संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
30-12-2023
कृष्णा वैध ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी :- तालुक्यातील तुमडीमेंढा येथील सरकारी जागेवरील शेतकऱ्यांच्या शेताला पाणी देणाऱ्या तलाव व इतर जागेवर अतिक्रमण करून तसेच शेतकऱ्यांना वाटपात मिळालेल्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या स्टेम पोद्दार स्कूल व्यवस्थापन मंडळींवर प्रशासनाने व सरकारने हस्तक्षेप करून सखोल चौकशी करून कारवाई करावी व पिढीत अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा गावातील संपूर्ण शेतकरी स्टेम पोद्दार स्कूल व्यवस्थापना विरुद्ध येत्या महिन्याभरात आक्रमक होत आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा स्थानिक शासकीय विश्राम गृहात घेतल्या गेलेल्या पत्रकार परिषदेतून पिढीत शेतकऱ्यांनी दिला.
सविस्तर वृत्त असे की, मौजा तूमडीमेंढा येथील शासकीय जागेवर गट क्रमांक १० व ११ या गट नंबर परिसरात गट नंबर १० मध्ये १०.९४ हे. आर तसेच गट क्रमांक ११ मध्ये 10.५२ हे. आर अशा क्षेत्रात तलाव असून या तलावामुळे परिसरातील शेतकऱ्यांना पिकासाठी ओलिताची सोय होते.तसेच जनावराच्या पिण्याच्या पाण्याची सोय होत असते.परंतु सन २०१७-१८ या वर्षात गैरअर्जदार मे.विजय किरण मेंनजमेंट एज्युकेशन इन्स्टिट्युट नागपूर तर्फे डायरेक्टर किरण विजय वडेट्टीवार यांनी स्टेम पोद्दार लर्न स्कूल संस्था स्थापन करण्यासाठी तलाव परिसरातील जागेवर अतिक्रमण करून शेतकऱ्यांना जाण्यासाठी तलावाची पाळ व पांदन रस्त्यावर अतिक्रमण केले व सन २०२०-२१ या वर्षात सरकारच्या अतिक्रमण जागेवर स्कूल ची इमारत बांधली त्यामुळे शेतकऱ्यांना पांदन रस्त्याने येण्या जाण्याचा मार्ग बंद केला तसेच तलावाखाली असलेल्या शेतकऱ्यांच्या. शेतीला मिळणारा पाणी बंद केला व जनावरांना पाणी मिळणे कठीण झाले . गट क्रमांक १०,११,३,९,5,१५,१६,१७,१८,२२,१४,२१,४,२,१३,९३ ही जागा तलाव परिसराला लागून असल्याने यामध्ये वनविभाग ,महसूल विभागाची जमीन आहे तसेच सन १९७२-७३ या काळात शासनाने भूमिहीन लोकांना शेती वहिवाटीकरिता भुस्वामी करून पट्टे दिले अशा लोकांना देखील स्टेम पोद्दार लर्न स्कूलच्या व्यवस्थापनाकडून पैशाच्या जोरावर अधिकाऱ्यावर दबाव आणून शासनाची व शेतकऱ्यांची जमीन आपल्या ताब्यात घेतली.याच परिसरात खरबी ,माहेर , तुमडी मेंढा येथील अनेक शेतकऱ्यांची जमीन आहे.सन २०२१ पासून आतापर्यंत शासनाला सबंधित उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांना कितेकदा विनंती अर्ज करून न्यायासाठी मागणी केली मात्र राजकीय दबावाखाली असलेल्या संपूर्ण अधिकारी वर्गाने शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून उलट राजकीय व सत्तापिपासू लोकांना मदत केली व शेतकऱ्यांवर अन्याय केला. त्यामुळे खरबी,माहेर तुमडीमेंढा येथील ग्रामस्थांनी तलाव आणि परिसरातील शासकीय जागेवर गैरअर्जदार यांनी केलेले अतिक्रमण त्वरित काढावे अन्यथा तिन्ही गावातील नागरिक स्टेम पोद्दार लर्न स्कूलच्या समोर ठिय्या आंदोलन करून संपूर्ण कुदुंबसहित आमरण उपोषणाला बसू असा इशारा शेतकऱ्यांनी स्थानिक शासकीय विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेतून दिला. या पत्रकार पत्रकार परिषदेत गावातील गुलाब बागडे,नारायण अमृतकर,भगवान मेश्राम,सचिन बागडे,विश्वेश्वर अमृतकर तसेच तुंमडी मेंढा येथील सरपंच व सदस्य तसेच मोठ्या संख्येत महिला व गावकरी पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments