ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
07-01-2024
रुमदेव सहारे सहसंपादक आरमोरी..
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे संघर्षातून आणि खडतर परिस्थितीतून निर्माण झालेले महामानव आहेत. जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्थेने नाकारलेल्या शोषित ,वंचितांना त्याचे हक्क व अधिकार मिळावे व सन्मानाने जगता यावे याकरिता मानवी हक्कांसाठी बाबासाहेबाचा लढा होता.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आमच्यात जगण्याचे सामर्थ्य निर्माण केले. फुले दाम्पत्यानी सामाजिक चौकटीत बंधिस्त असलेल्या महिलाना वाचा फोडून शिक्षण घेण्याची संधी दिली म्हणुनच तर महीला सर्वच क्षेत्रात हिमतीने व स्वकर्तुत्वाने पुढे जात आहेत. आपल्या महापुरुषांनी केलेल्या संघर्ष व त्यागामुळे आम्ही सन्मानाने जगतो आहे. असे प्रतिपादन प्रेरणा शिक्षण संस्थेचे सचिव मदन मेश्राम यांनी केले.
आरमोरी येथे भीमा कोरेगाव शौर्य दिन अभिवादन, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने समता युवा सामाजिक संघटनेच्या वतीने गुरुवारी आरमोरी येथे *क्रांती निळ्या पाखराची, या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. राजकुमार शेंडे यांनी केले. सह उद्घाटक म्हणून शिक्षणमहर्षी भाग्यवान खोब्रागडे हे होते . अध्यक्षस्थानी.प्रेरणा शिक्षण संस्थेचे सचिव मदन मेश्राम हे होते.तर प्रमूख अतिथी म्हणून तहसिलदार श्रीहरी माने, पोलिस निरिक्षक संदिप मंडलिक, वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, माजी जिल्हा परिषद सभापती वेणूताई ढवगाये, सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार ठवरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मनिषा दोनाडकर प्रा. शशिकांत गेडाम, डॉ. आंबेडकर स्मारक मंडळाचे अध्यक्ष यशवंत जांभूळकर, प्राचार्य साईनाथ अद्दलवार प्राचार्य जयदास फुलझले,सिद्धार्थ साखरे, किशोर सहारे, खिरेंद्र बांबोळे, सत्यवान वघाडे, मोरेश्वर टेंभूर्णे, राजुभाऊ कुंभारे,किशोर सहारे, गोलू वाघरे, आदी उपस्थित होते.
प्राचार्य राजकुमार शेंडे म्हणाले की भीमा कोरेगांव लढाई ही खऱ्या अर्थाने आत्मसन्मानाची लढाई होती.अन्याय अत्याचार व जातीव्यवस्था विरोधात होती. म्हणुनच भीमा कोरेगावचा रक्तरंजित इतिहास हा सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला. पुण्यात प्लेगची साथ असताना स्वतःच्या जिवाची पर्वा न करता एका मुलाला कडेवर घेऊन धावत धावत रुग्णालयात घेऊन जाणारी सावित्रीबाईं फुले ही खऱ्या अर्थाने क्रांतीज्योती होती असेही ते म्हणाले.
यावेळी शिक्षणमहर्षी भाग्यवान खोब्रागडे, वेणूताई ढवगाये, मनिषा दोनाडकर, यशवंत जांभूळकर यांनीही यांनीही उपस्थिताना उचित मार्गदर्शन केले.
यावेळी क्रांति निळ्या पाखराची या संगीतमय प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता युवा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष निलेश अंबादे यानी केले.संचालन प्राचार्य अमरदिप मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन संघटनेचे उपाध्यक्ष्य प्रविण रहाटे यानी केले.कार्यक्रमाच्या यशवितेसाठी समता युवा सामाजिक संघटनेचे मार्गदर्शक , ॲड.अमितजी टेंभुर्ण,महेंद्रजी रामटेके समता युवा सामाजिक संघटनेचे सचिव अनुप रामटेके,सहसचिव मंगेश पाटील सदस्य सौरभ मस्के,रुपेश जौंजालकर,निखिल दुमाणे, प्रिन्स मेश्राम, देवा बोरकर,आदित्य चीलबुले,भूषण काळबांधे,संघर्ष रामटेके,हर्षल खोब्रागडे, आदींचे विशेष सहकार्य लाभले.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments