अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
08-06-2024
देशात 18 वी लोकसभा निवडणूक संपून त्याचे परिणाम सुद्धा घोषित झाले व गडचिरोली चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार म्हणून माननीय डॉ.नामदेवराव किरसान यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.गडचिरोली जिल्हा हा उद्योगहीन जिल्हा म्हणून परिचित आहे. आदिवासी बाहुल जिल्हा म्हणून नावारूपास आलेला जिल्हा आहे.शेतीवर आणि रोजीरोटी वर संसाराचा गाडा हाकलने एवढेच जिल्ह्यातील जनतेचा रोजगार आहे आणि रोजगारहीन जिल्हा असल्यामुळे बेरोजगारांची संख्या जरा जास्तच आहे.
सर्वप्रथम जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे याला प्रथम प्राधान्य द्यावे लागेल. चामोर्शी तालुक्यातील चिचडोह बॅरेज मागील काही वर्षांपासून शोभेची वास्तू बनलेला आहे त्याचे पाणी शेतकऱ्यांच्या बांध्यांपर्यंत येण्याच्या नियोजन केलं तर चामोर्शी तालुक्यातील शेतकरी सुजलाम सुफलाम होईल.जेणेकरून तालुक्यातील भगिनी आंध्र प्रदेश सारख्या बाहेर राज्यात जाऊन काम करतात ती नामुष्की त्यांच्यावर येणार नाही.
गडचिरोली जिल्ह्यात काही मोजक्याच ठिकाणी जसे चामोर्शी तालुका आहे आणि आरमोरी व कुरखेडा तालुका या ठिकाणी काही फिडर वर भारनीयमनाचा बडगा उभारल्या गेला आहे.कृषी पंप धारकांना जीव धोक्यात घालून शेतीला पाणी पुरविण्यात तारेवरची कसरत करावी लागत आहे आणि हा प्रश्न फार गंभीर आहे.त्यावर चिंतन करणे गरजेचे आहे.
जयरामपूर,कोणसरी, मुधोली,गणपुर,विठ्ठलपूर अशा बऱ्याच गावात भूसंपादनाचा कायदा आणून शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी अधिग्रहित करण्याचा प्रयत्न सुरू आहे,त्यावर सुद्धा प्रतिबंब आणंने गरजेचे आहे. जिल्ह्यात उद्योग निर्माण व्हायलाच पाहिजे परंतु शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीवर नाही तर फॉरेस्टच्या जमिनीवर उद्योग उभे व्हायला पाहिजे. जेणेकरून बेरोजगारांना काम मिळेल आणि सुपीक जमिनीवर शेती करून शेतकरी सुद्धा आत्मनिर्भर बनेल.अशी व्यवस्था या जिल्ह्यात उभी व्हायला पाहिजे.
जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षणाची सोय व्हायला पाहिजे जेणेकरून जिल्ह्यातील विद्यार्थी जिल्ह्यातील कॉलेजात डिग्रीचे शिक्षण घेऊन जिल्ह्यातच सेवा करेल आणि संपूर्ण जिल्ह्याला आत्मनिर्भर करण्यास तो समर्थ असेल.अशा अनेक आव्हाने जिल्ह्यात आवर्जून उभी आहेत त्याची पूर्तता व्हायला पाहिजे हीच अपेक्षा.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments