पडली समाजातील अनेक संसार उद्धवस्त झाले अशी मन सुन्न करनारी परिस्थिती असताना त्याही कोराणाच्या काळात राजू कर्दनकाळ ठरला. काळ आला होता पण वेळ आली नव्हती कोरोणाचा काळ सर करत रात्री हायवे रस्त्यालगत दुकान चाळीत निवांत झोपायचा. दिसायला ठणठणीत असलेल्या राजू ला नितांत उपचाराची गरज आहे हे समाजाला कळले नाही. राजू पहायला थोडा भयानक पन बोलायला शांत स्वभावाचा होता. परिस्थिती सापेक्ष शुभम ने पंधरा दिवस चालता बोलता राजू सोबत मैत्री केली.

           या देशात अनेक जाती धर्माची पंताची लोक राहतात मानूस हा समाजशील असला तरी सर्वच दान - पून करनारी नसतात स्वतःसाठी तर सगळेच जगतात पण थोड दुसऱ्यांसाठी  जगून पहायचं अस मनाशी ठरवून स्वतः ला सामाजिक कार्यात झोकून देत स्वतच्या मताशी ठाम व विचाराशी कधीही तडजोड न करणारे, बेघर ,बेवारस, भिक्षेकरी, निराधार ,अनाथांची सेवा व सामाजिक क्षेत्रात अग्रस्थानी असलेले व्यक्तीमत्व चिमूर येथील दिव्यवंदना फाऊंडेशन चे शुभम पसारकर यांनी जे केल ते इतरांना जमलं नाही. अखेर पंचेविस वर्षानंतर राजू ची शहरातील परिस्थिती लक्षात घेता  चिमूर पोलीस स्टेशन व दिव्यवंदना आधार फाऊंडेशन च्या वतीने केंद्र शासन भिक्षेकरी पुनर्वसन केंद्र नागपूर महानगर पालिका येथे राजु ला पुनर्वसनाकरिता दाखल करण्यात आले आहे. येत्या काही दिवसामध्ये प्रादेशिक मनोरुग्णालय नागपूर येथे राजू ला उपचाराकरिता भरती करन्यात येईल. राजू  उपचारातून बरा झाल्यानंतर दिव्यवंदना फाउंडेशन राजूची संपूर्ण जिम्मेदारी घेत आधार देनार आहे.

,...................................................................


       गरजू लोकांकरिता मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून रस्त्यावर राहनाऱ्या लोकांना तातडीने मदत, पूर्नवसन करन्याचा प्रयत्न होत आहे. आपल्या परिसरात रस्त्यावर भिक्षेकरी बेवारस बेघर गरजू व्यक्ती आढळल्यास चिमूर येथील दिव्यवंदना आधार फाऊंडेशन येथे संपर्क साधावा असे आवाहन शुभम पसारकर यांनी केले आहे.

 


PostImage

Chunnilal kudwe

Oct. 18, 2023

PostImage

Abolition of EVM defends Constitution - वंचित बहुजन आघाडीचा आक्रोश मोर्चा


चिमूर तालुका वंचित बहुजन आघाडीने दिले महामहीम राज्यपाल यांना विविध मागण्यांचे निवेदन -

चिमूर अप्पर जिल्हाधीकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

 

  • देशातील अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय समाजाच्या नागरिकांचे अधिकार, राजकिय, सामाजिक आरक्षण, लोकशाही, संपवण्याचा घाट रचून शेटजी भटजींचे राज्य निर्माण करण्याचे प्रयत्न भाजपा सरकार कडून सुरू असून राज्यात बहुजन समाज स्वतःला असुरक्षित समजत असून जातींच्या, धर्माचा नावावर आपापसात लढवल्या जात आहे त्यामुळे बहुजन समाजाचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी चिमूर तालुका वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर येऊन ईव्हीएम हटाव, संविधान बचाव या प्रमुख मागणीसाठी बुधवारला आक्रोश मोर्चा काढून शासनाचा निषेध करण्यात आला.


        शहरातील वडाळा ( पैकु ) संविधान चौकातून भदंत ज्ञानज्योति महाथेरो ,भदंत धम्मचेती, महाराष्ट्र प्रदेश सदस्य कुशलभाऊ मेश्राम, डॉ रमेशकुमार गजभे, अरविंद सांदेकर, राजेश बोरकर, जयदीप खोब्रागडे,महिला जिल्हाध्यक्ष कविता गौरकर, यांच्या मार्गदर्शनात चिमूर तालुका वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष बाळासाहेब बन्सोड, वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हाध्यक्ष शुभम मंडपे यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
       देशातील सर्वच निवडणूका बॉलेट पेपर वर घेण्यात यावी,तीन पिढ्याची अट रद्द करण्यात यावी,केजी टू पीजी शिक्षण मोफत करण्यात यावी,६२ हजार शाळेचे खाजगीकरण रद्द करावे, सर्व जातीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, कंत्राटी भरतीचा जिआर रद्द करण्यात यावा, अश्या अनेक मागण्या घेऊन मोर्चाचे आयोजन करण्यात आले, मोर्चात सरकारच्या विरोधात घोषणा देत मोर्चा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येत धडकला 
अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयापुढे मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत करण्यात आले
         दरम्यान मोर्चेकर्यांना  भदंत महाथेरो ज्ञानज्योति, उमरेड विधानसभा समनव्यक राजू मेश्राम, डॉ बाळासाहेब बन्सोड, कुशलभाऊ मेश्राम, डॉ रमेशकुमार गजभे, शुभम मंडपे, अरविंद सांदेकर,अल्काताई मोटघरे, आदींनी मोर्चाला संबोधित केले कार्यक्रमाचे संचालन प्रकाश मेश्राम यांनी केले दरम्यान शिस्टमंडळाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्यपाल रमेश बैस यांना पाठविण्यात आले मोर्चाच्या यशस्वीतेसाठी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले
-----------------------------
ईव्हीएम ची केली होळी -

मोर्चाची मुख्य मागणी एव्हीएम हटाव,देश बचाव ही असल्याने, मोर्चेकर्यांनि तहसील कार्यालयापुढे प्रतिकात्मक एव्हीएम ची होळी करून ईव्हीएम हटवण्याची मागणी करण्यात आली.


PostImage

Chunnilal kudwe

Oct. 9, 2023

PostImage

Radhakrushan vikhe patil - डॉ वारजूकर म्हणतात राज्याचे महसुल मंत्री फक्त चिमूर तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बांधावर


 सामान्य गरीब नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे पाट


         तालुक्यातील  शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करित असतानाच पिकांवर नव नविन रोगाने शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांने पिकाला लावलेला खर्च सुद्धा निघाला नाही.आजच्या घडीला शेतकरी मेटाकुटीस आला असुन होत्याचा नव्हता झाला आहे. काही दिवसात घरी येनारे सोयाबीन चे पिक बुरशी रोगाने काडी मोड झाले कपासी पिकांची अवस्था अशाच प्रकारची असल्याची माहीती आहे. याच पिक पाहणीचा दौरा करण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यातील सामान्य गरीब नुकसानग्रस्त  शेतकर्यांकडे दुर्लक्ष करत त्यांच्या सोयाबीन व कपासी पिकांची नुकसानीची पाहणी न करता फक्त आमदार  भांगडीया यांच्या इशाऱ्यावर रविवार ला तालुक्यातील बोथली, रेगांबोडी, वहानगाव येथील सामान्य गरीब  शेतकऱ्यांना पाट दाखवत ओळखीच्या भाजपा  पदाधिकारीच्या घरी व शेती बांधावर पिक नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले असल्याचे सोमवार ला चिमूर येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कार्यालयातील आयोजीत पत्रकार परिषदेत चिमूर विधान सभा क्षेत्राचे समन्वयक डॉ सतिश वारजूकर बोलत होते.


      महसुल मंत्री यांचा दौरा तालुक्यातील नियोजीत गावांत होता. रस्त्यालगत वहानगांव व भिसी येथे अनेक शेतकरी अपेक्षेने आपल्या शेती बांधावर महसुल मंत्री येतील म्हणून वाट पाहत होते. दरम्यान शेतकरी संवाद कार्यक्रम एका खाजगी जिनींग मध्ये ठेवन्यात आला होता . त्यात आपल्याला आपल्या शेतातील सोयाबीन व कपासीची व्यथा महसुल मंत्री यांना सांगता येईल अशी संकल्पना शेतकऱ्यांच्या मनात होती. मात्र भिसी येथील नागरीकांची संपूर्ण तहसीलची मागणी लक्षात घेता  मागणी पूर्ण करू शकत नसल्यामूळे भिसी मार्गावरून नागपूरकडे जाताना रस्त्यावर प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्याकडे न पाहता महसूल मंत्री ठेंगा दाखवत सरळ मार्गाने निघून गेल्याचे कळते. 
       वर्षभरापूर्वी सुध्दा तालुक्यात अतिवृष्टी झाली होती तेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तालुक्यातील निवडक गांवातील शेतकर्यांच्या शेतातील पिकांची पाहणीचा दौरा केला होता. मात्र महालगाव काळू येथील लोकांच्या घरात पूराचे पाणि शिरले शेतपिकांचे नुकसान झाले तरी त्या गावात उपमुख्यमंत्री न जाता गावाला वळसा मारून भाजपा कार्यकर्ता, पदाधिकारी यांच्या शेतातील पिकांची पाहणी करून निघून गेले होते. त्यावेळेस सुद्धा भरपूर नुकसान भरपाई देवू असे आश्वासन दिले तेही फोल ठरल्याचे कळते. महसुल मंत्री यांना मतदार संघात आनून गाजावाजा करायचा आणि प्रत्यक्षात शेतकन्यांच्या पदरात काहीच पडू दयायचे नाही. अशा प्रकारे गरीब शेतकऱ्यांची थट्टा करायची असा चंगच स्थानिक आमदारांनी बांधला असल्याचे आयोजीत पत्रकार परिषदेत डॉ सतिश वारजूकर यांनी सांगीतले
       पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल सरचिटनीस प्रा. राम राऊत, तालूका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष डॉ विजय गावंडे, शहर अध्यक्ष अविनाश अगडे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष नागेंद्र चट्टे, उपाध्यक्ष राजू चौधरी, विधान सभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष प्रशांत डवले, भाऊ टेकाम, रोशन हजारे, गुरुदास जुनघरे, आदी काँग्रेस कार्यकर्ता पदाधिकारी उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Oct. 8, 2023

PostImage

NCP च्या चिमूर विधानसभा अध्यक्षपदी अरविंद रेवतकर यांची निवड


       राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल पटेल, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी रविवारला नियुक्ती पत्र देवून अरविंद रेवतकर यांची चिमूर विधानसभा अध्यक्षपदी निवड केली आहे. 


       तालुक्यात अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अरविंद रेवतकर जनतेसाठी काम करत आहेत. या कामाची दखल घेत राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या विचारसरनीनुसार पुन्हा भविष्यात  सर्वसामान्य जनतेच्या विकासात भरिव कार्य करून पक्ष संघटना मजबूत कराल याच दृष्टीकोनातून चिमूर विधान सभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडी बदल चिमूर विधान सभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व त्यांच्या चाहत्यानी कौतुक करून अभिनंदण केले आहे.


PostImage

Chunnilal kudwe

Sept. 28, 2023

PostImage

Potholes on the highway - भिसी टागोर फाटा ते मार्बन आंबा हायवेवर खड्डे


चंद्रपूर राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा सरचिटणीस अरविंद रेवतकर यांनी केली रोडची पाहणी



अनेक दिवसा पासुन नॅशनल हायवे वरील टागोर फाटा ते मार्बत आंबा या रोड चे काम बंद असून या रोड ला मोठ - मोठे खड्डे पडले आहे. या खड्‌यामूळे ये - जा करणाऱ्या वाहनांना त्रास सहन करावा लागत आहे. या खड्‌यामूळे अनेक वाहनांचे अपघात झाले आहे. भिसी गावातील सकाळी मार्निंग वाकला जानारे नागरीक, पादचार्यांचे आरोग्य धोक्यात आले असुन कधीही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गाच्या दुर्दशाची माहीती चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी  काँग्रेस सरचिटनीस ( अजित पवार गट ) यांना मिळाली असता त्यांनी प्रत्यक्ष हायवे महामार्गाची पाहणी करून या महामार्गावरील त्वरीत खड्डे बुजवून आठ दिवसात मार्ग दुरुस्तीकरण करण्यात यावे अन्यथा चिमूर उपविभागीय कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल असा ईशाराही यावेळी दिला आहे. 


     यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस भिसी युवा शहर अध्यक्ष अक्षय खवसे किशोर गभणे,पंकज रेवतकर, देवा  घुटके, स्वप्निल काळे, जगत तांबे, चेतन पडोळे, हरीश डुकरे, अक्षय नागपुरे, शैलेश आजबलकर, शुभम सहारे, जग्गा मेश्राम, रोशन रेवतकर, सौरभ कामडी, यश कोथळे, आशिष श्रीरामे, निखिल कोथळे, आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Sept. 28, 2023

PostImage

Ayushman Bharat Card,blood donation - गडचिरोलीत आरोग्य तपासणी, रक्तदान व आयुष्यमान भारत कार्डचे वितरण


भाजप तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त रामनगर (कॅम्प एरिया) हनुमान मंदिर येथे "सेवा सप्ताह पंधरवाडा" कार्यक्रम

      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त "सेवा सप्ताह पंधरवाडा" या कार्यक्रमांतर्गत भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने स्थानिक रामनगर (कॅम्प एरिया) येथिल हनुमान मंदिरामध्ये भव्य रक्तदान शिबिर,आरोग्य तपासणी शिबिर व आयुष्यमान भारत कार्डची नोंदणी व वितरण करण्यात आले.


     या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते तर जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीता हिंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी बीपी, शुगर ची तपासणी करून घेतली.तसेच रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यानी रक्तदान केले. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. व आरोग्य सेविका यांच्या चमुने आरोग्य तपासणी करून उपचार मार्गदर्शन केले. तर आशा सेविका यांनी आयुष्यमान भारत कार्डची नोंदणी करून कार्डचे वितरण केले.
      कार्यक्रमाला जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, शहराध्यक्ष कविता उरकुडे,भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी, अविनाश महाजन, श्रीकांत पतरंगे, माजी नगरसेविका अल्काताई पोहनकर, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष दिपक सातपुते, शहर महामंत्री हर्षल गेडाम, गजेंद्र डोमळे, आरोग्य सेविका, आशा सेविका, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Sept. 28, 2023

PostImage

Role acting competition - अनुसूचित जाती मुलींची निवासी शाळा विभागस्तरीय स्पर्धेसाठी पात्र


भूमिका अभिनय स्पर्धेत प्रथम -

       राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प अन्वये जिल्हास्तरीय भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन बुधवारला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत चिमूर येथील अनुसुचित जाती मुलींची निवासी शाळा येथील विद्यार्थीनींच्या संघानी भूमिका अभिनय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून विभागस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्या आहेत.


        पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी वृषाली गड्डमवार, मुख्याध्यापिका सुनिता खोब्रागडे, केंद्र प्रमुख टी आर महल्ले, सहाय्यक शिक्षक सतिश कुकडे, विनय खापर्डे, सहाय्यक ग्रंथपाल मनोहर गभने, प्रयोगशाळा सहायक अनुराधा महाजन, शिपाई हेमूताई मगरे, बॉबी धात्रक, समन्वयक वरभे, आत्राम, पंधरे यांनी विजयी संघाचे कौतूक करून विभागस्तर स्पर्धेच्या शुभेच्छा दिल्या.


PostImage

Chunnilal kudwe

Sept. 28, 2023

PostImage

Camp on various diseases - शिबीरात पाचशे साठ नागरिकांनी घेतला लाभ


 मोहम्मद हजरत पैगंबर साहेब जयंती निमीत्त

 

       पोलीस स्टेशन शेंगाव ( बु ) व पैगामे रजा सेवा संस्था शेंगाव ( बु ) यांच्या संयुक्त विद्यमाने हजतरा पैगंबर साहेब यांच्या जयंतीचे निमीत्त साधून विवीध रोगांवरील शिबीर व निदान कार्यक्रमाचे आयोजन मंळवार ला नेहरु विद्यालय शेंगाव (बु) येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्दघाटन वरोरा - भद्रावती विधान सभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर व ठाणेदार अविनाश मेश्राम यांनी केले. या विवीध रोगांवरील शिबीरात पाचशे साठ नागरीकांनी सहभाग दर्शवित लाभ घेतला.

       कार्यक्रमाच्या उद्दघाटनाप्रसंगी आमदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, आरोग्य हा प्रत्येकाच्या जिवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येकाला निरोगी जिवन जगता यावे यासाठी प्रयत्न करायला पाहीजे. नागरीकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असल्याचे बोलत होत्या. ठाणेदार अविनाश मेश्राम म्हणाले की, लोकाभिमुख कार्यक्रम घेवून मुस्लीम बांधवांना मोहम्मद पैगंबर जयंतीच्या शुभेच्छा देत गणपती उत्सव सुद्धा शांतता सुव्यवस्था अबाधीत ठेवून साजरा करावा असे आवाहन याप्रसंगी केले. विवीध रोगावरील शिबीरात निदान व उपचारासाठी वर्धा येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे येथील तज्ञ डॉक्टरांची चमू बोलावण्यात आली. यामध्ये मेडिसीन तज्ञ, नेत्ररोग तज्ञ सर्जरी बालरोग स्त्रीरोग आस्थिरोग स्वसन रोग दंत व मुख रोग त्वचा रोग तज्ञ यांचा समावेश होता.

         या कार्यक्रमाकरीता नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक ढाकुनकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष राजू चिकटे, माजी सरपंच यशवंत लोडे, तमूस अध्यक्ष गजानन ठाकरे, शांतता समितीचे उमेश माकोडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ पठाण, यांनी केले तर आभार मुज्जू शेख यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्य नागरीक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करन्यासाठी पैगामे रजा सेवा संस्था व पोलीस स्टेशन शेगांव ( बू ) यांनी प्रयत्न केले.


PostImage

Chunnilal kudwe

Sept. 28, 2023

PostImage

Centenary of Advocacy - डॉ बाबासाहेब आंबेडकर निष्नात दूर दृष्टीचे वकील - समतादूत राजूरवाडे


बार्टि तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची वकिली शताब्दीवर्ष -

.......................................

        डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदेत गोरगरीब जनतेला न्याय मिळावा म्हणून फिरत्या न्यायालयाची मागनी केली होती त्यावेळेस जर हे विधेयक मंजूर झाले असते तर आज घडीला तिन कोटी केसेस प्रलंबीत नसत्या. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या वकिलीत सर्वव्यापकता, मानवतावादी, वंचित घटकांना न्याय  मिळवून देण्यासाठी कायमची तत्परता असल्यामुळे डॉ  बाबासाहेब आंबेडकर हे दुरदृष्टीचे निष्नात वकील होते. दिवानी व फौजदारी न्यायालय चिमूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वकिली शताब्दी वर्ष कार्यक्रम पार पडला त्या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या समतादुत प्रज्ञा राजूरवाडे कार्यक्रमाच्या मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.


      यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष वरिष्ठ अधिवक्ता संघ चिमुर चे अध्यक्ष आर.आर.सोनडवले, प्रमुख अतिथी  अधिवक्ता संघाचे सचिव अगडे, अधिवक्ता महेशदत्त काळे, अधिवक्ता लांबट, अधिवक्ता शिवरकर ,अधिवक्ता थुटे, अधिवक्ता श्रीरामे,अधिवक्ता हिंगे,अधिवक्ता आर जी रामटेके, अधिवक्ता एन यू रामटेके, अधिवक्ता सूभाष नन्नावरे, अधीवक्ता संजीवनी सातारडे, अधिवक्ता नितीन रामटेके आदी उपस्थित होते दरम्यान समतादूत प्रज्ञा राजुरवाडे यांनी सविधान रत्न अधिवक्ता नितीन रामटेके यांचा सत्कार करत सर्व अधिवक्ता यांना बार्टीच्या वतीने संविधान प्रत देन्यात आली. 


       पुढे बोलताना समतादूत राजूरवाडे म्हणाल्या की, समाजसुधारक र.धो कर्वे हे महीलाचे स्वास्थ व लैंगिक शिक्षणावर कार्य करित असताना  समाज स्वास्थ ह्या नियतकालिके वर खटला भरवन्यात आला होता. तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे वकीलीपत्र घेतले होते.  न्यायलयानी बाबासाहेब यांना विचारले होते हे विकृत आहे का बाबासाहेब यांनी उत्तर देताना म्हंटले की समाजात काहि लोकाना अभिव्यक्ती स्वातंत्र्य विषय आवडत नाही म्हणून कर्वे नी लिहायचेच नाही का? आज इतक्या वर्षांनी जेव्हा लैंगिक हिंसाचार समाजात होतात. तेव्हा कर्वे चा डॉ बाबासाहेबांनी चालवलेला खटला आज ही किती म्हत्वाचा वाटतो. डॉ बाबासाहेब यांचे जेधे मोरे बद्द्ल  राजकिय वैमनष्य होते तरी त्यांचे ही वकिलीपत्र घेतले म्हणून वकिलांनी न्याय मिळवून देताना बाबासाहेब आंबेडकर यांच्या वकिलीला समोर ठेवुन  न्यायदानाचे लक्ष्य प्राप्त करावे न्यायाची दये सोबत गफलत करु नये समाज हा न्यायामुळे सक्षम स्वयंपूर्ण होतो. तळागाळातील वंचित घटकाना न्याय मिळवून दिला पाहीजे असल्याचे बोलत होत्या. कार्यक्रमाचे संचालन अधिवक्ता डी के नागदेवते आभार  अधिवक्ता जे डी मुन यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्य वकील होते.


PostImage

Chunnilal kudwe

Sept. 28, 2023

PostImage

Financial fraud - आर्थिक घोटाळ्यातील मुख्य सुत्रधारांवर कारवाई न करता संस्था संचालकाची उलट तपासणी



- राष्ट्रसंत तुकडोजी पतसंस्थेतील आर्थिक घोटाळा प्रकरण


      राष्ट्रसंत तुकडोजी पतसंस्थेत अकरा महिन्यांपूर्वी आर्थिक घोटाळा झाला. याची लेखी तक्रार उपलेखापरिक्षक सुधाकर लांडगे यांनी चिमूर पोलीसात दिली होती पोलीसांनी तपासाअंती १६ लोकांवर विवीध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांचेकडे वर्ग करन्यात आले. आर्थिक गुन्हे शाखाने १६ आरोपीपैकी फक्त तिन आरोपींनाच अटक केली. मात्र या प्रकरणातील आर्थिक घोटाळ्यात जे मुख्य सुत्रधार आरोपी आहेत त्यांच्यावर सर्व प्रकारची कारवाई न करता आर्थिक गुन्हे शाखाने संस्थेच्या संचालकांची उलट तपासणी सुरु केली असुन विवीध बँकेतील खात्यावर बंदी घालून मालमत्ता विषयी माहिती घेत असल्याचे संस्थेचे संचालक यांनी मंगळवार ला पतसंस्थेच्या कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत सांगीतले.


       संस्थेचे माजी उपाध्यक्ष अरुण मेहरकुरे, अमोल मेहरकुरे, अतुल मेहरकुरे व माजी व्यवस्थापक मारोती पेंदोर आणि इतरांनी पतसंस्थेत सात करोड 65 लाख 33 हजार 450 रुपयाचा आर्थिक घोटाळा केला असल्याची तक्रार सहकारी संस्थाचे उपलेखा परिक्षक राजेश लांडगे यांनी नऊ वर्षांच्या कालावधीत संस्थेचा लेखा जोखा तपासणी करून चाचणी लेखापरिषण अहवाल पत संस्थेला सादर केला असता निदर्शनास आले. त्यानुसार उपलेखा परिक्षक राजेश लांडगे यानी पोलीसात लेखी तक्रार दाखल केली पोलीसांनी तपासाअंती १६ आरोपी वर गुन्हे दाखल केले. त्यांच्यावर संपूर्ण कारवाई न करता संचालकावर सुडबुद्धीने कारवाई करण्याचे षडयंत्र निर्माण करून संचालकाची मालमत्ता रजिस्ट्री ऑफीस व विवीध बँकेत असलेल्या खात्यावर बंदी घालत मालमत्तेची माहिती घेत मालमत्ता जप्त करून मालमतेचा लिलाव करण्याचा डाव आर्थिक गुन्हे शाखा तर करीत नाही ना असाही प्रश्न पतसंस्थेच्या संचालकात निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे पतसंस्थेच्या संचालकांना मानसीक बौद्धीक शारीरीक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. कोनाचे देवान घेवान कसे करायचे या विवंचनेत संस्था संचालक आहेत. यामूळे या प्रकरणाची परिवारातही अस्वस्थता निर्माण झाली आहे. मात्र यात माजी संचालक रमेश खेरे यांनी  या आर्थिक घोटाळा प्रकरणापूर्वीच राजीनामा दिला आहे त्यांचा संबध पतसंस्थेशी नसताना त्यांचे बॅक खाते गोठवीन्यात आले. ते पूर्ववत सुरु करावे अशी मागणी केली आहे. यात संचालकांचा दोष नसताना आर्थिक गुन्हे शाखेने त्रास देने सुरु केले आहे.


       आर्थिक गुन्हे शाखेने  संचालकाविरुद्ध कारवाई थांबवावी मुख्य आरोपीसह इतर आरोपीची चौकशी करून त्यांना अटक करावी अन्यथा तिव्र आंदोलन करन्यात येईल असा इशारा पतसंस्थेच्या संचालकांची पत्रकार परिषदेतून दिला आहे. यांच्या प्रतिलिपी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, विभागीय पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी चंद्रपूर, पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांना पाठवीन्यात आल्या आहेत. पत्रकार परिषदेला संस्थेचे अध्यक्ष पुंडलीक मांढरे, संचालक अर्जुन कारमेंगे, विनोद शिरपुरवार, उमेश कुंभारे, बबन बन्सोड, मोहन हजारे, प्रविण वैद्य, रमेश खेरे आदी उपस्थित होते

 

----------------------------------
आर्थिक घोटाळ्यात जे काही आरोपी आहे त्यांच्यावर कारवाई करने सुरू आहे. संचालकाची मालमत्ता जप्तीची कारवाई ही MPID कडून सुरु आहे जोपर्यंत ठेवीदारांचे पैसे परत मिळनार नाही तो पर्यंत संस्था व संस्थेचे संचालक यांची प्रॉपर्टी जमा करण्याचे प्रावधान शासनाला आहे. संस्थेच्या आर्थिक घोटाळ्यात जे संचालक नव्हते त्या संचालकांचे खाते चुकीने बंद करण्यात आले आहे आता ते खाते पूर्ववत सुरू करण्यात आले. पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्याची चौकशी सुरु आहे.

आयुष नोपाणी
सहायक पोलीस अधिक्षक आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर


PostImage

Chunnilal kudwe

Sept. 28, 2023

PostImage

Soybean pick stick mode -येल्लो मोजेक बुरशी रोगाने सोयाबीन पिक काडी मोड


  • राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटीस अरविंद रेवतकर शेतकर्‍यांच्या बांधावर -

            सोयाबीन पिकांची मर्यादा संपली आहे. काही दिवसांनी शेतकर्यांच्या हातात पिक येनार असतानाच भिसी परिसरात येलो मोजेक बुरशी रोगाने सोयाबीन पिक ग्रासले आहे. शेतीत सोयाबीन पिकांसाठी खर्च लावला तो ही निघाला नाही. अखेर शेतकर्यांच्या पदरी निराशा अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटनीस ( अजित पवार गट ) यांनी बुधवार ला शेतकरी घनश्याम बुधाराम  कामडी यांच्या शेतातील सोयाबीन पीकाची पाहणी करन्यासाठी शेतकर्याच्या बांधावर पोहचले असता सोयाबीन पिक काडी मोड झाल्याचे आढळले.
  •        तालुक्यातील भिसी गाव, परिसर, हलक्यात, शेतकर्यांचे शेतातील संपूर्ण सोयाबीन पिक येल्लो, मोजेक, बुरशी या रोगाने  झाडाच्या बुडापासुन नष्ट  झाले आहे. त्यामूळे शासनाने शेतकर्‍याला एकरी एक लाख रुपयांची मदत जाहीर करावी अशी मागणी चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटनीस ( अजित पवार गट ) अरविंद रेवतकर यांनी केली आहे.
            यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) भिसी युवा शहर अध्यक्ष अक्षय खवसे, किशोर गभणे, पंकज रेवतकर, देवा घुटके, स्वप्निल काळे, जगत तांबे, चेतन पडोळे, हरीश डुकरे, अक्षय नागपुरे, शैलेश आजबलकर, शुभम सहारे, रोशन रेवतकर, सौरभ कामडी, यश कोथळे, आशिष श्रीरामे, निखिल कोथळे, आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Sept. 24, 2023

PostImage

Sport -सरस्वती कन्या विद्यालयांचा खो-खो चा संघ जिल्हास्तरावर प्रतिनिधीत्व करनार



  • १४ वर्षा आतील शालेय क्रिडा स्पर्धा
  •         तालुका स्तरीय १४ वर्षा आतील शालेय खो-खो क्रिडा स्पर्धा शुक्रवार ला जनता विद्यालय नेरी येथे घेन्यात आल्या. दरम्यान अत्यंत चुरशीच्या सामन्यात चिमूर येथील नेहरू विद्यालयाच्या संघाला पराजित करून सरस्वती कन्या विद्यालय नेरी च्या संघाने दणदणीत विजय प्राप्त केला. त्यामुळे नेरी येथील सरस्वती कन्या विद्यालयचा खो - खो चा संघ चिमूर तालुक्याचे जिल्हास्तरावर प्रतिनिधीत्व करनार आहे.

  •         चुरशीच्या सुंदर खेळाच कौतूक तालूका क्रिडाचे भास्कर बावणकर, जयंत गौरकर व क्रिडांगणावर प्रेक्षकांनी केल. स्पर्धेत सहभागी खेळाडूनी आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापिका अर्चना डोंगरे, क्रिडा प्रशिक्षक सुनिल पोहनकर, सि एस ढोले, वर्ग शिक्षक सरोजा मांडवकर, हरणे, अजानी, पळवेकर तथा समस्त शिक्षक वृंद व आई वडीलांना दिले. दरम्यान संस्थेचे सचिव संजय डोंगरे यांनी स्पर्धेतील खेळाच्या यशाने विद्यार्थ्यांने सरस्वती कन्या विद्यालयाचे नाव लौकीक केले भविष्यातही अशीच प्रगती करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.


PostImage

Chunnilal kudwe

Sept. 23, 2023

PostImage

Protest by the Construction Department - शंकरपूर - कांपा मार्गावार रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता



- महामार्गावर बेशरमांची झाड़ लावून बांधकाम विभागाचा केला निषेध


कांपा - चिमूर हा राज्य महामार्ग आहे या रस्त्यावर पडलेले खड्डे हे अनेक दिवसापासुन अपघाताला आमंत्रण देत जिव घेत आहे बांधकाम विभागाकडून हे खड्डे अजूनही बुजविन्यात आले नाही शंकरपूर - कांपा मार्गाची रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता आशि परिस्थिती निर्माण झाली असल्यामूळे येथील स्थानीक  महामार्गाविरील रस्त्यात बेशरमांची झाडे लावून बांधकाम विभागाचा निषेध केला आहे.

 
       चिमूर - कांपा या राज्य महामार्गवर 15 गावे बसले आहे तर रस्त्याच्या परिसरात 30 गावे आहेत चिमूर पासुन कांपा गावांचे अंतर 33 किलोमीटर आहे या महामार्गावरील रस्त्याने अनेक चारचाकी दुचाकी वाहने जात असतात. जवळपासच्या सर्व गावांतील नागरिक या महामार्ग रस्त्याचा वापर करतात परंतु या महामार्गावरील रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत शंकरपूर ते कांपा या आठ किलोमीटर च्या अंतरावर तर जीवघेणे खड्डे आहेत या रस्त्यावरून दुचाकी चालविणेही कठीण झाले आहे.


     या रस्त्यावरील खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने मुरूम व गिट्टी टाकून दोनवेळा बुजविले परंतु खड्डे आहे तसेच आहे त्यामुळे खड्डे बुजविण्याच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून खड्डे बुजविण्यासाठी आलेला लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे  त्यामुळे महामार्गातील रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता अशी परिस्थिती झाली आहे त्यामूळे हा रस्ता होणार की नाही असाप्रश्न निर्माण झाला असून सध्यातरी या रस्त्यावरील खड्डे कायमस्वरूपी बुजविण्यात यावे यासाठी येथील युवकांनी बेशरमांची झाडे लावून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे महामार्गावर बेशरमांची झाडे आमोद गौरकर अशोक चौधरी आशिष चौधरी निखील गायकवाड आशु हजारे गणेश वानकार साधू गेडाम विनोद घरत अमन मेश्राम प्रियंशु वाढई नंदू शेरकी मनोज सहारे रुपेश रंदये बबलू शेख  आदिंनी पुढाकार घेत लावले आहे.


PostImage

Chunnilal kudwe

Sept. 21, 2023

PostImage

Education circular - गुलामगिरीच्या खाईत नेणारे ते परिपत्रक रद्द करा - आम. प्रतिभा धानोरकर


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे मागणी

 

शिक्षणाचा अधिकार हा संविधानाने दिलेला आहे. देशाचे भविष्य उज्वल करायचे असेल तर सर्वांना शिक्षण मिळायला हवे. शहरी व ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत मध्यम व गरीब जनता शिक्षण घेतात. विशेष म्हणजे याकरिता स्वतंत्र मंत्रालय व बजेटची तरतूद देखील अर्थसंकल्पात करण्यात येते. परंतु आता हेच शिक्षण देणगीदारांवर अवलंबून राहणार आहे. दुसरीकडे सामान्य परिवारातील युवक स्पर्धा परीक्षेचे शिकवणीवर्ग लावून स्पर्धापरीक्षेची तयारी करीत असतात. परंतु आता त्या जागा देखील खाजगी कंपनीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या दोन परिपत्रकामुळे युवकांना गुलामगिरीच्या खाईत नेणारे आहे. त्यामुळे ते दोन त्वरित परिपत्रक रद्द करण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाने नुकतेच दोन परिपत्रक काढले आहेत. त्यापैकी एक परिपत्रक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये देणगीदारांकडून शिक्षण घेण्याची परवानगी देणारा आहे. दुसरा परिपत्रक स्पर्धा परीक्षेच्या शिकवणी वर्गांसाठी खाजगी कंपन्यांना परवानगी देणारा आहे. या दोन्ही परिपत्रकांमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भार वाढणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांवर खाजगी कंपन्यांचा वर्चस्व निर्माण होणार आहे.

आमदार धानोरकर म्हणाल्या की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये देणगीदारांकडून शिक्षण घेण्याची परवानगी देणारा परिपत्रक विद्यार्थ्यांवर आर्थिक भार वाढवणारा आहे. या परिपत्रकामुळे गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे. तसेच, खाजगी कंपन्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांवर वर्चस्व निर्माण करण्याची संधी मिळणार आहे.

स्पर्धा परीक्षेच्या शिकवणी वर्गांसाठी खाजगी कंपन्यांना परवानगी देणारा परिपत्रक देखील विद्यार्थ्यांवर आर्थिक भार वाढवणारा आहे. या परिपत्रकामुळे सामान्य परिवारातील युवकांना स्पर्धा परीक्षा पास करणे कठीण होणार आहे. तसेच, खाजगी कंपन्या विद्यार्थ्यांकडून भरमसाठ शुल्क आकारणार आहेत.

आमदार धानोरकर यांनी या दोन्ही परिपत्रकांना त्वरित रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. त्यांनी सांगितले की, हे परिपत्रक विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणार आहेत. त्यामुळे हे परिपत्रक रद्द करून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी केली आहे.


PostImage

Chunnilal kudwe

Sept. 20, 2023

PostImage

Shivsena ( UBT ) - सोयाबीन पिकाची पाहणी करून तात्काळ नुकसान भरपाई द्या - प्रशांत कोल्हे


 चंद्रपूर जिल्हा शिवसेना ( उबाठा ) ची मागणी

..........................................


        तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत. सतत पाऊस, उन्ह व खराब वातावरणाने सोयाबीन पिकांवर विवीध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीला तक्रारी केल्या मात्र कंपनी कडून दाद मिळत नाही त्यामुळे शेतपिकांची पाहणी करून तात्काळ नुकसान भरपाई देन्याची मागणी चंद्रपूर जिल्हा शिवसेना ( उबाठा ) चे उपजिल्हा प्रमुख प्रशांत कोल्हे यांनी सोमवार ला चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे मार्फत पाठवीलेल्या निवेदनातून केली आहे.
       शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत कापूस व सोयाबीन या पिकांचा पिक काढला. सोयाबीन पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याच्या तक्रारी पिक विमा कंपनीला केल्या मात्र दाद मिळत नाही. तसेच अनेक शेतकरी तांत्रीक अडचनीमूळे पिक विमा पासून वंचीत आहेत. अशा सर्व शेतकऱ्यांची परिस्थिती गृहीत धरुन तात्काळ पिक पाहणी करून शेतकऱ्यांना पिक विमा देन्यात यावा व ज्या शेतकर्यांचा विमा नाही अशांना शासन स्तरावरून पाठपुरावा करून मदत पुरवावी. पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या तक्रारी वाट न बघता स्वता पहाणी करून मदतीसाठी आश्वासीत करावे. सदर सोयाबीन पिकांची मुदत संपत येत आहे. त्यामुळे पिकांचे पंचनामे सात दिवसात होणे आवश्यक आहे. पिक विमा कंपनीव प्रशासनाच्या दुर्लक्षतामूळे शेतकरी मदती पासुन वंचीत राहील्यास शिवसेना स्टाईल ने आंदोलन करन्याचा इशारा शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रशांत कोल्हे यांनी दिला आहे.
      निवेदणाच्या प्रतिलिपी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार बंटी भांगडीया, जिल्हा कृषी अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना पाठवील्या आहेत.


PostImage

Chunnilal kudwe

Sept. 19, 2023

PostImage

soyabean corp - तालुक्यात येल्लो, व्हेन, मोजाक व कॉलर रॅट रोगांचा सोयाबीन पिकांवर प्रादुर्भाव


थेट कृषी अधिकारी सोयाबीन शेतकर्याच्या बांधावर

आमदार 'बंटी भांगडीया' यांच्या सुचनेची दखल 

नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन पीक काही दिवसात शेतकऱ्याच्या हातात येणार आहे मात्र चिमूर तालुक्यात सोयाबीन पिकावर येल्लो व्हेन मोजाक,व कॉलर रॅट या रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्याच्या हातातील पीक जाण्याच्या मार्गावर आले आहे त्यामुळे तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे चिमूर विधान सभा क्षेत्रातील  शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आमदार बंटी भांगडीया यांच्या सुचने वरून कृषी अधिकारी सोयाबीन पिकाची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्याच्या बांधावर पोहचले आहेत

सोयाबीन पीकांची मुदत संपल्यातच आहे पिक हातात येण्याच्या वेळेस चिमूर तालुक्यातील खानगाव सावरी वहनगाव  खडसंगी भिसी शंकरपूर नेरी जांबुळघाट मासळ (बु) तथा ग्रामीण भागात येल्लो व्हेन मोजाक व कॉलर रॅट रोगाने सोयाबीन पिकावर  आक्रमकन केल्याने शेतकऱ्यांमध्ये हाहाकार माजून धडकी भरली आहे. सोयाबीन शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी आमदार बंटी भांगडीया शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत तर त्याच्या सूचनेवरून  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावार, डॉ विनोद नागदेवते, तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव तिखे, विजय रामटेके, विलास शेंडे, पर्यवेक्षक रूपेश सोनवणे, चव्हाण मॅडम, ज्ञानेश्वर मापारी, नितीन मोरे, यांनी तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पिकाची पाहणी केली.

नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई साठी अहवाल तयार करण्याचे काम सुरू केले आहे तर सोयाबीन पीक विमा धारक व विमा नसलेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी आमदार बंटी भांगडीया प्रयत्नशील असून त्यांच्या सूचनेनुसारच कृषी अधिकारी तात्काळ शेतकऱ्याच्या बांधावर पोहचल्याची माहिती मंगळवार ला  पत्रकार परिषदेत शेतकरी तथा भाजप ओबीसी आघाडी अध्यक्ष एकनाथ थुटे, भाजप महामंत्री रोशन बन्सोड, सरपंच प्रफुल्ल कोलते, भाजप ज्येष्ठ नेते रमेश कंचर्लावार यांनी दिली
--------------------------


PostImage

Chunnilal kudwe

Sept. 19, 2023

PostImage

Ganesh chaturthi - अनूचित घटनाचा परिणाम व्हायला नको - अप्पर पोलिस अधिक्षक रिना जनबंधू


गणपती उत्सवा दरम्यान काळजी घ्या 

 

"गणपती" उत्सवापासून इतर सनाला सुरुवात होत आहे. वर्तमानातील सप्टेंबर महिन्यात हिंदू व मुसलमान या दोन्ही समाजांचे सन आले आहे. मंगळवार पासुन गणेश उत्सवाला सुरुवात होत आहे. जगात देशात व राज्यात काय घडत हे सोशल मिडीयावरून कळते कोनतीही पोष्ट फारवड करताना शहानिशा केली पाहिजे. हल्ली अनेक अनुचित घटना घडत आहे. याचा परिणाम गणपती प्रतिष्ठापणा ते विसर्जन पर्यत व्हायला नको याची दखल गणेश मंडळानी घेत नियमांचे पालन गणपती मंडळ व नागरीकांनी केले पाहीजे असल्याचे मार्गदर्शन सोमवारला चिमूर येथील शहीद बालाजी रायपूरकर सभागृहातील आयोजीत कार्यक्रमात गणपती मंडळांना अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधू यांनी केले.


        चिमूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अंतर्गत येनाऱ्या चिमूर, भिसी, शेंगाव (बु) पोलीस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने शांतता कमेटी, गणपती मंडळ, पोलीस पाटील, पत्रकार, सरपंच, नगर परिषद, नगर पंचायत, प्रशासकीय अधिकारी, समाजसेवक व नागरीक यांची संयुक्त सभा घेन्यात आली.

पूढे बोलताना जनबंधू म्हणाले की, गणपती मंडळानी गणपती उत्सवाची परवानगी घेने आवश्यक आहे. गणपतीची मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसची नको निव्वळ मातीने बनविलेल्या मूर्तीची प्रतिस्थापना करा. गणपती उत्सवादरम्यान कोनते कार्यक्रम घेता याची माहीती पोलीस पाटील किंवा प्रत्यक्ष पोलीस स्टेशनला येवून द्या. गणपती मूर्तीची प्रतिस्थापना करताना कोणतीही अनुचित घटना घडनार नाही याची काळजी घ्या. गणपती मंडळातील दोन सदस्यांनी गणपती प्रतिस्थापना ते विसर्जन पर्यत आळीपाळीने देखरेख करने आवश्यक आहे. जमत असेल तर एका रांगेत गणपति विसर्जन करा याचा फायदा इतर नागरीकांना दर्शनासाठी होईल. एक गाव एक गणपती संकल्पना ही समाजाला जोडनारी आहे होत असेल असा प्रयत्न करून गणपतीची प्रतिस्थापना करा. MSEB कडून परवानगी घेवून लाईट ची व्यवस्था करा. CCTV कॅमेरा लावा. इतरांना त्रास होनार नाही याची काळजी घेत साऊंड 60 डेसीबल पर्यतच वाजवा. कोर्टाच्या सुचनेचा अवमान होनार नाही याची काळजी घ्या. गणपती विसर्जन दरम्यान मुख्य मार्गावरील मंदीर - मजीद जवळ साऊंड किंवा वाजंत्री वाजविने शक्यतोवर टाळा. वाहतुकीला अडथळा होनार नाही याची काळजी घ्या असल्याचे बोलत होते.

 उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणाले की, यापूर्वी सुद्धा सन उत्सव साजरे करत आलो गणपती उत्सवादरम्यान ईद ए मीलाद कार्यक्रम आला दोन्ही समाजातील नागरीकांनी शांतता सुव्यवस्था अबाधीत ठेवून उत्सव साजरा करावा. यावेळी भिसी ठाणेदार प्रकाश राऊत, शेंगाव ( बु) अविनाश मेश्राम, API विनोद जांभूळे, PSI भिष्मराज सोरते, PSI दिप्ती मरकाम, नायब तहसीलदार तुळशीदास मोहर्ले आदि उपस्थीत होते. कार्यक्रमाचे संचालन कैलास आलाम आभार प्रभारी ठाणेदार निलेश चवरे यांनी केले.


PostImage

Chunnilal kudwe

Sept. 17, 2023

PostImage

Women support - दिव्यवंदना फाऊंडेशनने मनोरुग्ण महिलेला केली मदत



मुंबई येथील मराठा लाईफ फाउंडेशन ने जिम्मेदारी घेत दिला आधार

 

             एक मनोरुग्ण महिला अनेक दिवसापासून एका गावात इकडे तिकडे भटकत होती त्या महिलेचा गावकऱ्यांना त्रास होत असल्याची  माहिती समोर आली. त्या महिलेचे नाव वैशाली मदन सोनटक्के असून ती 29 वर्षाची आहे  सदर महिला ही मनोरुग्ण असून मासाळ या गावांमध्ये पंधरा दिवसापासून राहत आहे. यांची माहीती चिमूर येथील दिव्यवंदना आधार फाऊंडेशन ला मिळताच त्या महिले विषयी संपूर्ण माहिती गावकऱ्यांकडून जानुण घेत मनोरुग्ण महिला वैशालीला मदत केली.

  •         " वैशाली " मूळची भिवापूर तालुक्यातील नांद येथील रहीवासी आहे. तिचे आई - वडील ६ वर्षापूर्वीच स्वर्गवासी झाले. तिला कोनाचाहि आधार नाही. रहायला घर नाही. जे नागरीक देईल ते खाने आणि राहणे एवढीच भूमीका वैशालीची असल्याची माहिती दिव्यवंदना फाउंडेशनचे अध्यक्ष शुभम पसारकर यांना मिळाली. त्यांनी  मासाळ येथील ग्रामपंचायत सदस्य,पोलीस पाटील व गावकरी,यांच्याशी संपर्क साधून मनोरुग्ण महिला विषयी चर्चा केली. वैशालीच्या चेहर्‍यावरील नैराश्य पाहून आपल्याच मनाला वेदना होत होत्या तात्काळ महिलेची दखल घेत कायमस्वरूपी आधार देण्याचा व तिला समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी शुभम ने प्रयत्न सुरू केले. यासाठी मासळ (बु) येथील नागरिकांनी लोकसहभागातून मदत केली.

          राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मराठा लाईफ फाउंडेशन चे अध्यक्ष किसन लोखंडे यांच्याशी दिव्यवंदना आधार फाऊंडेशनचे अध्यक्ष शुभम पसारकर यांनी संपर्क साधत  मनोरुग्ण महिलेबद्दल माहिती दिली वैशालीला मुंबई येथील मराठा फाऊंडेशन येथे भरती केले असता त्या मनोरुग्ण वैशालीची काळजी घेत तीच्या आखरी श्वासापर्यंत आधार देत निवास, उपचारांची सोय करेल अशी ग्वाही दिली. मुंबई येथील मराठा लाईफ फाउंडेशन येथे वैशालीला भरती होताच तिच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य आनंद पाहून गावकऱ्यांनी दिव्यवंदना आधार फाउंडेशन व मराठा लाइफ फाउंडेशन यांचे आभार मानले. यावेळी दिव्यवंदना आधार फाउंडेशनचे अध्यक्ष शुभम पसारकर, दिव्या गलगले, नथ्थु मेश्राम , रेखा मेश्राम, वामन बागडे, अब्दुल रफिक शेख आदी उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Sept. 17, 2023

PostImage

BJP सरकारला हद्दपार करण्यासाठी चिमुरात दुसरी क्रांती करण्याची गरज - Nana Patole


 काँग्रेस कायकर्ता मेळाव्यात नाना पटोले व विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती


         आता आपण दुसऱ्या महायुद्धाची तयारी करतोय त्यावेळी काँग्रेसने इंग्रजांना देशातून हाकलले होते आता इंग्रज विचारसरनीचे सरकार  देशात व राज्यात आहे त्या सरकारला हद्दपार करण्यासाठी चिमुरात दुसरी क्रांती करण्याची गरज आहे ही क्रांति चिमुरकर करतील अशी अपेक्षा असल्याचे चिमूर येथील माजी आमदार स्व. धनश्यामबापू बिरजे परिसरात शनिवारला काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात अध्यक्ष स्थानावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत होते.


        चिमूर तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक डॉ सतिश वारजूकर यांच्या वाढदिवसा निमित्त काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
          देशात सध्या भयावह परिस्थिती आहे देशातील लोकशाही, संविधानिक व्यवस्था संपुष्टात आणण्याचे काम भाजप सरकार करीत आहे तर भाजप कधीच शेतकरी,भटक्या विमुक्त जाती, ओबीसी, एसी, एसटी चा हितकारक नव्हता तर नेहमी विरोधात होता, फक्त धर्माच्या नावावर बहुजनांना आपल्या जाळ्यात ओढून सत्तेत आले आहेत, सत्तेत येताच मोदी सरकारने शेतकऱ्यांना संपवण्याचा प्लॅन केला आहे, शेतकरी स्वाभिमान योजनेत  शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळतात हे टॅक्स रुपी पैसे तुमचे आहेत मोदींचे नाहीत मात्र शेतकऱ्यांना चुकीच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी  अमेरिका दौऱ्यावर गेले असता  भाषनात मै व्यापारी हु मै व्यापार करणे आया हु असे म्हणाले होते त्यानुसार ते मोठया व्यापाऱ्यांना मोठे करीत आहेत व शेतकरी, मजूरांना गुलाम बनविण्यात येत असल्याची टीका कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली.
_____________________

ओबीसींनो कंत्राटी जीआर लागू होऊ देऊ नका - विजय वडेट्टीवार - 

नुकताच राज्य सरकारने शासकीय नौकरीसाठी कंत्राटी पद्धतीने भरती घेण्याचा जीआर काढला आहे या जिआरमुळे बहुजन समाजातील सुशिक्षित बेरोजगारांचे भविष्य अंधकारमय झाल्याशिवाय राहणार नाही तेव्हा येत्या काळात बहुजनांनी प्रत्येक तहसील कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे या जिआर ची होळी करून या कंत्राटी जीआरचा विरोध करावा तसेच महाराष्ट्र राज्यात जुनी पेंशन योजना सुरू करायची असेल तर कांग्रेसला साथ द्या  असे आव्हान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी कर्मचाऱ्यांना मंचावरून उद्दघाटन भाषण करताना बोलत होते.


        देशाचे संविधान कायम ठेवण्यासाठी व देशाला वाचवण्यासाठी स्वतःचा स्वार्थ बाजुला ठेऊन देशाच्या सर्वोच्च स्थानी राहुल गांधी यांना बसविणे गरजेचे आहे  तसेच दुष्काळ, गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांना अजून नुकसान भरपाई  मिळाली नाही  तरी हे सरकार  शेतकरी स्वाभिमान योजनेचा बागुलबुवा  करीत असल्याची टीका करीत आम्हि सत्तेसाठी नाहीत तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान टिकावे व बहुजन समाजाचे अधिकार अबाधित राहावे यासाठी ही आमची लढाई आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सत्तर हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला माञ पंधरा दिवसातच अजित पवार यांना भाजप मध्ये प्रवेश देत भ्रष्ट्राचारातून क्लीन चिट दिली काय असा प्रश्न उपस्थित करीत या आरोपातील भाजपाला किती पैसे मिळाले आहेत असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.


            चिमूर विधानसभा क्षेत्रात 
 येणाऱ्या काळात बहुजन समाजातील व्यक्ती आमदार बनला पाहिजे, येत्या काळात  राज्यात कांग्रेसचे सरकार आल्यास मला सहा महिन्यासाठी का होईना महसूलमंत्री बनवा  येथिल आमदारांचे पितळ उघडे पडतो. नऊ वर्ष झाले अजून पर्यत या क्षेत्रात मोखाबर्डीचे पाणि शेतकऱ्याला मिळाले नाही. म्हणे होवून जावून द्या दुध का दुध पाणि का पाणि यासाठी सर्वं कांग्रेस नेत्यांनी एकत्र येऊन काम करावे. यावेळी निवडणूका लागल्यातर गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रावर महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल. पक्षानी चंद्रपूर - गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी दिली तर विधान सभेत काँग्रेसचे आमदार निवडून आनतो असे वक्तव्य करित बहीनींना साडी सोबत मंगळसुत्र देनाऱ्या आमदारांला हद्दपार करावे असे आव्हान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. कार्यक्रमादरम्यान विवीध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.


         यावेळी विधानपरिषद आमदार अभीजीत वंजारी, विधानपरिषद आमदार सुधाकर अडबाले; मुख्य प्रवक्ता अतुल लोंढे; माजी आमदार डॉॅ अविनाश वारजूकर , बाळ कुळकर्णी, माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी, आनंदराव गेडाम, डॉ सतिश वारजूकर ; डॉ नामदेव कीरसान ,डॉ नितीन कोडवते, महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रफुल खापर्डे, बंटी शेवाळे, धनराज मुंगले , गजानन बुटके, विलास डांगे , प्रा राम राऊत, संजय डोंगरे, जेष्ठ नागरीक भिमराव ठावरी, माजी प्राचार्य सुधीर पोहनकर, राजेंद्र लोनारे तथा चंद्रपूर - गडचिरोली जिल्यातील अनेक कॉंग्रेस पदाधिकारी, जेष्ठ नागरिक, कार्यकर्ते, उपस्थीत होते.


      श्रीहरी बालाजी महाराज देवस्थान येथून रॅली काढन्यात आली चिमूर तालुका काँग्रेस कमेटी जन सवांद यात्रेचा रॅलीचा समारोप कार्यक्रमात करण्यात आला. दरम्यान चिमूर तालुका कॉंग्रेस कमेटीच्या कार्यालयाचे उद्घाटन काँप्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार उपस्थित  मान्यवरांच्या हस्ते करन्यात आले. काँग्रेस कार्यकर्त  मेळाव्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांना तलवार भेट देन्यात आली.


     कार्यक्रमाचे संचालन प्रणया गडङ्‌मवार व सुवर्णा ढाकुनकर, प्रास्ताविक तालूका काँग्रेस कमेटीचे अध्यक डॉ विजय गावंडे, आभार विजय डाबरे यांनी मानले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरीकांनी गर्दी केली होती कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी कॉंग्रेसच्या सर्व आघाडी सेल कार्यकत्यांनी परिश्रम घेतले


PostImage

Chunnilal kudwe

Sept. 17, 2023

PostImage

Wushu sports competition - जुनेद शहा जिल्ह्यातून प्रथम


नेरी येथील सरस्वती कन्या विद्यालयाची सरशी

 


     जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा नुकत्याच झाल्या या स्पर्धेत नेरी येथील इंदिरा ज्ञान प्रसारक मंडळ अंतर्गत येत असलेल्या सरस्वती कन्या विद्यालयाचा विद्यार्थी जुनेद शहा याने  वुशु या क्रीडा प्रकारात  जिल्ह्यातून प्रथम  क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे सरस्वती कन्या विद्यालय विद्यार्थी पारितोषीकात सरसी ठरत आहे.  


      जुनेद च्या यशाने परिसरात व  विद्यालयात आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. हा विद्यार्थी विभागीय स्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. या यशाचे श्रेय मुख्याध्यापिका अर्चना संजय डोंगरे , प्रशिक्षक डॉ.सुशांत इंदोरकर, चंद्रदास ढोले सर,सुनील पोहनकर सर, वर्ग शिक्षक नरहरी पिसे, आई, वडील व शाळेतील सर्व शिक्षकवृदांना दिले. यावेळी नेरी येथील इंदिरा ज्ञान प्रसारक मंडळ संस्थाचे सचिव संजय डोंगरे यांनी शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील निरंतर प्रगती झाली पाहिजे व प्रत्येक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहीजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे मनोगत व्यक्त केले.


PostImage

Chunnilal kudwe

Sept. 14, 2023

PostImage

आज चिमूर शहरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष Nana Patole व विरोधी पक्ष नेता Vijay wadettiwar विजय वडेट्टीवार


Congress workers meeting and felicitation of various dignitaries 

      चिमूर विधान सभा क्षेत्राचे समन्वयक माजी जि प अध्यक्ष डॉ सतिश वारजूकर यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व विवीध मान्यवरांचा सत्कार समारंभ १६ सप्टेंबर शनिवार ला दुपारी १२ वाजता चिमूर - वडाळा मुख्य मार्गावरील जुनी न्यु राष्ट्रीय प्रेरणा कॉन्वेंट, मिलन सभागृहाच्या बाजूला आयोजीत करण्यात आला आहे.


      या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस कमेटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कार्यक्रमाचे उद्दघाटक महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधीपक्ष नेता विजय वडेट्टीवार, कार्यक्रमाचे विशेष अतिथी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटी अध्यक्ष तथा आमदार सुभाष धोटे, वरोरा विधान सभा क्षेत्र आमदार प्रतिभा धाणोरकर, विधान परिषद आमदार अभिजित वंजारी, विधान परिषद आमदार सुधाकर अडबाले, ओबीसी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे, प्रदेश काँग्रेस कमेटी मुख्य प्रवक्ता अतूल लोंढे, माजी संपादक बाळ कुलकर्णी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी महासचिव जॅ अविनाश वारजूकर, महाराष्ट्र प्रदेश आदिवासी विभाग अध्यक्ष डॉ नामदेव उसेंडी, माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार आनंदराव गेडाम, प्रदेश काँग्रेस कमेटी महासचिव विनोद दतात्रय, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी महासचिव नामदेव किरसान, चंद्रपूर जि म सह. बँक अध्यक्ष संतोषसिंग रावत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी सचिव नितीन कोडवते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी सचिव संदीप गड्मवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी सचिव शिवा राव, चंद्रपूर शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष रामू तिवारी, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमेटी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, जिल्हाध्यक्ष सेवादल चंद्रपूर सूर्यकांत खनके, जिल्हाध्यक्ष चंद्रपूर महीला काँग्रेस कमेटी नम्रता ठेमस्कर, चंद्रपूर अनु.जाती सेल जिल्हाध्यक्ष प्रफुल खापर्डे, चंद्रपूर जिल्हा ओबीसी सेल अध्यक्ष प्रशांत दानव, चंद्रपूर जिल्हा आदिवासी सेल अध्यक्ष रमेश शेमले, अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष सोहेल रजा शेख, प्रमुख पाहुणे व जेष्ठ नेते महाराष्ट्र प्रदेश सेवादल सहसचिव प्रा राम राऊत, पंजाबराव गावंडे, समन्वयक राष्ट्रीय ओबीसी सेल  ॲड गोविंदराव भेंडारकर, अँड दिगांबर गुरपुडे, संजय डोंगरे, तालूका अध्यक्ष काँग्रस सेवादल किशोर शिंगरे, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी संघटक धनराज मुंगले, माधवबापू बिरजे, प्रा डॉ राजेश कांबळे, जेष्ठ नेते प्रा डॉ अमीर धम्माणी, जेष्ठ नेते प्रा डॉ मोहन जगनाडे, जेष्ठ नेते भिवराव ठावरी, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सरचिटनीस  गजानन बुटके, प्रा डॉ अनमोल शेंडे, विनोद बोरकर, खोजराम मरस्कोल्हे, प्रमोद चिमूरकर, स्मिता पारधी, ब्रम्हपूरी तालूका काँग्रेस कमेटी अध्यक्ष खेमराज तिडके, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटी उपाध्यक्ष सोपान खोडके, किसान सेल अध्यक्ष वामन मिसार, नैना गेडाम, तालूका काँग्रेस कमेटी धनराज मालके, तालूका काँग्रेस कमेटी संघटक ज्ञानेश्वर दडमल, संजय घुटके, राजू कापसे, शांताराम शेलवटकर , लता पिसे, जिल्हा महीला काँग्रेस कमेटी महासचिव माधूरी रेवतकर, जिल्हा काँग्रेस कमेटी महासचिव प्रदिप बंडे, महिला काँग्रेस कमेटी उपाध्यक्ष सविता चौधरी, गिता रानडे, भावना बावणकर आदी उपस्थित राहनार आहेत.


        कार्यक्रमाला उपस्थित राहन्याचे आवाहन चिमूर तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष डॉ विजय गावंडे, महाराष्ट्र प्रदेश संघटक (ओबीसी )धनराज मुंगले, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सरचिटनीस गजानन बुटके, नागभिड तालूका काँग्रेस कमेटी अध्यक्ष प्रमोद चौधरी, ब्रम्हपूरी तालूका अध्यक्ष नेताजी मेश्राम, काँग्रेस शहर अध्यक्ष अविनाश अगडे, नागभिड कांग्रेस शहर अध्यक्ष रमेश ठाकरे, चिमूर विधानसभा तालूका अध्यक्ष नितू गुरपुडे, चिमूर तालूका महिला काँग्रेस कमेटी अध्यक्ष वनिता मगरे, नागभिड तालूका महिला अध्यक्ष प्रणया गड्मवार, ब्रम्हपूरी तालूका महिला काँग्रेस कमेटी अध्यक्ष (विभागीय) दामिनी चौधरी, चिमूर शहर महिला कॉंग्रेस कमेटी अध्यक्ष गितांजली थुटे, नागभिड शहर महिला काँग्रेस कमेटी अध्यक्ष सुनिता डोईजड, चिमूर तालुका अनू. जाती सेल अध्यक्ष नर्मदा रामटेके, चिमूर तालुका अनू. जाती सेल अध्यक्ष लोकनाथ रामटेके, चिमूर तालुका अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष आरीफ शेख, चिमूर तालुका अनू. जमाती अध्यक्ष बालाजी कोयचाडे, चिमूर तालुका ओबीसी सेल विलास डांगे, अनू. जमाती संघटक रामदास चौधरी, चिमूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष रोशन ढोक आदीनी केले आहे.
.......................
 रक्तदान शिबीर -
डॉ सतिश वारजूकर यांच्या वाढदिवसा निमीत्त चिमूर तालूका काँग्रेस कार्यालय येथे १६ सप्टेंबर शनिवार ला सकाळी ११ वाजता रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
............................
काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात चिमूर तालूका काँग्रेस कमेटीच्या जनसंवाद पदयात्रेचा समारोप व जनसंवाद पदयात्रा मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीहरी बालाजी महाराज देवस्थान चिमूर येथून निघनार आहे. दरम्यान चिमूर येथील तालूका काँग्रेस कार्यालयाचे उद्धघाटण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होनार आहे.


PostImage

Chunnilal kudwe

Sept. 11, 2023

PostImage

Poet prakas kodape zadbolii honoured 'Shabdasadhak'Avard



         Zadi Shabdasadhak Award given by zadiboli Sahitya Mandal to poet Prakash Kodape was presented at a ceremony held at Nizbal Auditorium of Sandhya Niketan, Anandavan.


      At this time Gram Gitacharya Bandopant Bodhekar presided over the ceremony.  Dr. Vikas Amte, secretary of Maharogi Seva Samiti, Anandvan, famous theater artist Padmashri Dr. Parashuram Khune, Anandvan trustee Sudhakar Kadu, senior writer N. Go. Thute, poetess Ratnamala Bhoyer, poet Arun Zagadkar, Pandit Londhe etc. were present as chief guests.  Prakash Kodape was felicitated by the guest by giving badge, certificate, manvastra.  Prakash Kodape Chimur Pt.  S.  Internal Dist.  W.  Prof.  Working as Assistant Teacher in School, Sonegaon (Bay). His poetry anthology "Sangrash" has been published and his poems have been published in many newspapers.  He is the Secretary of Zadiboli Sahitya Mandal, Chimur.  Various literary activities are implemented by the board.  Kodape has been felicitated by all the members of Zadiboli Sahitya Mandal Chimur for honoring him with Zadi Shabdsadhaka Award by Zadiboli Sahitya Mandal, Chandrapur District Branch in recognition of his work.


PostImage

Chunnilal kudwe

Sept. 11, 2023

PostImage

Activities of Rotaries


विद्यार्थ्यांना वाटले शालेय उपयोगी साहीत्य

चिमूर रोटरी क्लब चा उपक्रम



      शिक्षक दिनाचे औचीत्य साधून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येरखेडा येथे शनीवार ला रोटरी क्लब चिमुरच्या वतीने शालेय उपयोगी साहीत्यासह नोटबुक, पेन आदी वस्तूचे वाटप करण्यात आले.


      यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष वैभव लांडगे सचिव विनोद भोयर डॉ. महेश खानेकर विशाल गंम्पावार राकेश बघेल पवन ताकसांडे प्रफुल बेत्तावार शाळेचे मुख्याध्यापक विनोद भोयर अतकरे, दंडारे, अमृतकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरुण खेडेकर व विलास बोरीकर आदी शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते


PostImage

Chunnilal kudwe

Sept. 5, 2023

PostImage

Teacher's - Black ribbons लावून अशैक्षणीक कामाचा Prohibition


शिक्षकदिनी शिक्षकांनी केला निषेध

सध्या राष्ट्रीय कार्याच्या नावाखाली शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामे करावी लागत आहेत. शिक्षकांना अध्यापन सोडून इतर कोणतीही अशैक्षणिक कामे सांगायला नको आहे .पण सध्या अध्यापन सोडून इतर सर्व अशैक्षणिक कामे करुन घेतली जात आहेत हे दुर्दैवी आहे.आम्हाला शिकवू द्या अशी शिक्षकांना मागणी करावी लागत आहे. शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे बंद करावीत या मागणीसाठी शासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा करण्यात आला आहे. पण शासन दखल घेत नसल्यामुळे शिक्षक भारतीच्या वतीने दि.५ सप्टेंबर २०२३ रोजी शिक्षकदिनी शिक्षक शासनाच्या या धोरणाचा निषेध म्हणून शाळेत दिवसभर काळ्या फीती लावून अध्यापन करण्यात आले.

५ सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन.हा दिवस देशातील प्रत्येक शिक्षकांसाठी महत्वाचा असतो.या दिवशी शिक्षकांचा देशभर गौरव व सन्मान होत असतो.पण अशैक्षणिक कामाच्या ओझ्यात शिक्षक भरडला जात आहे. आम्हाला शिकवू द्या अशी शिक्षकांची मागणी आहे.अशैक्षणिक कामे आणि ऑनलाईन कामांमुळे शिक्षक बेजार झाला आहे.अशैक्षणिक कामांचा निषेध करण्यासाठी शिक्षक भारतीच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून शासनाच्या अशैक्षणिक कामाच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला अशी माहिती शिक्षक भारती चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुरेश डांगे, कार्याध्यक्ष जब्बार शेख, सचिव नंदकिशोर शेरकी,राजाराम घोडके,निर्मला सोनवणे,विलास फलके, विरेनकुमार खोब्रागडे,रावण शेरकुरे, कैलाश बोरकर,शेषराव येरमे, क्रिष्णा बावणे, राजेश धोंगडे,संजय बोबाटे यांनी दिली आहे.


PostImage

Chunnilal kudwe

Sept. 5, 2023

PostImage

FDCM Khadsangi - गस्त करताना अवैध रेतीचे ट्रॅक्टर पकडले


  • Khadsangi Roving Squad यांची कारवाई

     

  • एफडीसीएमच्या भिसी बिटातील कक्ष क्रमांक १७ येथील घटना

     

    रात्रीच्या दरम्यान जंगलात fdcm ची petrolig gast सुरु असताना जंगलातील नाल्यातून दोन ट्रॅक्टर अवैध रेती भरुन भिसीकडे येताना गस्तीत असलेल्या अधिकार्याला दिसले असता दोन्ही ट्रॅक्टर चालकांनी ट्रॅक्टर सोडून पड काढन्याचा प्रयत्न केला. यापैकी एक ट्रॅक्टर पळून जान्यात यशस्वी झाला तर दुसरा ट्रॅक्टर रस्त्यात फसल्याने मिळाला. मात्र ट्रॅक्टर  चालक फरार झाला होता. फसलेले ट्रॅक्टर भिसी येथील रोशन गिरीधर लोहकरे यांच्या मालकीचे असल्याची माहीती समोर आली आहे.हि घटना रविवार ला पहाटेच्या दरम्यान एफडिसीएमच्या भिसी बिटातील कक्ष क्रमांक १७ मध्ये घडली.   

    भिसी नगर पंचायत हद्दीतील तिनं किमी अंतरावर असलेल्या जंगलातील कक्ष क्रमांक १७ मध्ये एक नाला आहे. पाऊसाचे दिवस असल्याने काही प्रमाणात त्या नाल्याला पाणि आहे. त्यामुळे फिरते पथक या जंगल परिसरात येनार नाही याच संधीचा फायदा घेत रेती तस्कर त्या नाल्यातील अवैध रेती चोरी करून नेत असल्याची माहीती fdcm च्या फिरते पथकाला  मिळाली. त्यानुसार FDCM ने साफळा रचून फिरते पथक यांनी पेट्रोलिंग गस्त राबवीली. जंगलातील नाल्यातून दोन ट्रॅक्टर रेती भरून येत असल्याचे FDCM ला दिसले हि बाब अवैध रेती तस्करांच्या लक्षात येताच ट्रॅक्टर चालकांनी ट्रॅक्टर तिथेच सोडून पड काढला. दरम्यान जिवाची पर्वा न करता अधिकार्यांनी खराब रस्ता काडी कचर्‍यातून धाव घेत एका फसलेल्या ट्रॅक्टर ला पकडले तर दुसरा ट्रॅक्टर पळून गेला त्याचा शोध घेने सुरु आहे. दरम्यान अधिकार्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून रेति भरलेले ट्रॅक्टर एफडीसीएम कार्यालय खडसंगी येथे जमा केले. सदरची कार्यवाही एफडिसीएम चे आरएफओ अमर सोनूरकर यांच्या मार्गदर्शनात फिरते पथकचे अधिकारी घोरफडे, वनरक्षक कांचन कन्नाके, वनमजूर निलेश काकडे, यादव गोठे, रामकृष्ण चौधरी, अनिकेत रामगडे यांनी  केली. त्यामळे नाल्यातील अवैध रेती चोरून नेनाऱ्यामध्ये वनविकास महामंडळची दहशत निर्माण झाली आहे. पूढील तपास FDCM करीत आहे.

  •  


PostImage

Chunnilal kudwe

Sept. 5, 2023

PostImage

Congress Mass Communication - नऊ वर्ष सत्तेत असलेल्या "modi" सरकारने देशातील हजारो शेतकऱ्यांना रस्त्यावर आनले


कॉंग्रेसच्या जन संवाद पदयात्रेला तालुक्यात नागरीकांचा  प्रतिसाद

 

लोकशाही मार्गाने निवडून आलेले केंद्रातील मोदी सरकार हुकुमशाहप्रमाणे वागत आहे. त्यांच्या अपयशी धोरणामुळे आजच्या घडीला महागाई गगनाला भिडलेली आहे जीवनावश्यक दूध, दही, आटा खरेदीवर GST तसेच बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले असताना फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इशाऱ्यावर महाराष्ट्र राज्यातील मोठे मोठे प्रकल्प फक्त गुजरात राज्यात नेले जातात. त्यामुळे राज्याच्या युवकांचा रोजगार हिरावल्या जात आहे. तर दुसरीकडे शेतीवर उत्पन्न दुप्पट करू व शेतमालाला दीडपट हमीभाव देऊ असे आश्वासन देऊन नऊ वर्ष  सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी सरकारने देशातील शेतकऱ्यांनाच आज रस्त्यावर आणून ठेवलेले आहे. अन्यायकारक असे कृषी कायदे आणल्याने देशातील देशातील हजारो शेतकऱ्यांना आपला जीवही गमवावा लागला असल्याचे चिमूर येथील काँग्रेस जनसंवाद पदयात्रा दरम्यान सोमवार ला नेहरू चौक येथील कार्नर सभेत चिमूर विधान सभा क्षेत्राचे समन्वयक डॉ सतिश वारजूकर बोलत होते.


        महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटीचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार संपुर्ण महाराष्ट्रात जन संवाद पदयात्रा सुरू आहे. याच अभियानाचा भाग म्हणून चिमुर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक महाराष्ट्र प्रदेश ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष  डॉ. सतिश वारजुकर यांचे मार्गदर्शनाखाली चिमुर तालुका कॉंगेस कमेटीचे तालुका अध्यक्ष डॉ. विजय गावडे यांचे नेतृत्वात चिमुर तालुक्यात जनसंवाद पदयात्रा सुरू आहे. या जनसंवाद पदयात्रेची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची तपोभूमी गोंदोडा येथून प्रारंभ झाली या जनसंवाद यात्रेला नागरीकांचा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या यात्रेदरम्यान विविध गावात जावुन कॉंगेस पक्षाच्या वतीने मिरवणुक व सभा घेणे सुरू आहे. या सभे दरम्यान महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या, आरक्षण अश्या विविध विषयांत मार्गदर्शन करण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात कार्यकर्त्यांचे भाषण सुरू असतांना नागरीक मोदी सरकार विरोधात प्रतिसाद देत आहे. २०१४ पूर्वी ४०० रुपयाला मिळणारा गॅस सिलेंडर आज १२०० रुपयाला मिळत आहे. ७० रुपये लीटरचा खाद्यतेल आज १२० रुपये लिटर झालेला आहे, ७० रुपयाला मिळणारा डिझेल आज १०० रुपये लिटर झाला आहे आणि ७० रुपये लिटर असलेला पेट्रोल आज ११० रुपये झालेला आहे. शेतीला १२ तास वीज देण्याचे आश्वासन देणाऱ्या तिघाडी सरकारच्या काळात ८ तासही वीज मिळत नाही. प्रचंड वीज दर वाढवून सर्वसामान्यांना तिघाडी सरकार लुटत आहे. भाजपा सरकार आल्यापासून शेतमालाला कधीही हमी भाव (MSP) मिळाला नाही. शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रु. देऊन खताच्या मशागतीच्या, किटकनाशकाच्या किंमतीतील खर्चात वाढ करुन शेतकऱ्यांकडून १२ हजार रुपये काढले जात आहे. याउलट शेती साहित्यांवर १८ टक्के GST लावला जात आहे. देशातील रेल्वे, वीज निर्मिती व वितरण, विमानतळे, बँका, वीमा कंपन्यांसह विविध सरकारी संस्था एकाच उद्योगपतीला विकण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे या क्षेत्रात असणाऱ्या शासकीय नोकऱ्यांचे खाजगीकरण होत असून या माध्यमातून SC, ST, OBC यांचा आरक्षण हिरावण्याचा काम मोदी सरकार सरकार करत आहे. देशातील मुठभर उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयाचे कर्ज मोदी सरकारने माफ केले, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. याउलट पिक विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची खुलेआम लुट केल्या जात आहे. 
          या पदयात्रेत प्रदेश कांग्रेस कमेटीचे प्रदेश महासचिव तथा माजी आमदार डॉ. अविनाश वारजुकर यांच्या मार्गदर्शनात तालुका अध्यक्ष डॉ विजय पाटील गावंडे, शहर अध्यक्ष अविनाश अगडे, कॉंग्रेसचे  जिल्हा सरचिटणीस तथा जि.प. माजी सदस्य गजानन बुटके, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाचे संघटक धनराज मुंगले, सेवादल कॉग्रेसचे प्रा. राम राऊत, जेष्ठ नेते कृष्णा तपासे, रामदास चौधरी, माजी जि प सदस्य विलास डांगे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक भरत बंडे, माजी प्राचार्य सुधिर पोहनकर, पर्यावरण समितीचे प्रदिप तळवेकर, सोशल मिडीया अध्यक्ष पप्पुभाई शेख, युवक कॉंग्रेसचे रोशन ढोक,साईस वारजूकर, नितीन सावरकर, नागेंद्र पट्टे, प्रशांत डवले, वामन डांगे, केशवराव वरखेडे, आशिष नलोडे, संकेत हरदास, अक्षय लांजेवार, मनिष नंदेश्वर, सविता चौधरी, गीतांजली थुठे, प्रिती दीडमुठे, भावना बावनकर,कमल राऊत, प्रज्वला गावंडे, गीता रानडे, नर्मदा रामटेके, कल्पना इंदूरकर रिता अंबादे, शहनाज शेख यांचेसह कॉग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते सहभागी आहेत.


PostImage

Chunnilal kudwe

Sept. 4, 2023

PostImage

Teacher's day - काळ्या फिती लावून शिक्षक करनार "अध्यापन"


शिक्षक भारती  करणार शासनाच्या धोरणाचा निषेध 


            हल्ली राष्ट्रीय कार्याच्या नावाखाली शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामे करावी लागत आहेत. शिक्षकांना अध्यापन सोडून इतर कोणतीही अशैक्षणिक कामे सांगायला नको आहे .पण सध्या अध्यापन सोडून इतर सर्व अशैक्षणिक कामे करुन घेतली जात आहेत हे दुर्दैवी आहे. आम्हाला शिकवू द्या अशी शिक्षकांना मागणी करावी लागत आहे. आजपर्यंत शिक्षक भारतीच्या माध्यमातून व शिक्षक आमदार कपिल पाटीलयांचे मार्गदर्शनात आणि म. रा. प्रा. शिक्षक भारती अध्यक्ष नवनाथ गेंड यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांकडील  अशैक्षणिक कामे बंद करावीत या मागणीसाठी शासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा केलेला आहे. पण शासन दखल घेत नसल्यामुळे शिक्षक भारतीच्या वतीने ५ सप्टेंबर शिक्षक दिनी शिक्षक शासनाच्या या धोरणाचा निषेध म्हणून शाळेत दिवसभर काळ्या फीती लावून अध्यापन करण्यात येणार आहे.


           ५ सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन हा दिवस देशातील प्रत्येक शिक्षकांसाठी महत्वाचा असतो. या दिवशी शिक्षकांचा देशभर गौरव व सन्मान होत असतो.पण अशैक्षणिक कामाच्या ओझ्यात शिक्षक भरडला जात आहे. आम्हाला शिकवू द्या अशी शिक्षकांची मागणी आहे. अशैक्षणिक कामे आणि ऑनलाईन कामांमुळे शिक्षक बेजार झाला आहे. अशैक्षणिक कामांचा निषेध करण्यासाठी शिक्षक काळ्या फिती लावून शासनाचा निषेध करणार असल्याची माहिती शिक्षक भारती चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुरेश डांगे यांनी दिली आहे.


PostImage

Chunnilal kudwe

Sept. 3, 2023

PostImage

चिमूर क्रांती भूमितील शुभम चा शिंपी समाजाने केला सत्कार


संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवणी समाधी सोहळा

अखिल भारतीय संत शिरोमणी शिंपी सोहळे समाज आयोजीत संत शिरोमणी देव महाराज संजीवनी समाधिला कार्यक्रमाचे विजयी श्री बालाजी महाराज देवस्थान चिमूर येथे रविवार दिव्यावंदना फाउंडेशनचे अध्यक्ष शुभम पसरकर यांचे स्वागत करण्यात आले.

 शुभम ची परिस्थिती हलाकीची असताना अति संघर्षातून अनेक निराधार, बेघर, बेवारस, व्याधीग्रस्त, आश्रित, भिक्षेकरी आदी नागरीकांना आपुलकीने सहकार्य उपचार करत नविन जिवण जगन्याची उमेद दिली. त्यांच्यासाठी हल्ली कार्य सुरूच आहे. त्यांच्या कामाची महत्ती पाहताच मुंबई येथील मराठा लाईफ फाऊंडेशन नुकतेच शुभम ला मानवसेवा पुरस्काराने सन्मानीत केले होते यांची दखल चिमूर येथील अखिल भारतीय शिंपी समाज यांनी घेत संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवनी समाधी सोहळा कार्यक्रमात शुभम चा सत्कार केला.


          सत्कार करताना महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभाग संघटक धनराज मुंगले, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सरचिटनीस गजानन बुटके, शिंपी समाज अध्यक्ष नेमाजी बोबडे, उपाध्यक्ष राजू लोणारे, राजेंद्र खाडे, संदिप कावरे, निखिल डोईजळ, अभिजीत बनगे, प्रशांत डवले, देविदास पसारे, गोविद गोहणे, दिवाकर चिंचोलकर, राकेश कापसे आदी उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Sept. 3, 2023

PostImage

OBC " संघटक " धनराज मुंगले यांचा सत्कार


संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा


             अखिल भारतीय शिंपी समाज चिमूर च्या वतिने आयोजित संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा कार्यक्रम रविवार ला चिमूर येथील श्रीहरी बालाजी देवस्थान येथे पार पडला. दरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग संघटक धनराज मुंगले यांचा सत्कार करण्यात आला . 


               यावेळी माजी सदस्य जिल्हा परिषद ग्रजानन बुटके, शिंपी समाज अध्यक्ष नेमाजी बोबडे, शिंपी समाज उपाध्यक्ष राजू लोनारे , काँग्रेस नेते कृषणा तपासे, कोषाध्यक्ष राजेंद्र खाडे, युवक मंडळ चिमूर अध्यक्ष संदिप कावरे, उपाध्यक्ष निखिल डोईजळ , सदस्य अभिजीत बनगे , प्रशांत डवले , राकेश कापसे, देविदास पसारे , दिवाकर चिंचोलकर , गोवींद गोहणे  , आदी शिंपी समाज बांधव उपस्थित होते .


PostImage

Chunnilal kudwe

Sept. 3, 2023

PostImage

Gondeda "Tapobhumi" - प्रार्थना करून कॉंग्रेस जनसंवाद पदयात्रेला सुरुवात


तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ता यांची उपस्थिती

 

      महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने संपूर्ण राज्यभरात काँग्रेस पक्षाच्या वतीने मोदी सरकारचे अपयश चव्हाट्यावर आणण्यासाठी जनसंवाद पदयात्रा काढण्यात आली आहे. त्याच अनुसंघाने चिमूर तालूका काँग्रेस कमेटीच्या वतीने या जनसंवाद पदयात्राची सुरुवात रविवार ला चिमूर क्रांतिभूमीतील प्रसिद्ध वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची तपोभूमी गोंदेडा येथे पार्थना करून करण्यात आली.
         दरम्यान जनतेपर्यत जाऊन जनेतच्या अडचणी, समस्या जानून घेत राज्यातील महागाई, बेरोजगारी, ओबीसी जनगनना, ओबीसी आरक्षण आदी केंद्रातील भाजप आणि राज्यातील ED सरकाचे अपयश लोकांना सांगण्यात येणार आहे. ही जनसंवाद पदयात्रा पहिल्या दिवशी गोंदेडा येथून निघून पळसगांव - विहीरगाव मार्गे मासळ येथे येवून पदयात्रेचे सभेत रूपांतर होवून मासळ ला मुक्काम राहनार आहे. या जनसंवाद पदयात्रेत प्रदेश काँग्रेस कमेमिटीचे महासचिव अविनाश वारजूकर प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग प्रदेश संघटक धनराज मुंगले ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष डॉ सतिश वारजूकर जिल्हा काँग्रेस सरचिटनीस गजानन बुटके सेवादल काँग्रेसचे प्रा. राम राऊत काँग्रेस तालूका अध्यक्ष विजय गांवडे काँग्रेस पर्यावरण समितीचे अध्यक्ष प्रदिप तळवेकर किशोर शिंगरे विलास डांगे नागेंद्र चट्टे अक्षय लांजेवार पप्पू शेख वामन गेडाम प्रशांत डवले तालुक्यातील युवक, महिला, शेतकरी, काँग्रेस सर्व सेल अध्यक्ष काँग्रेस कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ही जनसंवाद यात्रा दहा दिवसात तालुक्यातील २१४ कि मी चा टप्पा पार करनार आहे. असे त्यामुळे या जनसंवाद पदयात्रेत परिसरातील नागरीकांनी सहभाग दर्शवावा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी महासचिव डॉ. अविनाश वारजूकर यांनी केले आहे.


PostImage

Chunnilal kudwe

Sept. 2, 2023

PostImage

Congres padyatra - तुकडोजी महाराजांच्या तपोभूमी गोंदेडा येथून निघनार जनसंवाद पदयात्रा


जनसंवाद पदयात्रेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांची उपस्थीती

 

 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी मुंबई यांच्या सुचनेनुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात ३ सप्टेंबर रविवार पासून जनसंवाद पदयात्रा निघत आहे. त्या अनुसंघाने चिमूर तालुका काँग्रेस कमेटी जनसंवाद पदयात्रेची सुरुवात तालुक्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची तपोभूमी गोंदेडा येथून सुरुवात करणार आहे. अशी माहिती चिमूर तालुका काँग्रेस कमेटीचे तालूका अध्यक्ष विजय गावंडे शहर अध्यक्ष अविनाश अगडे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.


         हि जनसंवाद यात्रा ऐतिहासीक ठरणार असुन पदयात्रेच्या माध्यमातून चिमूर तालुक्यातील जनतेमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या अन्याया विरुद्ध जनजागृती करण्याचा काँग्रेसचा संकल्प आहे. राष्ट्रीय, राज्य व स्थानीक पातळीवरील जनसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणे. शासन पुरस्कृत महागाई, बेरोजगारी, भ्रष्ट्राचार अन्याय, अत्याचार व अन्य समस्यावर जनतेशी संवाद साधून जनभावणा जाणून घेने हाच पदयात्रेचा उद्देश आहे. चिमूर तालुक्यात जनसंवाद पदयात्रेला दिनांक ३ सप्टेंबर रविवार पासुन गोंदेडा येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या तपोभूमीतून सुरूवात होनार आहे. हि पदयात्रा भारत जोडो च्या धर्तीवर असून दररोज किमान २५ कि.मी. चा प्रवास होनार आहे. १० दिवसात तालुक्यात एकून २१४ किमी चा प्रवास पूर्ण करनार आहे. दरम्यान तालुक्यातील मासळ, खडसंगी, भिसी, चिमूर, शंकरपूर या ठिकाणी जनसभा होनार आहे. या जनसंवाद पदयात्रेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमीटीचे प्रांताध्यक्ष नाना पटोले, चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हध्यक्ष आम. सुभाष धोटे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सरचिटनीस डॉ. अविनाश वारजूकर, उपस्थित राहनार आहे. या जनसंवाद पदयात्रेचा समारोप १२ सप्टेंबर मंगळवार ला गोंदेडा येथील राष्ट्रसंताच्या तपोभूमीत होनार आहे.
        या जनसंवाद पदयात्रेत पन्नास पदयात्रीची निवड करण्यात आली आहे. या जनसंवाद पदयात्रेला चिमूर विधान सभा क्षेत्राचे समन्वयक डॉ सतिश वारजूकर, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभाग संघटक धनराज मुंगले, माजी जि. प. सदस्य गजानन बुटके, माधवबापू बिरजे, राम राऊत, विलास डांगे आदी उपस्थित राहनार आहे. या जनसंवाद पदयात्रेला चिमूर विधान सभा क्षेत्रातील नागरीक, शेतमजूर, युवक, महिला, विद्यार्थी यांनी उपस्थीत राहून सहभाग दर्शवावा असे आवाहन चिमूर तालूका कॉंग्रेस कमेटी अध्यक्ष डॉ विजय गावंडे, शहर अध्यक्ष अविनाश अगडे, तालूका युवक काँग्रेस संघटक अक्षय लांजेवार, चिमूर शहर उपाध्यक्ष गुरुदास जुनघरे, महिल तालूका काँग्रेस कमेटी अध्यक्षा वनिता मगरे, शहर अध्यक्षा गितांजली थुटे, तालूका काँग्रेस पर्यावरण विभाग अध्यक्ष प्रदिप तळवेकर, तालूका काँग्रेस किसान सेल विभाग अध्यक्ष राजू कापसे, तालूला काँग्रेस अनुसुचित जमाती अध्यक्ष बालाजी कोयचाडे, तालूका काँग्रेस अनुसुचित जाती अध्यक्ष लोकेश रामटेके तथा सर्व चिमूर काँग्रेस कमेटी आघाडीने केले आहे.
   .........................
 असा राहनार कार्यक्रम -
३ सप्टेंबर रविवार ला सकाळी ६ वाजता गोंदेडा येथून जनसंवाद यात्रा शुभारंभ पळसगाव विहीरगाव मासळ येथे सभा मुक्काम, ४ सप्टेंबर सोमवार ला सातारा टेकेपार तळोधी चिमूर ला सभा मुक्काम, ५ सप्टेंबर मंगळवार ला चिमूर खडसंगी सभा मुक्काम, ६ सप्टेंबर बुधवार खडसंगी नवेगाव मालेवाडा नेरी येथे सभा मुक्काम, ७ सप्टेंबर गुरुवार ला नेरी सिरपूर जांभूळघाट आंबेनेरी भिसी येथे सभा मुक्काम, ८ सप्टेंबर गुरुवार ला भिसी पुयारदंड गडपिपरी चिचाळा आंबोली शंकरपूर येथे सभा मुक्काम, ९ सप्टेंबर शनिवार शंकरपूर हिरापूर डोमा नवतळा सभा व मुक्काम, १० सप्टेंबर रविवार ला नवतळा काजळसर मोटेगाव येथे सभा मुक्काम, ११ सप्टेंबर सोमवार ला मोटेगाव महादवाडी वडसी गोंदेडा येथे सभा मुक्काम, १२ सप्टेंबर मंगळवार ला गोंदेडा येथे जाहीर सभा व जनसंवाद यात्रेचा समारोप


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 31, 2023

PostImage

Deputy "CM" भेटले केली चर्चा


जिल्हा सरचिटणीस अरविंद रेवतकर यांनी मांडला भिसी तहसीलचा मुद्दा



        अनेक वर्षांपासून भिसी तालूका व्हावा अशी मागणी होत असताना भाजप सरकारने काही वर्षापूर्वी भीसी ला अप्पर तहसिल केले. मात्र अप्पर तहसिल मध्ये कोणतेही काम वेळेवर होत नाही. कार्यालयात कधी अधिकारी कर्मचारी हाजर असतात तर कधी गैरहाजर असतात त्यामुळे उलट चिमूर तहसीलला जावून नागरिकांना दोन तिन वेळा चकरा मारून कामे करून घ्यावी लागत आहे. त्यामुळे भिसीला पूर्ण तहसीलचा दर्जा मिळाला पाहीजे यासाठी चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस सरचिटनीस (अ.प. गट ) यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली.


        यावेळी किशोर गभणे, विनोद नवघडे, अमृत बन्सोड, पंकज रेवतकर, प्रणय खवसे, चेतन पडोळे, देवा घुटके, जगत तांबे, शुभम सहारे, रोहीत गभणे, राहुल कामडी, अक्षय नागपूरे , शैलेश बावणे, रोशन रेवतकर, सौरभ कामडी आदी उपस्थीत असताना दरम्यान राज्याचे खाद्य व औषधी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या उपस्थीत मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटनिस अरविंद रेवतकर यांच्या नेतृत्वात सर्वानी राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प. गटात ) पक्षात प्रवेश घेतला.


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 31, 2023

PostImage

Chimur News "CEO" शाळा भेटीला येताच विद्यार्थीनी बांधली राखी


 बोथलीच्या जि प उच्च प्राथ.शाळेच्या विद्यार्यांचा आनंद व्दिगूणीत

 

               पंचायत समिती चिमूर अंतर्गत येत असलेल्या जि. प. उच्च प्राथमिक शाळा बोथली येथे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी अचानक गुरुवार ला आकस्मिक भेट दिली दरम्यान विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन निमीत्त त्यांना ओवाळून राखी बांधली त्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद व्दिगुणीत झाला.

       मुख्य कार्यकारी अधिकारी जॉनसन यांनी आकस्मिक शाळेत भेट दिली भेटी दरम्यान आठ पाकळ्यांची पोषण वाटीका, निपूण भारत अंमलबजावनी बाबत पाहनी केली. ग्रामपंचायत च्या माध्यमातून उमेद अंतर्गत बचत गटाच्या औजार बँकेस भेट, जलजीवन मिशन अंतर्गत कामाची पाहणी केली.

      यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, कपील कलोडे, गटविकास अधिकारी राजेश राठोड, गटशिक्षणाधिकारी वृशाली गड्डमवार, सरपंच विनोद देठे, उपसरपंच देविदास नन्नावरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास नन्नावरे, ग्रामसेवक नरड, गटसाधन केंद्राचे संजय पंधरे, जितेंद्र बगडे, मुख्याधीपीका अर्चना नवघडे शाळेचे पदाधीकारी, शिक्षक, कर्मचारी व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 31, 2023

PostImage

Human Service Award Chimur - चिमूर क्रांती भूमीतील अनाथांचा नाथ शुभम ला मानव सेवा पुरस्कार


- सिंधूताई सपकाळ व वंचळाबाई लोखंडे स्मृतीप्रित्यर्थ

 

          मराठा लाईफ फाउंडेशन व जीवन ज्योत ड्रग्ज बँक, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, नशामुक्ती केंद्र सिंधूताई सपकाळ व वंचळाबाई लोखंडे यांच्या स्मृृतीप्रित्ययर्थ मराठा लाईफ फाउंडेशन चे संस्थापक किसन लोखंडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत जांभूळपाडा, भालीवली, मुंबई येथे ३० ऑगस्ट २०२३ बुधवारला चिमूर क्रांती भूमीतील अनाथांचा नाथ दिव्यवंदना आधार फाउंडेशनचे अध्यक्ष शुभम पसारकर यांना मानव सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

         चिमूर क्रांती भूमितील रहीवासी शुभम पसारकर असे व्यक्ती महत्व आहे की ज्यांची परिस्थिती हलाकीची असताना सुद्धा सामाजीक संघर्षातून मार्ग शोधत अनाथाच्या नाथान अल्पावधीतच नाव लौकीक करत विश्व निर्माण केल. शुभम ला बालपणापासूनच भुकेल्यांना अन्न व गरजूंना मदत करने आवडत होते. शुभमचे शिक्षण कळत न कळत जेमतेम पदवी पर्यंत झाले असले तरी मात्र काही कारणास्तव वयाच्या सतराव्या वर्षी घर सोडून एका हॉटेलात नौकरी केली. हॉटेलात नौकरी करत असतांना अस लक्षात आल की असे खूप लोक रस्त्यावर उपाशी आहेत जे लोक या हॉटेलमध्ये काही वाया गेलेलं अन्न मागायला येतात ते पण त्यांना दिल जात नाही अशा लोकांची अशी बिकट वाईट परिस्थिती पाहून शुभमच्या मनाला ठेच लागली तेव्हाच निश्चय करत शुभमने वर्तमान स्थितीत गरजू लोकांसाठी काम करण्याचा निश्चय केला. काळ परतवे काही वर्ष त्यांनी नागपूर मध्ये पाच वर्ष सेवा देत 2022 मध्ये दिव्यवंदना आधार फाऊंडेशनची स्थापना केली. शुभमने स्वता अतोनात कष्ट करत व लोकांनी दिलेली स्व मदत, लोकवर्गनी, सेवाभावी दानातून रोडवरील बेघर, बेवारस, भिक्षेकरी, निराधार, अनाथ, लोकांच्या स्वप्नातील घर ( निवारा ) बांधकामाला हल्ली चिमूर क्रांती भूमी व भिसी अप्पर तहसील साज्यातील जांमगाव (कोमटी ) येथे सुरुवात केली आहे.

         शुभम ने कोरोणा काळात ज्यांच कोणी नाही अशा लोकांना मदत करत आश्रय देत काहींचा उपाचार केला उपचारातुन बरे झालेल्यांना त्यांच्या घर पर्यत पोहचविण्याच काम केल त्याच कामाची पावती व सहकारी नागरीकांच्या सहकार्याने शुभम ला मानव सेवा पुरस्कार मिळाला. मानवसेवा पुरस्कार मिळ्याबदल शुभमच्या चाहत्यांनी व चिमूर क्रांती भूमी परिसरातील नागरीकांनी कौतुक केले आहे दरम्यान मराठा लाईफ फाऊंडेशन ने ५१ हजार रुपयांचा धनादेश दिव्यवंदना आधार फाऊंडेशनला बांधकामासाठी मदत म्हणून दिला आहे. चंद्रपूर जिल्यातील चिमूर तालुक्यातील जांमगाव (को) येथे भिक्षेकर्यांसाठी हे पहिलं केंद्र असून आपनही बांधकामासाठी आर्थिक मदत देत दिव्यवंदना आधार फाऊंडेशन बळकट करा असे आव्हान संस्थेचे अध्यक्ष शुभम पसारकर यांनी केले आहे.


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 30, 2023

PostImage

Chimur Raksha bandhan - बहिनींने बांधलेल्या राखीचे रक्षण करण्याची जबाबदारी आमची ( police )


चिमुर रोटरी क्लबच्या वतीने चिमूर पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन

............................................

 

रोटरी क्लब चिमूरच्या वतीने पोलीस स्टेशन चिमूर येथे दुपारी १२ वाजता रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला. कर्तव्यावर कार्य करीत असतांना समाजाची सेवा व बहिनींनी बांधलेल्या राखीचे रक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे आणि आम्ही ती पूर्ण करणार असा विश्वास राखी बांधना-या भगिनींना पोलीस भावांनी दिला.

या कार्यक्रमाला उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव, पोलीस निरीक्षक मनोज गभने, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद जांभळे, पोलीस उपनिरीक्षक भिष्मराज सोरते, पोहवा गणेश चलाख, पोहवा श्यामराव धुर्वे, पोहवा विलास निमगडे, ना. पो. अ. कैलास आलाम, पो. अं. भरत घोडवे, पो. अं. शैलेश मडावी, पो. अं. सुखराज यादव, पो. अं. दिलीप वाळवे, पो. अं. चंद्रशेखर श्रीरामे, पो. अं. कृणाल राठोड, पो. अं. धनराज कोडापे, पो. अं. देविदास रणदिवे आदी उपस्थित होते.

रोटरी क्लब चिमुरच्या वतीने अर्चना भोयर, निता लांडगे, डॉ. आश्लेषा लांडगे, सपना बेतावार, डॉ. पोर्णिमा खानेकर, सपना गंप्पावार, अश्विनी रोकडे, प्रियंका बघेल, राजश्री ताकसांडे, मनिषा मोडक आदी महिला भगिनी उपस्थित होत्या.

रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे, वैभव लांडगे, सचिव रोटे. विनोद भोयर, ट्रेझरर रोटे. राकेश बघेल, रोटे. विशाल गंप्पावार, रोटे. डॉ. महेश खानेकर, रोटे. गुरुदास ठाकरे, रोटे. खुशाब रोकडे, रोटे. पवन ताकसांडे, रोटे. विलास अल्लडवार, रोटे. प्रफुल बेत्तावार आदी उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 30, 2023

PostImage

"Shivling" ( शिवलिंग ) found while digging in front of the temple


नेरी  येथील पार्वती मंदिरा समोरील बांधकामसाठी खोदकाम करताना काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या दोन " शिवलिंग " आढळल्या

 

           चिमूर तालुक्या पासुन १० किमी अंतरावर असलेल नेरी हे पुरातन वास्तूसाठी प्रसिद्ध असलेल गाव असून या गावात पुरातन काळातील अनेक वास्तू यापूर्वी सापडलेल्या आहेत. दि 30 ऑगस्ट रक्षा बंधनाच्या दिवसी बुधवार ला स्थानीक पार्वती मंदिर समोर बांधकाम सुरू करण्यासाठी खोदकाम करण्यात आले या कामात पौराणिक शिल्प असलेल्या दोन शिवलिंग आढळून आल्या नागरीकांनी पूजा अर्चा करून दोन्ही शिवलिंग बाहेर काढले.

            पौरानीक शिल्प, वस्तू असलेल्य नेरी गावात पुरातन हेमांडपंती मंदिर, जोड हनुमान मंदिर, पार्वती माता मंदिर मूर्ती, विष्णूजी मंदिर असे अनेक पुरातन मंदिर आहेत. येेथील हेमाडपंथी मंदिरात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी वास्तव्य केले आहे. दरम्यान पार्वती माता मंदिराचे संभामांडप उभारणीसाठी मंदिराच्या अगदी समोर खोदकाम सुरू असताना त्या ठिकाणी खोदकाम करणाऱ्या मजुरांना मोठा दगड असल्याचे जाणवले त्यामुळे याची माहिती गावातील नागरिकांना दिली त्यानंतर सदर जागेचे खोदकाम जेसीबी च्या साहाय्याने करण्यात आले. त्यावेळी त्या जागी काळ्या दगडाची एक शिवपिंडी व पांढऱ्या दगडाची एक शिवपिंड अश्या 2 शिवपिंडी सापडल्या.

               नारळी पौर्णिमेला शिवपिंडाचे दर्शन झाल्याने नागरिकांत नव चैतन्य निर्माण झाले आहे. सदर शिवपिंड मिळाल्याची माहिती गावात पसरताच दर्शनासाठी शेकडो नागरिकांनी गर्दी केली सदर खोदकामात शिवलिंग मिळाल्याची माहिती ग्रामपंचायत ला देण्यात आली असता खोदकाम करताना ग्रामपंचायत सदस्य संदीप पिसे पिंटू खाटीक आदी उपस्थित झाले होते या विषयीची माहिती पुुरातन विभागाला देण्यात आल्याचे समजले


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 30, 2023

PostImage

Business news - Student Activities - "Learn and Earn" शिका आणि कमवा


जि. प. उर्दू शाळेत "शिका आणि कमवा" उपक्रम

 

        जिल्हा परिषद ऊर्दू उच्च प्राथमिक शाळा चिमुर येथे ३० ऑगस्टला रक्षाबंधन त्यौहारानिमित्त विद्यार्थ्यांना राखी बनविण्यासाठी प्रक्षिक्षण देण्यात आले. नंतर त्यांनी झी-सेल मध्ये पन्नास टक्के राखीवर सुट म्हणजे विस रूपयांची राखी १० रूपयांमध्ये व दहा रूपयांची राखी पांच रुपयांमध्ये विक्री केली. त्यांनी एकुण ४० राख्या "शिका आणि कमवा" उपक्रमात तयार करून ४०० रुपयांना विकल्या. राखी तयार करण्यासाठी साहित्य खरेदी किंमत १०० रूपये व विक्री किमंत ४०० रूपये व नफा ३०० रूपये झाला.

 

मुख्याध्यापिका कमरुन्निसा मो. अली सय्यद यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य असेल तर कौतुक होईल व बेरोजगारीची समस्या सोडविता येईल. नफा, तोटा, खरेदी किंमत, विक्री किंमत, शेकडा नफा, शेकडा तोटा इत्यादी आवश्यक व्यवहारीक गणितीय संबोध प्रात्यक्षिक करून दाखविल्याने गणित विषय सोपा होतो. या कार्यक्रमाचे आभार महेविश शेख शिक्षणप्रेमी यांनी मानले.


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 29, 2023

PostImage

Death news - राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. अंथोनी यांचे निधन


चिमूर येथील गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमुरचे माजी प्राचार्य डॉ. पी. व्ही. अंथोनी वय ६६ वर्ष यांचे मंगळवारला सकाळी दहा वाजता दरम्यान  माणिक नगर येथील निवासस्थानी (व्हीला) येथे हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले.

 

डॉ. अंथोनी हे ख्रिश्चन धर्माचे असुन राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय, चिमूर येथे सन १९९१ ते २००३ या काळात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. नागपूर विद्यापीठाने त्यांना सन २००४ मध्ये पदोन्नती देत त्याच महाविद्यालयात प्राचार्य पदावर नियुक्त केले होते. त्या नंतर त्यांनी सन २०१९ पर्यंत सेवा देत सेवानिवृत्त झाले होते. ते मुळचे केरळ राज्यातील रहिवासी होते. मात्र, सेवा निवृत्ती झाल्यानंतर येथील ऋणानुबंधाने चिमूर येथेच कायमचे वास्तव्यास होते.

विध्यार्थी प्रिय अशी त्यांची ओळख होती. अनेक विद्यार्थ्यांना घडविण्यात त्यांचे मोलांचे सहकार्य होते. गांधीसेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. दिपक यावले, सचिव विनायक(कन्हैया) कापसे, सहसचिव नारायण डांगाले, सदस्य गोहणे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अश्विन चंदेल, सहकारी प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या. त्यांचेवर बुधवारला ब्रम्हपुरी येथे ख्रिश्चन मिशनरी तर्फे अंतिम संस्कार होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे.


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 29, 2023

PostImage

Homegard News - होमगार्ड सैनिकांच्या न्याय मागण्या मान्य करा ..


आमदार प्रतिभा धानोरकर यांचे राज्य सरकारला पत्र

 

महाराष्ट्र होमगार्ड सैनिकांच्या 10 दिवसीय राज्यव्यापी आंदोलनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र राज्य होमगार्ड महासंघाने निवेदन दिले आहे. या पार्श्वभूमीवर वरोरा - भद्रावती मतदारसंघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी होमगार्ड सैनिकांच्या न्याय मागण्या मान्य करण्यात याव्या यासाठी राज्य सरकारला पत्र पाठवीले आहे.

केंद्र सरकारच्या उपसचिवांनी काढलेल्या दि. 17 जानेवारी 1984 चा आदेश चे अमलबजावणी करून होमगार्डना 365 दिवस नियमित करण्यात यावे, बॉम्बे होमगार्ड ॲक्ट 1947 मधील दर 3 वर्षानी होणाऱ्या पुर्ननोंदणी पुनर्नियुक्ती प्रणाली अथवा पद्धत कायमस्वरूपी बंद करण्यात यावी, पोलीस विभाग प्रमाणेच राज्याचे दर आर्थिक वर्षी त्यांचा बजट सत्रात होमगार्ड विभाग करिता स्वतंत्र बजट ची व्यवस्था निर्माण करावी व प्रतिवर्ष महागाई दरानुसार होमगार्ड विभागाला महागाई भत्ता उपलब्ध करण्याचे विधान तयार करण्यात यावे, इतर राज्या प्रमाणे महाराष्ट्र राज्य मध्ये देखील 3 वर्षे सेवा देवू केलेले होमगार्ड सैनिकांना पोलीस विभाग, वन विभाग इत्यादी शासकीय प्रशासकीय विभागात 5 टक्के आरक्षण सह भरती निवळ प्रक्रियेत वयात आणि उंचीत विशेष सवलत देवूनी सरळ भरती वा नेमणूक देण्यात यावी, बॉम्बे होमगार्ड अधिनियम 1947 कलम 9 नुसार होमगार्ड हा लोकसेवक समजण्यात येतो त्यानुसार होमगार्ड प्रशासकीय लोकसेवकांप्रमाणे सोयी सेवा सुविधा देण्यात यावे, होमगार्ड सैनिकांची सेवानिवृत्ती वयोमर्यादा किमान 60 वर्षे पर्यंत करण्यात यावी, माननीय सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होमगार्ड सैनिकांना सातव्या वेतनानुसार रु. 990 रुपये दर प्रमाणे मानधन वेतनमाण वाढवून देण्यात यावे अशा मागण्याचा समावेश होमगार्ड महासंघाचे अध्यक्ष डॉ प्रतापराव पाटील यांनी दिलेल्या निवेदनात आहे.

या संदर्भात आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले की, होमगार्ड सैनिकांना गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या न्याय मागण्यांसाठी संघर्ष करावा लागत आहे. यावेळी होमगार्ड सैनिकांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. राज्य सरकारने या मागण्या माण्य करून होमगार्ड सैनिकांना न्याय दिला पाहिजे यासाठी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे.


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 28, 2023

PostImage

चिमूर येथे १० सप्टेंबर ला भव्य दही हंडी स्पर्धा


सिने अभिनेत्री अमृता खानविलकर यांची उपस्थिती

 

भांगडिया फॉउंडेशनच्या वतीने 10 सप्टेंबर रविवार ला सायंकाळी 4 वाजता चिमूर येथील नेहरू विद्यालयाच्या प्रांगणात भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध सिने अभिनेत्री चंद्रमुखी फेम अमृता खानविलकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या दही हंडी स्पर्धाचे उद्धघाटण माजी आमदार मितेश भांगडीया करनार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चिमूर  विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया उपस्थीत राहनार आहेत.

 

चिमूर विधानसभा क्षेत्रात मागील दहा वर्षापासुन सामाजिक  क्षेत्रासह विवीध क्षेत्रात भांगडिया फॉउंडेशन चे मोठे योगदान आहे या फॉउंडेशनच्या माध्यमातून जनतेच्या हिताचे विविध कार्यक्रम, उपक्रम राबवील्या जातात. दरवर्षी प्रमाने याही वर्षी शहरात दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आहे. या स्पर्धेचे प्रथम बक्षीस 33,333 रुपये तर द्वितीय बक्षीस 22,222 रुपये आहे राहणार आहे तरी या दहीहंडी स्पर्धेला विदर्भातील जास्तीत जास्त गोविंदा पथकानी नोंदणी करण्याचे आवाहन भांगडिया फॉउंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे.


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 28, 2023

PostImage

सोशल मिडीयाची नविन टिम करणार चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे हात मजबूत


नागपूर येथे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान...

 

        अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने वनामती सभागृह नागपूर येथे आयोजित एकदिवसीय सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी सोशल मीडियाच्या नवीन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र काँग्रेसचे सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांनी जिल्हात सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसचे हात मजबूत करण्यासाठी एकजुटीने व ताकदीने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. 

यावेळी राजुरा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष म्हणून प्रा. प्रफुल शेंडे, चंद्रपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष म्हणून सारंग शंकरराव चालखूरे, बल्लारशा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष म्हणून प्रशांत झाडे, ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष म्हणून चोकेश्वर भरडकर, चिमूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष म्हणून श्रीकृष्ण झिल्लारे आदि पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. तर लवकरच जिल्हा सोशल मीडियाचे अन्य पदाधिकारी, जिल्हातील सर्व विधानसभा क्षेत्रातील अध्यक्ष व त्यांच्या टिम मधील अन्य पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात येणार आहे. 

या कार्यशाळेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, आकाश तायवाडे, सुमित लोणारे, बिलाल अहमद, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष मुन्ना तावाडे उपस्थित होते.

सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, वरोरा विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष रामु तिवारी, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष नम्रताताई ठेमस्कर यासह जिल्हा काँग्रेस व स्थानिक विधानसभा काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 28, 2023

PostImage

एड्स पथनाट्य स्पर्धेत ग्रामगीता महाविद्यालय प्रथम


निमित्त आंतरराष्ट्रीय युवा दिन -

 

 एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष सामान्य रुग्णालय चंद्रपूर व रोटरी क्लब चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एड्स पथनाट्य स्पर्धेत ग्रामगीता महाविद्यालय चिमूर च्या चमूला प्रथम पारितोषिक मिळाले.

       आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्याने चंद्रपूर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध महाविद्यालयाच्या जवळपास चौदा चमुने या स्पर्धेत भाग घेतला होता. ग्रामगीता महाविद्यालयातील रेड रिबीन क्लब व राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमाच्या अंतर्गत प्रशिक्षक लेखक दिग्दर्शक सचिन भरडे यांच्या मार्गदर्शनात पथनाट्य सादर करण्यात आले. पहिल्यांदा महाविद्यालयाने प्रथम सहभागी होत पहिले पारितोषिक प्राप्त केले. दरम्यान कोमल डहारे, साक्षी कौरासे, गौरी चंदनखेडे, लक्ष्मी पिंपळकर, वैशाली गायकवाड, सानिका बारापात्रे, आरती अरके, आकाश पाटील या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. उपजिल्हा रुग्णालय चिमूर च्या समुपदेशक कामिनी हलमारे यांचे मार्गदर्शन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमीर धम्मानी यांचे प्रोत्साहन व महाविद्यालयाचे रेड रिबीन क्लब समन्वयक प्रा.डॉ. निलेश ठवकर तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. बिजनकुमार शील यांचे सहकार्य लाभले.


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 28, 2023

PostImage

प्रा. चरडे यांची गोंडवाना विद्यापीठाच्या ग्रामगीता अध्यासन केंद्र सल्लागार समितीवर नियुक्ती


 

 

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे कुलसचिव यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीता अध्यासन केंद्राच्या सल्लागार समितीवर चिमुर येथील प्रा. अशोक चरडे यांची नियुक्ती केली. 

      प्रा. अशोक चरडे यांनी नेहरू विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चिमुर येथे प्रदिर्घ व्याख्याता म्हणुन सेवा केली आहे. ते श्री गुरुदेव सेवा मंडळ चिमुरचे बरेच वर्षे ग्रामसेवाधिकारी होते. गुरुकुंज आश्रम मोझरीच्या कार्यकारणीत त्यांना घेण्यात आले होते. ते गुरुकुंज आश्रमचे आजीवन प्रचारक आहेत. संपुर्ण विदर्भात अनेक खेडे व शहरी भागात राष्ट्रसंताच्या ग्रामगीतेवर आधारीत समाजप्रबोधन, राष्ट्रीय एकात्मता, आदर्श गाव, सर्वधर्म समभाव, महिलोन्नती, व्यसनमुक्ती आदी विषयावर त्यांनी किर्तन व प्रवचनाचे कार्यक्रम केले व राष्ट्रसंताच्या साहित्याचा ते आजही प्रचार करीत आहे.

       प्रा. अशोक चरडे यांच्या नियुक्तीबद्दल अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे, प्रचारसेवाधिकारी प्रकाशराव वाघ महाराज, उपसेवाधिकारी दामोधर (पाटील, प्रचार सचिव सुशील बनवे, ग्रामगीता परिक्षा प्रमुख गुलाबराव खवसे, गुरुदेव मासिकांचे प्रकाशक गोपाळराव कडु, सरचिटणीस जनार्धन बोथे, चिमुर गुरुदेव सेवा मंडळाचे ग्रामसेवाधिकारी वसंतराव कडु, सचिव परमानंद बोरकर, उपग्रामसेवाधिकारी बाबाराव दोहतरे, विठ्ठलराव सावरकर, नथ्थुजी भोयर, तालुका सेवाधिकारी अतकरे आदीने अभिनंदन केले आहे.


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 27, 2023

PostImage

3 सप्टेंबर ला जनसंवाद पदयात्रा


गडचिरोली जिल्ह्या काँग्रेस कमिटीच्या वतीने 3 सप्टेंबर पासून जनसंवाद पदयात्रा सुरु होणार असून पदयात्रेच्या यशस्वीतेकरिता आज वडसा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी आमदार आनंदराव गेडाम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव डॉ. नामदेव किरसान, जिल्हा उपाध्यक्ष परसराम टिकले, तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, प. स. माजी उपसभापती नितीन राऊत, नरेंद्र गजपुरे, माजी नगरसेवक हरीश मोठवानी, अरिफ खालानी, जावेद शेख, अरुण कुंभलवार, मनोहर निमजे, टिकाराम सहारे, आरती लहरी, यामिना कोसरे, रजनी आत्राम, जयमाला पेंदाम, पंकज चहांदे, चंद्रकांत भरे सह काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 27, 2023

PostImage

श्री संत जगनाडे महाराज यांच्या जिवण चरित्र विषयी नाट्या प्रयोगा विषयी सभा


विदर्भ तेली समाजाच्या वतीने चंद्रपूर येथे दिनांक ०९ सप्टेंबर २३ ला श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवन चारित्र्यावर आधारित होत असणाऱ्या नाट्यप्रयोगाविषयी सभा रविवार दिनांक २७ ऑगस्ट ला चिमूर येथील विश्राम गृह येथे घेण्यात आली. 

यावेळी डॉ. विश्वास झाडे चंद्रपूर, सोनल भरडकर घुग्गुस , अभय घटे चंद्रपूर, दिनेश बोरपे घुग्गुस, निलेश लांजेवार घुग्गुस, तालुका अध्यक्ष तेली समाज ईश्वर डुकरे, सहसचिव पितांबर पिसे, उपाध्यक्ष विलास बंडे , धनराज वंजारी, भास्कर बावनकर, अशोक चौधरी शंकरपूर तेली समाज अध्यक्ष, कवडू लोहकरे , अंकुश मेहरकुरे , दीपक रेवतकर, तेली समाज संघटक माधुरी दीपक रेवतकर, वैभव दांडेकर, रुपेश करकाडे, राकेश बावनकर आदी उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 27, 2023

PostImage

लाखापूर गावातील प्रत्येक घराला मिनार पिण्याचे शुद्ध पाणि


पंतप्रधानांनी दिला  लाखापूर ग्रामपंचायत ला अवार्ड

 

       पाण्यासाठी अनेक गावांना भटकंती करावी लागत असताना विहीर किंवा बोरवेल व्दारे शुद्ध पाणि मिळत नव्हते. नागरीकांचे आरोग्य धोक्यात येत होते. त्यामुळे केंद्र सरकारने नागरीकांचे जिवनमाण सुधारण्यासाठी जल जिवण मिशण योजना अंतर्गत हर घर नल हर घर जल योजना अमलात आनली. या योजने अंतर्गत लाखापूर ग्रामपंचायतील गावात शंभर टक्के नळ जोडणी झाली त्यामूळे लाखापूर गावातील प्रत्येक घरात पिण्याच शुद्ध पाणि मिळनार आहे.

         जल जिवन मिशन अंतर्गत चंद्रपूर जिलह्यातील व ब्रम्हपूरी तालुक्यातील लाखापुर ग्राम पंचायतची लोकसंख्या अंदाजे दोन हजारच्या घरात आहे. या गावातील प्रत्येक घरात वैयक्तिक १०० % नळजोडणी झाल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे कडून अवॉर्ड प्राप्त झाल्याने खासदार अशोक नेते व माजी आमदार अतुल देशकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार व अभिनंदन कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालय लाखापुर येथे रविवार ला आयोजित करण्यात आला होता.

       यावेळी मंचावर गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोक नेते, माजी आमदार तथा लोकसभा संयोजक प्रा.अतुल देशकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, सरपंच चंद्रकला मेश्राम, उपसरपंच मालन गायकवाड, ब्रम्हपुरी भाजपा शहराध्यक्ष अरविंद नंदुरकर, ओबीसी मोर्चा शहर अध्यक्ष प्रा. सोलोटकर, नगरसेवक मनोज वठठे, प्रसिद्धी प्रमुख संजय लांबे, ग्रा.प.सचिव भुमेशवर हुमे, ग्रा.प.सदस्य श्रावण दुधकुळे, ग्रा.प.सदस्या निला राऊत, लता कुथे,जयपाल राऊत, हरीचंद बनकर आदी उपस्थित होते.

       पूढे बोलताना खासदार अशोक नेते म्हणाले की, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर नल, हर घर जल हि योजना आणली. हि योजना नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी आहे. या योजनेद्वारे प्रत्येक घरात पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे. हा योजनेचा उद्देश आहे यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत लाखापुर या गावातील प्रत्येक वैयक्तिक १०० % नळ जोळणी झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लाखापुर ग्रामपंचायतीला अवॉर्ड प्राप्त झाला हा अवॉर्ड दिल्ली येथील केंद्रीय जल मंत्री गजेंद्र शेखावत यांच्या हस्ते लाखापूर च्या सरपंच चंद्रकला मेश्राम यांना सुपूर्त करण्यात आला. केंद्र शासनाच्या विकास कामासाठी सातत्याने माझा सुद्धा प्रयत्न राहील. या योजनेचा लाभ प्रत्येक गावांनी घेवून चांगला उपयोग करावा. माजी आमदार प्रा. अतुल देशकर बोलतांना म्हणाले की ,या गावात जनतेच्या सहकार्याने लोकसहभागाने हा अवॉर्ड प्राप्त झाला या गावात पिण्याच्या पाण्याची आवश्यकता होती.ती आता दूर झाली.आपल्या गावातील प्रगती कशी करावी. यासाठी एकत्र यावे . कार्यक्रमा दरम्यान सरपंच चंद्रकला मेश्राम म्हणाल्या की आपल्या या छोट्याशा गावात खासदार अशोक नेते व माजी आमदार अतुल देशकर कार्यक्रमाप्रसंगी आले. आमचा व गावकऱ्यांचा सत्कार,अभिनंदन केल ही आमच्या गावासाठी गौरवाची, आनंदाची अभिमानास्पद बाब आहे. या कार्यक्रमाला गावातील बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 26, 2023

PostImage

नेरी चिमूर उमा नदी मार्गावरील पूल बांधकाम पूर्ण


चिमूर मार्गावर नेरी जवळ उमा नदी वाहत असून पुल नसल्याने शेतकऱ्यांना शेती हंगामात त्रास सहन करावा लागत होता. नेरी वरून चिमूर कडे अंतर कमी होत असल्याने जनतेला सुद्धा अडचण निर्माण होत होती. शेतकऱ्यांच्या व जनतेच्या मागणी वरून आमदार बंटी भांगडीया यांनी पुल बांधकामाबाबत निधी मंजूर करवून घेतले. शनीवार ला पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून रहदारी सुरू झाली आहे.

    आमदार बंटी भांगडीया यांच्या प्रयत्नांनी पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याने परिसरातील शेतकरी नागरीकानी  बंटी भांगडीया यांचे आभार व्यक्त करीत अभिनंदन केले.

_________________


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 26, 2023

PostImage

पूढे युवकांनी निराश न होता विजयासांठी प्रयत्न करावा


 खासदार अशोक नेते यांनी फुटबाल स्पर्धांचे किक मारून उद्धघाटन केले

 

युवकांनी मैदानी खेळ खेळावा या खेळामूळे शरीर तंदुरस्त राहते. शरीराचा व्यायाम होते. आरोग्य चांगले राहते. खेळा बरोबर युवकांनी सर्वांगीन विकास साधावा. स्पर्धेत विजय - पराजय होतोच पराजय झाला तर निराश होवू नये. वादविवाद न करता उलट पूढे युवकांनी विजयासाठी प्रयत्न करावा. असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी फुटबॉल स्पर्धकांना उद्दघाटनाप्रसंगी केले.

     जयहिंद युवा कृषि बचत गट, जयनगर चामोर्शी द्वारा आयोजित नेताजी कप फुटबॉल प्रतियोगिता चामोर्शी येथे शुक्रवार ला आयोजीत करन्यात आली. दरम्यान खासदार नेते गावात प्रवेश करतांच ओक्षवंत करत विद्यार्थी विद्यार्थिनींनी बँड,लेझीम च्या तालासुरात स्वागत केले. या फुटबॉल प्रतियोगितेचे उद्घाटन रिबिन (फित) कापुन खासदार अशोकजी नेते यांनी केले. दरम्यान खासदार अशोक नेते यांनी फुटबॉल स्पर्धाचे किक मारून खेळाचा आनंद घेतला.

       यावेळी युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य स्वप्निल वरघंटे, सरपंच श्रीकांत ओल्लालवार, माजी सरपंच प्रतीमा सरकार, ठानेदार विजयनंद पाटील, सुशांत बेपारी, माजी पंचायत समिती सदस्य विष्णु ढाली, अपूर्व वैद्य, देवकुमार मंडल, तमन मंडल, मुणाल हलदार, किशोर साना, रविन मंडल, सरोजित मंडल, राजेन मंडल, मिथुन बिशवास, गाईली मॅडम, गौरीपुर सरपंच मुखर्जी, सुरेश राठोड, टोकण गाईन,हरेण हलदार, सुजित मुजुमदार, निरुपण गाईन, मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 26, 2023

PostImage

गोंदेडा येथील गावकर्यानी रात्र जागुन पकडले रेतीचे चार ट्रॅक्टर


विना नंबर तीन ट्रॅक्टर ट्राली सहित व एक नांगरटी लावलेले ट्रॅक्टर जप्त

 

        रेती चोरी नेहमीची बाब असली तरी गावकर्यांनी अख्खी रात्र जागून रेती भरलेले चार ट्रॅक्टर पकडूले हि घटना गोंदेडा येथे गुरुवार ला रात्री घडली.

          गोंदेडा वडसी येथील उमा नदी पात्रातील रेती चोरीचे प्रमान वाढले आहे याकडे महसूल विभागचे दुर्लक्ष होत असले तरी ही नेहमीची बाब लक्षात घेता गोंदेडा ग्रामवाशियानी स्वत पुढाकार घेऊन महसूल विभागाची जवाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन स्वतः रात्र जागून दि 24 ऑगस्ट च्या मध्यरात्री नंबर नसलेले ट्राली सहित तीन ट्रकटर व एक विना ट्रालीचे नांगरटी लावलेले असे चार ट्रकटर ग्रामवाशीयांनी उमा नदीवरील रेती घाटावर पकडले रेतीतस्करांनी तात्काळ ट्रालीतील रेती खाली केली मात्र गावकर्यानी चारही ट्रकटर पकडत त्या ट्रॅक्टरच्या चाव्या काढून ट्रॅक्टर ग्रामपंचायतीला जमा केले d कार्यालयाला समोरील गेट ला कुलूप लावीत रेती तस्करांच्या मुसक्या आवळल्या 

           रेती चोरी होत असल्याची सुचना मदसुल विभागाला गावकर्यानी दिली होती महसुल विभागाने दुर्लक्ष केल्याने गावकरी एकत्र आले स्वतः पुढाकार घेऊन तस्करांना पकडण्याचे एकमताने ठरविण्यात आले मध्यरात्री च्या सुमारास चार ट्रकटर पकडले यांची माहिती महसूल विभागाच्या कर्मचार्याना भ्रमणध्वनी वरून दिली दरम्यान कोन्ही आले नाही पोलीसांन माहीती देताच रात्री दोन वाजता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले दुसऱ्या दिवसी शुक्रवार ला सकाळी आर आय मंडल अधिकारी टिळक ,तलाठी राठोड व सहकारी घटनास्थळी दाखल झाले मौका चौकशी करून पंचनामा केला मात्र यावर नागरिकांनी कोणती कारवाई करणार याबद्दल विचारले असता महसूल विभागाने उत्तर दिली नाही त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता यानंतर जिल्ह्यातील महसूल विभागाला माहिती देण्यात आली महसूल विभागचे अधिकारी दुपारी घटना स्थळावर पोहचले महसुल विभाग अधिकारी व पोलीस यांच्या देखरेखीखाली चारही ट्रॅक्टर चिमूर तहसिल कार्यालयात जमा करण्यात आले होते सदर तीन ट्रॅक्टर पिपरडा येथील गेडाम यांच्या मालकीचे तर एक ट्रकटर नेरी येथील ननावरे यांच्या मालकीचे असल्याची माहिती समोर आली आहे महसूल विभागाने जप्तीची दंडात्मक कारवाई करून ट्रकटर मालकावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली असून महसूल विभाग कोणती कारवाई करते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 26, 2023

PostImage

भिसी शहरातील समस्या सोडवा अन्यथा रस्त्यावर उतरू


 राष्ट्रवादी काँग्रेसचे रेवतकर यांचा इशारा

       भिसी येथे नगर पंचायत झाली तेव्हा समस्या कमी होईल असे वाटले मात्र दिवसेंदिवस उलट समस्या वाढल्या आहेत नागरीकांचे वेळेवर काम होत नाही. नागरीकांना अनेक समस्याला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे भिसी नगर पंचायत मधील समस्या तात्काळ सोडवा अन्यथा रस्तावर उतरू अशा प्रकारचे इशारा निवेदण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( अजित गट ) चे जिल्हा सरचिटनीस अरविंद रेवतकर यांनी नगर पंचायत मुख्याधिकारी डॉ सुप्रीया राठोड यांना दिले आहे.

       नगर पंचायतीतील आबादीच्या जागेवर अनेक वर्षापासुन नागरिक राहत आहे त्यांना घरकूल मंजूर करण्यात यावे, ज्यांना घरकूल मंजूर झाले नाही त्याना घरकूल मंजूरी देन्यात येवून बांधकामाचि परवानगी देन्यात यावी, नगर पंचायती मधील पाणीपुरवठा फिल्टर व्दारे करूयात यावा, शहरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीची सफाई करण्यात यावी , स्वच्छ भारत योजना अंतर्गत ज्या कुंटूबाला घरगुती शौचालय नाही अशा कुंटूबाचा सर्वे करून त्या कुंटूबास शौच्छालयाचा लाभ देन्यात यावा, घनकचऱ्यांची विल्हेवाट, विद्युत पुरवठा, राहरातील बोरवेलवरिल पाणी टॅक सफाई व दुरुस्ती करणे, नगर पंचायत मधील कर्मचारी भरती प्रकरण, मागासवर्गीय वस्तीला लागून असलेले दारू दुकान शहराबाहेर स्थानास्तरीत करण्यात यावे, आदी समस्यांमुळे नागरिक बेजार झाले आहेत. शहरातील टागोर फाटा चिमूर बायपास ते भिसी चौरस्ता बाजार चौक बसस्थानकापर्यत रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, रामलीला मैदानावरील घनकचरा उचलन्यात यावा, मागील अतिवृष्टीमुळे शहरातील नागरीकांच्या घरात पूराचे पाणि शिरले नुकसान झाले अशांना नुकसान भरपाई देन्यात यावी. आदि समस्यांविषयी योग्य निर्णय घेवून शहरातील समस्यांचे निराकरण करण्यात यावे महीनाभरात समस्यांचे निराकरण न झाल्यास शहरवासीय तिव्र आंदोलन करेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित गट ) जिल्हा सरचिटनिस अरविंद रेवतकर यांनी निवेदनातून दिला आहे. 

          यावेळी प्रणय खवसे जगत तांबे किशोर गभणे विजय ननावरे चेतन पडोळे हरी मोहीनकर अविशा रोकडे मंजिरी भिमटे उषा गभणे वनिता मेश्राम माधूरी कामडी योगीता बोरकर राकेश दांडेकर श्यामराव मुंगले विजय पोहीनकर आशीष देसहि बेडू मेश्राम प्रकाश रोकडे ईश्वर घंदरे व शहरातील नागरिक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थीत होते.


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 24, 2023

PostImage

Drought-like situation in the state - राज्यात कोरडा दुष्काळ सदृश्य परिस्थिती


● मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष.

 

        अनेक दिवसापासून पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्रातील शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या हातची पिके जान्याच्या तयारीत आहेत. सोयाबिन, भुईमूग, नागली, भात या खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे राज्यात कोरडा दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याची माहिती राज्य विधान सभा चे विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी माहीती दिली.

     समितीच्या सर्वेक्षणात उत्पादनात ५० टक्क्यापेक्षा अधिक घट होणार असल्याचे लक्षात आल्यास २५ टक्के अग्रीम भरपाईची द्यावी लागते. मात्र त्याकडे सुद्धा सरकारचे कोणतेही लक्ष नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जून महिना आणि जुलैचे तीन आठवडे राज्यात पाऊस पडलेला नाही. ऑगस्ट महिन्यात अनेक भागात सलग २१ दिवस पाऊस न झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

      मराठवाड्यातील नाथसागरमध्ये केवळ ३४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यातील २३१ महसूल मंडळात सलग २१ दिवस पाऊस न झाल्याची नोंद राज्याच्या कृषी आयुक्तांकडे उपलब्ध आहे.  सलग २१ दिवस पाऊस झाला नाही, तर राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा एक निकष आहे. त्या निकषानुसार सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात कोरड्या दुष्काळाची परिस्थिती असूनही सरकार दुष्काळ जाहीर करण्याच्या तयारीत नाही. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. हे सरकार शेतकर्‍यांच्या विरोधात का? असा प्रश्न आता महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे. 


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 24, 2023

PostImage

मालेवाडा येथे अखिल भारतीय धम्म ज्ञान परिक्षा


जेतवन बुद्ध विहार मालेवाडा यांचे आयोजन

.........................................


      मानवी मूल्यांचा प्रचार-प्रसार व संस्कार करण्याच्या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंथन समिती, नागपूर द्वारा आयोजीत जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा यांचे सहकार्यातून  अखिल भारतीय धम्म ज्ञान परीक्षा- 2023 चे आयोजन  मालेवाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत करण्यात आले.
      ही परिक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावर आधारीत वस्तुनिष्ठ स्वरुपाची परिक्षा होती गावातील एकूण 38 परीक्षार्थींनी यात सहभाग नोंदवीला. या परीक्षेकरिता बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंथन समिती, नागपूर द्वारा परीक्षार्थींना देण्यात आला होता परीक्षेचे आयोजनात बौध्द पंचकमेटी मालेवाडा, भीमज्योती महिला मंडळ मालेवाडा, प्रबुद्ध विचार मंच मालेवाडा यांचे विशेष सहकार्य लाभले. केंद्र प्रभारी म्हणून असित नीलकंठ बांबोडे यांनी तर केंद्र व्यवस्थापनात प्रदीप मेश्राम, सनय बांबोडे, दिक्षांत शेंडे, साहील शेंडे, प्रशिक बहादुरे, तेजस शेंडे आदींचे सहकार्य लाभले. परीक्षेच्या यशस्वीतेकरिता जगदीश रामटेके, आशिक रामटेके, प्रतिक शेंडे, योगेश मेश्राम यांनी प्रयत्न केले. मुख्याध्यापिका तुरारे ग्रामपंचायत सरपंच कालिदास भोयर यांचे सहकार्य तथा परीक्षार्थींनी यात दर्शविलेला सहभाग याशिवाय हा उपक्रम पूर्ण होऊ शकला नसता असे मत बौध्द पंच कमेटीचे सचिव आशिक रामटेके यांनी व्यक्त केले. सदर परीक्षेचा निकाल व पारितोषिक वितरण 14 ऑक्टो. चे कार्यक्रमात करण्यात येईल


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 23, 2023

PostImage

पिपंळाव येथे टेली मेडिसीन व्दारा कॅन्सर तपासणी


महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग संघटक यांच्या दस्ते उद्धघाटन
               महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते ना. विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकारातून प्रथमच पिंपळगांव येथे बुधवार ला टेली मेडिसिन द्वारा  कॅन्सर तपासणी शिबीर घेण्यात आले . या शिबीराचे सदर उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग संघटक धनराज मुंगले यांच्या शुभहस्ते पार पडले.
             आज देशभरात नव्हे तर महाराष्ट्रात सुद्धा वाढत्या कॅन्सर आजाराला आळा घालण्यासाठी कॅन्सर ग्रस्ताचे प्राण वाचवीन्याचे ध्येय समोर ठेवून अडीच कोटी रुपये खर्च करून प्रगत तंत्रज्ञान तसेच टेली मेडिसिन ने युक्त राज्यातील पहिले अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित , कॅन्सर निदान फिरते हॉस्पिटल जनतेच्या सेवेत महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्ष नेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार साहेब यांच्या पुढाकारातून जनतेच्या सेवेत समर्पित करण्यात आले आहे .
           या शिबिरास प्रामुख्याने चंद्रपूर माजी जि प अध्यक्ष डॉ सतीश वारजूरकर , ब्रम्हपुरी तालुका कांग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके, चिमूर विधानसभा ब्रम्हपुरी तालुका विभागीय अध्यक्ष नेताजी मेश्राम, चंद्रपूर माजी जिल्हा परिषद सदस्या स्मिता पारधी, ग्रामपंचायत सरपंच सुरेश दुणेदार, तोरगाव ग्रामपंचायत सरपंच संजय राऊत , ग्रामपंचायत कालेता सरपंच  रामाभाऊ पिल्लारे, चांदली ग्रामपंचायत उपसरपंच संदीप बगमारे, कांग्रेस कांग्रेस कार्यकर्ते गुड्डू बगमारे, खंडाळा माजी सरपंच अरुण अलोणे, माजी सरपंच वामन मिसार, कांग्रेस कार्यकर्ते ईश्वर कुथे, ग्रामपंचायत सदस्य मंगेश भुते, तंटामुक्ती अध्यक्ष अक्षय लोंढे, देविदास ठाकरे, मेश्राम ,दादा मिसार, विनोद तिकले, भिमराव वंजारी, गंगाधर देशमुख, सुधीर पंदीलवार,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश कांबळी, गिरीधर भाजीपाले, दिलीप शेलोकर तसेच चिमूर, ब्रह्मपुरी विधानसभेतील शेकडो काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी गावकरी मंडळी आदी उपस्थित होते. दरम्यान कार्तिक वामन तुपट यांची डी आर एफ मध्ये निवड झाल्यबदल चिमूर विधान सभा काँग्रेस कमिटी तर्फे जाहीर सत्कार करन्यात आला.


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 23, 2023

PostImage

शहरात मेरी माटी मेरा देश अंतर्गत रॅली


 पोलिस विभाग व भैय्यु महाराज विद्यालयांचा सहभाग

        चिमूर पोलीस व संत भय्यूजी महाराज विद्यालयाच्या विद्यार्थ्यांने मेरी माटी मेरा देश अंतर्गत या कार्यक्रमाच्या अनुसंघाने शहरातील वडाळा - चिमूर या मुख्य मार्गाने बुधवार ला रॅली काढली.
        ९ ऑगस्ट क्रांती दिनाचे पर्वावर मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमाचे आयोजन करन्यात आले होते दरम्यान चिमूर शहरातील पोलिस विभाग व संत भय्यु महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शहरातील मुख्य मार्गाने रॅली काढून हुतात्मा स्मारक येथे रॅलीची सांगता करन्यात आली दरम्यान हुतात्मा स्मारकातील शहीदांना अभिवादन करण्यात आले यावेळी पोलिस निरीक्षक मनोज गभणे, पोलीस अधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी विद्यार्थी आदी उपस्थीत होते.


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 23, 2023

PostImage

नवीन अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन


 

- महाराष्ट्र प्रदेश ओबीसी महासंघ उपाध्यक्ष तथा ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक डॉ. सतिश वारजुकर यांची उपस्थिती

 चिमूर विधानसभा क्षेत्रातील ब्रह्मपुरी तालुक्यातील चांदली येथे बुधवार ला  जिल्हा परिषद चंद्रपूर च्या जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत दोन नवीन अंगणवाडी इमारती मंजूर कामाचे भूमिपूजन महाराष्ट्र प्रदेश ओबीसी महासंघ उपाध्यक्ष तथा ७४ चिमर  विधानसभा क्षेत्राचे समन्वयक डॉ सतिश वारजूकर यांच्या उपस्थितीत खंडाळा ग्रामपंचायतचे उपसरपंच नंदकिशोर राखडे यांनी केले.

 माजी जिल्हा परिषद सदस्य अस्मिता  पारधी, ब्रह्मपुरी शहर महिला काँग्रेसचे अध्यक्षा योगिता आमले, ग्रामपंचायत सरपंच कालेता रामाभाऊ पिल्लारे,माजी सरपंच अरुण अलोणे, अंबादास राखडे, अंगणवाडी सेविका सिंधु येनूरकर, मोहन तलमले, बाजीराव कामडी,योगेश बनकर, प्रदीप वाघमारे, व गावकरी उपस्थित होते,