संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
25-12-2023
महाराष्ट्र सरकारने कोनसरी परिसरातील जैरामपूर,मुधोली चक नं.१,मुधोली चक नं.२ ,सोमनपल्ली,गणपूर,विठ्ठलपूर या गावाच्या हद्दीतील एकूण 898.8422 हेक्टर जमीन शासनाने खाजगी व सरकारी क्षेत्र असलेली भूमी अधिग्रहण करण्याचा आदेश काढलेला असून.यामुळे या परिसरातील शेतकरी डबघााईस येणार असून,या विरोधात महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यासाठी मौजा जैरामपूर येथे आक्रोश सभा घेऊन.एक इंचभर सुद्धा जमीन देणार नाही,असा निर्धार परिसरातील शेतकऱ्यांनी केला विशेष म्हणजे या सभेला महिलांची उपस्थिती पुरुषांपेक्षा जास्त होती.
महाराष्ट्र शासनाने चामोर्शी औद्योगिक क्षेत्रातील कोनसरी परिसरातील 898.8422 हेक्टर जमिनीला भूसंपादित करण्याचा जो घाट घातला जात आहे.त्यामुळे या परिसरातील शेतकरी सर्वप्रथम नेस्तनाबूत होणार आहे.म्हणजे शेतकऱ्यांना पूर्णपणे संपविण्याचा डाव असून,याला पूर्णपणे महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे.अशा प्रकल्पामुळे औद्योगिक क्रांती घडून येणार असल्याची खोटी बतावणी सरकार करीत असून,या प्रकारामुळे शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबांना संपविण्याचा घाट घातला जात आहे आणि,हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही.
परंतु महाराष्ट्र शासन आपली फसवणूक करीत असून आपल्याला भूमिहीन करण्याच्या मनस्थितीत असून आपल्याला कंगाल केल्याशिवाय सोडणार नाही याची पूर्ण कल्पना कोणसरी परिसरातील शेतकऱ्यांना असल्यामुळे.आज दिनांक २५-१२-२०२३ रोजी मौजा जैरामपूर येथे ग्रामपंचायत पटांगणावर आक्रोश सभेचे आयोजन करून,शासनाविरोधात आपला रोष प्रगट केला.मुख्य म्हणजे आज जैरामपूर येथे झालेल्या सभेला भूमी अधिग्रहित परिसरातील महिला पुरुषांच्या तुलनेत जास्त संखेत उपस्थित होत्या,हे इथे आवर्जून प्रगट करावेसे वाटते.
ज्या सभेला महिलांची उपस्थिती जास्त प्रमाणात असते ती सभा,तो निर्धार कधीच वाया जात नाही,हेच यावरून सिद्ध होतंय. कोनसरी परिसरातील भोळ्या भाबड्या महिला आपल्या जमिनीचा तुकडा सरकारच्या माथी लागू नये याकरिता शेतातील कामधंदा सोडून शासनाविरोधात आपला आक्रोश प्रगट करताना दिसत होत्या.म्हणजे विचार करा शासनाविरोधात या भगिनींच्या मनात किती चीड निर्माण झाली होती,ही स्पष्ट त्या महिलांच्या चेहऱ्यावरून दिसून येत होते आणि मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले हे विदारक दृश्य आहे.
एक इंच भर सुद्धा जमीन शासनाला देणार नाही असा निर्धार त्या महिला व्यक्त करीत होत्या.आजच्या जैरामपूर येथील सभेला कोणसरी परिसरातील जवळपास 3 हजाराच्या वर अन्यायग्रस्त शेतकरी उपस्थित असून सरकारचा निषेध केला जात होता.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments