रोज ब्युटी पार्लर
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
31-01-2024
महाराष्ट्र सरकारने सिंचनाची सोय व्हावी म्हणून मागेल त्याला विहीर या धर्तीवर योजना राबविणे सुरू केलेले आहे.तरी राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, अशी कळकळीची विनंती रमेश चौखुंडे यांनी केलेली आहे.
मागेल त्याला शेततळा याच धरतीवर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी चार लाख रुपये अनुदानावर विहीर योजना सुरू केलेली आहे.आणि ह्या योजनेचा महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी लाभ घ्यायला पाहिजे,कारण शेती आणि पाणी हा एक सामायिक कार्यक्रम असल्यामुळे.शेतकऱ्यांनी आपाआपल्या शेतामध्ये विहिरीचे खोदकाम करून आपाआपली शेती अधिक बळकट करावी,हीच अपेक्षा.
प्रत्येक ग्रामपंचायतीकडून किमान 15 लाभार्थी निवडणे,असे महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेले आहे.तरी पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी एका ग्रामपंचायतीकडून 15 पेक्षा जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो,तरी तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, अशी कळकळीची विनंती रमेश चौखुंडे यांनी शेतकऱ्यांना केलेली आहे.
या योजनेचा लाभ ग्रामपंचायत सचिवाकडे किंवा आपल्या स्वतःच्या शेतामधून ऑनलाइन पद्धतीने करू शकता आणि याचा लाभ तीन टप्प्यांमध्ये मिळवता येते तरी शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त पद्धतीने याचा लाभ घेऊ शकतो.
१) पहिला अनुदान विहीर खोदकामापूर्वी
२) दुसरा अनुदान विहीर खोदकाम 30 ते 60 टक्के झालेले असताना .
३) तिसरा अनुदान खोदाई पूर्ण झाल्यावर पूर्ण अनुदान दिले जाईल.
ज्या शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतामध्ये ऑनलाईन करता येत नसेल तर ग्रामपंचायती सचीवाकडे आपल्या नावाची नोंदणी करता येऊ शकते.फक्त शेतकरी बांधवांना एवढीच विनंती करू इच्छितो की,विहीर खोदकामाचा आदेश येईपर्यंत विहिरीचे खोदकाम करूनये.अन्यथा विहिरीचे अनुदान ना मंजूर होऊ शकते,याची काळजी शेतकरी बांधवांनी घ्यावी.
प्रत्येक ग्रामपंचायतमधील रोजगार सेवक यांच्याकडे सविस्तर माहिती उपलब्ध आहे त्यांच्याशी संपर्क साधावा.
शेतकऱ्यांचा सातबारा,नमुना आठ अ व जॉब कार्ड इत्यादी कागदपत्रे घेऊन अपलोड करू शकता किंवा ग्रामपंचायतकडे स्वतः जाऊन जमा करू शकता.
ज्या जागेवर विहिरीचे बांधकाम करायचे आहे त्या जागेची पाहणी लघु पाटबंधारे शाखा अभियंता कडून किंवा उपअभियंताकडून सर्वप्रथम जागेची तपासणी केल्या जाईल आणि त्यानंतर विहीर अनुदानाला स्वरूप प्राप्त होईल.तरी शेतकरी बांधवांनी कसल्याही प्रकारची शंका कुशंका उपस्थित न करता सदर योजनेचा लाभ घ्यावा,अशी विनंती राज्यातील तमाम शेतकऱ्यांना करण्यात येत आहे.
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments