ProfileImage
70

Post

4

Followers

0

Following

PostImage

Bahujnancha Buland Aawaj

July 8, 2024

PostImage

घरकुलाचे लाभार्थी निधीच्या प्रतीक्षेत शासनाला मात्र जाग येईना !


शहरी असो किंवा ग्रामीण भागात शासनाने गरीब व अत्यंत गरजू लोकांनच्या डोक्यावर निवारा असावा या हेतूने घरकुल वाटप केलेले आहे.परंतु सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला काही लोकांनी आपल्या खिशातील पैसे खर्च करून किंवा इतरांकडून उसणवार करून घरकुल बांधून घेतले,परंतु 90% गरीब लोकांच्या डोक्यावर निवारा बांधून झालाच नाही.

कारण काय शासनाने पहिला आणि दुसरा हप्ता नित्यनियमाने दिल्या गेला परंतु तिसरा हप्ता मात्र लाभार्थ्यांना मिळाला नाही आणि कित्येक गरिबांचे संसार उघड्यावरच पसरले आहेत.म्हणजे नवीन घरकुलाच्या अजूनही प्रतीक्षेतच आहेत.कारण जोपर्यंत तिसरा आणि चौथा हप्ता मिळणार नाही तोपर्यंत लाभार्थ्यांच्या डोक्यावर छत होणारच नाही.

 ऐन पावसाळ्याच्या दिवसात घरकुल अपूर्णच आहे तर मग विचार करा गरीब माणसाचा संसार उघड्यावरच आहे आणि म्हणून शासनाने उदाशीन अवलंबिल्या गेलेले धोरण थांबवून गरीब व गरजू लोकांच्या डोक्यावर निवारा लवकरात लवकर तयार होईल याचा विचार करावा.

 गरीब लाभार्थ्यांच्या आशा आकांक्षा घरकुलावरच अवलंबून आहे. त्याकरिता गरीब व गरजवंतांची थट्टा न करता तिसरा व चौथा हप्ता लवकर उपलब्ध करून द्यावा,म्हणजे गरीबांना हक्काचं घर मिळेल आणि उघड्यावर पडलेला संसार सावरायला मदत होईल.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

July 4, 2024

PostImage

लाडकी बहिण योजने पासून वंचित राहू नये असे वाटत असेल तर जाचक अटी शितील करा,राज्य सरकारला रमेश चौखूंडेची विनंती


सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे.राज्यातील भगिनींचा विचार केला तर खूपच सुंदर योजना आहे.अशी योजना या आधीच सुरू व्हायला पाहिजे होती परंतु उशिरा का होईना परंतु छान योजना आहे.

 मात्र काही जाचक अटी लादल्या गेल्या आहेत.जसे की अधिवास प्रमाणपत्र,पंधरा वर्षांपूर्वीचा शिधापत्रिका,जन्माचा दाखला,शाळा सोडल्याचा दाखला,हे या योजनेमध्ये नको आहेत.कारण राज्यात अशा कितीतरी लाडक्या बहिणी आहेत की त्यांना जन्माचा दाखला या जन्मी तर मिळणार नाहीच परंतु पुढच्या जन्मी सुद्धा मिळणार नाही,असं म्हणायला हरकत नाही आणि याच जाचक अटिंमुळे राज्यात कितीतरी लाडक्या बहिणी वंचित राहू शकतात.

 किंवा पंधरा वर्षांपूर्वीची शिधापत्रिका हि सुद्धा जाचक अट आहे.कारण ज्यांच्या लग्नाला 14 वर्षे झालेली आहेत किंवा 10 ते 12 वर्षे लग्न होवून झाले आहेत,अशा कितीतरी लाडक्या बहिणी आहेत.म्हणजे आजचा विचार करायला गेला तर त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही.