CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
11-02-2024
बापाने व मोठ्या भावानेच लहाण्याची केली गळा आवळून हत्या अन् केला कोणीतरी मारल्याचा बनाव
स्वान पथकाच्या साह्याने असा झाला धक्कादाय घटनेचा उलगडा
अकोला :
महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवा गावात एक खळबळजनक घटना समोर आली आहे.येथे एका तरुणाचा बापाने आणि मोठ्या भावाने गळा आवळून खुन अन् पिंजर पोलीस ठाणे गाठून मुलाला कोणीतरी मारल्याचे सांगितले मात्र तपासा दरम्यान प्रकरण उघडकीस आले.
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवा गावातील संदीप गावंडे या तरुणाची बापाने व त्याच्या मोठ्या भावाने मिळून गळा आवळून हातपाय बांधून हत्या केली.संदीप चे गावातीलच एका अनुसूचित जातीच्या मुलीशी प्रेम प्रकरण जुळले होते.व तो तिच्याशी लग्न करणार होता.हे प्रकरण घरातील लोकांना पसंद नसल्याने त्यांनी संदीपला टोकले असता त्यांच्यात वाद निर्माण झाला.या वादाचे रूपांतर एकदम टोकाच्या भूमिकेवर गेल्याने सखां बाप व मोठा भाऊ वैरी झाला व त्यांनी संदीपचा गळा आवरून हातपाय बांधून त्याला संपविल्याचे उघड झाल्याने सध्या पोलिसांनी आरोपी बाप आणि मोठ्या भावाला अटक करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बार्शिटाकळी तालुक्यातील टिटवा गावात वास्तव्यास असणारे नागोराव गावंडे यांना दोन मुले असून लहान मुलगा संदीप गावंडे हा पुणे येथील एका कंपनीत काम करीत होता.त्याचे गावातील एका अनुसूचित जाती गटातील मुलीशी प्रेम संबंध जुळल्याने तिच्याशीच लग्न करण्याचा कायमचा हट्ट धरला होता.त्याचे वडिलांना हे प्रेम प्रकरण मान्य नसल्याने याबद्दल त्यांच्या घरात नेहमीच वादविवाद व्हायचे.यामुळे संदीप ने पळून जाऊन लग्न करण्याचे वडील नागोराव गावंडे यांना समजले यावरून त्यांनी संदीपला तू तिच्याशी प्रेम का करतो व आता लग्न करू लागलाय असे म्हणून त्यांच्यात वाद वाढल्याने गुरुवार आठ फेब्रुवारी च्या दिवशी वडील नागोराव गावंडे यांनी मोठ्या मुलाला सोबत घेऊन संदीप चा गळा आवळून हत्या केली व त्याचे हात पाय बांधून बाहेरगावी चालले गेले.दुसऱ्या दिवशी शुक्रवार 9 फेब्रुवारीला दुपारच्या दरम्यान घरी आले असता संदीप चा मृतदेह पाहून एकच टाहो फोडला व पिंजर पोलीस स्टेशन गाठून माझ्या मुलाला कोणीतरी मारल्याचे बनाव करून सांगितले. पिंजर पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मुर्तीजापुर उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे व अकोला श्वान पथकाला सदर घटनेची माहिती दिली. घटनास्थळी श्वान पथकाच्या सहाय्याने पोलिसांनी तपास केला असता श्वान वडील व मोठ्या भावा जवळ येऊन थांबले यावरून पोलिसांनी वडील नागोराव गावंडे व मोठ्या भावाला ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी हत्या केल्याची कबुली दिली. असा झाला घटनेतील हत्या करणाऱ्या आरोपींचा उलगडा झाला.याप्रकरणी अधिक तपास मुर्तीजापुर उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ यांच्या नेतृत्वात पिंजर पोलीस करीत आहे.असे वृत्त प्रतिनिधी प्रज्ञानंद भगत यांनी कळविल्याचे आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांनी सांगितले .
Redefine your style
book your appointment now
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments