संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
01-01-2024
वाशिम : जिल्ह्यात खरीप हंगाम २०२३ मध्ये २३ हजार २६५ हेक्टरवर कापुस पिकाची लागवड करण्यात आली आहे. मुख्यत्वे मानोरा, कारंजा व मंगरूळपीर तालुक्यामध्ये सर्वाधिक पेरा आहे. कापुस पिकाच्या वेचण्या जवळपास पूर्ण झाल्या आहेत. कापुस पिकावरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवणे व पुढील वर्षी होणारा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी कापुस पिकाची फरदड न घेता डिसेंबरअखेर पिकाचे अवशेष उपटून किंवा कॉटन श्रेडरने काढावे. फरदड घेतल्यामुळे गुलाबी बोंडअळीचे जीवनक्रम अखंडित चालू राहते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी डिसेंबरअखेर कपाशी पीक काढून टाकावे. जिनिंग, प्रेसिंग मिल, गोडाऊन आणि मार्केट यार्ड या ठिकाणी कच्च्या कापसाची दीर्घकाळ साठवणूक केली जात असल्याने अशा साठवलेल्या कापसामध्ये राहिलेल्या गुलाबी बोंडअळीच्या अवस्था पुढील हंगामात घेतल्या जाणाऱ्या कापसाच्या पिकासाठी स्त्रोतस्थान म्हणून काम करतात. किडीस निरंतर खाद्य मिळत राहिल्याने पुढील हंगामात या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. कापूस फरदड निर्मुलन मोहीम घेऊन डिसेंबर महिन्यात प्रत्येक कापूस उत्पादक गावात फरदडमुक्त गाव करावे. जिनिंग, प्रेसिंग मिल, गोडाऊन, मार्केट यार्ड आणि कापूस खरेदी केंद्रे इ. ठिकाणी फेरोमेन ट्रॅप लावावे. गुलाबी बोंडअळीचे जीवनक्रम खंडित करण्यासाठी ५ ते ६ महिने कापूस विरहित ठेवावे. कपाशीची शेवटची वेचणी झाल्याबरोबर शेतात शेळ्या, मेंढ्या व इतर जनावरे चरण्यासाठी सोडवी. कपाशीच्या फरदडामध्ये किडीच्या सुप्त अवस्था राहत असल्याने त्यांची गंजी करून बांधावर ठेवू नये. पीक काढणीनंतर जमिनीची खोल नांगरट करावी, त्यामुळे जमिनीवर आलेले किडीचे कोष व इतर अवस्था नष्ट होतील. तरी सर्व शेतकऱ्यांनी डिसेंबरअखेर कापुस काढणी करून पुढील वर्षी येणाऱ्या किडीकरीता उपाययोजना कराव्यात. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह यांनी केले आहे.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments