ProfileImage
140

Post

1

Followers

1

Following

PostImage

युवाक्रांती समाचार

April 5, 2024

PostImage

ब्रेकिंग न्युज.!इसमाची तलावात उडी घेवून केली आत्महत्या.! ब्रम्हपुरी तालुक्यातील घटना


ब्रम्हपुरी:-

 तालुक्यातील मुख्य महामार्गावर असलेल्या गांगलवाडी येथील  तलावात इसमाने उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक:-५/४/२०२४ ला अंदाजे सकाळी ५ ते ६ वाजताच्या दरम्यान घडली.
पुरुषोत्तम सूर्यवंशी वय वर्ष ५५ गांगलवाडी येथील रहिवाशी आहे.
सविस्तर वृत्तांत असे आहे की, मृतक पुरूषोत्तम चा केस कर्तनालयाचा व्यवसाय होता. सकाळी दररोज ८ ते ९ वाजता केस कर्तनालयाचे दुकान सुरू करायला जायचा माञ आज सकाळी ५ ते ६ वाजता घरून केस कर्तनालय दुकानाकडे गेला आणि केस कर्तनालय दुकानाचे शटर थोडे उघडून सायकलने तलावाकडे गेला.सायकल आणि  चप्पल तलावाजवळ ठेवून तलावात उडी घेतली. ही माहिती कुटुंबीयांना माहिती होताच घटनेची माहिती पोलिस विभागाला देण्यात आली. एका पाणबुड्याच्या साह्याने तलावातील पाण्यात पुरुषोत्तम चा शोध घेतला असता दूपारी १ वाजताच्या दरम्यान पुरुषोत्तमचा शोध लागला.तलावातील पाण्याच्या बाहेर पुरुषोत्तमचा मृतदेह बाहेर काढून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालय ब्रम्हपुरी येथेनेण्यात आले. मृतक पुरुषोत्तम च्या पच्छात्य पत्नी, मुले सुन नातवंडं असा आप्त परीवार आहे.

घटनेचा पुढील तपास संबधित पोलिस विभाग करीत आहेत.

 


PostImage

युवाक्रांती समाचार

March 13, 2024

PostImage

विधवा महिलांना कर्जमुक्ती केव्हा ?शासनाकडून विधवा महिलांची अवहेलना होत असल्याचा प्रा. येलेकर यांचा आरोप


रुमदेव सहारे सहसंपादक 

Covid-19 मुळे विधवा झालेल्या महिलांना थकीत कर्जातून मुक्तता देण्यासंदर्भात शासन स्तरावर निर्णय घेण्यासाठी सहकार आयुक्तांनी राज्यातील सर्व विभागीय निबंध व जिल्हा निबंधकांना 11 नोव्हेंबर 2022 व 16 जानेवारी 2023 च्या आदेशान्वये माहिती गोळा करून ती माहिती 20 जानेवारी 2023 पर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले होते  या आदेशामुळे मृतकर्जदाराच्या विधवा महिलांच्या कर्जमुक्त होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.  परंतु आता एक वर्ष उलटून सुद्धा विधवा महिलांना कर्जमुक्तीचा दिलासा मिळाला नाही. त्यामुळे आता हे कर्ज कसे  फेडायचे ? असा मोठा प्रश्न त्या विधवा महिलांसमोर आहे.  राज्य सरकारने येणाऱ्या लोकसभा डोळ्यासमोर ठेवून मते मिळवण्यासाठी 11 व 12 मार्च या दोन दिवसात जवळपास 250  चे वर शासन निर्णय निर्गमित करून हजारो करोड रुपयाच्या सोयी सुविधा जनतेला दिल्यात. तर केंद्र सरकारने उद्योगपतींचे 16 लाख कोटींचे कर्ज माफ केले. परंतु मृतक कर्जदारांच्या विधवा महिलांच्या  कर्जमुक्ती कडे मात्र  मागील एक वर्षापासून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप गडचिरोली जिल्हा सहकारी पतसंस्था संघाचे मानद सचिव तथा सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष प्रा. शेषराव  येलेकर यांनी केला आहे. एकीकडे  महिलांच्या उन्नतीसाठी राज्यात महिला धोरण जाहीर करून आम्ही महिलांचे तारणहार असल्याचा गाजावाजा करायचा आणि दुसरीकडे मात्र त्याच राज्यातील विधवा महिलांना मागील एक वर्षापासून कर्जमुक्तीचे गाजर दाखऊन त्यांची  अव्हेलना करायची हा कुठला न्याय आहे ?  असा सवाल प्रा येलेकर यांनी केला आहे.

    कोविड 19 या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेकांवर आर्थिक अडचणी  ओढविल्या.ज्या कुटुंबातील कर्तापुरुष कोरोनात मृत्यू पावला त्या कुटुंबांना मोठी आर्थिक झड बसली आहे. त्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी कर्ता पुरुषाच्या विधवा पत्नीवर आली आहे. मयत कर्जदाराचे राहते घर इतर मालमत्ता तारण असल्यास अशावेळी त्याच्या कुटुंबावर बेघर होण्याची पाळी आली आहे, या संदर्भात जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून विचारणा केली असता शासनाने मागितलेली माहिती दिलेल्या वेळेत सहकार आयुक्त कार्यालय पुणे येथे पाठवण्यात आली, परंतु अजून पर्यंत कोणताही निर्णय शासन स्तरावर झाला नसल्याचे त्यांच्याकडून  सांगण्यात आले. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा प्रश्न निकाली लागून मृतकर्जदाराच्या विधवा महिलांना थकीत  कर्जातून  मुक्तता मिळेल असे वाटत होते, परंतु त्या अभागी महिलांच्या पदरी मात्र निराशाच आली. पुढील लगतच्या काळात तरी विशेष बाब म्हणून सदर विधवा महिलांना कर्जमुक्ती मिळेल काय ? असा प्रश्न प्रा. शेषराव येलेकर यांनी  शासनाला केला आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

March 13, 2024

PostImage

EWS व खुला प्रवर्गाला गडचिरोली पोलीस भरतीत मा.तनुश्री ताई धर्मराव आत्राम व पोलीस बॉईज असोसिएशनच्या प्रयत्नाला यश   


रुमदेव सहारे सहसंपादक 

गडचिरोली :-
तब्बल 170 जागेची झाली वाढ पोलीस भरती युवकांसाठी आनंदाचे वातावरण    
    सध्या गडचिरोली जिल्हा पोलिस भरती मध्ये 742 शिपाई पदाच्या जागा निघाल्या  त्यात EWS आणि खुला प्रवर्गाला एकही जागा  गृहविभागाने दिला नव्हता त्या अनुषंगाने पोलीस बॉईज असोसिएशन गडचिरोली यांनी पोलीस भरती तयारी करणारे युवकांना घेऊन मा. तनुश्री धर्मराव बाबा आत्राम यांचेमार्फत मा. ना मंत्री धर्मरावा बाबा आत्राम यांना 4 मार्च रोजी भेट घेतली व निवेदन दिले तात्काळ बाबा यांनी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली व पोलीस  शिपाई पदाच्या तब्बल 170 जागेची वाढ खालील प्रमाणे  केली ई डब्ल्यूएस 50, खुला 70, एसिबिसी 50 जागेची वाढ केली त्याकरिता पोलीस भरती तयारी करणारे युवकांकडून मा.तनुश्री धर्मराव बाबा आत्राम व पोलीस बॉईज असोसिएशन चे जिल्हा अध्यक्ष गिरीश कोरमी व जिल्हा उपाध्यक्ष  आकाश ढाली ,कार्यकारी अध्यक्ष रजत कुकुडकर , व प्रंतोष विश्वास ,रणजित रामटेके,निखिल बरसगडे ,अशुतोष चांगलानी  यांच्यावर शुभेच्छांच्या वर्षाव होत आहे .


PostImage

युवाक्रांती समाचार

March 10, 2024

PostImage

ब्रेकींग न्युज.!ठकाबाई तलाव जवळ कच्चेपार रोड मार्गावर  ट्रेक्टर पलटी झाल्याने  भीषण अपघातात 1 ठार तर 3  जखमी


(प्रशांत गेडाम) सिंदेवाही प्रतिनिधि 

सिंदेवाही -सिंदेवाही शहरालगत ठकाबाई तलाव जवळ कच्चेपार रोड मार्गावर लाकड़ाने भरलेला ट्रेक्टर पलटी झाल्याने 1 जागिच ठार तर 3 गंभीर जख्मी झाल्याची घटना आज दि. 10/3/2024 रोज रविवार ला दुपारी 12-30 वाजता दरम्यान  घडली आहे.
सविस्तर वृत असे की आज दि. 10।3।2024 रोज रविवार ला दुपारचा सुमारास कच्चेपार सिंदेवाही रोडवर लाकुड़ घेऊन येणाऱ्या ट्रेक्टर चे समोर चे दोन्ही चाक अचानक फुटल्याने चालकाचे ट्रेक्टर वाहना वरुन नियंत्रण सुटले व ट्रेक्टर एका झाडाला जाऊन धडकले ही धडक ईतकी जोरदार होती कि, भीषण अपघात घडला
यात उमेश अशोक आदे वय 32 राहणार महात्मा फुले चौक सिंदेवाही हा जागिच ठार झाला असुन गंभीर जखमी मध्ये ट्रेक्टर चालक मुन्ना देवराव गावतुरे  हमाल अनिल सदाशिव मोहुर्ले व सुखदेव विट्ठल गावतुरे हे सर्व राहणार सिंदेवाही हे तिघेही गंभीर जख्मी झाले याची माहिती पुलिस स्टेशन सिंदेवाही ला मिळताच तात्काळ  पोलीस ठाणेदार चव्हाण आपल्या पथकासह घटना स्थळी जाऊन ट्रेक्टर अपघातल्या ट्रेक्टर मध्ये फसलेल्या  जेसीबी च्या सहाय्याने मृतक व जख्मीना बाहेर काढले. व लगेच एम्बुलेंस चा सहाय्याने शहरातील ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे दाखल केले. सदर घठणेचा  पुढील तपास पोलिस ठाणेदार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

March 3, 2024

PostImage

कारंजा शहर पोलीसांच्या तिक्ष्ण नजरेने हरिश्चंद्र मेश्राम यांच्या हत्येच्या आरोपीच्या पाच तासातच मुसक्या आवळल्या.


कारंजा : शुक्रवार दि. 01 मार्च रोजी,नागरीकांची वर्दळ असणाऱ्या तहसिल परिसरात दस्तऐवज लेखक हरिश्चंद्र विश्राम मेश्राम यांची धारदार शस्त्राने हत्या करून हत्याऱ्याने पळ काढला होता. या संदर्भात दिनकर विश्राम मेश्राम राहणार ग्राम मेहा यांनी दिलेल्या फिर्यादी वरून शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून कारंजा शहरचे कर्तव्यतत्पर पोलीस निरिक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांनी समयसुचकता दाखवीत ताबडतोब तपासाची चक्रे फिरवून चौकशी केली असता सदर गुन्ह्यामध्ये हत्या झालेली मृतक व्यक्ती हरिश्चंद्र मेश्राम हे ग्राम मेहा ता.कारंजाचे रहिवाशी असून त्यांचे घराशेजारील प्रेमदास उद्वव भगत यांचेशी सरकारी अतिक्रमित जागेवर हातपंप काढल्यामुळे वादविवाद होऊन त्याची तक्रार मृतक व्यक्तीने मेहा ग्रामपंचायतला दिली होती. त्यामुळे प्रेमदास उद्धव भगत यानी दि 04 डिसेंबर 2023 रोजी मृतक हरिश्चंद्र मेश्राम यांचेशी भानगड करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार मृतक व्यक्तीने  धनज पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली होती. पुढे या तक्रारीच्या रागामधूनच शुक्रवारी, संगनमताने मिथुन विठ्ठल शिरसाट या आरोपीने मृतक हरिश्चंद्र मेश्राम यांचे मानेवर व गळ्यावर प्राणघातक शस्त्राने हल्ला करीत त्यांना जीवानिशी ठार मारले. या घटनेचा तपास जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे ,अप्पर पोलीस अधिक्षक भारत तागडे,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाडवी यांच्या मार्गदर्शनात व सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला  यांनी करून, वेगवेगळी पोलीस पथके चोहीकडे पाठवून सदर गुन्हाच्या आरोपीला केवळ पाच तासात अटक करून त्याच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवीले.त्याबद्दल कारंजा शहर पोलीसाच्या हजरजवाबी कर्तव्यतत्परता पूर्ण यशस्वी कामगीरीचे सर्व स्तरातून कौतुक होत असून अधिक तपास सुरु असल्याचे कळविण्यात आले असल्याचे वृत्त आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळविले आहे .


PostImage

युवाक्रांती समाचार

March 1, 2024

PostImage

दिवसाढवळ्या चाकू हल्ल्यात तहसिल आवारात दस्तलेखकाची निघृण हत्या.


संजय कडोळे वाशिम जिल्हा विशेष प्रती.

सदर हत्येने करून दिली 30 वर्षापूर्वीच्या कारंजा बसस्थानकावरील सरपंच स्व. खटेश्वर करडेच्या हत्येची आठवण."

कारंजा : आज शुक्रवार दि . 01 मार्च 2024 रोजी, कारंजा तहसील कार्यालय परिसरात कार्यालयीन कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर दस्तऐवज लेखक (अर्जनविस) सुद्धा परिसरात आपले टेबल मांडून बसले असतांना अचानक दुपारी दोन वाजताच्या दरम्यान  हरिश्चंद्र विलास मेश्राम वय 38 वर्ष यांचे मानेवर कुण्यातरी अज्ञात मारेकऱ्यानी प्राणघातक शस्त्राने हल्ला चढवून हरिश्चंद्र मेश्राम या दस्तऐवज लेखकाची हत्या केली. व मारेकरी फरार होण्यात यशस्वी झाला. सदर मृतक कारंजा तालुक्यातील मेहा येथील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे. प्राप्त माहितीनुसार दुपारी मृतक दस्तलेखक आपले काम करीत असताना अचानक पणे एका अज्ञात इसमाने येऊन त्याच्या मानेवर चाकूने वार केले त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच त्याला कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तपासणी दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक दिनेशचंद्र शुक्ला व पोलीस पथकानी देखील घटनास्थळी धाव घेतली व पुढील तपास सुरु आहे . घटनेची माहिती घेतली दरम्यान वृत्त लिहेस्तोवर या संदर्भात पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली नव्हती .चाकू हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाला. सदर घटना तहसिल कार्यालया समोरच्या वर्दळीच्या परिसरातील असूनही आरोपी पळून गेल्याने, तीस वर्षापूर्वी कारंजा बसस्थानकासमोर वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे दिसून येत आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Feb. 26, 2024

PostImage

संत निरंकारी मिशन तर्फे बारई तलावाची स्वच्छता


ब्रह्मपुरी:- संत निरंकारी मिशन अंतर्गत दर वर्षी २३ फेब्रुवारी गुरू पूजा दिवस संपूर्ण विश्वात आयोजित केल्या जाते त्या अंतर्गत विविध उपक्रम राबविला जातात या वर्षी सुद्धा  प्रोजेक्ट अमृत अंतर्गत  स्वच्छ जल स्वच्छ मन या मिशन अंतर्गत विविध जलस्रोतांची स्वच्छता राबविण्यात आली यात संत निरंकारी मिशन ब्रम्हपुरी तर्फे स्थानिक बारई तलावाची साफ सफाई मिशन च्या सेवादल - अनुयायी यांच्या तर्फ करण्यात आली यात नगरपरिषद ब्रम्हपुरी यांचे सुद्धा योगदान लाभले. सर्व प्रथम सकाळी 8 वाजता सेवादल प्रार्थना करून सद्गुरू माता सविंदर हरदेवसीहजी महाराज यांना नमस्कार करून स्वच्छता अभियानाला सुरू झाली व 12 वाजता स्वच्छता अभियानाची सांगता लंगर करून समाप्त करण्यात आली. या प्रसंगी ब्रम्हपुरी ब्रांच प्रमुख सुयोग बाळबुधे, डॉ.सतीश कावळे,सेवादल इंचार्ज नितीन रासेकर, तसेच बेटाळा,रानबोथाली,वाढोना,मालडोंगरी, नागभीड,बोरगाव,उदापुर,आदी गावातील निरंकारी मिशनचे शेकडो अनुयायी उपस्थित होते.


PostImage

युवाक्रांती समाचार

Feb. 26, 2024

PostImage

दरबारातील सत्कार माझा नसून  माझ्या कार्याचा सत्कार आहे :- प्रकाश सावकर पोरेड्डीवार सहकार महर्षी  


ब्रम्हपुरी/ प्रतिनिधी-  माणसाने नेहमी चांगले कार्य करीत राहिले पाहिजेत. आपल्या चांगल्या कार्याची पावती समाज आपोआप देत असतो. आज पर्यंत माझ्या हातून सत्कार्य करीत आहे व पुढे पण करीत राहीन.त्यामुळे आज माझ्या कार्याची पावती म्हणुन दरबारने दिली आहे.अल्हाज हजरत सैय्यद मोहम्मद ईकबलशाहा बाबा उर्फ बाबाजान कादरी चिस्ती चिंचोलीच्या उर्स मुबारक कार्यक्रमात जो सत्कार करण्यात आला तो सत्कार माझा नसून माझ्या कार्याचा सत्कार आहे असे प्रतिपादन प्रकाश सावकार पोरेड्डीवार सहकार महर्षि तथा अध्यक्ष गड.डिस्ट्रिक्ट सेंट्रल को. आफ बैंक गडचिरोली यानी केले.                                                                         अल्हाज हज़रत सैय्यद मोहम्मद इकबालशाह बाबा उर्फ बाबाजान कादरी चिस्ती चिंचोली (बु) ता.ब्रम्हपुरी आयोजित " उर्स मुबारक " व शानदार कव्वाली कार्यक्रमाच्या  प्रसंगी विशेष अतिथि म्हणून अम्मासाहेबा, शफिबाबा ,शरीफबाबा,मनोहरजी पाटिल पोरेटी मा.उपाध्यक्ष जी.प.गडचीरोली ,कृष्णाभाऊ गजभे आमदार आरमोरी,प्रकाश सावकार पोरेडीवार सहकार महर्षि तथा अध्यक्ष गड.डिस्ट्रिक्ट सेंट्रल को. आफ बैंक गडचिरोली, मा.मनोहरजी चंद्रिकापुरे आमदार  अर्जुनी-मोरगांव, तुषार सोम भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य, राजेश जयस्वाल, नानाभाऊ नाकाडे वडसा, मोतीलाल कुकरेजा उपाध्यक्ष भाजपा गड़चिरोली मा.घनश्याम कावळे नागपुर,मा.रामदासजी मसराम काँगेस नेता वडसा, अरविंद जयस्वाल, प्रल्हादजी धोटे वडसा,नामदेवजी कुथे जेष्ट नागरिक चिंचोली,मा.रोशन दीवटे.  चिचोली,परसरामजी टीकले माजी स.पं.स.वडसा व अन्य मान्यवरानी बाबाजान संदर्भात अनेक उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले.                                                                                            अल्हाज हजरत सैय्यद मोहमद ईकबलशाहा बाबा उर्फ बाबाजान चिशती चिंचोली येथे अम्मासाहेबा, शफीबाबा, शरीफबाबा यांच्या मार्गर्शनाखाली दरवर्षी उर्स् मुबारक व दरबारी सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विजेंद्रजी बत्रा तर आभार प्रदर्शन वसंतराव गोगल सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अल्हाद हजरत सैय्यद ईकबलशाहा बाबा उर्फ बाबाजान  दरबारी सेवक, सार्वजनिक मंडळ चिंचोली बु., पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार व पोलिस कर्मचारी, गावातील पुरुष, महीला, युवक मंडळ तसेच भक्तगण यांनी मोलाचे सहकार्य केले....


PostImage

युवाक्रांती समाचार

Feb. 23, 2024

PostImage

लोकशाही संवर्धन आणि सामाजिक साधनेची लोकस्वातंत्र्यची अभिनंदनिय वाटचाल !- प्रा.अंजलीताई आंबेडकर


विचारमंथनात अंजलीताईंचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघात प्रवेश!

हार्ट अटॕकच्या शक्यतांवर प्रतिबंध करणाऱ्या ईमरजन्सी किटचे वाटप

शहीद जवान,मराठा आरक्षण व अपघात बळींना श्रध्दांजली

 अकोला:--- देशातील लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे जतन आणि समृध्द लोकशाहीतून संविधानाचे संवर्धन करीत पत्रकार व समाजाच्या हक्कांसाठी संघर्षरत राहणाऱ्या  लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची सर्वसमावेशक सामाजिक वाटचाल कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे,असे गौरवपूर्ण प्रतिपादन अग्रेसर सामाजिक नेत्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रबुध्द भारतच्या संपादिका प्रा.सौ.अंजलीताई आंबेडकर यांनी केले.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या नियमित मासिक विचारमंथन तथा सन्मान समारंभात त्या बोलत होत्या.त्यांनी लोकस्वातंत्र्यचे सभासदत्व स्विकारून या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेत प्रवेश केला.त्यासाठी विचारमंथन मेळाव्यात त्यांना कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विराजमान करून केन्द्रीय कार्यकारिणी कडून त्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी त्यांना महासंघाच्या विशेष मार्गदर्शिका तथा राज्य संघटन प्रमुख  म्हणून नियुक्तीपत्रासह,खास सन्मानपत्र,शाल,ग्रामगीता आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी उपस्थित सभासदांना हार्ट अटॕकच्या लक्षणांवर प्रतिबंध करणाऱ्या ईमरजन्सी किटचे वाटप लोकस्वातंत्र्यच्या वतीने करण्यात आले.

       सर्वप्रथम संघटनेच्या सामाजिक साधनेचे अधिष्ठाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांना नेहमीप्रमाणे हारार्पण करून वंदन करण्यात आले.अतिथींचे सत्कार व उपस्थितांची स्वागतं करण्यात आली.शहिद जवान,मराठा आरक्षण प्रश्नाततील बळी आणि अपघात व आपत्तींमधील बळींना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

              याप्रसंगी बोलतांना अंजलीताईंनी या पत्रकार महासंघाच्या "लोकस्वातंत्र्य" या  नावातूनच सर्वसमावेशक आणि समतावादी लोकशाहीची वाटचाल लक्षात येते.पत्रकार कल्याणासोबतच सामाजिक उपक्रमातून कृतिशील पत्रकारिता आणि त्यासाठी सामाजिक क्षेत्रातील ईतर नामवंतांनाही सोबत घेऊन चालण्याची अभिनव संकल्पना ही वैचारीक परिवर्तनातून सामाजिक विकासाची खरी वाटचाल आहे,असे विचार व्यक्त करून उपक्रम,शिस्तबध्द नियोजन आणि महाराष्ट्र आणि बाहेर सुरू केलेल्या करणाऱ्या संघटन कार्याचे कौतुक करून शुभेच्छा व्यक्त केल्या.
      
         लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या संघटन कार्याच्या व्दितीय अभियानातील ४ था मासिक विचारमंथन मेळावा स्थानिक जैन रेस्ट्रो मध्ये संपन्न झाला.याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिका आणि रजधुळ मासिकाच्या संपादिका देवकाताई देशमुख,आयएमए पदाधिकारी,अस्थिरोग तज्ञ, ओम हॉस्पिटलचे डॉ.रणजित देशमुख हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.तर लोकस्वातंत्र्यचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख,प्रा.डॉ.संतोषजी हूशे,उपाध्यक्ष प्रदिप खाडे,सचिव राजेन्द्र देशमुख अरविंद देशमुख(नागपूर) यांची प्रमुख उपस्थिती होती. संजय देशमुख यांनी प्रास्ताविकातून संघटनेच्या वाटचालीची माहिती दिली‌.तर प्रा.संतोषजी हूशे यांनी सुध्दा मनोगतातून संघटनेच्या ३ वर्षाच्या व्याप्तीमधील अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या योगदानाची माहिती दिली.याप्रसंगी देवकाताई तथा डॉ.रणजित देशमुख आणि उपस्थितांनी संघटनेच्या गतिमान कार्याबद्दल आनंद व्यक्त करून शुभेच्छा दिल्यात.

             प्रा.मनोज देशमुख व सौ.दिपाली बाहेकर यांच्या बहारदार संचलनाखाली झालेल्या  या कार्यक्रमाला प्रा‌‌.राजाभाऊ देशमुख,रावसाहेब देशमुख,गजानन जिरापूरे,संदिप देशमुख, (अमरावती) नंदकिशोर चौबे, अकोला जिल्हाध्यक्ष मोहन शेळके, सागर लोडम(ग्रामीण), देवेन्द्र बन्सोड,देवेन्द्र मेश्राम (जि.प्रसिध्दी प्रमुख,पालघर) सुरेश डाहाके,मनोहर मोहोड,दिपक देशपांडे,पंजाबराव वर,संतोष धरमकर,अॕड.राजेश कराळे,सतिश देशमुख,(निंबेकर),विजय बाहकर, मनोहरराव हरणे,शामराव देशमुख,राजाभाऊ देशमुख(रामतिरथकर) रामराव देशमुख,सौ.सोनल अग्रवाल,सौ.सुलभा देशमुख,सौ.राजश्री देशमुख,(खामगाव) वसंतराव देशमुख (नारखेडकर),.प्रा‌.आर.जी.देशमुख (माजी संपादक पिकेव्ही) कैलास टकोरे,अशोक भाकरे,शशिकांत हांडे, प्रा.विजय काटे, डॉ.विजयकुमार बढे,सुरेश भारती, सुरेश पाचकवडे,अशोककुमार पंड्या,के‌‌.एम. डॉ.अशोक तायडे,कृष्णा देशमुख,सुनिल देशमुख (निंबेकर), गौरव देशमुख,प्रा.सुरेश कुलकर्णी,सुरेश पाचकवडे,देवीदास घोरळ,शिवचरण डोंगरे, ओरा चक्रे,वासुदेव चक्रनारायण,आत्माराम तेलगोटे,ज्ञानदेव खंडारे,रामराव खंडारे,व ईतर बहूसंख्य पत्रकार व समाजसेवी उपस्थित होते.  आभारप्रदर्शन विजयराव बाहकर यांनी केले.


PostImage

युवाक्रांती समाचार

Feb. 22, 2024

PostImage

मेंडकी एसबिआय बँके कडुण दोन लाखाचा विमा परतावा


मेंडकी:-

भारतीय स्टेट बँकेच्या वतीने ग्राहकांच्या संरक्षणा , सुरक्षितते करीता पैश्या च्या देवाण- घेवाना सोबतच विविध विमा योजणा मधुन बँक खातेदारांचें विमा काढण्यात येते . त्यामध्ये मेंडकी एसबीआय शाखे तर्फे पंतप्रधाण जीवण ज्योती , विमा संरक्षण योजणा, अमृत कलश योजणा , पंतप्रधान विमा , अटल पेंशन योजणा अश्या विविध विमा योजणाचीं अंमलबजावणी केली जाते. यामध्ये ग्राहक आपल्या आर्थीक व्यवहार करताना वित्तिय वर्षात वेगवेगळया वयोगटा नुसार वर्षातुण एकवेळा एकल किश्त भरूण स्वतःचा विमा काढतात . याप्रमाणेच मेंडकी भारतीय स्टेट बँके कडुण प्रधाणमंत्री जीवण ज्योती विमा योजणे अंतर्गत मृतक महिला पोर्निमा पांडुरंग लिंगायत वय ४३ राहणार रानबोथली यांनी सन २२-२३ ह्या आर्थिक वर्षात ३३०/- रुपये वार्षीक भरुण स्वतःचा विमा काढला . मागील काही महिन्या पुर्वी प्रदिर्घ आजाराने पोर्निमा लिंगायत यांचा मृत्यु झाला. वारसदार त्यांचे पती पांडुरंग लिंगायत शेतमजुर व सुतारकाम करतात . नुकतेच मेंडकी स्टेट बँकेचे व्यवस्थापक ईशान दयालवार यांचे हस्ते दोन लाखाचा धनादेश देण्यात आले . यावेळी शाखा व्यवस्थापक यांनी मेंडकी एसबीआय च्या समस्त ग्राहकाणां शाखे मार्फत आर्थीक व्यवहारा सोबतच विमा काढण्याचे आवाहण केले.


PostImage

युवाक्रांती समाचार

Feb. 21, 2024

PostImage

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी


ब्रम्हपुरी/प्रतिनीधी:-  स्थानिक डाॅ.पंजाबराव देशमुख कन्या कनिष्ठ महाविद्यालय तथा डॉ.पंजाबराव देशमुख कॉन्व्हेंन्ट ब्रम्हपुरी यांच्या संयुक्त विद्यमानाने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,जाणता राजा, रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती साजरी करून त्यांना व त्यांच्या कार्यांना अभिवादन करण्यात आले.                                                     याप्रसंगी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.प्रकाशजी बगमारे, संस्थेच्या उपाध्यक्षा तथा कान्व्हेंन्टच्या प्राचार्या सौ मनीषाताई बगमारे, महाविद्यालयाच्या प्राचार्या शारदाताई ठाकरे, उपप्राचार्य श्री.सौरभजी खांदे सर प्रामुख्याने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.उपस्थित पाहुण्यांनी शिवचरित्राचा व्यापक इतिहास हा विद्यार्थ्यांना व उपस्थितांसमोर आपल्या भाषणाद्वारे सांगितला.सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती गुरनुले  तर आभार प्रतिक्षा निहाटे  यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेकरिता प्रा.खोब्रागडे , प्रा.एच के.बगमारे , गोवर्धन दोनाडकर,निलीमा गुज्जेवार,निशा मेश्राम, अश्विता सयाम, वैशाली सोनकुसरे, प्रियंका करंबे,प्रतिक्षा निहाटे,ज्योती गुरनुले,संजय नागोसे तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


PostImage

युवाक्रांती समाचार

Feb. 21, 2024

PostImage

चिंचोली (बु.) येथे उर्स मुबारक व शानदार दुय्यम कव्वालीचा कार्यक्रम.  


ब्रम्हपुरी /प्रतिनिधी - अल्हाज हजरत सैय्यद मोहम्मद ईकबालशाह बाबा उर्फ बाबाजान कादरी चिशती चिंचोली(बू) ता. ब्रम्हपुरी येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी दि.23 फेब्रुवारी 2024रोज शुक्रवारला रात्रौ 8 वाजता अम्मासाहेब , शफीबाबा, शरीफबाबा यांच्या मार्गद्शनाखाली ऊर्स मुबारक व मान्यवरांचे जाहीर सत्कार तसेच शानदार दुय्यम कव्वालीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.      

                          सदर कार्यक्रमास महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा श्रेत्राचे  आमदार विजयभाऊ  वडेट्टीवार ,खासदार अशोक नेते , आमदार बंटीभाऊ भांगडीया, आमदार किष्णा गजभे , आमदार किशोर जोरगेरवार,आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी नगराध्यक्ष इतेश्याम अली वरोरा, तुषारभाऊ सोम भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य, सतिश वाजूरकर उपाध्यक्ष ओबीसी महासंघ प्रदेश, माजी आमदार अतुलभाऊ देशकर, किसनजी नागदेवे जिल्हाध्यक्ष भाजपा गडचिरोली, विनोद संकत, शंकरलाल अग्रवाल चंद्रपूर, भास्कर डांगे, राकेश जयस्वाल, नानाभाऊ नाकाडे, डा. नामदेव किरसान, महेद्र ब्राम्हणवाडे,उषाताई चौधरी  तहसीलदार ब्रम्हपुरी, दिनकर ठोसरे उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपरी, ठाणेदार अनिल जिट्टवार,स्मिताताई पारधी व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.                          

  अल्हाज हजरत सैय्यद मोहमद ईकबलशाह बाबा उर्फ बाबाजान कादरी व सार्वजनिक मंडळ चिंचोली( बू ) यांच्या वतीने. दरबारी सत्कार सत्कारमूर्ती प्रकाशभाऊ सावकार पोरेद्दीवार अध्यक्ष गडचिरोली ग्रामीण बँक,मोतीलाल कुकरेजा उपाध्यक्ष भाजपा गडचिरोली,घनश्याम जीवनजी कावळे नागपूर , प्रल्हाद धोटे वडसा, नामदेव कुथे जेष्ठ नागरिक चिंचोली(बु) तसेच पाल्य पुरस्कार कु. कूनिका लालाजी पारधी ब्रम्हपुरी, कू. यामिनी किशोर मेश्राम आरमोरी, आलाप तुषार सोम चंद्रपूर, रोशन देविदास दिवटे चिंचोली (बू) यांचा दरबारच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. रात्रौ दहा वाजताच्या दरम्यान असलम मुकरम साबरी सहारनपूर (युपी )व राजा सर्फराज साबारी रायपूर (युपी )यांची दुय्यम कव्वालीचा शानदार कार्यकम होणार आहे. आलेल्या भाविक भक्तांना स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तरी समस्त जनतेनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अल्हाद हजरत सैय्यद ईकबलशाह बाबा उर्फ बाबाजान कादरी च्या वतीने करण्यात आले आहे..


PostImage

युवाक्रांती समाचार

Feb. 18, 2024

PostImage

जगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज सेवा समितीतर्फ रक्तदान


ब्रम्हपुरी/ तालुका प्रतिनिधी:- जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज व.प. पु. कानिफनाथ महाराज सेवा समितीतर्फे १७ फेब्रुवारी २०२४ पिपळगाव (भोसले) ता. ब्रम्हपुरी येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाध मिळाला सदर शिबिरात १०७ रक्तदात्यांनी रक्तदान केले सदर शिबीरात् जिवन ज्योती ब्लड बँक नागपुर रक्तपेढी रक्तसंकलन करण्याक्रीता उपलब्ध होती सर्व रक्तदात्यांचे खुप खुप अभिनंदन व आभार तालुक्याचे तालुकाध्यक्ष व त्यांची तालुका कमेटी, सेवा केंद्र कमेटी, आरती कमेटी व सर्व जिल्यांच्या कमेटीने व कार्यकर्त्यांनी परिश्रम करून शिबिर यशस्वी केले त्याबद्दल सर्वांचे खुप खुप अभिनंदन अशिच सेवा आपल्या हातून निरंतर घडत राहो अशी स्वामी चरणी प्रार्थना..


PostImage

युवाक्रांती समाचार

Feb. 17, 2024

PostImage

विदर्भकन्याअपूर्वा देशमुख हिची अभिनय कलेतील अपूर्व वाटचाल!


अकोला:-अभिनय क्षेत्रात आपल्या कलासाधनेतील कौशल्याने प्रगतीचं उल्लेखनीय स्थान कायम करण्यासाठी अविरत मेहनत करणारी  अपूर्वा कला क्षेत्रात अपूर्व वाटचाल करीत आहे.ही उदयोन्मुख कलाकार सिरियलच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात* आपल्या क्षमता सिध्द करीत पुढे आलेली आहे. ती नागपूरातील अपूर्वा मिनरल्स या कंपनीचे संचालक व लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे विदर्भ विभागीय संघटन तथा संपर्क प्रमुख श्री अरविंदराव देशमुख,भामोदकर  यांची कन्या आहे.

    तिने नागपूर येथून आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अॕन्ड रिसर्च सेंटर मधून एमबीए पूर्ण केले.प्रथमपासून अभिनयाची असलेली आवड जोपासत नंतर किशोर नमिता कपूर अॕक्टींग इन्स्टिट्यूटमधून दोन वर्षांचा अभिनय प्रशिक्षण कोर्स पूर्ण केला.आपल्या आवडीच्या क्षेत्रातच प्रगती करून  स्थिरावण्याचे ध्येय घेऊन अॕक्टींग प्रशिक्षणाचे धडे घेत ती सध्या मुंबईमध्ये अनेक सिरियलमध्ये सक्रिय आहे.जाहिरात शुटींगमध्ये ती दुबईला पण होती.यापूर्वी *"जय जय स्वामी समर्थ",*"परशुराम" " अहिल्याबाई नंतर सध्या स्टार प्लसच्या *"आंख मिचौली"* सिरिजच्या शुटींमध्ये ती सक्रिय आहे! स्वतःच्या अभिरूचीला न्याय देत सर्व क्षमतांनी प्रयत्नातील सातत्य,मेहनतपूर्ण सरावाने विविध भूमिकांमधून अभिनय क्षेत्रात आपले आगळे वेगळे स्थान निर्माण करण्याचा तिचा मनोदय आहे.या यशाकडे जाणाऱ्या प्रवासासाठी तिला समाजातून अनेकांनी स्नेहपूर्ण शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.


    तिच्या अभिनय क्षेत्राच्या वाटचालीचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या महाराष्ट्र राज्य संघटन व संपर्क प्रमुख,महाराष्ट्र २४ तास च्या संपादिका अमिता कदम यांनी तिची मुलाखत घेऊन तिच्या धडाडीच्या संघर्षशील प्रवासाचा प्रेक्षकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Feb. 16, 2024

PostImage

26 वा वर्धापन दिन  मोठ्या उत्साहात साजरा.!विद्यार्थ्यांच्या कलगुणांचा सत्कार कार्यक्रम


ब्रह्मपुरी -

ब्रम्हपुरी येथे युवापरिवर्तन संस्था ही मागील अनेक वर्षांपासून आसपासच्या तालुक्यातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून टेलरिंग, ब्युटीशियन, कॉम्पुटरचे बेसिक व ऍडव्हान्स कोर्सेस, बेसिक नर्सिंग कोर्स आणि असे विविध कौशल्य विकास प्रशिक्षण अगदी माफक दरात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून, त्यांना योग्य रित्या प्रशिक्षण देऊन बेरोजगार युवक - युवतींना रोजगार देण्याचे उत्तम कार्य युवा परिवर्तन संस्था करीत आहे.

दि.15 फेब्रुवारी 2024 रोजी गुरुवारला युवा परिवर्तन संस्थेचा 26 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.मोहन वाडेकर सर होते., तर मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ.क्रिष्णा राऊत सर, प्रमुख अथिती म्हणून डॉ.अंजली वाडेकर मॅडम, डॉ.उदयकुमार पगाडे सर (युवा समाजसेवक), प्रा.लालाजी मैंद सर., प्रा.श्रीकांत कळसकर सर., सचिन दिघोरे सर (व्यवस्थापक - युवा परिवर्तन ब्रम्हपुरी) यांच्या उपस्थितीत पार पडला. 

ह्या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सावन सहारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ.कुंदा निकुरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता वर्षा भानारकार, रमाकांत बगमारे, पियुष यांनी व आदी लोकांनी उत्तमरित्या सहकार्य केले..


PostImage

युवाक्रांती समाचार

Feb. 13, 2024

PostImage

शुल्लक वादातून पतीने केली पत्नीची हत्या.! ब्रम्हपुरी तालुक्यातील मालडोंगरी येथील घटना


ब्रम्हपुरी (ता.प्र.):-

     तालुक्यापासून अवघ्या 2 किमी. अंतरावर असलेल्या मालडोंगरी येथे पतीनेच पत्नीची हत्या केल्याची घटना दि.12 फेब्रुवारी ला सकाळी उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार सदर घटनेतील आरोपी जयदेव पिल्लेवान (60)रा.मालडोंगरी व मृतक पत्नी यांच्यात मागील 2-3 दिवसापासून रोज भांडण होत होते दरम्यान दि.11 फेब्रुवारी ला रात्री 11.00 वा दरम्यान फिर्यादी मजलग जॉकीस जयदेव पिल्लेवान (30)याला आरोपी व मृतक भांडण करताना दिसले.हे भांडण नेहमीचेच  समजून फिर्यादीने लक्ष्य दिले नाही.मात्र  सकाळी 7.00 वा जॅकीस ला त्याची आई हिरकण्या जयदेव पिल्लेवान (50)  ही मृतावस्थेत पडलेली दिसली. त्यामुळे आरोपीने त्याला शिवीगाळ केल्याचे कारणावरून त्याचे पत्नीला हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याने डोक्याला व चेहऱ्याला मार लागल्याने ती मरण पावली अशी माहिती पोलीस ठाण्यात दिली.
        फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी  जयदेव पिल्लेवान वय (60)याचेवर  अ.क्र. 71/24 कलम 302 भादवी नुस गुन्हा दाखल करून. आरोपीला अटक करण्यात अली.घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्या मार्गदर्शनात ब्रम्हपुरी पोलीस करत आहेत.


PostImage

युवाक्रांती समाचार

Feb. 11, 2024

PostImage

शाळेच्या टेरेसवर आढळले नवजात मृत अर्भक, अभ्रकाचे चार तुकडे, निर्दयपणाचा कळस


अकोला (प्रतिनिधी- प्रज्ञानंद थोरात) अकोला येथील रतनलाल प्लॉट चौकातील जिल्हा परिषद उर्दू शाळेजवळ एक नवजात अर्भकाचा मृतदेह आढळून आला आहे. जिल्हा परिषद उर्दू शाळा ही जिल्हा महिला रुग्णालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. नवजात अर्भकाच्या मृतदेहाचे चार तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. 

 घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. शाळेच्या छतावर हा अर्भक कुठून आला? याचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे. खळबळजनक घटनेनं अकोल्यासह संपूर्ण जिल्हा हादरला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "जिल्हा परिषद शाळेल्या आवारात एक अर्भक आढळून आलं आहे आणि त्याच्या बाजूला मांसाचे तीन भाग आढळून आले आहेत. मृतदेह ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील खुलासा होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.  शाळेच्या मैदानाजवळ काही मुलं क्रिकेट खेळत होती. खेळता खेळता त्यांचा बॉल शाळेच्या छतावर गेला. काही मुलं बॉल आणण्यासाठी तिथे गेली. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला. मुलं घाबरुन गेली आणि त्यांनी तिथे जवळच राहणाऱ्या काही लोकांशी संपर्क साधला. लोकांनी या धक्कादायक प्रकाराबाबत पोलिसांना तात्काळ माहिती दिली. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महत्त्वाची बाब म्हणजे, जिल्हा स्त्री रुग्णालय जिल्हा परिषदेच्या शाळेपासून जवळच आहे. तसेच, सापडलेलं अर्भक स्त्री अर्भक आहे की, पुरूष अर्भक आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. असे वृत्त आमचे प्रतिनिधी प्रज्ञानंद थोरात यांनी वाशिम जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांचेकडे कळवीले आहे .


PostImage

युवाक्रांती समाचार

Feb. 11, 2024

PostImage

हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांच्या अंदाजाप्रमाणे वर्धा,अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात झाला अवकाळी पाऊस


संजय कडोळे जिल्हा विशेष प्रती.

वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : आमचे वर्धा,अमरावती, यवतमाळ प्रतिनिधी यांनी दिलेल्या वृत्तानुसार,वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात असणाऱ्या ग्राम रुईगोस्ता  येथील हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांच्या अचूक अंदाजानुसार, शनिवार दि. 10 फेब्रुवारी 2024 रोजी, वर्धा,अमरावती, यवतमाळ जिल्हयात कोठे रिमझिम तर कोठे दमदार अवकाळी पाऊस सर्वदूर झाल्याचे वृत्त मिळाले असून, दुपारी झालेल्या पावसाने नागरिकाची दाणादाण झाली आहे. या पावसाने अमरावती जिल्हयातील धामणगाव रेल्वे,चांदूर भागात वर्धा जिल्हयातील हिंगणघाट, वडनेर येथे ,देवळी तालुक्यातील इसापूर, भिडी, सैदापूर , काजळसरा, दुर्गुडा, आकोली, तांबा, विजयगोपाल, दापोरी, अडेगाव, गौळ, इंझाळा भागात बोरासारखी गारपिट झाली आहे.यवतमाळ जिल्हयातूनही गारपिटीचे वृत्त मिळाले असून भाजीपाला पिकासह,गहू-हरभरा या रब्बी पिकाचे नुकसान झाले आहे. विदर्भातील शेतकरी हवालदिल झाला आहे. आधीच यावर्षीचा हंगाम शेतकऱ्याच्या हातून गेल्यात जमा होता.त्यात सोयाबीन,कपाशीला भाव नाही. तरीही संकटाना मात देत असलेल्या भुमिपूत्राच्या रब्बीच्या हंगामला अवकाळीचा फटका बसल्यामुळे शेतकरी राजा संकटात सापडून काळजीग्रस्त झाला आहे.हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांच्या अंदाजाप्रमाणे आजपासून पाच दिवस पावसाचे असून,भाग बदलून हा अवकाळी पाऊस दि. 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत होण्याची शक्यता आहे. तसेच या काळात थंडगार वारे,वादळ, विजाचा वर्षाव आणि गारपिट होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी ग्रामस्थांनी दुपारी शेतात जाणे, झाडाखाली उभे रहाणे टाळावे,शेळ्यामेंढ्या,गुरेढोरे झाडाखाली न बांधण्याचा सल्ला त्यांनी दिला असल्याचे वृत्त आमचे वाशिम जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांनी दिले आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Feb. 11, 2024

PostImage

प्रेम प्रकरण मान्य नसल्याने; सखां बाप व मोठा भाऊच निघाले वैरी.! लहाण्याची केली गळा आवळून हत्या


बापाने व मोठ्या भावानेच लहाण्याची केली गळा आवळून हत्या अन् केला कोणीतरी मारल्याचा बनाव

स्वान पथकाच्या साह्याने असा झाला धक्कादाय घटनेचा उलगडा

अकोला :

महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवा गावात एक खळबळजनक घटना समोर आली आहे.येथे एका तरुणाचा बापाने आणि मोठ्या भावाने गळा आवळून खुन अन् पिंजर पोलीस ठाणे गाठून मुलाला कोणीतरी मारल्याचे सांगितले मात्र तपासा दरम्यान प्रकरण उघडकीस आले.

अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवा गावातील संदीप गावंडे या  तरुणाची बापाने व त्याच्या मोठ्या भावाने मिळून गळा आवळून हातपाय बांधून  हत्या केली.संदीप चे गावातीलच एका अनुसूचित जातीच्या मुलीशी प्रेम प्रकरण जुळले होते.व तो तिच्याशी लग्न करणार होता.हे प्रकरण घरातील लोकांना पसंद नसल्याने त्यांनी संदीपला टोकले असता त्यांच्यात वाद निर्माण झाला.या वादाचे  रूपांतर एकदम टोकाच्या भूमिकेवर गेल्याने सखां बाप व मोठा भाऊ वैरी झाला व त्यांनी संदीपचा गळा आवरून हातपाय बांधून त्याला संपविल्याचे उघड झाल्याने सध्या पोलिसांनी आरोपी बाप आणि मोठ्या भावाला अटक करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बार्शिटाकळी तालुक्यातील टिटवा गावात वास्तव्यास असणारे नागोराव गावंडे यांना दोन मुले असून लहान मुलगा संदीप गावंडे हा पुणे येथील एका कंपनीत काम करीत होता.त्याचे गावातील एका अनुसूचित जाती गटातील मुलीशी प्रेम संबंध जुळल्याने तिच्याशीच लग्न करण्याचा कायमचा हट्ट धरला होता.त्याचे वडिलांना हे प्रेम प्रकरण मान्य नसल्याने  याबद्दल त्यांच्या घरात नेहमीच वादविवाद व्हायचे.यामुळे संदीप ने पळून जाऊन लग्न करण्याचे वडील नागोराव गावंडे यांना समजले यावरून त्यांनी संदीपला तू तिच्याशी प्रेम का करतो व आता लग्न करू लागलाय असे म्हणून त्यांच्यात वाद वाढल्याने गुरुवार आठ फेब्रुवारी च्या दिवशी वडील नागोराव गावंडे यांनी  मोठ्या मुलाला सोबत घेऊन संदीप चा गळा आवळून हत्या केली व त्याचे हात पाय बांधून बाहेरगावी चालले गेले.दुसऱ्या दिवशी शुक्रवार 9 फेब्रुवारीला दुपारच्या दरम्यान घरी आले असता संदीप चा मृतदेह पाहून एकच टाहो फोडला व पिंजर पोलीस स्टेशन गाठून माझ्या मुलाला कोणीतरी मारल्याचे बनाव करून सांगितले. पिंजर पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मुर्तीजापुर उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे व अकोला श्वान पथकाला सदर घटनेची माहिती दिली. घटनास्थळी श्वान पथकाच्या सहाय्याने पोलिसांनी तपास केला असता श्वान वडील व मोठ्या भावा जवळ येऊन थांबले यावरून पोलिसांनी वडील नागोराव गावंडे व मोठ्या भावाला ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी हत्या केल्याची कबुली दिली. असा झाला घटनेतील हत्या करणाऱ्या आरोपींचा उलगडा झाला.याप्रकरणी अधिक तपास मुर्तीजापुर उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ यांच्या नेतृत्वात पिंजर पोलीस करीत आहे.असे वृत्त प्रतिनिधी प्रज्ञानंद भगत यांनी कळविल्याचे आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांनी सांगितले .


PostImage

युवाक्रांती समाचार

Feb. 10, 2024

PostImage

आरटीई २५% चा खर्च शासनास परवडत नसल्याने, आता जिल्हा परिषद सह अनुदानित शाळांमध्ये मिळणार मोफत प्रवेश . .?


राज्य सरकारचा शिक्षण क्षेत्रातील विकास थांबविण्याचा घाट!

संजय कडोळे   वाशिम जिल्हा विशेष प्रती.

वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे): केंद्र शासनाने २००९ साली आरटीई चा कायदा आणला. मात्र राज्यात प्रत्यक्षात २०१२ पासुन सुरू झाला. त्याद्वारे अ.जा., अ.ज. व ओबीसीतील आर्थीक दुर्बल घटक (कमी ऊत्पन्न असणारा) घटकातील ६ वर्षाच्या मुली मुलांना वर्ग ८ वी पर्यंत इंग्रजी शाळेत मोफत शिकण्याची सोय आहे. त्यास १२ वर्षापासून चांगला प्रतिसाद सुद्धा मिळात आहे. या योजनेनुसार केंद्र सरकार ६०% तर राज्य सरकार ४०% रक्कमेचा निधी संबंधीत शाळांना वितरीत करते. त्याअंतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी व पालकांना आपण दर्जेदार शाळेत शिक्षण घेत असल्याचा आनंद मिळत आहे. असे असतांना मात्र राज्य सरकार या योजनेमधे आधीच अनुदानीत असणार्‍या शाळांना समाविष्ट करून या योजनेद्वारे खर्च होणारी रक्कम बचत करून पालकांच्या इंग्रजी शिक्षणाच्या अपेक्षांना सुरुंग लावण्याच्या तयारीत दिसत आहे. याबाबत शासन नवा प्रस्ताव मंजुरीसाठी लवकरच आणत असल्याची माहीती आहे.
————————————
मुलींची इंग्रजी शिक्षणाची लाॅटरी बंद?
 आरटिई' २५ टक्के मोफत प्रवेशाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रीयेस शालेय शिक्षण विभागाचे "लाॅटरी पद्धतीने प्रवेश" असे नावं आहे. अर्थात ज्या पालकांनी आपल्या पाल्याचा याद्वारे प्रवेशाकरीता अर्ज केला, त्यांचा नंबर लागल्यास लाॅटरी लागली असे म्हटले जाते. सदर पालकांना याचा लॉटरी लागल्यागत आनंद होतो सुद्धा होतो. मात्र राज्य शासनाकडून ६०-७० कोटींच्या निधी वितरणासाठी या योजनेत अडथळे निर्माण करणे योग्य नाही. सद्याच्या योजनेचा इंग्रजी शिक्षणाकरीता विशेषत: मुलींना लाभ होत आहे. आज पालकांची इंग्रजी शिक्षणाची चढाओढ पाहता या योजनेतील प्रवेशाची व्याप्ती २५% वरून ५०% करावी अशी आमची मागणी आहे.असे
राहुलदेव मनवर, उपाध्यक्ष मावळा संघटना यांनी कळविले आहे.
'आरटीई'च्या नव्या नियमानुसार वर्ग पहिलीच्या मुलीमुलांचे प्रवेश सरकारी शाळांमधे घेणे बंधनकारक असणार!
   वास्तवीक पाहता सरकारी शाळा ह्या अनुदानीत असल्यामूळे त्यामधे सर्वांसाठीच मोफत शिक्षणाची सोय असते. सद्या 'आरटीई' अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क सरकारी तिजोरीतून खासगी इंग्रजी शाळांना दिले जाते. सद्याचा 'आरटीई'चा पॅटर्न सरकारला  परवडणारा नसल्याने इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यास त्याच्या घरापासून एक कि.मी. अंतरावरील जि.प., खासगी, अनुदानित किंवा अंशत: अनुदानित शाळेत प्रवेश दिला जाईल. त्यावेळी त्या मुलाच्या पालकांच्या पसंतीला प्राधान्य राहील. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालीका किंवा शासकीय अनुदानित शाळा त्या परिसरात नसेल तरच संबंधीत मुलांसाठी खासगी इंग्रजी शाळांचा पर्याय असणार आहे. आरटीई'च्या नव्या नियमानुसार वर्ग पहिलीच्या मुलीमुलांचे प्रवेश सरकारी शाळांमधेच घेणे बंधनकारक असणार आहे. प्रवेश न घेतल्यास त्या विद्यार्थ्यास दुसर्‍या कुठल्याच शाळेत मोफत शिक्षणाचा पर्याय नसेल.
*——————————————*
सरकारी शाळातील शिक्षणाचा दर्जा खालावल्याने साडेबारा हजारांहून अधिक शाळांची पटसंख्या कमी झाली आहे. यामूळे हजारो शिक्षक अतिरीक्त झाले आहेत. मात्र आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांना सरकारच्या माध्यमातून खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जातो.
▪️यामूळे दरवर्षी केंद्र शासनाचा ६०% व राज्य शासनाचा ४०% दोन्ही मिळून 'आरटीई' प्रवेशापोटी वितरीत केले जातात. मात्र राज्य सरकारला हे परवडणारे नसल्याचे राज्य शासनाचे मत आहे.
सद्या २०२२-२३ पर्यंतचे खासगी इंग्रजी शाळांचे १६०० कोटी रुपयांचे शुल्क थकलेले आहे.

सरकार का संपवू पाहते ही योजना?
▪️मराठी शाळांची पटसंख्या कमी होऊन सात ते आठ हजार शाळा बंद पडण्याच्या मार्गावर; खासगी इंग्रजी शाळांकडून शासन दरबारी शुल्क वाढीची मागणी आहे.
'आरटीई'तून पहिली ते आठवीपर्यंत इंग्रजी शाळांमध्ये मोफत शिकलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाचा खर्च परवडत नाही; त्यांना पुन्हा मराठी माध्यमातूनच शिकावे लागते. त्यातून अनेकजण नैराश्याचे शिकार होवू शकतात असे शासनाचे म्हणणे आहे.असे रहुलदेव,उपाध्यक्ष मावळा संघटना यांनी कळवीलेहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Feb. 9, 2024

PostImage

मोठी बातमी.महीला मजुरांना घेवुन जाणारी पिकअप पलटली..!चार महिला मजुरांचा मृत्यू.!ब्रम्हपुरी तालुक्यातील माहेर गावात दुःखाचे डोंगर कोसळले


ब्रम्हपुरी:-

ब्रम्हपुरी तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली असून माहेर(खरबी)गावातील १७ महिला मजूर चना कापणीसाठी दिनांक:-८ फेब्रुवारीला २०२४ ला बाहेर गावी जात असताना या महिला मजुरांना घेऊन जाणारा पिकअप वाहन उमरेड तालुक्यातील सिर्सी गावाजवळ पलटी झाल्याने या घटनेत चार महिला मजुरांचा मृत्यू झाला आहे .तर काही महिला गंभीर जखमी आणि इतर महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत.गंभीर जखमी महीला मजुरांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे उपचाराकरीता हलविण्यात आले आहे.

या घटनेने माहेर गावासह सभोवतालील गावपरिसरात शोककळा पसरली आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Feb. 7, 2024

PostImage

जगदगुरू नरेंद्रचार्यजी महाराज यांचा प्रत्यक्ष दर्शन व मार्गदर्शन सोहळा १२ व १३ फेब्रुवारी ला


ब्रम्हपूरी/तालुका प्रति:-जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज , जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिण पीठ , नाणीजधाम यांचा प्रत्यक्ष मार्गदर्शन व दर्शन सोहळा दिनांक  १२व १३ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९ .०० वाजता ज.न.म.संस्थान , उपपीठ पूर्व विदर्भ , मोहगाव (झिल्पि) , ता हिंगणा ,   जि . नागपूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे . आपणास .स्वामीजींचे मार्गदर्शन पूर्णतः विनामुल्य असते. आपल्या भागातील दुःख पिडीतांना नाणीजधाम या ठिकाणी आर्थिक , शारीरीक किंवा वेळेअभावी जाता येत नाही . याकरीता स्वामीजी स्वतःच आपल्या भेटीसाठी, येत आहेत .  स्वामीजींच्या प्रत्यक्ष मार्गदर्शन व दर्शन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.उपासक दिक्षा सोमवार दि १२ फेब्रुवारी २०२४ ला व साधक दिक्षा दि 13 फेब्रुवारी २०२४ ला  दिल्या जातील.परिसरातील भक्तांनी दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन ज.न. म . संस्थान , उपपीठ पूर्व विदर्भ , पीठ प्रमुख  राजेंद्रकुमार  भोयर , व्यवस्थापक  प्रविण  परब व चंद्रपूर जिल्हा निरीक्षक राजेश येरने जिल्हाध्यक्ष लडी सर व चंद्रपूर जिल्हा भक्त सेवा मंडळ यांचे कडून करण्यात आले आहे .


PostImage

युवाक्रांती समाचार

Feb. 4, 2024

PostImage

कॅन्सर दीना निमित्त लॉयन्स क्लब्स इंटरनॅशनल व डॉ.चव्हाण होमिओपॅथीचा अभिनव उपक्रम


अजय जागीरदार अकोला जिल्हा विशेष प्रती.

अकोला:-   कर्करोग जागतिक स्तरावर मृत्त्यूचे प्रमुख दुसरे कारण आहे. जागतिक स्तरावर कर्करोगा संबंधी जागरूकते करिता समजा मध्ये योग्य तो प्रचार प्रसार करून या आजारांशी दोन हात करण्याकरिता लॉयन्स क्लबच्या सहकार्याने सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने व कॅन्सरमुक्त समाज निर्मितीचे उधिष्ठ डोळ्यासमोर ठेऊन

 ४ फेब्रुवारी जागतिक कॅन्सर दिवसानिमित्त डॉ.चव्हाण होमिओपॅथी व लॉयन्स क्लब्स इंटरनॅशनलचा अभिनव उपक्रम पुढील काळात राबविण्यात येणार आहे यामध्ये दर महिन्याच्या पहिल्या रविवारी कॅन्सर ग्रस्त तसेच त्यासंबंधी लक्षणे असलेल्या रुग्णांकरिता डॉ.चव्हाण होमिओपॅथिक क्लिनिक ला मोफत तपासणी केली जाईल. यामध्ये प्रामुख्याने रुग्णांची मोफत तपासणी तज्ञ मंडळी करतील तर अल्पदरामध्ये होमिओपॅथिक व आधुनिक अलोपॅथिक औषधोपचार संबंधित तज्ञांच्या क्लीनिकमध्ये केला जाईल. यामध्ये डॉ.संदिप चव्हाण (होमिओपॅथिक तज्ञ) , डॉ.सौ.योगीता चव्हाण (होमिओपॅथिक तज्ञ) , डॉ.आशिष डेहनकर ( क्षय व फुफुस विकार तज्ञ ),डॉ.पराग डोईफोडे  (नाक कान घसा तज्ञ ) , डॉ.विजय शर्मा ( मुख कर्करोग तज्ञ ) सेवा देतील अशी माहिती प्रकल्प प्रमुख लॉयन विशाल शाह यांनी लॉयन्स क्लब अकोला चे अध्यक्ष लॉयन पियुष संघवी यांच्या वतीने दिली.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 31, 2024

PostImage

महासांस्कृतिक महोत्सवात, रणरागीणी बालिका कु.अमृता पचांगे हिने दाखवीले शौर्यप्रदर्शन !


संजय कडोळे  वाशिम जिल्हा विशेष प्रती.

वाशिम : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचनालय मंत्रालय मुंबई द्वारा, वाशिम येथे दि.27 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024 पर्यंत भव्य अशा महासांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पहिल्या दिवशी पारंपारिक आणि शिवकालिन साहसी खेळ आणि शस्त्र प्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी झालेल्या शौर्यप्रदरर्शनात,स्थानिक बालासाहेब व्यायाम प्रसारक मंडळ वत्सगुल्म वाशिमच्या खेळाडूं समवेत,बालासाहेब व्यायाम प्रसारक मंडळाची रणरागीणी विरांगणा ठरू पहाणाऱ्या,कु.अमृता (अर्चना) रामेश्वर पचांगे हिने शिवकालिन मावळ्यांच्या "दांडपट्टा" युद्धकौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन करून उपस्थिता कडून कौतुकाची थाप मिळवीली. कु अमृता अर्चना रामेश्वर पचांगे ही पोतदार इंग्लीश स्कूलची इयत्ता नववीची विद्यार्थीनी असून तिने इंग्लीश माध्यमाच्या शिक्षणा सोबतच,वक्तृत्वकला,नृत्यकला, कराटे, फुटबॉल,तलवार बाजी, दांडपट्टा चालविणे इत्यादी लोककला जोपासल्या आहेत. त्याबद्दल जिल्हयातील अग्रणी असलेल्या,विदर्भ लोककला संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे, उपाध्यक्ष विजय पाटील खंडार, उमेश अनासाने यांनी तीचे अभिनंदन केले आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 31, 2024

PostImage

राज्यस्तरीय कामगार भजन स्पर्धेत पुरूष गटात कोल्हापूर तर महिला गटात नागपूर संघ प्रथम.! कामगार भजन स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ थाटात संपन्न


पंजाबराव देशमुख

गुरुकुंज/ मोझरी/अमरावती-

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळा करवी पुरुष 28 वी तर महिला  18 वी राज्यस्तरीय कामगार भजन स्पर्धेचे आयोजन राष्ट्र संत तुकडोजी महाराज श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम येथे आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत पुरुष गटात कोल्हापूर  तर महिला गटात नागपूर संघ प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत या विजयी संघाना राज्यस्तरीय पुरस्कार व रोख रक्कम देऊन त्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आहे तसेच राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सागता झाली. 
    या राज्यस्तरीय कामगार भजन स्पर्धा दि.29 व 30 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या संपूर्ण राज्यातून पुरुष व महिला एकूण 35 संघ सहभागी होऊन त्यामध्ये एकूण 420 भजन कलावंतानी आपला कलाविष्कार प्रगट केला तर आपल्या भजन साधनेने भजन रसिकांची मने जिकंली. या कामगार राज्यस्तरीय स्पर्धेचा बक्षिस समारंभ मोठया थाटाने आज अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम,( मोझरी) येथे पार पडला.
       या स्पर्धेत पुरुष गटात व्दितीय नायगांव गट  तृतीय वरळी गट उत्तेजनार्थ प्रथम अमरावती गट  व्दितीय सोलापूर गट तर उत्कृष्ट तबला-पखवाजक वादक प्रथम ज्ञानेश वगेळी ,कोल्हापूर गट व्दितीय मिलाजी पुणेकर, नागपूर गट तृतीय सुजल काडवे, नांयगाव गट उत्कृष्ट गायक प्रथम कृष्णा काडवे, नायगांव गट व्दितीय  प्रमोद पोकळे, नायगांव गट तृतीय शत्रुघ्न आढाव, अकोला गट उत्कृष्ट पेटीवादक प्रथम प्रशांत घाडी, वरळी गट व्दितीय प्रविण कुरळकर, पुणे गट तृतीय चैतन्य कडस्कर, नागपूर गट , उत्कृष्ट तालसंच प्रथम नाशिक गट व्दितीय संभाजीनगर गट तृतीय नागपूर गट  तर महिला गटात व्दितीय  संभाजीनगर गट तृतीय चिपळूण गट उत्तेजनार्थ प्रथम ठाणे गट व्दितीय नांदेड गट तर उत्कृष्ट तबला-पखवाजक वादक प्रथम विजया इंगोले, संभाजी नगर गट  व्दितीय भाग्यश्री शिंदे, वरळी गट  उत्कृष्ट गायक प्रथम रश्मी कविश्वर, नागपूर गट व्दितीय लक्ष्मी थोरात, संभाजीनगर गट तृतीय शितल भोसले, ठाणे गट उत्कृष्ट पेटीवादक प्रथम भारती पाळेकर, चिपळूण गट  व्दितीय  जयश्री खतकर, ठाणे गट तृतीय स्वाती पंडित, सांगली गट, उत्कृष्ट तालसंच प्रथम सांगली गट व्दितीय नागपूर गट तृतीय ठाणे गट भजनी संघ कलावंताना पुरस्कार,प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 
    या राज्यस्तरीय कामगार भजन स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी  जनार्दन बोथे सरचिटणीस,अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज ,प्रमुख पाहुणे अमोल बांबल अधिक्षक श्री गुरुदेव मानवसेवा छात्रालय तसेच विशेष उपस्थिती म्हणून  राज्याचे कल्याण आयुक्त रविराज इळवे, नागपूर व अकोला विभागाचे सहायक कल्याण आयुक्त नंदलाल राठोड आणि स्पर्धेचे तज्ञ परिक्षक  नारायण दरेकर, किशोर अगडे, डॉ.मुक्ता महल्ले (धांडे) हे मान्यवर मंचावर उपस्थित होते. हया मंडळाच्या  स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंकज देशमुख अध्यक्ष जिल्हा कॉग्रस सेल,निलेश भिवगडे डेकोरेटर, हेमत भोंगाडे ध्वनीक्षेपण व्यवस्थापना,शाम काळकर तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज याची मनमोहक प्रतिमा रांगोळीच्या माध्यमातून साकारणारे कलावंत अमोल ठाकरे यांचे स्वागत कल्याण आयुक्त् इळवे यांच्या हस्ते करण्यात आले या दोन दिवसीय राज्यस्तरीय कामगार भजन स्पर्धेने श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रमाची पावनभूमी भक्ती गायनाच्या सूरानी न्हाहून निघाली. या राज्यस्तरीय कामगार भजन स्पर्धेचे परिक्षण सन्माननिय परिक्षक नारायण दरेकर, किशोर अगडे, डॉ.मुक्ता महल्ले (धांडे) यांनी केले  कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्याचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमरावती गटाच्या कामगार कल्याण अधिकारी प्रतिभा भाकरे  यांनी केले तर आभार प्रदर्शन सहायक कल्याण आयुक्त नंदलाल राठोड यांनी केले सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अकोला गटाच्या कामगार कल्याण अधिकारी वैशाली नवघरे,जळगाव खान्देश गटाचे कामगार कल्याण अधिकारी सत्यजित चौधरी व नागपूर गटाचे कामगार कल्याण अधिकारी छोटु जाधव,नागपूर विभागाचे निधी निरीक्षक राजेश पाठराबे, अमरावती येथील केंद्र संचालक सचिन खारोडे,कल्याण निरीक्षक प्रतिभा पागधुने तसेच मंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिक्षम घेतले.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 31, 2024

PostImage

प्रा. अभिषेक दुर्गे यांची पर्यावरण सेंद्रिय रसायनशास्त्र आणि तंत्रज्ञान या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी नियुक्ती


रुमदेव सहारे सहसंपादक

आरमोरी :-

चामोर्शी येथील रहिवासी प्रा.अभिषेक ईश्वर दुर्गे यांची 'पर्यावरण सेंद्रिय रसायनशास्त्र आणि तंत्रज्ञान' या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.  ही परिषद एप्रिल 2024 मध्ये अमेरिकेतील लास वेगास येथे सात दिवस चालणार आहे. 9 ते 12 जानेवारी 2024 दरम्यान मुंबई येथे झालेल्या 'आंतरराष्ट्रीय रसायन विज्ञान आणि शिक्षण परिषदे'मध्ये सहभागी होऊन संपूर्ण टीमचे लक्ष वेधून घेतले.  त्यांचे शोधनिबंध प्रदर्शित करणे.  या परिषदेनंतर त्यांच्या संशोधनाची आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद व्हावी यासाठी एप्रिल महिन्यात अमेरिकेत होणाऱ्या परिषदेसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.

 प्रा.अभिषेक दुर्गे हे मूळचे चामोर्शीचे असून त्यांचे प्राथमिक शिक्षण मुलचेरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले.  गडचिरोली जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय घोट येथे इयत्ता 5 वी मध्ये जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण आणि 6 वी ते 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.  पुढील शिक्षण नागपुरात बी.एस्सी.  आणि पुढे 2021 मध्ये रसायनशास्त्रात एम. एस्सी 2022 मध्ये NET आणि 2023 मध्ये SET उत्तीर्ण होऊन संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठात वयाच्या 25 व्या वर्षी पदव्युत्तर महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले.  सध्या प्रा.अभिषेक दुर्गे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्न असलेल्या शिवाजी विज्ञान महाविद्यालयात रसायनशास्त्राचे सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

 त्यांनी केलेल्या सर्व कार्याचे श्रेय त्यांचे पालक, मुख्याध्यापक आणि सर्व सहाय्यक कर्मचारी आणि मित्रांना देत, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 31, 2024

PostImage

गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थी सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सबज्युनिअर अँथलेटिक्स स्पर्धेत होणार सहभागी


रुमदेव सहारे सहसंपादक 

गडचिरोली :- लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी व लहान वयातच विद्यार्थी खेळांच्या  प्रवाहात येऊन  मजबुत व्हावे यासाठी दरवर्षी महाराष्ट्र अँम्युचर अँथलेटिक्स असोसिएशन तर्फे सबज्युनिअर अँथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन होत असते ज्यामध्ये ८,१० व  १२ वर्षाच्या विद्यार्थ्यांना अँथलेटिक्स क्रीडाप्रकारातील रनिंग,लांबउडी ,गोळाफेक ऊंचउडी या खेळात आवळ निर्माण व्हावी व त्यामध्ये सातत्यपूर्ण प्रशिक्षण घेऊन आजचे चिमुकले विद्यार्थी उद्या देशाचे भावी स्टार खेळाडू बनावे ही बाब ओळखुन  अँथलेटिक्स सारख्या खेळात तालुका, जिल्हा, राज्य व  देशाचे प्रतिनिधित्व करून आपली ओळख जागतिक स्तरावर निर्माण करावेत या उदात्त हेतूने महाराष्ट्र अँम्युचर अँथलेटिक्स असोसिएशन अंतर्गत दि.९ फेब्रुवारी २०२४ ते ११ फेब्रुवारी २०२४ ला सांगली येथे राज्यस्तरीय सबज्युनिअर अँथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे या स्पर्धेची निवड चाचणी दि.२८ जानेवारी २०२४ रविवार ला गडचिरोली येथील कॉम्प्लेक्स क्षेत्रातील सेमान बायपास रोड स्थित संजीवनी ग्राउंड येथे सकाळी ९:०० वाजता गडचिरोली जिल्हा अँम्युचर अँथलेटिक्स असोसिएशन तर्फे पार पडली या  राज्यस्तरीय सबज्युनिअर निवड चाचणीत ८ वर्षाआतील मुलांच्या गटात ५० व १०० मीटर रनिंग मध्ये प्रथम देवदीप जुआरे तर ५०मीटर रनिंग मध्ये  सत्यम करोडकर दुतीय व १०० मीटर रनिंग मध्ये  अथांग दुर्गम हा दुतीय , स्टँडिंग ब्रॉड जम्प मध्ये  निखिल चौके प्रथम तर सूर्यांश म्हशाखेत्री  दुतीय, बॉल थ्रो मध्ये इंद्रावर्धन असमवार प्रथम तर युवराज देशमुख दुतीय ८ वर्षाआतील मुलिंच्या गटात ५०मीटर रनिंग मध्ये दिशा कालबांध्ये प्रथम तर अनन्या नैताम दुतीय ,१०० मीटर रनिंग मध्ये अनवी चौके प्रथम तर संबोधी पिपरे दुतीय स्टँडिंग ब्रॉड जम्प मध्ये दिशा कालबांध्ये प्रथम चेतना जुआरे दुतीय तर १० वर्षाआतील मुलांच्या गटात ६० मीटर रनिंग मध्ये आदित्य ठेंगरी प्रथम देवांश देशमुख दुतीय ,१०० मीटर रनिंग मध्ये सारंग केळझलकर प्रथम तर प्रथमेश कुकडकर दुतीय  स्टँडिंग ब्रॉड जम्प मध्ये मैत्रेय टेंम्बुर्णे प्रथम तर सारंग केळझलकर दुतीय, गोळाफेक मध्ये तिवान पोहनकर प्रथम तर आदित्य ठेंगरी दुतीय १० वर्षाआतील मुलींच्या गटात ६० मीटर रनिंग मध्ये हार्दीकी माने प्रथम तर प्रहा गेडाम दुतीय १०० मीटर रनिंग मध्ये रितिका गरमळे प्रथम तर सारा करावते दुतीय ,स्टँडिंग ब्रॉड जम्प मध्ये सारा करावते प्रथम तर अधवी नागुलवर दुतीय गोळाफेक मध्ये प्रहा गेडाम प्रथम तर गिजिरी माने दुतीय तर १२ वर्षाआतील मुलांच्या गटात ६० मीटर रनिंग मध्ये जितेंद्र आत्राम प्रथम तर अनय मडावी दुतीय ,३०० मीटर रनिंग मध्ये अंशु गडपल्लीवार प्रथम तर जितेंद्र आत्राम दुतीय,लांबउडी मध्ये चिराग नासकोल प्रथम तर चिराग पारधी दुतीय ,उंचउडी मध्ये चेतस भांडेकर प्रथम तर मोहित गेडाम दुतीय  गोळाफेक मध्ये जितेंद्र आत्राम प्रथम तर  रोहित आत्राम दुतीय तर १२ वर्षाआतील मुलींच्या गटात ६० मीटर रनिंग मध्ये रुचिता राऊत प्रथम तर सनाया करोडकर 

दुतीय तर ३०० मीटर रनिंग मध्ये संघवी कापकर प्रथम तर युक्ती सोरते दुतीय लांबउडी मध्ये दिशीता माने प्रथम तर टीना नैताम दुतीय उंचउडी मध्ये टीना नैताम प्रथम तर सारा बोकडे दुतीय तर गोळाफेक मध्ये संघवी कापकर प्रथम तर दिशा सलामे दुतीय क्रमांक पटकावला या स्पर्धेसाठी गडचिरोली जिल्हा अँम्युचर अँथलेटिक्स असोसिएशन चे सचिव आशिष नंदनवार सर यांच्या मार्गदर्शनात क्रीडा समन्वयक म्हणून राहुल जुआरे सर ,मृणाली सराफ मॅडम यांनी सहकार्य केले याप्रसंगी शेकडो पालक उपस्थित होते.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 29, 2024

PostImage

खोब्रागडे कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाला  उस्फूर्त प्रतिसाद


रुमदेव सहारे सहसंपादक

वैरागड - दि. 25 जानेवारी 2024 रोज गुरुवारला श्री किसनराव खोब्रागडे कनिष्ठ महाविद्यालय वैरागड येथे " राष्ट्रीय मतदान दिन व गणराज्य दिनाच्या पूर्वसंधेचे औचित्य साधून " वार्षिक स्नेहसम्मेलन कार्यक्रम " घेण्यात आले.

  या कार्यक्रमाचे अध्यक्ष वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य धर्मेंद्र जनबंधू सर, तर प्रमुख अतिथी म्हणून  प्रा. डाँ. विलास मेश्राम, प्रा. धारगावे सर, प्राचार्य विवेक हलमारे, प्रा. एस. पी. बन्सोड, प्रा. प्रकाश म्हशाखेत्री, प्रा. महेश बोदेले, प्रा. बर्वे, आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वतीचे पूजन व दीप प्रज्ज्वलन करून करण्यात आले  तसेच स्वागत गीताने पाहुण्याचे स्वागत करण्यात आले. " राष्ट्रीय मतदान दिन " निमित्त विध्यार्थ्याकडून शपथ घेण्यात आली.  वार्षिक स्नेह संमेलन हे विध्यार्थ्यांचे सुप्त कलागुणांनातील  एक आदर्श व्यासपीठ होय असे उप प्राचार्य  धर्मेंद्र जनबंधू यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलतांना सांगितले. कार्यक्रमाचे संचालन  प्रा. मनिष राऊत, तर प्रास्ताविक प्रा. अमोल नैताम  तर प्रा. नरेश लाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.तसेच विध्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी  दयानंद कुमरे, व  शिवशंकर पाटील यांनी सहकार्य केले.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 27, 2024

PostImage

युवकांनी खेळामध्ये ही शिखर गाठावे : प्रा. अतुल देशकर.!नमो चषक 2024 क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्घाटन


ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील जवराबोडी मेंढा येथे भारतीय जनता युवा मोर्चा व इलेव्हन क्रिकेट क्लब जबरा बोडी मेंढ्याच्या वतीने नमो चषक 2024 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. देशाच्या 75 व्या गणराज्य दिनाचे औचित्य साधून नमो चषक या भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार, भाजप नेते प्रा. अतुल देशकर यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाप्रसंगी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ.वंदना शेंडे, भाजपा तालुका अध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रा. रामलाल दोनाडकर, माजी जि.प सदस्य काशिनाथ पाटील थेरकर, बाजार समितीचे संचालक प्रा. यशवंत आंबोरकर, जवराबोडी मेंढाचे सरपंच देवराव उईके प्रामुख्याने उपस्थित होते.

युवकांनी शिक्षणासोबतच खेळामध्ये ही शिखर गाठवे अस आवाहन माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी युवकांना या प्रसंगी केले. सोबतच युवकांनी व्यसनापासून दूर राहून व्यक्तिमत्त्व विकसित करावे असे सांगितले व भविष्यात अशाच प्रकारच्या भव्य स्पर्धांचे आयोजन करू असे सांगत युवकांचा उत्साह वाढविला. भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा वंदनाताई शेंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांसाठी केलेल्या अनेक जनहितकारी धोरणांची व योजनांची माहिती देत युवकांना या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या प्रसंगी बाजार समितीचे संचालक यशवंत आंबोरकर व जोराबोडी मेंढाचे सरपंच श्री. देवराव उईके यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाला प्रामुख्याने भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सचिव तथा नमो विधानसभा संयोजक तनय देशकर, सरपंच श्री उईके, भाजपा मेंडकी अध्यक्ष राजू आंबोरकर, युवा मोर्चा तालुका महामंत्री अविनाश मस्के, साकेत भानरकर, मेंडकी ग्राम. पं सदस्य राजेंद्र आंबोरकर, भाजपा सोशल मीडिया तालुका संयोजक धीरज पाल,  शामराव राणे, दुर्वास निकुरे, विलास उईके, विनायक थेरकर, मुखरूजी घरत, चरण पा थेरकर,विलास उईके, विनायक थेरकर, पुंडलिक थेरकर, प्रकाश गोबाडे, मधुकर थेरकर, सुधाकर मडावी, तामदेव थेरकर, घनश्याम थेरकर उपस्थित होते. इलेव्हन क्रिकेट क्लबचे रोशन बोरकर, शेखर बोरकर, स्वप्नील बोरकर, मारोती थेरकर, छत्रपाल श्रीरामे, सूरज बावणे, साईनाथ थेरकर, आदिनाथ थेरकर, रोशन राणे, रोहित थेरकर, अविनाश शेंडे, विशाल थेरकर व येथील युवक या ठिकाणी उपस्थित होते.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 24, 2024

PostImage

बहुप्रतिक्षित वडसा - गडचिरोली रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरू:- खासदार अशोक नेते यांनी केली पाहणी..


रुमदेव सहारे सहसंपादक

गडचिरोली - वडसा ते गडचिरोली या 52 किलोमीटरच्या नवीन रेल्वे मार्गाच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. खासदार अशोक नेते यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या या कामाला बुधवारी खा.नेते यांनी भेट देऊन पाहणी केली.  यावेळी रेल्वेच्या अभियंत्यांनी त्यांना झालेल्या कामाची माहिती दिली.

वडसा ते आरमोरी यादरम्यान वन्यजीवांची वर्दळ राहत असल्यामुळे या मार्गावर रेल्वेसाठी पुलाची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाची किंमत १०९६ कोटी वरून १८८८ कोटी रुपये झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रत्येकी ५० टक्के वाट्यातून उभारल्या जात असलेल्या या रेल्वेमार्गाच्या पहिल्या टप्प्यात ३२२ कोटी रुपयांच्या खर्चातून उभारल्या जाणाऱ्या २० किमीच्या रेल्वेमार्गाच्या कामाला सुरुवात झाली. वडसा रेल्वे स्थानकापासून गडचिरोलीच्या दिशेने या कामाची  सुरुवात करण्यात आली. 

खासदार अशोक नेते यांनी रेल्वेच्या कामाची पाहणी केल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करतांना

गडचिरोली जिल्हा हा आदिवासी आकांक्षीत अविकसित जिल्हा म्हणून ओळख आहे.या जिल्ह्यात एकमेव वडसा( देसाईगंज) रेल्वे स्टेशन आहे.परंतु वडसा गडचिरोली पर्यंत बावन ५२  किलोमीटर पर्यंत रेल्वे मार्ग  आणण्यासाठी, या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, व केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, विदर्भाच्या विकासासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात अग्रेसर असलेले विकास पुरूष  केंद्रीयमंत्री नितिन जी गडकरी यांचे शतशा आभार...
यासोबतच या कामात राज्य सरकारचा  50% यात  वाटा असल्याने विकास कामात मौलाची भूमिका बजावणारे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे व महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री मान.देवेद्रजी फडणवीस व तत्कालीन वितमंत्री लोकनेते, विकास पुरूष यांची ही विकासासंबंधित मौलाची भूमिका आहे यासाठी सर्वांचे अभिनंदन व आभार मानीत रेल्वेच्या कामाची पाहणी केल्यानंतर खासदार अशोक नेते यांनी आनंद व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या..


खा. अशोक नेते यांनी या कामाची गती पाहून समाधान व्यक्त केले. या कामासाठी आवश्यक असलेला निधी केंद्र आणि राज्य सरकारकडून वेळोवेळी मिळवून देण्यासाठी मी कटीबद्ध आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन गडचिरोली आणि पुढे छत्तीसगड, तेलंगणापर्यंत या रेल्वे मार्गाचा विस्तार केला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 24, 2024

PostImage

स्पर्श म्हणजे विद्यार्थ्याचे सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास घडविण्याचे व्यासपीठ :-संस्थाध्यक्ष भाग्यवानजी  खोब्रागडे यांचे प्रतिपादन  


सनराव खोब्रागडे  फाउंडेशनचा स्पर्श कला व सांस्कृतिक महोत्सव उद्घघाटन   सोहळा संपन्न


 रुमदेव सहारे सहसंपादक

आरमोरी:-
             विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुणांना वाव देणारा आणि विद्यार्थ्यांचे  व्यक्तिमत्व विकास घडविण्याचे व्यासपीठ म्हणजेच स्पर्श हा कार्यक्रम होय  या माध्यमातून विद्यार्थी हे नृत्या आविष्कार सादर करीत असतात आपली कला सादरीकरण करून त्यांच्या अंगी असलेले सुप्त गुण हे प्रेक्षकांसमोर आणण्याचे खरे कार्य आहे स्पर्श कलाविष्काराच्या माध्यमातून होत असते असे प्रतिपादन श्री किसनराव खोब्रागडे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भाग्यवानजी खोब्रागडे यांनी केले                                            दिनांक 24 जानेवारी 2024 रोज बुधवारला आयोजित श्री किसनराव खोब्रागडे फाउंडेशन अंतर्गत स्पर्श हा कलाविष्कारांचा उद्घाटन सोहळा स्थानिक श्री किसनराव खोब्रागडे महाविद्यालय येथील सांस्कृतिक भवनामध्ये पार पडला या सोहळ्याचे  प्रमुख अतिथी म्हणून श्री किसनराव खोब्रागडे एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ-सचिन खोब्रागडे होते तर विशेषअतिथी म्हणून  श्री किसनराव खोब्रागडे एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सुशील खोब्रागडे, सौ    भाग्यलक्ष्मी खोब्रागडे कोषाध्यक्ष श्री किसनराव खोबराकडे एज्युकेशन सोसायटी, श्रीहरी माने तहसीलदार आरमोरी, ज्योती राक्षे पोलीस उपनिरीक्षक  पोलीस स्टेशन आरमोरी ,किसनराव खोब्रागडे शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ  डी आर भगत , श्री पी एम ठाकरे उपप्राचार्य यशवंतराव चव्हाण महाविद्यालय लाखांदूर , यशवंत इंग्लिश मिडीयम स्कूल चे प्राचार्य अमरदीप मेश्राम ,   यशवंत उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अशोक बनसोड ,किसनराव खोब्रागडे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विवेक हलमारे ,ठाणेगाव येथील यशवंत कला उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत झीमटे,आदी मंडळी यावेळी उपस्थित होते
 या उद्घघाटन सोहळ्याला मार्गदर्शन करताना श्री भाग्यवानजी खोब्रागडे खोब्रागडे म्हणाले सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे या माध्यमातून आदर्श विद्यार्थी घडविणे  हे कार्य करण्यासाठी शाळा नेहमी प्रयत्नशील आहे शिक्षणाबरोबर पालकाची सुद्धा काही जबाबदारी आहे त्यांनी शिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थ्यांप्रती एक जबाबदार व्यक्ती म्हणून लक्ष देण्याची गरज आहे या विद्यालयाचा विद्यार्थी वरिष्ठ स्तरावर यश प्राप्ती होण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहू असे यावेळी सांगितले 
सदर कार्यक्रमाचे संचालन कुमारी तेजस्विनी सहारे प्रस्ताविक यशवंत इंग्लिश मिडीयम स्कूल चे प्राचार्य अमरदीप मेश्राम यांनी केले  तर आभार जॉन सर यांनी मानले                                    स्पर्श या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यशवंत इंग्लिश मीडियम स्कूल चे सर्व शिक्षक वृंद तसेच किसनराव खोब्रागडे एज्युकेशन सोसायटी अंतर्गत किसनराव खोब्रागडे महाविद्यालय आरमोरीचे सर्व प्राध्यापक ,संताजी महाविद्यालय आरमोरी येथील सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 24, 2024

PostImage

तालुकास्तरीय नवरत्न स्पर्धा पं.समिती भद्रावती उत्साहात संपन्न


भद्रावती पंचायत समिती अंतर्गत तालुकास्तरीय नाविन्यपूर्ण नवरत्न स्पर्धा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गवराळा येथे आज दिनांक 23 जानेवारी 2024 ला मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेचे उद्घाटन मान. आशुतोष सपकाळ गटविकास अधिकारी पंचायत समिती भद्रावती यांचे हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सन्मा. श्री दिपक  पोटे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गवराळा, विशेष अतिथी सन्मा. अनिलभाऊ धानोरकर माजी नगराध्यक्ष भद्रावती , प्रमुख अतिथी सन्मा. डॉ. प्रकाश महाकाळकर गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती भद्रावती, कु. कल्पना शिदमशेट्टीवार मॅडम शिक्षण विस्तारअधिकारी , श्री मोरेश्वर विद्ये गटसमन्वयक गटसाधन केंद्र भद्रावती,  सौ माया जुनघरे प्र.विस्तार अधिकारी, श्री. भारत गायकवाड केंद्रप्रमुख ढोरवासा  तसेच श्री पुंडलिक घुगूल मुख्याध्यापक जि प उच्च प्राथमिक शाळा गवराळा हे उपस्थित होते.
           उद्घाटनिय भाषणात सन्माननीय आशुतोष सपकाळ साहेब यांनी भद्रावती शिक्षण विभागाचे कार्य अतिशय उत्तम असून पूर्णतः सहकार्य करण्याचे आश्वासन दिले व विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची रूपरेषा, आयोजन व महत्त्व  प्रास्ताविक पर भाषणातून मान. डॉक्टर प्रकाश महाकाळकर गटशिक्षणाधिकारी विषद केले. मान. अनिल भाऊ धानोरकर यांनी विद्यार्थीनी मोठे होउनआपले नाव कमवावे असे आवाहन केले.
             सदर स्पर्धा या चार वाजेपर्यंत घेण्यात आल्या. लगेच सांय. 4.30 वाजता बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला. बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी सन्मा. रणजीतजी यादव I A S , अप्पर जिल्हाधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्याला प्रेरणादायी मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी मोठे ध्येय ठेवून उत्तुंग भरारी घ्यावी याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मा. दोहतरे मुख्याध्यापक कर्मवीर विद्यालय भद्रावती उपस्थित होते.
            सदर स्पर्धेचे आयोजन मान.डॉ. प्रकाश महाकाळकर गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली, सर्व साधन व्यक्ती बीआरसी चे सर्व कर्मचारी ,सर्व शिक्षक जिल्हा परिषद शाळा गवराळा यांच्या सहकार्याने स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडल्या . उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. छाया खनके विषय तज्ञ भद्रावती यांनी केले तर बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ उर्मिला बोंडे  गवराळा यांनी केले.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 23, 2024

PostImage

गोंधनखेडा येथिल श्री राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी गोसेवा आश्रमात स्वच्छता अभियान...


सुभाष शेळके जालना 

जाफराबाद:- जाफराबाद तालुक्यातील गोंधनखेडा येथील श्री राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी गोसेवा आश्रम व परिसरात "स्वच्छ तीर्थक्षेत्र अभियान" अंतर्गत केंद्रीय मंत्री माननीय नामदार श्री रावसाहेब पाटील दानवे दादा व भोकरदन-जाफराबाद मतदार संघाचे आमदार संतोष भाऊ दानवे यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे.

त्यादरम्यान अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला होणार असून या शुभ मुहूर्तावर राज्यात उत्साहाचे वातावरण आहे. या अनुषंगाने पंतप्रधान  मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांनी देशभरात 14 ते 21 जानेवारीपर्यंत मंदिरे आणि धार्मिक स्थळावर स्वच्छता अभियान सुरू केले आहे. या अभियाना अंतर्गत धार्मिक आणि पवित्र स्थळे स्वच्छ आणि कचरामुक्त करण्यात येणार आहे


    यावेळी भाजपचा महीला तालुकाध्यक्ष सौ.तारामती नंदकिशोर अवकाळे, सामजिक कार्यकर्त्या सौ.पुष्पाताई शालिकराव म्हस्के, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौ . अनिता दुर्गेश नवले इत्यादी सह प्रमुख पदाधिकारी व महीला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 23, 2024

PostImage

ब्रम्हपुरी माध्यमिक मुख्याध्यापक संघाचा मराठा व खुल्या सर्वेक्षणावर बहिष्कार


ब्रम्हपुरी तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ ब्रम्हपुरी च्या वतीने मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षण करण्याकरिता पर्यवेक्षक व प्रगणक म्हणून तालुक्यातील मुख्याध्यापक ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती मोट्या प्रमाणावर करण्यात आली त्यामुळे शाळा चालवायची काशी हा गहण प्रश्न निर्माण झालेला आहे.

सध्या दहावी व बारावी परीक्षेचे दिवस जवळ आले असतांना सर्व शिक्षकांना अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा घेणे मूल्यमापन करणे हा शिक्षकांच्या जिव्हाड्याचा प्रश्न आहे शिक्षकांना हे शैक्षनिक कार्य करणे गरजेचे असतांना सर्वेक्षण करण्याकरिता केलेली नियुक्ती योग्य नाही.


सदर सर्वेक्षणाचे अशैक्षणिक काम असल्याने ब्रम्हपुरी तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ या सर्वेक्षणावर बहिष्कार टाकत आहे.याबाबतचे निवेदन आज दिनांक 22/01/2024 रोज सोमवार ला नायब तहसीलदार ब्रम्हपुरी माननीय प्रशांत गोविंदवार यांना देण्यात आले. सदर निवेदन सादर करतांना ब्रम्हपुरी तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. विष्णुजी तोंडरे सर सचिव श्री. संजयजी हटवार सर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष श्री जगदिशजी ठाकरे सर तथा तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांनी यात सहभागी दर्शविला...


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 23, 2024

PostImage

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची पत्रकारांची पोलिसांनी पत्रकारांना अडवूणूक करू नये.:- उपमुख्यमंत्र्याचे पोलीस विभागाला निर्देश.


संजय कडोळे  विषेश प्रती वाशिम 

मुखमंत्री एकनाथ शिंदे असो, उपमुख्यमंत्री फडणवीस असो की आम्ही उपमुख्यमंत्री अजीत पवार असो.आम्हाला झेड प्लस सुरक्षा जरी असली तरी आमचे पर्यंत येणाऱ्या पत्रकारांना पोलिसांनी अडवायचे नाही.ते त्यांचं काम करत असतात,त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे. त्यामुळे त्यांची अडवणूक पोलिस करू शकत नाहीत.त्यांना यापुढे आमच्याकडे लोकनेत्यांकडे येण्यास यापुढे अडवीता कामा नये.पत्रकारांशी आम्ही बोलायचं की नाही,ते आम्ही नेते ठरवू.या पुढं पत्रकारांची तक्रार येता कामा नये. असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी दिल्यामुळे पत्रकारांनी समाधान व्यक्त करीत यापुढे महाराष्ट्राच्या पोलीस विभागातील तमाम पोलीस हे लक्षात घेऊन पत्रकारांना मानसन्मान देतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे .


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 18, 2024

PostImage

विद्यार्थी प्रिय शिक्षिका सौ.अंजलीताई कानिंदे  सत्यशोधक शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित


क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले' यांच्या १९३ व्या जयंतीचे औचित्य साधून  पहिला सत्यशोधक शिक्षक रत्न पुरस्काराने श्री.शिवाजी हायस्कूल कंधार च्या विद्यार्थीप्रिय   शिक्षिका सौ.अंजली कानिंदे( मुनेश्वर ) मॅडम यांना सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार सोहळा १० जानेवारी 2024 रोजी प्रा.नरहर कुरुंदकर सभागृह पीपल्स कॉलेज नांदेड येथे संपन्न झाला.  सत्यशोधक  समाज शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षांत 

राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले जयंती निमित्त  
सत्यशोधक  शिक्षकरत्न सन्मान  सोहळा 2024चेआयोजन‌करण्यात आले होते. कानिंदे मॅडमचे शैक्षणिक व सामाजिक कार्य पाहून केलेल्या निवडीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. याप्रसंगी आदरणीय  मा.डाॅ. व्यंकटेश काब्दे (माजी खासदार )
मा.एस.जी.माचनवार (राष्ट्रीय अध्यक्ष BPSS)
मा.प्रा. लक्ष्मणराव हाके (राज्य मागासवर्ग आयोग सदस्य)
मा. बालाजी ईबितवार. इ. उपस्थित होते.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 18, 2024

PostImage

शेतकरी आत्महत्येची 13 प्रकरणे मदतीकरीता निकाली .!अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी घेतला आढावा


चंद्रपूर, : जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणी समितीच्या बैठकीमध्ये शेतकरी  आत्महत्येची एकूण 20 प्रकरणे समितीपुढे ठेवण्यात आली. अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली  घेण्यात आलेल्या या बैठकीत 13 प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली असून 7 प्रकरणे समितीने अपात्र ठरविली आहे.

अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनात पार पडलेल्या आढावा बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, नायब तहसिलदार गिता उत्तरवार, पोलिस उपनिरीक्षक दौलत इष्टाम, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद किन्नाके, विस्तार अधिकारी (कृषि) उमेश शिंदे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रतिनिधी शंकर लोडे, महसूल सहाय्यक प्रमोद गेडाम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

शेतीमध्ये सततची नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्ज परतफेडीचा तगादा या तीन प्रमुख कारणांपैकी शेतकरी आत्महत्या झाली असल्यास संबंधित कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात येते.

00000


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 18, 2024

PostImage

मुलीवर प्रेम करणे पडले महागात! मुलीच्या नातेवाईकाकडून मुलाच्या वडिलाचा खून.!


 

सांगली:-

प्रेम संबंधातून मुलाच्या वडिलांना मुलीच्या नातेवाईकांनी विद्युत खांबाला बांधून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, यात मुलाच्या वडिलांचा मूत्यू झाल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यामधील मांगले येथे घडली आहे. मुलीवर प्रेम करणे मुलाला महागात पडले आहे.या घटनेने शिराळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिराळा पोलिसांनी बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली.

दादासाहेब चौगुले यांच्या मुलाचे गावातीलच एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून चौगुले यांच्या मुलाने आणि संबंधित मुलीने पळून जाऊन लग्न केलं होतं. याचा राग मुलीच्या नातेवाईकांना होता. दरम्यान दादासाहेब चौगुले हे बुधवारी सकाळी त्यांच्या शेताकडे गेले असता मुलीचे नातेवाईक देखील त्या ठिकाणी पोहोचले. आमच्या मुलीला तुमचा मुलगा घेऊन गेला आहे ते कोठे आहेत सांगा असे म्हणून दादासाहेब चौगुले यांना विद्युत खांबाला बांधून बेदम मारहाण केली. यात दादासाहेब चौगुले बेशुद्ध पडले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिराळा पोलिसांनी बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 18, 2024

PostImage

विद्यार्थ्यांनी द्येय समोर ठेऊन शैक्षणिक वाटचाल करावी:-प्रा.प्रशांत राऊत


विकास विद्यालय अर्हेरनवरगाव येथे व्यवसाय मार्गदर्शन दिन साजरा

ब्रम्हपुरी:-
       16 ते 20 वर्षे वय हे जीवन घडविणारे आहे.या वयात आत्मसात केलेले ज्ञान आपले भविष्य घडविणारे आहे. विद्यार्थी जीवनातील इयत्ता 9 वी ते 12 वी हे चार वर्षे अतिशय महत्वाचे आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांनी द्येय समोर ठेऊन शैक्षणिक वाटचाल करावी.असे प्रतिपादन प्रा.प्रशांत राऊत यांनी केले ते अर्हेरनवरगाव येथील विकास विद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन दिना निमित्य आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
        यावेळी विचारपीठावर अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.बी.धोटे,मार्गदर्शक म्हणून प्रा.मंगेश जराते,सहाय्यक शिक्षिका वैशाली धोटे,सहाय्यक शिक्षक केशव घरत,खरकाटे सर ,घनश्याम मेश्राम,श्रीहरी ठेंगरे,रामेश्वर वकेकार,शिक्षिका कूथे मॅडम उपस्थित होते.
            प्रा. राऊत पुढे म्हणाले की,विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनात वाईट व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे,मोबाईलचा अपव्यय वापर टाळावे.12 वी झाल्यानंतर उच्चशिक्षणासाठी अनेक क्षेत्र समोर येतात मात्र आपण ज्या क्षेत्रात पारंगत आहोत तो क्षेत्र निवडला तर ध्येय गाठण्यासाठी सोपे जाते.या शिवाय शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणाविषयी मार्गदर्शन केले. 
          तर प्रा. मंगेश जराते यांनी चालू घडामोडींवर प्रकाश टाकत विद्यार्थी जीवनात येणारे संकट व त्यावरील उपाय,यावर प्रकाश टाकत विद्यार्थी जीवनातील विविध उदाहरणे देऊन ग्रामीण जीवनशैलीतून विद्यार्थी कसे घडतील यावर मार्गदर्शन केले. तर अध्यक्षीय भाषणात  शाळेचे मुख्याध्यापक एम.बी.धोटे यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक केशव घरत यांनी केले तर आभार सहाय्यक शिक्षिका वैशाली धोटे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 17, 2024

PostImage

भद्रावती च्या शिक्षकाचा मुलगा निघाला फ्रांस ला.


भद्रावती- स्थानिक किल्ला वॉर्ड,  बगळेवाडी येथील रहिवासी व जिल्हा परिषद शाळा ढोरवासा येथील मुख्याध्यापक व प्रभारी केंद्रप्रमुख श्री भारतजी गायकवाड यांचा मुलगा प्रणय हा नुकताच फ्रांस येथील बोरडेक्स युनिव्हर्सिटी येथे जुनीअर सायंटिस्ट या पदावर रुजू होण्यासाठी भद्रावती वरून रवाना झाला आहे.
प्रणय ची बहिन कोमल गायकवाड पण केरळ येथील तिरुअनंतपुरम येथे जुनीअर सायंटिस्ट या पदावर कार्यरत आहे.
एका सर्वसाधारण घरातील मुलाने मिळविलेले हे यश नक्किच प्रशंसनीय असून प्रणय ला वार्षिक 24 लाखाचे पॅकेज मिळणार असून त्याची आई सौ रेखा भारत गायकवाड पण जिल्हा परिषद शाळा विठ्ठलवाडा येथे शिक्षिका आहे.
प्रणय चे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 13, 2024

PostImage

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली अपघातस्थळाची पाहणी.!ब्रम्हपूरी शहरातील ट्रक अपघातातील विद्यार्थीनी मृत्यू प्रकरण


ब्रम्हपुरी:-ट्रकने दिलेल्या धडकेत महाविद्यालयात जाणारी विद्यार्थीनी कू.समीक्षा संतोष चहांदे (वय 17 वर्ष) ही ट्रकच्या मागच्या चाकाखाली दबुन तिचा जागेतच मृत्यू झाल्याची घटना ब्रम्हपूरी शहरातील नेवजाबाई हितकारीणी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर दि. 12 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी  आज दि. 13 जानेवारी रोजी सदर घटनास्थळी भेट देवून घटनास्थळाची पाहणी केली.

यावेळी त्यांनी नेवजाबाई हितकारीणी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील मार्गावर असलेले वीज वितरण कंपनीचे विद्युत पोल त्वरित हटविण्याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच सदर मार्गावर अपघाताची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता आवश्यक ठिकाणी गतिरोधक तयार करण्याच्या सुचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. सोबतच महाविद्यालयीन सुट्टीच्या वेळेस वाहतूक पोलीस तैनात करण्याचे निर्देश पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
त्यानंतर शहरातील शिवाजी महाराज चौकात जावून रहदारीस होणारा अडथळा व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अजय चहांदे, न.प. मुख्याधिकारी अर्शिया जुही, पोलिस निरीक्षक अनिल जिट्टावार, महावितरणचे अभियंता सिध्दांत रामटेके, अभियंता दिनेश हनवते, न.प. विद्युत अभियंता मंगेश बोंद्रे, अभियंता हटवार, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समिती सभापती प्रभाकर सेलोकर, नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार, नगरसेवक हितेंद्र राऊत, माजी न.प. उपाध्यक्ष बंटी श्रीवास्तव, माजी सभापती नेताजी मेश्राम, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरज मेश्राम, माजी सरपंच राजेश पारधी, अनुसूचित जाती सेलचे विधानसभा उपाध्यक्ष मुन्ना रामटेके यांची यावेळी उपस्थिती होती.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 13, 2024

PostImage

पैशासाठी विवाहीतेचा मानसिक छळ.! 


परभणी : विवाहितेला लग्नानंतर मुलगी झाली. पण सासरकडच्यांना मुलगा पाहिजे होता. त्यामुळे ''तुला मुलगीच का झाली?",म्हणत विवाहितेची शारीरिक मानसिक प्रताडणा करण्यात आली. विवाहितेला लहान मुलीसह माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये म्हणत घराबाहेर काढण्यात आले. विवाहितेचा छळ येथेच थांबला नाही. तर विवाहितेच्या सासूने माहेरी येऊन सांगितले ''दोन लाख रुपये जमा झाले नाहीत का? म्हणत जर दोन लाख रुपये घेऊन सासरी आली नाहीस तर तुला खतम करून टाकू", अशी देखील धमकी दिली. त्रास आपण किती सहन करायच म्हणून त्रासाला कंटाळलेल्या विवाहितेने आपल्या आईसोबत पोलीस ठाणे गाठले आणि सर्व घडलेली आपबिती पोलिस विभागातील अधिकारि कर्मचारी यांना सांगू लागले.लगेच पोलिस विभागातील अधिकारि यांनी चौकशी केली आणि सासरच्या सहा जणांविरुद्ध परभणी येथील मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिल्पा शेजराव (वय २९, रा. माऊली नगर परभणी) हिचा विवाह दिनेश सईजराव यांच्याशी रीतीरीवाजाप्रमाणे २०१८ सली संपन्न झाला. त्यानंतर मे २०१९ दोघांना दीप्ती नावाची मुलगी झाली. पण पती दिनेश सह सासरच्या सर्वांनाच मुलगा हवा होता. बाळंतपणानंतर शिल्पा जेव्हा आपल्या मुलीला घेऊन सासरी आली तेव्हा सासरच्यांनी ''तू कशाला आलीस. मुलीला जन्म देऊन आमच्या घरी का आलीस'', म्हणून शिव्या द्यायला सुरुवात केली. तर पती दिनेशने मारहाण देखील केली. शारीरिक व मानसिक त्रास सहन करत शिल्पा मात्र सासरीच राहिली.

 


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 12, 2024

PostImage

पद्मश्री राहीबाई पोपेरे यांची नोंदणी कक्षाला सदिच्छा भेट


चंद्रपूर :-

दि. ३ ते ७ जानेवारी २०२४ दरम्यान स्थानिक चांदा क्लब मैदानात 'चांदा अॅग्रो २०२४' शिर्षकांतर्गत कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

बुधवार ३ जानेवारी २०२४ ला दुपारी १ वाजता राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे हस्ते व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सदर कृषी महोत्सवाचे उद्घाटन सत्र पार पडले.दुस-या दिवशीपासून तर शेवटच्या दिवशीपर्यंत सकाळ - संध्याकाळ चर्चासत्र व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कृषी महोत्सव दरम्यान चौथ्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या बिजमाता 'पद्मश्री' राहीबाई पोपेरे व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार,मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी भाजयुमो महानगर जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार यांच्या आमंत्रणावरून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे माध्यमातून सुरू असलेल्या कॅलेंडर वाटप व नोंदणी कक्षाला सदिच्छा भेट दिली.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष अनिल डोंगरे 
,भाजयुमो महानगर जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार,रितेश वर्मा,नकुल आचार्य, प्रसाद काटपाताळ,मेघा ताटीकुडलवार,श्वेता चौधरी,अनिल देबटवार,वाघुजी गेडाम,मोनिका घुमे,बागेश्वर रामटेके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 12, 2024

PostImage

आत्ताची मोठीं ब्रेकींग न्युज.!ट्रकच्या धडकेत विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू.!ब्रम्हपुरी शहरातील घटना


ब्रम्हपुरी शहरात काही वेळापूर्वी ट्रॅकच्या धडकेत एका विद्यार्थ्यांनीची जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आज  दिनांक:१२/१/२०२४ ला घडली आहे.

समीक्षा संतोष चहांदे वय वर्ष १७ असे असून मृतक युवतीचे नाव असून मृतक युवती मालडोंगरी येथील रहिवाशी आहे.

समीक्षा ही आंबेडकर कॉलेज इयत्ता ११ वी मध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थिनी असून कॉलेज मध्ये जात असतांना धान्य वाहतूक करणाऱ्या ट्रकने समीक्षाच्या सायकलला मागून धडक दिला ज्यात ट्रकचे चाक शरीरावरून गेल्याने समिक्षाचा जागीच मृत्यू झाला.सदर घटना ही नेवजाबाई हितकारीनी कॉलेजच्या समोर काही अंतरावर घडली आहे.

समीक्षाच्या पच्छात्य आई बाबा बहीण भाऊ असा लहानगा परीवार आहे.कुटुंबातील मोठी मुलगी गेल्यामुळे चहांदे कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावपरिसर शोकसागरात बुडालेला आहे.

घटनेचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलिस विभागाचे अधिकारी कर्मचारी करीत आहेत.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 12, 2024

PostImage

लघवी फेकण्याच्या वादावरून उपसरपंचास मारहाण.! ब्रम्हपुरी तालुक्यातील घटना मुडझा


 ब्रम्हपुरी:-- कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रिया करण्याकरीता गेलेल्या ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा गाव येथील युवक व मुडझा येथील उपसरपंचात लघवीवरून झालेल्या वादात उपसरपंचास मारहाण झालेली असुन सदर घटना मंगळवारला रात्राे ७.३०वाजता घडली असुन पाेलीसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. 

  प्राप्त माहितीनुसार,मुडझा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर मंगळवारला आयाेजीत केलेला हाेता.या शिबीरात मुडझा येथील उपसरपंच लाेमेश्वर राऊत व हळदा येथील माेरेश्वर चिमुरकर  हे दाेघेही कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी आरोग्य केंद्रात मंगळवारला रात्राे ७.३० वा. आले.तत्पूर्वी आराेग्य केंद्रातील कर्मचारी अरूण खरकाटे यांनी दाेघांनाही लघवी तपासणी करण्यासाठी लघवी आणण्यास सांगीतले.लघवी तपासुन झाल्यानंतर लघवी बाहेर फेकण्यावरून दाेघांमध्येही वादावादीला सुरवात झाली यानंतर या वादाचे रूपांतर हाणामारीत हाेऊन माेरेश्वर चिमुरकर याने लाेमेश्वर राऊत उपसरपंच यांना मारहाण केली.सदर घटनेची माहीती ब्रम्हपुरी पाेलिस स्टेशनला देण्यात आली असुन आराेपी माेरेश्वर चिमुरकर,अरूण सहारे,गाेविंदसिंग टांक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 11, 2024

PostImage

ब्रेकींग न्यूज.! दुचाकीची झाडाला जब्बर धडक.! एकाचा जागीच मृत्यू एक गंभीर जखमी.!


चंद्रपुर मुल महामार्गांवरील नागाळा गावा नजिकच्या  वळणावर घडली घटना.!

मुल उबाठा शिवसेना तालुका अध्यक्ष प्रशांत गट्टूवार यांची घटनास्थळी धाव

मूल:-

चार दिवसापूर्वी तहसील कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने राजूभें डारे (३८) राहणार चिचाळा, यांची रेती भरलेली ट्रॅक्टरप कडली, रेती तस्करी करीत असल्याने त्याची ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आली, शासन निर्णयाप्रमाणे ट्रॅक्टर सोडविण्याकरिता एक लाख 25 हजाराचा दंड आकारण्यात आला, एवढी मोठी रक्कम देणे राजूला शक्य झाले नाही. ट्रॅक्टरसो डविण्याकरिता एक लाख 25 हजार रुपये दंडाची रक्कमजु ळवाजुळव करण्याकरिता, तो मित्रांकडे नातेवाईकांकडे फेऱ्या मारीत होता.

    अशाच एका नातेवाईकाकडे पैसे आणण्याकरिता जात असताना, चंद्रपूर रोडवर नागाळा नजीक राजू चा अपघात झाला.आणि त्यात तो दुर्दैवाने मृत पावला. राजू भेंडारे सोबत आणखी एक त्याचा साथीदार होता, तो गंभीर जखमी झाला या अपघाताची माहिती उ.बा .ठा  शिवसेना संघटनेच्या मुल तालुका अध्यक्ष प्रशांत गट्टूवार यांना माहिति मिळताच घटनास्थळी दाखल होउन जखमी ला  रुग्णालयात दाखल करण्यात आले.असून त्याला उपचाराकरिता चंद्रपूर येथे नेण्यात आले आहे. मृटक राजु ने आज सकाळीच  अनेक मित्रांकडे दंड भरण्याकरिता काही रक्कमेची मदत करावी म्हणून विनंती करीत होता, असे त्याच्या मित्रांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. राजू भेंडारे, यांना दोन अपत्य असून, घरची शेती विकून त्यांनी ट्रॅक्टर घेतली होती हे विशेष.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 11, 2024

PostImage

Inter-college hockey tournament organised at Nevjabai Hitkarini College


Byuro chief Brahmapuri 11January:-

 Under Gondwana University, Gadchiroli Inter College Men's and Women's Hockey Tournament and Selection Test was organised on 28 to 29 December 2023. There were 13 teams in the men's group and 8 teams in the women's group. In this competition, the team of Nevjabai Hitkarini College, Bramhapuri secured second position in men's and women's category respectively. events
The programme was inaugurated by Ashokji
Bhaiya. Nevjabai Secretary. Hitkarini Shikshan Sanstha, while Dr Ravindra Shobhane. noted litterateur. Adv Bhaskarrao Urade, Joint Secretary, Hitkarini Nevjabai Shikshan Sanstha, Bramhapuri, Dr DH Gahane, Principal, Nevjabai Hitkarini College, Bramhapuri, Dr NS Kokode Ex. Principal, Nevjabai Hitkarini College, Bramhapuri, Dr MS Varbhe, Principal, Shantabai Bhaiya Women's College, Dr SM Shekokar, Vice Principal, Nevjabai Hitkarini College, Bramhapuri, DrMA Shaikh, Sports Committee Chairman, Major Narad Director, Nevjabai Hitkarini
Junior College, Bramhapuri, Dr Dhanraj Khanorkar Dr. YN Meshram and other dignitaries were present on the occasion.

The competition was organised by Dr SM Shekokar under the guidance of Principal Dr DH Gahane. Dr. Kuljit Kaur Gill. Sanju Meshram, Praful Shende, Bhushan Khanorkar, Vikas Patil, Saurabh Talamale helped in this project.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 11, 2024

PostImage

तरुणाची गळफास घेवुन आत्महत्या.! गळफास घेणारा तरुण ब्रम्हपुरी तालुक्यातील


आरमोरी:-

आरमोरी ब्रहापुरी मार्गावर एका तरुणाने बाभळीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबजनक घटना दिनांक :- १० जानेवारी २०२४ घडली. आत्महत्येमागील कारण अस्पष्ट आहे.संदीप श्यामराव ठाकरे (३०, रा. आवळगाव, ता. ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर) असे गळफास घेणाऱ्या तरुणाचे नाव आहे. सचिन हा  तीन दिवसांपूर्वी कामानिमित्त स्वगाव आवळगाव येथून गडचिरोलीला गेला होता. त्यानंतर तो ट्रॅव्हल्सने आरमोरीत पोहोचला. ब्रह्मपुरी रोडवर असलेल्या एका राईस मिलजवळ बाभळीच्या झाडास साडीने गळफास लावून त्याने आत्महत्या केली. पोलिसांनी धाव घेत मृतदेह फासावरून उतरवून ओळख पटविली. आरमोरी ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद आहे.सचिनच्या पच्छात्य आई बाबा पत्नी मुलगी असा लहानगा परीवार आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 11, 2024

PostImage

भरधाव दुचाकीची ट्रकला धडक.! तीन तरुण ठार


गडचिरोली : नवीन घेतलेल्या बाईकवरून भरधाव वेगाने ट्रिपल सिट जाणे तीन तरुणांच्या जीवावर बेतले. समोरून येणाऱ्या ट्रकवर जाऊन धडकल्याने गंभीर जखमी होऊन तिघांचाही मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास चंद्रपूर मार्गावरील मुरखळा फाट्याजवळ मुख्य मार्गावर घडला. हे तीनही तरुण अहेरी तालुक्यातील गोविंदगाव येथील रहिवासी होते.

अक्षय दशरथ पेंदाम (२३ वर्ष), अजित रघु सडमेक (२३) आणि अमोल अशोक अर्का (२०) अशी त्या मृत युवकांची नावे आहेत. हे तरुण एका दुकाचीवरून चंद्रपूर मार्गावरून गडचिरोलीच्या दिशेने येत होते. याचवेळी गोंदियाकडून आंध्र प्रदेशात जाणारा ट्रक गडचिरोलीकडून चंद्रपूरच्या दिशेने निघाला होता. बाईक चालवणाऱ्या अक्षय पेंदाम याचे नियंत्रण सुटले आणि त्यांची बाईक समोरून येणाऱ्या त्या ट्रकला धडकली. यामुळे बाईक काही अंतरावर पुढे जाऊन रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला जाऊन पडली. तिघेही तरुण रस्त्यावर फेकल्या गेल्याने गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.

बुधवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांचे शवपरिक्षण केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 10, 2024

PostImage

४ वर्षाच्या कालावधीनंतर अनेकांच्या अनेक प्रयत्नानंतर चंद्रपूर-राजुरा-चेन्नूरमार्गे सिरोंचासाठी धावली आज लालपरी.!


४ वर्षाच्या कालावधीनंतर महेश कोलावार व अनेकांच्या प्रयत्नांना आले यश

वर्ष २०२० मध्ये पहिल्यांदा सादर केले होते सदर मागणीचे निवेदन

मध्यंतरी कालावधीतही विभागीय कार्यालयात घेतली होती धाव

चालक,वाहक व प्रवाशांचे पुष्पगुच्छाने स्वागत करीत पहिल्या दिवसाच्या दोन्ही फेरीच्या प्रवासाचा केला शुभारंभ

चंद्रपूर :- 

अनेकांच्या अनेक प्रयत्नानंतर चंद्रपूर-राजुरा-चेन्नूरमार्गे सिरोंचासाठी आज लालपरीची सेवा सुरू करण्यात आली असल्याचे आनंद माझ्यासहित सिरोंचा वासियांना होत आहे असे प्रतिपादन भाजयुमो महानगर जिल्हाकारिणी सदस्य महेश कोलावार यांनी केले आहे.

पुढे बोलतांना कोलावार म्हणाले की वर्ष २०२० मध्ये सदर मागणीचा हट्टहास धरला असून याबाबतीचे पहिले निवेदन आपणच पुर्व विभागीय नियंत्रक आर.एन पाटील यांची भेट घेत सादर केले होते.

मध्यंतरी काळात देखील सिरोंचाचे माजी आमदार पेंटा रामा तलांडी,माजी तहसीलदार शंकर पुप्पालवार यांच्याही सुचनेनुसार आपण
या मागणीबाबतचे विषय घेऊन विभागीय कार्यालयात विचारपूस करत लालपरी सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवावेत अशी मागणी करत आले.

यानंतर खासदार अशोक नेते यांनी स्वत: सिरोंच्याला बैठक घेत विभागीय नियंत्रक कार्यालयाला सुचना करत आंतरराज्यीय परवानगी घेण्याचे सुचविले होते.
त्यानंतर अनेकांनी याबाबत निवेदन सादर केले होते.

अश्या अनेकांच्या प्रयत्नांना यश आल्याचे आनंदाची बातमी घेऊन भाजयुमो महानगर जिल्हाकारिणी सदस्य महेश कोलावार यांनी विभागीय नियंत्रक स्मिता सुतावने यांची सदिच्छा भेट घेत त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे स्वागत व अभिनंदन करत आभार मानले. सोबतच ही लालपरी सेवा सतत सुरू ठेवण्याची व दुपारच्या वेळेत बदल करून ३ वाजताच्या नंतर चालवावी अशी विनंती केली असता विभाग नियंत्रकांनी लालपरी सेवेच्या आर्थिक नफा - तोटांचा विचार करत सदर सेवा मागणीनुसार सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.

तर अनेक प्रयत्नानंतर आज सिरोंचासाठी लालपरी रवाना होतांना सकाळी कार्यालयीन अधिकारी - कर्मचा-यांनी चालक,वाहक व प्रवाशांचे पुष्पगुच्छाने स्वागत करत पहिल्या प्रवासाचा शुभारंभ केला तर दुपारच्या फेरीत महेश कोलावार यांनी चालक,वाहक व प्रवाशांचे पुष्पगुच्छाने स्वागत करत पहिल्या दिवसातील दुस-या फेरीच्या प्रवासाचा शुभारंभ केला.ही लालपरी दररोज सकाळी ७ वाजता व दुपारी २ वाजता चंद्रपूरहून चेन्नूरमार्गे सिरोंचासाठी रवाना होणार आहे.

यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी पुरूषोत्तम व्यवहारे, आगार प्रमुख प्रितेश रामटेके, सहाय्यक वाहतूक अधिक्षक हेमंत गोवर्धन,वाहतूक निरीक्षक अंकित कामतवार,सहाय्यक वाहतूक निरीक्षक निलेश जुनघरे,भाजयुमो महानगर जिल्हाकारिणी सदस्य महेश कोलावार,चालक सुमित शेंडे,वाहक सचिन बैलनवार, नवनाथ वाढीकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 10, 2024

PostImage

दि.27 ते 31 जानेवारी महासंस्कृती महोत्सवात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा.: -जिल्हा प्रशासनाचे आवाहन.


संजय कडोळे वाशिम जिल्हा विशेष प्रती.

वाशिम : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. राज्यातील विविध संस्कृतीचे आदान-प्रदान,स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ,लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन तसेच स्वातंत्र्य लढ्यातील लढवय्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी 27 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल, वाशिम येथे महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. 

                या महोत्सवाअंतर्गत सांस्कृतिक रंगमंचावरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारे कार्यक्रम,शिवचरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, लोककलेतील विविध प्रकार पोवाडा, भारुड,गोंधळ गीते,विविध भागातील तसेच स्थानिक दुर्मिळ आणि लुप्त होत चाललेल्या लोककला व संस्कृतीचे कार्यक्रम,राज्यातील विविध महोत्सव, कविता कार्यक्रम/व्याख्याने,देशभक्ती गीतांचा कार्यक्रम आणि जिल्ह्यातील स्थानिक सण उत्सवाची कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
           यावेळी प्रदर्शन दालने देखील उभारण्यात येणार आहे.यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सचित्र दालन, राज्य संरक्षित स्मारके व गडकिल्ल्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यक्रम: प्रदर्शन, हस्तकला वस्तू दालन, बचत गटांचे उत्पादन दालन व पर्यटनविषयक दालने उभारण्यात येणार आहे.यासह राज्याची संस्कृती दर्शविणाऱ्या स्पर्धा,मर्दानी खेळ, शिवकालीन लोककला,लुप्त होत चाललेल्या खेळासंबंधीचा उपक्रम आणि जिल्हा समितीने ठरविलेले उपक्रम राबविण्यात येणार आहे. 
           जिल्ह्यातील जास्तीत जास्त  लोककलावंत,महिला बचतगट, शालेय व महाविद्यालय विद्यार्थी-विद्यार्थिनी व नागरिकांनी या महासंस्कृती महोत्सवामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे.असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
               या महासंस्कृती महोत्सवात सहभागी होण्यास इच्छुक असणाऱ्यांनी आपले अर्ज 18 जानेवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय येथील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष येथे सादर करावे. प्राप्त अर्जाची छाननी करून काही कलाकारांना या कार्यक्रमात आपली कला दाखवण्याची संधी देण्यात येईल.असे उपजिल्हाधिकारी (रोहयो) कैलास देवरे यांनी कळविले आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 10, 2024

PostImage

तळोधी (बा.) येथे संत श्री नगाजी महाराज जयंती महोत्सव


रुमदेव सहारे सहसंपादक सावरगाव :-

          नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.)येथील तळोधी युवा नाभिक बहुउद्देशीय संस्था, नाभिक युवा आघाडी,नाभिक महिला आघाडी,यांच्या संयुक्त विद्यमाने वाढोणा बायपास रोड नामदेवराव गुरनुले ले - आउट तळोधी( बा.)येथे नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत श्री नगाजी महाराज यांची 347 वी जयंती महोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.व श्री नगाजी महाराज सामाजिक सभागृहाचे भूमिपुजन रविवारी थाटात पार पडले.
      श्री नगाजी महाराजांच्या सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन व कार्यक्रमाचे उदघाट्न चिमूर क्षेत्राचे आमदार कीर्तिकुमार उर्फ बंटी भांगडिया यांच्या शुभ हस्ते पार पडले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ने.हि.महाविद्यालय ब्रम्हपुरीचे प्रा.लक्ष्मण मेश्राम होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच राजेश घिये,भाजपा तालुकाध्यक्ष संतोष रडके,ग्रा.पं.सदस्य नरेंद्र खोब्रागडे,माजी भाजपा तालुकाध्यक्ष होमदेव मेश्राम,सोनू कटारे,महाराष्ट्र नाभिक महामंडळ गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष नामदेव शेंडे, नाभिक युवा आघाडी ब्रह्मपुरीचे अजय खडसिंगे, आरमोरीचे तालुकाध्यक्ष कालिदास लक्षणे,ब्रम्हपुरीचे सामाजिक कार्यकर्ते उदय पगाडे,एडवोकेट किशोर चोपकार,तळोधी पत्रकार संघांचे अध्यक्ष राजेश बारसागडे,प्रेमदास मेंढुळकर,भुपेश भाकरे,सतिश बारसागडे,दिलीप फुलबांधे,शंकर रक्तसिंगे,दिलीप बारसागडे,हभप धर्माजी बारसागडे महाराज,प्रीती बारसागडे आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत श्री नगाजी महाराजांची घटस्थापणा व प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर महिलांचे हळदी -कुंकू व कीर्तनकार धर्माजी बारसागडे महाराजांचे कीर्तन पार पडले.त्यानंतर आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्या हस्ते सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन पार पडले.या कार्यक्रमाच्या औचित्याने नाभिक समाजातील सुप्रसिद्ध विनोदी नाट्य कलावंत मयूर चन्ने गेवर्धा व पाश्चर्य गायक व नाट्य कलावंत देवा शेंडे केशोरी यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी उद्घाटनपर भाषणात बोलताना आमदार भांगडिया यांनी नगाजी महाराजांच्या सभागृहास 15 लाख रुपयांची निधी मंजूर केली आहे. मात्र प्रत्यक्ष बांधकामाच्या वेळी निधीची कमतरता भासल्यास मी स्वतः देईन.अशी ग्वाही नाभिक समाज बांधवांना दिली.याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात मेश्राम यांनी समाजाला न्याय,हक्क प्राप्त करण्याकरिता समाजाने एकत्रित येने गरजेचे असल्याचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी इतर मान्यवरांची समयोचित भाषणे झालीत. प्रस्तावना व संचालन वैभव बारसागडे यांनी केले.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 10, 2024

PostImage

लहर की बरखा-१३..! लेखक:-पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर


लूटो मजा गुरुनाम की, ऐसी बखत ना आयगी ।

यह मालमत्ता यार इकदिन, खाकमें मिलजायगी ।।

अपने भलाईके लिये, सत्संग साधो जन्मभर ।

तो माल क्या संसार है?, कूदे चढेंगे ख्यालपर ।।

            श्री गुरुदेवाने दिलेला नाममंत्राचा जप करून जीवाचा उद्धार करु शकता. गुरुदेवाच्या नामाचा महिमा अनंत आहे. गुरुदेवाने दिलेल्या नामात जेवढा आनंद आहे, तो आनंद आपल्या मालमत्तेत, संपत्ती मध्ये नाही. कारण ही मालमत्ता एक दिवस आपल्याला सोडून जावे लागेल. राष्ट्रसंत म्हणतात.

जो खासकी पहिचान दे ।
वैसे गुरुपर जान दे ।।

             जे सत् आहे म्हणजेच नित्य आहे त्याच्याशी संग म्हणजे सत्संग. आपल्या भल्यासाठी सत्संग साधणे गरजेचे आहे. सर्व प्राणीमात्राची धडपड ही सुखासाठी चाललेली असते. विषयात सुख नाही असे संत सांगतात. सत्संग एक क्षण मिळाला तरी आमचा जीव पावन होईल असे राष्ट्रसंत म्हणतात.

सत्संग जरी क्षण एक मिळे ।
जीव पावन होईल हा अमुचा ।।

             रामाची भक्ती केली जाते पण खरा आत्माराम जेथे सांगितला जातो किंवा ज्याची ओळख करुन दिली जाते, ते ठिकाण सत्संग होय. सत्संग म्हणजे चांगला सहवास. सत् पुरुषाचे समागमाने मनोवृत्ती संस्कारित होते. काम क्रोधादी मळापासून मुक्त होते आणि स्वतचा मार्ग मोकळा होतो. 

          संसारातून माणसाला तिळमात्र फुरसत मिळत नाही. संसारात राहून भगवंताच्या अस्तित्वाची, त्याच्या प्रेमाची आठवण ठेऊ शकतो. संसार करून परमार्थ करणे गरजेचे आहे. जवळपास कुठे आध्यात्मिक कार्य चालत असेल तेथे जाता येते. संसारातून थोडा वेळ काढावा लागेल. संसार सुखाचा होण्यासाठी पैसा एकमेव मार्ग आहे पण अतिप्रमाणात लोभ असणे चुकीचे आहे. लोभी माणसाचा संसार सुखाचा होण्याऐवजी दुःखाचा होतो.

पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्री गुरुदेव प्रचारक, यवतमाळ 
फोन- 9921791677


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 10, 2024

PostImage

चक्क.. तिघांना दिली दुचाकीने धडक.! एकाच मृत्यू तर दोघे जखमी.! मॉर्निंग वॉकला जाणे बेतले जीवावर.!


अहमदनगर:-

सध्या हिवाळ्याचे दीवस सुरु असून सकाळी मॉर्निंग वॉक ला जाणाऱ्या तीन युवकांना मोटारसायकलने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले आहे.अनिकेत महादेव अकोलकर असे मृत युवकाचे नाव असून फुलारी व चितळे हे दोन गंभीर जखमी झालेल्या युवकांचे नाव आहेत. जखमी दोघांना  उपचारासाठी नगरला दाखल करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोद केली आहे. मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता ही घटना शेवगाव रोडवर हॉटेल निवांत समोर घडली आहे. काल मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास डांगेवाडी शिवरात हॉटेल निवांत समोर रस्त्यावर व्यायाम करणारे अनिकेत अकोलकर,फुलारी व चितळे यांना मोटारसायकलने जोरात धडक दिली. यामध्ये अनिकेत महादेव अकोलकर हा ठार झाला तर चितळे व फुलारी दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. पहाटे फिरायला येणारे युवक तातडीने धावले व जखमींना उपचारासाठी दाखल केले आहे. पहाटे फिरायला जाणारे व व्यायामासाठी रस्त्यावरच उतरणाऱ्यांनी या घटनेतून बोध घेण्याची गरज आहे. याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सहायक फौजदार अमोल आव्हाड पुढील तपास करीत आहेत.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 9, 2024

PostImage

पी एम किसान सन्मान निधी योजना पात्र व्यक्तींनी आवश्यक बाबींची पूर्तता करावी कृषी विभागाचे आवाहन


पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभआपण घेत असाल तर आपण सर्व पात्र व्यक्तींना आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी गावपातळीवर मोहिम राबविण्यात येत असून, सर्व पात्र शेतकरी बांधवांनी आवश्यक बाबींची पूर्तता करण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.  शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने पि एम किसान सन्मान निधी  योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) २ हजार रु. प्रति हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी ६ हजार रू. लाभ अदा करण्यात येत आहे. लागवडीलायक क्षेत्रधारक, बँक खाती आधार संलग्न व योजनेचे ईकेवायसी केलेले शेतकरी कुटुंब पी. एम. किसान योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. लाभार्थींची स्वयं नोंदणी व ईकेवायसीसाठी सर्व सामाईक सुविधा केंद्र  तर आधार संलग्न बँक खाती उघडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांनाही सहभागी करण्यात आले आहे.पी.एम.किसान योजनेच्या लाभासाठी बंधनकारक केलेल्या बाबींची पूर्तता केलेल्या लाभार्थींनाच योजनेचा लाभ केंद्र शासन अदा करत आहे. त्यामुळे भूमी अभिलेख नोंदीनुसार जमिनीचा तपशील अद्ययावत न केलेल्या, बँक खाती आधार संलग्न व ई-केवायसी लाभार्थींनी सदर बाबींची पूर्तता करून घ्यावी. यामध्ये भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत नसलेल्या लाभार्थींनी संबंधित तलाठी / तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधावा. त्याचप्रमाणे, ईकेवायसी व बँक खाती आधार संलग्न करणे यासाठी अनुक्रमे नजीकच्या सामाईक सुविधा केंद्र व इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या मार्फत कार्यपूर्तता करावी. तसेच आवश्यकतेप्रमाणे पूर्तता करण्यासाठी गावच्या ग्रामस्तरीय नोडल अधिकारी / कृषी सहाय्यक यांची मदत घ्यावी.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 9, 2024

PostImage

जय श्री सीता राम चा जयघोषाच्या  उत्साहपूर्ण वातावरणात समाधी वार्ड परिसर दुमदुमली


अयोध्येतील श्रीराम मंदिरातील श्री मंगल अक्षदा कलशाचे करण्यात आले भव्य मिरवणूक


चंद्रपूर :- 

प्रभू श्रीरामाची भव्य प्रतिमा असलेल्या अयोध्येतील रामलल्लांची मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात पूजन करून आणलेल्या 'अक्षतांचे' पूजन करीत समाधी वार्ड स्थित विठ्ठल रूख्मिनी मंदिरापासून भव्य मंगल 'कलश यात्रा' काढण्यात आली. 

यावेळी अनेक रामभक्त व महिला डोक्यावर अक्षता कलश घेऊन यात्रेत सहभागी झाले. सदर यात्रेचे ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी विश्व हिंदू परिषद जिल्हा सत्संग प्रमुख किशोर महालक्ष्मे, प्रांत सत्संग प्रमुख राकेश त्रिपाठी, जिल्हा कोशाध्यक्ष ब्रिजमोहन मंत्री,विठ्ठल रूख्मिनी मंदिर समाधी वार्ड कोषाध्यक्ष प्रकाश कविश्वर,अजय देशमुख,
भाजपा महानगर जिल्हा सचिव राजेंद्र खांडेकर,भाजयुमो महानगर जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार,गणेश रासपायले,राजू गंपावार,प्रदुम्न माढई,ओमकार महालक्ष्मे,विजय डोमलवार,हेमंत रूदपवार, अशोक गज्जलवार,श्रीकांत गोविंदवार,रविंद्र घरोटे,विजय वैद्य,अनिल देहनकर,विष्णू देवईकर,प्रदीप आसूटकर,प्रशांत बाटवे,पंकज कोनेर,सुशांत क्षिरसागर,विनोद माढई,विजय कासर्लेवार,राजू रूदपवार,वासुदेव कोहपरे,सचिन वनकर,जिल्हा ग्राहक पंचायत अध्यक्षा नंदिनी चुनारकर,अनिता  कासर्लेवार, कल्याणी महालक्ष्मे,मंगला रूद्रपवार,निलिमा कविश्वर,पुष्पा बोनगिरी,आरती माढई,वसुदा गंपावार,सुनंदा क्षिरसागर,स्मिता गज्जलवार,वैष्णवी गंपावार, ज्योती भलमे,शिल्पा जोशी,कांचन देशकर,प्रणिता आकनपल्लीवार,सुचिता खोंड,प्रमिला भानारकर,योगिता वनकर,मंगला मुत्तेलवार,नीता चुनारकर,माया गाळे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 9, 2024

PostImage

शंकरनगर येथे रानटी हत्तीच्या हल्ल्यात मृत महिलेच्या कुटुंबियांना १ कोटीची आर्थिक मदत द्या.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नामदार धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन


रुमदेव सहारे सहसंपादक आरमोरी:-

        तालुक्यातील शंकरनगर  येथे आपल्या शेतात कुटुंबियांसोबत वास्तव्यात असलेल्या श्रीमती कौशल्या राधाकांत मंडल या महिलेवर रानटी हत्तीने हल्ला करून सोंडेत पकडून जमिनीवर आपटले व पायाने तुडवले. यामध्ये ती महिला मृत झाली. त्या मृत महिलेच्या कुटुंबियांना राज्य शासनाच्या वतीने १कोटी रुपयाची आर्थिक मदत देऊन वारसानांपैकी एकाला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे. या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आरमोरी च्या वतीने राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार राजे धर्मराव बाबा आत्राम यांना देण्यात आले.
         रविभवन, नागपूर येथील कुटीर क्र.२७ मधील नामदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या जनसंपर्क कार्यालयात निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र वासेकर,तालुका अध्यक्ष अमीन लालानी, जिल्हा उपाध्यक्ष चिनी मोटवानी, तालुका कार्याध्यक्ष सुनील नंदनवार, युवक तालुका अध्यक्ष दिवाकर गराडे, पवन मोटवानी उपस्थित होते.
       गेल्या दोन वर्षांपासून रानटी हत्तीचा आरमोरी तालुक्यात हैदोस सुरु आहे. आजपर्यंत रानटी हत्तीकडून अनेक शेतकऱ्यांच्या पिकांची भरपूर प्रमाणात नासधूस झाली आहे. तर अनेक नागरिकांच्या घरांची सुद्धा स नाशधुस झालेली आहे. रानटी हटत्तीमुळे तालुक्यातील शंकरनगर, जोगीसाखरा, पळसगाव, पाथरगोटा, सालमारा, कणेरी, रामपुरी या भागातील नागरिक दहशतीत आहेत. त्यामुळे रानटी हत्तीचा बंदोबस्त करण्यात यावा.
         वनविभागामार्फत  रानटी हत्तीना हाकलून लावण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. हत्ती ज्या परिसरात आहेत त्या परिसरातील नागरिकांना योग्य सुचना व संरक्षण दिल्या जात नाही. म्हणून अशाप्रकारच्या घटना घडून जीवितहानी होत असतात. म्हणून  चौकशी करून दोषी वनाधिकारी यांच्यावर निलंबनाची  कारवाई करण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार राजे धर्मरावबाबा आत्राम यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 9, 2024

PostImage

आशा वर्कर, गट प्रवर्तक,अंगणवाडी सेविका,शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या  मागण्यांकडे मा.मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन वेधले लक्ष!


 गांधी चौकात आयटक चा,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,जवाब दो आंदोलन! 

गडचिरोली:- 
संप काळात सरकारने केलेल्या घोषणा नुसार गटप्रवर्तक महिलांना दरमहा दहा हजार रुपये मानधन वाढ, दरमहा आरोग्यवर्धिनीचे पंधराशे रुपये , कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सर्व हक्क व दिवाळी बोनस. तसेच आशा महिलांना दरमहा सात हजार रुपये मानधन वाढ  देण्याचा जीआर तात्काळ काढा,अंगणवाडी सेविकांना 26 हजार रू. मदतनीसला वीस हजार रु किमान वेतन, पेन्शन, ग्राजूयटी लागू करा.शालेय पोषण आहार कर्मचाऱयांना किमान वेतन श्रेणी मिळे पर्यंत 15 हजार रु.मानधन लागू करा.शिक्षण मंत्र्यांनी केलेल्या घोषणे नुसार मासिक 1500 रू. मानधन वाढीचा जी आर काढा या प्रमुख मागणीसाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गडचिरोली येथे 9 जानेवारी 2024 रोजी प्रशासनाच्या वतीने आयोजित महिला सक्षमीकरण मेळावा करिता मा.मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री यांचा नियोजित दौरा असल्याची माहिती आयटक पदाधिकारी यांना मिळाल्याने त्यांना जाब विचारण्यासाठी गडचिरोली येथील गांधी चौकात आयटक च्या नेतृत्वात योजना कर्मचाऱ्यांचा जवाब दो!आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला होता.परंतु आंदोलन करण्याच्या 1 दिवसापूर्वीच आयटक चे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे यांना सकाळीच ब्रम्हपुरी वरून तर जिल्ह्याधक्ष कॉ.देवराव चवळे यांना गडचिरोली पोलिसांनी ताब्यात घेऊन नजर कैद करण्यात आले आणि आंदोलन मागे घेण्याकरिता दबाव आणला जात होता परंतु जो पर्यंत मुख्यमंत्री यांच्या सोबत भेट घडवून आणल्या शिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही अशी टाटर भूमिका आयटक पदाधिकाऱ्यांनी घेतल्याने शेवटी पोलिस अधीक्षक यांनी मुख्यमंत्री सोबत भेट करून देणार असल्याचे मान्य केल्याने गांधी चौकातील राजीव गांधी पटांगणात सकाळी 11 वाजता पासून हजारो योजना कर्मचाऱ्यांनी  जवाब दो !आंदोलनात  सरकार विरोधात तीव्र नारेबाजी करन्यात आली .शेवटी आयटक चे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे, जिल्हाध्यक्ष देवराव चवळे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ.ड्रा.महेश कोपुलवार,कॉ.सरिता नैताम, कॉ.फर्जणा शेख, कॉ .वनिता कुंठावार,राधा ठाकरे यांच्या शिषटमंडळाने मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन चर्चा केली.18  डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनात आयटक महामोर्चात ठरल्या नुसार  लवकरच मुंबई मंत्रालयात बैठक घेऊन मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.
जवाब दो!आंदोलनात आयटक चे कॉ.विनोद झोडगे, जिल्हाध्यक्ष देवराव चवळे कॉ.ड्रॉ.महेश कोपुलवार यांच्यासह अनेक नेत्यांनी मार्गदर्शन करत सरकारचा खरपूस समाचार घेतला.एकीकडे सरकार ने दोन महिन्यापूर्वी संप काळात घोषणा करूनही आशा वर्कर, गट प्रवर्तक,कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढ,दिवाळी बोनस चा जी आर काढायला  वेळ नाही तर अंगणवाडी सेविकांचा 36 दिवस झाले राज्यव्यापी संप सुरू आहे परंतु तोडगा काढायला सरकार जवळ वेळ नाही,केंद्र सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून शालेय पोषण आहार कर्मचाऱयांनच्या मानधनात वाढ केली नाही तेव्हा शापोआ कर्मचाऱ्यांनी मासिक 2500 रू.मानधनात जगावे कसे? तेव्हा अश्या वेळकाढू कामगार विरोधी  सरकारला येत्या 2024 मध्ये सत्तेवरून खाली खेचण्याचा व पुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आयटक नी दिला आहे.आंदोलनात गडचिरोली,चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो आशा वर्कर गट प्रवर्तक,अंगणवाडी सेविका मदतनीस,शालेय पोषण आहार कर्मचारी उपस्थित होत्या.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 9, 2024

PostImage

गडचिरोली : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान लाईव्ह प्रक्षेपण



PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 9, 2024

PostImage

भारतीय स्टेट बँक मेंडकी तर्फे अन्नदाता दिवस साजरा


मेंडकी:-

         अन्नदाता शेतकरी दिवसाचे औचित्य साधुण भारतीय स्टेट बँक शाखा मेंडकी च्या वतीने अन्नदाता दिवस नुकताच साजरा करन्यात आला .            संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणुन मेंडकी स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक ईशान दयालवार दिवाकरजी तुपट मुख्य रोखपाल तर प्रमुख अतिथी म्हणुन पुंडलिकजी झोडे, कुसुमबाई शेंडे, गुनाजी थेरकर, श्रीरामजी देशमख, पुरुषोत्तम सालोरकर, प्रीतम सातपुते, भाष्कर राउत, बाबुरावजी सालोरकर, सामदेव सहारे, उपेंद्र बोरूले, मधुकरजी करंजेकार आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.            मागील काही वर्षा पासुन जे शेतकरी  मेंडकी स्टेट बँके कडुन पिक कर्जाची उचल करूण मुदती पुर्वी कर्जाचा भरणा करतात अश्या शेतकऱ्यांचा शाखा व्यवस्थापक व पाहुण्याच्यां हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला . तसेच अटल पेंशन योजना, पंतप्रधाण जीवण ज्योती योजणा, विमा संरक्षण योजणा, अमृत कलश योजणा, व्यवसायीक तथा उद्योगीक कर्ज, सोने तारण कर्ज योजना, व इतर बँकेच्या योजणा सोई सुविधा वर शाखा व्यवस्थापक ईशान दयालवार यांनी मार्गदर्शण केले .          कार्यक्रमात मुरपार, बेलगाव, गणेशपुर, भुज, एकारा शि. तुकुम, रुपाळा - आकापुर, ज . मेंढा, मेंडकी येथिल शेतकरी सहभागी झाले होते .   कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिवाकरजी तुपट यांनी केले. तर सुत्रसंचालन शुभम महाडोरे नी केले . पाहुन्याचे आभार बँकेचे कर्मचारी मेघराज सातव यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विकास निमसरकार सुरक्षा रक्षक मेंडकी येथिल सीएसपी केंद्रचालक स्वप्नील नरड, सिद्धांत आंबोरकर, अनिकेत महाडोरे, गौरव सातव, राजु टोंगे यांनी अथक परिश्रम घेतले.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 9, 2024

PostImage

ब्रम्हपुरी येथे २७ जानेवारी रोजी अखिल कुणबी समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन


ब्रम्हपुरी:-

              अखिल कुणबी समाज मंडळ ब्रम्हपुरीच्या वतीने कुणबी समाज मंडळ सभागृहाच्या प्रस्तावित जागेवर भव्य वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यात मोठ्या संख्येने उत्सुक अखिल कुणबी समाजाच्या वधू-वर व त्यांचे नातेवाईक यांनी सहभागी होण्याचे आव्हान आयोजक अखिल कुणबी समाज मंडळ ब्रम्हपुरीचे वतीने करण्यात आले आहे.
                      मुलं वयात आली आणि उद्योग व्यवसायात रमली की; पालकांचा शोध त्यांना जोडीदार शोधण्यासाठी सुरू होतो. पण हल्ली आपल्या उद्योग व्यवसाय नौकरीतील धकाधाकीच्या व धावपळीच्या जीवनात माणसाना वेळ ही अमूल्य गोष्ट झाली आहे. या सर्व अडचणी दूर करून समाज बांधवांनां एका व्यासपीठाखाली आणून त्यांचा जोडीदार शोधण्याचा मार्ग सोयीस्कर व्हावा व समाज एकत्रित यावा उदात्त हेतूने अखिल कुणबी समाज मंडळ ब्रम्हपुरीच्या पुढाकारातून या मागिल वर्षी पेक्षा मोठ्या स्वरूपात वडसा रोडवरील अखिल कुणबी समाज मंडळ सभागृहाच्या प्रस्तावित जागेवर रविवार दिनांक २७ जानेवारी रोजी भव्य अखिल कुणबी वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. सोबतच कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 
याबाबत अखिल कुणबी समाज मंडळ ब्रम्हपुरीची  नियोजन सभा मुरलीधर मंदिर टिळक नगर वडसा रोड ब्रम्हपुरी येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी अखिल कुणबी समाज मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
..........


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 9, 2024

PostImage

परंपरागत खेळांना वाव द्या.- रेखलालभाऊ टेंभरे


रुमदेव सहारे सहसंपादक गोरेगाव:-

                  बोटे येथे नुकतेच संपन्न झालेल्या भव्य कबड्डी स्पर्धेच्या बक्षिस वितरण सोहळ्याला अध्यक्ष म्हणून रेखलालभाऊ टेंभरे (डायरेक्टर, जीडीसीसी बॅंक गोंदिया) उपस्थित झाले होते. व आदी मान्यवर उपस्थित होते. 
         याप्रसंगी रेखलालभाऊ टेंभरे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, देश विकासाच्या मार्गावर आहे. देश प्रगत होत आहे. त्यामुळे देशाच्या सर्व बाबींमध्ये थोडाफार बदल होत असल्याचे समजून येत आहे. अशा वेळी खेळ व मनोरंजनाच्या साधनांमध्ये सुद्धा बदल झालेला आहे. अशा वेळी आपले परंपरागत खेळ व परंपरागत मनोरंजनाचे साधन टिकवून ठेवणे ही आपण सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. शेवटी ते म्हणाले की, माणूस कितीही मोठा झाला तरी त्याने आपल्या जन्मभूमी शी निगडित परंपरांना विसरू नये.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 9, 2024

PostImage

चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरूणाचा मृत्यू.! चारचाकी वाहन चालक घटनास्थळावरुन पसार 


चिमूर (नेरी):-

 भरधाव येणाऱ्या चारचाकी वाहनाने दुचाकीला जब्बर धडक दिल्याने दुचाकीस्वार युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. नितीन मेश्राम (३२) रा. येनोली असे मृतक युवकाचे नाव आहे. ही घटना नवरगाव मार्गावर खुंटाळाजवळ ८ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. 
मृतक नितीनच्या गावी मंडई  असल्याने चिमूर तालुक्यातील मानेमोहाळी येथील पाहुणे त्याच्या घरी आले होते. त्या पाहुण्यांना सोडण्यासाठी म्हणून नितीन  एमएच ३४/ एके ७६६२ या दुचाकीने गेला होता. पाहुण्यांना सोडून गावाकडे परत येत असताना खुंटाळाजवळ भरधाव येणाऱ्या चारचाकी वाहनाने  दुचाकीस्वार नितीनला जब्बर धडक दिली. धडक इतकी भिषण होती की यामध्ये दुचाकीस्वार नितीन यांचा जागीच मृत्यू झाला. धडक देणारे पिकअप वाहन कापूस वाहून नेणारे असल्याचे बोलले जात आहे.अपघात एवढा भीषण होता की, त्याच्या दुचाकीचे पार्टस इतरत्र पसरलेले दिसत असून ४० फूटपर्यंत  पसरले होते. घटनेनंतर वाहनचालक घटनास्थळावरून पळ काढला.
 घटनेची माहिती चिमूर पोलिस विभागाला मिळताच चिमूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जांभळे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. 
अज्ञात चारचाकी पीकअप चालकावर भांदवि ३०४ अ, २९७, ४३७, १३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चिमूर पोलीस विभागाचे अधिकारी करीत आहेत.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 8, 2024

PostImage

बिबट्या आढळला झाडाच्या फांदीवर मृतावस्थेत.!


 

तळोधी बाळापूर – वर्ष 2023 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात 7 वाघाचा विविध कारणांनी मृत्यू झाला होता, आता नव्या वर्षात ब्रह्मपुरी वनविभाग अंतर्गत येणाऱ्या तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील बिबट्याचा मृतदेह आढळून आला. वन कर्मचारी कॅमेरा ट्रॅप चे फोटो चेक करण्यासाठी जंगलात गेले असता त्यांना दुर्गंधी येऊ लागली, परिसरात बघितले तर एका झाडावर 20 ते 30 फूट उंचीवर बिबट्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला.

घटनेची माहिती तळोधी बाळापुर वन परिक्षेत्र अधिकारी आरुप कन्नमवार यांना देण्यात आली घटनेची माहिती मिळताचं वन अधिकारी तात्काळ घटनास्थळी जाऊन दोराच्या साह्याने झाडावर चढून त्या बिबट्याला खाली उतरविले.

सदर मृत बिबट ही साडेतीन ते चार वर्षे वयाचा मादा बिबट असल्याचे लक्षात आले. व घटनास्थळावरून हे बिबटमृत झाल्याची घटनाही पाच ते सहा दिवसापूर्वी घडल्याचे घटनास्थळावरील परिस्थितीनुसार लक्षात आले. सदर परिसराची चौकशी केली असता ज्या झाडावर हा बिबट मेलेला होता त्या झाडाखाली वाघाने ओरबडल्याचे, मार्किंग केल्याचे व झाडावर थोड्या उंचावर पर्यंत वाघाच्याही पंजाचे नखांचे निशाण आढळून आले. त्यावरून वाघाने पाठलाग केल्यामुळे बिबट झाडावर घाईघाईने चढला व चढल्यानंतर हृदय घाताने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला.

मोक्का पंचनामा केल्यानंतर विच्छेदनासाठी ब्रह्मपुरी वन विभागाच्या ऑफिसला पाठविण्यात आले.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 8, 2024

PostImage

महिला शिपाई प्रकरणी कोणतीही घटना घडलेली नाही, पोलिस उपायुक्तांचे (अभियान) स्पष्टीकरण


मुंबई, दि. 8 : काही प्रसार माध्यमे व समाजमाध्यमांवर मुंबई पोलीस दलातील महिला शिपाई यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे वृत्त प्रदर्शित झाले. या प्रकरणी सखोल माहिती घेण्यात आली. याप्रकरणी तथाकथित अर्जदारांकडे चौकशी केली असता असा अर्ज त्यांनी केला नसून त्याचे नाव व सही कुणीतरी अज्ञात माणसाने खोडसाळपणे वापर केल्याचे समजून आले आहे. ही माहिती पूर्णपणे चुकीची असून काही समाजकंटकांनी जाणीपूर्वक सदरचे कृत्य केले असल्याचे समजून आले आहे.

या अर्जामध्ये नमूद करण्यात आल्याप्रमाणे अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नसून खोडसाळपणाने अर्ज करण्याऱ्याचा शोध घेऊन त्याच्याविरूद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे, असे स्पष्टीकरण मुंबई पोलीस उपायुक्त (अभियान) यांनी केले आहे.

००००

नीलेश तायडे/विसंअ/


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 8, 2024

PostImage

थानेश्वर पाटील कायरकर यांना "डॉक्टरेट पदवी व समाज भूषण पुरस्कार-२०२४ प्रदान


मेंडकी, ८ जानेवारी २०२४,

                 थानेश्वर पाटील कायरकर यांचा जन्म २३ जुलै १९७० रोजी अल्प भूधारक शेतकरी कुटुंबात झाला असून वडील केशवराव कायरकर मेंडकी येथील माजी पोलीस पाटील होते. महात्मा गांधी यांचे विचार उराशी बाळगून त्यांच्या वडिलांनी १९४२ मधिल स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होवून ६ महिन्याची सजा भोगली. हेच प्रेरणादायी विचार मनात घेऊन ग्रामीण भागात काम करीत असताना थानेश्वर कायरकर यांना सहकार क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली.गांव, तालुका, जिल्हा स्तरावर अनेक सहकारी संस्था मध्ये कामे करीत असताना लोकप्रियता मिळाली १९९३ मध्ये मेंडकी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले सलग २० वर्षे ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केल्यानंतर २०१७ मध्ये ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघ आमदार तथा महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली ब्रम्हपुरी पंचायत समितीमध्ये थानेश्वर कायरकर सदस्य म्हणून काँग्रेस पक्षाचे एकटेच निवडून आले.आणी मतदारसंघात विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन कोट्यवधी रुपयांची शासकीय निधी मंजूर केला व भरीव कामे केली.


            थानेश्वर पाटील कायरकर यांच्या यशाची कहाणी समाजातील सामान्य व्यक्तींसाठी प्रेरणादायी आहे.या यशाचे रहस्य म्हणजे थानेश्वर कायरकर यांची काँग्रेस पक्षाची निष्ठा आणि सामान्य लोकांप्रती समर्पित भाव आहे.त्यांचे कठोर परिश्रम आणि मेहनत त्यांनां या यशापर्यत पोहोचवीले आहे. तालुक्यातील सर्व गावाचा विकास करणे, लोकांना चांगले जीवन जगण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे स्वप्न थानेश्वर पाटील कायरकर यांचे आहे.
           त्यांच्या कार्याची दखल घेत दि.२आक्टोबर २०२३ रोजी ग्लोबल स्कालर्स फाऊंडेशन, पुणे तर्फे "राष्ट्रपिता राष्ट्रीय सन्मान -२०२३"पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. त्यांनी समर्पित भावनेने लोकांसाठी पुढेही चालू ठेवलेल्या कार्याची दखल घेत *"राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार -२०२४" त्यांना प्रदान करण्यात आला. त्याच बरोबर त्यांनी शैक्षणिक आवड सोडली नाही वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांना थॅमस इंटरनॅशनल विद्यापीठ, पॅरिस (फ्रान्स) ने "डॉक्टरेट पदवी" (Ph.D) ७ जानेवारी २०२४ रोजी "यशदा सभागृह, यशवंतराव चव्हाण अकादमी ऑफ डेव्हलपमेंट ऑडमिस्ट्रेशन , पुणे" येथे प्रदान करुन गौरविण्यात आले आले असल्याने थानेश्वर पाटील कायरकर यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.त्यांनी या यशाचे श्रेय "बेलगावे एज्युकेशन प्रा.लि.पुणे"  व ज्यांनी सहकार्य केले त्या सर्व सहकारी मित्रपरिवार, कार्यकर्त्ये व आप्तेष्ट नातेवाईक यांना दिले आहे.

Caption

 


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 8, 2024

PostImage

9 जानेवारी रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत महिला सशक्तीकरण अभियान


रुमदेव सहारे सहसंपादक

गडचिरोली,(जिमाका)दि.08 : 9 जानेवारी 2024 रोजी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची सुरुवात गडचिरोली येथे होत आहे. या अभियानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती राहणार आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 11.00 वा. एमआयडीसी मैदान, कोटगल रोड, गडचिरोली येथे होत आहे.

    यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम,  उद्योग मंत्री उदय सामंत, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.
यावेळी विविध विकास कामांचे भुमिपुजन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
*या विकासकामांचे होणार लोकार्पण व भूमीपूजन*
100 मोबाईल टॉवर, प्राथमिक आरोग्य पथक (ग्यारापत्ती)
मानव विकास मिशन अंतर्गत 08 एकल गोडाऊन (आंबेझरी, कांदाळी, राजगोपालपूर, डार्ली, नरोटीचक, धोडराज, होड्री व गोंगवाडा), एकल सेंटर (मौजा- मेंढा ता. धानोरा, एकल सेंटर मो. कुरुड ता. देसाईगंज), आदिवासी विभागाचे शाळा व वसतिगृह, तलाव सौदर्यींकरण, नगर परिषद प्रशासकीय इमारत
चामोर्शी तालुका क्रिडांगण, धानोरा तालुका क्रिडांगण, चामोर्शी नगर पंचायत प्रशासकीय भवन, 
वघाडा-सायगाव-शिवणी-डोंगरगाव मोठया पुलाचे बांधकाम करणे (ता. आरमोरी), चोप-तमाशीटोला ते वडसा मोठया पुलाचे बांधकाम करणे. (ता. वडसा) सानगडी-गोठणगाव-कुरखेडा-मालेवाडा-रामा-मोठया पुलाचे बांधकाम करणे (ता. धानोरा), सानगडी- गोठणगाव-कुरखेडा-मालेवाडा-रामा-ची सुधारणा करणे (ता. कुरखेडा),
मौशीखांब-वडधा-शंकरपूर-कोरेगाव रस्ता ची रुंदीकरणासह सुधारणा करणे. (ता. वडसा),  मोशीखांब-वडधा-शंकरपूर-कोरेगाव रस्ता सुधारणा करणे (ता. वडस, वडसा-नैनपुर-कोकडी रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे (ता. वडसा), कुरखेडा-वैरागड रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. (ता. आरमोरी)  मौशीखांब-
वैरागड-पळसगाव रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (ता. आरमोरी),  मौशीखांब-
वैरागड-पळसगाव रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (ता. आरमोरी),  वडधा- सायगाव-शिवणी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (ता. आरमोर, NH-353 C शिवराजपुर- उसेगाव- मोहटोला किन्हाळा रस्ता दजोन्नोती करणे (ता. वडसा), MRL-01- आमगाव-गांधीनगर रस्ता दजोन्नोती करणे (ता. वडसा), दवंडी-रांगी रस्ता दजोन्नोती करणे (ता. आरमोरी), कुलकुली- अंगारा रस्ता दजोन्नोती करणे (ता. आरमोरी), भांसी-माजिटोला रस्ता दजोन्नती करणे (ता. आरमोरी),डोंगरमेन्ढा रस्ता दजोन्नती करणे (ता. आरमोरी), मार्कण्डा देव पुननिर्माण कार्य,
मार्कण्डा देवस्थान नुतनीकरण कार्य (राज्य शासन), चपराळा देवस्थान (ता. चामोर्शी) पर्यटन विकास (अरतोंडी) पर्यटन विकास (कलापूर) पर्यटन स्थळ विकास (ता. अहेरी)  रामदेगी (ता. चिमूर) पर्यटन स्थळ विकास, (सोमनूर) पर्यटन स्थळ ता. (सिरोंचा), कचार गड तिर्थ क्षेत्र विकास (ता. सालेकसा जि. गोंदिया)
गडचिरोली तलाव सौदर्यीकरण, नगरपरिषद प्रशासकीय इमारत.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 8, 2024

PostImage

नाथसमाजाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यात आलेला क्षण..!वैदर्भीय नाथ समाज संघाच्या वतीने अभुतपुर्व सत्कार सोहळा


संजय कडोळे जिल्हा विशेष प्रती मो. नं.+91 90756 35338

अमरावती/वाशिम -वैदर्भिय नाथ समाज संघाच्या वतीने रविवार दिनांक 07/01/24 रोजी अमरावती येथे नाथ समाजाचा अतिशय जिव्हाळ्याचा आणि आवश्यक असलेला प्रश्न म्हणजे नाथ समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ आणि त्या महामंडळाच्या प्रश्नाला मंत्रालयीन स्तरावर मार्गी लावण्याचे काम माननीय श्रीकांतदादा देशपांडे (माजी राज्यमंत्री) यांनी केल्याबद्दल संपूर्ण टीमच्या वतीने आज अमरावती येथील त्यांच्या कार्यालयामध्ये भव्य असा सत्कार  सत्कार करण्यात आला.अमरावती कारागृहात नुकत्याच जेलर म्हणून लाभलेल्या विशेष म्हणजे नाथपंथी समाजाच्या मीराताई बाबर यांची सदिच्छा भेट घेऊन,नाथ समाजाचे भूषण म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला.अमरावतीचे माजी पालकमंत्री विद्यमानविपस आमदार श्री प्रविण पोटे पाटील यांची त्यांच्या कार्यालयात आमच्या शिष्टमंडळाने भेट घेतली असता अमरावती येथे लवकरच नाथसमाज सभागृहाची उभारणी करण्याचा शब्द त्यांनी दिल्याबद्दल त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला..
यावेळी वैदर्भीय नाथ समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथजी पवार,विदर्भ समिती अध्यक्ष श्री दिवाकरनाथजी गौरकर,अकोला जिल्हा समिती अध्यक्ष नागेश नाथजी जाधव ,विनोद नाथजी चव्हाण ,अंकुश नाथ जाधव, संतोषनाथजी चिलवंत,नितीन अखतकर ,गजाननजी इंगळे साहेब,भर्तरीनाथ  गौरकर,सुधाकरनाथ गौरकर ,सत्यजित वाडेकर , भुषण वाणे,प्रणव गौरकर तसेच इतर बरेच नाथबांधव उपस्थित होते...


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 8, 2024

PostImage

स्पर्धा परीक्षार्थी, विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शहरात अत्याधुनिक अभ्यासिका उभारणार – पालकमंत्री संजय राठोड


दारव्हा शहरात सुसज्ज अभ्यासिका केंद्राचे लोकार्पण
  
यवतमाळ, दि. 8 : शहरी व ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यातील प्रत्येक शहराच्या ठिकाणी अत्याधुनिक अभ्यासिका उभारणार असल्याची माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी  दिली.

दारव्हा शहरातील स्वामी समर्थ नगर, नातुवाडी येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या स्व बाळासाहेब ठाकरे अभ्यासिका केंद्र व ग्रंथालयाचे लोकार्पण शनिवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश मितकर, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, श्रीधर मोहोड, कालिंदा पवार, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक रवी वाकोडे, दीपक कोठारी, मनोज सिंगी, राजू दुधे, आरिफ काझी, दामोदर लढ्ढा, गटविकास अधिकारी राजीव शिंदे, सुभाष राठोड, सुशांत इंगोले यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि नागरिक उपस्थित होते.

 

पालकमंत्री श्री. राठोड पुढे म्हणाले, समाजामधील शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्व घटकांसाठी वेगवेगळ्या योजना कार्यान्वित झाल्या पाहिजेत, ही सातत्याने भूमिका राहते. लोकप्रतिनिधी म्हणून फक्त रस्ते, नाल्या, सभामंडप अशा मूलभूत सुविधांसारखे सार्वजनिक विकासकामे नेहमी करत असतो. समाजाच्या विकासासाठी नव्या संकल्पना राबविण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. या संकल्पनेतूनच दारव्हा शहरात नवे अभ्यासिका केंद्र उभे राहिले आहे. त्यात सर्व सोयीसुविधा व स्वच्छता आहे. परंतु त्या कायम राहिल्या पाहिजेत. तसेच संगणक आणि स्पर्धा परीक्षा पुस्तकांची संख्या वाढवावी लागेल.  विद्यार्थ्यांना ही अभ्यासिका उपलब्ध झाली असून अजून एक अभ्यासिका करणार आहोत. त्याच्या बांधकाम आणि इतर सुविधांसाठी 15 कोटी रुपये मंजूर केले आहेत. अशा अभ्यासिका जिल्ह्यातील प्रत्येक शहराच्या ठिकाणी झाल्या पाहिजेत या भूमिकेतून खनिज विकास निधीतून प्रत्येक शहराला 15 कोटी रुपये मंजूर केले आहेत, अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली.

पैसे, साधन आणि सर्व सुविधा असलेले विद्यार्थी पुणे, नागपूर सारख्या शहरात स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी जाऊ शकतात. परंतू समाजातील अनेक कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थी त्यापासून वंचित राहतात. त्यासाठी गाव तिथे अभ्यासिका झाली पाहिजे या भूमिकेतून अभ्यासिकेसाठी गावातील शाळा, ग्रामपंचायतीत स्पर्धा परीक्षेची पुस्तके, फर्निचर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निधीची भरीव तरतूद केलेली आहे. याचा पहिला टप्पा मंजूर केला असून जिल्हाभरात कामाला सुरुवात झाली आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या शाळांमध्ये सर्व शैक्षणिक सुविधा मिळाल्या पाहिजे या भूमिकेतून मॉडेल स्कुलची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून जिल्ह्यासाठी भरीव निधी मंजूर करून घेतला आहे. लवकरच प्रायोगिक तत्वावर काम सुरू होणार आहे. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णय, योजनांची माहिती देत त्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना केले.

जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार देणारे प्रकल्प, महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या योजना, साखर कारखाना आणि व्ही तारा कंपनीच्या उद्योग प्रकल्पाची माहितीही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.

दारव्हा शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी 150 कोटींचा डीपीआर

दारव्हा शहराचा खऱ्या अर्थाने चेहरामोहरा बदलण्याचे काम चालू आहे. त्यासाठी नगर परिषदेच्या मार्फत दीडशे कोटींचा विकास आराखडा (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. दारव्हा शहरवासीयांना  पाणीपुरवठा करण्यासाठी योजनेवर काम सुरू आहे. महिन्याभरात पाणी पोहोचवण्याचे नियोजन केले असल्याचे सांगून दारव्ह्यात सुरू असलेल्या विकास कामांची माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी दिली.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश मितकर, उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्य कार्यक्रमापूर्वी रवी वाकोडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते दहावी व बारावीतील ३०८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले व पदवी, पदविका अभ्यासक्रमातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच गुंठेवारी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले

 


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 8, 2024

PostImage

चंद्रपूर प्रकल्पातील खेळाडूंची राज्यस्तरावर उंच भरारी


चंद्रपूर, दि. 8 : आदिवासी विकास विभाग, नाशिक अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा 7 ते 9 जानेवारी 2024 ला गरुडझेप अकॅडमी, नाशिक येथे संपन्न होत आहे. या स्पर्धेसाठी नागपूर विभाग अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर येथील देवाडा, बोर्डा, तोहोगाव, सुब्बई, जानाळा, देलनवाडी, डोंगरगाव, सरडपार, राजुरा, भारी, दुर्गापूर या शाळेचे 9 मुली व 18 मुले असे एकूण 27  खेळाडूंनी कब्बड्डी, खो- खो,व्हॅलीबाल, हॅन्डबाल, वैयक्तिक खेळ प्रकारात राज्यस्तरावर उंच भरारी घेतली असून सर्व खेळाडू नाशिकला रवाना झाले आहेत.

दरवर्षी शालेय व आदिवासी विभागाच्या क्रीडा स्पर्धेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील विद्यार्थी सहभाग घेतात. विभाग व राज्य स्तरावर आपल्या प्रकल्पाचे नाव उंच करतात. खेळ, सांस्कृतिक, व शैक्षणिक क्षेत्रात चंद्रपूर प्रकल्प अग्रेसर आहे, या स्पर्धेसाठी क्रीडा व्यवस्थापक, क्रीडा नियोजनसाठी सुरेश श्रीरामे, उमेश कडू,  किशोर चिंचोलकर, सुनिता हतिमारे, श्रीहरी आत्राम, वर्षा मडावी  हे सर्व कर्मचारी नाशिक येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी रवाना झाले आहे.

वरील स्पर्धेसाठी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मुरुगानंथम एम., श्री. टिंगूसले, श्री. बोंगीरवार, श्री. धोटकर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. पोड, श्री. कुळसंगे, श्री. चव्हाण, श्रीमती कुतरमारे तसेच प्रकल्प कार्यालयाचे सर्व कर्मचारी व शासकीय, तथा अनुदानित शाळेचे मुख्याध्यापक व सर्व कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे कौतुक केले आहे.

०००००००


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 8, 2024

PostImage

आता तुम्हाला मिळणार 15100 टोल-फ्री क्रमांकावरुन मोफत कायदेविषयक सल्ला


चंद्रपूर दि. 08: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली मार्फत राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त 15100 हा टोल-फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. या क्रमांकावर फोन करून कायदेविषयक सल्ला हवा असल्यास तज्ञ वकिलांमार्फत दिला जातो. सदर टोल-फ्री क्रमांकाचा लाभ भारताचा कोणताही नागरीक सहजपणे घेऊ शकतो.

जिल्ह्यातील नागरीकास कायदेविषयक सल्ला हवा असल्यास त्याने टोल-फ्री क्रमांकावर फोन करावा. त्यानंतर राहत असलेले राज्य, जिल्हा व तालुक्याची निवड करावी. तसेच संबंधित जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय येथील पॅनलवर कार्यरत असलेल्या वकिलांशी फोनवरून संपर्क करता येऊ शकतो. याकरीता महिला किंवा पुरुष वकील असा विकल्प सुद्धा उपलब्ध आहे.

सदर सेवा कार्यालयीन वेळेत सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. ज्या व्यक्तींना प्रत्यक्ष कार्यालयात येणे शक्य नाही किंवा केवळ सल्ला स्वरूप कायदेविषयक माहिती हवी आहे, अशांनी सदर सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी केले आहे.

00000


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 8, 2024

PostImage

पतंग उडवण्याची हौस  जीवावर बेतली.!  9 वर्षांच्या चिमुकल्याचा गेला जीव.!


बीड:-

लहान मुलांच्या डोळ्यात तेल घालून लक्ष द्या, थोडंसं दुर्लक्ष चिमुकल्यांच्या जीवावर बेतू शकत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मकर संक्रांत जवळ आली आहे, त्यानिमित्ताने आता बाजारपेठेत पतंग मिळत आहेत.
लहान मुलांना पतंग उडवण्याची हौस भारी असते. मात्र याच पतंगाच्या मागे जाताना चिमुकल्यासोबत दुर्घटना घडली आहे.

मोठ्या उत्साहाने चिमुकल्याने पतंग उडवला मात्र तो गॅलरीत जाऊन अडकला. आता अडकलेला पतंग काढण्यासाठी चिमुकल्याची कसरत सुरू झाली. त्याच दरम्यान गॅलरीतून पतंग काढत असताना त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. या दुर्घटनेत 9 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.

ही धक्कादायक घटना बीड शहरातील शहरातील पांगरी रोड परिसरात घडली. कृष्णा दिलीप तकीक यांचा मुलगा संध्याकाळच्या वेळी आपल्या घराच्या गच्चीवर पतंग उडवत होता. त्याचा पतंग आडकल्याने तो काढण्याचा प्रयत्न करत होता. पतंग काढत असताना तोल जावून तो गॅलरीतून खाली पडला.

यामध्ये त्याला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान चिमुकल्याच्या मृतदेहावर रात्री उमरद जहॉगिर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने उमरद जहॉगिर व खापर पांगरी येथे हळहळ व्यक्त केली जात आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात मृत्यू नोंद करण्यात आले आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 8, 2024

PostImage

गुरुनाम की नैया....! लेखक पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर


           गुरुदेवच भक्ताला भवदुःखातून पार करतो. गुरुशिवाय कोणीही भवसागर पार करु शकत नाही. गुरुदेवाच्या चरण कमलाची रज, धुलीकण आपल्या मनरुपी आरसा पवित्र करतो. आपले मन गढूळ झालेले शुद्ध होते. गुरुदेवच काम, अर्थ, धर्म आणि मोक्ष देतात. आपल्या मनातील वासनाचे बीज मुळापासून मिटविण्याची शक्ती गुरुदेवाच्या चरणरज मध्ये आहे.

गुरुनाम की नैया हमें, भव दुःख से तरवायगी ।
गुरुकी चरणरज ही हमें, मन भौर से हरवायगी ।।
गुरु-प्रेम की बरखा हमें, सत् ज्ञानको बतलायगी ।
गुरुकी कृपा हमको हमारे, सुखमें मिलवायगी ।।

             गुरुदेव ईश्वरापेक्षा कमी नसतात तर ईश्वराची ओळख गुरुदेवच करतात. जो अज्ञानाचा अंधार दूर करुन ज्ञानाचा प्रकाश देतात. सगुण ब्रम्ह म्हणजेच गुरु. गुरुचे ज्ञान म्हणजे ब्रम्हज्ञान. तो चैतन्य रूप आहे. श्री गुरुहून श्रेष्ठ असे काहीच नाही.

गुरु तो आदि अंतीचा, गुरु अधिकार शांतीचा ।
गुरु तो निवृत्त भ्रांतीचा, प्रगटला देह ताराया ।।

          खरा गुरु आपल्या शिष्याला ज्ञान देतो. गुरु शिष्याची पात्रता पाहूनच ज्ञान देतात. पैसा, गाडी, बंगला म्हणजे गुरुकृपा नव्हे. आयुष्यात येणारे संकटे आपल्या नकळत टळून जातात ते टळलेले संकट म्हणजे गुरुकृपा. गुरु म्हणजे एक अशी कृपाच असते जी केवळ काही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते. 

              गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे परंतु घटाने, घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरुजवळ शिष्याने नम्र झाल्या विना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही. हे सर्वांनी लक्षात ठेवावे. "गुरु बिन ज्ञान कहाॕसे लावू?" हेच खरे आहे.

           गुरु जवळून माहिती घेऊन आपल्यात असणारा परमात्मा प्राप्त करावा लागतो. मात्र एक फार मोठे गुढ आहे की, गुरुचा व्यवसाय करणाऱ्या गुरुचा जगभर सुकाळ असला तरी किल्लीवाला गुरु ओळखणे कठीण जाते. जो सर्व जिवमात्राला ब्रम्ह समजून वागतो, आपल्या आणि दुसऱ्या जीवात भेद समजून वागत नाही. हा उत्तम गुरु समजावा. हा श्रीमंत तो गरीब तुम्ही अलिकडे या व तुम्ही पलिकडे जा, असा भेदभाव समजून वागणाऱ्या जवळ किल्लीच नाही. तो गुरुच नव्हे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात.

तनमें करो कोई खोजजी, आनंद कंद है ।
गुरुके कृपाबिन ना खुले, ताल बंद है ।।

            हा मायारुपी भवसागर तरुन जायचे असेल तर सद्गुरुची आवश्यकता आहे. सद्गुरुच मोक्षपदाला नेतात. एकदा गुरुदेवांनी आपला हात हातात घेतला की ते आपल्याला सोडत नाहीत. सद्गुरुला शोधण्यासाठी आपणास जावे लागते असे नाही तर शिष्याची आध्यात्मिक प्रगती झाली की, ते स्वतःहून त्याला शोधत येतात. सद्गुरुची प्राप्ती झाल्यानंतर गुरुसेवा करणे हे शिष्याचे परम् कर्तव्य आहे. गुरुसेवा म्हणजे त्यांची आज्ञा पाळणे.

भगवान मेरी नैया उसपार लगा देना ।
अबतक निभाया है, आगे भी निभा देना ।।

             संत महात्म्याच्या, गुरुदेवाच्या मतानुसार नाम वाया जात नाही. नामानेच जीवाला आपलं साध्य साधता येते. याच नामाने अजामिळ, गणीकेसारखे महान पापी उद्धरले. वाल्ह्या सारख्या महान पाप्याला ऋषी बनविले. शंकराची विषबाधा नष्ट झाली. गीता, उपनिषदे सुध्दा सांगतात की, गुरुदेवांनी दिलेल्या नामामुळे मनुष्याची जन्ममरणाची येरझार बंद होऊन मनुष्याच्या जन्ममरणाचा नाश होऊन ज्ञान प्राप्ती होते व अंती देवाची प्राप्ती करता येते. अखंड नामस्मरण हे त्या जीवाला जन्ममरणाच्या प्रवाहातून मुक्त करणारा अभ्यास आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात.

नामस्मरणे, अजि मुक्ती लाभतेही, सर्व  काही ।।

            वाळलेली गवताची गंजी कितीही मोठी असली तरी अग्नीच्या तडाख्यात जशी साफ होते तसेच नामस्मरणाचे धडाक्यात कितीही असलेले पाप खाक होते. यासंबंधीचा इतिहास असा-- उदाः वाल्ह्या कोळ्याने एक मनुष्य मारावा आणि एक खडा रांजणात टाकावा. याप्रमाणे सात रांजणे भरली. शेवटी त्याला नारदमुनी गुरु म्हणून लाभले. वाल्ह्याला रामराम मंत्राचा जप करायला सांगितले. त्या नामाचे जपाने तो पापमुक्त होऊन महान पुण्यवान झाला. त्या पुण्याचे बळावर तो रामाचा अवतार होण्यापूर्वी रामायणाचे भविष्य लिहू शकला. त्यामुळे महान ऋषी म्हणून प्रसिद्धीस आला. हे आपण सर्वांना माहितच आहे. नामस्मरणाने पापाचा नाश होतो आणि पाप नाहिसे झाले म्हणजे सर्व दुःख नष्ट होते. राष्ट्रसंत म्हणतात.

हरीच्या नामस्मरणाने, हरीचे तेज ये अंगी ।
मनाची दुष्टता नासे, मनही रंगे हरी रंगी ।।

            गुरु केल्याशिवाय आपली नाव मुळीच तरणार नाही. श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात की, गुरु करण्यापूर्वी शिष्य हा साधनचंतुष्ट संपन्न असावा लागतो, तरच त्याला गुरु करण्यातून उपयोग होतो. तेव्हा शिष्याला पदरात फलश्रृती प्राप्त होण्यासाठी गुरु करुन नाममंत्राचा जप करावा लागेल. प्रथम शिष्याला सत्य काय व असत्य काय हे त्याला कळायला पाहिजे. असत्याचा त्याग करून सत्याचा स्विकार करावा लागतो. दरिद्र आणि अविवाहित तरुणाकडे स्वर्गीची उर्वशी आश्रय मागण्यास आली असताना हे तुच्छ वाटायला पाहिजे. तसेच मन स्वाधीन असावे. इंद्रिये ताब्यात असावी. मनाला सैरभैर भटकू देऊ नये. सद्गुरु वचनावर पूर्ण श्रद्धा असावी. राष्ट्रसंत पुढे म्हणतात की,

पूजा गुरुची होतसे, वचनी त्यांचीया भावना ।
तसेच जगी वागणे, जरी प्राण जाई क्षणा ।।

             श्री गुरुदेवाचा नाममंत्र फार उपयोगी आहे. परमात्मा सर्व घटात परिपूर्ण भरला आहे. मात्र त्याला जाणण्याचा मार्ग गुरुकृपेने कळतो. एकूण गुरु जवळून माहिती घेऊन आपल्यात असणारा परमात्मा प्राप्त करावा लागतो.


पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्री गुरुदेव प्रचारक, यवतमाळ 
फोन- 9921791677


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 7, 2024

PostImage

आई वडिलांना शंका येवू नये म्हणून द्यायची झोपेच्या गोळ्या.! नंतर रात्री घरी बोलवायची बॉयफ्रेंडला .!३ महिण्यानंतर बिंग फुटले


तरुणी रोज रात्री प्रियकराला घरी बोलवायची. पण तिचे हे गुपित आई-वडिलांसमोर येऊ नये यासाठी तिने धक्कादायक पाऊल उचलले. गेल्या तीन महिन्यांपासून तिचा हा कारमाना सुरू होता. एक अज्ञात मुलगा रोज रात्री परिसरात फिरतो हे शेजाऱ्यांनी पाहिल्यावर त्यांनी मुलीच्या पालकांना सांगितले. त्यांनंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आले. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत कोणीतीही तक्रार दाखल केली नाही.

मुलगी गेल्या तीन महिन्यांपासून आई-वडिलांच्या जेवणात झोपेच्या गोळ्या टाकून त्यांना खाण्यासाठी देत होती. जेव्हा तिचे आई-वडिल गाढ झोपेत असत तेव्हा ती प्रियकराला घरी बोलवत होती आणि कुटुंबीयांना जाग येण्याच्या आधी त्याला तिथून जायला भाग पाडत होती. जेव्हा परिसरातील लोकांना संशय आला तेव्हा त्यांनी तिच्या वडिलांना याबाबत विचारले.
या बाबत पोलिसांना सूचना मिळताच युवकाच्या कुटंबीयांना देण्यात आली. तेव्हा युवक व युवती दोघांच्याही कुटुंबीयांमध्ये मोठा वाद रंगला. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही पक्षातील वाद समजावून शांत केला. दरम्यान, या प्रकरणात आत्तापर्यंत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाहीये, अशी माहिती पोलिसांनी दिली.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 7, 2024

PostImage

शेतीवर काम करण्यासाठी गेलेल्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात ठार


गडचिरोली:-

शेतात कापूस वेचणी करीत असताना वाघाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात महिलेचा (Gadchiroli) मृत्यू झाल्याची घटना गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ या गाव शिवारात घडली.

या घटनेमुळे (Tiger) परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये घाबरत पसरली आहे.
सुषमा देवीदास मंडल असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. हि घटना आज सकाळी ११ विजेच्या सुमारास घडली आहे. सुषमा मंडल या महिलेसह काही मजूर गावनजिक असलेल्या शेतात कापूस वेचणीच्या कामासाठी गेले होते. या दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला (Tiger Attack) करत महिलेच्या मानेला पकडून अंदाजे १०० मिटरपर्यंत फरफडत नेले. घटनास्थळी काही महिला सुषमासोबत कापूस वेचणी करीत होते. वाघाने हल्ला केल्याचे बघताच तिथून बाकीच्या महिलांनी पळ काढला.
गावकऱ्यांची धाव

शेतातील महिलांनी गावाकडे धाव घेत गावात घटनेबद्दल माहिती दिली. काही वेळानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली असता वाघाने महिलेला तिथेच ठार केले असल्याचे दिसून आले. यामुळे आता संपूर्ण परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 7, 2024

PostImage

एटीएम चोरणारे दोन कुख्यात आरोपी अटकेत, तीन फरार


संग्रामपूर : संग्रामपूर शहरातील अख्खे एटीएम लंपास करणाऱ्या टोळीच्या मुसक्या जालना पोलिसांनी आवळल्या आहेत. नाकाबंदी दरम्यान जालना जिल्ह्यातील मौजपुरी पोलिस ठाणे हद्दीत रामनगर साखर कारखाना परिसरामध्ये रविवारी सकाळी साडेआठ वाजेदरम्यान ही कारवाई करण्यात आली.
गुन्ह्यात सहभागी २ आरोपींना पकडण्यात आले. ३ आरोपी फरार झाले आहेत. संग्रामपूर शहरातील दाटवस्तीतून रात्री ३ वाजता दरोडेखोरांनी भारतीय स्टेट बँकेची एटीएम मशीन पळवून नेली होती. या घटनेची माहिती प्राप्त होताच पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी केली होती.

सकाळी साडेआठ वाजता जालना जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मौजपुरी पोलिसांना रामनगर साखर कारखाना परिसरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने काही व्यक्ती असल्याची माहिती प्राप्त झाली. कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना आरोपींजवळ संग्रामपूर येथून पळवून नेलेली एटीएम मशीन दिसून आली. मौजपुरी पोलिसांनी आरोपींकडून एटीएम मशीनसह इतर मुद्देमाल जप्त करून दोघांना बेड्या ठोकल्या. या एटीएम मशीनमध्ये १७ लाख ७८ हजारांची रोकड असल्याची माहिती आहे. रविवारी रात्री ३ वाजेच्या सुमारास दरोडेखोर एका चारचाकी वाहनाने आले. एटीएम मशीनला त्यांनी चारचाकी वाहनाला बांधून बाहेर ओढले. ती मशीन वाहनात टाकून त्यांनी पळ काढला.

आरोपींना अशा ठोकल्या बेड्या
जालना जिल्ह्यातील मौजपुरी पोलिसांना काही व्यक्ती दरोडा टाकण्यासाठी आल्याची माहिती मिळाली. पोलिस रामनगर कारखाना समोरील एका पडक्या घराजवळ खात्री करण्यासाठी गेले. त्याठिकाणी ५ व्यक्ती एक एटीएम मशीन कापताना दिसून आले. सोबतच एक विनाक्रमांकाचे चारचाकी वाहन दिसले. पोलिसांनी तातडीने २ आरोपींना रंगेहाथ पकडले. ३ आरोपी फरार झाले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव दयासिंग गुलजारसिंग टाक (४५), नरसिंह अतरसिंग बावरी (६०), दोघेही रा. शिकलकरी मोहल्ला, मंगळ बाजार, ता.जि. जालना येथील आहेत. तर, पळून गेलेला आकाशसिंग नरसिंग बावरी व इतर दोन अनोळखी असून आरोपींविरुद्ध मौजपुरी पोलिस ठाण्यात कलम ३९९, ३०२ सह आर्म ॲक्ट कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. 

सिसिटीव्ही कॅमेय्रावर मारला रंगाचा फवारा 
चोरट्यांनी एटीएम चोरण्यापूर्वी सिसिटीव्ही कॅमेय्रावर रंगाचा फवारा मारला. 

दरोडा टाकण्याच्या उद्देशाने काही जण आल्याची माहिती होती. घटनास्थळी धाव घेतली असता आरोपींकडे एटीएम मशीन दिसून आले. दोघांना ताब्यात घेण्यात आले. तीन आरोपी फरार आहेत.
- आर.पी. नेटके,
पोलिस उपनिरीक्षक,
मौजपुरी, पोलिस स्टेशन जालना.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 7, 2024

PostImage

बाळशास्त्री जांभेकर यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून पत्रकारिता करावी:-भाग्यवानजी खोब्रागडे यांचे प्रतिपादन .! तालुका पत्रकार संघ आरमोरीतर्फे पत्रकार दिन साजरा 


रुमदेव सहारे सहसंपादक

आरमोरी:-      

          मराठी  पत्रकारितेतील जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सर्वप्रथम दर्पण हे वृत्तपत्र काढून वृत्तपत्र सृष्टीचे जनक म्हणून नाव मिळविले  त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पत्रकारांनी आजही पत्रकारितेच्या क्षेत्रात चांगले कार्य करावे आणि पत्रकारांविषयीची आस्था आहे ती समाजाला दिशादर्शक ठरावी असे प्रतिपादन श्री किसनराव खोब्रागडे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री भाग्यवानजी खोब्रागडे यांनी केले                                         दिनांक 6 जानेवारी रोजी आरमोरी येथे वनविभागाच्या विश्रामगृहात तालुका पत्रकार संघातर्फे आयोजित पत्रकार दिनाच्या सोहळ्याला अध्यक्ष स्थानावरून बोलत होते सहा जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचा सोहळा पत्रकार दिन म्हणून सर्व महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात साजरा केला जातो. समाजातील अन्याय अत्याचार घडणाऱ्या घडामोडी ह्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे खरे कार्य हे पत्रकार करीत असतात त्यांना खूपच  अडचणी येत असतात त्या अडचणींना सामोरे जाऊन आपली लेखणी धारदार ठेवून लिखाण करीत असतात त्यामुळे वंचित व सर्वसामान्य नागरिकांना त्या माध्यमातून न्याय मिळतो त्यामुळेच आजही  पत्रकारितेचे अस्तित्व या देशात टिकून आहे असेही भाग्यवानजी खोब्रागडे यांनी मार्गदर्शन करताना म्हटले
           या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आरमोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संदीप मंडलिक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आमिष जी निमजे  आणि आरमोरी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री अनिल सोमनकर यांनी सुद्धा मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक दौलत धोटे, संचालन प्रशांत झिमटे तर आभार आकाश चिलबुले  यांनी मानले.
            या पत्रकार दिनाचे औचित्य साधून बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर प्रमुख अतिथींनी प्रकाश टाकला. या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाला आरमोरी तालुका पत्रकार संघाचे सदस्य श्री. हरेंद्रजी मडावी, रूपेश गजपुरे, अमरदीप मेश्राम, महेंद्र रामटेके, सुनील नंदनवार, विलासजी गोंधळे, प्रवीण रहाटे,  रूमदेव सहारे आदी पत्रकार मंडळी उपस्थित होते


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 7, 2024

PostImage

बाबासाहेबांच्या सविधानाने आमच्यात जगण्याचे सामर्थ्य निर्माण केले :-प्राचार्य मदन मेश्राम.!आरमोरीत क्रांती निळ्या पाखराची प्रबोधन कार्यक्रम


रुमदेव सहारे सहसंपादक आरमोरी..

       डॉ बाबासाहेब आंबेडकर हे संघर्षातून आणि खडतर परिस्थितीतून निर्माण झालेले  महामानव आहेत. जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्थेने नाकारलेल्या शोषित ,वंचितांना त्याचे हक्क व अधिकार मिळावे व सन्मानाने जगता यावे  याकरिता मानवी हक्कांसाठी बाबासाहेबाचा लढा होता.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आमच्यात जगण्याचे सामर्थ्य निर्माण केले. फुले दाम्पत्यानी सामाजिक चौकटीत बंधिस्त असलेल्या महिलाना वाचा फोडून शिक्षण घेण्याची संधी दिली म्हणुनच तर महीला सर्वच क्षेत्रात हिमतीने व स्वकर्तुत्वाने पुढे जात आहेत. आपल्या महापुरुषांनी   केलेल्या संघर्ष व त्यागामुळे आम्ही सन्मानाने जगतो आहे. असे प्रतिपादन प्रेरणा शिक्षण संस्थेचे सचिव मदन मेश्राम यांनी केले.

आरमोरी येथे भीमा कोरेगाव शौर्य दिन अभिवादन, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व  राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने समता युवा सामाजिक संघटनेच्या वतीने गुरुवारी आरमोरी येथे *क्रांती निळ्या पाखराची, या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 

कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. राजकुमार शेंडे यांनी केले. सह उद्घाटक म्हणून शिक्षणमहर्षी भाग्यवान खोब्रागडे हे होते . अध्यक्षस्थानी.प्रेरणा शिक्षण संस्थेचे सचिव मदन मेश्राम हे होते.तर प्रमूख अतिथी म्हणून तहसिलदार श्रीहरी माने, पोलिस निरिक्षक संदिप मंडलिक, वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, माजी जिल्हा परिषद सभापती वेणूताई ढवगाये, सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार ठवरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मनिषा दोनाडकर प्रा. शशिकांत गेडाम, डॉ. आंबेडकर स्मारक मंडळाचे अध्यक्ष यशवंत जांभूळकर, प्राचार्य साईनाथ अद्दलवार प्राचार्य जयदास  फुलझले,सिद्धार्थ साखरे, किशोर सहारे, खिरेंद्र बांबोळे, सत्यवान वघाडे, मोरेश्वर टेंभूर्णे, राजुभाऊ कुंभारे,किशोर सहारे, गोलू वाघरे, आदी उपस्थित होते.

प्राचार्य राजकुमार शेंडे म्हणाले की  भीमा कोरेगांव लढाई ही खऱ्या अर्थाने आत्मसन्मानाची लढाई होती.अन्याय अत्याचार व जातीव्यवस्था विरोधात होती. म्हणुनच भीमा कोरेगावचा रक्तरंजित इतिहास हा सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला. पुण्यात प्लेगची साथ असताना स्वतःच्या जिवाची पर्वा न करता एका मुलाला कडेवर घेऊन धावत धावत रुग्णालयात घेऊन जाणारी सावित्रीबाईं फुले  ही खऱ्या अर्थाने क्रांतीज्योती होती असेही ते म्हणाले.

यावेळी शिक्षणमहर्षी भाग्यवान खोब्रागडे, वेणूताई ढवगाये, मनिषा दोनाडकर, यशवंत जांभूळकर यांनीही यांनीही उपस्थिताना उचित मार्गदर्शन केले.

यावेळी क्रांति निळ्या पाखराची या संगीतमय प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता युवा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष निलेश अंबादे यानी केले.संचालन प्राचार्य अमरदिप मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन संघटनेचे उपाध्यक्ष्य प्रविण रहाटे यानी केले.कार्यक्रमाच्या यशवितेसाठी समता युवा सामाजिक संघटनेचे मार्गदर्शक , ॲड.अमितजी  टेंभुर्ण,महेंद्रजी रामटेके समता युवा सामाजिक संघटनेचे सचिव अनुप रामटेके,सहसचिव मंगेश पाटील सदस्य सौरभ मस्के,रुपेश जौंजालकर,निखिल दुमाणे, प्रिन्स मेश्राम, देवा बोरकर,आदित्य चीलबुले,भूषण काळबांधे,संघर्ष रामटेके,हर्षल खोब्रागडे, आदींचे विशेष सहकार्य लाभले.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 7, 2024

PostImage

गुटख्यापुडी दिला नाही म्हणून तरुणाने मित्रालाच भोसकलं.! कुठली घटना आहे वाचा सविस्तर वृत्तांत


जालन्यात हत्यांचं सत्र सुरुच असल्याने नागरिकांमध्ये आता दहशत निर्माण झाली आहे. गुटख्याच्या पुडीवरून झालेल्या बाचाबाचीत मित्रानेच मित्राचा चाकून भोसकून खून केला.

शहरापासून जवळच असलेल्या पीर पिंपळगाव शिवारात ही घटना घडली. दिलिप हरिभाऊ कोल्हे (वय 23 वर्ष) असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर अरविंद लक्ष्मण शेळके असं आरोपीचं नाव आहे.

गुटख्याची पुडीवरुन खून
गुटख्याची पुडी मागण्यावरून दोघांमध्ये शाब्दिक बचावाची झाली होती. त्यानंर बाचाबाचीचे रूपांतर चक्क हाणामारीमध्ये झाले. या हाणामारीत दिलीप हरिभाऊ कोल्हे याच्या छातीत अरविंद लक्ष्मण शेळके यांने चाकू भोसकला. त्यानंतर तो साथीदारांसह फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी चंदनझीरा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन या मयत तरुणाला जिल्हा सामान्य रुग्णालयात शविछेदन करण्याकरिता दाखल केलं. घटनेतील आरोपींचा शोध घेण्यासाठी चंदनझीरा पोलीस ठाण्याचे दोन पथके तैनात करण्यात आली आहेत.

काही दिवसांपूर्वीच भरदिवसा गोळीबार


काही दिवसांपूर्वीच जालना शहरातील मंठा चौफुली भागात गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली होती. या गोळीबाराच्या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला होता. गोळीबारात मृत्यू झालेला व्यक्ती अनेक गुन्ह्यात आरोपी असल्याचे देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. गजानन तौर असे गोळीबारात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तीन आरोपींकडून गजानन तौर नावाच्या व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या गजानन याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच गोळीबार करणाऱ्या आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेने मात्र जालना जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 7, 2024

PostImage

पाण्याच्या टाकीवरून पडून तरूण मजुराचा मृत्यू


अहमदनगर:-

कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर ग्रामपंचायतीच्या अमरधामशेजारील नवीन बांधकाम सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीवरून काम करत असताना तोल जाऊन खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाला.शनिवारी (दि.६) दुपारी १२ वाजता ही घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईश्वरचंद भवरलाल मेघवान (वय ३३, रा. चकमिटाई, सीकर, राजस्थान) असे मयत इसमाचे नाव आहे.

कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर शिवारात अमरधामशेजारी गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरु आहे.

शनिवारी (दि. ६) सकाळी जेवण करून ईश्वर मेघवान व विकास नायक या दोघींनीही कामाची सुरुवात केली. दोघे पाण्याच्या टाकीवर चढले होते. ग्राईंडरने काम चालू होते, तेव्हा ग्राईंडरची वायर वारंवार निघत होती.

यावेळी विकास नायक याने ईश्वरचंदला पाण्याच्या टाकीवरून खाली पाठविले व वायरवर लक्ष देण्यास सांगितले.

पाण्याच्या टाकीच्या एका बाजूचे काम पूर्ण झाल्यानंतर ईश्वर यास वर बोलावले. पाण्याच्या टाकीच्या एका बाजूचे बांधकाम साहित्य सरकवत असताना तोल जाऊन जवळपास ५० फुटांवरून खाली पडल्याने ईश्वरचंदचा जागीच मृत्यू झाला.

त्याच्या आधार कार्डवरील माहितीनुसार तो ३३ वर्षांचा असून त्यावर त्याचे नाव ईश्वरचंद भवरलाल मेघवान असल्याचे कळते. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आला आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 6, 2024

PostImage

इच्छाशक्ती व कठोर परिश्रम हे यशाचे गमक : -पद्यश्री डॉ परशुराम खुणे


ब्रह्मपुरी/ता.प्र
 " कुठेही जा पण महाविद्यालय,शिक्षक आणि पालकांना विसरु नका.यश मिळवून मोठे झाले तर सर्वांनाच आनंद होतो पण अपयश आलं तरी खचू नका.पुन्हा नेटाने पुढे रहा, कारण इच्छाशक्ती व कठोर परिश्रम हे यशाचे गमक आहे " असे मार्मिक विचार प्रसिद्ध नाट्यकर्मी व पद्मश्री डॉ परशुराम खुणेंनी मांडले.ते नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात वार्षिकोत्सवात व सत्रभर चाललेल्या स्पर्धांचे पारितोषिक वितरण समारंभांत पारितोषिक वितरक म्हणून बोलत होते.
      विचारपीठावर अध्यक्षस्थानी नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अँड प्रकाशजी भैया होते.प्रमुख अतिथीमध्ये संस्थेचे सदस्य प्रा सुभाष बजाज, प्राचार्य डॉ डी एच गहाणे, उपप्राचार्य डॉ सुभाष शेकोकर, प्राचार्य डॉ माधव वरभे,प्रा विनोद नरड, प्रभारी डॉ तात्याजी गेडाम, डॉ हर्षा कानफाडे, विद्यार्थी संघाचे अध्यक्ष कृणाल नैताम,सुषमा ठुसे, सचिव स्वाती धनविजय,समीक्षा पंडीत उपस्थित होते.
      अध्यक्षीय भाषणात अँड प्रकाशजी भैया म्हणाले की,कोणतीही स्पर्धा ही जिंकण्यासाठी असते पण तुम्ही हरलात तर पुन्हा प्रयत्न करुन यश संपादन करा!असे आव्हान त्यांनी केले.यावेळी सत्रभर चाललेल्या व वार्षिकोत्सवात झालेल्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
    या समारंभाचे प्रस्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ डी एच गहाणेंनी करुन दिला.संचालन डॉ वर्षा चंदनशिवे तर आभार प्रभारी डॉ तात्याजी गेडामांनी केले.
यशस्वीतेसाठी डॉ.राजेंद्र डांगे, डॉ रेखा मेश्राम, अधीक्षक संगीता ठाकरे,डॉ असलम शेख, डॉ धनराज खानोरकर, डॉ रतन मेश्राम, डॉ मोहन कापगते, डॉ किशोर नाकतोडे,डॉ योगेश ठावरी,डॉ भास्कर लेनगुरे,डॉ प्रकाश वट्टी, डॉ पद्माकर वानखडे, डॉ युवराज मेश्राम,डॉ मिलिंद पठाडे,डॉ कुलजित शर्मा,डॉ अरविंद मुंगोले,डॉ अतुल येरपुडे,प्रा.निलिमा रंगारी,प्रा रुपेश वाकोडीकर अशा वेगवेगळ्या समितीच्या अध्यक्षांनी व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.पुढे विद्यार्थ्यांचा आवडीचा ' फॅशन शो ' कार्यक्रम पार पडला.

Caption

 


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 6, 2024

PostImage

तर होऊ शकतो गौणखनीज वाहून नेणा-या वाहनांना50 हजार रुपयांपर्यंत दंड.!1 जानेवारी 2024 पासून वाढीव दंडाची तरतुद


चंद्रपूर दि. 6 : चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा, राख, विटा, वाळू, तसेच गौण खनीजाची वाहतूक करणारे वाहन ताडपत्रीने न झाकल्यास या वाहनांना 50 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणच्या बैठकीत घेण्यात आला. या वाढीव दंडाची तरतुद 1 जानेवारी 2024 पासून सुरू झाल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात वाहनांद्वारे होणारे रस्ते अपघात टाळण्यासाठी कोळसा, राख, विटा, वाळू, आदी गौणखनीज वाहतूक करणा-या वाहनांनी सदर माल ताडपत्रीने न झाकल्यास वाहनावर परवाना निलंबनाची विभागीय व दंडनीय कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या  बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे आदी उपस्थित होते.

कोळसा, राख, विटा, वाळू, तसेच गौण खनीजाची वाहतूक करणा-या वाहनास ताडपत्री कव्हरने न झाकून वाहतूक केल्यास पहिला गुन्हा 10 दिवस परवाना निलंबन किंवा 10 हजार रुपये दंड,  दुसरा गुन्हा 20 दिवस परवाना निलंबन किंवा 20 हजार रुपये दंड आणि तिसरा गुन्हा 50 दिवस परवाना निलंबन किंवा 50 हजार रुपये दंड आकारला जावू शकतो, याची सर्व वाहन मालकांनी नोंद घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.

०००००००


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 6, 2024

PostImage

अन्.. उंदराने केली हजारो रुपयांचे नुकसान..!


भंडारा : सकाळच्या सुमारास माजघरात देवापुढे लावलेली दिव्याची पेटती वात उंदीर घेऊन गेल्याने घराला लागलेल्या आगीत साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली. ही घटना शनिवारी, दि.६ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास लाखांदूर येथील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये घडली. या घटनेत बुधेश्वर रघुनाथ रासेकर (४५) यांच्या घरासह घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

बुधेश्वर रासेकर हे आपली आई, पत्नी व २ मुलांसह मागील कित्येक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. दरम्यान, घटनेच्या दिवशी सकाळच्या सुमारास बुधेश्वरने नेहमीप्रमाणे माजघरातील देव्हाऱ्यासमोर दिवा आणि अगरबत्ती लावून पूजा केली होती. काही वेळाने ते मजुरीच्या कामकाजासाठी घराबाहेर निघून गेला. बुधेश्वरची आई सुमित्रा घराबाहेर अंगणात कपडे धूत असताना घरातून धूर निघताना दिसला. तिने घरात जाऊन पाहिले असता घरातील जीवनावश्यक साहित्य जळत असल्याचे दिसून आले. त्यांनी आरडाओरड केल्याने गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेत त्यांच्या घरातील जीवनावश्यक साहित्य व नातवंडांची शालेय कागदपत्रे जळून खाक झाली. याप्रकरणी शासन, प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन नुकसानभरपाई मिळण्याची मागणी पीडित कुटुंबीयांनी केली आहे.

महसूल अधिकाऱ्यांनी केला घटनेचा पंचनामा :

घराला आग लागून घरातील साहित्य जळून खाक झाल्याची माहिती लाखांदूर महसूल विभागाला होताच लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांच्या मार्गदर्शनात तलाठी आशिष खामणकर व सहकारी खुशाल दिघोरे यांनी घटनास्थळी पोहोचत घटनेचा पंचनामा केला. या घटनेत पीडित इसमाचे जवळपास २५ हजार रुपये किमतीचे साहित्य जळून खाक झाल्याची माहिती देण्यात आली आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 6, 2024

PostImage

वडिलांनी मुलांना विष पाजलं, नंतर नवरा-बायकोने संपवलं जीवन


अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वारणवाडीत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका वडिलांनी मुलांना विषारी औषध पाजून पत्नीसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घोड्याचं समोर आलं आहे.

या घटनेत नऊ वर्षांची मुलगी बचावली असून सहा वर्षांचा मुलाचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गजानन रोकडे, पौर्णिमा रोकडे , दुर्वेश रोकडे यांचा मृतांमध्ये समावेश असून नऊ वर्षाची चैताली रोकडे ही बचावली आहे. चैताली रोकडे हिच्यावर अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गजानन रोकडेने पत्नी पौर्णिमा रोकडे हे जुन्नर तालुक्यातील रहिवासी असून पारनेर तालुक्यातील एका पतसंस्थेमध्ये नोकरी करत होते. या घटनेने वारणवाडीसह पारनेर तालुक्यात खळबळ उडाली असून या कुटुंबाने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस घटनेचा तपास करत आहेत. 


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 5, 2024

PostImage

वाहनचालकांना नैसर्गीक न्याय मिळवून देण्यासाठी हिट अ‍ॅन्ड रन कायद्यावर पुनर्विचार करा.!महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे महामहिम राज्यपालांना निवेदन


वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे मो.नं.90756 35338 )- समन्याय व न्याय अशी कायदेशीर चौकट प्रस्थापित करण्यासाठी व वाहन चालकांना नैसर्गिक न्याय मिळवून देण्यासाठी सदर कायद्याबाबत पुनर्विचार होणे गरजेचे असून महामहिम राज्यपालांनी या कायद्यात हस्तक्षेप करुन सर्व वाहन चालकांचे अधिकार आणि प्रतिष्ठेचे रक्षण करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे यांच्या नेतृत्वात आणि जिल्हाध्यक्ष राजु किडसे यांच्या उपस्थितीत ५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी वाहतूक सेना सरचिटणीस देविदास जैताडे, प्रमोद मेंढे, शंकर ठाकरे, महादेव बाटोडे आदी उपस्थित होते.
.  निवेदनात नमूद आहे केी, केंद्र सरकारने डिसेंबर २०२३ मध्ये देशातील वाहन चालकांच्या विरोधात नवीन कायदा मंजूर केला आहे. (कायदा क्रमांक : १७३/२०२३ भाग क्रमांकः ६ सूची क्रमांक : १०६/१/२
  सदर कायदा हा भारतातील प्रत्येक वाहन चालकाच्या विरोधात अतिजाचक असून सदर कायद्याबाबत देशातील सर्व वाहन-चालकांचे मनात असुरक्षित व भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी देशातील व राज्यातील सर्व वाहन चालक भीतीपोटी आपली वाहने रस्त्याच्या कडेला सोडून वाहन चालक या कामाचा त्याग करीत आहेत. ज्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची मालवाहतूक ठप्प झालेली आहे. देशातील काही राज्यांमध्ये तीव्र निदर्शने सुरू झालेली असून त्याचे तीव्र पडसाद आपल्या राज्यातही दिसू लागले आहेत.
  ही बाब आपल्या राज्यासाठी अतिशय चिंताजनक असून सदर कायद्यामध्ये वाहन चालकास केंद्रबिंदू ठरवून त्याची आर्थिक सामाजिक व मानसिक स्थिती लक्षात न घेता वाहन चालवत असताना होणार्‍या अपघातास व अभ्यासामध्ये झालेल्या मनुष्यहानीस त्यास कारणीभूत ठरवून त्याला दहा वर्षाची शिक्षा व सात लाख रुपयांचा दंडाची शिक्षा अशी तरतूद सदर कायद्यामध्ये केल्यामुळे वाहन चालकांच्या मनात असुरक्षिततेचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने आपणास विनम्र पूर्वक विनंती करतो की सदर कायद्याला मंजुरी मिळण्यापूर्वी सदर कायद्याचे गांभीर्य महामहीम राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून देण्याचा विचार करावा. ज्यामुळे समन्यायी व न्याय समन्याय व न्याय अशी कायदेशीर चौकट प्रस्थापित करण्यासाठी व वाहन चालकांना नैसर्गिक न्याय मिळवून देण्यासाठी सदर कायद्याबाबत पुनर्विचार होणे गरजेचे आहे. त्यामुळे याबाबत आपण लक्ष घालून सर्व वाहन चालकांचे अधिकार आणि प्रतिष्ठेचे रक्षण करावे अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. असे वृत्त त्यांचेकडून आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांना कळविण्यात आले आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 5, 2024

PostImage

५ लाखाची लाचखोर वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात


रुमदेव सहारे सहसंपादक

गडचिरोली :-

आलापल्ली वनविभाग  अंतर्गत येत असलेल्या पेरमिलीचे वनपरिक्षेत्र अधिकार्याला ५ लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. रस्त्याच्या कामावरील पकडलेले ट्रॅक्टर सोडण्यासाठी आणि दंड कमी करण्यासाठी त्याने १० लाख रुपयांची मागणी केली होती. प्रमोद आनंदराव जेनेकर असं लाचखोर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे नाव आहे. ही कारवाई गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (४ जानेवारी) रोजी रात्रीच्या सुमारास केली.तक्रारदार रस्त्याचे काम करतो. तुमरगुंडा ते कासमपल्लीपर्यंत रस्त्याचे काम सुरू होते. त्या कामावर सुरू असलेले काही ट्रॅक्टर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद जेनेकर यांनी पकडली होती. ती वाहने सोडण्यासाठी व आकारलेले ७२ लाखांचा दंड कमी करण्यासाठी त्यांनी तब्बल १० लाखांची मागणी केली होती. तडजोड अंती ५ लाख रुपये देण्याचे ठरले. मात्र, संबंधित तक्रारदाराला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या अनुषंगाने सापडा रचण्यात आला असता, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद जेनेकर यांनी ५ लाख रुपयांचा लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. विशेष म्हणजे लाचखोर प्रमोद आनंदराव जेकर यांच्या पेरमिली शासकीय निवासस्थानी झळती घेतले असता ८५ हजार रुपये रोख रक्कमही मिळाले.सदर कारवाई पेरमेली येथे करण्यात आली असून ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल माणकीकर अँटी करप्शन ब्युरो नागपूर, सचिन कदम अप्पर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक श्रीमती अनामिका मिर्झापुरे अँटी करप्शन ब्युरो गडचिरोली, पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, सुनील पेद्दीवार, किशोर जंजारकर, संदीप घोरमोडे, संदीप उडान, नरेश कस्तुरवार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली यांनी केले.

 


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 4, 2024

PostImage

या ...शहरात कॉफी शॉपमध्ये तरुण-तरुणी करीत होते अश्लील चाळे.! पोलीसांनी छापे मारले असता आढळले नको त्या अवस्थेत.!


जालना पोलिसांनी केलेल्या छापेमारीत मोठे सेक्स रॅकेट उघड झाले आहे. शहरात 3 कॉफी शॉपमध्ये नावाखाली गोरखधंदा सुरु होता. पोलिसांना कॉलेज तरुण-तरुणींना आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहाथ पकडले.

तरुण-तरुणींना अश्लील चाळे करण्यासाठी कॉफी शॉप मालकांकडून छोटे कंपार्टमेंट उपलब्ध करून दिले जात होते. या कारवाईमुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. 

जालना पोलिसांनी कुठे टाकले छापे?

- महिला व बाल रुग्णालयासमोर कदीम जालना हद्दीतील गांधीचमन परिसरातील हिडन फूड्स.
- महात्मा गांधी पुतळ्यासमोर बडीज् कॉफी कॅफे.
- सिंदखेडराजा रोडवरील दत्ताश्रमासमोर दी शेलेक्स कॅफे.

पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली ही धडक कारवाई करण्यात आली. हिडन, बडीज आणि दी शेलेक्स अशी तीन कॉफीशॉपवर पोलिसांनी छापे टाकले. प्रेमीयुगुलांना अश्लील चाळे करताना रंगेहाथ पकडले. हिडनमध्ये 4, बडीजमध्ये 2 आणि दी शेलेक्समध्ये 3 कपल्स अश्लील चाळे करताना अवस्थेत आढळून आले. सर्व तरुण- तरुणी 17 ते 21 वयोगटातील आहेत. धक्कादायक म्हणजे कॉफी शॉप मालकांकडून तरुण-तरुणी बेड असलेले छोटे कंपार्टमेंट उपलब्ध करून देण्यात आले होते.

प्रत्येक कपलकडून एका तासासाठी 1000 रुपये आकारले जात होते. पोलिसांनी कॅफे हिडन कॉफीशॉपचा मालक गजेंद्र सुनील सुपेकर (वय 28, रा. गांधी चौक), बडीजचा मालक मेघराज दत्तात्रय चव्हाण (वय 29, राय भाग्यनगर) आणि द शेलेक्सचा मालक अमोल दुर्गादास जाधव (वय 27, रा. भाग्यनगर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

दरम्यान, जालना शहर पोलिसांनी गेल्या महिन्यात दोन सेंटरवर धडक कारवाई केली होती. आता त्याच पद्धतीने शहरातील आणखी 3 कॉफी शॉपवर पोलिसांनी छापा टाकून गोरखधंद्याचा भंडाफोड केला आह


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 4, 2024

PostImage

चिमुकल्याच्या गळा आवळून केला खून.! चुलत भाऊच निघाला खुनी


अकोला:-

कबुतर पकडण्यासाठी शेतात गेला असता तेथे झालेल्या वादानंतर सात वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह शेतातील विहिरीत टाकून दिला. १६ दिवसांनी मृतदेह विहिरीत आढळून आला.

मुलाचा खून गळा आवळून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मारेकऱ्याला शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. अखेर हा खून मृतकाच्या विधिसंघर्ष १७ वर्षीय चुलत भावानेच केला असल्याचे गुढ उकलण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. 

अकोला जिल्ह्यात नव्याजे रुजू झालेले पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेने पहिलीच उत्कृष्ट कारवाई करीत सात वर्षाच्या मुलाचा हत्येच्या क्लिष्ट गुन्ह्याची उकल केली. ता. १९ डिसेंबर २०२३ पासून हरवलेला मुलगा शेख अफ्फान शेख अय्युब (रा. बागवानपुरा पिंजर) याचा मृतदेह स्थानिक गुन्हे शाखा अकोला, श्वान पथक व पिंजर येथील पोलिस तसेच संत गाडगेबाबा आपातकालीन पथक पिंजर यांचे १२ दिवसांचे अथक प्रयत्नाने पिंजर-अकोला रोडवरील विहिरीत सापडला होता.

घटनेचे गांभिर्य ओळखून पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलिस अधिकारी मूर्तिजापूर मनोहर दाभाडे, स्थानिक गुन्हे शाखा अकोला प्रमुख पोलिस निरीक्षक शंकर शेळके, पो.उप. नि. गोपाल जाधव व पोलिस स्टेशन पिंजरचे ठाणेदार स. पो. नि. राहुल वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस अधीक्षकांनी तपासाबाबत सूचना दिली.

त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विचारपूस करीत, तांत्रिक माहिती व पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनावरून गुन्ह्यातील संशयित यांना ताब्यात घेतले. सखोल विचारपूस केली असता मयत शेख अफ्फान शेख अय्युब याचा खून त्याचा चुलत भाऊ विधी संघर्षित बालक वय १७ वर्षे याने केल्याची कबुली दिली.

ही कारवाई पो. नि. शंकर शेळके, सपोनि कैलास भगत, पोउपनि गोपाल जाधव, व स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलिस अंमलदार दशरथ बोरकर, राजपालसिंह ठाकुर, गोकुळ चव्हाण, प्रमोद डोईफोडे, फिरोज खान, रवी खंडारे, अब्दुल माजीद, वसीमोद्दीन, महेंद्रं मलीये, अविनाश पाचपोर, खुशाल नेमाडे, लिलाधर खंडार, शेख अन्सार एजाज अहेमद, आकाश मानकर, धीरज वानखडे, उदय शुक्ला, स्वप्निल चौधरी, मोहम्मद आमीर, अभिषेक पाठक, चालक शेख नफीस, अक्षय बोबडे, प्रवीण कश्यप, अनिल राठोड व तांत्रिक विश्लेषक राहुल गायकवाड, गोपाल ठोंबरे, आशिष आमले यांनी केली.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 4, 2024

PostImage

मंत्रिमंडळ निर्णय


राज्यातील सहकारी संघ व खाजगी दुध प्रकल्पांना दुध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याबाबत आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

राज्यातील सहकारी दुध संघ व खाजगी दुध प्रकल्पांमार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधाकरीता दुध उत्पादक शेतकरी यांना प्रतिलिटर ५ रुपये  इतके अनुदान देण्यात येईल

सहकारी दूध संघ व खाजगी दुध प्रकल्पांमार्फत दुध उत्पादक शेतकरी यांना ३.५ फॅट /८.५ एसएनएफ या गुणप्रतिकरीता किमान २७ रुपये  प्रति लिटर इतका दर संबंधित दुध उत्पादक शेतकऱ्याच्या वैयक्तिक बँक खात्यावर रोख विरहीत पध्दतीने (ऑनलाईन) देणे  बंधनकारक राहील. तद्नंतर, शेतकऱ्यांना शासनामार्फत  ५ रुपये प्रतिलिटर बँक खात्यांवर थेट वर्ग (डीबीटी) करण्यात येईल.

फॅट व एसएनएफ ३.५/८.५ या गुणप्रतिपेक्षा प्रति पॉईन्ट कमी होणाऱ्या फॅट व एसएनएफ करीता प्रत्येकी ३० पैसे वजावट करण्यात येईल. तसेच प्रति पॉईन्ट वाढीकरीता ३० पैसे वाढ करण्यात यावी.

सदर योजनेच्या अंमलबजावणीकरीता बँकेमार्फत विशेष सॉफ्टवेअर विकसित करून त्याद्वारे अनुदान दुध उत्पादक शेतकरी यांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे देणेबाबत मान्यता देण्यात येत आहे.

नोव्हेंबर, २०२३ मधील आकडेवारीनुसार सहकारी दूध संघ व खाजगी दुध प्रकल्पांमार्फत होणारे दुध संकलन १४९ लाख लिटर प्रतिदिन इतके आहे. प्रस्तावित रू.५/- प्रतिलिटर अनुदानप्रमाणे एक महिन्याच्या कालावधीकरीता अंदाजित रू.२३० कोटी इतके अनुदान आवश्यक राहील. तथापि, प्रत्यक्ष होणाऱ्या दुध संकलनातील घट वा वाढ यानुसार उपरोक्त रकमेत बदल होण्याची शक्यता आहे.

योजना ११ जानेवारी, २०२४ ते १० फेब्रुवारी, २०२४ या कालावधीकरीता राबविण्यात येईल.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 4, 2024

PostImage

दुचाकीच्या समोर कुत्रा आडवा आल्याने दुचाकी स्लिप होउन दुचाकी स्वाराचा मृत्यू.! चालक गंभीर जखमी 


धुळे: धुळे ते चाळीसगाव रोडवरील विंचुर फाट्यानजीक भरधाव दुचाकीसमोर अचानक कुत्रा आला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्न करत असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटले. भरधाव दुचाकी घसरून अपघात झाला. ही घटना मंगळवारी सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास घडली. गंभीर जखमी झालेल्या रमेश शांताराम पवार (रा. खोरदड, ता. धुळे) यांचा मृत्यू झाला.

मंगळवारी सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास रमेश शांताराम पवार हे खोरदड गावातील नाना सखाराम पाटील यांच्या एमएच १८ सीबी ८९६५ क्रमांकाच्या दुचाकीवर मागे बसून धुळ्याकडे येत होते. त्यादरम्यान विंचूर फाट्याजवळ अचानक कुत्रा समोर आल्याने नाना पाटील यांनी जोराचा ब्रेक दाबला. त्यामुळे दुचाकी घसरून अपघात झाला. त्यात मागे बसलेले रमेश पवार यांना गंभीर दुखापत झाली. नाना पाटील हे ही जखमी झाले. गंभीर अवस्थेत रमेश पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्याला अधिक मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत सुधाकर गंजीधर देवरे (रा. वलवाडी, ता. धुळे) यांनी धुळे तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अपघातप्रकरणी दुचाकी चालक नाना पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक काळे करीत आहेत.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 4, 2024

PostImage

अस्वलाच्या हल्यात शेतकरी गंभिर जखमी.!


अकोला:- जिल्हातल्या अकोट तालुक्यातील आदिवासी भागात बोरव्हा शिवारात अस्वलाने शेतकऱ्यावर हल्ला केला. यात  शेतकरी गंभीर जखमी झाले असून शेतकऱ्यावर  अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अकोट  तालुक्यातील आदिवासी भागात अस्वलांचा वावर पाहण्यास मिळाला आहे. यात अस्वलांकडून होत असलेल्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. या दरम्यान बोरव्हा शिवारातुन आज एक शेतकरी शेतीच्या कामासाठी जात असताना अस्वलाने अचानक हल्ला केला. अस्वलाने हल्ला केल्याने शेतकऱ्याने जोरात आरोड्या मारल्या. यामुळे परिसरातील काहीजण धावून आल्याने अस्वलाने तेथून पळ काढला. मात्र यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.


उपाय योजना करण्याची मागणी:-

अकोट तालुक्याच्या आदिवासी भागात अस्वलांचा वावर अधिक वाढला असून यावर वन विभागाने लवकरात लवकर उपाय योजना करण्याची मागणी आदिवासी भागात राहणाऱ्या शेत शिवारातील शेतकऱ्यांनी केली आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 4, 2024

PostImage

भर धाव येणारी कार दुभाजकावर आदळली.! कार चालक व महीला ठार


नागपूर:-

 नागपूर-अमरावती मार्गावरील  आठवा मैल भागात दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. यात, कार चालक व एक महिला मृत्युमुखी पडले असून, मागच्या सीटवर बसलेली एक महिला गंभीर जखमी झाली आहे. अपघातग्रस्त कारमधील कुटूंब अंजनगाव सुर्जी येथील असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. 
ही कार अमरावतीच्या दिशेने जात असताना अती वेगात असल्याने रस्ता दुभाजकावर धडकली व अनियंत्रीत होऊन नागपूर दिशेला जाणाऱ्या मार्गावर पलटली. 
तेव्हाच नागपूरकडे जात असणाऱ्या एका ट्रॅकवर ती धडकली. यात कारचालक व एक महिला समोरच्या सीटवर असल्याने जागीच मृत झाले. मागील सीटवर असणारी एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात नेण्यात आले आहे. गाडी पूर्णपणे चकनाचूर झाली असून, स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले आहे.  


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 4, 2024

PostImage

काय भारतातील गाव ढगात आहे.! नवलच म्हणावं की काय.! वाचा सविस्तर वृत्तांत


आजवर तुम्ही बरीच ठिकाणं फिरलात असाल. देश-विदेशातील पर्यनटस्थळं पालथी घातली असाल. पण तुम्हाला माहिती आहे का? भारतात एक असं गाव आहे जे चक्क ढगात आहे. परीकथेतील वाटावं असं हे ठिकाण प्रत्यक्षात आहे, तेसुद्धा भारतात.

या ठिकाणाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

अशी काही ठिकाणं आहेत, जी अद्भुत आहेत. ती पाहिल्यावर स्वप्नातील किंवा परीकथेतील दुनिया वाटते किंवा एखाद्या हॉलिवूड फिल्ममधील सीन... असंच भारतातलं हे ठिकाण. जे चक्क ढगात आहे. तुम्ही भारतातील बरंच सुंदर गावं पाहिली असतील. पण असं गाव नाही. हे गाव पाहिल्यावर तुम्ही इथं जाण्यावाचून स्वतःला रोखू शकणार नाही.

मेघालयच्या पूर्व खासी हिल्स प्रदेशातील नॉन्जरोंग गाव. शिलाँगपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात प्रत्येकाला जावंसं वाटतं. ढगांच्या मध्ये वसलेलं हे गाव खूप सुंदर आहे. हिरव्यागार टेकड्या, तिन्ही बाजूंनी खोल दऱ्या, वाहणाऱ्या नद्यांचा आवाज, प्राचीन धबधबे, पक्ष्यांचा किलबिलाट... हे गाव मेघालयातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे... इतकी सुंदर की स्वित्झर्लंडही यासमोर फेल आहे.

गावात सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दृश्य अप्रतिम आहे. ते पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येथे येतात आणि ढगांमध्ये काही काळ आनंद लुटतात. इथं गेल्यावर तुम्ही ढगांच्या कुशीत बसल्याचा भास होईल. पृथ्वी कुठंही दिसणार नाही.

काही लोक म्हणतात की पहाटेचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही पहाटे अडीच वाजता शिलाँग सोडलं पाहिजे, कारण शिलाँगहून इथं पोहोचण्यासाठी तुम्हाला 2 तासांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. संध्याकाळच्या एक दिवस आधी पोहोचणं चांगलं. विशेष म्हणजे या भागात पथदिवे, साईन बोर्ड, पेट्रोल पंप आणि गुगल मॅपचीही मदत असणार नाही. तुम्हाला रस्ता दाखवण्यासाठी रस्त्यावर कोणीही सापडणार नाही. दाट धुक्यात हा मार्ग दऱ्याखोऱ्यात वळसा घालत आहे, त्यामुळे एक दिवस आधी संध्याकाळी इथे पोहोचलात तर बरं होईल.

या सुंदर गावात संपूर्ण रात्र घालवा. इथं पारंपारिक खाद्यपदार्थांचा आनंद घ्या. संगीत ऐका. लोकांशी बोलण्यात वेळ घालवा. यापेक्षा चांगला आनंद तुम्हाला कुठेही मिळणार नाही. पारंपारिक जीवनशैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या या गावातील लोकांचा आदरातिथ्य पाहून तुम्ही रोमांचित व्हाल. नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान इथं भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे. या गावातील हवामान सर्वात आल्हाददायक आहे. उन्हाळ्यात दिवसभरात थोडी उष्णता जाणवेल.

https://twitter.com/GoNorthEastIN/status/1742179072711774436?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1742179072711774436%7Ctwgr%5Ed93718f02fcb517b0f376e1e83e91d7e1fdfa3c0%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F
@GoNorthEastIN एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 4, 2024

PostImage

प्रियकरासोबत पत्नीला निर्वस्त्र, शारीरिक संबंध ठेवत असताना पतीने रंगेहात पकडले.! कुठली घटना आहे वाचा सविस्तर वृत्तांत


January ४

 पिंपरी- चिंचवड शहरामधील वाकड परिसरात असलेल्या लॉजवर पत्नीला प्रियकराबरोबर रंगेहात पकडून पत्नीच्या अफेअरचा पतीने भंडाफोड केला आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात पतीने तक्रार दिली आहे.

निर्वस्त्र, शारीरिक संबंध ठेवत असतानाच पतीने रंगेहात पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबतचा दखलपात्र तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे.


पती आणि पत्नीचे नातं हे पवित्र मानलं जातं. याच नात्यात वितुष्ट आल्याचं प्रकरण पिंपरी- चिंचवडमध्ये समोर आलं आहे. वाकड मधील लॉजवर पत्नीला प्रियकराबरोबर शारीरिक संबंध ठेवत असताना पतीने रंगेहात पकडले आहे.
ही घटना २८ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडली. जेव्हा पतीने रूमचा दरवाजा तोडला त्यावेळी दोघेही निर्वस्त्र आणि शारीरिक संबंध ठेवत असल्याचं पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.
पतीला पत्नीवर संशय होता. पत्नीचा पाठलाग करत तो वाकड मधील लॉजपर्यंत पोहोचला. बॉयफ्रेंड आल्यानंतर काही वेळाने सहकार्यासह पतीने रूमचा दरवाजा तोडला आणि दोघांना रंगेहात पकडले.

 


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 4, 2024

PostImage

त्या रात्री बहीण भावामध्ये नको ते घडले.! कोर्टानं नकार देताना स्पष्ट सांगितलं.!


केरळमधून एक बहिण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. भावासोबतच्या अनैतिक संबंधातून अल्पवयीन बहीण गर्भवती राहिली. ही बाब मुलीच्या पालकांना समजल्यानंतर त्यांनी गर्भपाताच्या परवानगीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. कोर्टाचे न्यायमूर्ती देवन रामचंद्रन यांनी मार्गदर्शनाखाली या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टाने मुलीला गर्भपात करण्यास परवानगी देण्यास नकार दिला. याचे कारण स्पष्ट करतानाच कोर्टाने अल्पवयीन मुलीने तिच्या पालकांच्या देखरेखीखाली राहावे, असे आदेश दिले. तर, ज्या भावावर आरोप करण्यात आले आहेत त्याला मुलीपासून दूर ठेवण्याची खात्री करण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देशही न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना आणि पालकांना दिले.

भावासोबतच्या अनैतिक संबंध निर्माण झाल्यामुळे एक अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. तिचे वाढते पोट पाहून पालकांनी शंका आली. त्यांनी तिची तपासणी केली असता रिपोर्टमध्ये ती गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. रिपोर्ट पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी गर्भपातासाठी परवानगी मिळावी म्हणून केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली.
केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती देवन रामचंद्रन यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. गर्भधारणेमुळे मुलीला शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ शकतो, असा युक्तिवाद मुलीच्या कुटुंबीयांनी न्यायालयात केला. तर, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या वैद्यकीय मंडळानेही मुलीचे लहान वय आणि संभाव्य मानसिक आघात यामुळे 34 आठवड्यांची गर्भधारणा संपुष्टात आणण्याची शिफारस केली होती. मात्र, कोर्टाने या प्रकरणी निकाल देताना गर्भपात करण्याची परवानगी नाकारली.
कोर्टाने ही परवानगी नाकारण्याचे कारण स्पष्ट करताना असे म्हटले की, मुलीच्या पोटात वाढत असलेला गर्भ हा 34 आठवड्यांपर्यंत पोहोचला आहे. तो पूर्णपणे विकसित झाला असल्याने आता गर्भपात करता येणार नाही. गर्भ आता गर्भाबाहेर येऊन त्याच्या जीवनाची तयारी करत आहे. अशावेळी गर्भपात करणे अशक्य आहे. त्यामुळे साहजिकच मुलाला जन्म देण्याची परवानगी द्यावी लागेल असे कोर्टाने म्हटले.

 


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 3, 2024

PostImage

चिकन दिलं नाही म्हणून दुकानदाराला चाकूने हल्ला


नव्या वर्षाला सुरुवात झाली पण पुण्यातील  गुन्हेगारी कृत्य काही कमी व्हायची नाव घेत नाहीत. पुण्यातील विविध भागात जीवघेणं हल्ले सुरुच आहेत, त्याशिवाय काही भागात कोयाता गँगची  दहशत आहेच. तर अनेक ठिकाणी गाड्यांची तोडफोड केली जातेय. अशातच कोंढव्यात धक्कादायक घटना घडली आहे. पार्टी करण्यासाठी चिकन दिलं नाही, म्हणून चक्क दुकानदाराला भोकसल्याची घटना घडली आहे. सुफियान आयुब शेख असं मारहाण करत दुकानदारास चाकूने भोकसणाऱ्या आरोपीचं नाव आहे. तर अब्दुला शेख असं हल्ला झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. 

पार्टी करण्यासाठी चिकन दिलं नाही, म्हणून चिकन दुकानदाराला चाकूने भोकसल्याची घटना पुण्यातील कोंढवा परिसरात घडली आहे. सुफियान आयुब शेख असं आरोपीचं नाव आहे. हा प्रकार सोमवारी (दि.1) रात्री अकराच्या सुमारास मिठानगर येथील आयशा चिकन नावाच्या दुकानात घडला आहे. 23 वर्षीय अब्दुला हाशिम शेख याने याबाबत कोंढवा पोलिसात  तक्रार दिली.

याबाबत अब्दुला हाशिम शेख याच्या तक्रारीनंतर कोंढवा पोलीस ठाण्यात सुफियान अय्युब शेख याच्यावर गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी आयपीसी 323, 324 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. या प्रकरणाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अब्दुला शेख याचे कोंढव्यातील मिठानगर येथे आयशा चिकन सेंटर नावाचे दुकान आहे. एक जानेवारी रोजी म्हणजेच सोमवारी रात्री अकराच्या सुमारास दुकान अब्दुला शेख बंद करत होता. दुकानदाराच्या तोंड ओळखीचा सुफियान शेख त्यावेळी दुकानात आला. सुफियान याने त्याच्याकडे चिकन मागितले. पण अब्दुलाने त्याला नाही म्हणून सांगितले.  दुकान बंद करत आहे, चिकन मिळणार नाही असे अब्दुलाने सुफियान याला सांगितले. पण हाच राग सुफियान याला आला. सुफियान याने अब्दुला याला मारहाण करत जाब विचारला. अब्दुला याच्या कानाखालीही लगावली. सुफियान इतक्यावरच थांबला नाही, त्याने दुकानातील चाकू अब्दुला शेख याच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. काहीसं दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कोंढवा पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. आरोपी सुफियाना फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. अब्दुला याच्यावर प्रथमिक उपचार सुरु आहेत. 


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 3, 2024

PostImage

महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरीच्या ग्रामोन्नती करिता युवक संकल्पनेच्या शिबिराचे उदघाटन


रुमदेव सहारे सहसंपादक 

आरमोरी :-

           गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली  अंतर्गत महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न.प.वाणिज्य महाविद्यालय आरमोरी येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उदघाटन जि. प. माध्य. केंद्र शाळा जोगीसाखरा येथे संपन्न झाला.
             ग्रामोन्नती करिता युवक व अंधश्रद्धा निर्मूलन संकल्पना स्वीकारून आठ दिवशीय रा. से. यो. शिबीर दि 03 जानेवारीला बालिका दिनाच्या औचित्याने रा. से. यो. शिबाराचे उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोजभाऊ वनमाली, उदघाटक सरपंच संदीपभाऊ ठाकूर, प्रमुख पाहुणे मा. हरिरामजी वरखडे माजी आमदार, दिलीप घोडाम अध्यक्ष गुरुदेव जंगल कामगार संस्था जोगीसाखरा उपस्थित होते.
         शिबिराचे सूत्र संचालन प्रा. कु. नागदेवे, प्रास्ताविक प्राचार्य खालसा  व आभार रा. से. यो अधिकारी प्रा.सोनटक्के यांनी केले.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 3, 2024

PostImage

आरमोरीत ४ जानेवारीला क्रांती निळ्या पाखराची, प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन


रूमदेव सहारे सहसंपादक

आरमोरी... समता युवा सामाजिक संघटना  आरमोरीच्या वतीने भिमा कोरेगांव शौर्य दिन अभिवादन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती समारोह निमीत्य दिनांक  ४ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता विजय पारधी यांचा "क्रांती निळ्या पाखराची, हा प्रबोधनपर संगीतमय  कार्यक्रम आरमोरी जूना बसस्थानक जवळील तथागत बुद्ध विहाराच्या परिवर्तन मंच सभागृहात  होणारं आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामीण विकास शिक्षण संस्था चुरमुराचे संस्थापक डॉ. राजकुमार शेंडे यांच्या हस्ते होणारं आहे. सहउद्घाटक म्हणुन  किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्था आरमोरीचे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे हे राहणार आहेत तर  अध्यक्षस्थानी   प्रेरणा शिक्षण. संस्था आरमोरीचे सचिव मदन मेश्राम हे राहणार आहेत.
प्रमूख अतिथी म्हणून भिवापूरचे तहसिलदार  कल्याणकुमार डहाट, आरमोरीचे तहसीलदार,  श्रीहरी माने, अहेरीचे पोलिस निरीक्षक  मनोज काळबांडे , आरमोरीचे पोलीस निरीक्षक संदिप मंडलिक, डॉ आंबेडकर स्मारक मंडळाचे अध्यक्ष  यशवंत जांभुळकर , सामाजिक कार्यकर्ते  जयकुमार मेश्राम, नगराध्यक्ष . पवन नारनवरे, आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी, अविनाश मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते  विजयकुमार ठवरे,  प्रा. शशिकांत गेडाम,  माजी जि.प.सभापती वेणुताई ढवगाये, माजी जिल्हा परिषद सदस्य मनिषा दोनाडकर,  तालुका कृषी अधिकारी निलेश गेडाम,योगेंद्र बन्सोड, नगरपरिषद उपाध्यक्ष  हैदरभाई पंजवानी, नगरपरिषद सभापती  भारत बावणथडे,   विलास पारधी,  सागर मने, सुनिता चांदेवार नायब तहसिलदार  ललीतकुमार लाडे, प्राचार्य  रविंद्र बांबोळे,  प्राचार्य  जयदास फुलझेले , प्राचार्य साईनाथ अद्दलवार, भाजपा तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, धानोराचे सहाय्यक गटविकास अधिकारी एम. ई. कोमलवार,. माजी प्राचार्य पि.के. सहारे , विनोद शेंडे , श्री सत्यसाई आदीवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था आरमोरीचे सचिव महेश तितीरमारे , शाखा अभियंता प्रविण झापे, गट समन्वयक कैलाश टेंभुर्णे, मोरेश्वर टेंभुर्णे, खिरेंद्र बांबोळे  डॉ. प्रदिप खोब्रागडे,  मनोज टेंभुर्णे, कलिराम गायकवाड, अभियंता अविनाश बंडावार   डॉ. अमोल धान्नक, डॉ. सोनाली धान्नक,  प्रा. सौ स्नेहा श्रीकांत गौतम,  राजु उके  अविनाश चंहादे, अमर बोबाटे,  गोलू वाघरे,  गंगाधर कुकडकर,  शुभम हुकरे, जितु शेंडे, राजु कुंभारे, प्रफुल ठवकर,  सत्यवान वाघाडे,  सिध्दार्थ साखरे,  विजय लाकडे, अतुल मेश्राम,  शुभम तुमने आदी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समता युवा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष निलेश अंबादे यानी केले आहे


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 2, 2024

PostImage

तरुणाचे क्रूर कृत्य .!आईवडिलासह बहिणीला संपवुन मृतदेह अंगणात टाकले.!


जयपूर: राजस्थानातील नागौर जिल्ह्यात एका २० वर्षीय तरुणाने तीक्ष्ण कुऱ्हाडीचे घाव घालून आपल्या आईवडिलांची आणि बहिणीची हत्या केल्याची घटना रविवारी घडली होती. पडुकलान गावातील या घटनेतील हल्लेखोर तरुणाला मोबाइलचे भयंकर व्यसन जडले होते. दिवसातील १५-१६ तासांहून अधिक वेळ तो मोबाइलमध्ये अडकलेला असे, अशी माहिती आता समोर आली आहे.

मोहित नावाचा हा तरुण एखाद्या हिंसक ऑनलाइन गेमच्या किंवा कंटेंटच्या विळख्यात अडकला होता. त्यामुळे त्याच्या वर्तनात काही बदल झाला होता का किंवा आरोग्याची काही समस्या निर्माण झाली होती का, याचा आता पोलीस तपास करत आहेत. यासंदर्भात एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, "आम्ही या आरोपीची चौकशी करत आहोत. त्याच्या मोबाइलच्या तपासणीत त्याने आत्महत्या करण्याच्या पद्धतीविषयी माहिती शोधल्याचे सर्च हिस्ट्रीमधून समोर येत आहे. आईवडिलांची आणि बहिणीची हत्या केल्यानंतर, त्याने रात्रीच्या वेळी घरात तयार केलेल्या टाकीत उडी मारून जीव देण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र तो अपयशी ठरला. केलेल्या हत्यांबद्दल आरोपीला किंचितही पश्चात्तापाची भावना असल्याचे दिसत नाही. त्याच्या देहबोलीवरून तो मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे दिसते.
या तरुणाने एका महिन्यापूर्वीच आपल्या आईवडिलांची हत्या करण्याचा कट रचला होता. मात्र त्याची अमलबजावणी करता आली नाही, असे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. या हत्यांमागील उद्देश अद्याप समोर आलेला नाही, असे पोलिसांनी सांगितले. कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षाला शिकत असलेल्या या आरोपीने प्रथम त्याची आई राजेश कंवर आणि बहीण प्रियांका कंवर या दोघी खोलीत झोपलेल्या असताना त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर त्यांचे रक्ताळलेले मृतदेह त्याने घराच्या अंगणात आणून टाकले. या दरम्यान, त्याचे वडील, दिलीप सिंह यांना जाग आली आणि ते बाहेर आले. तेव्हा मोहितने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले, असे तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मोहितने वडिलांचा मृतदेह खेचत अंगणात आणला आणि तिथे मृतदेहांसोबत बसून राहिला. हे कुटुंब मागील वर्षीच चेन्नईहून राजस्थानात परतले होते आणि पडुकलान या गावात स्थायिक झाले होते. दिलीप सिंह हे दागिन्यांचे दुकान चालवत होते, तर मोहित त्यांना मदत करत होता, असे पोलिसांनी सांगितले.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 2, 2024

PostImage

नियंत्रण सुटल्याने दुचाकी आदळली पुलाच्या लोखंडी कठड्याला .!दुचाकीस्वार जावयासह, सासरा गंभीर जखमी..


चामोर्शी(गडचिरोली) दिनांक ०२ :-  चामोर्शी तालुक्यातील आष्टी - चामोर्शी मार्गांवरील उमरी जवळील पुलाच्या लोखंडी कठड्याला दुचाकीची जबर धडक बसली यात दुचाकीस्वार जावया सह सासरा गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 2 जानेवारीला मंगळवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली.
     संदिप तुळशीराम पोटे वय 42 वर्ष रा. मुरखळा ता. चामोर्शी परशूराम बालाजी ठाकूर वय 65 वर्ष रा बल्लू ता. चामोर्शी असे गंभीर जखमीची नावे आहेत. 

  मुरखळा येथील संदीप पोटे हा आपल्या सासरे परशूराम ठाकूर यांना घेउन दुचाकी क्रमांक MH 33 AB 0655 ने तेलंगणातील सिरपुर येथे शेतीची कीटकनाशके खरेदी करण्यासाठी गेले तिथून गावाकडे परत जात असताना. दुचाकी वरुन नियंत्रण सुटल्याने आष्टी चामोर्शी मार्गावरील उमरजवळील पुलाच्या लोखंडी कठड्याला दुचाकीची जबर धडक बसली ही धडक इतकी भीषण होती की यात दुचाकीस्वार जावई संदिप पोटे याचा एका पायाचा अर्धा तुकडाच पडला तर सासरे परशूराम ठाकूर यांचा एक पाय चेंदामेंदा झाला. घटनेची माहिती कळताच आष्टी पोलिस ठाण्याचे ठाणेदार कुंदन गावडे , उपनिरिक्षक गणेश जंगले हे पोलिस पथकासह घटना स्थळी दाखल झाले व जखमींना आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. नंतर दोन्हीं जखमींना चंद्रपूर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. घटनेचा पुढील तपास आष्टी पोलिस करीत आहे.

जखमी अवस्थेत दुचाकीस्वार 


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 2, 2024

PostImage

काय आहे नवा हिट अँड रन कायदा..? ज्याचामुळे ट्रक आणि बस ड्रायव्हर्स करीत आहेत विरोध


तुम्हाला माहिती असेल, हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्यावतीने संप पुकारण्यात आला आहे. आज या संपाचा दुसरा दिवस होता. 

त्यामुळे आजपासून सर्व खासगी बसच्या चालकांसह इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचे चालकही संपावर गेले आहेत. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

मात्र हा 'हिट अँड रन' कायदा काय आहे ? हे अनेकांना माहिती नाही, दरम्यान या कायद्याविषयी सविस्तर माहिती आपण या मॅसेज मध्ये जाणून घेऊ. 

काय आहे हिट अँड रन नवीन कायदा ?

 तुम्हाला माहिती असेल, यापूर्वी आयपीसी कलम 304A अंतर्गत वाहनचालक अपघात करून फरार झाल्यास त्याला फक्त दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागत होता. 

मात्र आता केंद्र सरकारने नवीन मोटार वाहन कायदा पारित केला आहे. नवीन कायद्यानुसार वाहनचालक अपघात करून फरार झाल्यास तसेच प्राणघातक अपघाताची माहिती पोलिसांना न दिल्यास चालकांना 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास होण्याची शक्यता आहे. 

यासोबतच सात लाख रुपये दंड देखील आकारण्यात येणार आहे. यालाच हिट-अँड-रन कायदा असे म्हटले आहे. यापूर्वी या प्रकरणात आरोपी चालकाला काही दिवसांत जामीन मिळायचा - 

आणि तो पोलिस ठाण्यातूनच बाहेर पडत असे. मात्र, या कायद्यांतर्गत दोन वर्षांच्या तुरुंगवासाचीही तरतूद करण्यात आली आहे. 


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 2, 2024

PostImage

सोने लंपास करणारी गुलाबी गँग अटकेत!सहा महिलांचा समावेश.! गुलाबी गँग कशी करायची चोरी.! वाचाच सविस्तर वृत्तांत


नागपूर:-

ज्वेलर्सच्या दुकानात काम करीत तिथे टप्प्याटप्‍प्यांने सोने आणि चांदीची चोरी करणारी महिला आणि मुलींच्या "गुलाबी गँग'चा तहसील पोलिसांनी पर्दाफाश केला.
त्यांच्याकडून १ हजार ४५० ग्रॅम सोने आणि साडेदहा किलो चांदी असा ९४ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सहा महिलांवर गुन्हा दाखल केला असून चार महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

अस्मिता उर्फ स्वाती प्रकाश लुटे (वय ३९, रा. वर्धमाननगर, देशपांडे ले आउट), प्रिया प्रणव राऊत (वय ३०, ४ पवनगाव रोड, कळमना), पूजा राजाराम भनारकर (वय २०, रा. नंदगिरी रोड, पाचपावली), कल्याणी मनोज खडतकर (वय ३३, रा. श्रीकृष्णनगर) अशी अटकेतील महिला व युवतींची नावे आहेत. भाग्यश्री पवन इंधनकर (वय ३०, रा. तिननल चौक, तहसील), मनीषा ओमप्रकाश मोहुर्ले (वय ३८, रा. प्रेमनगर, झेंडा चौक, शांतीनगर)यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्मिता ऊर्फ स्वाती ही गेल्या काही वर्षांपासून तहसील येथील चिमुरकर ज्वेलर्समध्ये काम करीत होती. ती पूर्वी सोन्याचांदीच्या दागिण्यांची विक्री ते बिलिंग करण्यापर्यंतची सर्व कामे करायची, त्यानंतर मनीषा तिथे कामाला लागली. तीही जवळपास हीच कामे करायची. 

त्यानंतर प्रिया, कल्याणी, पूनम आणि भाग्यश्री याही येथे सेल्सगर्ल म्हणून रुजू झाल्या. या सर्वांवर मालकांचा विश्‍वास बसल्यानंतर त्या दुकानातील सोने आणि चांदीच्या वस्तू थोड्या-थोड्या प्रमाणात काढून घ्यायला लागल्या.
विशेष म्हणजे, याबाबत मालक शंतनू चिमूरकर (वय २८ रा. रेशीमबाग) यांनी कधीही किती विक्री झाली आणि किती माल शिल्लक आहे, याची कधीही विचारणा केली नाही. त्यामुळे याचा फायदा घेत, गेल्या पाच ते सहा वर्षांपासून त्यांची ही चोरी सुरूच होती. त्यानुसार पोलिसांनी एकूण १ हजार ४५० ग्रॅम सोने आणि साडेदहा किलो चांदी जप्त केली. चारही महिला आरोपींना अटक करीत, पोलिसानी कोठडी मिळविली. आता त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

असे फुटले बिंग

जुलै महिन्यात चिमूरकर ज्वेलर्स येथून सोन्याची अंगठी चोरीला गेली होती. त्या प्रकरणात पोलिसांनी जयेश सोनकुसरे याला अटक केली. त्याने या प्रकरणात माहिती देताना, येथे काम करणाऱ्या महिला यापेक्षा जास्त चोरी करीत असल्याची माहिती दिली. दरम्यान पोलिसांनी त्या दिशेने तपास करण्यास सुरुवात केली असता हा सगळा प्रकार समोर आला. त्यानुसार पोलिसांनी इतक्या मोठ्या प्रमाणात सोने जप्त केले.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 2, 2024

PostImage

ब्रेकिंग न्युज !मुलाने काठीने मारहाण करून बापाला संपविले.! नागभिड तालुक्यांतील घटना 


नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वासाळा (मेंढा )येथील 53 वर्षीय इसमाचा त्याच्याच 17 वर्षीय मुलाने केलेल्या मारहाणीत  मृत्यु झाल्याची खळबळजनक घटना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार मृतकाला दारूचे व्यसन होते, तो नेहमीच मद्यधुंद अवस्थेत राहत होता. घटनेच्या दिवशी मृतकाची पत्नी व आरोपीची आई काही कामानिमित्त बाहेरगावी गेली होती. दरम्यान वडील व मुलाची वादावादी झाली व त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. मुलाने बापाच्या डोक्यावर काठीने वार केला त्यामुळे वडील जागीच कोसळले व त्यांचा जागीच मृत्यू झाला.

वडिलांचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच आरोपीने गावाच्या सरपंचांना माहिती दिली. त्यांनतर पोलीस पाटलांच्या मदतीने नागभिड पोलिसांत तक्रार करण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणेदार घारे यांनी घटनास्थळ गाठून आरोपी मुलास ताब्यात घेतले. घटनेचा पंचनामा करून पोलीस स्टेशन नागभीड येथे मर्ग दाखल केला तसेच शवविच्छेदन करून प्रेत कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. उप विभागीय पोलीस अधिकारी ठोंबरे यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार घारे ह्यांच्या नेतृत्वात नागभिड पोलीस अधिक तपास करीत आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 2, 2024

PostImage

चाकूने भोसकून युवकाची हत्या


अकोला:-नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कृषी नगर परीसारात युवकाची हत्या झाल्याचे समोर आले आहे. हत्या झालेला युवक हा जळगाव जामोद,  तरोळा येथील रहिवसी असुन विशाल मधुकर झाडे वय वीस वर्षचा आहे.  सदर मुलाची चाकूने भोसकून हत्या केली आहे. सिव्हिल लाईन पोलीस आणि SDPO घटना स्थळी दाखल होऊन मृतदेहावर पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालय येथे पाठविण्यात आला आहे. 

पोटावर गंभीर चाकूचे घाव असलेल्या विशालला स्थानिक नागरिकांनी तातडीने अकोल्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगावकर, स्थानिक गुन्हे शाखेसह सर्व वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या कृषी नगर संकुलात मिरज सिनेमासमोर एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाला होता.त्यानंतर काही दिवसांनी एका तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 2, 2024

PostImage

सख्खा मावस भावाने केले मावस बहिणी सोबत नको ते कृत्य.! पोलीसांनी अनोखी शक्कल लढवून आरोपीला पकडले


बारामती : बारामती तालुक्यातील एका गावात शिक्षणासाठी मावशीकडे राहणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ यूट्यूबवरती व्हायरल करून त्याद्वारे संबंधित मुलीला ब्लॅकमेल केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी अखेर या आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे हा आरोपी पीडितेचा सख्खा मावस भाऊ आहे. पीडित विद्यार्थीनी बारामती शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिक्षणासाठी मावशीकडे राहणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ यूट्यूब ला व्हायरल करून त्याद्वारे संबंधित मुलीला ब्लॅकमेल केले जात होते.
याबाबत त्या मुलीच्या मैत्रिणींनी येथील एका सामाजिक कार्यकर्त्याशी संपर्क साधला. त्यानंतर बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांना सर्व हकीकत सांगितली. मुलीला मेसेज येत असलेल्या मोबाइलचे डिटेल्स काढण्याचा प्रयत्न सुरूवातीला करण्यात आला. परंतू त्याने मोबाईल स्वीच ऑफ ठेवला. त्यानंतर पोलिसांनी ट्रॅप लावण्याचे नियोजन केले. पण आरोपी सकाळी सात पासून मुलीला ब्लॅकमेल करून भेटायला बोलवत होता.
त्यानंतर घाबरलेल्या मुलीसोबतच्या मैत्रिणीनी, व सामाजिक कार्यकर्त्यांने प्लॅन केला. त्या आरोपीला मुलगी घाबरली आहे, ती भेटायला तयार असल्याचे भासवले. त्यावर आरोपीने तिला शाहू हायस्कुल समोर भेटायला बोलावले. तसेच परत पुढे पाटस रस्ता येथे आरोपीने येण्यास सांगितले.
यावेळी शहर पोलीसचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांना मदत मागण्यात आली. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटाच्या आत गुन्हे शोध पथकाचे अक्षय सीताप ,दशरथ इंगुले हे कर्मचारी हजर झाले. सर्वांनी मिळून आरोपीपर्यंत पोहोचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याचा मोबाईल जप्त केला. आरोपी हा मुलीचा सख्खा मावस भाऊ निघाला.
दरम्यान, मुलीचे आईवडील गरीब असल्याचा फायदा घेत तिने तक्रार करू नये म्हणून दबाव आणण्यात आला. त्यानंतर याबाबत पोलिसांनी स्वतःहून फिर्याद दाखल केली आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 2, 2024

PostImage

रागवराचा ताबा सुटला आणि माणूस राक्षस बनला.! चावी फेकली म्हणून पुतण्याचं संतापजनक कृत्य.! वाचा सविस्तर वृत्तांत 


धाराशिव : राग आणि भिक माग अशी म्हण आहे. रागावरचा ताबा सुटला की माणूस राक्षस होतो, आणि तो नको ते कृत्य करतो. अशीच एक घटना तुळजापुर तालुक्यातील अणदुर येथे घडली आहे. घराची चावी पुतण्याने चुलतीकडे मागितली. चुलतीने चावी लांबून फेकून दिली. चावी फेकल्याचा राग आल्याने ३२ वर्षीय पुतण्याने ४५ वर्षीय चुलतीला पाण्याने भरलेल्या विहिरीत ढकलून दिले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शब्बीर दस्तगीर पिंजारी (वय ३२, रा. अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव) याने त्याची चुलती मयत जैनाबी कासीम पिंजारी (वय ४५, रा. अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव) दशरथ घुगे याच्या शेतात ऊस तोडत होत्या. या दरम्यान आरोपी शब्बीरने जैनाबी यांच्याकडून घराची चावी मागितली. जैनाबी यांनी चावी खाली का टाकून दिली? या कारणावरून आरोपी शब्बीर पिंजारी याने मयत चुलती जैनाबी पिंजारी यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली.
''तुला जिवंत सोडत नाही'', असं म्हणत शब्बीरने जैनाबी यांना हाताला धरुन ओढत नेऊन पाण्याने भरलेल्या दशरथ घुगे यांच्या अणदुर शिवारातील विहिरीत ढकलून देऊन जिवे ठार मारलं. ही घटना शनिवारी रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास घडली. यावेळी ऊसतोड करणारे कामगार जैनाबी यांना वाचवण्यासाठी विहिरीच्या दिशेने धावले. परंतु जैनाबी यांनी विहिरीचा तळ गाठला होता. बघ्यांपैकी कोणी तरी नळदुर्ग पोलिसांना घडलेल्या घटनेबद्दल सांगताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. आरोपी शब्बीर पिंजारी हा हैद्राबाद - सोलापूर हायवेवर जात असताना नळदुर्ग पोलिसांनी त्याला पकडले.
या बाबत फिर्यादी मस्तान ईसाक शेख (वय ३६, रा. अणदुर, ता. तुळजापूर जि. धाराशिव) यांनी काल रोजी दिलेल्या फिर्यादीवरुन नळदुर्ग पोलीस ठाणे येथे कलम ३०२, ३२३, ५०४ भारतीय दंड विधान संहिता अन्वये गुन्हा नोंदवला आहे. आरोपी शब्बीर पिंजारीला न्यायालयात हजर केल्यानंतर २ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मयत जैनाबी यांना १ विवाहित मुलगी, २ अविवाहित मुले आहेत. तर आरोपी शब्बीर पिंजारीला ४ मुली आहेत. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरज देवकर हे सहाय्यक पोलीस निरिक्षक स्वप्निल लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 2, 2024

PostImage

मोठी बातमी ! बस घाटात उलटली.!काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात


रायगड जिल्ह्यात पुण्यातून येणारी बस माणगाव हद्दीत ताम्हिणी घाटात कोंडेथर वळणाजवळ या बसला भीषण अपघात झाला. यामुळे एकच खळबळ उडाली. यामध्ये ५५ जण जखमी झाले आहेत. तर दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.

यामुळे मोठी पळापळ झाली. माणगाव तालुक्यात ताम्हिणी घाटात हा अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच ०४ एफके ६२९९ ही बस पुण्यावरुन माणगावकडे येत होती. यावेळी रस्त्याखली उतरल्याने पलटी होऊन हा अपघात झाला आहे.

हा अपघात1अचानक झाला. अपघातानंतर घटनास्थळी माणगाव पोलिसांनी धाव घेतली. यावेळी बस पूर्णपणे पलटी झाली होती. माणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या.

जखमींना उपजिल्हा रुग्णालय माणगाव, येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आले आहे.

याअपघातामुळे मार्गावरही वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. पुण्याहून हरिहरेश्वरला पर्यटनाला जात असताना बसला अपघात झाला आहे. पुणे येथील कंपनीची सहल खाजगी बसने हरिहरेश्वरला जात असताना बस उलटली आहे. 

दरम्यान, पहाटे ही बस पुण्याहून हरिहरेश्वरला निघाले होती. या बसमध्ये 57 प्रवासी प्रवास करत होते. पण ताम्हिणी घाटात आल्यानंतर चालकाचा बसवरचा ताबा सुटला अन् ही बस उलटली. यावेळी एकच गोंधळ पाहायला मिळाला.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 2, 2024

PostImage

नवरा कामावर गेला नाही म्हणून बायकोने उचलले टोकाचे पाऊल.! वाचुन थक्क व्हाल


 परभणी:-नवरा बायको म्हंटल तर प्रेम आलं, भांडण आलं आणि वादही आले. संसार म्हंटल तर भांड्याला भांड लागणारच, परंतु रागाच्या भरात आपल्या बायकोला नवऱ्यानेच विषारी द्रव्य पाजल्याची धक्कादायक घटना परभणी येथे घडली आहे.

निमित्त होत ते म्हणजे तुम्ही कामावर का गेला नाही असा प्रश्न बायकोने नवऱ्याला केला, आणि रागाच्या भरात नवऱ्याने हे टोकाचे पाऊल उचललं. या घटनेनंतर पतीविरोधात नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी शीतल नारायण पवार यांचं लग्न 2012 मध्ये नेहरूनगर भागातील नारायण उत्तम पवार यांच्यासोबत झालं होते. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. बुधवारी संध्याकाळी नारायण पवार संध्याकाळी ५ वाजता घरी येताच तुम्ही कामावर का गेला नाही असा सवाल त्यांच्या बायकोने म्हणजे शीतल नारायण पवार यांनी केला. यानंतर नारायण याना राग आला आणि रागाच्या भरात त्यांनी बायकोला शिवीगाळ केली. बोलत बोलत वाद इतका टोकाला गेला कि तुला आता जिवंतच ठेवत नाही म्हणत नारायण पवार यांनी बायकोला विषारी द्रव पाजले. शीतल यांनी आरडाओरडा केल्यानंतर त्यांची सासू, नणंद आणि इतर आसपासच्या लोकांनी त्यांना नवर्याच्या तावडीतून सोडवलं.

विषारी द्रव पोटात गेल्यानंतर शीतल याना चक्कर येऊ लागली. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असून कोणताही धोका नाही. या सर्व घटनेनंतर शीतल पवार यांनी पती नारायण पवार यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली. पोलिसांनी नारायण पवार याच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. परंतु या सर्व घटनेनंतर परभणी जिल्ह्यात मात्र मोठी खळबळ उडाली आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 2, 2024

PostImage

नव्या कायद्याविरोधात विदर्भात ट्रक व ट्रँकरचालकांचे बंद आंदोलन.!


नागपुर:-केंद्राच्या प्रस्तावित मोटार वाहन कायद्याविरोधात राज्यातील ट्रक आणि टँकर चालकांनी अनिश्चितकालीन संप पुकारला असून त्याच फटका सर्वसामान्यांना बसला. त्यामुळे राज्य सरकारला महसूलावर पाणी सोडावे लागले तर कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली.
ट्रकचालकांनी घोषणाबाजी करीत कायदा रद्द करण्याची मागणी केली. आंदोलन मंगळवारीही सुरू राहणार आहे.

ट्रकचालकांनी नागपूर सीमेच्या चारही बाजूच्या महामार्गावर ट्रक आडवे ठेवल्याने वाहतूक खोळंबली. जिल्हाधिकाऱ्यांनी जागेवर येऊन आमचे म्हणणे ऐकावे, अशी ट्रकचालकांची मागणी होती. आंदोलनामुळे विदर्भातील जवळपास १५ हजार ट्रक आणि ट्रँकर जागेवरच उभे राहिले. वेळेवर न पोहोचल्याने काही जणांची रेल्वे आणि विमाने सुटल्याची माहिती आहे.

राज्यात निर्माण होणार पेट्रोल व डिझेलचा तुटवडा
टँकर चालकांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने राज्यात पेट्रोल-डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आंदोलनात बीपीसीएल, एचपीसीएल आणि इंडिया ऑईल या तिन्ही सरकारी तेल कंपन्यांच्या टँकर चालकांचा समावेश आहे. राज्याच्या विविध भागात टँकर बाहेर न पडल्याने इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाला. टँकर चालकांचा संप लवकर मिटला नाही तर राज्यात पेट्रोल-डिझेल पुरवठा होण्यास अडचणी येऊ शकतात.

आंदोलकांनी ट्रक रस्त्यावर केले आडवे
सरकार आंदोलनाची दखल घेत नसल्याचे पाहून ट्रकचालकांनी नागपुरात दुपारनंतर ट्रक महामार्गावर आडवे ठेवल्याने अनेक तास वाहतुकीचा खोळंबा झाला. हे ट्रक अनेक तास महामार्गावर आडवे उभे होते. त्यामुळे शहरी आणि शहराबाहेरील बससेवा पूर्णपणे ठप्प झाली. शिवाय शहरी आपली बस सेवेलाही फटका बसला. प्रवाशांना ऑटोने शहरात यावे लागले. अशी स्थिती सायंकाळपर्यंत होती. शेवटी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर वाहतूक व्यवस्था हळूहळू पूर्ववत झाली.

ट्रकचालकाला जबाबदार धरले जाणार

नव्या मोटार वाहन कायद्यामध्ये अपघात झाल्याच्या स्थितीत ट्रकचालकाला जबाबदार धरण्यात येणार आहे. या प्रकरणी ट्रक चालकांना १० वर्षांची शिक्षा आणि ७.५ लाखांचा दंड भरावा लागणार आहे. या तरतुदीला देशभरातील ट्रक आणि टँकर चालकांनी विरोध करून संप पुकारला. या कठोर कायद्यामुळे ट्रकचालक अडचणीत येणार आहे. चूक नसतानाही त्यांना जेलमध्ये जावे लागेल. सध्या ही तरतूद असली तरीही पुढे कायद्याचे स्वरूप आल्यास ट्रकचालकासह कारचालकही अडचणीत येतील. त्यामुळे केंद्र सरकारने हा कायदा तात्काळ रद्द करावा.
कुक्कू मारवाह, अध्यक्ष, नागपूर ट्रक ओनर्स असोसिएशन.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 2, 2024

PostImage

रिव्हाल्वर, चार काडतुसांसह चौघांना पकडले.! स्थानीक गुन्हे शाखा व पोलीस यांची संयुक्त कारवाई 


भंडारा:-सरत्या वर्षात स्थानिक गुन्हे शाखा व तुमसर पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत रिव्हॉलर, चार काडतुसांसह चौघांना अटक केली आहे. ही धाडसी कारवाई मंगळवारला दुपारी भंडारा शहरातील शीतला माता मंदिराजवळ करण्यात आली.

यात दोन जण फरार असल्याचेही पोलिस सुत्रांनी सांगितले. तुमसर येथे २५ सप्टेंबरला नईम शेख यांची हत्या करण्यात आली होती. आज अटक केलेल्या आरोपींचा या हत्यांकाडाशी कनेक्शन आहे का? याचाही शोध घेण्यात येत आहे.

स्थानिक गुन्हे शाखा व तुमसर पोलिसांना काही अज्ञात गुंड प्रवृत्तीचे इसम भंडारा शहरात आल्याची माहिती मिळाली. उल्लेखनीय म्हणजे मंगळवारी दुपारच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा व तुमसर पोलिसांनी केलेल्या कारवाईत पकडण्यात आलेले चारही इसम हे तुमसर येथील रहिवासी होते.

भरगच्च वस्तीतून जात असताना घडलेल्या कारवाईने खळबळ उडाली. वर्षभरात खूनाच्या तब्बल २५ घटना व खुनाच्या प्रयत्नाच्या घटनातही वाढ झाल्याचे दिसून आले. सरत्या वर्ष संपायला पाच दिवसांचा कालवाधी शिल्लक असतानाच रिवाल्वरसह चार जिवंत काडतुसे या चौघांच्या ताब्यातून जप्त करण्यात आली.

सर्व चारही व्यक्ती तुमसर येथील रहिवासी आहेत. एखाद्या मोठ्या घटनेला अंजाम देण्यासाठी तर भंडारा शहरात आले नव्हते, याचाही तपास पोलीस करीत आहेत. या कारवाईदरम्यान फरार असलेले दोन इसमांचा शोध घेतला जात आहे. पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर आहे. भंडारा पोलिस ठाण्यात रात्र उशिरापर्यंत अटकेची कारवाई सुरू असल्याने अटक केलेल्यांची नावे उपलब्ध होऊ शकली नाही.

नईम शेख हत्याकांडाशी कनेक्शन?

रेती व मॅग्निज व्यावसायिक नईम शेख यांची गोबरवाही रेल्वे फाटकासमोर २५ सप्टेंबर २०२३ ला बंदुकीतुन गोळ्या व धारदार शस्त्राने वार करून खुन करण्यात आला होता. या प्रकरणाशी आज अटक केलेल्या इसमांचा कनेक्शन तर नाही, याचाही शोध घेण्यात येत आहे. शेख हत्या प्रकरणात एकूण ११
आरोपींचा समावेश आहे. अन्य घटनांवरही लक्ष केंद्रीत करून पोलिसांचा तपास सुरू आहे.

स्थानिक गुन्हे शाखा व तुमसर पोलीस यांच्या संयुक्त पथकाने चौघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून एक रिव्हाल्वर व चार काडतुसे जप्त केली. फरार आरोपींच्या शोधात पथक पाठविण्यात आले आहे. या घटनेचा सखोल तपास केला जात आहे.- लोहित मतानी, पोलीस अधीक्षक, भंडारा.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 1, 2024

PostImage

ठाकरे, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांत जोरदार धक्काबुक्की 


मिरज : मिरजेत शिवसेनेच्या ठाकरे गटाने उभारलेल्या कार्यालयावरून शिवसेनेच्या दोन गटांत जोरदार वादावादी झाली. शिंदे व ठाकरे गटांच्या शहरप्रमुखांत हाणामारी झाली. त्यानंतर महापालिकेने कार्यालयाचे अतिक्रमण काढून टाकले. यावेळी पोलिस आणि शिवसैनिकांत जोरदार धक्काबुक्की झाली. अतिक्रमण हटविण्यास विरोध करणारे शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे यांना पोलिसांनी फरफटत गाडीत घातले. जेसीबीच्या मदतीने पत्र्याचे खोके जमीनदोस्त केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या आदेशानेच कार्यालय हटविल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. ठाकरे गटाने किल्ला भागात संपर्क कार्यालय म्हणून खोके बसविले होते. पण ते अतिक्रमण असल्याच्या तक्रारीनंतर शिवसेनेचे दोन्ही गट आमनेसामने आले. शिंदे व ठाकरे गटांच्या शहरप्रमुखांत हाणामारी झाली. परस्परांना अश्लील शिवीगाळ करण्यात आली. शिंदे गटाने ठाकरे गटाच्या कार्यालयाचे काम बंद पाडले.
सेतू कार्यालयाजवळ ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयासाठी खोके बसविण्यास सुरुवात केली असता शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेकडे तक्रार केली. तिची दखल घेत अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेचे पथक आले. मैगुरे यांच्याशी त्यांची वादावादी झाली. मैंगुरे यांनी ही जागा शिवसेनेच्या मालकीची असून अतिक्रमण नसल्याचा पवित्र घेतला. दरम्यान, शिंदे गटाचे शहर प्रमुख किरण राजपूत तेथे आले. आमची शिवसेना खरी असून महापालिकेने अतिक्रमण त्वरित हटवावे अशी मागणी केली. त्यामुळे मैगुरे व राजपूत यांच्यात बाचाबाची, हमरीतुमरी झाली. शिवीगाळही केली. खोके हटविले जात नसल्याने पाहून राजपूत गटाने आक्रमक पवित्रा घेतला, त्याचे पर्यवसान मैगुरे व रजपूत यांच्या हाणामारीत झाले. पोलिस व महापालिका अधिकाऱ्यांनी दोन्ही गटांना रोखण्याचा प्रयत्न केला. 

ठाकरे गट खोके हटविण्यास तयार नसल्याने तब्बल चार तास महापालिकेचे पथक थांबून होते. उपायुक्त स्मृती पाटील व पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला. अखेर पाच वाजता बंदोबस्तात महापालिकेने अतिक्रमण हटविले. यावेळीही शिवसैनिकांच्या विरोधामुळे पोलिसांसोबत झटापट झाली. खोके काढण्यास विरोध करीत जमिनीवर झोपलेल्या मैगुरे यांना पोलिसांनी फरफटत नेऊन गाडीत घातले. महिला शिवसैनिकांही ताब्यात घेतले. त्यानंतर खोके जमीनदोस्त करण्यात आले.

 


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 1, 2024

PostImage

गुलाबी बोंडअळी नियंत्रण : फरदड घेणे टाळावे.कृषी विभागाचे आवाहन


वाशिम :  जिल्ह्यात खरीप हंगाम २०२३ मध्ये २३ हजार २६५ हेक्टरवर कापुस पिकाची लागवड करण्यात आली आहे. मुख्यत्वे मानोरा, कारंजा व मंगरूळपीर तालुक्यामध्ये सर्वाधिक पेरा आहे. कापुस पिकाच्या वेचण्या जवळपास पूर्ण झाल्या आहेत. कापुस पिकावरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवणे व पुढील वर्षी होणारा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी कापुस पिकाची फरदड न घेता डिसेंबरअखेर पिकाचे अवशेष उपटून किंवा कॉटन श्रेडरने काढावे. फरदड घेतल्यामुळे गुलाबी बोंडअळीचे जीवनक्रम अखंडित चालू राहते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी डिसेंबरअखेर कपाशी पीक काढून टाकावे. जिनिंग, प्रेसिंग मिल, गोडाऊन आणि मार्केट यार्ड या ठिकाणी कच्च्या कापसाची दीर्घकाळ साठवणूक केली जात असल्याने अशा साठवलेल्या कापसामध्ये राहिलेल्या गुलाबी बोंडअळीच्या अवस्था पुढील हंगामात घेतल्या जाणाऱ्या कापसाच्या पिकासाठी स्त्रोतस्थान म्हणून काम करतात. किडीस निरंतर खाद्य मिळत राहिल्याने पुढील हंगामात या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. कापूस फरदड निर्मुलन मोहीम घेऊन डिसेंबर महिन्यात प्रत्येक कापूस उत्पादक गावात फरदडमुक्त गाव करावे. जिनिंग, प्रेसिंग मिल, गोडाऊन, मार्केट यार्ड आणि कापूस खरेदी केंद्रे इ. ठिकाणी फेरोमेन ट्रॅप लावावे. गुलाबी बोंडअळीचे जीवनक्रम खंडित करण्यासाठी ५ ते ६ महिने कापूस विरहित ठेवावे. कपाशीची शेवटची वेचणी झाल्याबरोबर शेतात शेळ्या, मेंढ्या व इतर जनावरे चरण्यासाठी सोडवी. कपाशीच्या फरदडामध्ये किडीच्या सुप्त अवस्था राहत असल्याने त्यांची गंजी करून बांधावर ठेवू नये. पीक काढणीनंतर जमिनीची खोल नांगरट करावी, त्यामुळे जमिनीवर आलेले किडीचे कोष व इतर अवस्था नष्ट होतील. तरी सर्व शेतकऱ्यांनी डिसेंबरअखेर कापुस काढणी करून पुढील वर्षी येणाऱ्या किडीकरीता उपाययोजना कराव्यात. असे आवाहन जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह यांनी केले आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 1, 2024

PostImage

गौतम बुद्धाच्या पुतळ्याची विटंबना.! 


भद्रावती :-भद्रावती शहरातील ऐतिहासिक बुद्ध लेणी टेकडीवरील भगवान गौतम बुद्धाच्या पुतळ्याची अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना झाल्याची घटना दिनांक एक रोज सोमवारला पहाटेच्या वेळी उघडकीस आली. सदर घटनेनी संतप्त झालेल्या शहरातील बौद्ध बांधवांनी मोर्चा काढून या घटनेचा निषेध व्यक्त करीत या अज्ञात समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत भद्रावती येथील तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले आहे. सदर ऐतिहासिक बौद्ध लेणी टेकडीवर भगवान बुद्धाचा पुतळा होता. टेकडीवर हा पुतळा असल्याने तो सहजपणे दिसायचा. घटनेच्या दिवशी या परिसरात पहाटे फिरणाऱ्या काही व्यक्तींना हा पुतळा न दिसल्याने त्यांनी टेकडीवर जाऊन पाहणी केली असता पुतळ्याची तोडफोड झाल्याची आढळून आले. घटनेची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहरातील बौद्ध बांधव सुद्धा घटनास्थळी जमा झाले.त्यानंतर नाग मंदिरापासून निषेध मोर्चा काढून शहरातील व्यापाऱ्यांना भद्रावती बंदचे आवाहन केले केले. त्याला प्रतिसाद देत शहरातील व्यापारी प्रतिष्ठाणे बंद ठेवण्यात आली. त्यानंतर बौद्ध बांधवांतर्फे तहसीलदारांना निवेदन सादर करून या घटनेतील दोषी समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांचेवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. निषेध मोर्चात शहरातील बौद्ध बांधव तथा महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 1, 2024

PostImage

नववर्षाच्या प्रारंभीच भारताची अवकाश भरारी!क्सपोसॅट च्या यशासाठी इस्रोचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदनके.!जे.सोमय्या महाविद्यालयाचे केले कौतुक


मुंबई, दि.१: अवकाशातील वेधशाळेसह, दहा उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण आणि त्यांना इच्छीत कक्षेत प्रस्थापित करण्याचा भारतीय अवकाश संशोधन संस्था - इस्रोने  आज नववर्षाच्या प्रारंभीच विक्रम केला आहे. इस्रोच्या या 'एक्सपोसॅट' या महत्वाकांक्षी मोहिमेच्या अभूतपूर्व यशाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. तसेच इस्रोचे आणि या मोहिमेत सहभागी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

विशेष म्हणजे या मोहिमेतील दहा उपग्रहांपैकी एक उपग्रह मुंबईतील  के.जे.सोमय्या महाविद्यालयाचा आहे. यासाठीही मुख्यमंत्र्यांनी या महाविद्यालयातील या वैज्ञानिक उपक्रमशीलतेचे कौतुक करून यात सहभागी संशोधक विद्यार्थी, अध्यापक- तज्ज्ञांचे अभिनंदन केले आहे. 

'नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्रोने भारतीयांना एक वैज्ञानिक गिफ्ट दिली आहे. चंद्रयान - ३ मोहिम, आदित्य - एल १, गगनयान १ या लागोपाठ यशस्वी मोहिमांनी इसरोने भारतीयांची मान गौरवाने उंचावली आहे. या यशा पाठोपाठ आता अवकाश संशोधनाला मोठी गती मिळेल.   'एक्सपोसॅट'च्या यशाने भारतीयांचा अवकाश संशोधनातील आत्मविश्वास उंचावला आहे.  या यशामागे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैज्ञानिक आणि अवकाश संशोधनाला पाठबळ देण्याची भूमिका महत्त्वाची ठरली आहे, असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी इस्रोच्या या मोहिमेत सहभागी वैज्ञानिकांचे, संशोधक, अभियंते, तंत्रज्ञ तसेच तमाम विज्ञान जगताचे अभिनंदन केले आहे. इस्रोच्या पुढील सर्वच मोहिमांना, प्रयोगांसाठी सुयश चिंतिले आहे.
00000


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 1, 2024

PostImage

भरधाव वेगात येणाऱ्या मर्सिडीज कारने भाजीपाला घेऊन जाणाऱ्या आयशरला पाठीमागून जब्बर धडक .! तिघांचा मृत्यू


नाशिकः राज्यातील अपघातांचं प्रमाण वाढत असल्याचं चित्र आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिक - मुंबई महामार्गावर असलेल्या इगतपुरी तालुक्यातील बोरर्टेंभे येथे भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.भरधाव वेगातील मर्सिडीज कारने भाजीपाला घेऊन जाणाऱ्या आयशरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने आज पहाटेच्या सुमारास अपघात झाला आहे. या घटनेत ३ जण ठार तर १ जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. अपघातग्रस्त कारमधील प्रवासी हे मुंबईतील असल्याची प्राथमिक माहिती असून त्यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत.

भरधाव मर्सिडीजनं आयशरला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला आहे. अपघातात एमएच ०२ ईएक्स ६७७७ या क्रमांकाच्या मर्सिडीज कारचा चक्काचूर झाला आहे. या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. मर्सिडीज आणि आयशर अपघाताची माहिती मिळताच रूट पेट्रोलिंग टीम, टोल प्लाझा रुग्णवाहिका आणि महामार्ग पोलीस घोटी हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य सुरु केले. नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिल्याच दिवशी अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या अपघातानंतर टोल प्लाझा रुग्णवाहिका आणि रूट पेट्रोलिंग टीमने या ठिकाणी मदत कार्य राबवले त्यानंतर पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेत मृतदेहांचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवले असून जखमी अपघातग्रस्तांना देखील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघातातील जखमी सह मृत पावलेले मुंबई येथील असल्याची माहिती मिळाली असून त्यांचे अद्याप नावे समजू शकलेली नाही.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 1, 2024

PostImage

चरूर गावातील विद्यार्थ्यांनी मॅजिक उपक्रमाला भेट देत मावळत्या वर्षाला दिला निरोप व नवीन वर्षाचे केले स्वागत


भीसी, दि, १ जाने:- भद्रावती तालुक्यातील चरूर या गावातील शालेय विद्यार्थ्यांनी भिशी जवळील पुयारदंड येथील डॉ. रमेशकुमार गजबे शिक्षा संकुल येथे सुरू असलेल्या मॅजिक  उपक्रमाला दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी भेट दिली. यामुळे विद्यार्थ्यांनी एकप्रकारे मावळत्या 2023 या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि 2024 या वर्षाचे स्वागत करण्यासाठी शैक्षणिकसहलीचे आयोजन करून एक वेगळा पायंडा रोवला आहे, असे मत मॅजिक उपक्रमाचे मुख्य संयोजक वाल्मीक नन्नावरे यांनी व्यक्त केले.

चरूर या गावात नुकताच आदिवासी माना जमात व ग्रामवासी यांच्या वतीने वतीने नागदिवाळी उत्सव साजरा करण्यात आला.  यानंतर गावातील शालेय विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहलीचे आयोजन करून भिसी येथे सुरू असलेल्या मॅजिक उपक्रमाला भेट दिली. त्यामुळे वर्षाच्या शेवटच्या दिवशी रम-रमा-पार्टी यात गुंतलेल्या तरुणाईपुढे या विद्यार्थ्यांनी आदर्श निर्माण केला आहे. विद्यार्थ्यांनी मॅजिक ला भेट दिल्यानंतर त्यांनी मॅजिक उपक्रमाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली मॅजिक उपक्रम कसा चालतो. येथील विद्यार्थी नेमके काय करतात. त्यांची दैनंदिनी कशी असते. मॅजिक परिवाराच्या भविष्यातील नेमक्या कोणत्या योजना आहेत. अशी इत्यंभूत माहिती त्यांनी जाणून घेतली. त्यानंतर मॅजिकचे माजी विद्यार्थी आणि पोलीस विभागात  कार्यरत असलेले ज्ञानेश्वर जांभुळे यांनी उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे उत्तम मार्गदर्शन केले. यानंतर त्यांनी मॅजिकला अन्नधान्य व आर्थिक स्वरूपात भरघोस मदत सुद्धा केली. 

Caption

 

याप्रसंगी आदिवासी विद्यार्थी युवा संघटनेचे जिल्हाअध्यक्ष नंदकिशोर जांभूळे, ग्रामशाखेचे अमोल दडमल व गावातील नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Caption

 


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 1, 2024

PostImage

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक.! दुचाकीस्वार तरूणाचा मृत्यू.! अज्ञात वाहन घटनास्थळावरून पसार


सावली:-अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक जागीच ठार झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.विक्की अजय कोंकावार(२६) असे मृतकाचे नाव असून तो बोथली येथील रहिवासी आहे.

           नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरु आहे,या कामात तरुण वर्ग सजगपणे लागला आहे.सर्वत्र नव्या वर्षाच्या आगमनासाठी अनेक ठिकाणी तरुणाची मेजवानी सुरु आहे.या साठी निश्चित जागांची शोधाशोध सुरू असताना,अचानक सावली -बोथली मार्गावर एका तरुणाचा दुर्दैवी मुत्यु झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

     घटनेच्या दिवशी मृतक हा एम.एच. 34,सी.सी. 2165 होंडा स्पेलेंडर या दुचाकीने कामानिमित्य आपल्या स्वगाव बोथली वरुन सावली कडे येत असताना सावली वरून बोथली कडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाची जोरदार धडक झाली,त्यात रक्तबंबाळ अवस्थेत मृतक हा सावली -बोथली मार्गावरील वळणावर पडला होता.तर अज्ञात वाहनधारक घटनास्थळावरून पसार झाले आहेत.

        घटनेची माहीती होताच पोलीस कर्मचारी धावुन आले आणि पंचनामा करून मृतकाचे शव उत्तरीय तपासणी साठी ताब्यात घेतले.

         विशेष म्हणजे नुकताच अपघात झालेले ठिकाण हा वळणादार मार्ग असून आतापर्यंत या ठिकाणी अनेक जनांना आपला जीव गमवावा लागला आहे,तर कित्येक जण जखमी झाल्याचे बोलले जात आहे.

            नववर्षाच्या पुर्वसंध्येवर कुटुंबातील कर्तबगार तरुणाचा मुत्यु झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबावर दुख:चे डोंगर कोसळले आहे.मृतकाच्या पश्चात आई वडील, बहीण असा आप्त परीवार आहे.पुढील तपास सुरु आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 1, 2024

PostImage

आईचा प्रियकर निघाला सख्खा मित्रच..! अन्....


लातूर:-

जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भादा पोलिस ठाणे हद्दीतील वडजी गावातील एका युवकाचा झोपेत असताना डोक्यात व गळ्यावर वार करून अत्यंत निर्दयीपणे खून (Murder) केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली होती. या घटनेबाबत पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला होता. दरम्यान, आईसोबत नको त्या संबंधांचा संशय आल्याने मयत तरुणाच्याच मित्रानेच त्याची हत्या केल्याचं आता पोलीस तपासात समोर आले आहे. रणजित उर्फ बाळू तानाजी माळी (वय 22 वर्ष) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

रणजित हा अविवाहित असून आई-वडीलांना शेती व्यवसायात मदत करून दुग्ध व्यवसाय करायचा. शुक्रवारी नेहमीप्रमाणे रणजित आपल्या शेतात मुक्कामी गेला असताना रात्री उशिरा किंवा पहाटेच्या वेळी अज्ञात मारेकऱ्याने झोपेत असताना त्याच्या डोक्यात व गळ्यावर अत्यंत निर्दयीपणे धारधार कोयत्याने वार करून त्याचा खून केला. ही घटना शनिवारी रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस येताच याची माहिती भादा पोलिसांना देण्यात आली. सदरील घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरु केला होता. 

असा अडकला आरोपी... 
दरम्यान, पोलिसांकडून गावात चौकशी सुरु असतानाच मृत रंजितचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते आणि तिचा मुलगा रंजितचा खूप जवळचा मित्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ एका 17 वर्षीय मुलास चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याला विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिले. दरम्यान, याचवेळी याच तरुणाने गावातील एका मुलाकडून कोयत्याला धार लावून नेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली.

आदल्या दिवशी कोयत्याला धार लावून आणली...
मयत रंजित आणि आरोपी दोघेही चांगले मित्र होते. त्यामुळे एकमेकांच्या घरी त्यांचे येणेजाणे असायचे. दरम्यानच्या काळात रंजित आणि आपल्या आईचे अनैतिक संबंध असल्याचा आरोपीला संशय आला होता. त्यामुळे त्याने काही दिवस पाळत ठेवत खात्री केली. त्यामुळे मयत रंजितला कायमचे संपवण्याचा त्याने निर्णय घेतला. त्यानुसार आदल्या दिवशी कोयत्याला धार लावून आणली आणि रात्री रंजित गोठ्यात झोपला असतानाच त्याचा खून केला. 


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 1, 2024

PostImage

गुरुकुंज आश्रमाला विशेष बाब म्हणून ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा.!ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित .!श्री. मुनगंटीवार यांनी ग्रामविकास मंत्र्यांकडे केला होता पाठपुरावा


चंद्रपूर :-

 लाखो गुरूदेव भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या अमरावती जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गुरूकुंज आश्रमाला विशेष बाब म्हणून ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी ग्रामविकास मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता.

अमरावती येथील गुरूकुंज आश्रम जगाच्या कानाकोपऱ्यातील गुरूदेव भक्तांसाठी महत्त्वाचे स्थान आहे. थोर विभूती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची येथे समाधी आहे. राष्ट्रसंतांनी राष्ट्रभक्ती, जागृती, अंधश्रद्धा-जातीभेद निर्मूलन, ग्रामविकास यासाठी आपले आयुष्य वेचले. त्यांच्याद्वारे लिखित ग्रामगिता अनेकांना जीवन कसे जगावे यासाठी प्रेरणा देते. मध्यप्रदेश व महाराष्ट्र शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना स्वातंत्र्य संग्राम सैनिक म्हणून गौरविले आहे. १९३५ मध्ये गुरूकुंज मोझरी येथे राष्ट्रसंतांनी आश्रम स्थापन केले. हा केवळ आश्रम नसून गुरूदेव भक्तांसाठी ऊर्जास्रोत आहे, असे श्री. मुनगंटीवार यांनी आपल्या पत्रात नमूद केले होते.

राष्ट्रसंतांच्या या कार्याला ‘अ’वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, अशी आग्रही मागणीही त्यांनी ग्रामविकास मंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातून केली होती. त्यानुसार ग्रामविकास विभागाने २८ डिसेंबर २०२३ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे महासमाधी स्थळ श्रीक्षेत्र गुरूकुंज आश्रमाला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्रदान केला आहे. शासनाला यासंदर्भात विशेष बाब म्हणून तीर्थक्षेत्राला 'अ' दर्जा  मिळवून दिल्याबद्दल गुरूकुंज आश्रम व गुरूभक्तांकडून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त होत आहेत.

गुरूदेव भक्तांमध्ये आनंद

यापूर्वी राष्ट्रसंतांचे नाव नागपूर विद्यापीठाला देण्यासाठी माननीय सुधीर मुनगंटीवार यांनी विविध संसदीय आयुधांचा वापर करत सातत्यपूर्ण प्रयत्न विधिमंडळात आणि बाहेरही उभारत मोठी लढाई यशस्वी केली होती. हे सर्व गुरुदेव भक्तांच्या स्मरणात आहेत आणि आता गुरुकुंज आश्रमाला 'अ' तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्याने जगभरातील गुरुदेव भक्तामध्ये आनंद व्यक्त होत आहे.

श्री. मुनगंटीवार यांचा पाठपुरावा

गुरुकुंज आश्रमाला 'अ' वर्ग तीर्थक्षेत्राच्या दर्जा मिळावा म्हणून राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरुवातीपासून पाठपुरावा केला. ऑगस्ट 2023 पासून त्यांनी यासाठी ग्रामविकास विभागाकडे पत्रव्यवहार गेला. त्यांच्या पत्रव्यवहारानंतर ग्रामविकास विभागाने प्रधान सचिवांना या संदर्भात तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 'अ' वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळण्यासंदर्भात ग्रामविकास विभागाला प्रस्ताव सादर केला.

अंतिम मंजुरीसाठी पत्र

अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव शासनाला सादर केल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी ग्रामविकास विभागाचे या संदर्भात लक्ष वेधले. त्यानुसार 28 डिसेंबर 2023 रोजी ग्रामविकास विभागाने गुरुकुंज आश्रमाला 'अ' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्रदान केला.

०००००००


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 1, 2024

PostImage

पोहायला जाणे बेतले जीवावर.!१५ वर्षीय मुलाचा नदीपात्रात बुडून मृत्यु.!चंद्रपूर जिल्ह्यातील घटना 


चंद्रपूर:-

मावळत्या वर्षाला निरोप तसेच रविवारी सुटी असल्याने पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या चंद्रपूर शहरातील एका १५ वर्षीय मुलाचा बल्लारपूर तालुक्यातील हडस्ती - कढोली पुलाजवळील वर्धा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला.

ही घटना रविवारी सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास घडली. जीत रवींद्र गाऊत्रे (१५, रा. नगिनाबाग, चंद्रपूर) असे मृत मुलाचे नाव आहे.

रविवारी सकाळी ११:०० वाजता जीत आपल्या तीन मित्रांसह वर्धा नदीच्या हडस्ती - कढोली पुलाजवळ पोहण्यासाठी गेला होता. तिघेही पोहत असताना जीत खोल पाण्यात गेला. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. जवळील मित्रांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी नदीपात्रात धाव घेतली. मात्र, तो दिसला नाही. त्यानंतर चंद्रपूर शहर पोलिस स्टेशनला कळविण्यात आले. आपत्कालीन विभाग तसेच स्थानिक मच्छिमार महादेव मेश्राम व संबा मेश्राम या बंधूंच्या सहकार्याने त्याला शोधण्यात आले. मात्र, त्याचा मृतदेहच पाण्यातून बाहेर काढण्यात आला. चंद्रपूर शहर पोलिसांनी मर्ग दाखल केला. यावेळी बल्लारपूरचे प्रभारी तहसीलदार ओंकार ठाकरे, मंडळ अधिकारी चौधरी, तलाठी महादेव कन्नाके आदींची उपस्थिती होती. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 1, 2024

PostImage

११ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या चिमुकलीचा मृतदेह आढळला विहीरीत.! श्वान पथकाचा घ्यावी लागली मदत 


अकोला : जिल्ह्यातील पिंजर गावातून बेपत्ता झालेल्या सात वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह ११ दिवसांनंतर विहिरीत कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पिंजर येथील सात वर्षांचा चिमुकला शेख अफ्फान आयुब बागवान हा १९ डिसेंबर रोजी बेपत्ता झाला. पिंजर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली. चिमुकल्याच्या बेपत्ता होण्याच्या घटनेचे गांभीर्य ओळखून युद्ध पातळीवर शोधमोहीम पोलिसांकडून राबविण्यात आली. तरीही त्याचा शोध लागला नाही.

समाजमाध्यमातून माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. शेख अफ्फानचा शोध घेणाऱ्यास कुटुंबीयांनी बक्षीससुद्धा जाहीर केले. तरीही चिमुकल्याचा पत्ता लागला नाही. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांनी शेख अफ्फानच्या नातेवाइकांची भेट घेतली व परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणांची पाहणीसुद्धा केली. ३० डिसेंबर रोजी सायंकाळी गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक पिंजरमध्ये दाखल झाले. श्वान पथकाच्या मदतीने परिसरातील एका विहिरीत शेख अफ्फानचा मृतदेह दिसून आला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 1, 2024

PostImage

शेतीसाठी लावलेल्या कुंपणाला वीज प्रवाहाचा दोन महिलांना जब्बर धक्का.! दोन्ही महिलांचा मृत्यू.!


अमरावती : मोर्शी तालुक्यातील दहसूर येथे एका शेताच्या कुंपणातील वीज प्रवाहाच्या संपर्कात आल्याने दोन महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वर्षाच्या सरते शेवटी, ३१ डिसेंबर रोजी दुपारी घडली.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहसूर येथील राजू मधुकर काकडे (३५) यांनी कपाशी व तुरीच्या पिकाचे नुकसान होऊ नये, वन्य प्राण्यांपासून संरक्षण मिळावे, यासाठी शेताच्या कुंपणात विद्युत प्रवाह जोडला होता. दरम्यान, आज त्याने कापूस वेचण्यासाठी महिला मजुरांना शेतात पाठवले. स्वतः फवारणीसाठी घाटलाडकी येथे कीटकनाशक औषध आणण्यासाठी निघून गेला. दरम्यान, दहसूर येथील रुखमाबाई विठ्ठलराव नावंगे ( ७०), मीराबाई फगणू परतेती (३७) या दोन महिला कापूस वेचण्यासाठी गेल्या असता सर्वप्रथम रुखमाबाई नावंगे यांना विजेचा धक्का लागून त्या जागीच कोसळल्या हे पाहून सोबत असलेली मीरा हिने गावाकडे धाव घेतली असता दुसऱ्या ठिकाणी तिलासुद्धा विजेचा धक्का बसल्याने त्या सुद्धा खाली कोसळल्या.

दरम्यान राजू काकडे यांची पत्नी पिण्याचे पाणी घेऊन शेतात गेली असता तिला रुखमाबाई मृतावस्थेत आढळल्याने तिने गावात येऊन आरडाओरड केली. गावातील लोकांनी लगेच घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता रुखमाबाई व मीरा मृतावस्थेत दिसून आल्या. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी शेतात वीज प्रवाह सोडणाऱ्या आरोपी राजू मधुकर काकडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 1, 2024

PostImage

महिलेचा दगडाने ठेचून खून.!


सांगली : भावा-भावाच्या वादात एका महिलेचा दगडाने ठेचून खून करण्याचा प्रकार कडेगाव तालुक्यातील नेवरी येथे शनिवारी सायंकाळी घडला. या मारामारीत महिलेच्या पतीसह दीरही जखमी झाला असून या प्रकरणी दोन महिलांसह पाच जणांना रविवारी पोलीसांनी ताब्यात घेतले.नेवरी (ता. कडेगाव) येथे कौटुंबिक कारणातून अजय महाडिक व शरद महाडिक यांच्यात वाद झाला. या वादात प्रियांका अजय महाडिक (वय २५) हिच्यासह पती अजय महाडिक आणि चुलत दीर नवनाथ बाबूराव महाडिक यांच्यावर हल्ला करण्यात आला. महिलेला दगडाने ठेचून धारदार हत्याराने वार करण्यात आले. यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

याबाबत कडेगाव पोलिसात नोंद झाली आहे. याप्रकरणी मृत महिलेची सासू तारामती आप्पासाहेब महाडीक, दीर शरद आप्पासाहेब महाडीक, जाऊ उवला शरद महाडीक, पुतण्या अभिषेक शरद महाडीक या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शरद व अजय महाडिक हे सख्खे भाऊ आहेत. शरदचा मुंबई येथे रिक्षाचा व्यवसाय आहे. तो पंधरा दिवसांपूर्वी नेवरी येथे आला. शनिवारी सायंकाळी दोन्ही कुटुंबात भांडण सुरू झाले. रागाच्या भरात दीर शरद आणि पुतण्या अभिषेक याने धारदार शस्त्राने प्रियांकाच्या डोक्यावर व गळ्यावर तसेच, तिचा पती अजयच्याही डोक्यावर वार केले. त्यामुळे प्रियांकाचा जागीच मृत्यू झाला. तर भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या मयत महिलेचा चुलत दीर नवनाथ महाडीक जखमी झाला. त्यास स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुढील तपास कडेगाव पोलीस करत आहेत.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 1, 2024

PostImage

भावाने बहिणीचा गळा आवळून केला खून.! 


भंडारा:-

चारित्र्याच्या संशयावरून मोठ्या भावाचा बहिणीसोबत शाब्दिक वाद झाला. वादाचे पर्यवसान मारहाणीपर्यंत पोहचले, अशातच भावाने बहिणीचा गळा दाबला आणि तिचा मृत्यू झाला. सदर घटना भंडारा तालुक्यातील वरठी लगतच्या सोनूली येथे घडली.
वरठी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून आशिष गोपीचंद बावनकुळे (२२) याला अटक केली आहे. अश्विनी बावनकुळे (२०) असे मृत बहिणीचे नाव आहे. भंडारा तालुक्यातील वरठी नजीकच्या सोनूली या गावात रविवारी घडलेली ही घटना रात्री उशिरा उघडकीस आली. 

सोनूली येथे गोपीचंद बावनकुळे आपल्या परिवारासह अनेक वर्षांपासून राहतात. ते एक मुलगा व मुलगी आणि पत्नी सोबत राहत असून आई वडील मोलमजुरी करतात. घटनेच्या दिवशी आई साकोली व वडील कन्हान ला कार्यक्रमानिमित्त गेले होते. दरम्यान आशिष व त्याची बहीण अश्विनी दोघे घरी होते.

दुपारी दोघात प्रेमप्रकरणावरून शाब्दिक वाद झाला. क्षुल्लक वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. वाद एवढा विकोपाला गेला की आशिषने अश्विनीच्या नाका-तोंडावर बुक्क्या हणल्या. एवढ्यावरच न थांबता तिचा गळा आवळला. यात नकळत ती गतप्राण झाली. घटनेनंतर कुठेही वाच्यता न करता तो गावातच थांबून राहिला. आपल्या हातून घडलेले कृत्य लपविण्यासाठी त्याने लहान बहीण छतावरून पडल्याचे आईवडिलांना सांगितले. सायंकाळपर्यंत गावातही शुकशुकाट होता.
दरम्यान, पोलीस पाटीलांनी घटनेबाबत पोलिसांना सायंकाळी सूचना केली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सामान्य रुग्णालयात हलवला. तो पर्यंत पोलिस यंत्रणा घटनेचा शोध घेण्यास कामाला लागली. गळ्यावर दाबल्यागत खुणा दिसत असल्याने पोलिसांनी तपासाची गती वाढवली व आशिषला विचारपूस केली. यावेळी तो पोलिसांसोबत दवाखान्यात होता. शवविच्छेदन अहवालात सर्व उघड होण्याची कल्पना येताच त्याने रात्री दवाखान्यातच खुनाची कबुली दिली. पोलिसांनी या प्रकरणी भादंवि ३०२ अन्वये गुन्हा नोंद करून आशिषला ताब्यात घेतले. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक अभिजित पाटील व उपनिरीक्षक महेंद्र शहारे, हवालदार विनायक बेदरकर करीत आहेत.

परिक्षेकरिता आली होती स्वगावी

अश्विनी नागपूरला मावशीकडे राहायची. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने ती नागपूरला व्यावसायिक शिक्षण घेत होती. १२ वी नंतर तिने भंडारा येथील महाविद्यालयात तात्पुरता प्रवेश घेतला होता. सध्या हिवाळी परीक्षा सुरू असल्याने ती परीक्षा देण्यासाठी २२ तारखेला सोनूली येथे आली होती.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 1, 2024

PostImage

पत्नीने दगडाने ठेचून केली पतीची हत्या.! कशासाठी केली हत्या वाचाच सविस्तर वृत्तांत


नागपूर: दारू पिण्यासाठी पैशाच्या तगादा लावण्याच्या वादातून संतप्त पत्नीने दगडाने डोके ठेचून पतीची हत्या केली. ही थरारक घटना नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आवंढी येथे उघडकीस आली. आनंद भदुजी पाटील (४५) असे मृतकाचे नाव आहे. अरुणा पाटील असं मारेकरी पत्नीचे नाव आहे. आनंद हा श्रमिक होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदला दारूचे व्यसन असल्याने ते भागविण्यासाठी तो पत्नीकडे नेहमी पैसे मागायचा. शनिवारी रात्रीही त्याने पत्नीकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पत्नीने पैसे देण्यास नकार दिला. दोघांमध्ये वाद झाला. काही वेळाने आनंद हा झोपला. सतत वाद घालत असल्याने अरुणा संतापल्या. आनंद झोपेत असतानाच त्यांनी दगडाने डोके ठेचून त्याचा खून केला. रात्रभर त्या मृतदेहासोबत राहिल्या. रविवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास अरुणा यांनी घराला कुलूप लावले. थेट नवीन कामठी पोलीस ठाणे गाठले. पतीची हत्या केल्याची माहिती दिली.
३१ डिसेंबरला आमटी-भाकरीचा बेत, आगडगावची परंपरा राज्यासाठी रोल मॉडेल, इतर गावांनी घेतला आदर्श

पोलिसांमध्ये काही काळ खळबळ उडाली. लगेच पोलिसांचा ताफा आवंढी येथे पोहोचला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हॉस्पिटलकडे रवाना केला. याप्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून अरुणा यांना ताब्यात घेतले आहे. अरुणा यांना मयूर नावाचा मुलगा आहे. तो श्रमिक असून काही दिवसांपूर्वीच मयूर हा पुण्याला गेला आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Dec. 31, 2023

PostImage

विद्युत स्पर्शाने हत्तीचा मृत्यू.!



गडचिरोली जिल्ह्यातील पलसगड वाढोणा या परिसरात एका हत्तीचा मृतदेह आढळुन आला आहे. विद्युत स्पर्शाने या हत्तीचा मृत्यू झाला असल्याचे उघड झाले असून तस्करीसाठी हा सापळा लावण्यात आल्याचे ही सांगितले जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यामध्ये ही घटना घडली असून हत्तीच्या अवयवांच्या तस्करीसाठी ही शिकार केल्याचे सांगितले जात आहे. शिकारी आणि तस्करी याचे प्रमाण वाढले आहे. हत्तीच्या दातांची तसेच इतर अवयवांची तस्करी करण्यात येते. या तस्करीसाठी हत्तींच्या शिकारीचे प्रमाण वाढले असून खुले आम वनहत्तींची शिकार केली जात आहे. वनविभाग याला आळा घालण्यासाठी कोणते उपाय करणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Dec. 31, 2023

PostImage

हातमोज्याच्या कंपनीला भीषण आग; आगीत सहा जणांचा मृत्यू


त्रपती संभाजीनगमधील एमआयडीसीमध्ये हातमोजे बनविणाऱ्या शनिवारी मध्यरात्री २ वाजता भीषण आग लागली. या आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या आगीने ३ वाजता रौद्र रूप धारण केले. यात १५ कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, ६ कर्मचाऱ्यांना घाटी रुग्णालयात बेशुद्धावस्थेत हलविण्यात आले होते. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वाळूज औद्योगिक वसाहतीमधील २१५-१६ सेक्टरमध्ये हँड ग्लोव्हज तयार करणारा सनशाईन इंटरप्राईज हा कारखाना आहे. यात २०० हून अधिक कर्मचारी काम करतात. शनिवारी मध्यरात्री रच्या सुमारास कंपनीत मोठा स्फोट झाला. काय झाले, हे कळायच्या आत कंपनीतून मोठ्या प्रमाणात धूर निघण्यास सुरुवात झाली. काही क्षणात कंपनीला आगीने वेढले. 

वाळूज एमआयडीसी परिसरात असलेल्या कारखान्याला आग लागली असून कामगार अडकल्याचे स्थानिकांनी कळविले होते. आग लागल्यानंतर इमारतीतून लोक मदतीसाठी आरडाओरडा करताना दिसले होते. कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, इमारतीत सहा कर्मचारी अडकले आहेत. भुल्ला शेख (65), कौसर शेख (26), इक्बाल शेख (26) आणि मगरूफ शेख (25) अशी अडकलेल्या चार कर्मचाऱ्यांची नावे आहेत. 

सहायक पोलीस आयुक्त अशोक थोरात, अग्निशमन विभागाचे वैभव बाकडे यांनी धाव घेतली. थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण १ वाजून २० मिनिटांनी कंपनीला आग लागल्याची माहिती मिळाली, अग्निशमन विभागाने धाव घेईपर्यंत कंपनीला चहूबाजूंनी आगीने वेढले होते. आग वाढेपर्यंत जवळपास १६ ते १८ कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले. सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून आग विझविण्याचे काम सुरु असल्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी मोहन मुंगसे यांनी सांगितले. 

 


PostImage

युवाक्रांती समाचार

Dec. 31, 2023

PostImage

हायप्रोफाईल रेव्ह पार्टी करणे पडले अंगलट.! पोलिसांची धाड, ५ तरुणींसह १०० तरुण ताब्यात


नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबईपासून जवळ असलेल्या ठाणे येथे नववर्षाच्या पूर्वसंध्येला होणारी एक हायप्रोफाइल रेव्ह पार्टी ठाणे पोलिसांनी उधळून लावली आहे.नववर्षापूर्वी मुंबईजवळ हायप्रोफाइल रेव्ह पार्टी उधळली, पोलिसांची धाड, ५ तरुणींसह १०० तरुण ताब्यात

नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबईपासून जवळ असलेल्या ठाणे येथे नववर्षाच्या पूर्वसंध्येला होणारी एक हायप्रोफाइल रेव्ह पार्टी ठाणेपोलिसांनी उधळून लावली आहे. नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला रेव्ह पार्टी करण्यासाठी जमलेल्या सुमारे १०० लोकांना ठाणे क्राइम ब्रँचने धाड टाकून ताब्यात घेतले आहे. ठाण्यातील जंगलामध्ये काही तरुण आणि तरुणी नव्या वर्षाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी जमले होते. मात्र या रेव्ह पार्टीची कुणकूण पोलिसांना लागली आणि सगळ्याचा भांडाफोड झाला. रेव्ह पार्टीच्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणावर दारू आणि नशेची सामुग्री सापडल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी धाड टाकली आणि सुमारे १०० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यात पाच तरुणींचाही समावेश आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे पोलिसांनी ही धाड टाकली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शेकडो जणांपैकी दोघे जण असे आहेत ज्यांनी या रेव्ह पार्टीचं आयोजन केलं होतं. ठाणे क्राइम ब्रँडच्या पथकाने सुमारे २ वाजता ही कारवाई केली होती. छापेमारीदरम्यान पोलिसांच्या पथकाने एलएसडी, मरिजुआनासह विविध अवैध अमली पदार्थ सापडले आहेत. हे पदार्थ जप्त करण्यात आले आहे. 

 


PostImage

युवाक्रांती समाचार

Dec. 31, 2023

PostImage

रेती तस्करी करण्यासाठी गेलेल्या रेती चोर युवकावर वाळूचा ढीग कोसळून मृत्यु 


सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातल्या खंडनाळमध्ये वाळू चोरी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. वाळू तस्करांनी साठवलेल्या वाळूचा ढिगारा अंगावर कोसळल्याने ढिगाऱ्याखाली अडकून तरुण ठार झाला आहे. जत तालुक्यातील बोर नदी पात्रात सदरची दुर्दैवी घटना घडली. सचिन सयाप्पा कुलाळ (वय २५, रा. कुलाळवाडी, खंडनाळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेत एक जण जखमी झाला. यामध्ये संशयित आरोपी सुरेश टेंगले, बिरुदेव टेंगल या दोघांविरुद्ध जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सचिन कुलाळ हा पत्नी, मुले, आई-वडिलांसमवेत राहत होता. शुक्रवारी रात्री खंडनाळ गावातील ट्रॅक्टर मालक सुरेश टेंगले यांनी त्यास वाळू भरण्यासाठी घेऊन गेले. रात्री चार-पाच मजूर मिळून बोर नदीपात्रातील वाळू चोरून ट्रॅक्टरमध्ये भरत होते. यावेळी नदी पात्रात वाळू उपशाने खोल खड्डा पडला होता.
रात्रीची वेळ असल्याने वाळू भरताना ढिगाऱ्याचा अंदाज आला नाही. वाळू उपसताना बाजूचा ढिगारा थेट अंगावरच कोसळला. सचिन पुढे असल्याने ढिगाऱ्याखाली सापडला. वाळूची ढेकळे असल्याने सचिनला डोक्याला, पाठीला जोराचा मार लागला. तो जागेवरच बेशुद्ध पडला. या दुर्घटनेत मजूर आकारम करे हा जखमी झाला. या घटनेत सचिनचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयितांवर गुन्हा दाखल करत एकास अटक केली आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Dec. 31, 2023

PostImage

जेसीबी व ट्रॅक्टर च्या सहाय्याने पर्यटन क्षेत्रात अवैधरित्या मुरूमाचे उत्खनन सुरू


चंद्रपूर : - ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील खडसंगी बफर झोन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर JCB ने जंगलामध्ये मोठं - मोठी खड्डे करून त्यातील मुरूम ट्रॅक्टर च्या सहाय्याने जंगल सफारी करीता तयार करण्यात आलेली रस्ते दुरुस्ती करीता पांढरा तसेच लाल मुरूम वापरला जात आहे. परंतु या खड्ड्यात पडून वन्य प्राणी यांना मृत्यूस झुंज देत जीवन घालवावे लागत असल्याने याकडे खडसंगी बफर वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे नेहमीच हेतुपुरस्सर दुर्लक्ष होतांना दिसत आहे.काही दिवसागोदर खडसंगी जवळील वहानगाव येथे दोन वाघांच्या झुंजीत बजरंग असे नाव असलेल्या वाघाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आज आपण दैनंदिन चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कुठे ना कुठे वन्य प्राणी यांचे मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे.असे चित्र बघत आहोत.तसेच आता जेमतेम हिवाळी अधिवेशन संपले या अधिवेशनाला मोठं - मोठ्या नेत्यांनी नागपूर याठिकाणी हजेरी लावली होती. या दरम्यान सुप्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये सिने अभिनेता असो वा अभिनेत्री , मंत्री असो अथवा आमदार - खासदार तसेच भारत रत्न पुरस्काराने सन्मानित असलेले सचिन तेंडुलकर यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वीच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात हजेरी लावली होती.या अभयारण्यास JMFC कोर्ट असो अथवा जिल्हा सत्र न्यायालय वा हायकोर्ट असो कि सुप्रीम कोर्ट येथील न्यायाधिशांनी सुद्धा या व्याघ्र पर्यटन स्थळी भेट दिली आहे. परंतु अजूनही या दैनंदिन होत चाललेल्या वन्य प्राण्यांच्या मृत्यूचे कारण तथा प्राण्यांच्या जखमी होण्याचे कारण समोर येऊ शकले नाही. याबाबत वनमंत्री यांनी वरिष्ठ स्तरावरून चौकशी लावून संपूर्ण ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पिंजून काढून कोट्यवधी रुपयांची बफर असो अथवा कोअर  झोन याठिकाणी झालेल्या कामांची चौकशी करून दोषी अधिकारी यांचेवर कारवाई करण्यात यावी.जेणेकरून वन्यजीव यांना कसलीही हानी निर्माण होणार नाही. व जंगल वाचवा वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 (1972 चा 53), वन्य प्राण्यांच्या विविध प्रजातींचे संरक्षण, त्यांच्या अधिवासाचे व्यवस्थापन आणि वन्य प्राण्यांच्या शरीराच्या विविध भागांपासून मिळणाऱ्या उत्पादनांच्या व्यापाराचे नियमन आणि नियंत्रण यासाठी कायदेशीर नियम आहे. म्हणून जंगल तसेच वन्य जीव यांचे संरक्षण करण्यासाठी याकडे वनमंत्री तसेच वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Dec. 30, 2023

PostImage

रेती तस्करी करीता रेती तस्करांनी तयार केला चक्क नदीपात्रातून रस्ता.!अपर जिल्हाधिकारी पोहोचताच घाम फुटला, थेट कारवाईचे निर्देश


गडचिरोली : अहेरी उपविभागात रेती नसल्याने सध्या रेती तस्करी मोठ्या जोमात आहे. एवढंच काय तर नदी पत्रात चक्क तयार करून राजरोसपणे रेती तस्करी असल्याचा धक्कादायक प्रकार भामरागड तालुक्यात समोर आला आहे. नुकतेच अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी भेट देऊन हा प्रकार डोळ्याने बघितल्यावर चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देताच एकच खळबळ उडाली आहे. भामरागड तालुका मुख्यालयात इंद्रावती, पामुलगौतम आणि पर्लकोटा या तीन नद्यांचा संगम आहे. येथील बारमाही वाहणाऱ्या नदीमध्ये उत्तम दर्जाची रेती आहे. या रेतीवर आता तस्करांची नजर पडली असून नदीपात्र पोखरण्यासाठी चक्क रस्ताच तयार केला आहे. हा सगळा प्रकार त्रिवेणी संगमाजवळ सुरू असून घनदाट जंगलातून नदी पत्रात मुरुम टाकून चक्क रस्ता तयार करण्यात आला आहे. या नदी पत्रातून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरू असल्याचा प्रकार लक्षात येताच अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनीस्थानिक महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळ गाठले तेव्हा रेती तस्करी साठी तयार केलेला रस्ता आणि पोखरलेला नदीपात्र बघून सर्वांचे डोळे चक्रावले. लगेच अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी जेसीबी बोलावून तयार केलेला रस्ता तोडायला लावला. एवढेच नव्हेतर किती ब्रॉस रेती उत्खनन करण्यात आली आणि हे रेती तस्कर कोण? याची योग्य चौकशी करण्याचे निर्देश संबंधित तहसीलदारांना दिले. त्यामुळे भामरागड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. 
विशेष म्हणजे स्थानिक महसूल प्रशासन आणि वनविभागाच्या कार्यप्राणालीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अतिदुर्गम अशा भामरागड तालुक्यात विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात बांधकाम केली जात आहेत. मात्र, याठिकाणी रेती घाटच नाही तर रेती येते तरी कुठून ? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आता स्वतः अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन हा सगळा प्रकार उघळकीस आणल्याने तस्करांचे धाबे दणाणले आहेत. त्रिवेणी संगम परिसरातील नदी पत्रात जाण्यासाठी बांधकामकेल्याचे आढळले. मात्र, याठिकाणी रस्ता कुठलेच गाव नसताना हा रस्ता नेमकं कशासाठी तयार केला असावा म्हणून प्रत्यक्ष पाहणी केली तेंव्हा हा सर्व प्रकार समोर आला. तालुका मुख्यालयात राजरोसपणे रेती तस्करी होणे ही अत्यंत गंभीर बाब असून लगेच मोरूम टाकून तयार केलेला रस्ता तोडण्यात आले व योग्य चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश तहसीलदार यांना दिले आहे.

 

 


PostImage

युवाक्रांती समाचार

Dec. 30, 2023

PostImage

शेतात काम करण्यासाठी गेलेल्या महिलेवर रानटी डुकराचा जीवघेणा हल्ला.! महीला गंभीर जखमी 


चीमुर:-

नेरी वरून जवळ असलेल्या नवतळा येथील शेतात काम करीत असलेल्या महिलेवर रानटी डुकराने हमला करून जखमी केले सदर हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून चिमूर येथील उपजिल्हारुग्णालयात उपचार घेत आहे सुदैवाने आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेतल्याने जीवितहानी टळली.नवतळा येथील शालिनी मारोती बारसागडे वय अंदाजे 60 वर्षे ही सकाळी 10 वाजता शेतातील काम करण्यासाठी शेतात गेली असता शेतात एकटीच होती ऐन दुपारी 12 वाजता दरम्यान ऐका रानटी डुकराने शेतात आगमन करीत सरळ शालिनी बाईवर हल्ला चढवला मात्र शालिनी ला या डुकराचा मागोवा सुद्धा लागला नाही ती तुरी च्या शेंगा तोडीत होती रानटी डुकराची धडक इतकी जोरदार होती की सरळ पाळीवरून खाली कोसळली यामध्ये तिला गंभीर मार लागला व ती जखमी झाली खाली पडताच ती जोरात ओरडल्याने आजूबाजूच्या शेतातील नागरिक तिच्या आवाजाच्या दिशेने धावले लोकांना पाहून रानटी डुकर पसार झाला.त्यामुळे सुदैवाने तिचे प्राण वाचले सदर शेतकऱ्यांनी तिला उचलून घरी नेले व तात्काळ वाहन करून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले वृत्त लिहिपर्यत वनविभाग पोहचले की नाही याची माहिती मिळाली नाही सदर महिलेला वनविभागाने उपचारासाठी मदत द्यावी अशी मागणी गावकरी करीत आहेत.


PostImage

युवाक्रांती समाचार

Dec. 30, 2023

PostImage

स्टेम पोद्दार स्कूल व्यवस्थापनाकडून शेतकऱ्यावर होणार अन्याय त्वरित थांबवावा अन्यथा आमरण उपोषण :- अन्याग्रस्त शेतकऱ्यांची मागणी.


कृष्णा वैध ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी  :- तालुक्यातील तुमडीमेंढा येथील सरकारी जागेवरील शेतकऱ्यांच्या शेताला पाणी देणाऱ्या तलाव व इतर जागेवर अतिक्रमण करून तसेच शेतकऱ्यांना  वाटपात  मिळालेल्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या स्टेम पोद्दार स्कूल व्यवस्थापन मंडळींवर प्रशासनाने व सरकारने हस्तक्षेप करून सखोल चौकशी करून कारवाई करावी व पिढीत अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा गावातील संपूर्ण शेतकरी स्टेम पोद्दार स्कूल व्यवस्थापना विरुद्ध येत्या महिन्याभरात आक्रमक होत आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा स्थानिक शासकीय विश्राम गृहात घेतल्या गेलेल्या पत्रकार परिषदेतून पिढीत शेतकऱ्यांनी दिला.

सविस्तर वृत्त असे की, मौजा तूमडीमेंढा येथील शासकीय जागेवर गट क्रमांक १० व ११ या गट नंबर परिसरात गट नंबर १० मध्ये १०.९४ हे. आर तसेच गट क्रमांक ११ मध्ये 10.५२ हे. आर अशा क्षेत्रात तलाव असून या तलावामुळे परिसरातील शेतकऱ्यांना पिकासाठी ओलिताची सोय होते.तसेच जनावराच्या पिण्याच्या पाण्याची सोय होत असते.परंतु सन २०१७-१८  या वर्षात गैरअर्जदार मे.विजय किरण मेंनजमेंट एज्युकेशन इन्स्टिट्युट नागपूर तर्फे  डायरेक्टर किरण  विजय वडेट्टीवार यांनी स्टेम पोद्दार लर्न स्कूल संस्था स्थापन करण्यासाठी तलाव परिसरातील जागेवर अतिक्रमण करून शेतकऱ्यांना जाण्यासाठी तलावाची पाळ व पांदन रस्त्यावर अतिक्रमण केले व सन २०२०-२१  या वर्षात  सरकारच्या अतिक्रमण जागेवर स्कूल ची इमारत बांधली त्यामुळे शेतकऱ्यांना पांदन रस्त्याने येण्या जाण्याचा मार्ग बंद केला तसेच तलावाखाली असलेल्या शेतकऱ्यांच्या. शेतीला मिळणारा पाणी बंद केला व जनावरांना पाणी मिळणे कठीण झाले . गट क्रमांक १०,११,३,९,5,१५,१६,१७,१८,२२,१४,२१,४,२,१३,९३ ही जागा तलाव परिसराला लागून असल्याने यामध्ये वनविभाग ,महसूल विभागाची जमीन आहे तसेच सन १९७२-७३ या काळात शासनाने भूमिहीन लोकांना शेती वहिवाटीकरिता भुस्वामी करून पट्टे दिले अशा लोकांना देखील स्टेम पोद्दार लर्न स्कूलच्या व्यवस्थापनाकडून पैशाच्या जोरावर अधिकाऱ्यावर दबाव आणून शासनाची व शेतकऱ्यांची जमीन आपल्या ताब्यात घेतली.याच परिसरात खरबी ,माहेर , तुमडी मेंढा  येथील अनेक शेतकऱ्यांची जमीन आहे.सन २०२१ पासून आतापर्यंत शासनाला सबंधित उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांना कितेकदा विनंती  अर्ज  करून न्यायासाठी मागणी केली मात्र राजकीय दबावाखाली असलेल्या संपूर्ण अधिकारी वर्गाने शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून उलट राजकीय व सत्तापिपासू लोकांना मदत केली व शेतकऱ्यांवर अन्याय केला. त्यामुळे खरबी,माहेर तुमडीमेंढा येथील ग्रामस्थांनी तलाव आणि परिसरातील शासकीय जागेवर गैरअर्जदार यांनी केलेले अतिक्रमण  त्वरित काढावे अन्यथा तिन्ही गावातील नागरिक स्टेम पोद्दार लर्न स्कूलच्या समोर ठिय्या आंदोलन करून संपूर्ण कुदुंबसहित आमरण उपोषणाला बसू असा इशारा  शेतकऱ्यांनी स्थानिक शासकीय विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेतून दिला.  या पत्रकार पत्रकार परिषदेत गावातील गुलाब बागडे,नारायण अमृतकर,भगवान मेश्राम,सचिन बागडे,विश्वेश्वर अमृतकर तसेच तुंमडी मेंढा येथील सरपंच व सदस्य तसेच मोठ्या संख्येत महिला व गावकरी पत्रकार परिषदेत उपस्थित होते.


PostImage

युवाक्रांती समाचार

Dec. 30, 2023

PostImage

रानटी हत्तीच्या हल्ल्यात महीला ठार.! रानटी हत्तींचा हैदोशामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण 


गडचिरोली, दि. ३० : जिल्ह्यात रानटी हत्तीच्या कळपाने धुमाकुळ माजवला असून आता रानटी हत्तीने आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथील महिलेला ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. कौशल्या राधाकांत मंडल रा. शंकरनगर ( वय ६७ ) असे मृतक महिलेचे नाव आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा परिसरात दोन दिवसांपूर्वी रानटी हत्तींच्या कळपाने धुमाकुळ माजवत घरांचे नुकसान केले होते. कसेबसे नागरिकांनी यावेळी आपला जीव हत्तीच्या तावडीतून वाचवला. दरम्यान २९ डिसेंबर च्या रात्री शंकरनगर येथील जंगलालगत शेतशिवारात असलेल्या घरात मंडल कुटुंब असतांना जवळपास साडेदहा वाजताच्या सुमारास आपल्या परिसरात हत्ती आल्याचे त्यांना कळाले. हत्ती आपल्याला नुकसान पोहचवतील या भीतीने ते गावाकडे जाण्यास निघाले असता हत्तीने कौशल्या मंडल हिच्यावर हल्ला करून ठार केल्याचे कळते. सदर घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून संतापही व्यक्त केला आहे.
घटनेची माहिती मिळताच वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आल्याचे कळते. रानटी हत्तीच्या दहशतीत नागरिक असून हत्तीचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. दरम्यान तालुक्यात आता वाघासह हत्तीच्या दहशतीने नागरिक भयभीत झाले आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Dec. 29, 2023

PostImage

३४ लाखांच्या दारूवर पोलिसांनी फिरविला रोडरोलर


गडचिरोली:- आष्टी व देसाईगंज पोलिसांनी विविध कारवायांमध्ये जप्त केलेली सुमारे ३४ लाख रुपये किमतीची दारू न्यायालयाच्या परवानगीनंतर रोडरोलर चालवून नष्ट करण्यात आली आहे.गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असल्याने जिल्ह्यात दारूची निर्मिती, वाहतूक व विक्रीवर बंदी आहे.

त्यामुळे नजीकच्या चंद्रपूर जिल्ह्यातून दारू आणली जाते. देसाईगंज व आष्टी पोलिस ठाण्यांतर्गतची गावे चंद्रपूर जिल्ह्याला लागून आहेत. वैनगंगा नदी पार करून दारू गडचिरोली जिल्ह्यात आणली जाते. मात्र, पोलिसांकडून ते सुटू शकत नाही. कारवाई करून पोलिस दारू पकडतात. पुढे ही दारू न्यायालयाच्या निर्देशापर्यंत गोदामातच ठेवावी लागते. न्यायालयाने परवानगी दिल्यानंतरच दारू नष्ट करता येते.
आष्टी पोलिसांनी २०१६ ते २०२१ या पाच वर्षांच्या कालावधीत सुमारे १८ लाख रुपयांची देशी व विदेशी दारू जप्त केली. चामोर्शीचे न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशान्वये व उत्पादन शुल्क विभाग गडचिरोली यांच्या परवानगीने आष्टी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या उपस्थितीत दारू साठा नष्ट करण्यात आला. देसाईगंज पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये १६७ कारवाया करीत १६ लाखांची दारू जप्त केली होती. सदर दारू नष्ट करण्यात आली. रोडरोलर चालवून दारूच्या बॉटल फोडल्यानंतर बॉटलचा चुरा खोदलेल्या खड्ड्यात टाकण्यात आला. यावेळी देसाईगंज पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी किरण रासकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहकारी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


PostImage

युवाक्रांती समाचार

Dec. 29, 2023

PostImage

महाराष्ट्रातील नोकर भरती बंद असल्यामुळे मुलांचे झाले वाटोळे:- लोकनायक प्रकाशभाऊ पोहरे  


( डॉ. पंजाबराव देशमुख शतकोत्तर जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त ब्रह्मपुरी येथे लोकनायक प्रकाशभाऊ पोहरे व प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांची उपस्थिती)      

                                  ब्रम्हपुरी/ प्रतिनिधी:-- राज्यात गेल्या नऊ वर्षापासून अनुकंपा तत्त्वाची नोकर भरती, आठ वर्षापासून वर्ग तीन व वर्ग चार ची नोकर भरती तसेच 20 20 पासून सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग सोडता सर्व विभागाची नोकरी भरती बंद आहे. राज्यात 2 लाख 57 हजार पदे (जागा) रिक्त आहेत. कारण सरकारकडे  पगार देण्याची काही सोय नाही. तरुणांना नोकऱ्या मिळणार नाही व त्या विदर्भ राज्य झाल्यासच मिळणार आहे. देशाचे प्रथम  कृषिमंत्री डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी शिक्षणाचे दरवाजे मोकळे केले होते. परंतु या सरकारने शिक्षणाचे दरवाजे बंद करण्याचा तिढा हाती घेतल्यामुळे आजच्या मुलाचे नोकरीचे वाटोळे झाले आहे. असे मत ब्रह्मपुरी येथे डॉ. पंजाबराव देशमुख शतकोत्तर जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त व्यक्त केले..                                    आधुनिक भारतातील कृषी क्रांतीचे जनक व भारताचे प्रथम कृषिमंत्री डाँ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचा शतकोत्तर  जयंती उत्सव  सोहळा ब्रम्हपुरी पंचायत समितीच्या सभागृहात आयोजीत करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार अतुलभाऊ देशकर तर सुप्रसिद्ध वक्ते म्हणून दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक लोकनायक प्रकाशजी पोहरे व लोकजागर अभियानचे अध्यक्ष प्रा. ज्ञानेश वाकुडकर, प्रमुख अतिथी म्हणून माजी प्राचार्य प्रा. डाँ. देविदास जगनाडे, माजी प्राचार्य डाँ. नामदेवराव कोकोडे, प्राचार्य देवेशजी कांबळे, सहाय्यक गटविकास अधिकारी घुबडे पंचायत समिती ब्रम्हपुरी,कार्यक्रमाचे संयोजक व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रकाशजी बगमारे आदी मान्यवर उपस्थित होते.    
                 कार्यक्रमाप्रसंगी बोलतांना ज्ञानेश वाकुडकर यांनी देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने अनेक संस्था आहेत, अनेक विद्यापीठे आहेत. आजही  त्यांचे कार्य प्रेरणा देत आहेत. भाऊसाहेबांनी दिशा देण्याचे कार्य केले आहे. त्यांनी समाजकार्य करीत असताना सत्याची बाजू नेहमी घेतली आहे. एवढेच नव्हे तर महापुरुषाच्या जयंती, पुण्यतिथी साजरा करा व महापुरुषाचे विचार जीवनामध्ये आणावे असे कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. व अन्य मान्यवरांनी आधुनिक भारतातील कृषी क्रांतीचे जनक व भारताचे प्रथम कृती कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जीवन कार्यावर  प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.प्रकाश बगमारे तर संचालन व आभार भगवानजी कन्नाके यांनी केले.


PostImage

युवाक्रांती समाचार

Dec. 28, 2023

PostImage

साक्षगंधाकरीता जात असतांना वाहनाचा भीषण अपघात.!दीड वर्षीय बालकासह दोन महिला जागीच ठार…


गोंदिया,:-

 तिरोडा- गोंदिया मार्गावर भरधाव टवेरा वाहनास झालेल्या अपघातात दीड वर्षीय बालक व दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर इतर लोक जखमी झाल्याच्या दुर्दैवी घटनेमुळे करटी(तिरोडा) व मजीतपूर येथे शोककळा पसरली आहे.

तिरोडा तालुक्यातील करटि येथील एका कुटुंबाचे गोंदिया जिल्ह्यातील मज्जिदपूर येथे लग्न ठरल्याने साक्षगंधा करता टवेरा क्रमांक एम. एच. 40 ए 4243 ही 16 लोकं घेऊन मजीदपूरकडे जात असता भरधाव वेगाने जाणारी टवेरा वाहनाचे संतुलन बिघडल्याने वाहन चार-पाच पलट्या मारत रस्त्याचे बाजूला एका खांबावर व विटाचे भिंतीवर जाऊन आढळल्याने वाहनातील 13 ईसम जखमी होऊन एक महिला व छोटा बालक बाहेर फेकल्या गेले. त्यामुळे वाहनातील छाया अशोक ईनवाते (50) अनुराधा हरिचंद कांबळे (50 ) दोन्ही राहणार करटि व देवांश विशाल मुळे दीड वर्ष करटि या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर वाहनचालक अतुल नानाजी पटले 23 राहणार अर्जुनी, गीताप्रीतीचंद ईनवाते 55 करटि, पदमा राजकुमार इनवाते 50 भूराटोला, बिरजूला गुडन ठाकरे 35 बालाघाट अहिल्याबाई नामदेव कोडवते 62 करटि, गंभीर जखमी झाले तर इतर किरकोळ जखमी झाल्याने गंभीर जखमींना गोंदिया केटीएस रुग्णालयात उपचाराकरता पाठवण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच गंगाझरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश बनसोडे व तिरोडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास कठाळे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. फिर्यादीचे तक्रारीवरून गंगाझरी पोलीस स्टेशन येथे वाहन चालका विरोधात कलम 279 ,304 अ,338 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास गंगाझरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेश बनसोडे करीत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे करटी व मजीतपूर परिसरात शोककळा पसरली आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Dec. 27, 2023

PostImage

अबब... चक्क चोरट्यांनी केली पोलीस कर्मचाऱ्याच्या घरीचोरी .!पिस्टल आणि 30 जिवंत काडतूस चोरीला


नागपुरात:-

  राज्य राखीव पोलीस दलाच्या कमांडंटच्या गनमॅनचे बंदुकीच्या 30 गोळ्यासह पिस्टल चोरीला गेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पिस्टल आणि काडतुस चोरट्यांनी पोलीस वसाहतीतील घरात घुसून पळविले आहे


नागपूर:  नागपुरात   चोरट्यांनी थेट पोलिसांची बंदूक आणि गोळ्याच चोरल्या आहेत.  पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरातून पिस्टल आणि 30 जिवंत काढतूस चोरीला गेल्याची घटना नागपुरात घडली आहे. नागपुरात   राज्य राखीव पोलीस दलाच्या कमांडंटच्या गनमॅनचे बंदुकीच्या 30 गोळ्यासह पिस्टल चोरीला गेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पिस्टल आणि काडतुस चोरट्यांनी पोलीस वसाहतीतील घरात घुसून पळविले आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांनाच चोरटे आव्हान देत असल्याचे चित्र आहे.
राज्य राखीव पोलीस दलातील पोलीस जवान मंगेश लांजेवार जवानांच्या वसाहतीत राहतात. लांजेवार हे एस.आर.पी.एफ. गट क्र. 4 च्या समादेशक प्रियंका नारनवरे यांचे गनमॅन पदी कार्यरत आहे. मंगेश लांजेवार त्यांचे पिस्टल व 30 जिवंत काडतूस घरी ठेवून, साप्ताहिक सुटी असल्याने भंडारा येथे गेले होते. दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घरात घुसून आलमारीचे कुलूप तोडले व आत असलेले पिस्टल व 30 जिवंत काडतूस चोरून नेले. मंगेश हे नागपूरला परत आले असता  त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलले आणि पिस्तूल व काडतुसे गायब असल्याचे दिसले . याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे यापूर्वी नागपूर शहरातील एका ठाणेदाराचेही सर्व्हिस रिव्हॉल्व्हर चोरीला गेले असून, त्याचा अद्याप शोध लागलेला नाही.


पोलिसांचा धाकच नाही...

मागील काही दिवसांपासून नागपुरात गुन्हेगारीने कहर केला आहे. रोज नव्या घटना समोर येत आहे. मारहाण, दहशत, चोरी आणि हल्ल्यांच्या घटनांचं प्रमाण जास्त आहे. त्यातच पोलिसांना मारहाण केल्याच्यादेखील घटना समोर येत आहे. पोलिसांच्या घरात चोरी झााल्याने त्यामुळे पोलिसांचा धाक उरला नाही का?, किंवा वर्दीची भीती उरली नाही काय, असे प्रश्न पुन्हा उपस्थित होताना दिसत आहे. 

 


PostImage

युवाक्रांती समाचार

Dec. 26, 2023

PostImage

रानटी हत्तींचा पुन्हा हैदोस.! जीव वाचविण्यासाठी सोडावं लागलं घर.!


आरमोरी(गडचिरोली)
काही काळासाठी गोंदिया जिल्ह्यात गेलेला रानटी हत्तींचा कळप पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात परतला असून आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा गावात रविवारी मध्यरात्री हत्तींनी धुडगूस घातला.
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पाच कुटुंबांना जीव वाचवण्यासाठी घर सोडून पळ काढावा लागला. हल्ल्यात घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.२४ डिसेंबरच्या मध्यरात्री २० ते २२ रानटी हत्ती आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा गावातील पाच घरांवर हल्ला केला. सुरुवातीला अशोक वासुदेव राऊत यांच्या घराला धडक दिली.

हत्तीची किंचाळी ऐकून घरातील सर्व सदस्य उठून घराच्या मागच्या दरवाज्याने पळ काढला आणि मोठ्याने आरडाओरड करून शेजाऱ्यांना जागे केले. त्यामुळे या परिसरातील घरातील सर्व सदस्य जीव मुठीत घेऊन घराबाहेर सुसाट धावत सुटले. अशोक राऊत, सूरज दिघोरे, मंगला प्रधान ,चंद्रशेखर बघमारे, दुर्गादास बघमारे यांच्या घरांचीही हत्तींनी नासधूस केली. यानंतर संपूर्ण गाव जागे झाले, पण जीवाच्या भीतीने कोणीही घराबाहेर पडले नाही. गावकऱ्यांनी वनविभागाला कळविले. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, वनपाल मुखरु किनेकर ,वनरक्षक बाळू शिऊरकर , रुपा अत्करे , पंढरी तेलंग आदी दाखल झाले. हुल्ला पार्टीच्या मदतीने हत्तीच्या कळपाला हुसकावून लावले. हल्ल्यात घरांचे नुकसान झाले, पण जीवितहानी टळली.
पाच कुटुंबांना निवाऱ्याची व्यवस्था करावी

हत्तीच्या हल्ल्यामुळे पाच कुटुंब उघड्यावर आले आहे. त्यामुळे समोर जायचे कोठे, रहायचे कसे, खायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या कुटुंबांना तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करुन भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. यापूर्वी शंकरनगर येथे ९ सप्टेंबर रोजी हत्ती पहिल्यांदा दाखल झाले आणि शेतकऱ्यांच्या शेतातील धान्यासह बोअरवेल, इलेक्ट्रिक साहित्यांचे नुकसान केले होते. आता पुन्हा एकदा या भागात हत्तींनी प्रवेश केल्याने शेतकरी दहशतीत आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Dec. 26, 2023

PostImage

ट्रॅक्टरखाली दबुन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू


नागभीड तालुक्यातील मौजा ईरव्हा (टेकडी)येथील रहिवासी नामे लोकमन यादव मैंद वय 20 वर्ष या तरुणाचा ट्रॅक्टरखाली दबून दुदैवी मृत्यु झाल्याची खळबळ जनक घटना घडली आहे.

सदर घटना मौजा पाहर्णी - ईरव्हा रत्यावर घटणा घडली आहे.
, पाहर्णी येथे घरचे धान भरडाई करिता राईस मिल वर टॅ्क्टर नी धान सकाळी आणले होते.ते धान भरडाई करुण ( तादुंळ पिसुन)  दुपारी 3:00 वाजताच्या सुमारास ईरव्हा टेकडी गावाकडे जात असताना  वळणावर टॅ्क्टरची ट्रॉली ली पलटी झाली. त्यात लोकमान चा टॅ्क्टरखाली आल्याने जागीच मृत्यु झाला. वरील घटनेची माहिती संबधित पोलीस विभाग नागभीड ला देण्यात आली. लगेच पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी घटना स्थळी दाखल होऊन मृतकाचा स्थळ पंचनामा करुन मृतकाचे पार्थीव उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रूग्णालय येथे नेण्यात आले.आज सकाळी मृतदेह घरच्याच्या ताब्यात देण्यात आले, मौजा ईरव्हा टेकडी येथील स्मशानभूमीत अंत्यस्कार करण्यात आले.