अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
31-01-2024
रुमदेव सहारे सहसंपादक
गडचिरोली :- लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी व लहान वयातच विद्यार्थी खेळांच्या प्रवाहात येऊन मजबुत व्हावे यासाठी दरवर्षी महाराष्ट्र अँम्युचर अँथलेटिक्स असोसिएशन तर्फे सबज्युनिअर अँथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन होत असते ज्यामध्ये ८,१० व १२ वर्षाच्या विद्यार्थ्यांना अँथलेटिक्स क्रीडाप्रकारातील रनिंग,लांबउडी ,गोळाफेक ऊंचउडी या खेळात आवळ निर्माण व्हावी व त्यामध्ये सातत्यपूर्ण प्रशिक्षण घेऊन आजचे चिमुकले विद्यार्थी उद्या देशाचे भावी स्टार खेळाडू बनावे ही बाब ओळखुन अँथलेटिक्स सारख्या खेळात तालुका, जिल्हा, राज्य व देशाचे प्रतिनिधित्व करून आपली ओळख जागतिक स्तरावर निर्माण करावेत या उदात्त हेतूने महाराष्ट्र अँम्युचर अँथलेटिक्स असोसिएशन अंतर्गत दि.९ फेब्रुवारी २०२४ ते ११ फेब्रुवारी २०२४ ला सांगली येथे राज्यस्तरीय सबज्युनिअर अँथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे या स्पर्धेची निवड चाचणी दि.२८ जानेवारी २०२४ रविवार ला गडचिरोली येथील कॉम्प्लेक्स क्षेत्रातील सेमान बायपास रोड स्थित संजीवनी ग्राउंड येथे सकाळी ९:०० वाजता गडचिरोली जिल्हा अँम्युचर अँथलेटिक्स असोसिएशन तर्फे पार पडली या राज्यस्तरीय सबज्युनिअर निवड चाचणीत ८ वर्षाआतील मुलांच्या गटात ५० व १०० मीटर रनिंग मध्ये प्रथम देवदीप जुआरे तर ५०मीटर रनिंग मध्ये सत्यम करोडकर दुतीय व १०० मीटर रनिंग मध्ये अथांग दुर्गम हा दुतीय , स्टँडिंग ब्रॉड जम्प मध्ये निखिल चौके प्रथम तर सूर्यांश म्हशाखेत्री दुतीय, बॉल थ्रो मध्ये इंद्रावर्धन असमवार प्रथम तर युवराज देशमुख दुतीय ८ वर्षाआतील मुलिंच्या गटात ५०मीटर रनिंग मध्ये दिशा कालबांध्ये प्रथम तर अनन्या नैताम दुतीय ,१०० मीटर रनिंग मध्ये अनवी चौके प्रथम तर संबोधी पिपरे दुतीय स्टँडिंग ब्रॉड जम्प मध्ये दिशा कालबांध्ये प्रथम चेतना जुआरे दुतीय तर १० वर्षाआतील मुलांच्या गटात ६० मीटर रनिंग मध्ये आदित्य ठेंगरी प्रथम देवांश देशमुख दुतीय ,१०० मीटर रनिंग मध्ये सारंग केळझलकर प्रथम तर प्रथमेश कुकडकर दुतीय स्टँडिंग ब्रॉड जम्प मध्ये मैत्रेय टेंम्बुर्णे प्रथम तर सारंग केळझलकर दुतीय, गोळाफेक मध्ये तिवान पोहनकर प्रथम तर आदित्य ठेंगरी दुतीय १० वर्षाआतील मुलींच्या गटात ६० मीटर रनिंग मध्ये हार्दीकी माने प्रथम तर प्रहा गेडाम दुतीय १०० मीटर रनिंग मध्ये रितिका गरमळे प्रथम तर सारा करावते दुतीय ,स्टँडिंग ब्रॉड जम्प मध्ये सारा करावते प्रथम तर अधवी नागुलवर दुतीय गोळाफेक मध्ये प्रहा गेडाम प्रथम तर गिजिरी माने दुतीय तर १२ वर्षाआतील मुलांच्या गटात ६० मीटर रनिंग मध्ये जितेंद्र आत्राम प्रथम तर अनय मडावी दुतीय ,३०० मीटर रनिंग मध्ये अंशु गडपल्लीवार प्रथम तर जितेंद्र आत्राम दुतीय,लांबउडी मध्ये चिराग नासकोल प्रथम तर चिराग पारधी दुतीय ,उंचउडी मध्ये चेतस भांडेकर प्रथम तर मोहित गेडाम दुतीय गोळाफेक मध्ये जितेंद्र आत्राम प्रथम तर रोहित आत्राम दुतीय तर १२ वर्षाआतील मुलींच्या गटात ६० मीटर रनिंग मध्ये रुचिता राऊत प्रथम तर सनाया करोडकर
दुतीय तर ३०० मीटर रनिंग मध्ये संघवी कापकर प्रथम तर युक्ती सोरते दुतीय लांबउडी मध्ये दिशीता माने प्रथम तर टीना नैताम दुतीय उंचउडी मध्ये टीना नैताम प्रथम तर सारा बोकडे दुतीय तर गोळाफेक मध्ये संघवी कापकर प्रथम तर दिशा सलामे दुतीय क्रमांक पटकावला या स्पर्धेसाठी गडचिरोली जिल्हा अँम्युचर अँथलेटिक्स असोसिएशन चे सचिव आशिष नंदनवार सर यांच्या मार्गदर्शनात क्रीडा समन्वयक म्हणून राहुल जुआरे सर ,मृणाली सराफ मॅडम यांनी सहकार्य केले याप्रसंगी शेकडो पालक उपस्थित होते.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments