ProfileImage
17

Post

5

Followers

0

Following

PostImage

Dipak Indurkar

Sept. 5, 2024

PostImage

Gadchiroli News: एसटी कर्मचाऱ्यांचा संप ! गडचिरोली विभागात 610 फेऱ्या रद्द 


Gadchiroli News: राज्य परिवहन (एसटी) महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने एसटी कामगार संयुक्त कृती समितीने मंगळवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. याचा थेट फटका जिल्हयातील एसटी प्रवाशांना बसला. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाला गडचिरोली विभागातील तब्बल 610 बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. विशेष म्हणजे अहेरी आगारात संपाला जोरदार प्रतिसाद मिळाला. परिणामी या आगारात 233 बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. एसटी प्रवाशांची तारांबळ उडाली. अनेकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला.

हे देखील वाचा: Marriage Scheme: प्रेम करून लग्न करा, मिळवा 71 लाख रुपये, सरकारची अनोखी योजना

राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यस्तरीय कामगार संघटनेच्या कार्यकारिणीची 14 ऑगस्ट रोजी बैठक घेऊन कामगारांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकारला 27 ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर 28 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय कामगारांच्या कार्यकारिणीने निदर्शने करून 3 सप्टेंबरपासून एसटी महामंडळ कामगार संपावर जाणार असल्याचा इशारा दिला होता.

तरीही राज्य सरकारकडून कामगारांच्या मागण्यांची दखल घेण्यात न आल्याने त्याचा विपरीत परिणाम एसटी महामंडळाच्या दैनंदिन कामावर झाला. ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या एसटीची धाव कर्मचारी आंदोलनामुळे बुधवारी मंदावली. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ऐन सणासुदीच्या दिवसांत तसेच गणेशोत्सव काळात आगारातून बस सुटत नसल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. दुर्गम व ग्रामीण भागात एसटीची सेवा ठप्प झाली आहे.

हे देखील वाचा: ST Mahamandal Bharti 2024: 10वी 12वी पास वर एस टी महामंडळ MSRTC मध्ये निघाली इतक्या पदांसाठी भरती

संघटनेचे विभागीय सचिव अमित ठाकूर, रेखा बाळेकरमकर, कल्पना सोनवने, विठ्ठल गेडाम, जयंत इंगळे, प्रल्हाद भानारकर, गजानन नागोसे, किशोर चौधरी, किशोर वानखेडे, अरविंद उईके, संतराज कलिये धरणे देत होते.

 

अशा आहेत मागण्या

शासनाच्या कर्मचान्यांप्रमाणे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन द्यावे, वेतनवाढीतील फरक दूर करावा, महागाई भत्त्याची थकबाकी द्यावी, करारातील त्रुटी दूर कराव्यात, शिस्त आणि आवेदन पद्धतीमधील बदल करावा, वैद्यकीय कॅशलेस योजना लागू करावी आदी मागण्यांसाठी एसटी महामंडळ संघटनांनी स्थापन केलेल्या संयुक्त कृती समितीने हे आंदोलन पुकारले आहे. गडचिरोली व अहेरी आगारासमोर कर्मचायांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.


PostImage

Dipak Indurkar

Sept. 2, 2024

PostImage

Farmers News: शेतकऱ्यांनो सावधान ! धान पिकावर वाढला खोडकिड्याचा प्रादुर्भाव


Farmers News: वातावरणातील बदलामुळे धान पिकावर खोडकिड्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. खोडकिडा हा धानासाठी अतिशय घातक रोग आहे. अगदी खोडाचे रस या किडी शोषून घेत असल्याने धान पीक खोडापासूनच वाळते. त्यामुळे त्याचा वेळीच बंदोबस्त करणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा : Big news for farmers: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! गुलाबी बोंडअळीचा वाढतोय प्रादुर्भाव, अशी करा उपायोजना

धान रोवणीच्या कालावधीपासून खोडकिड्याचा प्रादुर्भाव यावर्षी आढळून येत आहे.
सुरुवातीच्या कालावधीत अत्यंत कमी ठिकाणी याचा प्रादुर्भाव आढळतो.

हे देखील वाचा : Marriage Scheme: प्रेम करून लग्न करा, मिळवा 71 लाख रुपये, सरकारची अनोखी योजना

मात्र वेळीच उपाययोजना न केल्यास त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. शेतकऱ्यांनी या रोगाचा वेळीच बंदोबस्त करावा. अनेक रासायनिक कीटकनाशके  उपलब्ध आहेत. तसेच खतासोबत टाकायची कीटकनाशकेसुद्धा उपलब्ध आहेत. यांचा वेळीच वापर करणे गरजेचे आहे.


PostImage

Dipak Indurkar

Aug. 30, 2024

PostImage

Marriage Scheme: प्रेम करून लग्न करा, मिळवा 71 लाख रुपये, सरकारची अनोखी योजना


जिथे जन्मदर चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे, तिथे सरकारने एक अनोखी योजना सुरू केली आहे. ही योजना विशेषतः त्या प्रेमीयुगलांसाठी आहे, ज्यांनी समाजाच्या विरोधाला न जुमानता आपलं प्रेम निभावत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्यतः प्रेम करून लग्न करणं म्हणजे घरच्यांच्या किंवा समाजाच्या विरोधात जाऊन, पळून लग्न करणं असा समज आहे. अशा वेळी, अनेकदा या प्रेमीयुगलांना घरच्यांचा पाठिंबा मिळत नाही आणि त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. 

परंतु आता दक्षिण कोरियाचं सरकार अशा नवदांपत्यांच्या मदतीला धावून आलं आहे. सरकारने 23 ते 43 वयोगटातील नागरिकांसाठी एक विशेष आर्थिक प्रोत्साहन योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत, जर एखाद्या जोडप्याने लग्न केलं तर त्यांना 20 लाख रुपये 'अभिनंदन भत्ता' म्हणून मिळेल. हा भत्ता नवविवाहितांना त्यांच्या नवीन जीवनाची सुरुवात करण्यासाठी मोठी मदत ठरेल.

हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: फवारणी पंपासाठी शेतकऱ्यांना मिळणार 100% अनुदान, असे करा अर्ज

याशिवाय, सरकारने पुढील पाच वर्षांसाठी या नवदांपत्यांना 31 लाख रुपये घरभाडे म्हणून देण्याचं आश्वासन दिलं आहे. यामुळे, नवविवाहितांना त्यांच्या पहिल्या घरासाठी किंवा नवं आयुष्य सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळेल.

दक्षिण कोरियामध्ये सध्या जन्मदर अत्यंत कमी आहे, जो जगात सर्वात कमी दरांपैकी एक आहे. यामुळे, सरकारला भविष्यातील लोकसंख्येच्या घटण्याची चिंता वाटते. या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने ही आर्थिक प्रोत्साहन योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश नागरिकांना लग्न करण्यासाठी आणि कुटुंब वाढवण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे.

हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: या योजने अंतर्गत लाडक्या बहिणींना मिळणार मोफत गॅस सिलेंडर, जाणून घ्या कधी आणि कसे

सरकारला विश्वास आहे की, या योजनेमुळे लोकांमध्ये लग्नाबाबत अधिक जागरूकता निर्माण होईल आणि विवाहसंस्था मजबूत होईल. याशिवाय, जन्मदर वाढवण्यासाठी हा एक महत्त्वाचा पाऊल ठरू शकतो. 

या योजनेबद्दल नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे, आणि अनेक जोडप्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे, या योजनेमुळे दक्षिण कोरियामध्ये नव्याने लग्न करण्याची एक लाट उसळण्याची शक्यता आहे. सरकारचं हे पाऊल, समाजाच्या विकासासाठी आणि भविष्यातील स्थिरतेसाठी महत्त्वाचं ठरेल, असं दिसत आहे.

अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील बटन ला क्लिक करा.

 


PostImage

Dipak Indurkar

Aug. 29, 2024

PostImage

Big news for farmers: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! गुलाबी बोंडअळीचा वाढतोय प्रादुर्भाव, अशी करा उपायोजना


Big news for farmers: चंद्रपूर जिल्ह्यात धान पिकांसह कापूस, सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांचे गुलाबी बोंडअळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या वर्षी कापूस पिकावर बोंडअळी प्रादुर्भाव केला आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्रादुर्भाव आढळून आला असून, डोमकळ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच सावध होऊन किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: फवारणी पंपासाठी शेतकऱ्यांना मिळणार 100% अनुदान, असे करा अर्ज

सध्या कपाशी पीक 50 ते 60 दिवसांचे झाले असून, बऱ्याच ठिकाणी फुलावर येत आहे. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव डोमकळ्याच्या स्वरूपात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच दिसून येत आहे. कीटकशास्त्र विभागाच्या चमूने शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी दिल्या असता, कपाशी जेथे फुलावस्थेत आहे अशा ठिकाणी डोमकळ्या आढळून आल्या आहेत.

सततचे ढगाळ वातावरण पिकावरील किडींना पोषक असते. किडींचे व्यवस्थापन करण्यास उशीर केल्यास या किडीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढण्याची शक्यता असते. शेतकऱ्यांनी त्वरित कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे नियोजन करावे, असे आवाहन डॉ. पंजाबराव  देशमुख कृषी विद्यापीठ अकोला व  कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: या योजने अंतर्गत लाडक्या बहिणींना मिळणार मोफत गॅस सिलेंडर, जाणून घ्या कधी आणि कसे

 

अशी करा उपाययोजना

पिकातील डोमकळ्या नियमित शोधून त्या अळीसहित नष्ट कराव्यात. दर पंधरा | दिवसांनी 5 टक्के निंबोळी अर्काची किंवा ॲझेंडिरेक्टिन 300 पीपीएम 50 मिली किंवा 1500 पीपीएम 25 मिली प्रति 10 लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. कामगंध सापळ्याचा वापर करावा. पिकाच्या उंचीनुसार किमान एक फूट उंच अंतर ठेवावे, कामगंध सापळ्याचा प्रभाव वातावरणात पसरण्यास मदत होईल. यासाठी एकरी दोन कामगंध सापळे लावावेत. सतत तीन दिवस या सापळ्यामध्ये आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनाचे उपाय करावेत, मास ट्रॅपिंगकरिता हेक्टरी 15 ते 20 कामगंध सापळे लावावेत.

प्रतिनिधित्व करतील, अशी 20 झाडे निवडलेल्या प्रत्येक झाडावरील फुले, पात्या व बोंडांची संख्या मोजून त्यात गुलाबी बोंडअळीग्रस्त फुले, पात्या व बोंडे यांची टक्केवारी काढावी व प्रादुर्भावग्रस्ताची टक्केवारी 5 टक्केपेक्षा जास्त आढळल्यास रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी.

अशाच  माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील बटन ला क्लिक करा.

 


PostImage

Dipak Indurkar

Aug. 27, 2024

PostImage

ST Mahamandal Bharti 2024: 10वी 12वी पास वर एस टी महामंडळ MSRTC मध्ये निघाली इतक्या पदांसाठी भरती


ST Mahamandal Bharti 2024 : मित्रांनो नमस्कार नोकरी शोधणाऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ MSRTC मध्ये भरती निघाली आहे.

लिपिक, सहाय्यक, शिपाई या पदांसाठी हि भरती निघालं आहे. 10वी आणि 12वी पास व ITI पदवी प्राप्त केलेले उमेदवार या भरती साठी अर्ज करू शकतात. या भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. मित्रांनो या भारतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावं लागेल.

हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: फवारणी पंपासाठी शेतकऱ्यांना मिळणार 100% अनुदान, असे करा अर्ज

या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार, शिक्षण पात्रता किती, आणि अर्ज कशा प्रकारे करावं लागेल. तर मित्रांनो याबद्दल आपण पूर्ण माहिती जाणून घेऊया.

पदांचे नाव:  लिपिक, सहाय्यक, शिपाई
एकूण पद: 68
शैक्षणिक पात्रता:  10वी आणि 12वी पास व ITI पदवी प्राप्त
वयोमर्यदा: 18 ते 35 वर्ष

 

हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: या योजने अंतर्गत लाडक्या बहिणींना मिळणार मोफत गॅस सिलेंडर, जाणून घ्या कधी आणि कसे

नोकरी करण्याचे ठिकाण : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यवतमाळ

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.

 


PostImage

Dipak Indurkar

Aug. 23, 2024

PostImage

Maharashtra Band: 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राहणार बंद, या सेवा असणार बंद


Maharashtra Band: बदलापूर येथील 4 आणि 6 वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याच्या धक्कादायक घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. या घटनाविरोधात महाविकास आघाडीने 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

संतप्त नागरिकांकडून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. महाविकास आघाडीने राज्यातील सर्व शाळा, कॉलेज, पालक आणि दुकानदारांना या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हा बंद करण्यात येत आहे.

हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: या योजने अंतर्गत लाडक्या बहिणींना मिळणार मोफत गॅस सिलेंडर, जाणून घ्या कधी आणि कसे

उद्धव ठाकरे यांनीही नागरिकांना या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. बंद दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठा बंद राहणार आहेत. दूध, भाजीपाला मार्केट, किराणा दुकाने आणि हॉटेल्स सुद्धा बंद असण्याची शक्यता आहे.

24 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाविकास आघाडीच्या या बंदमध्ये एसटी बस, लोकल आणि इतर सार्वजनिक वाहतूक सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पूर्वीच रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले होते, ज्यामुळे मुंबई लोकल सेवेवर परिणाम होण्याची भीती आहे.

अशाच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील बटन ला क्लिक करा.

 


PostImage

Dipak Indurkar

Aug. 20, 2024

PostImage

Police Bharti 2024: निर्मल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीत ठोकले यशाचे शिखर: जिल्हा टॉपर्स आणि महिला उमेदवारांमध्ये अव्वल स्थान मिळवले!


Police Bharti 2024: नुकत्याच पार पडलेल्या पोलीस भरती 2023-24 मध्ये निर्मल अकॅडेमीच्या विद्यार्थ्यांनी अपूर्व यश संपादन करून संपूर्ण जिल्ह्यात आपल्या अकॅडेमीचे नाव मोठे केले आहे. विद्यार्थ्यांच्या अथक मेहनतीने आणि समर्पणाने त्यांनी या भरतीत यशाची शिखरे गाठली आहेत.

जिल्हा पोलीस टॉपर म्हणून मयूर करकाडे यांनी आपल्या नावे एक उल्लेखनीय स्थान मिळवले आहे. विशेषतः, पदमा सलपाला यांनी जिल्हा महिला उमेदवारांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच कल्याणी सोनुले आणि कविता पुल्लूरी यांनी जिल्हा महिला उमेदवारांमध्ये द्वितीय क्रमांकावर आपली जागा सुरक्षित केली आहे.

Police Bharti 2024 निर्मल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीत ठोकले यशाचे शिखर जिल्हा टॉपर्स आणि महिला उमेदवारांमध्ये अव्वल स्थान मिळवले!

निर्मल अकॅडेमीच्या शिक्षकांनी देखील या भरतीत उल्लेखनीय यश प्राप्त केले असून, त्यांची जिल्हा पोलीस म्हणून निवड झाली आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा जाहीर सत्कार श्री. नगर परिषदचे उपमुख्याधिकारी आणि निर्मल अकॅडेमीच्या संपूर्ण टीमच्या वतीने करण्यात आला.

या यशाने संपूर्ण जिल्ह्यात निर्मल अकॅडेमीचे नाव उंचावले आहे, आणि त्यांच्या कुटुंबाचे मन आनंदाने भरले आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कठोर परिश्रमाने दाखवून दिले आहे की, कोणतेही ध्येय मेहनत आणि जिद्दीने साध्य करता येते.

या यशामुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळेल, आणि ते आपल्या ध्येयाच्या दिशेने अधिक आत्मविश्वासाने पाऊले टाकतील. निर्मल अकॅडेमी तर्फे त्यांच्या उज्ज्वल भविष्याची कामना करण्यात आली आहे. याशिवाय, आगामी ७,५००+ पोलीस शिपाई पदांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. 


PostImage

Dipak Indurkar

Aug. 16, 2024

PostImage

Sarkari Yojana 2024: फवारणी पंपासाठी शेतकऱ्यांना मिळणार 100% अनुदान, असे करा अर्ज


Sarkari Yojana 2024: शेतीमध्ये कीड, रोग, आणि तण यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना फवारणी करणे आवश्यक असते. यासाठी आता फवारणी पंप खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना 100% अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. परंतु, याबाबत सर्व शेतकऱ्यांना पुरेशी माहिती नसल्यामुळे, अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास अपयशी ठरत आहेत.

 

फवारणी पंपासाठी अर्ज कसा करावा?

फवारणी पंपासाठी 100% अनुदानाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे. शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर जाऊन अर्ज सादर करावा लागतो. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावी लागतात आणि अर्ज वेळेवर सादर करावा लागतो.

हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: या योजने अंतर्गत लाडक्या बहिणींना मिळणार मोफत गॅस सिलेंडर, जाणून घ्या कधी आणि कसे

 

अर्जासाठी अंतिम तारीख

या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 ऑगस्ट होती. तरीही, या योजनेबद्दल योग्य माहिती नसल्यामुळे फक्त काही निवडक शेतकऱ्यांनीच अर्ज केला आहे. अर्ज सादर करण्याची ही संधी दुरावली आहे, परंतु अशा प्रकारच्या योजनांबद्दल जागरूकता वाढविणे गरजेचे आहे.

 

MahaDBT पोर्टलवर अर्जाची प्रक्रिया

कृषी विभागाच्या MahaDBT पोर्टलवर अर्ज सादर केल्यानंतर, विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो. या पोर्टलवर फवारणी पंपांसाठी 100% अनुदानाची योजना सादर केली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी असून, शेतकऱ्यांना अर्ज सादर करण्यासाठी सेतू केंद्रात जावे लागते. ऑनलाइन प्रक्रियेसाठी सुमारे 200 ते 300 रुपये खर्च येऊ शकतो.

हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: शेतकऱ्यांना गोदाम बांधण्यासाठी सरकार देणार साडे 12 लाखांचे अनुदान

 

इतर कृषी योजना

MahaDBT पोर्टलवर केवळ फवारणी पंपासाठीच नव्हे, तर इतर अनेक कृषी योजनांची माहिती उपलब्ध आहे. यामध्ये कृषी यांत्रिकीकरण, सिंचन योजना, आणि इतर उपक्रमांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी या पोर्टलवर नियमितपणे भेट देऊन विविध योजनांचा लाभ घ्यावा.

अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.

 


PostImage

Dipak Indurkar

Aug. 10, 2024

PostImage

Sarkari Yojana 2024: या योजने अंतर्गत लाडक्या बहिणींना मिळणार मोफत गॅस सिलेंडर, जाणून घ्या कधी आणि कसे


Sarkari Yojana 2024: मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना राज्य शासनामार्फत वर्षातून तीन गॅस सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत.प्रशासनाच्या अंदाजानुसार गडचिरोली जिल्ह्यातील 2 लाख 69 हजार 650 महिला लाडकी बहिण योजनेसाठी पात्र ठरू शकतात. तेवढ्यांनाच तीन गॅस सिलिडरसुद्धा मोफत मिळतील.

 

Sarkari Yojana 2024: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ

हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: शेतकऱ्यांना गोदाम बांधण्यासाठी सरकार देणार साडे 12 लाखांचे अनुदान

राज्य शासनाने 28 जून रोजी अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यामध्ये महिलांना वर्षातून 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे.

 

Sarkari Yojana 2024: लाडक्या बहिणी ठरणार या योजनेच्या लाभार्थी 

पिवळे व केशरी रेशन कार्ड असलेल्यांना 3 मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहे. लाडक्या बहिणी या योजने च्या लाभार्थी ठरणार आहेत. राज्यातून 52 लाख कुटुंबांना लाभ मिळेल.

हे देखील वाचा : TRAI New Rules: मोबाइल नेटवर्क गेले तर ग्राहकांना मिळेल भरपाई, TRAI च्या नवीन नियमाने टेलिकॉम कंपन्यांना बसला दणका

 

Sarkari Yojana 2024: मोफत गॅस सिलिंडर योजनेकडे दुर्लक्ष

सध्या प्रत्येक महिला मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरण्यात व्यस्त आहे. मोफत गॅस सिलिंडर या योजनेकडे महिलांचे दुर्लक्ष झाले आहे. कोणाला गैस द्यायचा याबाबत अजुनपर्यंत शासन- स्तरावरून स्पष्ट आले नसल्याची माहिती अधिकायांनी दिली.

 

Sarkari Yojana 2024: उज्ज्वला गॅसच्या लाभार्थ्यांची यादी प्राप्त

उज्ज्वला गॅस योजनेचे गॅस कनेक्शन महिलेच्या नावाने आहेत. त्यामुळे या महिलांना लाभ देण्यास कोणतीच अडचण नाही. या लाभाथ्यांची यादी गॅस एजेंसींना पाठविली आहे. त्यांना लवकरच लाभ मिळेल.

अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील बटन ला क्लिक करा.

 


PostImage

Dipak Indurkar

Aug. 6, 2024

PostImage

TRAI New Rules: मोबाइल नेटवर्क गेले तर ग्राहकांना मिळेल भरपाई, TRAI च्या नवीन नियमाने टेलिकॉम कंपन्यांना बसला दणका 


TRAI New Rules: नवी दिल्ली मोबाइल कंपन्यांचे प्लान महागले, प्रीपेड रिचार्ज देणाऱ्या पेमेंट कंपन्यांनीही शुल्क आकारणी सुरू केली. परंतु नेटवर्क नसणे, कॉल ड्रॉप होणे यावर काहीही मात्रा निघू शकलेली नाही.

पण Telecom Regulatory Authority of India (TRAI) बदललेल्या नियमांनुसार आता यासाठी ग्राहकांना भरपाई द्यावी लागणार आहे. यामुळे ग्राहकांचा मनस्ताप कमी होणार आहे. सहा महिन्यांनी नवे नियम लागू होणार आहेत.

हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: शेतकऱ्यांना गोदाम बांधण्यासाठी सरकार देणार साडे 12 लाखांचे अनुदान

TRAI ने जारी केलेल्या नव्या गुणवत्ता मानकांनुसार दूरसंचार सेवा पुरवठादारांसाठी नुकसानभरपाई देण्याबाबत नवे नियम तयार केले आहेत. यासाठी 'The Standard of Quality of Service of Access ( Wirelines and Wireless) अँड ब्रॉडबँड सर्व्हिस रेग्युलेशन्स, 2024 यामध्ये सुधारणा केली. नव्या नियमांनुसार सेवा खंडित झाल्याने जिल्हा स्तरावर किती फटका बसला याचा विचार केला जाणार आहे. त्यानुसार भरपाईची रक्कम आकारजी जाणार आहे.

 

अशी मिळेल भरपाई

  • सेवा सलग 24 तासाहून अधिक काळ ठप्प असल्यास पोस्टपेड ग्राहकांना भाड्यात सूट द्यावी लागेल. बंदीचे दिवस पाहून ही सूट द्यावी लागेल.
  • प्रीपेड ग्राहकांना व्हॅलिडिटी वाढवून द्यावी लागणार आहे. दिवसात 12 तासांहून अधिक काळ नेटवर्क गायब असेल किंवा सेवा बंद असेल तर तो एक दिवस गणला जाईल.
  • Fixed line service देणाऱ्यांनाही सलग तीन दिवस बंद राहिल्यास पोस्टपेड आणि प्रीपेड ग्राहकांना भरपाई द्यावी लागेल.

हे देखील वाचा : Domestic Animal: पावसाळ्यात जनावरांना होऊ शकतात 'हे' आजार

 

इतक्या दिवसांनी मिळेल रक्कम

सेवा ठप्प झाल्यानंतर पुढच्या सात दिवसांच्या आत ही भरपाई ग्राहकाला द्यावी लागेल. पुढील बिलात त्याची वजावट दाखवावी लागेल. नैसर्गिक आपत्तीमुळे दूरसंचार सेवेला मोठ्या प्रमाणात फटका बसल्याच्या स्थितीत मात्र अशी भरपाई देण्याचे बंधन कंपन्यांवर नसेल.

अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील बटन ला क्लिक करा.

 


PostImage

Dipak Indurkar

Aug. 1, 2024

PostImage

Rain Update: आजपासून राज्यात पुन्हा सक्रिय होणार पाऊस, या जिल्ह्यांना अलर्ट जारी


Rain Update: 10-12 दिवस नागपूरसह विदर्भात धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने दोन दिवस घेतलेली विश्रांती आता संपण्याची शक्यता आहे. गुरुवारपासून विदर्भातील काही जिल्ह्यांसह महाराष्ट्रात मध्यम, जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे.

18 जुलैपासून सक्रिय झालेल्या पावसाने विदर्भात जोरदार तडाखा दिला. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा. वर्धा अशा बहुतेक जिल्ह्यांत पुर परिस्थिती निर्माण झाली. शेतीचेही मोठे नुकसान झाले व शहरांनाही फटका बसला.

पावसाचा 29 जुलैपासून जोर कमी झाला. 30 व 31 जुलैला पावसाने विश्रांती घेतली. नागरिकांनी सूर्यकिरणेही अनुभवली. आता 1 ऑगस्ट ते 4 ऑगस्ट विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. यात वर्धा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांत पुन्हा अतिजोरदार, तर नागपूर, अमरावती, यवतमाळ, भंडारा, बुलढाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.


PostImage

Dipak Indurkar

July 25, 2024

PostImage

Sarkari Yojana 2024: शेतकऱ्यांना गोदाम बांधण्यासाठी सरकार देणार साडे 12 लाखांचे अनुदान


Sarkari Yojana 2024: विविध केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत, राष्ट्रीय अन्न आणि पोषण अभियानाअंतर्गत 2024-25 या आर्थिक वर्षात 250 मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामांच्या बांधकामासाठी वास्तविक खर्चाच्या 50 टक्के किंवा 12 लाख 50 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. शासनाकडून सदर मिळणार असल्याने या योजनेला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वखार महामंडळाच्या तांत्रिक निकषांनुसार डिझाइन, तपशील, खर्च अंदाजानुसार त्याच आर्थिक वर्षात गोदामाचे बांधकाम पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला रास्त व नाममात्र किंमत आकारून साठवणुकीसाठी गोदामाचा वापर करणे बंधनकारक आहे. या योजनेची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यातही होत आहे.

हे देखील वाचा : Organic Farming: जैविक खेती क्या है, प्रकार, महत्व, लाभ और हानि, जानिए भारत में जैविक खेती कैसे करें

 

Sarkari Yojana 2024: यांना मिळेल लाभ

जिल्ह्यातील नोंदणीकृत शेतकरी संघ किंवा उत्पादक कंपनी यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारच्या ग्रामीण भांडार योजना Gramin Bhandar Yojana व नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अर्जदारांनी प्रथम राष्ट्रीयीकृत बँकेकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. बँके कडून कर्ज मंजूर केल्यानंतरच संबंधित अर्जदार किंवा कंपनी तालुका कृषी कार्यालयाकडे अर्ज करू शकतील.

 

 

Sarkari Yojana 2024: रक्कम थेट खात्यात

पूर्व मंजूर कंपन्यांनी बांधकाम पूर्ण केल्यानंतर, त्यांना स्वीकार्य अनुदान थेट लाभ हस्तांतरणाद्वारे शेतकरी उत्पादक कंपनी, असोसिएशनच्या खात्यात वितरीत केले जाणार आहे.

हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: खुशखबर ! सरकार स्वस्तात विकणार कांदे आणि टोमॅटो !

 

Sarkari Yojana 2024: इथे करा अर्ज

शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात संपूर्ण दस्तावेजासह अर्ज सादर करावा, असे कळविण्यात आले आहे.

 

 

Sarkari Yojana 2024: ही लागणार कागदपत्रे

  • सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्जासोबत जमिनीचा सातबारा, आधारकार्ड, बँक खाते आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  • शेतकरी उत्पादक कंपनी, संघ ज्या कार्यक्षेत्रात आहे त्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील विहित प्रपत्रात अर्ज सादर करावा. अर्जासोबत शेतकरी उत्पादक कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र, कंपनीच्या लेटर हेडवर अर्ज, शेतकरी उत्पादक कंपनी कमिटी ठराव, मागील तीन वर्षांचे ऑडिट, ज्या जागेवर गोदाम उभारणी करायची आहे, त्या जागेचा सातबारा व आठ अ उतारा जोडावा.

सदर हि योजना बँक कर्जाशी संबंधित आहे आणि इच्छुक शेतकरी व उत्पादक संघटना, कंपन्यांनी अर्ज सादर करावेत.

अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.

 


PostImage

Dipak Indurkar

July 16, 2024

PostImage

Domestic Animal: पावसाळ्यात जनावरांना होऊ शकतात 'हे' आजार


Domestic Animal: पावसाळ्यात पाळीव जनावरांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो. वेळीच उपचार न केल्यास काही वेळा जनावरे दगावण्याचाही धोका असतो. त्यामुळे पावसाळ्यात जनावरांची काळजी घेणे आवश्यक असते. पावसाळ्यात जंतुसंसर्ग किंवा पोषणाअभावी अनेक प्रकारचे आजार जनावरांना होत असतात. अशावेळी पशुपालकांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे पशुपालकांनी वेळेवर लक्ष देणे गरजेचे आहे.

 

Domestic Animal: जनावरांना या आजारांचा आहे धोका

हे देखील वाचा : Chandrapur News: बकरी ने विचित्र बच्चे को दिया जन्म

 

  •  घटसर्प : गाय, म्हैस, शेळी, मेंढीमध्ये पावसाळ्यात घटसर्प हा संसर्गजन्य रोग आढळतो. गळ्याला सूज येणे हे या आजाराचे लक्षण आहे.
  • चौखुरा : हा जनावरांमधील संसर्गजन्य रोग आहे. या आजारावर वेळीच उपचार होणे आवश्यक आहे. पायाच्या खुरांना कीड लागते.
  • पीपीआर : शेळ्यांमधील विषाणूजन्य साथीचा हा रोग आहे. या रोगावर वेळीच उपचार न झाल्यास संपूर्ण गोठा खाली होण्याचा धोका असतो.
  • सरा: डास, माश्या व इतर कीटक यांच्या चाव्यामुळे रोगाचा प्रसार होतो. हा रोग गाय, म्हैस, घोडा व उंटांमध्ये आढळतो.
  • बॅबेसिओसिस : एकपेशीय जंतूंमुळे हा रोग होतो. प्रसार पिसके चावल्यामुळे होतो. संकरित जनावरांमध्ये हा रोग जास्त आढळून येते. दुधाळ जनावरे संकरित असतात. यामध्ये हा आजार आढळतो.
  • गवण : हा आजार गायी-म्हशीना होतो. यामुळे ते चारा खात नाहीत. तसेच त्यांच्या दूध देण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो.
  • थायलेरिओसिस : हा रोग संकरित जनावरांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. वासरांवर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.

हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आजपासून करा ऑनलाईन अर्ज !

 

Domestic Animal: अशी घ्या काळजी 

Domestic Animal: नियमित लसीकरण करण्याची गरज

आताच्या या बदलत्या वातावरणात प्राण्यांचे शरीर योग्य प्रकारे साथ देत नाही. अनेकवेळा त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. यामध्ये जनावरे विविध प्रकारच्या आजाराला बळी पडतात.

हे देखील वाचा : Organic Farming: जैविक खेती क्या है, प्रकार, महत्व, लाभ और हानि, जानिए भारत में जैविक खेती कैसे करें

 

Domestic Animal: भिजलेला चारा देऊ नये

जनावरांना शक्यतो भिजलेला चारा खाऊ घालू नका. ओले गवत जनावरे कमी वेळेत व अधिक खातात. त्यामुळे जनावरांच्या पोटाचे आरोग्य बिघडू शकते.

पावसाच्या दिवसांमध्ये जनावरांचे आरोग्य अनेकवेळा बिघडते. त्यामुळे पशुपालकांनी वेळोवेळी लसीकरण करून घेणे महत्त्वाचे आहे. विशेषतः गोठ्याची स्वच्छताही महत्त्वाची असते. जनावराच्या हालचालीवरून ते आजारी आहे, हे लक्षात येतात पशुवैद्यकामार्फत औषधोपचार करावा.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.

 


PostImage

Dipak Indurkar

July 11, 2024

PostImage

Sarkari Yojana 2024: खुशखबर ! सरकार स्वस्तात विकणार कांदे आणि टोमॅटो !


Sarkari Yojana 2024: कांदे, टमाटरआणि अन्य भाजीपाल्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठी 'खरेदी-विक्री' योजना आणत आहे. भाज्या खरेदी करून देशभरातील १८ हजार केंद्रांमार्फत विकल्या जातील. NCCF, नाफेड केंद्रीय भांडार व राज्य सरकारांची ही केंद्रे आहेत.

किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने 27,500 कोटी रुपयांचा 'किमत स्थिरीकरण निधी' (पीएसएफ) बाजूला काढून ठेवला आहे. 23 जुलै रोजीच्या अर्थसंकल्पामध्ये ही तरतूद 30 हजार कोटी रुपये होऊ शकते.

हे देखील वाचा : Organic Farming: जैविक खेती क्या है, प्रकार, महत्व, लाभ और हानि, जानिए भारत में जैविक खेती कैसे करें

 

महाराष्ट्र सरकारनेही 1,500 कोटी रुपये खर्च करण्याची तयारी केली आहे. दिल्ली उत्तर प्रदेश NCR आणि हरियाणा यांसह उत्तर भारतातटमाटर दर सध्या वाढून 80 रुपये किलो झाले आहेत. मुरादाबाद भागात मुसळधार पावसाने  टोमॅटोच्या पिकाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ही भाववाढ झाली आहे. वालुचा  भावही वाढून 40 ते 45 रुपये किलो झाला आहे.

 

निवडणुकांत महागाईचा आघात नको

झारखंड महाराष्ट्र, आणि हरियाणा या तीन राज्यांत लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये महागाईने घात करू नये, यासाठी सरकारने ही योजना आखत आहे. या योजनेमध्ये कांदे दुप्पट भावाने खरेदी करून जवळपास 30 रुपये किलो दराने विकले जातील. हरियाणा राज्याचे सरकारही अशीच पावले उचलत आहेत.

हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आजपासून करा ऑनलाईन अर्ज !

 

यापूर्वीही राबविली आहे योजना

याआधी केंद्र सरकारने किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी अशी योजना राबविली आहे. त्यात भारत आटा 27.50रुपये किलो, भारत चणाडाळ 60 रुपये किलो, आणि भारत तांदूळ 29 रुपये किलो दराने विकण्यात आले. हा प्रयोग यशस्वी झाला होता.

अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.

 


PostImage

Dipak Indurkar

July 5, 2024

PostImage

Chandrapur News: बकरी ने विचित्र बच्चे को दिया जन्म


Chandrapur News: गोंडपिपरी तालुका के  चेक बेरडी गांव में एक बकरी ने इंसान जैसे दिखने वाले मेमने को जन्म देने से यह चर्चा का विषय बन गया. दरअसल बकरी के इस मेमने का सीर इंसान जैसा नजर आ रहा था, वहीं दोनों आंखें भी सामने मिली हुई थी. जिसे देखने के लिए ग्रामीणों की भीड़ उमड़ पड़ी. जन्म के बाद बकरी के मेमने की हालत बिगड़ गई, मालिक ने उसे बचाने की कोशिश की लेकिन वे सफल नहीं हुए. गुरुवार की सुबह करीब 9 बजे मेमने की मौत हो गई.

ये भी पढे : Sarkari Yojana 2024: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आजपासून करा ऑनलाईन अर्ज !

जानकारी के अनुसार चंद्रपुर जिले के चेक बेरडी छोटे से गांव में रहने वाले मोतीराम आत्राम के यहां एक बकरी ने दो मेमनों को जन्म दिया. पहला मेमना एक सामान्य मेमना की तरह लग रहा था. लेकिन दूसरे मेमने को देखकर सभी हैरान रह गए। मेमने की आंखें और चेहरा इंसानों जैसा था. जैसे ही गांव वालों को इस अजीब मेमने के बारे में पता चला, वे आत्राम के घर पहुंच गए. आत्राम की पत्नी छाया और उसके परिवार ने मेमने को बचाने की कोशिश की.

ये भी पढे : Organic Farming: जैविक खेती क्या है, प्रकार, महत्व, लाभ और हानि, जानिए भारत में जैविक खेती कैसे करें

 लेकिन मेमने की मौत हो गई. इसके बाद उसके शव को दफना कर अंतिम संस्कार किया गया. इस दौरान इस विचित्र मेमने की फोटो सोशल मीडिया पर वायरल हो गई. शोधकर्ताओं का मानना है कि यह कोई चमत्कार नहीं है बल्कि आनुवांशिक बदलाव का नतीजा है. गांव के पुराने परिचितों ने बताया कि उन्होंने अपने जीवन में ऐसा कभी नहीं देखा. वह मेमना इंसान जैसा दिखता था. हमने कभी ऐसा कुछ नहीं देखा। उसे बचाने की कोशिश की. लेकिन वह बच नहीं सका, एक ग्रामीणों ने कहा.

 


PostImage

Dipak Indurkar

July 1, 2024

PostImage

Sarkari Yojana 2024: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आजपासून करा ऑनलाईन अर्ज !


Sarkari Yojana 2024: मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर गरीब महिलांना मदत, तसेच त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य शासनातर्फे "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' Mukhyamantri Ladli Behna Yojana योजना सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेचे लाभार्थी निश्चित करण्यासाठी 1 ते 15 जुलै या कालावधीत अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

गरीब व गरजू महिलांसाठी ही योजना आर्थिकदृष्ट्या फायद्याची ठरणार आहे.
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' Mukhyamantri Ladli Behna Yojana योजनेसाठी 1 जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. 15 जुलै ही अंतिम तारीख आहे. 16 जुलै रोजी तात्पुरती यादीचे प्रकाशन होईल. तात्पुरत्या यादीवर तक्रार, हरकती दाखल करता येणार आहेत. 1 ऑगस्टला अंतिम यादी प्रकाशित करून 15 ऑगस्ट रोजी योजनेचा 1 हजार 500 रुपयांचा पहिला हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होईल.

हे देखील वाचा : Organic Farming: जैविक खेती क्या है, प्रकार, महत्व, लाभ और हानि, जानिए भारत में जैविक खेती कैसे करें

दर महिन्याच्या 15 तारखेपर्यंत या योजनेचा लाभ महिलांच्या बँक खात जमा केला जाणार आहे. विद्यमान सरकारच्या वतीने महिलांच्या उत्थानासाठी विविध योजना आखल्या जात आहेत. शासनाने यात जाचक अटी ठेवू नये, जेणे करून अडचणी येणार नाहीत.

 

Mukhyamantri Ladli Behna Yojana: यांना मिळणार योजनेचा लाभ?

लाभार्थी ही महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक, वयाची किमान 21 वर्षे तर कमाल 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत संबंधित महिलेला योजनेचा लाभ दिला जाईल. सदर लाभार्थ्यांचे बँक खाते असणे बंधनकारक आहे. लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे.

 

Mukhyamantri Ladli Behna Yojana: अर्जासाठी ही कागदपत्रे आवश्यक आहेत

महिलांना ऑनलाइन अर्ज सादर करावा लागणार आहे. यासाठी उत्पन्न दाखला, रेशनकार्ड, पासपोर्ट साईज फोटो, बँक खाते रहिवासी दाखला, लाभार्थ्यांचे आधारकार्ड, पासबुकची झेरॉक्स, अटी, शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र आदी कागदपत्रे लागणार आहेत.

 

Mukhyamantri Ladli Behna Yojana: विनामूल्य राहणार अर्ज भरण्याची प्रक्रिया

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज पोर्टल / मोबाइल अॅपद्वारे / सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाइन भरले जाऊ शकतात. पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. ज्या महिलेस Online अर्ज करता करता येत नसेल, त्याच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात / बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, ग्रामपंचायत / वॉर्ड / सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील. भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात/ बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, सेतू सुविधा केंद्रांमध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाइन प्रविष्ट केला जाईल. अर्ज भरण्याची प्रक्रिया विनामूल्य राहील, असे आदेशात शासन निर्णयात नमूद आहे.

 

Mukhyamantri Ladli Behna Yojana: या महिलांना मिळणार नाही लाभ

  • ज्या महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा कुटुंबातील महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • आयकरदाता असलेल्या कुटुंबातील सदस्य, संयुक्तरीत्या पाच एकरांपेक्षा जास्त शेतजमीन असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) नावावर असल्यास तसेच शासकीय सेवेत नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी किंवा मंडळ, उपक्रम आदी तत्त्वावर केंद्र तसेच राज्य शासनाच्या सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार नाही.

अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.

 


PostImage

Dipak Indurkar

June 28, 2024

PostImage

Organic Farming: जैविक खेती क्या है, प्रकार, महत्व, लाभ और हानि, जानिए भारत में जैविक खेती कैसे करें


Organic Farming: क्या आपने सोचा है कि ऑर्गेनिक सब्जियाँ क्यों सुरक्षित और स्वादिष्ट होती हैं? जब हम खरीदारी करते हैं, तो हम अपने बच्चों की सेहत की सबसे ज्यादा चिंता करते हैं.

स्वादिष्ट भोजन हमें ऊर्जा देता है, और इसे हम भगवान का वरदान मानते हैं. जैविक खेती (Organic Farming) एक प्राकृतिक और पारंपरिक तरीका है, जो हमें स्वास्थ्यवर्धक आहार प्रदान करता है.

जैविक खेती में केवल प्राकृतिक सामग्री का उपयोग होता है, कीटनाशकों का नहीं. यह हमारे स्वास्थ्य और पर्यावरण दोनों के लिए फायदेमंद है भारत में कई योजनाएं हैं जो किसानों को इस दिशा में सहायता प्रदान करती हैं.

जैविक उत्पादों की मांग बढ़ रही है. लोग स्वस्थ आहार पसंद करने लगे हैं. जैविक खेती हमारे स्वास्थ्य के साथ-साथ पृथ्वी के लिए भी अच्छी है.

इस लेख में हम जैविक खेती के विभिन्न प्रकार, उनके लाभ और हानियों की चर्चा करेंगे. चलिए इस नई कृषि पद्धति के बारे में सीखते हैं.


जैविक खेती के प्रकार Types of organic farming

जैविक खेती कई तरीकों से की जा सकती है. इसमें प्राकृतिक विविधता और स्थान का ध्यान रखा जाता है। कुछ प्रमुख प्रकार हैं - प्राकृतिक खेती, जैविक उपाय, और संजीवनी खेती.

 

  • प्राकृतिक खेती: प्राकृतिक तत्वों का उपयोग कर फसलों को उच्च गुणवत्ता और सुरक्षा मिलती है.
  • जैविक उपाय: कीटनाशकों का उपयोग नहीं किया जाता, जिससे पर्यावरण को फायदा होता है.
  • संजीवनी खेती: प्राकृतिक तत्वों से पौधों की वृद्धि होती है और ये पौधे पुनर्जीवित होते हैं.

ये तरीके जैविक खेती के महत्वपूर्ण आयाम हैं. ये एक सुरक्षित खेती प्रणाली प्रदान करते हैं. किसान जैविक खेती के प्रकारों का उपयोग कर अपनी फसलों को स्वस्थ और प्राकृतिक बना सकते हैं.


जैविक खेती के लाभ Benefits of Organic Farming

जैविक खेती के बहुत से लाभ हैं. यह केमिकल खादों का उपयोग नहीं करती, जिससे उत्पादों की गुणवत्ता बढ़ती है और स्वास्थ्यवर्धक खाद्य उत्पन्न होते हैं.

  • विषाणु मात्रा कम होती है: इससे आप स्वस्थ खाद्य खा सकते हैं.
  • सूक्ष्मजीवों की सुरक्षा: ये मिट्टी की नमी बनाए रखते हैं.
  • भूमि की स्थिरता: इससे भूमि बरकरार रहती है और पर्यावरण को कोई हानि नहीं पहुंचती.
  • पर्यावरण संतुलन: जैविक खेती संतुलित पर्यावरण के लिए भी अच्छी है क्योंकि इसमें कीटनाशकों और हानिकारक तत्वों की कमी होती है.

भारत में जैविक खेती बहुत महत्व रखती है. ग्रामीण क्षेत्रों में इसे करना थोड़ा संकटपूर्ण था, लेकिन अब यह पूरे भारत में हो रही है. जैविक उत्पादों की मांग तेजी से बढ़ रही है. यह आम लोगों के आहार में स्वास्थ्य बदलाव ला रही है और भारतीय किसानों को आर्थिक और सामाजिक लाभ भी मिल रहे हैं.


जैविक खेती के नुकसान Disadvantages of Organic Farming

जैविक खेती के लाभों के साथ नुकसान भी हैं. इसमें सबसे बड़ी समस्या यह है कि यह ज्यादा समय और मेहनत मांगती है. यह कीट और रोगों की संभावना बढ़ा सकती है और इसका सामना करना कठिन हो सकता है.

जैविक उपायों के लिए समय भी लगता है. जैविक उत्पादों का अधिक मूल्य होना संभव है क्योंकि उनकी कम प्रतिस्पर्धा होती है और उनका अधिक आवेदन नहीं होता है.

समस्याएँ और समाधान

हानियों का हल तलाशने के लिए कई उपाय हैं. प्राकृतिक शस्त्रक्रिया और कीटनाशकों का उपयोग किया जा सकता है. प्राकृतिक आपातकालीन औषधियां भी मददगार साबित हो सकती हैं. जब तकनीक और ताजगी से युक्त जैविक खाद का इस्तेमाल हो, तो सुचारू जैविक खेती संभव है. इसके लिए स्थानीय उत्पादकों की मदद भी की जा सकती है.


जैविक खेती का महत्व Importance of Organic Farming

जैविक खेती आजकल कृषि क्षेत्रों में बहुत महत्वपूर्ण है. यह पर्यावरण को नुकसान नहीं पहुंचाती है। इस तरह, यह प्राकृतिक संसाधनों का अच्छे से उपयोग करती है. इसके साथ ही, यह कीटनाशकों और केमिकल का उपयोग नहीं करती.

जैविक खेती से जमीन की गुणवत्ता भी सुधरती है. क्योंकि इसमें कीटों और कीटाणुओं का संभावित प्रकोप कम होता है. यह हमारे किसानों की आमदनी में भी वृद्धि लाती है.


जैविक खेती की विशेषताएं Features of Organic Farming

जैविक खेती के कुछ महत्वपूर्ण पहलू हैं। यह स्वस्थ और टिकाऊ खेती पद्धति है. जैविक तरीके से खेती करते समय कीटनाशकों का इस्तेमाल नहीं किया जाता.

इसके कारण, उत्पादों की उत्पादकता बढ़ती है और प्राकृतिक खाद्य की मांग भी बढ़ जाती है। साथ ही, जैविक उत्पादों में कीटनाशकों और केमिकल की मात्रा कम होती है। इससे लोगों को अधिक स्वास्थ्यवर्धक खाद्य मिलता है.

  • उत्पादकता और स्वास्थ्य: जैविक खेती उच्च उत्पादकता और स्वास्थ्य के साथ फसलों का उपयोग करती है.
  • कीटनाशकों के अभाव: कीटनाशक नहीं होने से उत्पादकता की मात्रा बढ़ती है और अधिक विक्रय के अवसर पैदा होते हैं.
  • गुणवत्ता खाद्य: जैविक खेती से उत्पादित खाद्य में कीटनाशक और केमिकल की कम मात्रा होती है और यह लोगों को स्वास्थ्यवर्धक खाद्य की आपूर्ति प्रदान करता है.


FAQ

जैविक खेती क्या है?
जैविक खेती एक नेचुरल तरीके से खेती करने की प्रवृत्ति है. इसमें केवल नेचुरल सामग्री का उपयोग होता है। यह उत्तम उत्पादों की खेती को बढ़ावा देता है और पेस्टिसाइड का इस्तेमाल कम करता है.

जैविक खेती के कौन-कौन से प्रकार होते हैं?
कुछ प्रमुख जैविक खेती के तरीके शामिल हैं - प्राकृतिक खेती, जैविक उपाय, और संजीवनी खेती.

जैविक खेती के क्या लाभ हैं?
इसमें कीटनाशकों का नहीं होता है, जिससे उत्पादों में कीटनाशक बचत होती है. यह स्वास्थ के लिए भी बहुत ही फायदेमंद है.

जैविक खेती के हानियाँ क्या हैं?
कई कमियां हैं जैसे कीटों और रोगों से निपटना मुश्किल हो सकता है। साथ ही, यह प्रतिस्पर्धी शौकिनों के लिए उपयुक्त नहीं हो सकते है.

जैविक खेती क्यों महत्वपूर्ण है?
जैविक खेती प्राकृतिक संसाधनों को सही तरीके से उपयोग करती है. यह पर्यावरण को बनाए रखने में मदद करती है.