नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
24-01-2024
सनराव खोब्रागडे फाउंडेशनचा स्पर्श कला व सांस्कृतिक महोत्सव उद्घघाटन सोहळा संपन्न
रुमदेव सहारे सहसंपादक
आरमोरी:-
विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुणांना वाव देणारा आणि विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकास घडविण्याचे व्यासपीठ म्हणजेच स्पर्श हा कार्यक्रम होय या माध्यमातून विद्यार्थी हे नृत्या आविष्कार सादर करीत असतात आपली कला सादरीकरण करून त्यांच्या अंगी असलेले सुप्त गुण हे प्रेक्षकांसमोर आणण्याचे खरे कार्य आहे स्पर्श कलाविष्काराच्या माध्यमातून होत असते असे प्रतिपादन श्री किसनराव खोब्रागडे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भाग्यवानजी खोब्रागडे यांनी केले दिनांक 24 जानेवारी 2024 रोज बुधवारला आयोजित श्री किसनराव खोब्रागडे फाउंडेशन अंतर्गत स्पर्श हा कलाविष्कारांचा उद्घाटन सोहळा स्थानिक श्री किसनराव खोब्रागडे महाविद्यालय येथील सांस्कृतिक भवनामध्ये पार पडला या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून श्री किसनराव खोब्रागडे एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ-सचिन खोब्रागडे होते तर विशेषअतिथी म्हणून श्री किसनराव खोब्रागडे एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सुशील खोब्रागडे, सौ भाग्यलक्ष्मी खोब्रागडे कोषाध्यक्ष श्री किसनराव खोबराकडे एज्युकेशन सोसायटी, श्रीहरी माने तहसीलदार आरमोरी, ज्योती राक्षे पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन आरमोरी ,किसनराव खोब्रागडे शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी आर भगत , श्री पी एम ठाकरे उपप्राचार्य यशवंतराव चव्हाण महाविद्यालय लाखांदूर , यशवंत इंग्लिश मिडीयम स्कूल चे प्राचार्य अमरदीप मेश्राम , यशवंत उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अशोक बनसोड ,किसनराव खोब्रागडे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विवेक हलमारे ,ठाणेगाव येथील यशवंत कला उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत झीमटे,आदी मंडळी यावेळी उपस्थित होते
या उद्घघाटन सोहळ्याला मार्गदर्शन करताना श्री भाग्यवानजी खोब्रागडे खोब्रागडे म्हणाले सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे या माध्यमातून आदर्श विद्यार्थी घडविणे हे कार्य करण्यासाठी शाळा नेहमी प्रयत्नशील आहे शिक्षणाबरोबर पालकाची सुद्धा काही जबाबदारी आहे त्यांनी शिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थ्यांप्रती एक जबाबदार व्यक्ती म्हणून लक्ष देण्याची गरज आहे या विद्यालयाचा विद्यार्थी वरिष्ठ स्तरावर यश प्राप्ती होण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहू असे यावेळी सांगितले
सदर कार्यक्रमाचे संचालन कुमारी तेजस्विनी सहारे प्रस्ताविक यशवंत इंग्लिश मिडीयम स्कूल चे प्राचार्य अमरदीप मेश्राम यांनी केले तर आभार जॉन सर यांनी मानले स्पर्श या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यशवंत इंग्लिश मीडियम स्कूल चे सर्व शिक्षक वृंद तसेच किसनराव खोब्रागडे एज्युकेशन सोसायटी अंतर्गत किसनराव खोब्रागडे महाविद्यालय आरमोरीचे सर्व प्राध्यापक ,संताजी महाविद्यालय आरमोरी येथील सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments