CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
06-01-2024
गडचिरोली जिल्ह्यात जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी तसेच जीव गमावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात असून. निरपराध लोकांचा नाहक बळी जाताना दिसतो आहे.वनविभागाकडून थातूर-मातूर चौकशी करून मृत्यू पावलेल्या कुटुंबियांना पैसे मोजून आपले हात झटकण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे परंतु असं न होता,ही बाब गंभीर पणे हाताळून महाराष्ट्र सरकारने उपाय योजना आखून वेळीच अमलात आणायला पाहिजे.वाघांचा वावर गावाच्या दिशेने का वळतो आहे ? याचा आत्मचिंतन व्हायला पाहिजे जेणेकरून निरपराध लोकांचा बळी जाणार नाही याची खबरदारी घ्यायला पाहिजे.
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील शंकरपूर येथील महिलेचा जंगली हत्तीने बळी घेतलेली घटना असो किंवा गडचिरोली तालुक्यातील वाकडी येथील महिलेचा वाघाने घेतलेला बळी असो परंतु या प्रकारामुळे जिल्ह्यातील जनता भयभीत झालेली आहे हे,मात्र खरं आहे.२०१९ पासून ते २०२३ चा जरी विचार करायला गेलो तर जिल्ह्यात आजपर्यंत जंगली प्राण्यांच्या हल्ल्यामुळे 64 निरपराध लोकांना आपला जीव गमावण्याची नामुष्की ओढावल्या गेली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील आकडेवारी यांचा विचार करायला गेला तर तो खालील प्रमाणे आहे.
वडसा विभाग : आरमोरी ९, देलनवाडी १
गडचिरोली विभाग : चातगांव ८,गडचिरोली ५,कूणघाडा १, मुरूमगाव १,घोट २,चौडमपल्ली १, सिरोंचा २, एटापल्ली ४, आरमोरी ३,
2019 पासून ते 2023 पर्यंतचे गडचिरोली जिल्ह्याची परिस्थितीचा प्रकार खूपच गंभीर आहे.जंगली प्राण्यांच्या वावर खेड्यापाड्यांकडे का वळता झाला ? याचा सरकारने आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. वास्तविक या बाबींकडे महाराष्ट्र सरकार गांभीर्याने बघायला पाहिजे परंतु तसं होताना दिसत नाही.जंगली प्राण्यांनी केलेली शिकारीचे थातूर-मातूर वनविभागाकडून चौकशी झाली आणि सरकार हातवर करून सरकार जनतेच्या किती कैवारी आहेत,हे दाखविण्याच्या केविलवाना प्रयत्न करीत आहे परंतु प्रश्न पैशांचा नाही प्रश्न आहे तो म्हणजे निरपराध लोकांचा बळी जाण्यांचा.सर्वात मोठी शोकांतिका ही आहे की यावर आत्मचिंतन व्हायला पाहिजे जनतेने असे प्रश्न सरकारकडे लावून धरायला पाहिजे पण तसं होताना दिसत नाही. शेळी जाते जीवनाशी अन खाणारा म्हणतोय वातळ आहे,अशी परिस्थिती जनतेची आहे.
राहिला प्रश्न जंगली प्राण्यांचे लोंढे खेड्यापाड्याकडे का येत आहेत ? याचा सुद्धा सरकारने विचार करून उपाय योजना अमलात आणायला पाहिजे परंतु तसं होताना दिसत नाही कारण आज पर्यंत सरकार या बाबींकडे जाणून बुजून कानाडोळा करीत आहे.दिवसेंदिवस जंगली प्राण्यांची संख्या वाढत आहे याला आमचा अजिबात विरोध नाही वाढत्या संख्येवर आळा लावा असेही आम्हाला म्हणायचं नाही परंतु निरपराध लोकांचे जीव जात आहे, त्यावर सरकार गांभीर्याने विचार करायला पाहिजे परंतु जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे या बाबींकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्या जात आहे,असा सरळ सरळ अर्थ आहे. राज्य सरकारला एवढेच विनंती आहे हा प्रश्न गंभीर आहे याचे गांभीर्य ओळखणे गरजेचे आहे,यामुळे कितीतरी निरपराध लोकांचे बळी जाण्यापासून वाचविता येईल आणि जिल्ह्यातील जनता शांतपणे जीवन जगू शकेल.
Redefine your style
book your appointment now
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments