CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
10-01-2024
मागील महिन्यात छत्तीसगड,मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि भारतीय जनता पक्षाला मिळालेला घवघवीत यश याचा जर सारासार विचार केला तर,हळूचपणे डोक्यात कल्पना तरंगायला सुरुवात होते.हा सर्व प्रकार ईव्हीएम मशीनचाच आहे बाकी सर्व काही नाही आणि समोरच्या निवडणुका होणार आहेत त्या सर्व अशाच प्रकारे होणार,असे मत देशातील अनेक राजकीय पुढारी व्यकत करीत आहेत.
भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत ज्या काही निवडणुकाजिंकल्या त्या सर्वच्या सर्वच ईव्हीएम मशीनमुळे जिंकल्या,असे म्हणता येणार नाही. ज्यावेळी २०१४ मध्ये नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले होते त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीची जबरदस्त हवा निर्माण झाली होती आणि आधीच्या सरकारला जनता देखील कंटाळली होती,हेही तितकच खरं आहे.परंतु आता मोदी लाट वगैरे काहीच नाही तरी परंतु भाजपाने जो निर्विवाद यश संपादन केला त्यावरून असं लक्षात येते की,दाल में कुछ काला है.
मध्यप्रदेश,छत्तीसगड,राजस्थान या राज्याच्या निवडणुका पार पडल्या यांत भाजपाने या तीनही राज्यांमध्ये भरभरून यश संपादन करून काँग्रेस पक्षाला चारी मुंड्या चित करण्यात, भाजप वरचढ ठरला. राजस्थानमध्ये परिवर्तन होणार होता,हे सांगायची गरज नाही आणि तेच झाले इथपर्यंत ठीक आहे परंतु मध्य प्रदेश,छत्तीसगड राज्यांचा विचार करायला गेलो तर या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेत येईल,असा अंदाज होता आणि त्या राज्यातील वातावरण काँग्रेस पक्षाच्या बाजूने होता परंतु या दोन्ही राज्यांमध्ये माशी एकाच वेळी शिंकली आणि होत्याच नव्हतं झालं.
आता काही दिवस गेले की लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील देशातील सर्वच राजकीय पक्ष आपाआपली ताकद पणाला लावण्याचा प्रयत्न करतील,यात काही शंकाच नाही परंतु देशात ज्या काही राजकीय घडामोडी निर्माण होत आहेत, त्यावर लक्ष केंद्रित करणे फार महत्त्वाचे होऊन गेला आहे.खरोखर ईव्हीएम मशीन मध्ये जर घोळ निर्माण झाला असेल तर देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा विजय संपादन करू शकतात आणि एकदा जर पुन्हा मोदीनी विजय संपादन केले तर विरोधी पक्ष पुन्हा एकदा चारही मुंड्या चीत.
नरेंद्र मोदी यांची पूर्वीसारखी अनुकूल परिस्थिती आजच्या घडीला उरलेली नाही आणि या गोष्टीला स्वतः नरेंद्र मोदी नाकारू शकत नाही.कारण त्यांनी कितीही विकासाच्या वलग्ना करीत असतील तरी पण सामान्य जनता महागाईने हवालदिल झालेली आहे आणि आजच्या घडीला परिवर्तनाची लाट असल्याचा वातावरण निर्माण झालेला आहे आणि ही वस्तुस्थिती स्वतः भाजपाचे राजकीय पुढारी सुद्धा नाकारू शकत नाही.तरीपण भाजपाने आत्ताच जाहीर करून टाकलंय,आबकी बार चारसौ के पार,म्हणजे विचार करा किती आत्मविश्वास मनात निर्माण झाला असेल.
राम मंदिर आस्थेचा मुद्दा आहे आणि सर्वांना तो ठाऊक आहे.जो तो आप आपल्या जाती धर्माचा अभिमान बाळगतो आणि बाळगायलाच पाहिजे.परंतु देशातील गोरगरीब जनता महागाईने होरपळतो आहे,याचे सोयरसुतक केंद्रातील सत्ताधारी पक्षाला आहेच नाही.तरीपण चारसौ के पार चा नारा देण्यात सरकार मग्न आहे. म्हणूनच मनात शंका निर्माण होतात,कही ईव्हीएम मशीन की तो चाल नही है.पुढील निवडणुका ईव्हीएम मशीनद्वारे न होता बॅलेट पेपर नीच घ्यायला पाहिजे,अशी जनतेची मागणी आहे.
लेखक : रमेश चौखूंडे
Redefine your style
book your appointment now
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments