CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
08-01-2024
मेंडकी, ८ जानेवारी २०२४,
थानेश्वर पाटील कायरकर यांचा जन्म २३ जुलै १९७० रोजी अल्प भूधारक शेतकरी कुटुंबात झाला असून वडील केशवराव कायरकर मेंडकी येथील माजी पोलीस पाटील होते. महात्मा गांधी यांचे विचार उराशी बाळगून त्यांच्या वडिलांनी १९४२ मधिल स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होवून ६ महिन्याची सजा भोगली. हेच प्रेरणादायी विचार मनात घेऊन ग्रामीण भागात काम करीत असताना थानेश्वर कायरकर यांना सहकार क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली.गांव, तालुका, जिल्हा स्तरावर अनेक सहकारी संस्था मध्ये कामे करीत असताना लोकप्रियता मिळाली १९९३ मध्ये मेंडकी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले सलग २० वर्षे ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केल्यानंतर २०१७ मध्ये ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघ आमदार तथा महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली ब्रम्हपुरी पंचायत समितीमध्ये थानेश्वर कायरकर सदस्य म्हणून काँग्रेस पक्षाचे एकटेच निवडून आले.आणी मतदारसंघात विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन कोट्यवधी रुपयांची शासकीय निधी मंजूर केला व भरीव कामे केली.
थानेश्वर पाटील कायरकर यांच्या यशाची कहाणी समाजातील सामान्य व्यक्तींसाठी प्रेरणादायी आहे.या यशाचे रहस्य म्हणजे थानेश्वर कायरकर यांची काँग्रेस पक्षाची निष्ठा आणि सामान्य लोकांप्रती समर्पित भाव आहे.त्यांचे कठोर परिश्रम आणि मेहनत त्यांनां या यशापर्यत पोहोचवीले आहे. तालुक्यातील सर्व गावाचा विकास करणे, लोकांना चांगले जीवन जगण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे स्वप्न थानेश्वर पाटील कायरकर यांचे आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेत दि.२आक्टोबर २०२३ रोजी ग्लोबल स्कालर्स फाऊंडेशन, पुणे तर्फे "राष्ट्रपिता राष्ट्रीय सन्मान -२०२३"पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. त्यांनी समर्पित भावनेने लोकांसाठी पुढेही चालू ठेवलेल्या कार्याची दखल घेत *"राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार -२०२४" त्यांना प्रदान करण्यात आला. त्याच बरोबर त्यांनी शैक्षणिक आवड सोडली नाही वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांना थॅमस इंटरनॅशनल विद्यापीठ, पॅरिस (फ्रान्स) ने "डॉक्टरेट पदवी" (Ph.D) ७ जानेवारी २०२४ रोजी "यशदा सभागृह, यशवंतराव चव्हाण अकादमी ऑफ डेव्हलपमेंट ऑडमिस्ट्रेशन , पुणे" येथे प्रदान करुन गौरविण्यात आले आले असल्याने थानेश्वर पाटील कायरकर यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.त्यांनी या यशाचे श्रेय "बेलगावे एज्युकेशन प्रा.लि.पुणे" व ज्यांनी सहकार्य केले त्या सर्व सहकारी मित्रपरिवार, कार्यकर्त्ये व आप्तेष्ट नातेवाईक यांना दिले आहे.
Redefine your style
book your appointment now
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments