ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
F
11-02-2024
महाराष्ट्राच्या इतिहासात दोन स्थानिक राजकीय पक्षांचे अस्तित्व मिटवण्यासाठी भाजप ने जी ताकद लावली होती, त्यास अखेर यश मिळत गेले. अनेक यंत्रणा मदतीला असल्यामुळे त्यात व्यत्यय येणेदेखील अशक्य होते. भारतीय जनता पक्षाला कमालीचा आनंद वाटत असला, तरी जनतेला काय वाटते हे महत्त्वाचे आहे. कारण पक्षाचे फक्त चिन्ह गेले, तरी विचारांचे अस्तित्व आणि सामर्थ्य जात नसते.
विश्वासघातकी, बेईमानी आणि संधीसाधू राजकारणाची त्रिसूत्री सध्याच्या राजकारणात दिसते. पण 'नॅनो 'वर 'बीएमडब्ल्यू'चा लोगो लावला की, 'नॅनो' 'बीएमडब्ल्यू' होत नाही, हे सर्वच राजकीय पक्षांनी लक्षात ठेवले पाहिजे. सध्या या महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे किंबहुना या देशांमध्ये काय चाललंय, हे पाहून नवी पिढी राजकारणात येईल की नाही शंकाच आहे. सध्या तरी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे. अवघ्या महाराष्ट्राचे कल्याण करण्याची संधी समोर असताना सुडाच्या राजकारणाचे सुरुंग पेरले गेले आहेत. राज्यातले राजकारण अत्यंत गलिच्छ पातळीवर आणून ठेवले आहे. सत्तेची महत्त्वाकांक्षा आणि आभाळाला भिडलेला अहंकार राज्याची वाट लावतोय!
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर मराठा समाजाचा एकमेव सामाजिक राजकीय प्रतिमा असलेला नेता म्हणजेच शरद पवार. शिवसेनेबरोबर आता त्यांचाही पक्ष गायब करून टाकण्यात आला. सामान्य जनतेला हा प्रकार आवडला की नाही हे मतपेटीतूनच कळेल. देशामधील लोकशाहीची मूल्य आणि संविधानामधील विविध प्रकारच्या तरतुदी पायदळी तुडवल्या गेल्या आहेत हे मात्र नक्की.
दादांनी पक्ष पळवला व भाजपसोबत गेले. त्यांची तरी काय चूक? विरोधात राहून चौकशीचा ससेमिरा मागे लावून घेऊन निरर्थक दोन-तीन वर्षाकरिता जेलवारी करण्यापेक्षा सत्तेत राहून क्लिनचिट मिळणार असेल, तर मग कसले काका अन् कसले काकांचे उपकार? शेवटी या वयात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांसारखे एक दिड वर्ष जेलमध्ये जाण्यापेक्षा सत्तेतील दिवस काय वाईट? बहुदा हाच प्रॅक्टिकल विचार अजितदादांनी केला असेल. महाराष्ट्रातील जनतेने त्यांना दोष देण्यापेक्षा या सर्वामागचे कर्ते-करविते ओळखले पाहिजेत. ज्या राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांवर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सिंचन घोटाळ्याचा आरोप केला, त्यांनाच सर्व आरोपांसहित महाराष्ट्रातील सत्तेत सामील करत मोठ्या दिमाखात व जोशात महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्रीपद बहाल केले. त्यामुळे कसले आले तत्त्व आणि कसले आले विचार. सत्ता हाच पुढे जाण्याचा व विकासाचा सोपा मार्ग आहे, हे लक्षात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पक्षचिन्हावर अजितदादा पवार गटाचा दावा मान्य करत निवडणूक आयोगाने शरद पवार गटाच्या विरोधात निकाल दिला. शिवसेनेचा घटनाबाह्य निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादीचा निकाल काय लागणार? याचा अंदाज मुरब्बी नेत्यांना आधीच आलेला होता. सध्या घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झालेला आहे. सरकार किंवा विधिमंडळ यांचा थेट संघर्ष सर्वोच्च न्यायालयाबरोबर होत आहे. संविधानाला वाचवायची जबाबदारी आता सर्वोच्च न्यायालय व शेवटी जनतेलाच करावी लागणार आहे. राजकारणात, समाजकारणात विकृती प्रस्थापित होताना दिसते आहे. महाराष्ट्राची सामाजिक व राजकीय घडी विस्कटली आहे. जिथं फुलं वेचली तिथं गोवऱ्या वेचायची वेळ आली आहे. जो महाराष्ट्र अनेक चळवळींनी, समाजसुधारकांच्या त्यागाने, संताच्या शिकवणीने घडला आहे, तो उद्ध्वस्त होतो की काय? अशी शंका येत आहे.
त्यामुळे उरलेल्या भ्रष्ट व सुमार नेत्यांच्यात फडणवीस मोठे दिसू लागलेत. निरंकुश सत्ता हातात असल्याने विरोधी पक्षातले भ्रष्ट नेते त्यांच्यासमोर वाकू लागलेत. भाजपासह विरोधी पक्षातले नेतेही फडणवीसांना शरण जाऊ लागले.त्यामुळे आता यांचा निकाल ही जनताच करेल.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments