संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
01-03-2024
संजय कडोळे वाशिम जिल्हा विशेष प्रती.
सदर हत्येने करून दिली 30 वर्षापूर्वीच्या कारंजा बसस्थानकावरील सरपंच स्व. खटेश्वर करडेच्या हत्येची आठवण."
कारंजा : आज शुक्रवार दि . 01 मार्च 2024 रोजी, कारंजा तहसील कार्यालय परिसरात कार्यालयीन कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर दस्तऐवज लेखक (अर्जनविस) सुद्धा परिसरात आपले टेबल मांडून बसले असतांना अचानक दुपारी दोन वाजताच्या दरम्यान हरिश्चंद्र विलास मेश्राम वय 38 वर्ष यांचे मानेवर कुण्यातरी अज्ञात मारेकऱ्यानी प्राणघातक शस्त्राने हल्ला चढवून हरिश्चंद्र मेश्राम या दस्तऐवज लेखकाची हत्या केली. व मारेकरी फरार होण्यात यशस्वी झाला. सदर मृतक कारंजा तालुक्यातील मेहा येथील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे. प्राप्त माहितीनुसार दुपारी मृतक दस्तलेखक आपले काम करीत असताना अचानक पणे एका अज्ञात इसमाने येऊन त्याच्या मानेवर चाकूने वार केले त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच त्याला कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तपासणी दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक दिनेशचंद्र शुक्ला व पोलीस पथकानी देखील घटनास्थळी धाव घेतली व पुढील तपास सुरु आहे . घटनेची माहिती घेतली दरम्यान वृत्त लिहेस्तोवर या संदर्भात पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली नव्हती .चाकू हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाला. सदर घटना तहसिल कार्यालया समोरच्या वर्दळीच्या परिसरातील असूनही आरोपी पळून गेल्याने, तीस वर्षापूर्वी कारंजा बसस्थानकासमोर वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे दिसून येत आहे.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments