संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
22-12-2023
शहरी भागा पाटोपाट आता ग्रामीण भागातील युवक सुद्धा उंच अशी गगन भरारी घेण्याच्या मानसिकतेत आहेत पण शहरी भागांतील युवकांप्रमाणे ग्रामीण भागातील युवकांना सोय सुविधा उपलब्ध नसल्या कारणाने ग्रामीण युवकाला अनेक अडचनिंना तोंड द्यावे लागते,हिच महत्वाची कमतरता असून ग्रामीण युवकांना संधीपासून कोसो दूर राहावं लागत असून मिळालेल्या संधीचा सोनं करण्यात अपयशी ठरतात.
जग इंटेरनेटच्या भरोश्यावर आकाशापर्यंत जाऊन पोहचला असतांना ग्रामीण भागांतील युवकांन मनाव तसं यश मिळवण्यात माघार घ्यावी लागतं कारण जिथं कव्हरेजच मिळत नाही,तिथली बिकट अवस्था न सांगितलेली बरी. ग्रामीण भागांतील युवकांना चांगल्या प्रकारचा मार्गदर्शन मिळत नाही. शिक्षणाच्या सोयी उपलब्ध राहत नाही,दळणवळणाच्या वेळेवर सोयी उपलब्ध राहत नाही आणि घरातील वडीलधारी मंडळी अशिक्षित असल्यामुळे त्यांना पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही,अशी कितीतरी उदाहरण देता येतील. इंटेरनेटमुळे जगात प्रगती झाली,या गोष्टी मान्य आहेत परंतु ह्या सुविधा ग्रामीण भागात मिळवण्यासाठी युवकांची दमछाक होते किंवा त्यांना तारेवरची कसरत करावी लागते आणि या मुख्य कारणांमुळे ग्रामीण भागांतील युवकाला शहरी भागांतील युवकांसोबत स्पर्धा करण्याकरिता अडचण भासते.
ग्रामीण भागात सर्वात मोठी अडचण कव्हरेजची असल्यामुळे ग्रामीण भागांतील युवक स्पर्धेत टिकू शकत नाही आणि अपयश मरणाहून वोखटे यामुळे लाख प्रयत्न करून अपयश आला तर तो जिव्हारी लागतो. मानसिकता खचली जाते आणि एखदा मानसिकता खचली की,कधी कधी होत्याचं नव्हतं होतं परंतु माझी ग्रामीण युवकाला विनंती आहे,या अडचणींना तोंड देत ध्येय कसं साधता येईल याचा विचार करा आणि यश मिळवा जिद्ध आणि चिकाटीच्या भरोश्यावर यश संपादन करण्याचा प्रयत्न करा. अगदी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पायांने चालणारा व्यक्ति फक्त अंतर कापतो आणि डोक्यानं चालणारा ध्येयापर्यंत जाऊन पोहचतो,हे प्रथम आपल्या मनावर बिंबवावं.
अडचणी कितीही आपल्या समोर अवासून उभ्या असतील तरी परंतु त्याचा प्रतिकार करीत यश संपादन करावं लागेल. कठोर परिश्रमाशीवे या जगात कोणतीही गोष्ट शक्य होणार नाही,हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते,ते प्रथम मनात रुजवावे लागेल,जीवनाच्या चक्रव्यूहात तोच यशस्वी होतो,जो धैर्याशी संघर्ष करतो,असे कितीतरी अडचणी ग्रामीण भागातील युवकांसमोर उभ्या आहेत आणि स्पर्धेत सातत्य टिकवून ठेवायचं असेल तर अडचणींना तोंड देत यश संपादन करता येतो.
मनाची तयारी असेल तर अगदी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन करू शकतो आणि आपल मन साथ देत नसेल तर नाचता येईना अंगण वाकडे अशी अवस्था होईल. मी आत्मविश्वासाने सांगतो ग्रामीण भागातील युवक मागे नाही. ध्येय गाठण्याची क्षमता ग्रामीण युवकांमध्ये आहे. ऊन,वारा,पाऊसाचे चटके सोसून संकटांवर मात करण्याची सवय त्यांच्या मध्ये आहेत आणि हे दणकट माझे बाहू याप्रमाणे तो स्पर्धेत टिकून राहील आणि यशाचं किनारा शोधत जिद्ध आणि चिकाटी च्या जोरावर संकटांनचा सामना करीत यश संपादन करेल,यात दुमत नाही.
आणखी वाचा : शेतकऱ्यांच्या पोरा तू लढायला शिक
ग्रामीण भागांतील युवक शहरी भागातील युवकांच्या बुद्धीने तलख असून थोर मोठ्यांचा मान पान राखण्यात सरस आहेत,फरक इतकाच आहे की,तो शहरात जन्माला आला आणि खेड्यात जन्माला आला,शहरी भागांतील युवकांना सुविधा लवकर उपलब्ध होत गेल्या आणि ग्रामीण भागांतील युवकांना त्या मुळातच मिळाल्या नाही तरीपण स्पर्धेत टिकून रहा न्याचा प्रयत्न करतो म्हणजे खुपकाही करतो असंच म्हणावं लागेल,तरी पण अश्या परिस्थितीवर मात करून यश संपादन करूनच परत येईल,एवढं मात्र सत्य आहे.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
art of living
Dec. 22, 2023, 8:16 p.m.Khup sundar