संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
27-12-2023
नागपुरात:-
राज्य राखीव पोलीस दलाच्या कमांडंटच्या गनमॅनचे बंदुकीच्या 30 गोळ्यासह पिस्टल चोरीला गेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पिस्टल आणि काडतुस चोरट्यांनी पोलीस वसाहतीतील घरात घुसून पळविले आहे
नागपूर: नागपुरात चोरट्यांनी थेट पोलिसांची बंदूक आणि गोळ्याच चोरल्या आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरातून पिस्टल आणि 30 जिवंत काढतूस चोरीला गेल्याची घटना नागपुरात घडली आहे. नागपुरात राज्य राखीव पोलीस दलाच्या कमांडंटच्या गनमॅनचे बंदुकीच्या 30 गोळ्यासह पिस्टल चोरीला गेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पिस्टल आणि काडतुस चोरट्यांनी पोलीस वसाहतीतील घरात घुसून पळविले आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांनाच चोरटे आव्हान देत असल्याचे चित्र आहे.
राज्य राखीव पोलीस दलातील पोलीस जवान मंगेश लांजेवार जवानांच्या वसाहतीत राहतात. लांजेवार हे एस.आर.पी.एफ. गट क्र. 4 च्या समादेशक प्रियंका नारनवरे यांचे गनमॅन पदी कार्यरत आहे. मंगेश लांजेवार त्यांचे पिस्टल व 30 जिवंत काडतूस घरी ठेवून, साप्ताहिक सुटी असल्याने भंडारा येथे गेले होते. दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घरात घुसून आलमारीचे कुलूप तोडले व आत असलेले पिस्टल व 30 जिवंत काडतूस चोरून नेले. मंगेश हे नागपूरला परत आले असता त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलले आणि पिस्तूल व काडतुसे गायब असल्याचे दिसले . याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे यापूर्वी नागपूर शहरातील एका ठाणेदाराचेही सर्व्हिस रिव्हॉल्व्हर चोरीला गेले असून, त्याचा अद्याप शोध लागलेला नाही.
पोलिसांचा धाकच नाही...
मागील काही दिवसांपासून नागपुरात गुन्हेगारीने कहर केला आहे. रोज नव्या घटना समोर येत आहे. मारहाण, दहशत, चोरी आणि हल्ल्यांच्या घटनांचं प्रमाण जास्त आहे. त्यातच पोलिसांना मारहाण केल्याच्यादेखील घटना समोर येत आहे. पोलिसांच्या घरात चोरी झााल्याने त्यामुळे पोलिसांचा धाक उरला नाही का?, किंवा वर्दीची भीती उरली नाही काय, असे प्रश्न पुन्हा उपस्थित होताना दिसत आहे.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments