नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
11-02-2024
संजय कडोळे जिल्हा विशेष प्रती.
वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : आमचे वर्धा,अमरावती, यवतमाळ प्रतिनिधी यांनी दिलेल्या वृत्तानुसार,वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात असणाऱ्या ग्राम रुईगोस्ता येथील हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांच्या अचूक अंदाजानुसार, शनिवार दि. 10 फेब्रुवारी 2024 रोजी, वर्धा,अमरावती, यवतमाळ जिल्हयात कोठे रिमझिम तर कोठे दमदार अवकाळी पाऊस सर्वदूर झाल्याचे वृत्त मिळाले असून, दुपारी झालेल्या पावसाने नागरिकाची दाणादाण झाली आहे. या पावसाने अमरावती जिल्हयातील धामणगाव रेल्वे,चांदूर भागात वर्धा जिल्हयातील हिंगणघाट, वडनेर येथे ,देवळी तालुक्यातील इसापूर, भिडी, सैदापूर , काजळसरा, दुर्गुडा, आकोली, तांबा, विजयगोपाल, दापोरी, अडेगाव, गौळ, इंझाळा भागात बोरासारखी गारपिट झाली आहे.यवतमाळ जिल्हयातूनही गारपिटीचे वृत्त मिळाले असून भाजीपाला पिकासह,गहू-हरभरा या रब्बी पिकाचे नुकसान झाले आहे. विदर्भातील शेतकरी हवालदिल झाला आहे. आधीच यावर्षीचा हंगाम शेतकऱ्याच्या हातून गेल्यात जमा होता.त्यात सोयाबीन,कपाशीला भाव नाही. तरीही संकटाना मात देत असलेल्या भुमिपूत्राच्या रब्बीच्या हंगामला अवकाळीचा फटका बसल्यामुळे शेतकरी राजा संकटात सापडून काळजीग्रस्त झाला आहे.हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांच्या अंदाजाप्रमाणे आजपासून पाच दिवस पावसाचे असून,भाग बदलून हा अवकाळी पाऊस दि. 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत होण्याची शक्यता आहे. तसेच या काळात थंडगार वारे,वादळ, विजाचा वर्षाव आणि गारपिट होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी ग्रामस्थांनी दुपारी शेतात जाणे, झाडाखाली उभे रहाणे टाळावे,शेळ्यामेंढ्या,गुरेढोरे झाडाखाली न बांधण्याचा सल्ला त्यांनी दिला असल्याचे वृत्त आमचे वाशिम जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांनी दिले आहे.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments