बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
25-07-2024
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असून धानाचे परे आणि केलेली रोवनी वाहून गेली तसेच कित्येक शेतकऱ्यांचे बांधीचे पाळ सुद्धा अती पावसामुळे फुटून वाहून गेली आहेत.असे अनेक संकटे शेतकऱ्यांसमोर आवर्जून उभी आहेत.आता बांधीचे पाळ नसल्याने तयार करायचे म्हटले तर माती कुठून आणायची ? हा खरा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा आहे.आणि अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांकडे आता ताकद उरली नसून,ती शासनाने लवकरात लवकर शेतीच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामे करून जास्तीत जास्त मदत जाहीर करावी जेणेकरून अतिवृष्टीमुळे कंबरडे मोडलेला शेतकरी जोमाने उभा राहील.
जी परिस्थिती धान उत्पादक शेतकऱ्यांचे झालेली आहे तसीच गत कापूस किंवा सोयाबीन शेतकऱ्यांचे सुद्धा झालेली आहे.अतिवृष्टीमुळे एका महिन्यांपासून मशागत करायला वेळ मिळाले नाही आहे.आणि अशा कठीण परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून दिलासा द्यावा,ही मागणी घेऊन शेतकरी एकता पॅनलच्या वतीने तहसीलदार चामोर्शी यांना निवेदन देऊन,शेतकऱ्यांचे व्यथा मांडल्या गेली.त्यावेळी रमेश चौखुंडे,प्रदीप भाकरे सगनापूर.प्रदीप जगन भोयर,भाऊराव पाल,प्रदीप सयाम एकोडी.हेमंत खेडेकर,सत्यवान कुत्ते कानोह्ली.देवानंद तुंबळे,किशोर लाळ कळमगाव.देविदास देशमुख वेलतुर तुकूम.विकास पोटे,विलास धोंगडे वाघोली. मुखरेश्वर चुदरी,सतीश पुटकमवार,केशव चुदरी,अनिल कुमरे डोटकुली. तोता पाटील आभारे,कबीर आभारे घारगाव l.भैय्याजी कुनघाडरकर,उमाकांत सातपुते,कोकावर सर,प्रमोद डांगे भेंडाळा आणि परिसरातील बरेच शेतकरी उपस्थित होते.
Your car is our responsibility
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments