अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
09-03-2024
संपूर्ण भारतभर काल दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.त्याच प्रकारे मौजा खुर्सा ता. जि. गडचिरोली या लहानस्या गावी सुद्धा जागतिक महिला दिन मोठ्या गुण्या गोविंदाने थाटामाटात साजरा करण्यात आला.
अगदी जगाला हेवा वाटावा अशा पद्धतीने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व अनुराधा महिला समूह बचत गट,संघर्ष महिला समूह बचत गट,एकता महिला समूह बचत गट,जय गणेशा महिला समूह बचत गट खूर्सा यांच्या संयुक्त विद्यमानाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सुकेशना जनबंधू होत्या.तसेच कुसुम नाकाडे,नीलकंठ धानोरकर ग्रामसेवक खूर्सा हे देखील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीलकंठ धानोरकर यांनी केले तर सूत्रसंचालन वंशिका आकाश लाडवे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अनिस प्रधान सचिव संदीप नामदेवराव आंभोरकर यांनी केले.
वैशाली संतोष आंभोरकर,सविता मोडघरे,लता आंभोरकर,नीता मोटघरे,गीता राऊत, किरण डोंगरे,कुसुम भगत,पिंगला कुडवे,तारकचंद मेश्राम ग्रामपंचायत सदस्य,रोहित मेश्राम,नरेश किनेकर आणि समस्त गावकरी खूर्सा यांच्या अथक परिश्रमाने कार्यक्रमाला रंगत आली.
विशेष म्हणजे खूर्सा सारख्या लहानस्या गावात महिला दिन मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.या गावकऱ्यांची जिद्द आणि एकी यामुळे हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला त्याबद्दल खूर्सा या गावाचा मी माझ्या तर्फे अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालींना शुभेच्छा देतो.भविष्यात असे कार्यक्रम गावात गुण्या गोविंदाने साजरे व्हावेत.
एवढ्या लहानशा खूर्सा गावात असे कार्यक्रम साजरे करून स्त्रियांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन स्त्री सक्षमीकरणाचा मूलमंत्र जपता येतो.त्याचप्रमाणे इथल्या महिला बचत गटाने जे कार्य केले ते खरोखर व्याख्यान जोग असून असा आदर्श गावागावात निर्माण करता येऊ शकतो.इतकेच नव्हे तर अशा कार्यक्रमा मुळे महिला सक्षमीकरणाला बळकटपणा मिळतो.अशा रनरागिनीला मानाचा मुजरा.
निर्मल जल शुद्धतात का वादा
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments