CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
03-01-2024
कोणसरी परीसरातील जैरामपूर, मुधोली चक नं. १. मुधोली चक्क नं. २. सोमनपल्ली, गणपूर, विठ्ठलपूर या गावात महाराष्ट्र सरकारने एमआयडीसी स्थापन करून या परीसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी कारखानदाराच्या घशात घालण्याचा प्रकार असून याला शेतकऱ्यांचा तिव्र विरोध आहे. शासनाच्या अशा प्रयत्नांमूळे या परीसरातील शेतकरी सर्वप्रथम नष्ठ होईल. महाराष्ट्र सरकारच्या दडपशाहीला न जुमानता शेतकऱ्यांच्या मुलांना शासनाविरोधात आवाज उङ्गवायला सांगण्याचा प्रयत्न चालू आहे. कोणसरी परीसरातील जैरामपूर, मुधोली चक नं. १, मुधोली चक नं. २. सोमनपल्ली, गणपूर, विठ्ठलपूर या गावाच्या हद्दीतील एकूण ८९८.८४२२ हेक्टर जमिनीवर महाराष्ट्र सरकार एमआयडीसी स्थापन करून जमिनी कारखानदाराच्या घशात घालण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतू याला परीसरातील शेतक-यांचा विरोध आहे. जीव गेला तरी जमीन देणार नाही. अशी शेतकऱ्यांची भुमीका आहे. तसा प्रामपंचायतने ग्रामसभेमध्ये नाहरकत पारीत करून शासनाला कळविले आहे.
जल, जंगल, जमीन या उपक्रमाद्वारे जमिन टिकवून ठेवणे हा शेतकऱ्यांसमोर आजच्या घडीला ज्वलंत प्रश्न आहे. गावागावात जनजागृती करून सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची माहिती समजावून सांगणे गरजेचे आहे. कारण ग्रामिण भागातील माझा शेतकरी बांधव निरक्षर आहे. स्वाभिमानी आहे पण भित्रा आहे. त्यामुळे त्याला जनजागृतीची गरज असल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या मुलाने (युवा पिढीने) एकत्र येऊन सरकारच्या दडपशाहीविरोधात रस्त्यावर उतरून लढा द्यायला पाहिजे. महात्मा फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा वारसा घेऊन शेतकरी प्रामाणिक पणाने व
स्वकष्टाने शेतातील मातीशी आपली नाळ जुळवून दिवसभर राबराब राबून उत्पन्न घेतो आणि आपल्या हक्काच्या काळ्या माऊलीवर सरकार दडपशाही करून त्या काळी माऊलीला अधिग्रहित करण्यात प्रयत्न करीत असेल तर ते सरकारचे प्रयत्न हाणून पाडल्या शिवाय शेतकऱ्यांकडे दुसरा कोणताच पर्याय उरणार नाही. हे सरकारला दरडाऊन सांगणे आजच्या घडीला आवश्यक आहे. म्हणून कोनसरी परिसरातील भूसंपादन शेतकऱ्यांच्या युवा पिढीलाअशी विनंती करतो की, आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात गावागावांत जाऊन जनजागृती करावी अन् शासनाच्या दडपशाहीविरोधात रस्त्यारस्त्यांवर लढाई लढण्याकरीता
अशी लढाई आम्ही डोळ्यांनी बघितली आहे. रस्त्यावरची लढाई मी पण लढलो आहे. परंतू लढाई लढतांना युवक पिढी पूढे न येता आपली जबाबदारी आपल्या बापाच्या माथी मारून मला महत्वाचा काम आहे म्हणून निघून जातात. परंतु असे न करता युवकांनी स्वतःला झोकून द्यावे आणि सरकारविरोधी संघर्ष उभा करावा.
Redefine your style
book your appointment now
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments