नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
29-12-2023
वेगळा विदर्भ झालाच पाहिजे या मागणीसाठी येथील इंदिरा गांधी चौकात आज २९ डिसेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करून राज्य सरकारला गर्भीत इशारा देण्यात आला. भर उन्हामध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता शेकडो कार्यकर्ते चौकात उभे राहून वेगळा विदर्भ झालाच पाहिजे अशा घोषणा देत, हीे मागणी कीती महत्वाची आहे हे यावरून सिध्द होते. राज्यकर्त्यांच्या उदासीन धोरणामुळे जनतेला भर रस्त्यावर उतरण्याची वेळ येते हे वैदर्भीय जनतेचे दुदैव आहे.
विदर्भाची मागणी रास्त असून सरकार जाणून बुजून या मागणीकडे काना-डोळा करीत आहे. परंतू ‘आता नाही तर, कधीच नाही’ ही अशा घेऊन जनता रस्त्यावर उतरून विदर्भाचा आवाज बुलंद करतांना दिसत आहेत. विदर्भ राज्य आमची हक्काची मागणी असून ती मिळविण्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. हिच भावना आंदोलन कर्त्यांच्या चेहर्यावर दिसून येत होती. आयुष्यभर राज्यांवर सत्तेचे अधिराज्य तुम्हीच अबादीत राखा पण आम्हाला वेगळा विदर्भ द्या! अशी आर्त हाक गडचिरोलीच्या रास्ता रोको आंदोलनकर्त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देत होते. आम्हाला भिऊ नको वेगळा विदर्भ हवा. हेच राज्यातील राज्यकर्त्यांना सांगत होते.
विदर्भ वेगळा झालाच पाहीजे. ही मागणी घेऊन विदर्भातील जनता रस्त्यावर उतरून सरकार विरोधी आक्रोश प्रगट करीत आहे. निवडणूक आली की, राज्यातील राज्यकर्ते विदर्भातील जनतेला अनेक प्रलोभने दाखवून भोळ्या-बाभळ्या जनतेची फसवणूक करून मते पदरात पाडून घेतात. आणि निवडणूका संपल्या की, तो मी नव्हेच! अशी भावना निर्माण करून वेळ निभावून नेतात. हीच पध्दत देशातील सर्वच राजकीय पक्षांची झालेली असून याला विदर्भातील जनता बळी पडत आहे. परंतू विविध आश्वासने ऐकून जनता देखील कंटाळून गेली आहे. महत्वाचे म्हणजे वेगळा विदर्भ का आवश्यक आहे. हे विदर्भातील जनतेला कळून चुकलेला आहे. म्हणून आता ‘आश्वासने नको तर कृती हवी’ ही मागणी घेऊन विदर्भातील जनता रस्त्यावर उतरून सरकार विरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न करत आहे. हेच आजच्या गडचिरोली रास्ता रोको आंदोलनावरून दिसून येते.
आम्ही सत्तेत परत आलो की, विदर्भाची मागणी पूर्ण करून म्हणजे वेगळा विदर्भ करून असे भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात लिहीले होते. परंतू सत्ता मिळताच सरड्या सारखे रंग बदलून विदर्भाच्या मागणीकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्या गेले. भाजपाने वेगळा विदर्भ केला नाही. भाजपाच्या सत्तेत विदर्भ विकासापासून कोसो दूर गेलाय अशी म्हणण्याची वेळ आता विदर्भातील जनतेवर आलेली आहे. म्हणजे लक्षात घ्या विदर्भाचा विकास तर झालाच नाही. परुतू सत्ताधार्यांनी विदर्भावर सतत अन्याय करतांना दिसून येत आहे. भाजपाचे सरकार विदर्भातील जनतेबद्दल सावत्रपनाची भावना निर्माण करीत आहेत हेच यावरून लक्षात येते. विदर्भातील जनतेवर सातत्याने होणारा अन्याय आता असह्य होऊ लागला आहे. म्हणून विदर्भातील जनता रस्त्यावर उतरून सरकार विरोधात विदर्भ वेगळा झालाच पाहिजे या मागणीसाठी आंदोलन करीत आहेत. आणि विदर्भ राज्य आंदोलन आता जनचळवळ म्हणून उभी करू असा इशारा सरकारला देण्यात येत आहे.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments