संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
13-01-2024
ब्रम्हपुरी:-ट्रकने दिलेल्या धडकेत महाविद्यालयात जाणारी विद्यार्थीनी कू.समीक्षा संतोष चहांदे (वय 17 वर्ष) ही ट्रकच्या मागच्या चाकाखाली दबुन तिचा जागेतच मृत्यू झाल्याची घटना ब्रम्हपूरी शहरातील नेवजाबाई हितकारीणी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर दि. 12 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी आज दि. 13 जानेवारी रोजी सदर घटनास्थळी भेट देवून घटनास्थळाची पाहणी केली.
यावेळी त्यांनी नेवजाबाई हितकारीणी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील मार्गावर असलेले वीज वितरण कंपनीचे विद्युत पोल त्वरित हटविण्याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच सदर मार्गावर अपघाताची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता आवश्यक ठिकाणी गतिरोधक तयार करण्याच्या सुचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. सोबतच महाविद्यालयीन सुट्टीच्या वेळेस वाहतूक पोलीस तैनात करण्याचे निर्देश पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
त्यानंतर शहरातील शिवाजी महाराज चौकात जावून रहदारीस होणारा अडथळा व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अजय चहांदे, न.प. मुख्याधिकारी अर्शिया जुही, पोलिस निरीक्षक अनिल जिट्टावार, महावितरणचे अभियंता सिध्दांत रामटेके, अभियंता दिनेश हनवते, न.प. विद्युत अभियंता मंगेश बोंद्रे, अभियंता हटवार, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समिती सभापती प्रभाकर सेलोकर, नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार, नगरसेवक हितेंद्र राऊत, माजी न.प. उपाध्यक्ष बंटी श्रीवास्तव, माजी सभापती नेताजी मेश्राम, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरज मेश्राम, माजी सरपंच राजेश पारधी, अनुसूचित जाती सेलचे विधानसभा उपाध्यक्ष मुन्ना रामटेके यांची यावेळी उपस्थिती होती.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments