नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
08-02-2024
शासन आपल्या दारी,हा नारा देत शासनाने उभारले कृषी पंप धारकांवर कुऱ्हाड, १२ तासांची वीज आता ८ तासांवर
शासन आपल्या दारी हा नारा देत महाराष्ट्र शासनाने कितीही पोकळ वलग्ना करीत असेल तरी पण हे सरकार शेतकऱ्यांना निस्तनाबुत करून सोडणारे आहे,हे आजच्या भारनियमना वरून दिसून येत आहे.
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील बोटावर मापन्या एवढ्या भागात भारनियमन सुरू करून.शासनाने कृषीपंप धारक शेतकऱ्यांवर अन्याय केलेला आहे. हे सरकार शेतकऱ्यांविरोधी आहे,हे यावरून स्पष्ट होताना दिसतो आहे.
शेतकरी आपल्या कुटुंबाच्या उदारनिर्वाह करण्यासाठी काहीही रोजगार नसल्यामुळे नाईलाजाने शेतीचा व्यवसाय करतो आहे परंतु महाराष्ट्रातील सरकार जाणून-बुजून शेतकऱ्यांना नाहक त्रास देण सुरू केलेलं आहे.
भारनियमन सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या धान पिकाला फटका बसून उत्पन्नात घट झाली आणि सरकारने भारनियमन लादून शेतकऱ्यांवर अन्याय केलेला आहे.
कित्येकदा निवेदन देण्यात आले कित्येक ठिकाणी कृषीपंप धारक आपल्या हक्काच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन देखील करण्यात आले होते.
शेतकऱ्यांच्या धान पीक शेतात डोलत होता तेव्हा आठ तास विज मिळत होती त्यामुळे धान पीक नष्ट झाले. जशी धान पिकाची सीजन संपली तेव्हा शासनाने बारा तास वीज सुरू केली आणि पुन्हा पेरणी करून शेतात पिक भरत असताना बारा तासांवरून परत आठ तास वीज देऊन शासनाने कृषी पंप शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली,हे यावरून सिद्ध होत आहे.
कृषी पंप शेतकऱ्यांनवर भारनियमन लादून हे सरकार शेतकऱ्यांना निस्तनाबूत करण्याचा षडयंत्र करीत नाही ना ? अशी भावना शेतकरी करताना दिसून येतोय आणि हे जर असंच राहत असेल तर येणाऱ्या निवडणुकीत सरकारचा खरा चेहरा शेतकरी बदलवून टाकल्याशिवाय राहणार नाही,हे तितकेच खरं आहे. हे सरकार शेतकरी विरोधी सरकार असल्यामुळे, अशा सरकारला मुळासकट उपडून फेकल्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय शेतकऱ्यांसमोर उरणार नाही.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments