संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
23-02-2024
विचारमंथनात अंजलीताईंचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघात प्रवेश!
हार्ट अटॕकच्या शक्यतांवर प्रतिबंध करणाऱ्या ईमरजन्सी किटचे वाटप
शहीद जवान,मराठा आरक्षण व अपघात बळींना श्रध्दांजली
अकोला:--- देशातील लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे जतन आणि समृध्द लोकशाहीतून संविधानाचे संवर्धन करीत पत्रकार व समाजाच्या हक्कांसाठी संघर्षरत राहणाऱ्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची सर्वसमावेशक सामाजिक वाटचाल कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे,असे गौरवपूर्ण प्रतिपादन अग्रेसर सामाजिक नेत्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रबुध्द भारतच्या संपादिका प्रा.सौ.अंजलीताई आंबेडकर यांनी केले.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या नियमित मासिक विचारमंथन तथा सन्मान समारंभात त्या बोलत होत्या.त्यांनी लोकस्वातंत्र्यचे सभासदत्व स्विकारून या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेत प्रवेश केला.त्यासाठी विचारमंथन मेळाव्यात त्यांना कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विराजमान करून केन्द्रीय कार्यकारिणी कडून त्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी त्यांना महासंघाच्या विशेष मार्गदर्शिका तथा राज्य संघटन प्रमुख म्हणून नियुक्तीपत्रासह,खास सन्मानपत्र,शाल,ग्रामगीता आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी उपस्थित सभासदांना हार्ट अटॕकच्या लक्षणांवर प्रतिबंध करणाऱ्या ईमरजन्सी किटचे वाटप लोकस्वातंत्र्यच्या वतीने करण्यात आले.
सर्वप्रथम संघटनेच्या सामाजिक साधनेचे अधिष्ठाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांना नेहमीप्रमाणे हारार्पण करून वंदन करण्यात आले.अतिथींचे सत्कार व उपस्थितांची स्वागतं करण्यात आली.शहिद जवान,मराठा आरक्षण प्रश्नाततील बळी आणि अपघात व आपत्तींमधील बळींना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी बोलतांना अंजलीताईंनी या पत्रकार महासंघाच्या "लोकस्वातंत्र्य" या नावातूनच सर्वसमावेशक आणि समतावादी लोकशाहीची वाटचाल लक्षात येते.पत्रकार कल्याणासोबतच सामाजिक उपक्रमातून कृतिशील पत्रकारिता आणि त्यासाठी सामाजिक क्षेत्रातील ईतर नामवंतांनाही सोबत घेऊन चालण्याची अभिनव संकल्पना ही वैचारीक परिवर्तनातून सामाजिक विकासाची खरी वाटचाल आहे,असे विचार व्यक्त करून उपक्रम,शिस्तबध्द नियोजन आणि महाराष्ट्र आणि बाहेर सुरू केलेल्या करणाऱ्या संघटन कार्याचे कौतुक करून शुभेच्छा व्यक्त केल्या.
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या संघटन कार्याच्या व्दितीय अभियानातील ४ था मासिक विचारमंथन मेळावा स्थानिक जैन रेस्ट्रो मध्ये संपन्न झाला.याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिका आणि रजधुळ मासिकाच्या संपादिका देवकाताई देशमुख,आयएमए पदाधिकारी,अस्थिरोग तज्ञ, ओम हॉस्पिटलचे डॉ.रणजित देशमुख हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.तर लोकस्वातंत्र्यचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख,प्रा.डॉ.संतोषजी हूशे,उपाध्यक्ष प्रदिप खाडे,सचिव राजेन्द्र देशमुख अरविंद देशमुख(नागपूर) यांची प्रमुख उपस्थिती होती. संजय देशमुख यांनी प्रास्ताविकातून संघटनेच्या वाटचालीची माहिती दिली.तर प्रा.संतोषजी हूशे यांनी सुध्दा मनोगतातून संघटनेच्या ३ वर्षाच्या व्याप्तीमधील अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या योगदानाची माहिती दिली.याप्रसंगी देवकाताई तथा डॉ.रणजित देशमुख आणि उपस्थितांनी संघटनेच्या गतिमान कार्याबद्दल आनंद व्यक्त करून शुभेच्छा दिल्यात.
प्रा.मनोज देशमुख व सौ.दिपाली बाहेकर यांच्या बहारदार संचलनाखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रा.राजाभाऊ देशमुख,रावसाहेब देशमुख,गजानन जिरापूरे,संदिप देशमुख, (अमरावती) नंदकिशोर चौबे, अकोला जिल्हाध्यक्ष मोहन शेळके, सागर लोडम(ग्रामीण), देवेन्द्र बन्सोड,देवेन्द्र मेश्राम (जि.प्रसिध्दी प्रमुख,पालघर) सुरेश डाहाके,मनोहर मोहोड,दिपक देशपांडे,पंजाबराव वर,संतोष धरमकर,अॕड.राजेश कराळे,सतिश देशमुख,(निंबेकर),विजय बाहकर, मनोहरराव हरणे,शामराव देशमुख,राजाभाऊ देशमुख(रामतिरथकर) रामराव देशमुख,सौ.सोनल अग्रवाल,सौ.सुलभा देशमुख,सौ.राजश्री देशमुख,(खामगाव) वसंतराव देशमुख (नारखेडकर),.प्रा.आर.जी.देशमुख (माजी संपादक पिकेव्ही) कैलास टकोरे,अशोक भाकरे,शशिकांत हांडे, प्रा.विजय काटे, डॉ.विजयकुमार बढे,सुरेश भारती, सुरेश पाचकवडे,अशोककुमार पंड्या,के.एम. डॉ.अशोक तायडे,कृष्णा देशमुख,सुनिल देशमुख (निंबेकर), गौरव देशमुख,प्रा.सुरेश कुलकर्णी,सुरेश पाचकवडे,देवीदास घोरळ,शिवचरण डोंगरे, ओरा चक्रे,वासुदेव चक्रनारायण,आत्माराम तेलगोटे,ज्ञानदेव खंडारे,रामराव खंडारे,व ईतर बहूसंख्य पत्रकार व समाजसेवी उपस्थित होते. आभारप्रदर्शन विजयराव बाहकर यांनी केले.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments