अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
11-11-2024
Toughest Job in the World: कल्पना करा, तुम्हाला अशी नोकरी मिळाली आहे जिथे वर्षाला ३० कोटी रुपयांचा पगार आहे. ना बॉसची कटकट, ना रोजचं धावपळीचं काम. हवं तेव्हा झोपू शकता, आराम करू शकता, आणि वेळ मिळाला की मस्तपैकी फिशिंगही करता येईल. ऐकूनच वाटेल, स्वप्नातली नोकरी आहे ही! पण, खरे तर असं काहीच नाही.
ही नोकरी आहे इजिप्तच्या अलेक्झांड्रिया बंदरावर असलेल्या जगप्रसिद्ध लाईट हाऊस कीपरची. जगातील पहिलं लाईट हाऊस असलेल्या या ठिकाणी काम करणाऱ्या कीपरला वर्षाला कोट्यवधी रुपयांचा पगार मिळतो. त्याचं काम एकच – लाईट हाऊसचा लाईट कायम सुरु ठेवणं. पण तरीही, या नोकरीसाठी कोणीच तयार नसतं.
ही नोकरी जितकी रोमांचक वाटते, तितकीच ती भीतीदायक आणि धोकादायक आहे. समुद्राच्या मध्यभागी असलेल्या या लाईट हाऊसवर कीपरला एकटंच राहावं लागतं. कधीही काहीही होऊ शकतं – उंच लाटा थेट लाईट हाऊसला धडकतात, प्रचंड वादळं येतात, आणि असं वाटतं की क्षणात लाईट हाऊस पाण्यात झाकला जाईल. एकटेपणा आणि भीतीचा सामना करत दिवसरात्र जागरण करावं लागतं.
या लाईट हाऊसवर कीपर सोबत बोलणारा कुणीच राहत नाही. दिवसानंतर दिवस, तासानंतर तास एकटे राहणं हे सोपं काम नाही. एकटा माणसाला सतत समुद्राच्या गर्जनेत राहतो, त्याला ना सोबत असते, ना कधीही समोर माणसाचं दर्शन होतं. यामुळे मानसिक ताण वाढतो.
या नोकरीसाठी कोट्यवधी रुपये पगार असूनही कोणीही ती करायला तयार नाही. कारण पैशापेक्षा जीव महत्वाचा आहे. त्यामुळे ही नोकरी आजही रिकामीच राहते, केवळ धाडसी व्यक्तीसाठीच ती आहे.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments