निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
06-03-2024
देशातील लोकसभेच्या निवडणुका केव्हाही जाहीर होऊ शकतात. निवडणुकांचे वारे वाहायला लागले,अशा परिस्थितीत पुढार्यांची मर्जी सांभाळणे आणि आपल्या जीवाची पर्वा न करता उमेदवाराच्या प्रचाराच्या रणधुमाळीत स्वतःला झोकून देणे आणि पुढाऱ्यांच्या सभेकरिता त्यांच्या पायघड्या उचलण्याकरिता तळागाळातील कार्यकर्त्यांनो,आता सज्ज व्हा कारण,ये समय नही सोने का.
तसं पाहायला गेल तर तळागाळातील कार्यकर्ता हा नेहमीच आपल्यातील तत्परता दाखविण्यासाठी सदा सर्वदा तयारच असतो,परंतु निवडणुकीची जाहीर प्रचार सभा म्हटल्यावर तो अगदी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच असतो,तो काही विषय नाही. कारण निवडणुका जाहीर व्हायच्या असल्या तरी निवडणुकांची जास्त खुशी ही तळागाळातील कार्यकर्त्यांना जास्त असते आणि खेड्यापाड्यात तर सर्वत्र निवडणुकांच्या चर्चा रंगू लागतात.
एकदाची ज्यांना निवडणूक लढायचे आहे त्यांना जेवढा इंटरेस्ट नाही, त्यापेक्षाही दुप्पट इंटरेस्ट त्यांच्या कार्यकर्त्यांना असतो आणि ही वस्तुस्थिती आहे.पुढे होणाऱ्या निवडणुकांच्या आपल्या क्षेत्रातील उमेदवार कोण असेल ? यापासून तर तो उमेदवार निवडून येईपर्यंत याचे भाकीत रोजच्या रोज वर्तविण्यापासून स्वतःला वाहून घेतो.
पुढार्यांची सभा असली की कार्यकर्ता जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस चकरा मारताना दिसतो आहे आणि पायघड्या उचलण्या पलीकडे या सामान्य कार्यकर्त्यांचे काहीच काम नसतो,तरीपण तळागाळातील कार्यकर्ता पुढार्यांच्या पायघड्या उचलण्यातच स्वतःला धन्य समजतो.
अरे बाबांनो आता तरी डोळे उघडा वेळेत सावधान सावध व्हा आणि पुढाऱ्यांच्या पायघड्या उचलणे बंद करा,यातच आपलं भलं आहे. पायघड्या उचलून आपला काहीच फायदा होत नाही.राजकीय पुढारी आपला फायदा करून घेण्यासाठी निवडणुकीपुरता आमचा वापर करून घेतात आणि आम्ही आपला कामधंदा सोडून पुढार्यांच्या नादात आपलं जीवन बरबाद करतो आहोत,हे सर्वप्रथम लक्षात घ्या.पायघड्या उचलणे बंद करा आणि स्वाभिमानाने जीवन जगा.
|| ओळख लहान असली तरी चालेल पण,ती स्वतःच्या कर्तुत्वाची असायला पाहिजे ||
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
Rajendra
March 7, 2024, 8:58 a.m.मस्त