संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
21-12-2023
चामोर्शी मुल मार्गावरील रस्ता इतका खराब झाला आहे की रस्त्यावरून गाडी चालवणे तर कठीण झाले आहे परंतु साधं चालत जाणं येणं करतांना सुद्धा माणसाला दुरावस्त झालं आहे.जीव धोक्यात घालून अशा रस्त्यांवर मार्गक्रमण चालू असून,गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होळी साहेबांनी याआधी रस्ता दुरुस्ती करण होण्यासाठी भेंडाळा येथे रास्ता रोको आंदोलन केले होते,परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही.म्हणून पुन्हा भेंडाळा येथे रास्ता रोको आंदोलन केल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही,अशी विनंती आमदार साहेबांना करण्यात येत आहे.
मुल चामोर्शी मार्ग इतका खराब होऊन गेला आहे की त्या रस्त्याने जाणं-येणं करणं भयंकर कठीण होऊन गेला आहे.जीव धोक्यात घालून प्रवासी या रस्त्याने मार्गक्रमण करतात.वास्तविक या रस्त्यांचे दुरुस्ती करण याआधीच व्हायला पाहिजे होतं परंतु माशी कुठं शिंकली,हे अजूनही गुलदस्त्यात आहे. मूल चामोर्शी मार्गाचं काम सुरू करण्यात यावे या मागणीसाठी स्वतः आमदार साहेब भेंडाळा येथे रास्ता रोको आंदोलन केले होते आणि त्या घटनेला तीन चार महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी अजूनही दुरुस्ती करण्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही,याचा अर्थ आमदार साहेबांच्या रास्ता रोको आंदोलनाला फारसा यश मिळालेला नाही,हे यावरून सिद्ध होतंय.
मुल चामोर्शी मार्ग क्रमांक 353C तसं दोन्ही जिल्ह्यांना म्हणजेच चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना जोडणारा रस्ता असून या रस्त्यांवर जाणं येणं करण्याचा प्रवाश्यांची वर्दळ बऱ्याच प्रमाणात असून,मार्ग जरी खराब असला तरी जीवाची आटापिटा अन जीव धोक्यात घालून नाईलाजाने प्रवाश्यांना प्रवास करणे आवश्यक आहे. इतका वर्दळीचा रस्ता खराब झाला असून किंवा स्वतः या क्षेत्राचे आमदार रास्ता रोको आंदोलन करून मुख्य रस्त्याचे काम सुरू होत नसेल तर सरकार याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असेल किंवा आमचे आमदार साहेब कुठे तरी कमी पडत असतील,असा अंदाज वर्तविण्यात काहीच हरकत नाही,हे यावरून सिद्ध होतंय.
मुल चामोर्शी मार्गाचे काम सुरू झालेच पाहिजे,याकरिता गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार म्हणून देवराव होळी साहेबांनी पुन्हा रस्त्यासाठी आंदोलन उभे करायला पाहिजे आणि आंदोलन उभे करून सरकारला गर्भित इशारा द्यायला पाहिजे जेणेकरून महाराष्ट्र सरकार सुद्धा तातडीने लक्ष घालून लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरू करेल आणि प्रवाशांना मार्गक्रमण करताना कुठल्याही प्रकारचा नाहक त्रास सहन करावा लागणार नाही.
आणखी वाचा : आमदार साहेब तुम्हचा मोर्चा तुम्हचे सरकार अन तुम्हचाच पर्चा....
मूल चामोर्शी मार्ग हा मुख्य मार्ग असून,इतका खराब होऊन गेला आहे की या रस्त्याने प्रवास करण्याचा सामान्य प्रवाशांना किती हाल अपेष्टा सहन करून प्रवास करावा लागत असेल याचा सोयरसुतक महाराष्ट्र सरकारला नाही किंवा संबंधित प्रशासनालाही नाही.म्हणजे विचार करा की जनतेचे किती हाल होत असतील याचा विचार न केलेला बरा. ज्या जनतेच्या भरोशावर राज्यातील सरकार टिकून आहे आणि तीच जनता अशा जीव घेण्या रस्त्यावर आपलं जीव मुठीत घालून प्रवास करत आहेत,म्हणजे कथा कुणाची अन व्यथा कुणाला अशी म्हणण्याची वेळ मात्र सामान्य जनतेवर आलेली आहे.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
art of living
Dec. 22, 2023, 8:17 p.m.Kharach garaj ahe