STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
22-02-2024
साहित्य नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुणे येथील साहित्य प्रज्ञामंच या संस्थेतर्फे दरवर्षी उत्कृष्ट वांड्.मय स्पर्धा आयोजित करण्यात येतात. यंदा आयोजित करण्यात आलेल्या "साहित्य प्रज्ञामंच पुरस्कार - २०२३" मध्ये झाडीपट्टीतील साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा-क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास नाट्यविभागात नाट्यलेखनाचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आल्याचे "साहित्य प्रज्ञामंच च्या" अध्यक्षा सौ. लिना देगलूरकर यांनी कळविले आहे. स्पर्धेचे परिक्षक म्हणून सौ. वंदना घाणेकर व मकरंद घाणेकर यांनी काम पाहिले.
या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे आहे. विशेष म्हणजे या नाटकाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयोग सुरू असून नुकत्याच शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेल्या महासंस्कृती महोत्सवात १८ तारखेला या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला आहे.
चुडाराम बल्हारपुरे हे झाडीपट्टीतील राज्य पुरस्कार प्राप्त नाटककार आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वांड्.मय पुरस्कार प्राप्त झालेले आहे. आजपर्यंत त्यांची विविध १३ पुस्तके प्रकाशित झाली असून विविध स्तरावरील अनेक पुरस्काराने ते सन्मानीत आहेत. महामृत्युंजय मार्कंडेश्वर, बहूढंगी समाधीवाले बाबा, स्पेशल रिपोर्ट, धरती आबा-क्रांतीसुर्य बिरसा मुंडा ,व गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके ही त्यांची गाजलेली नाटके आहेत.
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल प्रा. अरुण बुरे, योगेश गोहणे, प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर, प्रा. डॉ. जनबंधू मेश्राम, दै. लोकमतचे संजय तिपाले, दै. हितवादचे रोहिदास राऊत, दै. देशोन्नतीचे नरेश बावणे, प्रा. एस. एस. जगताप, प्रा. डॉ. माधव कांडणगीरे, प्रा. डॉ.राजकुमार मुसणे, प्रा. नवनीत देशमुख (साहित्यिक), लक्ष्मीकमल गेडाम (साहित्यिका) , मधुश्री प्रकाशनचे प्रा. पराग लोणकर (प्रकाशक) , डॉ. एस. एन.पठाण, डॉ. परशुराम खुणे, प्रमोद बोरसरे, कुसूमताई आलाम (साहित्यिका), हिरामण लांजे (साहित्यिक), प्रा. प्रब्रम्हानंद मडावी,प्रा. डॉ. बावनकुळे, पुंडलिक भांडेकर (पत्रकार) व इतर साहित्यिक मित्रांनी अभिनंदन केले आहे.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments