रोज ब्युटी पार्लर
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
05-09-2024
Gadchiroli News: राज्य परिवहन (एसटी) महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने एसटी कामगार संयुक्त कृती समितीने मंगळवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. याचा थेट फटका जिल्हयातील एसटी प्रवाशांना बसला. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाला गडचिरोली विभागातील तब्बल 610 बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. विशेष म्हणजे अहेरी आगारात संपाला जोरदार प्रतिसाद मिळाला. परिणामी या आगारात 233 बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. एसटी प्रवाशांची तारांबळ उडाली. अनेकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला.
हे देखील वाचा: Marriage Scheme: प्रेम करून लग्न करा, मिळवा 71 लाख रुपये, सरकारची अनोखी योजना
राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यस्तरीय कामगार संघटनेच्या कार्यकारिणीची 14 ऑगस्ट रोजी बैठक घेऊन कामगारांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकारला 27 ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर 28 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय कामगारांच्या कार्यकारिणीने निदर्शने करून 3 सप्टेंबरपासून एसटी महामंडळ कामगार संपावर जाणार असल्याचा इशारा दिला होता.
तरीही राज्य सरकारकडून कामगारांच्या मागण्यांची दखल घेण्यात न आल्याने त्याचा विपरीत परिणाम एसटी महामंडळाच्या दैनंदिन कामावर झाला. ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या एसटीची धाव कर्मचारी आंदोलनामुळे बुधवारी मंदावली. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ऐन सणासुदीच्या दिवसांत तसेच गणेशोत्सव काळात आगारातून बस सुटत नसल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. दुर्गम व ग्रामीण भागात एसटीची सेवा ठप्प झाली आहे.
संघटनेचे विभागीय सचिव अमित ठाकूर, रेखा बाळेकरमकर, कल्पना सोनवने, विठ्ठल गेडाम, जयंत इंगळे, प्रल्हाद भानारकर, गजानन नागोसे, किशोर चौधरी, किशोर वानखेडे, अरविंद उईके, संतराज कलिये धरणे देत होते.
शासनाच्या कर्मचान्यांप्रमाणे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन द्यावे, वेतनवाढीतील फरक दूर करावा, महागाई भत्त्याची थकबाकी द्यावी, करारातील त्रुटी दूर कराव्यात, शिस्त आणि आवेदन पद्धतीमधील बदल करावा, वैद्यकीय कॅशलेस योजना लागू करावी आदी मागण्यांसाठी एसटी महामंडळ संघटनांनी स्थापन केलेल्या संयुक्त कृती समितीने हे आंदोलन पुकारले आहे. गडचिरोली व अहेरी आगारासमोर कर्मचायांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments