STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
31-01-2024
रुमदेव सहारे सहसंपादक
आरमोरी :-
चामोर्शी येथील रहिवासी प्रा.अभिषेक ईश्वर दुर्गे यांची 'पर्यावरण सेंद्रिय रसायनशास्त्र आणि तंत्रज्ञान' या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. ही परिषद एप्रिल 2024 मध्ये अमेरिकेतील लास वेगास येथे सात दिवस चालणार आहे. 9 ते 12 जानेवारी 2024 दरम्यान मुंबई येथे झालेल्या 'आंतरराष्ट्रीय रसायन विज्ञान आणि शिक्षण परिषदे'मध्ये सहभागी होऊन संपूर्ण टीमचे लक्ष वेधून घेतले. त्यांचे शोधनिबंध प्रदर्शित करणे. या परिषदेनंतर त्यांच्या संशोधनाची आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद व्हावी यासाठी एप्रिल महिन्यात अमेरिकेत होणाऱ्या परिषदेसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
प्रा.अभिषेक दुर्गे हे मूळचे चामोर्शीचे असून त्यांचे प्राथमिक शिक्षण मुलचेरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. गडचिरोली जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय घोट येथे इयत्ता 5 वी मध्ये जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण आणि 6 वी ते 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षण नागपुरात बी.एस्सी. आणि पुढे 2021 मध्ये रसायनशास्त्रात एम. एस्सी 2022 मध्ये NET आणि 2023 मध्ये SET उत्तीर्ण होऊन संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठात वयाच्या 25 व्या वर्षी पदव्युत्तर महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. सध्या प्रा.अभिषेक दुर्गे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्न असलेल्या शिवाजी विज्ञान महाविद्यालयात रसायनशास्त्राचे सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
त्यांनी केलेल्या सर्व कार्याचे श्रेय त्यांचे पालक, मुख्याध्यापक आणि सर्व सहाय्यक कर्मचारी आणि मित्रांना देत, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments