बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
24-01-2024
रुमदेव सहारे सहसंपादक
गडचिरोली - वडसा ते गडचिरोली या 52 किलोमीटरच्या नवीन रेल्वे मार्गाच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. खासदार अशोक नेते यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या या कामाला बुधवारी खा.नेते यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी रेल्वेच्या अभियंत्यांनी त्यांना झालेल्या कामाची माहिती दिली.
वडसा ते आरमोरी यादरम्यान वन्यजीवांची वर्दळ राहत असल्यामुळे या मार्गावर रेल्वेसाठी पुलाची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाची किंमत १०९६ कोटी वरून १८८८ कोटी रुपये झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रत्येकी ५० टक्के वाट्यातून उभारल्या जात असलेल्या या रेल्वेमार्गाच्या पहिल्या टप्प्यात ३२२ कोटी रुपयांच्या खर्चातून उभारल्या जाणाऱ्या २० किमीच्या रेल्वेमार्गाच्या कामाला सुरुवात झाली. वडसा रेल्वे स्थानकापासून गडचिरोलीच्या दिशेने या कामाची सुरुवात करण्यात आली.
खासदार अशोक नेते यांनी रेल्वेच्या कामाची पाहणी केल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करतांना
गडचिरोली जिल्हा हा आदिवासी आकांक्षीत अविकसित जिल्हा म्हणून ओळख आहे.या जिल्ह्यात एकमेव वडसा( देसाईगंज) रेल्वे स्टेशन आहे.परंतु वडसा गडचिरोली पर्यंत बावन ५२ किलोमीटर पर्यंत रेल्वे मार्ग आणण्यासाठी, या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, व केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, विदर्भाच्या विकासासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात अग्रेसर असलेले विकास पुरूष केंद्रीयमंत्री नितिन जी गडकरी यांचे शतशा आभार...
यासोबतच या कामात राज्य सरकारचा 50% यात वाटा असल्याने विकास कामात मौलाची भूमिका बजावणारे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे व महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री मान.देवेद्रजी फडणवीस व तत्कालीन वितमंत्री लोकनेते, विकास पुरूष यांची ही विकासासंबंधित मौलाची भूमिका आहे यासाठी सर्वांचे अभिनंदन व आभार मानीत रेल्वेच्या कामाची पाहणी केल्यानंतर खासदार अशोक नेते यांनी आनंद व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या..
खा. अशोक नेते यांनी या कामाची गती पाहून समाधान व्यक्त केले. या कामासाठी आवश्यक असलेला निधी केंद्र आणि राज्य सरकारकडून वेळोवेळी मिळवून देण्यासाठी मी कटीबद्ध आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन गडचिरोली आणि पुढे छत्तीसगड, तेलंगणापर्यंत या रेल्वे मार्गाचा विस्तार केला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Your car is our responsibility
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments