नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
07-01-2024
रुमदेव सहारे सहसंपादक
आरमोरी:-
मराठी पत्रकारितेतील जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सर्वप्रथम दर्पण हे वृत्तपत्र काढून वृत्तपत्र सृष्टीचे जनक म्हणून नाव मिळविले त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पत्रकारांनी आजही पत्रकारितेच्या क्षेत्रात चांगले कार्य करावे आणि पत्रकारांविषयीची आस्था आहे ती समाजाला दिशादर्शक ठरावी असे प्रतिपादन श्री किसनराव खोब्रागडे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री भाग्यवानजी खोब्रागडे यांनी केले दिनांक 6 जानेवारी रोजी आरमोरी येथे वनविभागाच्या विश्रामगृहात तालुका पत्रकार संघातर्फे आयोजित पत्रकार दिनाच्या सोहळ्याला अध्यक्ष स्थानावरून बोलत होते सहा जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचा सोहळा पत्रकार दिन म्हणून सर्व महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात साजरा केला जातो. समाजातील अन्याय अत्याचार घडणाऱ्या घडामोडी ह्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे खरे कार्य हे पत्रकार करीत असतात त्यांना खूपच अडचणी येत असतात त्या अडचणींना सामोरे जाऊन आपली लेखणी धारदार ठेवून लिखाण करीत असतात त्यामुळे वंचित व सर्वसामान्य नागरिकांना त्या माध्यमातून न्याय मिळतो त्यामुळेच आजही पत्रकारितेचे अस्तित्व या देशात टिकून आहे असेही भाग्यवानजी खोब्रागडे यांनी मार्गदर्शन करताना म्हटले
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आरमोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संदीप मंडलिक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आमिष जी निमजे आणि आरमोरी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री अनिल सोमनकर यांनी सुद्धा मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक दौलत धोटे, संचालन प्रशांत झिमटे तर आभार आकाश चिलबुले यांनी मानले.
या पत्रकार दिनाचे औचित्य साधून बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर प्रमुख अतिथींनी प्रकाश टाकला. या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाला आरमोरी तालुका पत्रकार संघाचे सदस्य श्री. हरेंद्रजी मडावी, रूपेश गजपुरे, अमरदीप मेश्राम, महेंद्र रामटेके, सुनील नंदनवार, विलासजी गोंधळे, प्रवीण रहाटे, रूमदेव सहारे आदी पत्रकार मंडळी उपस्थित होते
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments